Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 31, 2015

सोरियासिस

सोरियासिस 

👽
               विरोधी आहार, मनाची दुष्टी आदी कारणांनी सोरियासिस सारखे त्वचाविकार होतात.....
शरीरातील कुठल्या धातुपर्यंत सोरियासिस चा आजार पोहचलाय हे समजले तर बरयाचदा लवकर आजार दुरूस्तीसाठीचा प्रयत्न करता येतो...
शरीरातील पहिला धातु म्हणजे आहारापासुन बनणारा रसधातु होय यात विरोधी आहार वा मनोदुष्टीजन्य आम क्लेद पोहचला असता रसापासुन पोषण होणारया त्वचेवरील रंगात बदल, तोडल्याप्रमाणे वेदना, कोरडेपणा उत्पन्न होतो.
            रक्त आणि पित्त हे शरीरात एकमेकांच्या आश्रयाने राहतात. पित्त हा रक्ताचा मल असल्याने रक्त या दुसरया धातुत क्लेद पोहचला असता घाम अत्याधिक प्रमाणात येतो, सुज येते. काही वेळा क्लेदाने घामाच्या मार्गाचा अवरोध होतो अशा वेळी तळपायातुन घाम बाहेर निघतच नाही. तळहात व तळपाय हे रक्तबहुल अवयव एकदम लाल दिसावयास लागतात.
शरीरावर फोड चट्टे आले म्हणजे शरीरातील तिसरा मांसधातु दुष्टी पावला असे समजता येइल. मांसधातु ठिकाणी दोष पोहचले की बाह्य लक्षणे spotting चट्टे स्वरूपात दिसावयास लागतात.
                   शरीरातील central धातु म्हणजे मेद चरबी पर्यंत आमदोष पोहचले असता खाज सुटावयास लागतो, चट्टयातुन स्राव निघते. आजाराने अर्ध शरीर व्यापल्याचे लक्षण मानता येइल याला.
मेदानंतर चा धातु म्हणजे अस्थि हाडे हा द्रवरहित असल्याने एकदम परिणाम होत नाही पण काही लोकांत आमविषाने हाडांची झीज होऊन गंभीर उपद्रव उद्भवतात.
              विरोधी आहार सेवन केल्याने मज्जाबिघाडते पुर्वी विरोधी आहार जसे शिकरण, फुडसलाड, मुगाची खिचडी दुध आदींचे सेवन केलेले असेल तर मज्जाही बिघडते सुरूवातिलाच त्वचेवरून कोरडे पापुद्रे layers, डोक्यातुन कोंडा निघतो. नतंर सर्व शरीर त्वचाविकाराने व्यापते.....
औषधी चिकित्सा देखील दोष घाण शरीरात किती दुरपर्यंत पोहचली यावरच ठरते. अस्थि मज्जेच्या ठिकाणची लक्षणे असतिल तर आजार दुरूस्त करावयास जास्त काळ लागतो. सर्व शरीर व्यापलेले असल्यास आजार याप्य वा असाध्य होतो बरयाच वेळा.
मांसमेदधातुपर्यंत पोहचलेले सोरियासिस दुरूस्तीसाठी सुखसाध्य वा कष्टसाध्य असते. उत्तरोत्तर धातुमध्ये पसरत जाणारया सोरियासिस चा लवकरात लवकर अटकाव योग्य चिकित्सा व पथ्यापथ्याच्या सल्ल्याने करावा....
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका 
नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Wednesday, December 30, 2015

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित याबाबतीत विचार करताना तीन बाबींचा विचार हवा आहे.
१) कच्चामाल उत्पादनातील अवस्था
२) कच्च्या मालातून पक्का माल तयार होताना त्याची अवस्था
३) पक्क्या मालाचे वितरण होतानाची अवस्था
१) रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर धोकादायक
भारतातील अन्नधान्याचा विचार केला असता भारत देशाने अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात अत्यंत प्रगती केलेली आहे. भारतात अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन होत असते; परंतु धान्य पिकवताना शेतामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जातो. कोणत्याही प्रमाणाशिवाय कीटकनाशके व खतांचा वापर केला जातो. यामुळे या कीटकनाशकांचा, रसायनांचा प्रवेश अन्नधान्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात होत असतो. हॉटेलमध्ये किंवा बाहेर उघड्यावर, चौपटीवर खाण्याची संस्कृती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. दररोज हजारो लोक उघड्यावरील अन्नपदार्थ खात असतात. हे अन्नपदार्थ बनविणा‍-यांचे आरोग्य, त्यांचे स्वयंपाकघर त्यात वापरले जाणारे पदार्थ याची तपासणी करणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही. लग्न, इतर समारंभ यात सतत जेवणाच्या पंगती उठत असतात. सकाळच्या चहासोबत बेकरीचे पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ले जातात. आपल्या देशांत भाजीपाला उघड्याने रस्त्याच्या कडेला विकला जातो तर चपला बूट एसी दुकानात विकले जातात. ही शोकांतिका आहे.
२) चवीमुळे गाड्यांवर, अस्वच्छ खाणे विषबाधेस कारण
हॉटेलमध्ये, गाड्यावर खाताना पदार्थांची फक्त चव पाहिली जाते ते कसे बनवले जातात ते नाही. स्वयंपाकघर अस्वच्छ कर्मचारी तसेच अस्वच्छ भांडी असतात. शिवाय स्वयंपाक बनवणारे, दारू पिऊन तंबाखू चघळत, अपु-या जागेत घामाच्या धारात पदार्थ बनवणे सुरू असते. अन्नधान्य -भाज्यांची सफाई, धुलाई न करताच त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मग आपल्याला अन्न विषबाधेमुळे लोकांना त्रास झाला. अशा बातम्या महिन्यातून एकदा तरी वाचाव्या लागतात. रुग्ण डॉक्टरकडे आल्यावर स्वत:च सांगतो की मी काल-परवा बाहेर गाड्यांवर खाल्ले होते त्यामुळे जुलाब होत आहे, उलटी होत आहे, पोट दुखत आहे. बाहेर गाड्यांवर वा इतर ठिकाणी कोणत्या तेलात भजे, वडापाव तळतात हे पाहायला हवे.
३) अस्वच्छ, अशुद्ध पिण्याचे पाणी
याशिवाय पिण्याच्या पाण्याचेही तेच हाल असतात. अनेक ठिकाणी हॉटेलमधील अन्न साठवणीचे ठिकाणही अत्यंत गलिच्छ असते. कित्येक ठिकाणी झुरळे उंदरांचा सुळसुळाट असतो. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे हाल अत्यंत वाईट असतात. पाण्याच्या टाक्या वर्षानुवर्षे धुतल्या जात नाहीत. त्या निर्जंतुक केल्या जात नाहीत. पाणी साठविण्याच्या पद्धती किंवा पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती अत्यंत जुनाट आहेत.
४) पदार्थांत सोडा, रंग, भेसळीचे पदार्थांचा वापर
अन्न पदार्थांमध्ये सोडा, प्रिझर्वेटिव्ह, रंग वापरण्याचे काहीही नियम नाहीत किंवा प्रमाण नाही. सध्या सर्व काही रेडिमेड वापरण्याकडे कल आहे. भेसळयुक्त लाल तिखट, भेसळयुक्त हळद, रंग दिलेली बडीसोप, रंग मिसळलेली चहापत्ती हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. आपल्याकडे काळीमिरीच्या ठिकाणी पपयाच्या बिया मिसळतात. केशरच्या ठिकाणी रंग दिलेल्या मक्याचे केस मिळतात. दिवाळी -दसरा अशा सणांच्या वेळेस खवा हा पूर्णपणे भेसळयुक्तच असतो. अन्न प्रशासनाने भेसळयुक्त खवा जप्त केला. सणासमारंभाच्या काळात वापरण्यात येणारे तेल-तूप-डालडादेखील बहुतांशी भेसळयुक्तच असते.
५) खवा, मिठाई, दुधातही भेसळीने दूध विषारी
भारतात बहुतांशी दूध हा आहारातील मुख्य घटक आहे. मात्र या दुधातही एका लिटर दुधामागे २ लिटर इतकी पाण्याची भेसळ असते. गायी-म्हशी-शेळ्यांना केमिकलची इंजेक्शन्स देऊन दुधाची मात्रा वाढविली जाते. उन्हाळ्याच्या काळात दुधामध्ये दूधपावडर मिसळून विकले जाते. रेल्वे स्टेशन, बसस्थानक या ठिकाणी उघड्यावर, धुळीत चहा तयार होतो.
६) फळांना रंगाचे वा अतिगोडीसाठी सॅकरीनचे इंजेक्शन
भेसळीत फळेदेखील सुटत नाहीत, टरबुजास रंगाचे व साखरेच्या द्रवणाचे इंजेक्शन देऊन ते लाल व गोड बनविले जातात. आंबे-केळी-चिक्कू ही अत्यंत विषारी केमिकलद्वारे पिकवले जातात. सफरचंदास वॅक्स लावून त्यास चमकवले जाते.
७) पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग
पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग दिला जातो. हॉटेलमधील प्रत्येक मिठायामध्ये आजकाल साखरेऐवजी सॅकरीन नावाचा विषारी साखरेपेक्षा १००० पट गोड पदार्थ वापरतात.
८) उघड्यावरील मासंविक्री अनारोग्यास निमंत्रण
मांसाहारामध्येदेखील कोणत्याही जनावरांची तपासणी झालेली नसते, आजारी-अशक्त जनावरे उघड्यावर कापली जातात व उघड्यावर व उघड्यावर रस्त्याच्या कडेला मांस-मासोळी विकली जाते.
९) असुरक्षित अन्नप्रक्रियाने उलटी, जुलाब, साथरोग
याप्रमाणे अत्यंत असुरक्षितरीत्या अन्नधान्यांचे -खाण्याच्या पदार्थांचे उत्पादन केले जाते, त्याची वाहतूक-त्याची साठवणदेखील असुरक्षित असते.
सर्वसामान्य नागरिकांसाठी केली जाणारी अन्नप्रक्रियादेखील असुरक्षित पद्धतीची असते. अशा दूषित, रसायनयुक्त आहाराच्या सेवनाने जुलाब उलटी, अतिसार, पचनाचे विकार, कावीळ, कॉलरा, क्षय, विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी, त्वचारोग, टॉयफाईड यासारखे जीवघेणे आजार होतात. कित्येकदा सामूहिक अन्न विषबाधा होणे, संपूर्ण गावात काविळीची साथ येणे, उलटीजुलाबाची साथ येणे असे प्रकार भारतात नित्याचेच आहेत.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय, लातूर
मोबा. ०९३२६५ ११६८१

फ्रीजचा उपयोग --- रोगकारक

फ्रीजचा उपयोग --- रोगकारक

आधुनिक विज्ञानाची एक देण म्हणजे फ्रीज होय. फळे भाज्या दुध खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फ्रीजच्या वापराचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे अत्यावश्यक आहे.
फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ कमी तापमानात बराच काळ दिवस ठेवल्याने त्यावर थंड गुणधर्माचे संस्कार होतात. संस्कार झाल्याने " संस्कारोही गुणांन्तरधारम् उच्यते" या नियमांप्रमाणे पदार्थामध्ये थंड गुणधर्म वाढुन हे सर्व पदार्थ वातुळ वात वाढविणारे व सोबत कफाला बिघडवणारे प्रकुपित करणारे ठरतात..
शरीरातील सातही धातुंवर फ्रीजचा परिणाम होतो यात शंका नाही कारण शरीर खालेल्या अन्न व पेय पदार्थांपासुनच बनते.
शरीरातील रक्त हे अनुष्ण म्हणजे किंचित उष्ण गरम गुणधर्माचे आहे. नेहमी फ्रीजमधील पदार्थ सेवन करणारया लोकांत रक्ताची उष्णता कमी होते. शरीरातील रक्त योग्य प्रतिचे तयार होत नाही. फ्रीजसंस्कारीत रक्ताचा पुरवठा सर्व शरीराला होत असल्याने परिणाम सर्व शरीरावर होतो. छोट्या छोट्या रक्तवाहिण्या मधील रक्तप्रवाह मंद होतो आणि तीव्र वेदना दिसावयास लागतात. विशेषत पाठीचा भाग, मणके, पायाच्या पोटरया, हातापायांचे छोटे व मोठे सांधे (joints), टाचदुखी, अर्धडोकेदुखी अशा प्रकारचे बरेच त्रास फक्त फ्रीजमुळे दिसावयास लागतात. त्रास कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय केले जातात पण आजाराचे मुळ कारण शरीरातील मुळ धातु रक्त बिघडवणारया फ्रीजचा उपयोग बंद होत नाही.
तयार अन्न रात्र उलटुन गेले की शिळे बनते ते मग फ्रीजमधील असो वा इतर कुठेही ठेवलेले असो.
अन्न फक्त विटत नाही पण ते थंड गुणधर्मामुळे पचावयास अतिशय कठीण जड बनते. असे अन्न खाल्ले असता शरीरात पोषक आहाररस तयार होत नाहीत पण मलभाग अधिक प्रमाणात तयार होत असतो. शरीराचा मल असलेले केस गळतात पण बिघाडाचे कारण फ्रीजचा उपयोग टाळला जात नाही.
फ्रीजचे अन्न दुध फळे पाणी पचविण्यासाठी शरीराची सर्व शक्ती खर्च होते. त्यामुळे कष्टाची कामे तर सोडाच पण साधे काम करण्यासाठी energy पुरत नाही.
Energy पुरत नाही म्हणुन energy वर्धक पदार्थांचे सेवन सुरू होते. पण हे सर्व पदार्थ पचावयास जड असल्याने शरीर पचवु शकत नाही. सर्व त्रास आणखी वाढत जातात पण सर्वांचे मुळ फ्रीजचा वापर टाळला जात नाही...
आयुर्वेदात शीतोष्णक्रमसेवनात म्हणजे थंड गरम क्रमसेवनाने स्वेद (घाम) बनविणारी संस्था बिघडते असे सांगितले आहे.
या संस्थेची मुलस्थाने शास्रानुसार मेदोमुळ म्हणजे (वृक्क kidney व वपावहन पोटातील चरबी) व रोमकुप म्हणजे केसांचे मुळ जेथुन निघते तो भाग हा असते. मुळस्थान बिघडले असल्याने किडनीचे काम योग्य प्रकारे होत नाही शरीरातील मलभाग शरीराच्या बाहेर योग्य रिकीने पडत नाही. तपासणी केली असता uric acid cholesterol, sr creatitine etc normal च्या पुढे जातात. केस गळायला लागतात. केस गळणारया, सांधेदुखी, पाठदुखी ते अर्ध डोकेदुखी चा त्रास असणारया लोकांनी फ्रीजचा वापर टाळणे अत्यावश्यक असते. नाहीतर कुठलाही त्रास मुळासकट कमी होत नाही. वा औषधींनी काहीच फरक पडत नाही कारण सर्वांचे मुळ फ्रीज बंद होत नाही. फ्रीजला रोगांचे मशीन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फ्रीजचा वापर करणारयांनी याचा विचार जरूर करावा.. फ्रीजचा वापर सुरू करण्यापुर्वीची तब्येत आणि आजची तब्येत यात काय बदल झालाय तो आठवुन पाहावा १ वेळा तरी..
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट (वातरोगांवर नियंत्रण व वेदनांपासून मुक्ती)

वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट (वातरोगांवर नियंत्रण व वेदनांपासून मुक्ती)







सूज व वेदनेबद्दल थोडक्यात -
कफ, पित्त आणि वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची तीन स्वसंवेद्य लक्षणे आहेत. कफाचे लक्षण आहे ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’. ह्या लक्षणांच्या मूळ कारणांची श्रेष्ठ चिकित्सा क्रमशः मध, तूप आणि तेल ह्या तीन द्रव्यांनी होते. म्हणून वातासाठी तेल हे सर्वोत्तम द्रव्य असल्याने सूज, वेदना, मुरडा, लचक अशा सर्व प्रकारच्या आजारांमध्ये तेलाचा प्रयोग श्रेष्ठ आहे. अक्षयने ह्या शास्त्रीय संकल्पनेवर आधारित वाताच्या दुखण्यांवर सेवनासाठी वातमुक्ता गोळ्या आणि बाह्य प्रयोगासाठी लिनिमेंट अशी दोन उत्पादने सादर केली आहेत.
कारणे -
• अपचन
• वाढते वय
• रोगप्रतिकार क्षमता खालावणे
• अनुवांशिक
• वजन वाढणे
• आघातजन्य
• व्यवसायजन्य आघात
• विशिष्ट खेळांमुळे आघात
• जीर्ण आजारांच्या परिणामाने
लक्षणे:
• स्थानिक उष्णता
• लाली
• वेदना
• आकारात वाढ
• हालचालीत अटकाव
• ज्वर

                                                                                                       • घामाचा अवरोध होणे

चिकित्सा सूत्रे
• शरीरातील शोथनिवारक यंत्रणा कार्यान्वित करणे
• शरीरस्थ दोषांना बाहेर घालविणे
• उष्मा वृद्धी करणारी चिकित्सा करणे
• स्नायु व सांध्यांना वंगण (स्नेहन) करणे
• पचनाचे तंत्र संतुलित ठेवणे
        वातमुक्ता गोळ्यांमध्ये उत्तम रोगनिवारक, शोथहर, संधिवातशामक आणि वेदनाहर गुण आहेत. प्रोस्टाग्लॅंडिन व ल्युकोट्राइन हे शरीरांतर्गत घटक शोथ निर्मितीस कारणीभूत असतात. सदर घटकांना प्रतिबंध करणारे स्राव ह्या पाठातील गुग्गुळ व शल्लकीमुळे उत्तेजित होतात हे खास लक्षात घेण्यासारखे आहे. ह्या पाठातील घटकद्रव्यांमुळे शरीराचे वजन कमी होते. वाढलेल्या वजनाचा भार सांध्यांवर सतत पडण्यामुळे होणारी झीज ह्यामुळे आटोक्यात राहते. ह्यातील पाचक औषधी द्रव्ये ‘अंतर्गत विषारी द्रव्यांचे’ (endotoxins) निर्हरण करतात. हाडजोडामुळे सांध्यांतील कुर्चांची (cartilages) स्थिती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते व हाडांची वक्रता (व्यंग) होण्यापासून संरक्षण होते.
      वातमुक्ता लिनिमेंट त्वचेतून खोलवर शोषले जाते ज्यामुळे सांध्यांची लवचिकता आणि स्निग्धपणा वाढून हालचाली सहज होतात. ह्यात पेट्रोलियम किंवा पॅराफिन सदृश कोणताही कृत्रिम घटक नाही. सर्वश्रेष्ठ अशा तीळ तेलाचा उपयोग आधारद्रव्य म्हणून केल्याने शोषण उत्तम होऊन वाताची परिपूर्ण चिकित्सा होते. त्वचेवर आग किंवा जळजळ करणाऱ्या बाम किंवा तेलांच्या तुलनेत ह्याची गुणवत्ता कैक पटीने अधिक आहे.
वातमुक्ता (विलेपित वटी)
प्रत्येक विलेपित वटीतील घटक द्रव्ये व प्रमाण
देवदार (Cedrus deodara), एरंडमूळ (Ricinus communis), हाडजोडा (Cessus quadrangularis), प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; शल्लकी निर्यास (Boswellia serrata), शुद्ध गुग्गुळ (Balsamodendron mukul) प्रत्येकी ५० मिलिग्रॅम; शुद्ध कुचला (Strychnous Nux-vomica) २५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य एरंडमूळ (Ricinus communis) आवश्यकतेनुसार
घटकद्रव्यांची कार्मुकता
देवदार : सूजनिर्मितीच्या प्रक्रियेत केंद्रबिंदु असलेले लायपॉग्झिजिनेझ स्राव रोखून सूज नियंत्रण करण्याचे प्रभावी कार्य देवदाराने होते. ह्याशिवाय उत्तम वेदनाशामक म्हणून ही वनस्पती स्वयंसिद्ध आहे.
एरंडमूळ : डायक्लोफिनॅक सोडियम नामक वेदनाशामक औषध आधुनिक वैद्यक शास्त्रात प्रसिद्ध आहे. कोणतेही कारण असो, ह्या औषधाने तत्काळ वेदना थांबते. एरंडमुळाचा तौलनिक अभ्यास ह्या औषधाबरोबर केला असता ह्यातील वेदनाशामक गुण तुल्यबळ असल्याचे निदर्शनास आले. शिवाय अन्य उपद्रवही (साइड इफेकट्स) होत नाहीत. आयुर्वेदातही आमवाताच्या चिकित्सेत एरंडमूळ श्रेष्ठ असल्याचे वर्णन मिळते.
                     “आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिणःl एक एव निहन्ताऽयमैरण्डस्नेहकेसरी ll”
                       आमवातरुपी गजेन्द्राचा नाश करणारा एकमेव सिंह म्हणजे एरंड स्नेह आहे.
अस्थिशृंखला : व्यायाम नेहमी अर्धशक्ति करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे. आवाक्यापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे हाडांतील सांध्यांची झीज होते व त्या ठिकाणी सूज येते. व्यायामाबद्दलच्या चुकीच्या समजुतीने किंवा जलद वजन नियंत्रणाच्या अपेक्षेने काही तरुण मंडळी अघोरी व्यायाम करतात. अशा कारणामुळे झालेल्या सांधेदुखीवर अस्थिशृंखलेचा प्रयोग वेदनामुक्तिसाठी सर्वश्रेष्ठ ठरला आहे.
शल्लकी : शल्लकी नावाच्या झाडापासून निघणाऱ्या डिंकाला ‘शल्लकी निर्यास’ म्हणतात. ह्यात बोसवेलिक अॅसिड नामक कार्यकारी घटक असतो. ह्यामुळे उत्तम वेदना नियंत्रण होते व सांध्यांच्या हालचाली अल्पकाळात पूर्ववत होतात असे सिद्ध झाले आहे. संधिवात व आमवात ह्या दोन्ही संधिविकारात उपयोगी ठरणारे हे मौल्यवान औषधी द्रव्य आहे. सूजनिर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या ल्युकोट्राइन्सवर ह्याचे अवसादक कार्य होते.
शुद्ध गुग्गुळ : केवळ सूजनियंत्रण नव्हे तर विशेषकरून सांध्यांच्या सुजेवर शुद्ध गुग्गुळ अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठीसुद्धा गुग्गुळाचा उपयोग प्रसिद्ध आहेच. वजन वाढीमुळे सांध्यांवर पडणारा भार कमी करून ह्याचा दुहेरी फायदा होतो. सूज निर्मिती करणाऱ्या प्रोस्टाग्लॅंडिन्सना आटोक्यात ठेवून ह्याची क्रिया होते.
शुद्ध कुचला : अत्यंत प्रभावशाली वेदनाशामक म्हणून हे द्रव्य कार्य करते व वेदनेचे गांभीर्य त्वरित आटोक्यात येते. मात्र ही एक विषारी वनस्पती आहे. अर्धवट ज्ञानाने वापरलेले अमृत हे विषसमान ठरते तर डोळसपणे अभ्यासून वापरलेले विष देखील अमृतासमान उपयोगी ठरते. कुचल्याच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत जुळते. शरीरातील दोष बाहेर काढून औषधाची गुणवत्ता अमृतासमान करण्यासाठी आयुर्वेदाने ह्याची शुद्धी करण्याचे तंत्र दिले आहे. स्ट्रिकनीन व ब्रूसीन असे दोन विषारी घटक ह्यात असतात. पैकी स्ट्रिकनीन हे तीव्र विष आहे.
       शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धी केल्याने ह्यातील स्ट्रिकनीन नाहीसे होते आहे तर ब्रूसीन चे परिवर्तन आयसोब्रूसीन नावाच्या श्रेष्ठ वेदनाशामक द्रव्यात होते. ह्याचा परिणाम स्थानिक वेदनेबरोबरच मेंदूतील वेदना संवाहक नाड्यांवरही होतो. शुद्धी क्रियेमुळे कुचल्यातील अन्य उपयुक्त गुणधर्म क्रियाशील होतात तर घातक परिणाम पूर्णपणे नाहीसे होतात. ह्याने बुद्धि तल्लख होते, रोगप्रतिकार क्षमता बळावते, यकृताचे कार्य सुधारते, अपस्माराचे वेग रोखले जातात, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगात लाभदायक ठरते, पचन क्रिया सुधारते व सर्पविषावर उतारा म्हणून कार्य करते. म्हणून सार्वदेहिक दोषवैषम्य असलेल्या आमवातात देखील कुचला प्रभावी ठरतो.
वातमुक्ता (लिनिमेंट) :
१० मिलि लिनिमेंट मधील घटकद्रव्ये व प्रमाण
विषगर्भ तेल ३ मिलि, महामाष तेल, नारायण तेल प्रत्येकी २ मिलि, गंधपुरा तेल (Gaultheria fragrantissima) ३ मिलि
घटकद्रव्यांची कार्मुकता
विषगर्भ तेल : सांध्यांच्या सुजेवर अत्यंत गुणकारी असे हे तेल आहे. गृध्रसी (सायाटिका), डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कानामध्ये आवाज (टिनिटस), मांसक्षय, खूप चालण्यामुळे होणारी अंगदुखी, पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ अशा सर्वप्रकारच्या वातरोगांवर गुणकारी आहे.
महामाष तेल : पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ, चेहऱ्याचा पॅरालिसिस (फेशियल पॅरालिसिस), मन्यास्तंभ, हनुस्तंभ, सांधे आखडणे, पाठीच्या व मानेच्या मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस), मुकामार, आमवात व संधिवात, मांसक्षय, अशा विकारांमध्ये परम उपयोगी. ह्याचा विशेष उपयोग वार्धक्यात होणाऱ्या विविध वातविकारांवर उत्तम होतो.
नारायण तेल : लांबच्या प्रवासामुळे होणारी अंगदुखी, संधिवात, आमवात, वातरक्त (गाऊट), मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस) व हाडांना बळकटी देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
गंधपुरा तेल : हे पिवळसर सुगंधी तेल संधिविकार चिकित्सेसाठी जगप्रसिद्ध आहे. गंध थोडाफार निलगिरीप्रमाणे असतो. ह्यात मिथाइल सॅलिसिलेट नामक वेदनाशामक रसायन असते. हे तेल त्वचेवर लावल्याने शेकल्याप्रमाणे जाणवते व वेदना शमन करण्यास उपयुक्त ठरते.
उपयुक्तता 
आमवात
• संधिवात
• गृध्रसी
• वातरक्त
• कटिशूल व मन्याशूल
• मांसगत वेदना
• स्नायुशोथ, कंडराशोथ
• पृष्ठशूल, मान आखडणे, कंबरेच्या वेदना
आहार विहार 
• भाजलेले धान्य व हलका आहार घ्यावा
• गहू, जव, कुळीथ, आले, लसूण ह्यांचा आहारात वापर करावा
• थंड पदार्थांचे सेवन व बाह्य प्रयोग करू नये
• जेवणानंतर किमान दोन तास झोपू नये
• घामाला रोखू नये
• मध्यम प्रमाणात पण नियमित व्यायाम करावा
• वजन वाढू देऊ नये
सेवन विधी:
• तीव्र अवस्थेत : २ गोळ्या रोज तीन वेळा
• नित्यावस्थेत : २ गोळ्या रोज दोन वेळा
• लिनिमेंट : बाह्य प्रयोग, जरुरीनुसार दिवसातून २ किंवा ३ वेळा करून शेक द्यावा.
रोगावस्थेनुसार औषधसेवन मात्रा वैद्यांच्या सल्ल्याने बदलावी
उपलब्धी: 
गोळ्या : ४० विलेपित गोळ्या
लिनिमेंट : १०० मिलि पेट बाटली

AKSHAY PHARMA REMEDIES (INDIA) PVT. LTD.
Mumbai
व्यापारी चौकशी
महाराष्ट्र राज्य +919881167711

Saturday, December 26, 2015

विरूध्द अन्न


विरूध्द अन्न 🍨

यत्किञ्चिदोषमुत्क्लेश्य न निर्हरति कायतः |
आहारजातं तत्सर्वमहितायोपपद्यते|| च.सु.
जो कुठला आहार औषधी द्रव्य कफपित्त आदी दोषांना आपल्या स्थानात प्रकुपित करेल पण त्यांना शरीराच्या बाहेर काढणार नाही. अशा आहाराला अहितकर विरोधी आहार म्हणता येईल...
विरोधी आहाराचे आयुर्वेदानुसार प्रकार
 देशविरूध्द
 आपण ज्या देशात म्हणजे भौगोलिक प्रांतात राहतो तेथे पिकणारे धान्य पदार्थ फळे खाणे जास्त उपयोगी ठरते कारण तेथील वातावरणाला अनुसरणच निसर्ग फळे भाज्या धान्य उत्पन्न करते किंवा त्या भागात विशिष्ट धान्य फळे पिकतात..
उदा. कोकणात-- भात मासे etc
उर्वरीत महाराष्टात-- गहु ज्वारी etc
कोकणा सारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात स्निग्ध तेल तैलयुक्त व थंड गुणधर्माचे पदार्थ खाणे व तापमान अधिक असणारया विदर्भ मराठवाड्यात कोरडे तीक्ष्ण पदार्थ खाणे देशविरोधी आहार घेणे ठरते
 कालविरूध्द ⛅
काळानुरूप रूतुनुसार आहार न घेणे जसे थंड काळात थंड कोरडा स्नेहरहित (तैलतुपरहित) आहार घेणे
 तसेच उन्हाळ्यात तिखट उष्ण गुणधर्माचा आहार घेणे काळविरोधी ठरते..उदा.. उन्हाळ्यात वसंत रूतु, oct heat मध्ये गरम गुणात्मक दही खाणे काळाच्या विरोधी ठरते तर पावसाळा हिवाळ्यात थंडी असताना दही काळानुरूप आहार ठरते..
अग्निविरूध्द (भुकेच्या विरूध्द)
भुक मंद असताना जडान्न खाणे किंवा भुक तीक्ष्ण असताना कमी वा हलके पदार्थ खाणे हे भुकेच्या विरोधी आहार ठरते.. भुकेनुसार घेतलेला आहार विरोधी ठरत नाही.
 मात्राविरूध्द
 मध व तुप समान मात्रेत एकत्र खाणे मात्रेच्या विरूध्द आहे..
 सात्म्यविरूध्द
 एखाद्या व्यक्तीला प्रकृती नुसार तिखट गरम गुणात्मक आहार suitable असेल अशा व्यक्तीने गोड थंड गुणाचा आहार घेणे. जो आहार आपणास suit होत नाही तो खाणे म्हणजे सात्म्यविरूध्द आहार घेणे होय.
 संस्कारविरूध्द
 दही गरम करून खाणे, कुठलेही अन्न दोन वेळा गरम करून खाणे ही संस्कार विरूध्द अन्नाची उदाहरणे आहेत. संस्कार विरूध्द अन्न म्हणजे अन्न चुकिच्या पध्दतीने बनवुन खाणे पनीर चा समावेश ही संस्कार विरूध्द अन्नात करता येईल..
 वीर्यविरूध्द
 थंड गरम पदार्थ एकत्र खाणे जसे चहाच्या आधी व नंतर थंड पाणी पिणे.. थंड गुणात्मक दुध व गरम गुणात्मक मासे एकत्र खाणे हे वीर्यविरूध्द अन्नाचे उदाहरण आहे.
 कोष्ठविरुध्द (पोटाच्या विरोधी)
जो व्यक्ती अधिक मात्रेत आहार पचवु शकतो अशा व्यक्तीने अत्यल्प आहार घेणे व जो व्यक्ती अधिक मात्रेत आहार पचवु शकत नाही अशा व्यक्तीने अत्याधिक आहार घेणे कोष्ठ म्हणजे कोठ्याच्या विरोधी ठरते..
 अवस्थाविरूध्द
 परिश्रम, मैथुन तसेच व्यायाम आदी कार्यात असणारया लोकांना वातवर्धक आहार देणे व ज्याला झोप आळस अत्याधिक प्रमाणात येतो अशा व्यक्तीने कफवर्धक आहार घेणे. हे अवस्था विरूध्द आहार घेणे ठरते.
 क्रमविरूध्द
 जो व्यक्ती मलमुत्रांचा त्याग न करता वा भुक नसताना वा अत्याधिक भुक लागुन गेल्यावर, वा जेवणाची सुरूवात तिखट खारट पदार्थांनी, व जेवणाची शेवट गोड पदार्थांनी करतो तो क्रमविरूध्द आहार घेत असतो...
 परिहारविरूध्द
 प्राण्यांच्या मांसाच्या सेवनानंतर पुन्हा गरम गुणधर्माचे पदार्थ खाणे. म्हणजे आग लागलेली असताना त्यात रॉकेल ओतल्या सारखे होय.. यालाच परिहार विरूध्द अन्न म्हणता येईल
 उपचार विरूध्द
 तुप वैगेरे स्नेहयुक्त पदार्थ सेवनानंतर
 थंड पाणी पिणे हे उपचार विरूध्द उपक्रमाचे उदाहरण होय.
 पाकविरूध्द
 कच्चे बनलेले अन्न वा अधिक शिजलेले अन्न वा कपरलेले अन्न पाकविरूध्द प्रकारचे अन्न होय.
 संयोग विरूध्द अन्न
 आंबट पदार्थ दुधासह घेणे वा दुध फळे दुध मीठ एकत्र खाणे. हे संयोग विरूध्द आहार आहे.
 ह्रदय विरूध्द अन्न
 जो आहार मनास रूचत नाही तो आहार ह्रदय विरूध्द प्रकारात येतो.
मनास रूचकर पण शरीरास हितकारक आहार घेणे उपयुक्त असते.
 सम्पद् विरूध्द आहार
 असे द्रव्य पदार्थ घेणे जे अजुन योग्य रितीने तयार झाले नाहीत वा तयार होऊन बराच काळ लोटल्याने खराब झाले आहेत.. उदा. कच्चे खाण्यास अनुपयुक्त फळे वा पिकुन खराब झालेली फळे खाणे.
 विधीविरूध्द आहार
 आयुर्वेदात आहार घेण्याचे जे नियम विधी सांगितलेली आहेत त्यांचे पालन न करता आहार घेणे हे विधी नियम विरूध्द अाहारसेवन ठरते.
जसे एकान्तात जेवन न करणे, रात्री दही सातु खाणे...इत्यादी
🔥 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती 💪🏻
व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्|| वा.सु. ७/४६
 व्यायाम करणारे, स्निग्ध आहार घेणारे, अग्नि भुक चांगली असणारे, तरूणवयात व बलवान अशा लोकांत जरी विरूध्द अन्न सेवन केले तरी फारसे विकार होत नाहीत. तसेच सवयीमुळे व कमी प्रमाणात विरूध्द अन्न फारसे बाधक ठरत नाहीत.
🍀विरूध्द पदार्थ अन्न सेवनाने होणारे त्रास🍀
विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.....
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग(रक्त कमी होणे) आमविष(पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड, विविध त्वचाविकार सोरियासिस,ग्रहणीरोग( ibs),सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत. नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात. विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा......
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 वैद्य गजानन मॅनमवार
9028562102,9130497856

Friday, December 25, 2015

थंडी मध्ये नियमित तेल मालीश करा ! आरोग्य राखा....


थंडी मध्ये नियमित तेल मालीश करा ! आरोग्य राखा....

शरीरास दररोज तेल मालीश करणे यासच आयुर्वेदात अभ्यंग करणे असे म्हणतात. ऽ दररोज शरीरास साधे तिळ तेल लावुन मालीश केल्यास त्वचा मृदु होते., शरीरातील किंवा त्वचेवरील कोरडे पणा कमी होतो.
ऽ नियमित अभ्यंग केल्याने शरीरात उत्साह निर्माण होतो, शक्ती बल वाढते, आरोग्य प्राप्त होते.
ऽ सांधेदुखीचा आजार असलेल्यांनी नियमित सांध्यांना औषधी तेलाने मालीश केल्यास सांधेदुखीची तीव्रता खुप कमी होते.
ऽ नियमित अंगास तेल मालीश केल्याने मणुष्य दिर्घायु होतो.
ऽ दृश्टी दोष उत्पन्न होउ नये, अकाली चश्मा लागु नये महणुन नियमित शरीरास तेल मालीश करावी.
ऽ नियमित अभ्यंग केल्यास झोप चांगली येते.
ऽ सर्वागास खाज येत असेल किंवा इतर त्वचा विकार असतील तर अंगास औषधी आयुर्वेदीक तेलाची मालीश केल्याने त्वचेची खाज कमी होते.
ऽ मधुमेही रूग्णांना सर्वांगाची आग होत असेल तर चंदन बला लाक्षादी तेलाने सर्वांगाची मालीश करावी. आग कमी होते.
ऽ सतत प्रवास करणा-यांनी शरीरात वात वाढु नये या करीता नियमित अभ्यंग करावा.
ऽ खेळाडु व्यक्तींनी, मॅरेथॉन मध्ये भाग घेणारयांनी, नियमित फिरायला जाणारयांनी, योगासने करणारयांनी नियमित तैलाभ्यंग करावा यामुळे खेळताना होणा-या आघातानंतर वेदना कमी होतात , शरीर लवचिक राहते. शरीराच्या सांध्यावर भार पडत नाही. 
ऽ कोणत्याही दीर्घ आजारानंतर आलेला अशक्तपणा तैलाभ्यंगाने कमी होतो.
ऽ नियमित मालीश साठी गंगा कंपनीचे शुध्द केलेले तिळाचे तेल वापरावे किंवा डाबर कंपनीचे महानारायण तेल वापरावे. 
ऽ तेल मालीश नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. 
ऽ शरीरावरील तेलाचा ओशटपणा काढण्यासाठी साबणाऐवजी बेसन-मसुळ दाळ पीठ-मुलतानी माती यांचा वापर करावा. डॉ. कविता पवन लड्डा लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म Slimming-Fitness-Beauty-गर्भसंस्कार OBESITY REDUCTION CENTER लातूर व्हॉट्स एप नंबर ०९३२६५ ११६८१

विषबाधा.

  विषबाधा.     


    होम मिनिस्टर च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोंचलेल्या आदेश बांदेकर या प्रसिध्द अभिनेत्यास दुधी च्या रसातून विषबाधा.
ही आजची बातमी वाचुन रसाहार चिकित्सेवर थोडक्यात लेख लिहण्याचा योग आला.
      नेहमी प्रमाणे आपण हा लेख वाचून इतरांच्या उपयोगी आहे असे वाटल्यास नक्की शेयर करा व ०९३२६५११६८१ या व्हॉट्स एप वर प्रतिक्रिया द्या.
      सध्या आपणास पाहण्यात येते की शहरातील चौकाचौकातून, वॉकींग ट्रॅक च्या शेजारी, विविध बाग बगिच्याच्या शेजारी सकाळ सकाळी विविध पालेभाज्यांचे, आवळा शरबत, गाजर बीट शरबत,्तुळस -पुदिना शरबत, कोरफड शरबत, गव्हांकुराचे ज्युस विक्री साठी आलेले असतात. पहाटे ४-५ वाजल्यापासुन हे ज्युस विक्रेते विविध पालेभाज्यांचा र्स विकत असतात. सर्व आजांरावर रामबाण उपाय अशा प्रकारचे फलक किंवा छापील पत्रके ते वाटत असतात. कॅन्सर पासुन एड्स, मधुमेह, हार्टएटॅक या सारख्या विविध आजारांवर रामबाण उपाय असा त्यांचा दावा असतो.
विविध पालेभाज्यांचे विविध गुणधर्म असतात, त्यामध्ये काही पालेभाज्या औषधी वापरासाठीही असतात. परंतु व्यक्तीची प्रकृती-त्याचे आरोग्य-त्याला असलेले आजार यानुसार औषधी ठरत असतात. समजण्यासाठी काही उदाहरणे घेऊ.
मधुमेह आहे, त्यास कडुनिंबाचा रस अत्यंत फायदेशीर म्हणुन कित्येक लोक सकाळ सकाळी कडुनिंबाचा ग्लास भर रस पितात. नित्यनियमाने दररोज कडुनिंबाचा ग्लास भर रस पिण्याने त्यातील कडू रसाच्या अतिसवनाने सांधेवात, सांधेदुखी चा आजार का नाही उद्भवणार, तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही या नियमानुसार नित्य नियमाने कडुनिंबाचा रस पिणारया लोकांमध्ये लैगिक शक्ती देखील कमी होते. त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो.
        याच पध्दतीने नित्य नियमाने कोरफडीचा रस देखील कित्येक लोक पितात त्यांना देखील कालांतराने किंड्नीचे गंभीर आजार होऊ शकतात असे अभ्यासातुन सिध्द झालेले आहे.
सतत अतिमात्रेमध्ये मुळ्याचा रस पिला तर कालांतराने पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. लहान आतड्यामध्ये अल्सर, आतड्यांना सुज असलेल्यांनी मुळा रस सेवन करणे अहितकर असते.
        दुधी भोपळ्याचा रस काढताना पहिल्यांदा त्याचा थोडासा तुकडा चाखुन बघावा, कित्येकदा काकडी प्रमाणेच दुधी भोपळा देखील कडू असतो. कडू प्रकारातील दुधी भोपळ्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. दुधी भोपळा रसामध्ये शक्यतो इतर कोणत्याही पालेभाज्यंचा रस एकत्र करू नये.
याच पध्दतीने ग्व्हांकुर रस , अत्यंत फायद्याचे असलेले हे ग्व्हांकुर रस शक्यतो घरीच गव्हाची रोपे लावुन त्यापासुन ताजा रस काढावा किंवा ते गव्हांकुर चावून खावे. १० मिनीटापेक्षा जास्त काळ रस काढून ठेवलेल्या गव्हांहुर रसा चा शरीराला काही एक फायदा होत नाही.
पालेभाज्यांचा रस आपल्या तब्येतीसाठी अत्यंत आवश्यक असतो, पण आपल्या प्रकृतीला काय आवश्यक आहे, आपल्या कोणत्या आजारासाठी कोणता रसाहार आवश्यक आहे, त्याची मात्रा किती हवी, किती दिवस घेणे आवश्यक आहे, कशा पध्दतीने घेणे आवश्यक आहे याचा अभ्यास महत्वाचा असतो . आपली पचन शक्ती चा देखील अभ्यास महत्वाचा असतो.
        पालेभाज्यांचा रस काढताना त्या स्वच्छ धुवुन थोडयाशा वाफवुनच त्याचा रस काढावा. वाफविल्यामुळे तो रस पचनासाठी सोपा असतो. चवीसाठी आले, लसूण, जिरे, मिरी, सुंठ, हिंग, मोहरी यांचा वापर असावा. शक्यतो घरी पालेभाज्या आणुनच त्याचा रस काढुन प्यावा.
पालेभाज्यांच्या बाह्य आवरणावर हजारो बारीक बारीक अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. पालेभाज्यांचा रस काढणारी मंडळी कटाक्षाने प्रत्येक पान न पान स्वच्छ धुऊन रस काढत असतील का? त्यामुळे ज्यांना कृमी, जंत, आमांश, पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, उदरवात हे विकार नेहमी नेहमी होत असतात, त्यांनी पालेभाज्या काळजीपूर्वक निवडून स्वच्छ करूनच खाव्यात. पोटाची तक्रार असणाऱ्यांनी कच्च्या पालेभाज्या किंवा पालेभाज्यांचा रस टाळलेलाच बरा.
         कित्येक ठिकाणी तर ताज्या पालेभाज्या उपलब्ध नसताना घरी बाजारातून आणलेल्या सुक्या पावडर मध्ये पाणी कालवुन ते ताजे ज्युस आहे असे भासवुन विकले जाते. उदाहरणात बाजारामध्ये दुधी भोपळ्याचे पावडरही मिळते, कारले पावडर ही मिळते, कडुनिंब पत्र पावडरही मिळते, कोरफड-आवळा पावडर ही मिळते. यामध्ये पाणी कालवले की विकायला तयार.
लक्षात घ्या कित्येक असाध्य आजांरावर पालेभाज्यांचे रस चिकित्सा उपयुक्त ठरली आहे. ही माहीती आपणास देण्याचा एकच उद्देष की औषधा साठी एखाद्या रसाचा/ज्युस चा वापर करायचा असेल तर तो चिकित्सकाच्या सल्ल्यानेच करावा. आयुर्वेदिक डॉक्टर्स आपणास या बाबत चांगले मार्गदर्शन करु शकता. ऐकीव माहितीवर किंवा कोठेतरी वाचुन स्व चिकित्सा करणे हानीकारक ठरते.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पंचकर्म Slimming-Fitness-Beauty-गर्भसंस्कार
OBESITY REDUCTION CENTER
लातूर
व्हॉट्स एप नंबर ०९३२६५ ११६८१

तारूण्यपिटिका पिंपल्स

तारूण्यपिटिका पिंपल्स

शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन
     सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, ...वात आणि रक्ताच्या बिघाडाने पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात..
    रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल..


रक्त बिघडवणारी कारणे.......
१.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण high alcohol level hard drinks चे सेवन करणे
२.अतिनमकीन पदार्थांचे सेवन करणे, अतिआंबट पदार्थांचे सेवन करणे, अतिप्रमाणात तिखट पदार्थ खाणे, तिळाचे तेल खाणे, उडीद दाळ अधिक खाणे ही देखील रक्त बिघडवणारी कारणे आहेत.
३.दही दह्यावरचे पाणी, विरूध्द आहार सेवन करणे, सडलेले दुर्गंधीत पदार्थांच्या सेवनाने, जड पदार्थ खाऊन दिवसा झोपल्याने, अतिरागावणे, अति उन्हात फिरणे, आगिजवळ काम करणे, उलटी आदींचा वेग रोखल्याने specially नेहमी antaacid खाणे,मार लागणे, शारीरीक व मानसिक संतापाने, पुर्वीचा आहार पचला नसताना पुन्हा जेवन करणे आदी कारणामुळे देहाचा मुळ रक्त बिघडते. आणि बिघडलेले रक्त कफवाताला बिघडवुन चेहरयावर तारूण्यपिटिका पिंपल्स निर्माण करते. ज्या रक्तामुळे निर्माण झालेल्या असल्याने वेदना निर्माण करतात..
      त्याकरीताच देहाचा मुळ योग्य राहण्यासाठी वरील कारणे टाळावित. कारणे घडत असल्यास रक्तमोक्षन विरेचन औषधी जळु लावणे आदि उपक्रम वैद्याच्या सल्ल्याने करावेत. बाह्य औषधींचा उपयोग तात्पुरत्या स्वरूपात होतो. बिघडलेले रक्त सुधारल्याशिवाय तारूण्यपिटिका पिंपल्स पुर्णपणे कमी होत नाहीत. रक्त सुधारण्याकरिता पोटातुन औषधी घ्याव्या लागतात तसेच जळु लेप आदी local उपक्रमांनी दुरूस्त झालेले पिंपल्स पुन्हा चुकिची कारणे घडल्याशिवाय उत्पन्न होत नाहीत...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
रामानंद नगर
 पावडेवाडी नाका
नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102 ,9130497856

विविध तेलांचे गुणधर्म

 विविध तेलांचे गुणधर्म

तैलं स्वयोनिगुणकृद्वाग्भटेनाखिलं मतम्||
अतः शेषस्य तैलस्य.....स्वयोनिवत्|| सार्थ भावप्रकाश
...
    तेल ज्या पदार्थांपासुन बनविले असेल त्या पदार्थांप्रमाणे तेलाचे गुणधर्म असतात असे वाग्भटाचार्यांनी सांगितले आहे...
    खाण्यासाठी कुठले तेल वापरावे हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न. वरील सुत्रात या प्रश्नाचे उत्तर आहे.
तिळाचे तेल खाण्यास निषिध्द सांगितले आहे पण अभ्यंगासाठी उत्तम असते.
मोहरीचे तेल उष्ण (गरम) गुणात्मक असते त्यामुळे थंड प्रदेशात मोहरी तेलाचा वापर होतो.उदा. उत्तर भारतात थंडीपासुन संरक्षणार्थ मोहरीच्या तेलाचा वापर होतो.
     नारळ समुद्रकाठावर उगवतात आकाशिय गुणधर्माचे असल्याने जास्त पाऊस पडणारया दमट वातावरणात उपयोगी ठरतात. कोकण किनारपट्टी भागात खोबरयाच्या तेलाचा वापर शरीरासाठी उपयोगी ठरतो.
जवसाचे तेल व करडई तेल हे दोन्ही गरम गुणधर्माचे पाककाळात तिखट असल्याने डोळ्यांकरिता अहितकर आहेत.
     शेंगदाणा व सुर्यफल सर्वत्र पिकतात. साहजीकच त्यांचे तेल खाण्यासाठी आपल्या भागात सर्वात प्रशस्त असते.
         बादामाचे खसखस आंदी पौष्टीक पदार्थापासुनचे बनविलेले तेल बलवर्धक असते.
गेल्या काही वर्षात सर्वत्र पसरलेले तेल म्हणजे सोयाबीन तेल. सोयाबीन हा खुपच जड पदार्थ. याला शाकाहारींचे मटण असेही म्हणतात. सोयाबीन पचावयास जड असल्याने त्यापासुन बनलेले तैलही पचावयास जड होते. काळानुरूप लोकांचा आहार श्रम नसल्याकारणाने कमी होत आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचा उपयोग श्रम भुक चांगली असतानाच जास्त उपयोगी..
        दोन किंवा अधिक तेल एकत्र मिसळुन खाणे. हे गुणधर्माच्या चष्म्याने पाहता येत नाही. संयोगाचा परिणाम गुणधर्म काय होतो हे रूषिमुनीच सांगु शकतात. संयोग मुनिरेव जानाति |
एकाच तेलाचा वापर वारंवार तळण्यासाठी किंवा इतर प्रकारे करणे हे संस्कार विरूध्द होते. अशा तेलापासुन बनविलेले पदार्थ विरूध्द संस्काराचे बनतात. जे विरूध्द आहारसेवन जन्य आजारांची निर्मिती करू शकतात..
 तुप व तेल संस्कारीत पदार्थ 
ह्रद्याः सुगन्धिनो भक्ष्या लघवो घृतपाचिताः||
वातपित्तहरा बल्या वर्णदृष्टीप्रसादनाः|
विदाहिनस्तैलकृता गुरवः कटुपाकिनः||
उष्णा मारूतदृष्टिघ्नाः पित्तलास्त्वक्प्रदुषणाः| सु.सु.४६
    तुपाच्या संस्काराने बनविलेले पदार्थ मनास आनंद देणारे, सुगंधी, पचावयास हलके, वातपित्तनाशक, बलवर्धक, वर्ण आणि दृष्टीसाठी हितकारक असतात.
 तर तेलाच्या संस्काराने बनविलेले पदार्थ विदाहकर (जळजळ निर्माण करणारे), पचावयास जड, पचनाचा शेवटी तिखट बनणारे, गरम, वात आणि दृष्टीसाठी अहितकारक, पित्तवर्धक आणि त्वचेकरिता हानीकारक असतात...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

पनीर विरूध्द अन्न

पनीर विरूध्द अन्न 

        हॉटेलात जेवणासाठी गेल्यानंतर veg लोकांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर होय.calories च्या चष्म्याने पाहिले असता पनीर हा फारच energy असले...ला पदार्थ आहे.
आयुर्वेददृष्टया पनीराचे गुणधर्म पाहिले तर बनविण्याच्या विरूध्द पध्दतीमुळे पनीर विरूध्द अन्नात गणला जाऊ शकतो.
       पनीर हा दुधाला फाटुन म्हणजे दुधात लिंबुरस आदी अम्ल पदार्थ (acids) टाकुन विशिष्ट पध्दतीने बनविला जाणारा पदार्थ आहे. फाटलेल्या दुधापासुन बनविला जात असल्याने हा विरूध्द पदार्थ (पचावयास कठीण) आहे...
तरीपण उत्तर भारतात (पंजाब हरियाणा) आदी राज्यात मोठ्या प्रमाणात पनीर खाण्यासाठी वापरला जातो कारण तेथे निसर्गःतच थंडी जास्त असते. थंड वातावरणामुळे भुक उत्तम असल्याने पनीर सारखा पचावयास जड पदार्थही तेथे पचविला जातो. पण नेहमी वापरात असणारया लोकांत लठ्ठपणा उत्पन्न होतो आणि तो लठ्ठपणा पिढानपिढ्या पुढे सरकतो.
        महाराष्ट्र उष्ण कटिबंधजन्य प्रदेश थंडी फक्त हिवाळ्यात ति पन उत्तरेकडील प्रदेशाच्या तुलनेत एकदम कमी मग पनीर सारखा पचावयास जड विरूध्द पदार्थ पचनार कसा, एकदा जरी पनीर खाल्ला तरी constipation सारखा तात्काळ परिणाम होतो. नेहमी नेहमी पनीर खाल्ले तर पचनसंस्था बिघडुन विविध विरूध्द अन्न सेवनजन्य आजार होण्याचा धोका असतो. नेहमी/विकली हॉटेलातील पनीरयुक्त जेवन हे विरूध्द अन्न असल्याने सर्व प्रकारचे आजार उत्पन्न करू शकते. आजच्या काळात वाढलेले bp ani diabetic चे pt हे नेहमी पनीर खाण्याचा effect आहे.असे म्हटल्यास चुकीचे ठरत नाही. एकीकडे bp sugar च्या tab घेतल्या जातात दुसरया बाजुला हॉटेलात यथेच्छ पनीरासारखे पदार्थ खाल्ले जातात. रक्तदाब sugar control होत नाहीत. तसेच विरूध्द अन्न सेवन जन्य अन्य त्रास दिसतात.
पनीर चा वापर करावा का??? वा किती करावा ??? याचा विचार सर्वांनी जरूर करावा


 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती
व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्|| वा.सु. ७/४६
       व्यायाम करणारे, स्निग्ध तेल तुपाने युक्त आहार घेणारे, अग्नि भुक चांगली असणारे, तरूणवयात व बलवान अशा लोकांत जरी विरूध्द अन्न सेवन केले तरी फारसे विकार होत नाहीत. तसेच सवयीमुळे व कमी प्रमाणात विरूध्द अन्न शरीरास सात्म्य झाले असतील तर फारसे बाधक ठरत नाहीत..पण नेहमीच विरूध्द अन्न सेवनाने पुढील गंभीर आजार निर्माण होउ शकतात...
नेहमी विरूध्द पदार्थ सेवनाने होणारे त्रास
नेहमी विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.....
      नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प (herpes zoster), जलोदर (पोटात पाणी साचणे), विस्फोट (शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार, पांडुरोग(रक्त कमी होणे) आमविष (पचन न झाल्याने उत्पन्न विष), पांढरा कोड, विविध त्वचाविकार सोरियासिस,ग्रहणीरोग (ibs),सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ अन्न टाळावेत नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात कारण विरूध्द अन्न सेवनाने शरीरातील मज्जा शुक्र व ओज या सारभुत धांतुवर परिणाम होतो. सारभुत धांतुवर परिणाम होत असल्याने उत्पन्न आजार दुरूस्त होण्यासाठी कठीण असतात..
        विरूध्द अन्न पचविण्याची ताकद असेल तरच अल्प प्रमाणात शरीराला त्रासदायक ठरणार नाही एवढ्या प्रमाणातच खावे. विरूध्द अन्न सेवनाचा इतिहास असल्यास गंभीर आजार उत्पन्न होईपर्यंत वाट पाहु नये. चिकित्साविषयक आयुर्वेदीय सल्ला नजिकच्या वैद्याकडुन जरूर घ्यावा....
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Saturday, December 19, 2015

किडनीचे आजार

 किडनीचे आजार 

🍀
निद्रानाशो वह्निमान्द्यं च शोथोनेत्रे चास्येषादयोर्वक्करोगे|
नाडीस्तब्धावेगमुक्ताथचोष्णात्वाचं रौक्ष्यं पुर्वरूपं प्रदिष्टम्|| भै.र.
रात्री झोप व्यवस्थित न लागणे, भुक कमी होणे, डोळ्याभोवती तोडांवर पायांच्या ठिकाणी सुज येणे, नाडीची स्तब्धता उष्णता वेग आदी वाढणे, त्वचेवर कोरडेपणा येणे ही सर्व लक्षणे भविष्यात होणारया किडनीच्या आजारांची सुचना मनुष्यात करतात.
किडनीचे आजार उत्पन्न होण्यापुर्वीच पुर्वरूपात योग्य चिकित्सक विषयक सल्ला घ्यावा...
😩 किडनीच्या आजारांची कारणे 😩
प्रायेण शैत्यस्य विशेषयोगाद्वृक्कद्वये वृक्कगदोभिजायते|
मसुरिकायां च विसुचिकायांकिंवा$$मवाते चिरजे ज्वरे$पि वा||
उपद्रवत्वेन गृहीतजन्मा भवेदसौ चेति मतं बुधानाम्|| भै.र.
वृक्क (kidney) चे रोग फ्रीजचे जलसेवन, cold drinks आदी थंड पदार्थांच्या सेवनाने होतात. तसेच मसुरिका (गोवर कांजण्या), विसुचिका (अन्नाच्या विषबाधेतुन उत्पन्न आजार), आमवात तसेच जुना ताप या आजारांच्या उपद्रव स्वरूप वृक्कांचे आजार होउ शकतात.
रक्ताच्या विशेष परिवर्तनाने किडनीचे रोग होतात. अतिथंड फ्रीजचे पदार्थांचे chilled cold drinks चे सेवन टाळणे व मसुरिका विसुचिका आमवात जुना ताप यांची उपद्रव रहित चिकित्सा केली असता वृक्कांच्या आजारांपासुन दुर राहता येइल......

Tuesday, December 15, 2015

व्यसन

व्यसन 

🍀
    व्यसनी पदार्थांची नावे सांगण्याची गरज नाही ते सर्वांनाच माहीति आहेत.व्यसनांचा शरीरावरील परिणाम काय ते पाहणे महत्वाचे.....
       व्यसनांच्या सेवनाने शरीरातील मुळ रक्त बिघडते.रक्त सर्व शरीरात प्राणवायु (oxygen) चा व आहाररसाचा पुरवठा करते.जर पुरवठा करणारे रक्तच दुषीत असेल तर प्राणवायु व आहाररस शरीरात योग्य मात्रेत पोहचत नाही परिणामी व्यसने असणारया लोकांत कांळवडलेपणा येतो जो त्याच्या प्राकृत रंगापेक्षा वेगळा असते.हा त्वचेवरील दिसणारा बाह्य परिणाम झाला असाच बदल शरीरातील विविध अवयवावंर होतो प्राणवायु व आहाररसचा पुरवठा योग्य न झाल्याने अवयव सुकतात (shrunk) होतात..फक्त एकाच अवयवावर परिणाम होतो असे नसुन सर्व शरीरावर परिणाम होतो.कृश व्यक्तींमध्ये चरबी संरक्षणार्थ नसल्याने व्यसनांचा परिणाम लवकर दिसतो.तर जाड लोकांत चरबी अधिक असल्याने परिणाम उशीरा होतात..पण परिणाम होतातच यात शंका नाही.. व्यसनी लोकांत heart attack, paralysis attack यांची शक्यता अधिक असते कारण रक्तवाहिन्यामध्ये फिरणारे रक्त बिघडल्याने रक्त वाहिण्यां फुटु शकतात.व्यसनांचा परिणाम फक्त एका अवयवावर न होता सर्व शरीरावरच होतो..त्यामुळे व्यसनी पदार्थांचे सेवन टाळावे.. पुर्वीचा सेवनाचा इतिहास असल्यास शरीराची हानी भरून काढण्यासाठी आयुर्वेदीय सल्ला जरूर घ्यावा...
उदा. मद्याचे व दुधाचे गुणधर्म आयुर्वेद दृष्टीने एकमेकांच्या विरूध्द आहेत.. पुर्वी मद्यसेवनाचा इतिहास असल्यास गाइचे दुध प्यावयास घेता येइल ज्याने मनाचा सत्व गुण ही वाढेल आणि मद्याचा शरीरावर झालेला परिणाम ही कमी होइल.सत्व गुण वाढीस लागला तर व्यसनांची इच्छा होणार नाही.....
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
नांदेड
9028562102. , 9130497856

मुळव्याध

मुळव्याध

          सामान्यत: मुळव्याधीची लक्षणे दिसेपर्यंत कुठल्याही प्रकारचे चिकित्सा घेतली जात नाही. शौचाच्या मार्गाने रक्त पडत असेल तर स्वभावपरमवादाने ते दुरूस्त होण्याची वाट पाहीली जाते म्हणजे शरीराने स्वतः जीव रूपी रक्ताचा अटकाव करावा हे म्हणता येईल. पण शरीरबलापेक्षा व्याधी बल अधिक असेल तर मग रक्त पडण्याचे थांबत नाही मग औषधी उपचार घेतले जातात. पण मुळव्याध जीर्ण झाल्याने शरीराला शत्रुप्रमाणे कापत असते. औषधींनी रक्त थांबले की चिकित्सा बंद होते.
अपुनर्भव चिकित्सा म्हणजे आजार कमी झाल्यावर पुन्हा होउ नये याकरिता काहीही त्रास नसता रसायन औषधी पथ्यपाळुन ज्याने शरीरबल वाढेल आणि आजाराचे बल कमी होईल अशाप्रकारची अपुनर्भव चिकित्सा कुठल्याही आजार कमी झाल्यानंतर पुन्हा उत्पन्न होउ नये याकरिता आवश्यक आहे.
          मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे समजलि तर मुळव्याधीचा त्रास होण्यापुर्विच शत्रुवत मुळव्याधीला जिंकता येईल. मुळव्याधीचा पुर्वरूपे...........
१.भुक मंदावणे, पोट फुगणे, मांड्या गळाल्याप्रमाणे वाटणे
२.पोटरया दुखणे, चक्कर येणे, अंग गळुन जाणे ,डोळे सुजणे,
मळ पातळ होणे वा मलबध्दता,अपान वायु कष्टाने सशब्द बाहेर पडणे,बाहेर पडताना टोचल्यासारखी व कातरल्यासारखी पीडा होणे ,आतड्यात आवाज येणे,पोटत गुडगुड होणे, शरीर बारीक होणे, ढेकर फार येणे, लघविला अधिक प्रमाणात होणे मलाचे प्रमाण कमी असणे, अन्नावर मन नसणे, घशाशी आंबट येणे, डोके पाठ उरात दुखणे,आळस येणे, शरीराचा प्राकृत वर्ण बदलणे, इंद्रिय बल कमी होणे, राग फार येणे, मोठ्या व्याधींची भिती ही मुळव्याध होण्यापुर्विची लक्षणे आहेत. यातिल जेवढे जास्त लक्षणे तेवढा व्याधी बलवन असतो त्यामुळेच पुर्वरूपातिल कमीत कमी लक्षणे समजत असताना योग्य उपचार व सल्ला घ्यावा .व्याधी जीर्ण होण्याची वाट पाहु नये नाहीतर मुळव्याध शत्रुप्रमाणे शरीराची वाट लावते...........
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
रामानंद नगर
पावडेवाडी नाका
 नांदेड.वैद्य गजानन मॅनमवार
9028562102 ,9130497856

व्यायाम

   व्यायाम 🍀

     स्निग्ध आहार (तुपतेलयुक्त) आहार घेणारया लोकांनी व बळकट लोकांनी थंडीच्या काळात व वसंत रूतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मा व्यायाम करावा. व इतर काळात म्हणजे पावसाळ्यात व उन्हाळ्यात शरीराचे बल कमी असल्याने अल्प व्यायाम करावा किंवा व्यायाम करू नये.
व्यायाम आणि मेहनत (exertion) यात basik फरक आहे. व्यायाम हा शरीराचे बल वाढवतो तर exertion मुळे शरीराची झीज होते..
अतिव्यायाम केल्याने तहान लागणे क्षय दम लागणे रक्तपित्त शरीरातील विविध opening मधुन रक्त पडणे थकवा दुर्बलता खोकला ताप वांती हे विकार उत्पन्न होतात. त्यामुळेच काळानुरूप तुप तैल आदींनी युक्त स्निग्ध आहारासह अर्धशक्ति व्यायाम करावा. स्निग्ध आहाराचा समावेश नसताना केलेला व्यायाम शरीराची झीज घडवुन नुकसान करतो..
🍀 व्यायामाचे लाभ 🍀
                        लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं दुःखसहिष्णुता|
                       दोषक्षयो ग्निवृध्दिश्च व्यायामादुपजायते|| च.सु. ७/३२
                   व्यायाम केल्याने शरीरास लाघवता (हलकेपणा) प्राप्त होतो.आळस दुर होतो.
कर्मसामर्थ्यं म्हणजे काम करण्याची कष्ट करण्याची क्षमता वाढते.
स्थैर्य प्राप्त होते. शारीर आणि मानस दोन्हींमध्ये स्थिरता येते. मनाची चंचलता दुर होते.
दुःखसहिष्णुता म्हणजे दुख कष्ट सहन करण्याची क्षमता वाढते. दुःख पचवण्याची मनाची तयारी वाढते.
शरीरातील मेद विकृत कफ आदी दोष वाढले असता त्यांचा क्षय व्यायामाने होतो.
व्यायामाने अग्निमध्ये (भुकेत) वाढ होते..फक्त व्यायाम अगोदरच्या नियमानुसार स्निग्ध आहारासह अर्धशक्ती रूतुनुसार करावा.म्हणजे वरील लाभ होतात.
🍀 व्यायामाची लक्षणे 🍀
                              ह्रदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते|
                              मुखं च शोषं लभते तब्दलार्धस्य लक्षणम्||
                               किंवा ललाटे नासायां गात्रसंधिषु कक्षयोः|
                              यदा संजायते स्वेदो बलार्धं तु तदा$$दिशेत्||
बलार्ध लक्षण---
         व्यायाम केल्यानंतर जेंव्हा ह्रदयातील वायु मुखात येत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तेंव्हा बलार्ध (शक्तीच्या अर्धा व्यायाम झाला समजावे.
किंवा व्यायाम केल्यानंतर जेंव्हा कपाळ, नाक, सांध्याचे ठिकाणी तसेच काखेत घाम येत असेल तेंव्हा आपल्या ताकदिच्या अर्धा व्यायाम झाला असे समजावे.
🍀 व्यायाम अयोग्य व्यक्ती 🍀
            अतिव्यवायभाराध्वकर्मभिश्चातिकर्शिताः| क्रोधशोकभयायासैः क्रान्ताः ये चापि मानवाः||
              बालवृध्दप्रवाताश्च ये चोच्चैर्बहुभाषकाः| ते वर्जयेयुर्व्यायामं क्षुधितास्तृषिताश्च ये|| च.सु.७
          ज्यो व्यक्तीने अत्यधिक मैथुनकर्म, अधिक वजन उचलण्यामुळे, जास्त चालण्याच्या कारणाने क्षीण झालेला आहे तसेच राग, शोक(दुखः), भिती व परिश्रमाने पिडीत असणारयांनी, बालवयात, म्हातारपणात, वातप्रकृती लोकांनी व नेहमी जोरात बोलणारया लोकांनी, भुकतहान लागलेली असताना मनुष्याने व्यायाम करू नये.
कुठल्याही प्रकारचा अर्धशक्ती पेक्षा अधिक प्रमाणात केलेला व्यायाम वर सांगितलेले अतिव्यायामजन्य आजार निर्माण होतात....

वैद्य गजानन मॅनमवार 
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
नांदेड

9028562102, 9130497856

🍀 शरीरातील निसर्ग

🍀 शरीरातील निसर्ग 

🍀
        शरीर स्वतः विविध लक्षणांच्या स्वरूपात आपणास काही सुचना करते त्यांचे पालन केले तर कुठलाही आजार त्रास गंभीरतेकडे जात नाही. लवकर दुरूस्त होतो..
    उदा. १.ताप असताना तोंडस चव नसते सर्वांग दुखते या लक्षणाद्वारे शरीरास आपणास काहीतरी सांगावयाचे असते. तोंडास चव नाही आता पोटाला आराम पाहीजे. अगोदर शरीरातील तापिचे कारण घाण (अपाचित अन्न अाम) भुकेद्वारे पचु दे. मगच रोजचे जेवन कर तोपर्यंत हलके अन्न मुगाची पातळ खिचडी ईत्यादी खा. तसेच शारीरीक हालचालीमुळे अपाचित आम सर्व शरीरात पसरण्याचा धोका असतो त्यामुळे आम कोठ्यातच (digestive tract मध्ये) पचावा शरीरात पसरू नये म्हणुन अंग गळुन जाणे दुखणे आदी लक्षणे दिसतात. कारण फक्त शारीरीक कष्ट हालचाली होउ नये हे असते. आपणास लक्षणे समजीे तर ठीक नाहीतर अपाचित आम पोटात असताना घेतलेला आहार पुर्विपासुन असलेल्या अपाचित आमसह मिसळुन आणखी जास्त प्रमाणात आपाचित आम तयार करतो. शारीरीक हालचालीमुळे अपाचित आम सर्व शरीरभर पसरून उपद्रव स्वरूप गंभीर व्याधी उत्पत्तीची निर्मिती करतो. वा व्याधी उत्त्पत्तीसाठी सुपिक जमीन बनवुन ठेवतो. काहीं लोकांत कुठलाही इतिहास नसताना sudden sugar वाढते किंवा रक्तदाब वाढतो. कुठलाही इतिहास नसताना अचानक त्रास होतो. हा त्रास अपाचित आम शरीरात पसरल्याने होतो. साध्या तापातुन उपद्रव स्वरूप विविध गंभीर आजार उत्पन्न होतात...
         २. अतिसार म्हणजे संडासला पातळ वारंवार जावे लागणे. हा त्रास दुषीत आहार वा पाण्याने होतो. अन्नपचन नीट होत नाही दुषीत न पचलेला अन्नाचा भाग जलाच्या साहाय्याने शरीर स्वतः बाहेर काढते. यावेळी सुध्दा मुखातुन जडान्न सेवन केले असता त्रास कमी न होता वाढतो. भुक लागल्यास पातळ मुगाची खिचडी खाता येते. पण गुलाबजामुन केळी सारख्या जड पदार्थांनी घाण अडवणे loose motions कमी करणे म्हणजे महात्रासदायक शास्रविरोधी...
          शरीरातील घाण औषधींनी वा वरील पदार्थांनी अडवली तरी पुढे त्रासदायक colitis सारखे त्रासदायक आजार उत्पन्न होतात.. त्यामुळेच शरीराचा निसर्ग लक्षात घेणे गरजेचे. निसर्ग विरोधी वा शास्रविरोधी उपायांनी केल्यास ताप वा अतिसाराची लक्षणे नाहीसी होतात. पण पुढे उपद्रव स्वरूपातील किचकट चेंगट आजारांचा सामना करावा लागतो. शरीराचे एेकायचे की शास्रविरोधी उपाय करून उपद्रव ओढुन घ्यायचे हे स्वतः वरच अवलंबुन असते. म्हणुनच शास्रकारांनी सांगितले आहे कुठल्याही आजाराची उपद्रव रहित चिकित्सा म्हणजे खरी चिकित्सा.....

वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
नांदेड 9028562102 , 9130497856

Monday, December 14, 2015

कमी करणे-वजन ---आहार

कमी करणे-वजन ---आहार

====================
सुखवस्तू भारतीयांच्या आहारात सामान्यतः खालील दोष आढळतात
१. हिरव्या भाज्या, सलाद, फळं यांचं प्रमाण कमी.
२. धान्यातील कोंडा (ब्रान) काढून पांढरं स्वच्छ धान्याचं पिठ (मैदा) किंवा तांदूळ वापरणं.
३. वरील १ व २ मुळे फयबर व अँटीऑक्सीडंट व्हिटामिन कमी.
४. सच्यरेटेड फॅटचं प्रमाण अधिक, तूप दुध-दही, अंडी व मांसाहार हे सच्यरेटेड फॅटचं प्रमुख स्त्रोत.
५. मिठाई व तळलेले पदार्थ अधिक. तळलेले पदार्थ वजन तर वाढवतातच शिवाय तळताना तेलात ट्रान्सफॅटी ऍसिड्स निर्माण होतात. जे कॅन्सर निर्मिती करतात.
६. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्चं प्रमाण कमी.
आपला आहार योग्य करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी मला आढळलेली काही उपयुक्त माहिती व युक्त्या अशा
१. वजन किती असावं ? वजनाच्या टेबल्सवरून इच्छित वजन ठरवू नये. ते तख्ते बहुदा जुन्या माहितीवर आधारित आहेत, जेव्हा बॉडी मास इंडेक्स २५ ते ३० सुरक्षित मानला जात होता. वजन किती असावं हे ठरवण्याचे तीन मापदंड
वजन कि.ग्रॅ.
बॉडी मास इंडेक्स १८ ते २१ असावा.
उंचीचा (मीटर) वर्ग
वेस्ट / हिप रेश्यो ०.८५ किंवा कमी असावा.
तुमचं वजन २५ व्या वर्षी जितकं असेल तितकचं कायम ठेवावं. या आधारावर आपलं इच्छित वजन ठरवावं.
२. शरीरातील चरबी वाढून वजन वाढतं ते ‘खाणं जास्त, श्रम कमी’ या असंतुलनामुळे. हे असंतुलन बदलवलं की वजन कमी होतं.
३. केवळ आहार नियंत्रणाने थोड्या काळापर्यंत वजन नियंत्रण होतं. कायम नियंत्रणासाठी शरीराचे स्नायू वाढवणं आवश्यक आहे. स्नायू वाढवले, की शरीरातील भट्‍टी जास्त जोरात जळते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर कमी होतं. स्नायू वाढवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. अशा प्रकारे व्यायाम आहार नियंत्रण दोन्ही हवे.
४. चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज किमान ३ ते ४ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी.
५. शरीरातील १ किलो फॅटमधून ८००० कॅलरीज निघतात. व्यायामानं रोज ३०० कॅलरीज जाळल्यास महिन्याभरात ३०० / ३० ९००० कॅलरीज म्हणजे जवळपास दर महिन्याला १ किलो वजन कमी होईल (आहार न वाढवल्यास)
६. कॅलरीज जाळण्यासाठी रोज चाला
चालण्याची गती वाढल्यास प्रति मिनिट जास्त कॅलरीज जळतात. रमत गमत डोलत चालू नका. भरभर, गतीने चाला ब्रिस्क किंवा एरोबिक वॉक घ्या.
घरकाम करा. पुरूषांनाही उपयोगी - शेती किंवा बगिच्यात काम करा.
७. चरबी वाढवणारे सर्वात महवाचे दोन अन्नघटक फॅटस व साखर. फॅट्समध्ये ९ कॅलरीज असतात. शिवाय श्रम करून त्या कॅलरीज वापरल्या नाहीत तर खालेल्या फॅटची ९७ टक्‍के चरबी बनते. साखर किंवा गोड कार्बोहायड्रेट्समधे प्रतिग्रॅम ४ कॅलरिज असतात. प्रोटीन, व्हिटामिन, फायबर नसतात. त्यामुळे त्यांना ‘पोकळ कॅलरीज’ म्हणतात.
८. लहानपणापासून आपल्याला बक्षीस म्हणून, आनंदाचा प्रसंग म्हणून गोड व फॅट असलेल्या मिठाया खायला देऊन मनाला व जिभेला या स्वीट-फॅट जोडगोळीची सवय लागते. स्वीट-फॅटची आवड ही व्यसनासारखीच असते. त्याची आस निर्माण होते. निव्वळ गोड किंवा निव्वळ फॅट फार खाता येत नाही. स्वीट-फॅटची जोडी केली की खूप जास्त खाता येते, खाल्ली जाते. शिवाय लठ्‍ठ लोकांना फॅट जास्त आवडतात. विषचक्रच!
९. हृदयरोग झालेल्यांनी कोलेस्टिरॉल कमी करण्यासाठी आपल्या आहारातील फक्त १० टक्‍के कॅलरीज फॅटमधून मिळवाव्या. रोज किती फॅट खाता येईल. व त्यातील किती सच्युरेटेड फॅट खाता येईल हे प्रकरण ७.५ मध्ये दिलं आहे.
१०. हृदयरोग नसणार्‍यांनी किंवा कोलेस्टिरॉल १५० मि.ग्रॅ. पेक्षा अधिक वाढलेलं. नसणार्‍यांनी फॅट इतकं मर्यादित करण्याची गरज नाही. पण तरी आहारातील फॅट कमी ठेवल्याने वजन व कोलेस्टिरॉल वाढणार नाही. सर्व प्रकारचे फॅट्स धरून एकूण कॅलरीज पैकी २० टक्‍केच्या वर कॅलरीज फॅटद्वारा मिळू नयेत. ११. तेल, लोणी, तूप, चीज, यातील फॅट दिसतंच. पण दुध व दुधाचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईसक्रिम, अंडी, मांस, मासोळी, तळलेले पदार्थ, शेंगदाण्याचे पदार्थ यात देखील भरपूर फॅट असतं.
१२. घरातील सर्व व्यक्ती मिळून एका महिन्याला किती तेल वापरायचं हा हिशोब करून तेवढंच तेल घरात आणावं. शेंगदाणा किंवा तीळ, सनफ्लावर व सरसो/मोहरी तेलाचं समप्रमाण मिश्रण वापरावं. स्वयंपाकघर सांभाळणार्‍या व्यक्तीने तेलाचं मासिक कोट्यातून दर आठवड्याचं राशन काढून तेवढं तेल आठवडाभर पुरवावं.
१३. फॅटवरची ही मर्यादा लहान मुलांसाठी नाही. त्यांची वाढ होत असल्याने त्यांना अधिक कॅलरीज हव्यात, पण मुलांना लहान वयात जे खाण्याची सवय लागेल तीच आवड आयुष्यभर टिकणार, हे लक्षात घेऊन स्वीट-फॅट खाण्याच्या सवयी लावू नये.
१४. घरात तळलेले पदार्थ किंवा मिठाईचे गोड पदार्थ आठवड्यातून एकदा यापेक्षा अधिक वेळा बनवू नयेत किंवा बाजारातून आणू नयेत.
१५. फायबर काढलेले प्रोसेस्ड फूड्स, बेकरी प्रॉडक्टस, फास्ट फूड्स बाजारात खूप मिळतात. यांचा वापर टाळावा.
१६. मूंग, मटकी यासारख्या डाळी अंकुरित करून त्या जेवणात वापराव्या.
१७. जेवणाच्या सुरूवातीस मुख्य अन्नाने सुरवात न करता ताटात फक्त अंकुरीत डाळी, सूप, सलाद, गाजर, काकडी असल्या गोष्टी वाढाव्या.
त्या खाऊन झाल्यानंतरच मुख्य अन्न वाढावं. त्यामुळे आपोआपच मुख्य अन्न फार खाता येत नाही. उपाशी न राहता देखील डायेटिंग करता येतं.
दिवसातून दोनदा खूप पोट भरून खाल्ल्याने (शरीरामधे अन्नाचं परिवर्तन शुगरमध्ये होत असल्याने) रक्तात शुगरचा पूर निर्माण होतो. त्याऐवजी दिवसातून ४-५ वेळात पसरून खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टिरॉल देखील कमी होतं.
१९. दोन जेवणांच्या मध्ये खरी भूक लागल्यास गोड खाऊ नये. गोड खाल्ल्यानंतर ताबडतोब रक्तातील शूगर वाढते व २ तासांनी ती झपाट्याने कमी होते.(रिबाऊँड हायपोग्लायसिमिया) त्यामुळे पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते.
२०. मधल्या काळात खाण्यासाठी भाजलेले फूटाणे (सालीसकट), मुरमुरे, लाह्या, अंकुरित डाळी, गाजर, टमाटे, काकडी, स्किम्ड दुधाचं ताक असले पदार्थ वापरावे.
२१. मनावरील ताण किंवा काळजी असली की त्या काळजीच्या विचारांपासून पळवाट म्हणून आपण उगाच खातो. भूक नसली तरी मनाला ‘काही तरी’ खाण्याची आठवण होते. आपली खरी भुक ओळखायला शिकणं, हा पुनर्शिक्षणाचा भाग आहे. शिवाय ताण, काळजी कमी करण्यासाठी उपाय करावे.
२२. पिठातील कोंडा, तांदळावरील लालसर साल, डाळींची साल, बटाट्यावरील साल काढू नका. त्यातील तांदूळ पॉलीश केलेला चकचकीत पांढरा वापरू नका. त्यातील फायबर निघून गेलेलं असतं. ब्रेड ही कोंड्यासकटच पिठाची - म्हणजे ब्राऊन ब्रेड- वापरावी.
२३. फळाचे रस (ज्यूस) प्याल्यामुळे (फायबर काढून टाकून फळातली निव्वळ शुगर पोटात गेल्याने) रक्तात शुगरचा पूर निर्माण होतो. त्याऐवजी पूर्ण फळं खाणं अधिक चांगलं.
२४. मेथीचे दाणे अंकुरित करून किंवा भूकटी करून जेवणापूर्वी २ चमचे खावे त्याने शूगरचा पूर कमी. शिवाय कोलेस्टिरॉल देखील कमी होतं. मात्र काही जणांना गॅसेस होऊ शकतात.
२५. तेलाचा वापर स्वयंपाकात कमी व्हावा म्हणून निर्लेप सारखी भांडी वापरा.
२७. आपलं वजन, बॉडीमास इंडेक्स, वेस्ट-हिप रेश्यो, ब्लड शुगर व कोलेस्टिरॉल नियमितपणे मोजा व ती माहिती टिपून ठेवा.

मधुमेह आणि आहार... !

मधुमेह आणि आहार... ! 

=================
मांसाहार करू नये या मताचा मी आहे. ज्यांना करावयाचा आहे. त्यांनी मासे टाळावे. हल्ली प्रदुषणाने पाण्यात विषाणू वाढल्याने ते रोग वाढवतात. अंडी पोरस किंवा हजारो छिद्र असलेली असतात. त्यांनी पोटाचे विकार वाढतात. त्वचाविकार, मधूमेह, हृदयरोग, स्थौल्य यात वाईट. पाणी तहानेपुरते प्यावे. स्थूल माणसाने जेवणाअगोदर पाणी प्यावे. वायु धरण्याने सर्दी, पडसे, दमेकर्‍यांनी गरम पाणी उकळून पिणे केव्हाही चांगले.
चांगल्या आरोग्याकरीता सकाळी जरूर हिंडावे. पण पोटाच्या तक्रारीकरीता सायंकाळी लवकर जेवावे. कमी जेवावे व जेवणानंतर झोपण्यापूर्वी किमान पंधरा-वीस मिनिटे किंवा अडीच हजार पावले फिरून यावे. उत्तम झोप लागते. झोपेसाठी व पोटाकरिता औषध प्यावे लागत नाही.
====================================================
आयुर्वेदानुसार सर्व सामान्यतः सर्वांकरीता आयुर्वेदीय पथ्यापथ्य, आहार विहार
====================================================
यामधील पथ्यकर चांगली व आरोग्याकरिता खावी. कृपया कमी खावे, क्वचितच खावे व काही पदार्थ तब्येत उत्तम असतांना खावेत. विशेष उपचार दैनंदिन आरोग्य उत्तम राखावे व जावे म्हणुन जपावे. वागावे व पाळावे.
पथ्य
दूध, गोड ताक, दही + मिरपूड, लोणी, तूप, भाजून तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मुगाची डाळ, तांदूळाची भाकरी, सुकी चपाती, कुळीथ, उडीद, चवळी, वाटाणा, हरभरा, तूर, मसूर, पालक, राजगिरी, मुळा, चाकवत, माठ, चुका, मेथी, अळू, शेवगा पाने, शेपू, सॅलाड, दुध्या भोपळा, पडवळ, कार्ले, दोडका, टिंडा, परवल, हादगा फुले रताळे, बटाटा, सुरण, शिंगाडा, राजगिरा, कांदा, काटेरी वांगी, गाजर, तांबडा भोपळा, फ्लॉवर, नवलकोल, गोवार, डिंगया, घेवडा, मटार, पापडी, घोसाळे, शेवगा, ओलीहळद, पुदीना, आले, लसून, कारले, कोकम, तुळशीची पाने, मिरेपूड, विड्याची पाने, आवळा, ऊसाचे तुकडे, मनुका, कोरफड गर, खारीक, बदाम, खजूर, शेंगदाने, खोबरे, खसखस, तीळ, मेथ्या, गूळ, साखर, मध, मिठ, लिंबू, आंबा, द्राक्षे, वेलची, केळे, डाळिंब, संत्रे, मोसंब, चिक्‍कू, जांभूळ, सफरचंद, अननस, पोपई, कवठ, फणस, बोरे, करवंद, ताडफळ, खरबूज, भात, ज्वारी, राजगिरा, मक्याच्या लाह्या, खजूर, सरबत, कोको,, तांदूळाची जीरेयुक्त पेज मेथी पोळी, एरंडेल तेल चपाती, टोस्ट, नारळाचे पाणी, सुंठ पाणी, गरमपाणी, लिंबू पाणी, कैरी पन्ह, लिंबू, कोकम सरबत, माठातील पाणी, एक चमचा धने जीरे ठेचून रात्री भिजत टाकून सकाळी चावून खाणे, तेच पाणी पिणे, खूप पाणी पिणे, सायंकाळी लवकर जेवणे, कमी जेवणे. आलेपाक, मोरावळा, गुलकंद, एक लंघन.
कुपथ्य
दही, टमाटू, काकडी, बियांची वांगी, पालेभाज्या, भेंडी, कोबी, काजू, चहा, कोल्ड्रींक, बर्फ, फ्रिजचे पाणी, खूप पातळ पदार्थ, आईस्क्रिम, फ्रुटसॅलड, शिकरण, फळांचे ज्यूस, ऊसाचा रस, पावभाजी, शेव, भजी, चिवडा, फरसाण आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा, पाव, केक, खारी, बिस्किटे, श्रीखंड, जिलेबी लोणचे, पापड, मिरच्या, मीठ, फार तिखट, गोड, खारट, आंबट, थंड उष्ण पदार्थ, शिळे अन्न, शिळेपाणी, कलिंगड, केळे, सिताफळ, पेरू, चिकू, लिंबू, चिंच, कैरी, जांभूळ, बटाटा, कांदा, रताळे, बाजरी, ज्वारी, भात, गहू, तीळगूळ, पोहे, चुरमुरे, डालडा, मिठाई, बेकरीचे पदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, चवळी, मटकी, वाटाणा, हरभरा, मसूर, तूर, करडई, आंबाडी, अळू, तांबडाभोपळा, मिसळ, भाज्या, अंडी, मासे, मांस, चिकन, दारू, तंबाखू, मशेरी, तपकीर, धूम्रपान, दुपारी झोप, रात्री जागरण बैठे काम ,धूळ, गर्दी, उशीरा जेवण, उगाच उपास, फाजील बडबड चिंता पुन्हः पुन्हा फार वेळां खाणे, अनियमित राहणी, उशी, गादी, मलमूत्रांचा अवरोध, टी. व्ही. कार्यक्रम, खूप बारीक वाचन, झोपून वाचन.
विशेष उपचार
किमान सहा सुर्य नमस्कार, अर्धवज्रासन, पश्‍चिमोत्तासन, शीर्षासन, शवासन, मानेचे व्यायाम, उषःपान, नाकाने पाणी पिणे, साध्या पाण्याच्या भरपूर चुळा, गुळण्या, तेल मसाज, मीठ व गरम पाणीशेक, रात्री पंधरा मिनिटे फिरणे, गरम पाणी पिणे, काठिण व उबदार अंथरूण, उशीशिवाय झोपणे, घाम येईल असे गरमागरम पाणी पिणे, स्वमुत्रोपचार, गोमुत्र, गोदुग्ध, नाकात तूप टाकणे, कानात लसून तेल, डोळ्यात लोणी, तूप, दूध, तळपायास तूप चोळणे, उकडलेल्या भाज्या, रात्री कडधान्ये खाणे, तोच तो आहार बदलणे, रात्री दात घासणे, दोरीच्या उड्या, पोहणे, बागकाम, कमरेत वाकून फरशी पुसणे, हवापालट, पूर्ण विश्रांती, मौन, श्रीरामरक्षा स्त्रोत्र, अथर्वशीर्ष. इति अलम्‌! जय आयुर्वेद!!
पथ्य व कुपथ्य यमध्ये दोन्हीकडे एक सारखे असणारे पदार्थ व आहार निसर्गतः म्हणून प्रमाणतच व बेतशीरच खावा!
प्रकृती व आहार विकाराचे नियम
स्वास्थ्य रक्षणाकरिता व रोग निवारण्याकरिता औषध सुचविणे हे योग्य त्या डॉक्टर, वैद्यांचे, चिकित्सकाचे काम आहे. स्थल काल किंवा व्यक्तीनुरूप औषधोपचार बदलू शकतात. कोणत्या गावी काय मिळते? किंवा कोणाच्या खिशाला काय परवडते? किंवा चिकित्सकाला काय सुचते? यावर औषधाचा तपशील अवलंबून राहील. पण आयुर्वेदाचे आहार, विहार व स्वास्थ्यवृत्तीचे ठाम सिध्दांत सदा सर्वकाळ लागू पडणारे आहेत. त्याची माहिती आपण करून घेणे उपयुक्त ठरेल.
वात प्रकृत्ती
पथ्य: आहार - गहू, ज्वारी, तांदूळ, मूग, चवळी, वाटाणा, हरभरा, उडीद, आंबा, सफरचंद, चिकू, केळे, मोसंबी, फणस, खजूर, बदाम, बेदाणे, खारीक, बटाटे, कांदे, कोहळा, फ्लॉवर, कोबी, बीट, म्हशीचे दूध, दही, साखर, गुळ, ते मेवा मिठाई, पाव, चॉकलेट, आईस्क्रिम, कॉफी, कोको इत्या.
विहार : भरपूर विश्रांती व झोप. किमान दगदग. भरपूर कपडे, थंडी वार्‍यापासून संरक्षण, मसाज.
कुपथ्य : आहार - बाजरी, नाचणी, मटकी, पावटे इत्या.
DrJitendra Ghosalkar

अति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा

अति वाढलेले पोट/ वजन /लठ्ठापणा कमी करा 

===============================
लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....
1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
4. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.
5. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.
7. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.
8. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
10. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
11. दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.

औषधी लसूण

औषधी लसूण :

***** पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!
" समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले .... अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला....तो थेंब पुथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला ....."
गंमतीशीर आहे पण आमच्या घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट मल आजही जशीच्या तशी आठवते ....खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा अशी खात्री मला झाली आहे ....
***** गुणधर्म
* गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे ...
* लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा ...
* लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत.
* लसणात डायली-सल्‍फाईड असते. त्‍यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्‍हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्‍यात मदत होते.
* लसूण बलवर्धक, उत्तेजक-संप्रेरक, रक्तदाब कमी करणारा, झटक्यांना नियंत्रित करणारा आणि सुक्ष्मजंतू विनाशक इ. गुणधर्मांनी युक्त आहे,
* संसर्गांवर उपचार करण्यास तसेच परोपजीवी जंतूंचा नाश करण्यास मदत करते.* पेटका येणे, गोळे येणे यासाठी उपयुक्त ठरते. Echinacea आणि Goldenseal बरोबर वापरल्यास सूक्ष्म जीवाणूंचा नाश करते.
* यात allin असते, ते बॅक्टोरिया प्रतिबंधक असते, पण त्यासाठी लसूण चावला पाहिजे किंवा वाटून बारीक केला पाहिजे, म्हणजे त्यातील हा गुणधर्म दिसून येईल.
* उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.
* ऑलिसिन हे प्रभावी रसायन फक्त कच्च्या लसूणात तो बारीक केल्यावर तयार होते. त्यामुळे अन्नात तो टाकण्यापूर्वी बारीक करून पाच मिनिटे बाहेर ठेऊन मग टाकावा. आख्ख्या पाकळ्यांचा हवा तसा परिणाम दिसत नाही. लसूण पावडर, पेस्ट, तेल या स्वरूपातही खाण्यात सहज मिसळता येतो.
* लसणाच्‍या सेवनामुळे व्‍हायरल, फंगल, यीस्‍ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्‍या लसणाच्‍या सेवनामुळे अन्‍नातून विषबाधा होण्‍याचा धोका कमी होतो
* दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्‍यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्‍नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात.
***** लसणाचे उपयोग :
* दुधात लसूण उकळवून पाजल्‍यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्‍या पाकळ्या भाजून खाल्‍यास लहान मुलांना श्‍वास घेताना होणारा त्रास दूर होतो.
* ज्‍या मुलांना कफ--सर्दीचा त्रास जास्‍त होतो, त्‍यांना लसणाच्‍या पाकळ्यांची / कांड्याची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.
* लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगीचं तेल आणि सहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.
* लसणाच्‍या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्‍थमासारख्‍या श्‍वसनविकारात लसूण गूणकारी आहे.
* थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्‍यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
* रोज लसणाचे सेवन केल्‍यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्‍यावर लसूण टाकलेला चहा गूणकारी आहे.
* लसणात ऍन्‍टी इन्‍फ्लामेटरी गूण आहेत. ज्‍यामुळे ऍलर्जीला दूर पळविता येते. लसणातील ऍन्‍टी आर्थीटिक गुणांमुळे डायलीसल्‍फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्‍यायल्‍यानेही अनेक फायदे आहेत.
* मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रीयांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हाडांची झीज होऊन हाडे ठिसूळ होतात. संशोधनाद्वारे सिध्द झाले आहे की कांदा व लसूण दोन्ही हाडांच्या ठिसूळपणावर (ऑस्टिओपोरोसिस) चांगला परिणाम दाखवते.
* लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
* अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
* लसणामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण व त्यातही वाईट कोलेस्टेरॉल LDL कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
* शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
* लसणाचे सेवन कॉलेस्‍ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्‍यामुळे रक्ताच्‍या गाठी निर्माण होत नाही.
* लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्‍सच्‍या प्रभावापासून वा‍चवितो. तसेच सल्‍फरयु्क्त गूण रक्तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. लसणामधे रक्त पातळ करण्याचा नैसर्गिक गुण आहे. ऍन्‍टी क्‍लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्‍यांमध्‍ये रक्ताच्‍या गाठी तयार होत नाहीत.
* वायू पोटात तयार होतो / बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर
* वजन घटविण्‍यात लसूण गूणकारी आहे. शरिरातील वसा कोशिकांना विनियमित करण्‍याची क्षमत लसणात आहे. त्‍यामुळे वजन कमी होते.
* लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगीचं तेल आणि सहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.
* लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
* सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
* बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
* सिरोसियसच्‍या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्‍यास त्‍वचेला खूप आराम मिळतो आणि समस्‍या दूर होते.
* गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो * किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
* डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते.
* लसूणातील ऍन्टीऑक्‍सीडंट अल्झायमर व डिम्नेशिया या मेंदूच्या विकारापासून संरक्षण करते.
* कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .सरसूच्‍या तेलात लसणाच्‍या पाकळ्या टाकून उकळून घ्‍या. हे तेल कानात टाकल्‍यास कान दुखण्‍याचा त्रास कमी होतो.
* भूक न लागणे , तोंडाला चव नसणे , अजीर्ण, पोटात वेदना , जंत , अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
* नियमित लसूण सेवन केल्‍याने रक्तदाब नियंत्रित राहतो. ऍसिडीटी आणि गॅसेसच्‍या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्‍या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो. अपचन, पोटदुखी यावरही अतिशय गुणकारी आहे.
* शरीराच्या प्रतिकारशक्तीची यंत्रणा लसणामुळे उत्तम राहते.
* भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
* हृदयाची अति उत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
* ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
* ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
* शरीरातील पेशींची झीज, इजा व वयाच्या खुणा या लसणामुळे कमी होतात. त्याचप्रमाणे आयुष्य वाढण्यास मदत होते.
* लसूण मनाची मरगळ घालवतो .
* हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
* लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
* तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो
* शरिरात रक्ताची कमतरता असल्‍यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्‍यास लोह आवश्‍यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्‍यामुळे स्‍कर्वी रोगापासूनही बचाव होतो.
* लसणात ऍन्‍टीबॅक्‍टेरियल गूण आहेत. म्‍हणूनच तारुण्‍यपिटीकांची समस्‍या असल्‍यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्‍यपिटीकेवर लसणाची पाकळी लावून हलक्‍याने रगडल्‍यास लवकरच आराम मिळतो.
* लसणाच्‍या नियमित सेवनाने त्‍वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्‍या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा ऍथलिट फुट यासारख्‍या आजारांवर लसूण गुणकारी आहे.
* लसूण शरिरात इन्‍सूलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्‍या रुग्‍णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
* लसणाच्‍या सेवनाने कामोत्तेजना कायम राहते.
* लसणाचे नियमित सेवन केल्‍यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
* लसूण नियमित सेवन केल्‍यास दातांच्‍या दुखण्‍यामध्‍ये आराम मिळतो. दात दुखत असल्‍यास लसणाची पेस्‍ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात ऍन्‍टी बॅक्‍टेरियल तत्त्व असतता. त्‍याचा फायदा होतो.
* लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्‍यास डास जवळ येत नाही. तसेच त्वचाही नितळ होते.
* लसणाच्‍या 5 पाकळ्या बारीक करुन त्‍यात थोडे पाणी टाकावे. त्‍यात 10 ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.
* लसणाच्‍या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात ऍलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्‍फरही असते. लसणाची पेस्‍ट डोक्‍याला लावल्‍यास केस गळणे कमी होते
* लसूण एक नैसर्गिक पेस्‍टीसाईड म्‍हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करुन नैसर्गिक किटकनाशक तयार केले जाऊ शकते.
* लसूण ठेचून त्‍याचा रस एखाद्या काचे ग्‍लासच्‍या हेअरलाईन क्रॅकवर लावल्‍यास ती भरुन जाते आणि ग्‍लास वाचतो.
* लसणामध्ये असणारे सल्फाईड द्रव्य त्वचा, फुफुसे व मूत्रपिंडाद्वारे बाहेर निघून जाते. लसूण हा पौस्टिक गरम आहे. जुलाबात गुणकारी आहे. स्त्रियाना लसूण हा खूप गुणकारी आहे.
* लसूण, मीठ, कोथंबीर, बेदाणा व साखर घालून चटणी बनवली असता व तिचं सेवन केले असता अरुची दूर होवून अन्न पचण्यास मदत होते.
* उडदाच्या वड्यात लसूण घालून वडे तळून खाल्याने लकवा बरा होतो असे म्हणतात.
* लसूण, पुदिना, जिरे, धने, मिरे व मीठ मिक्स करून त्याची चटणी सेवन केल्याने वाढलेल्या रक्त दाबाचे प्रमाण कमी होते.
* लसूण, ओला नारळ, मीठ, लाल मिरची पावडर व लिंबू घालून बनवलेला चटणी खूप छान लागते.
***** काळजी :
* लसूण हा उष्ण आहे त्यामुळे थंडी मध्ये त्याचे सेवन करावे. उन्हाळ्यात व त्याचे सेवन करी करावे कारण त्यामुळे पिक्त होऊ शकते. व शरीरावर छोटी-छोटी गळवे होऊ शकतात.
* लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती . गर्भिणी / आत्यंतिक पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तींनी लसूण खाऊ नये.
* जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे ...
* लसूणामुळे श्‍वासाला दुर्गंधी येत असल्याने त्यानंतर काही तरी खावे.
* काहींना लसणाची ऍलर्जी येऊ शकते.
* रक्त पातळ करण्याची औषधे चालू असल्यास जास्त प्रमाणात लसूण खाऊ नये.

Visit Our Page