हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका
द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत .
www.ayushdarpan.org
Pages
▼
Wednesday, November 24, 2010
कडुलिंब
कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे.
कडुलिंब रक्तदोषहारक व कृमीनाशक असून त्याच्या काड्यांचा वापर दात घासण्यासाठी करतात तसेच अनेक आयुर्वेदिक औषधांमधील एक प्रमुख घटक म्हणून कडुलिंब वापरतात. कडुलिंबाचा कीटकनाशक, जंतुनाशक म्हणून तसेच हवा-शुद्धीकरणासाठी उपयोग होतो.
कडुनिंबाचे पाने दररोज खाली असता त्याच्या साईड परिणाम होता त का?
ReplyDelete