Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, January 31, 2016

महाभूताग्नि


दीर्घकाळपासून पडलेला एक प्रश्न आणि त्याचे सुचलेले उत्तर आज मांडणार आहे. सर्वांनी त्याचे परीक्षण करावे अशी विनंती आहे.
महाभूताग्नि कोठे असतात व त्यांचा role नेमका काय आहे ? असा हा प्रश्न आहे. मूळ सूत्र आहे चरकातील चि. 15 मध्ये
अन्नमिष्टं ह्युपहितमिष्टैर्गन्धादिभिः पृथक् ।
देहे प्रीणाति गन्धादीन् घ्राणादीनीन्द्रियाणि च ।।
भौमाप्याग्नेयवायव्याः पंचोष्माणः सनाभसः ।
पंच आहारगुणान्स्वान्स्वान्पार्थिवादीन् पचन्ति हि ॥
यथा स्वं स्वं च पुष्णन्ति देहे द्रव्यगुणाः पृथक् ।
पार्थिवाः पार्थिवानेव शेषाः शेषांश्च कृत्स्नशः ॥ च. चि. 15/12-14
आणि चक्रपाणिदत्त टीके मध्ये म्हणतो – भौमादयः पञ्चोष्माणः पार्थिवादिद्रव्यव्यवस्थिता जाठराग्निसंधुक्षितबला अन्तरीयं द्रव्यं पचन्तः स्वान् स्वान् पार्थिवादीन् पूर्वपार्थिवगन्धत्वाद्यविलक्षणान् गुणान् निर्वर्तयन्ति ।
संपूर्ण टीका येथे लिहीत नाही. ती मुळातून वाचण्यासारखी आहे.
प्रकरण अधिकरण ही पाहण्यासारखे आहे. प्रथम अग्निचे महत्त्व, त्यानंतर जाठराग्नि, त्यानंतर अवस्थापाक, त्यानंतर हे महाभूताग्निचे सूत्र, त्यानंतर धातुगत पचन व धात्वग्निंचे वर्णन असा क्रम आहे. त्यातही जाठराग्निच्या action चा starting point (अन्नमादानकर्मा तु ....) व End Point (एवं रसमलाय ....) वर्णन केलेला आढळतो. त्याच पद्धतीने धात्वग्निंच्या action चा ही Start point व End point उपलब्ध होतो. मात्र महाभूताग्निच्या action ला Starting point व End point काय असे शोधावे लागते. जाठराग्निसंधुक्षितबला ... म्हणजे जाठराग्निचे कार्य सुरु झाले की महाभूताग्निचे काम सुरु होते असे म्हणता येईल. End point शोधण्यासाठी मात्र बरेच विवेचन करावे लागेल.
महाभूताग्नि कोठे असतात या प्रश्नाचे उत्तर चक्रपाणिदत्त देतो – पार्थिवादि द्रव्यव्यवस्थिता. म्हणजे हे भूताग्नि द्रव्यांमध्येच असतात. कोणत्या द्रव्यांमध्ये – आहारद्रव्यांमध्ये की शारीर द्रव्यांमध्ये ? त्याचे उत्तर दोन्ही द्रव्यांमध्ये असतात. आहारद्रव्यांमधील भूताग्निचा role वेगळा व शारीरद्रव्यांमधील भूताग्निचा role वेगळा.
आहारद्रव्यांमधील भूताग्नि
आहारद्रव्यांमध्ये भूताग्नि कोठून येतो ? सर्व सजीवांमध्ये (सेन्द्रिय असा चरकाचा शब्द) जाठराग्नि असतो व त्याचा अंश प्रत्येक द्रव्यामध्ये असतो. जाठराग्निच्या अस्तित्वामुळे हा द्रव्यांमधील अग्नि हा active राहतो. (अन्नस्य पक्ता सर्वेषां पक्तृणामधिपो मतः । तन्मूलास्ते हि तद्वृद्धिक्षयवृद्धिक्षयात्मकाः ।। वा. शा. 3-71). येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण जे अन्न म्हणून सेवन करतो ते सजीव सृष्टीतीलच असावे लागते. ( मी येथे सर्वसामान्य व्यक्तींबद्दल बोलतो आहे. योगाच्या क्षमतेने वायुभक्षण करुन राहणाऱ्या ऋषिंबद्दल बोलत नाहीये. त्यांची क्षमता थोडी भिन्न असावी. त्याच्या विषयी विवेचन करता येईल असे वाटते. पण ते विषयांतर होईल). आपण सजीव नसलेली दोन द्रव्ये सेवन करतो. जल आणि लवण. परंतु जलाचा role हा medium म्हणून आणि लवणाचा रसबोधनासाठी. त्यापैकी लवण नात्युपयुञ्जीत । आणि जल पिबेत् स्वस्थो अपि अल्पशः । महत्त्वाचे हे की केवळ जल किंवा लवण सेवन करुन आपण जगू शकत नाही. म्हणजे त्यांचा आहार म्हणून उपयोग नाही हे स्पष्ट आहे. तस्मात् आपला आहार हा सजीव सृष्टीतीलच असावा लागतो. असे का याचे उत्तर भूताग्निमध्ये आहे. आहारसेवन केल्यावर जाठराग्निची क्रिया सुरु झाल्यावर द्रव्यातील भूताग्निदेखिल प्रज्ज्वलित होतो व त्याची जोड मिळाली तरच जाठराग्निचे कार्य पूर्ण होऊ शकते. द्रव्यामध्ये भूताग्नि active नसेल तर केवळ जाठराग्नि द्रव्याचे पचन करु शकत नाही. त्याची दोन उदाहरणे देता येतात. एक – मृद्भक्षणजन्य पांडुमध्ये वाग्भट सांगतो - स्रोतांस्यपक्वैवापूर्य कुर्याद्रुद्ध्वा च पूर्ववत् । सेवन केलेली माती अपक्व एव ..... राहते. वस्तुतः जाठराग्निला काय अडचण आहे त्या मातीचे पचन करायला ? तर त्या मातीमध्ये भूताग्नि आवश्यक तेवढा नाही आणि तो जाठराग्निने active करता येईल इतका नाही. दुसरे उदाहरण – विष – तेही असेच अपाकि. जरी ते जिवंत सृष्टीतील असले तरी त्यातील भूताग्नि active नाही म्हणून ते मारक आहे.
याच अनुषंगाने आणखी एका प्रश्नाची उकल होते. आपण चिकन, फळे, भाजी आणतो आणि शिजवतो व त्याचे सेवन करतो. शिजवण्यापूर्वी व नंतरही त्याला एक विशिष्ट Shelf Life असते. ते कशावर अवलंबून आहे. चिकन मारलेली आहे. फळे झाडावरुन तोडलेली आहेत. म्हणजे आत्म्याचा संबंध नाही हे उघड आहे. मग हे Shelf Life कशावर ठरते. तर त्यातील भूताग्नि काही काळ अस्तित्वात असतो. (म्हणून तर व्यक्तीच्या मृत्युनंतर काही काळ शरीरस्पर्श उष्ण असू शकतो). Refrigerator मध्ये ठेऊन किंवा अन्य काही मार्गाने आपण तो preserve करु शकतो. मात्र जेव्हा तो अग्नि एका मर्यादेपेक्षा कमी होतो तेव्हा ते अन्न “मरते”. आता ते अन्न म्हणून उपयोगी पडू शकत नाही कारण जाठराग्निमुळे active होण्यासाठी त्यात भूताग्नि नाही. त्यानंतर असे चिकन, अशी फळे “कुजतात”. चरकाच्या “शान्ते अग्नौ म्रियते” या सूत्राचा हा वेगळा अर्थ आहे. द्रव्यातील अग्नि शांत झाला की अन्न मरते.
या पद्धतीने लावलेल्या अन्वयाचे अनेक उपयोग आहेत. आयुर्वेदातील औषधांना Route of Excretion का नाहीत आणि allopathy च्या औषधांना ते का आवश्यक आहेत  यातून समजते. रसशास्त्राच्या प्रक्रियांचाही अर्थ नीट उलगडतो. आयुर्वेदाची औषधे ही सजीव सृष्टीतून आलेली असल्यामुळे त्यांचे रीतसर पचन होते. त्या द्रव्यांपैकी Harmful भाग असलाच तर जाठराग्निच त्याला बाजूला काढतो व दोष-धातु-मल यामध्ये त्याचे रुपांतर घडवून आणतो. त्यामुळे Side-effect इ. ची शक्यता बऱ्याच प्रमाणात नष्ट होते. (बऱ्याच प्रमाणात म्हणायचे कारण असे की कोपन द्रव्ये असतील तर त्यांच्या प्रभावामुळे अनिष्ट परिणाम होतीलच). मात्र allopathy ची अनेक औषधे ही chemically derive केलेली असल्यामुळे, द्रव्य आहे म्हणजे रस-वीर्य-विपाक-प्रभाव-गुण आहेत म्हणून त्यांचे कर्म घडेलच, परंतु ते शरीरामध्ये assimilate होऊ शकणार नाही. शरीराला त्याला बाहेर टाकावे लागेल कारण जाठराग्नि ते पचवू शकत नाही. म्हणून त्या औषधांना route of excretion आवश्यक आहे. आणि तो route उपलब्ध नसेल तर ती औषधे वापरता येत नाहीत. आयुर्वेदाच्या औषधांना हे बंधन नाही.
हाच प्रश्न रसशास्त्राच्या औषधांच्या बाबतीत येतो. रसशास्त्रातील अनेक औषधे खनिज स्वरुपाची आहेत. रसशास्त्राच्या प्रक्रियांमध्ये भावना, पुट, कुपिपक्व व पोट्टली अशा अनेक पद्धतीने त्या द्रव्यांमध्ये अग्नि स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. या सर्व प्रक्रिया जर व्यवस्थित केल्या तर या मूलतः खनिज असणाऱ्या द्रव्यांमध्ये अग्नि स्थिर होतो व तो भूताग्नि म्हणून उपयोगी पडतो. त्यामुळे ही औषधे safe होतात. असा अग्नि बाहेरुन द्रव्यामध्ये स्थिर करता येतो याची अनेक उदाहरणे आहेत. उष्णोदकाचे गुण हे याची साक्ष देतात. पाणी उकळून विशिष्ट प्रमाणात आटवले की त्याची दीपन, पाचन अशी कर्मे करण्याची क्षमता वर्णन केलेली आढळते ती याचमुळे. मृत्युच्या वेळी अधिक मात्रेमध्ये हेमगर्भ वापरला असेल तर त्या व्यक्तीचे शरीर अधिक काळ अधिक प्रमाणात उष्ण राहते असा अनुभव गुणे शास्त्रींनी नोंदवलेला आहे. ही दृष्टी ज्या रसशास्त्राच्या ऋषिंना होती त्यांच्या विषयी अतीव आदर वाटत राहतो. रसशास्त्राची निर्मिती आयुर्वेदाच्या तत्त्वांवरच झालेली आहे याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे.
शारीरद्रव्यांमधील भूताग्नि
शारीरद्रव्यांमधील भूताग्निचा role हा थोडासा भिन्न आहे. धात्वग्निंचे कार्य पूर्ण झाल्यावर पोषक धात्वंश ज्यावेळी प्रत्यक्ष धातुंचे पोषण करतो त्यावेळी पोषक अंश व पोष्य धातु हे दोन्ही पांचभौतिकच आहेत. तेव्हा त्या पोषक अंशापैकी पृथ्वि महाभूताने पोष्य धातुमधील पृथ्वि महाभूताचे पोषण व्हायचे असते. त्यावेळी त्या शारीरद्रव्यामधील पृथ्विमहाभूताग्नि हा पोषक धातुमधील पृथ्वि महाभूताचे पचन करुन घेतो. त्या अर्थाने पार्थिवाः पार्थिवान् एव ..... या सूत्राची व पार्थिवा आहारद्रव्यगुणा देहगतान् पार्थिवानेव द्रव्यगुणान् पुष्णन्ति या चक्रपाणि टीकेची संगती लागते. असे असल्यामुळे भूताग्निच्या क्रियेचा End point दिलेला आढळत नाही. किंबहुना या पद्धतीने आहारद्रव्याचे शारीरधातुमध्ये पूर्ण रुपांतर झाल्यावरच भूताग्निचे कार्य संपते असे म्हणता येईल.
या सर्व विवेचनाचे महत्त्व व्यवहारामध्ये खूपच आहे. Cancer सारख्या व्याधिंमध्ये याचे महत्त्व राहणार आहे. जी द्रव्ये – आहार किंवा औषधी – आवश्यक तेवढ्या महाभूताग्निंनी युक्त नसतील ती सर्व द्रव्ये अपाकि व म्हणून विषवत् होऊ शकतात. मग ती Chemical Fertilizers असोत, हवेतील Pollutants असोत किंवा Chemically तयार केलेली औषधे (Allopathy ची किंवा नीट प्रक्रिया पूर्ण न केलेली रसशास्त्राची) असोत, ही सर्व अपाकि व म्हणून विषच ठरणार आहेत. कारण त्यांच्यामध्ये आवश्यक तेवढा महाभूताग्नि नाही व अशी द्रव्ये ही Carcinogenic असणार आहेत. (किंबहुना नवीन Studies मध्ये, नेहमी वापरली जाणारी pain killers सुद्धा carcinogenic आहेत असे स्पष्ट होते आहे) तसेच Cancer सारख्या व्याधिंच्या चिकित्सेमध्ये अग्नि व त्यातही महाभूताग्निचे महत्त्व यातून स्पष्ट होते.
दीर्घकाळ पडलेल्या प्रश्नांची मला सुचलेली उत्तरे मी या लेखामध्ये मांडलेली आहेत. वैद्य विवेक साने यांच्या गुरुवर्य कोल्हटकर प्रतिष्ठानच्या गुरुपौर्णिमा 2014 च्या कार्यक्रमामध्ये केलेल्या व्याख्यानाची मदत मला हा लेख लिहीताना झालेली आहे हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करु इच्छितो.
प्रामुख्याने नवीन वैद्य व विद्यार्थ्यांसाठी हा लेख लिहीलेला आहे. ज्येष्ठ, श्रेष्ठ व ज्ञानवृद्ध वैद्यांना हे बालकाचे बोल वाटतील अशी खात्री आहे. तरीही त्यांनी त्यातील चुका व त्रुटींकडे दुर्लक्ष न करता त्या मला सांगाव्यात म्हणजे मला माझ्या दृष्टीकोनामध्ये सुधारणा करता येतील अशी विनंती आहे.
वैद्य रसिक श्रीराम पावसकर
vaidyapawaskar@hotmail.com
पुणे

Saturday, January 30, 2016

दिल की धडकन रूक न जाए


दिल की धडकन रूक न जाए
 आज ब­रयाचदा आपण ऐकतो / पाहतो किंवा वृत्तपत्रात वाचतो की ऐन तिशीत ह्दयाचा झटका आला आणि क्षणार्धात जिवनयात्रा संपली. किंवा ऐन तारुण्यात ह्दयविकार, कोलेस्ट्रॉल वाढलेले इत्यादी अनेक समस्या ! तर बघण्यात येत आहे की भारतीय तरूणांमध्ये वाढते ह्दयरोगाचे प्रमाण गंभीर समस्येचे रूप घेत आहे. पुर्वी जेंव्हा चाळीशी नंतर ह्दयाचे आजार होण्याची शक्यता असायची त्या समस्या आज विशीतल्या युवापिढीला झालेल्या दिसतात.तज्ञांच्या अभ्यासानुसार याला कारण आजची धावपळीची जिवनशैली यास शभंर टक्के कारणीभूत होय. तणाव, थकवा, प्रदुषण अशा अनेक कारणांमुळे ह्दयासारख्या महत्त्वपुर्ण अवयवाचे काम क्षणोक्षणी कठीण होत चालले आहे.
ह्दयरोगाचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तणाव होय.तणावामुळे मेंदुव्दारे ज्या रसायनांचे स्त्रवण होत असते ते ह्दयाच्या तंत्रात दोष निर्माण करू शकतात. तसेच युवावर्गात ह्दयासंबधी आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे धुम्रपान व मसालेदार तळीव पदार्थांचे अत्याधिक सेवन करणे होय. जर आपण आपल्या आहारविषयांस दुर्लक्षित करित आहात, आपल्या खाण्यापिण्याची नियमित वेळ नाही. फास्टफुड, तळीव आणि मैदयाने बनवलेले पदार्थ आपल्या खाण्यात अधिक प्रमाणात असतात तर आपण डेजंर झोनच्या खूप जवळ आहात. जर आपण कुठल्याही प्रकारचे योगासन, व्यायाम करीत नाही, वाढत्या वजनाबद्दल आपण अनभिज्ञ आहात तर केव्हांही ह्दयाचे आजार आपणांस जवळ करून घेऊ शकतील. स्थुलता आणि ह्दयरोग यांचा अगदी जवळचा संबध आहे. ह्दयविकार तज्ञानुसार जर आपल्या कबंरेचा घेर 36 इंच पेक्षा एक इंच पण जरा जास्त वाढला तर आपण वेळीच सावध झालेले बरे! कारण वाढत्या पोटाच्या आकारमानासोबत हार्ट अटॅकचा धोकासुध्दा एक - एक टक्याने वाढत जातो. जर आपण मधुमेह, उच्चरक्तदाब याने पुर्वीच ग्रस्त आहात तर ह्मदयाचे आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे. तसेच ह्दयविकार हे अनुवांशिक देखील असू शकतात. तंबाखू, धुम्रपान तसेच मदयपान हया सवयी ह्मदयरोग वाढविण्यात अग्रेसर आहेत.
बैठी जिवनशैली, उशीरा रात्री जागरण, व्यायामाचा अभाव यामुळे ह्दयघाताचे सकंट दुपटीने वाढते.
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक वाढल्यास धमन्यांच्या आतल्या भित्तीवर ही चरबी साठून राहते. धमन्यांस काठिण्यता येते. रक्तवहनाचा मार्ग संकुचित होतो. रक्तात निर्माण झालेल्या गाठी त्यामुळे अडकुन राहतात. अशी स्थिती जर हार्दिक धमनी ह्दयाला रक्तपुरवठा करणारी धमनी मध्ये निर्माण झाली तर परिणाम ह्दयाघात !
ह्दयरोगाचे सामान्य लक्षण :-- थोडयाही पाय­या चढल्यानतंर धाप लागणे.
किंवा चालल्यास दम लागणे.
1. PREVENTION IS BETTER THAN CURE -- हे आपण नेहमीच वाचत ऐकत आलो आहे. तर ह्दयरोगापासून वाचण्याचा हाच उत्तम उपाय, कुठल्याही व्याधीच्या उपचारापेक्षा त्याचे प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक उत्तम ! त्यासाठी --
नियमितपणे आपल्या सर्व आरोग्य तपासण्या करून घेणे..उदा. रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल लेव्हल, शुगर लेव्हल, स्ट्रेस टेस्ट, इसीजी.
2. तणावापासून बचाव करण्यासाठी रोज 45मि. व्यायाम करणे. सोबत 15 ते 20 मिनिटे ओमकार,प्राणायाम ध्यान चा देखील अभ्यास करणे.
आहारातील तेल, तिखट, मसाला, साखर, मैदा, मिठ अत्यंत कमी करणे. घरी बनवलेले तूप घेण्यास हरकत नाही.
3. तसेच फळे, पालेभाज्या, फळभाज्या, हिरवे मुंग यांचे प्रमाण आहारात वाढविणे.
अध्यात्मिक वाचनात रूची वाढविणे.
4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिक वजन असल्यास वजन कमी करणे खूप गरजेचे ! त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तज्ञांच्या सल्ल्याने करणे. आयुर्वेदीय उपचारांमुळे वजन तर कमी होतेच. पण त्यासोबत शरीरात साठलेली घाण (असे दोष ज्यामुळे भविष्यकाळात व्याधी होऊ शकतात) बाहेर निघते. सर्व शरीराचे शुध्दीकरण होते. त्यामुळे शरीराचा निसर्गत: स्टॅमिना वाढतो, असलेले आजार नियंत्रणात येतात किंवा भविष्यात व्याधी होत नाही.
5. सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे शरीररूपी गाडीची वेळोवेळी आयुर्वेदीय पचंकर्माच्याव्दारे सव्र्हीसिंग आवश्यक होय. जसे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण तसेच ह्दयधारा व ह्दयबस्ती..ज्याने आपले शरीर परत नव्याने फुलत जाऊन शारीरिक क्षमता वाढत जाईल. पचंकर्माचे फायदे वाचण्यापेक्षा स्वत: अनुभव घेऊनच त्याचा आनंद घेणे अधिक श्रेष्ठ !!
ह्दयासाठी सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे प्रेम.....प्रेम घेणे व घेण्यासाठी आधी देणे तरच ह्दयाचे निश्चित मग निरोगी राहणे.
धन्यवाद ।
 इति शुभम् ।।
 डॉ. सौ. कविता पवन लड्डा
 लातूर
 मो. 09326511681

Friday, January 29, 2016

घरोघरी आयुर्वेद‬

आयुर्वेदाने दुधाला सर्वोत्तम 'टॉनिक' मानले आहे. वृद्धावस्थेत तर गायीचे दूध आणि तूप नियमितपणे आहारात असावे असे आयुर्वेद आग्रहाने सांगतो. असे असले तरीही प्रत्येक गोष्टीला काही विधिनिषेध हा असतोच. दुधाचे लाभ पाहिल्यावर दूध कधी टाळावे ते पाहूया.
१. पचायला जड असल्याने अपचन झालेले असल्यास वा शौचास पातळ होत असल्यास.
२. ताप आलेला असताना; विशेषतः विषमज्वरात.
३. कफकारक असल्याने सर्दी, खोकला किंवा दमा अशा श्वसनसंस्थेच्या विकारांत.
४. फळे वा मीठ घातलेली पोळी/ भात यांच्यासह.
५. विशेषतः आंबट फळे आणि दूध यांचे पाठोपाठ सेवन करू नये.
६. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिऊ नये.
७. दूध पिताना ते कोमट असावे. वैद्यांच्या सल्ल्याशिवाय थंड दूध पिऊ नये.
दूध न पचण्याची समस्या असल्यास वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. 'आता याला/हिला कधीही दूध देता येणार नाही' असा शिक्का मारलेल्या कित्येक बालरुग्णांना अल्पशा उपचारानंतर दूध देणे सहज शक्य होते; आणि ते पचतेदेखील हे आमच्यासारख्या कित्येक वैद्यांचे नित्य अनुभव आहेत. वैद्यकीय शास्त्राच्या एका शाखेची मर्यादा ही दुसऱ्या शाखेचे बलस्थान असते हे कायम लक्षात ठेवावे!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(टीप: कृपया लेख शेयर करताना लेखकाच्या नावासहच करावा. नाव वगळून त्याच्या मेहनतीचा अपमान करू नये. आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारार्थ हा लेख; लेखकाच्या नावासह शेयर करण्यास आपले स्वागत आहे.)

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार
अन्नात भवन्ति भूतानि |
अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते.
       अन्न हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी किंवा यंत्रणा आपल्या आहारातूनच निर्माण होत असते. म्हणूनच स्वास्थ्याच्या दृष्टीने आहाराला आहाराला विशेष महत्व आहे. स्त्रीशरीरात गर्भाचे रोपण व पोषण होत असतांना देखील हाच नियम लागू होतो. म्हणूनच भावी पिढी ही शरीर, मन, बुद्धी ह्या तिन्ही अंगांनी निरोगी निपजण्यासाठी अर्थात सुप्रजननासाठी आहाराचे महत्त्व लक्षात घेणे जरुरीचे आहे.
गर्भधारणा कशी होते?
     गर्भधारणा: गर्भाशयात शुक्र ( पुरुष बीज ) व आर्तव (स्त्री बीज ) आणि जीव / आत्मा ह्यांचा संयोग झाल्यानंतर त्यास गर्भ अशी संज्ञा दिली जाते. हे पुरुष व स्त्री बीज जर उत्कृष्ट असतील तर होणारी संतती सुद्धा चांगलीच होते. अशी सुप्रजा निर्मितीसाठी स्त्री व पुरुष ह्यांचे स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे हे तितकेच महत्त्वाचे असते.
    शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आहार, व्यायाम, निद्रा आदींचा समावेश होतो. ह्यांचे योग्य प्रकारे पालन केले तर मन हे अपोआपच प्रसन्न राहते. म्हणून अपत्य प्राप्तीचा संकल्प केल्यापासून सर्वांनी गर्भाधानापूर्वी किमान २ ते ३ महिने आपला आहार संतुलित ठेवून आरोग्य सुधारावे. ह्याने सुप्रजनासाठी नक्कीच हातभार लागेल.
गर्भधारणेत आहाराचे महत्त्व : गर्भवती स्त्री एकाच वेळी दोन जीवांचे पोषण करत असते. म्हणून तिला जास्त आहाराची गरज असते. गर्भाची सामान्य व अविकृत वाढ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीचा आहार पौष्टिक व संतुलितच असावा लागतो. कारण गर्भाची वाढ होणे हे पूर्णत: तिच्या आहारावर अवलंबून असते. तिने पोषक, पूरक आहर घेतला नाहीतर गर्भाची वाढ अपुरी होऊन गर्भाच्या सर्वांगीण विकासावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आहाराचे योग्य नियोजन करणे हे फार महत्त्वाचे आहे.
        संतुलित आहार: उष्मांक (calories), प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार (minerals), फायबर, पाणी इ. घटकांचा आहारात समावेश असावा. यामुळे माता व बालक ह्या दोहोंचे स्वास्थ्य उत्तम राहते.
बालकाचे पोषण योग्य होण्यासाठी सामान्य स्त्रीपेक्षा गर्भवती स्त्रीचा आवश्यकता ही ३०० कॅलरीने वाढलेली असते.
गर्भावस्था ही तीन टप्प्यांत विभागलेली असते.
पहिला टप्पा – गर्भधारणेपासून ते सुरुवातीचे तीन महिने (१ – ३ महिने)
दुसरा टप्पा - ४ ते ६ महिन्यांचा
तिसरा टप्पा – ७ ते ९ महिन्यांचा
पहिल्या तीन महिन्यांतील गर्भिणीचा आहार : प्रथम महिन्यात गर्भ हा अव्यक्त, कफस्वरूप असतो. पुढच्या महिन्यात त्या कफस्वरूप गर्भास घनता प्राप्त होते व सर्व महत्त्वाचे अंगप्रत्यंग इंद्रिये ही एकाच वेळी तिसऱ्या महिन्यात उत्पन्न होतात.
अशी महत्त्वाची जडणघडण पहिल्या ३ महिन्यांत होत असते. जन्माला येणाऱ्या बाळाची सूक्ष्म आकृती ह्या ३ महिन्यांतच तयार होत असल्याने ह्या महिन्यांतील पोषणावरच पुढील सहा महिने अवलंबून असतात. म्हणूनच योग्य व संतुलित आहार घेणे हे गर्भिणीच्या दृष्टीने आवश्यक असते. गर्भावस्थेतील सुरुवातीच्या ह्या काळातच गर्भिणीला मळमळ उलट्या होणे चक्कर येणे, अन्नाचा वास नकोसा वाटणे, खाण्याची इच्छा नसणे, इत्यादी त्रास उद्भवतात.
हे त्रास जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून पुढील उपाययोजना करावी.
• जास्त वेळ उपाशी राहू नये.
• झोपेतून उठल्या –उठल्या लगेचच काहीतरी खावे. जसे दूध, पोहे, दशमी काही नसेल तर गव्हाची बिस्कीटे (मैद्याची टाळावीत)
• एकाच वेळी भरपूर आहार घेण्यापेक्षा तो आहार ४ ते ६ वेळांमध्ये विभागून घ्यावा. ह्याने स्वतःचे व गर्भाचे पोषण व्यवस्थित होईल.
• चहा, कॉफीपेक्षा थंड दुधाचा समावेश करावा
• पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
प्रथम तीन महिन्यांत आवश्यक अन्नघटक -
सर्व संतुलित आहाराबरोबरच जीवनसत्व ब ९, फॉलिक अॅसिड हे येणे अत्यंत आवश्यक असते. गर्भधारणेच्या आधी १ - २ महिने व गर्भधारणा झाल्यावर पहिले ३ महिने फॉलिक अॅसिडयुक्त आहार व गोळ्या घेणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा बालकात Neural Tube defects & spina bifida सारखे विकार उद्भवण्याची शक्यता वाढते.
पुढील अन्नपदार्थातून फॉलिक अॅसिड मिळते.
• हिरव्या भाज्या – ब्रोकोली, कोबी, वाटाणा, कारले, दुधी, भेंडी, फ्लॉवर
• हिरव्या पालेभाज्या – पालक, मेथी, सरसो, मुळा, कोथिंबीर, पुदिना
• गव्हाचे पीठ, ओट, Corn Flakes
• फळे – टरबूज, संत्री, मोसंबी
• सुकामेवा – अक्रोड, बदाम
• जीवनसत्व अ
गर्भाच्या पूर्ण वाढीसाठी व त्वेच्या आरोग्यासाठी गर्भिणीने पूर्ण नऊ महिने ह्या जीवनसत्वांचा आहारात समावेश करावा.
गडद रंगाच्या भाज्यांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाणात अधिक आढळते उदा. पालक, मेथी, सरसो, कोथिंबीर, गाजर, लालभोपळा, तसेच संत्री, मोसंबी ह्या फळांतूनही जीवनसत्वे जास्त प्रमाणात मिळतात.
मांसाहार करणाऱ्यांसाठी – मासे व मटणाची कलेजी.
दुग्धजन्य पदार्थ – दूध, दही, ताक, तूप
गर्भिणीने पाणी पिण्याची प्रमाण वाढवले पाहिजे किमान दररोज ८ ते १० ग्लास इतके पाणी घेतले पाहिजे. ह्यासाठी थंड दूध, नारळपाणी, लिंबुपाणी ह्यांचा समावेश करावा. शक्यतो घरी बनवलेलाच फळांचा रस घ्यावा. उन्हाळा असेल तर शरीरातील पाणी कमी होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
गर्भावस्थेतील दुसरा टप्पा (४ ते ६ महिने):
चतुर्थ मास
ह्या महिन्यात गर्भ अधिक व्यक्त होतो व त्याला स्थिरता प्राप्त होते. यावेळी गर्भाच्या अवयवांची विशेष वाढ सुरु होत असल्यामुळे गर्भिणीला शरीर जड झाल्याप्रमाणे वाटते.
गर्भाचे विशेष अवयव म्हणजे मेंदू, डोळे ह्यांच्या अविकृत वाढी साठी गर्भिणीला संतुलित आहाराबरोबरच ओमेगा – ३ फॅटी अॅसिडची आवश्यकता असते.
ओमेगा – ३ फॅटी अॅसिड पुढील अन्नपदार्थातून मिळतात.
माशांमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आढळून येते. (फिश ऑइल)
हिरव्या पालेभाज्या – पालक, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर
सुकामेवा – अक्रोड, बदाम, सूर्यफुलाच्या बिया
सोयाबीन व टोफूमध्ये ह्याचे प्रमाण मुबलक असते.
पंचम मास
गर्भस्थ शिशूचे रक्त व मांस ह्यांची अधिक वृद्धी होते. पृष्ठवंश, दात, अस्थि ह्यांची निर्मिती होऊ लागते. त्यामुळे ह्या महिन्यात कॅल्शियम व जीवनसत्व ‘ड’ ह्यांनी युक्त आहार जास्त घ्यायला हवा. त्याच्या बरोबर इतर अन्नघटकांचीही जोड असावी. ‘कॅल्शियम’ हे क्षार (मिनरल्स) आपल्याला पूर्ण नऊ महिनेच नव्हे तर प्रसूती पश्च्यात सुद्धा तितकीच आवश्यकता असते. कॅल्शियम हे गर्भातील बाळाच्या हाडाच्या मजबुतीसाठी आवश्यक असते.
सामान्य स्त्री / पुरुषास कॅल्शियमची आवश्यकता ५०० ते १००० मिलिग्रॅम रोज असते. गर्भावस्थेत मात्र हे प्रमाण १२०० मिलिग्रॅम असावे लागते.
योग्य प्रमाणात जर कॅल्शियमची गरज भागवली गेली नाही तर, गर्भवतीस पाठ, कंबर, सांधे दुखणे पायात गोळे येणे, बाळंतपणास त्रास होणे, इत्यादी लक्षणे दिसून येतात.
अपुऱ्या कॅल्शियममुळे बाळाची हाडे ठिसूळ बनतात, दात उशिरा येणे व येताना त्रास होणे अशी लक्षणे उद्भवतात. हे टाळण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थ वाढविले पाहिजे.
कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी ‘ड’ जीवनसत्व आवश्यक असते. म्हणून त्याचाही आहारात समावेश करावा.
सूर्यप्रकाशातून मुबलक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्व मिळते. त्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरण्याने फायदा होतो.
दुग्धजन्य पदार्थ – दूध, दही, लोणी, तूप
Seafood (माशांमध्ये) ‘ड’ जीवनसत्व असते.
- Fish liver oil हे ड जीवनसत्वाचे उत्तम माध्यम आहे.
शाकाहारींसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 mg vitamin D घ्यावे.
कॅल्शियम युक्त पदार्थ -
       सर्वात जास्त कॅल्शियम हे दुधात व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, ताक, लस्सी, आईसक्रिम ह्यात असते. ह्यापैकी अतिथंड पदार्थ टाळावेत. दुधाचे अन्नमार्गात योग्य शोषण होण्यासाठी लाळेची आवश्यकता असते. त्याकरिता पोळ्यांची कणीक दुधात भिजवून पोळ्या कराव्यात. चावून खाण्यामुळे दुधातील कॅल्शियम अन्नमार्गातून उत्तमप्रकारे शोषले जाते व धातूंना शक्ती मिळते.
• धान्यात राजमा, सोयाबीन व नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
• हिरव्या पालेभाज्या – पालक, ब्रोकोली, मेथी, कच्चा कोबी, टोमॅटो, शेवग्याची पाने
• फळे – संत्री, लिंबू, स्ट्रोबेरी, किवी.
• सुकामेवा – बदाम, काजू, आक्रोड.
षष्ठ मास
      आतापर्यंत तुमच्या शरीराला संतुलित आहाराची सवय असते. त्यामुळे तोच आहार पुढेही चालू ठेवावा. उदा. काही प्रमाणत प्रथिने, डाळी, काही भाज्या, फळे, अंडी, सुकामेवा ह्यांचा आपल्या आवडीप्रमाणे आहारात समावेश करावा.
गर्भिणीला मसालेदार, चमचमीत पदार्थ, फास्टफूड, फरसाण, चॉकलेट, असे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. हा मोह शक्यतो टाळावा. तरीही खाण्याची इच्छा तीव्र वाटल्यास वरील पदार्थ खाण्याआधी प्रथम एखादे फळ (सफरचंद, केळे) खावे व त्यावर वरील एखादा पदार्थ खावा. त्यामुळे खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल व ते जास्त खाल्ले जाणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनावश्यक कॅलरीज शरीरात जाणार नाहीत व अवाजवी वजन वाढणार नाही.
      त्याचप्रमाणे चहा, कॉफीचे अति सेवन गर्भिणीच्या दृष्टीने अयोग्य असते. चहा, कॉफीमुळे शरीरात लोहाचे पोषण योग्य प्रकारे होत नाही व पुढे जाउन रक्ताल्पता होण्याची शक्यता असते. गर्भिणीला लोहाची सर्वात अधिक गरज गर्भावस्थेच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात असते. कारण लोह हे गर्भाच्या व वारेच्या वाढीसाठी आवश्यक असते.
लोहाची कमरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त औषधांचा वापर केला जातो. पण काहींना ह्या औषधांमुळे मलबद्धता होते. म्हणून ह्या औषधां बरोबर लोहयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करावा.
लोहयुक्त पदार्थ – मटण (meat) व विशेषत: लिव्हरमध्ये लोहाचे प्रमाण प्रचुर असते. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांनी ह्या पदार्थाचा आहारात समावेश करावा.
हिरव्या पालेभाज्या - पालक, मेथी, सरसो, पुदिना, कोथिंबीर .
• पूर्ण धान्य (whole grains) मध्ये लोह असते.
• फळांमध्ये - सफरचंद, डाळींब.
• सुकामेवा – यात विशेषतः बदामाचा वापर करावा. त्याचबरोबर अंजीर, जर्दाळू (apricoats) सेवन करावेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे लोहाचे शोषण शरीरात अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्याच्या बरोबर ‘क’ जीवनसत्व (Vitamin - C) घेणे हे अत्यंत आवश्यक असते.
जीवनसत्व ‘क’ पुढील पदार्थातून मिळतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे लिंबू त्यासाठी जेवणात मधूनमधून लिंबू पिळणे आवश्यक असते.
मोड आलेले मूग, मेथ्या.
फळ – संत्री, मोसंबी.
गर्भावस्थेतील तिसरा व अंतिम टप्पा (७ ते ९ महिने)
सप्तम मास
ह्या अवस्थेत सर्व अंगप्रत्यांगानी गर्भ परिपूर्ण होतो, त्याच्या अवयवांचे स्वरूप विकसित होते. गर्भाच्या वाढीमुळे गर्भाशयाचा आकार वाढतो व त्याचा दाब आतड्यांवर पडतो. त्यामुळे मलबद्धता, अॅसिडीटी (जळजळ, अम्लपित्त) ह्यांसारखी लक्षणे निर्माण होतात.
अम्लपित्त जळजळ जास्त होत असल्यास एकाच वेळी पूर्ण आहार घेण्यापेक्षा थोड्या – थोड्या वेळाने आहार घ्यावा.
• दोन खाण्यामध्ये जास्त अंतरही ठेवू नये. प्रत्येक २ - ३ तासाने काहीतरी पौष्टिक खावे.
• मलबद्धता होत असल्यास भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. व चोथा (fibre) युक्त आहार घ्यावा. त्यामुळे पचन सुखकर होईल व उत्सर्जन क्रियेस त्रास होणार नाही.
• चोथा (fibre) युक्त पदार्थ
• सफरचंद, केळी, गाजर, ब्रोकोली, फ्लॉवर, टोमॅटो, वाटाणा, हिरव्या पालेभाज्या.
(फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा ती चावून खाल्लीतर फायदा अधिक होतो.)
आहारात चोथायुक्त पदार्थाचा समावेश करत असेल तर त्याबरोबर पाणी पिण्याचे प्रमाणही वाढलेले पाहिजे. कारण चोथायुक्त पदार्थ हे पाण्याचे शोषण करतात. म्हणून गर्भिणीने पूर्ण नऊ महिने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
पोटसाफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अष्टम मास
ह्या महिन्यात सर्व अंगप्रत्यंग पूर्णत्वास येत असतात. कारण शेवटच्या ३ महिन्यातच गर्भाची वाढ झपाट्याने होत असते. म्हणून यावेळेला सर्व अन्नघटक युक्त आहार म्हणजे प्रथिने, जीवनसत्व (अ, ब, क, ई, के) कर्बोदके, कॅल्शियम हे सर्वच जेवणात असायलाच हवे.
नवम मास
गर्भिणीने वर उल्लेख केल्याप्रमाणे संतुलित आहाराचे सेवन केले असेल तर नऊ महिने पूर्ण होण्यापर्यंत तिचे वजन हे ११ ते १२ किलो पर्यंत वाढणे अपेक्षित असते. हे वाढलेले वजन गर्भपोषण व आरोग्याच्या दृष्टीने हितकर असते.
असा हा गर्भ सर्व शरीरावयांत परिपूर्ण पुष्ट होऊन प्रसवोन्मुख होतो.
गर्भिणीने विशेषकरून काय खाऊ नये ?
पपई, अननस, स्ट्रोबेरी, मेथी, बीन, पावटे, फ्रीज मधले थंडगार पदार्थ, बर्फ टाकलेले दूध, शिळे ताक हे पदार्थ वर्ज्य करावेत. गरम पदार्थाबरोबर मध खाऊ नये, मैद्याची बिस्किटे, ब्रेड, वडापाव, पिझा खाऊ नये. नॉन सीझनल फळे, डबाबंद पदार्थ, मिल्कशेक, चीज, पनीर शक्यतो खाऊ नये.
थोडक्यात ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १७ मधील खालील ओव्या गर्भिणीने लक्षात ठेवाव्यात:
तेवीं जैसा घेपे आहारु| धातु तैसाचि होय आकारु|
आणि धातु ऐसा अंतरु| भावो पोखे ||११६||
जैसें भांडियाचेनि तापें| आंतुलें उदकही तापे|
तैसी धातुवशें आटोपे| चित्तवृत्ती ||११७||
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे| तैं सत्त्वाची वाढी पाविजे|
राजसा तामसा होईजे| येरी रसीं ||११८||
तरी सात्त्विक कोण आहारु| राजसा तामसा कायी आकारु|
हें सांगों करीं आदरु| आकर्णनीं ||११९||
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

घरोघरी आयुर्वेद‬

     सुहागरात'ला गरम दुधाचा पेला दाखवणं हे तसं हिंदी चित्रपटसृष्टीने प्रसिद्ध केलेलं समीकरण. मात्र; त्यामागे प्रथा-परंपरा यांचा आधार आहेच. दुधाला केवळ एखाद्या 'ग्रंथीचा स्राव' या स्वरूपात न पाहता; शरीरातील सातही धातूंच्या उत्तम अंशातून बनलेले द्रव्य म्हणून आयुर्वेद पाहतो. आयुर्वेदाने दूध हे तत्काळ शुक्रोत्पत्ती करणारे आहे असे म्हटले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजही कित्येक आखाड्यांमध्ये कसरत झाल्यावर 'धारोष्ण' दूध पिणे हा पहिलवानांचा नित्यक्रम असतो. पहिलवानांचा नियमित खुराक म्हणून बनवली जाणारी थंडाईदेखील बनते ती दुधातच!!
     दूध हे शुक्रधातुसाठी विशेष करून चांगले मान्य केले आहे. म्हणूनच; अपत्यप्राप्तीकरता प्रयत्न करण्यासाठीची औषधे दुधातून घ्यावीत असा वैद्यांचा सल्ला असतो.
      आधुनिक विज्ञानातील काही संशोधनांनुसार; दुधातील 'testosterone' हे हार्मोन हे पुरुषांमधील हेच हार्मोन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने पुरुषांसाठी दूध हा उपयुक्त आहार आहे. थोड्क्यात; परिभाषा बदलल्या तरी सत्य बदलत नसते!!
          मात्र; वरील गुणधर्म हे देशी गाय/ म्हशीच्या दुधाचे आहेत. हार्मोनची इंजेक्शने टोचून निर्माण केलेली 'चार पायांची दुधाची यंत्रे' अशा गुणाचे दूध देणे अवघडच. किंबहुना अशा दुधातले हार्मोनचे अतिरिक्त प्रमाण हे घातक असते असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे; स्थानिक गोशाळा वा तबेल्यांतूनच दूध घेणे इष्ट. मुंबई-पुण्यात कुठल्या आल्यात गोशाळा? या प्रश्नावर 'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' हेच एकमेव उत्तर आहे!!
जरी 'अमृतुल्य' असले; तरीसुद्धा दूध पिणे कधी टाळावे हे उद्या पाहूया...........
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(टीप: कृपया लेख शेयर करताना लेखकाच्या नावासहच करावा. नाव वगळून त्याच्या मेहनतीचा अपमान करू नये. आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारार्थ हा लेख; लेखकाच्या नावासह शेयर करण्यास आपले स्वागत आहे.)

चांगल खा, चांगल दिसा !

चांगल खा, चांगल दिसा ! जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौंदर्यावरही आढळतो हे सुध्दा तितकेच खरे आहे. आयुर्वेद शास्त्रात तर आधीपासूनच या बद्दल विस्तारीत वर्णन आढळते की आपण तिखट मीठ जास्त खाल्ल तर आपले केस लवकर पांढरे होतील किंवा चेह­यावर पिंपल्सचे प्रमाण वाढू शकते इत्यादी. पण इतक्या दिवस आपल्याला हे सगळ थोतांडच वाटायचं ! आहाराचा आणि सौंदर्याचा काय म्हणून संबंध अशीच सर्व साधारण सर्वांची विचारसरणी . पुर्वी डॉक्टरांकडे औषधोपचार करताना रुग्णाने जाताना हळुच विचारावे की डॉक्टर साहेब खाण्यापिण्यात काय घ्यायचे, काय नको ? तर डॉक्टर या प्रश्नाला तितकसं महत्त्व न देता म्हणायचे, नाही तसं काही नाही सगळं चालतं थोडं तेलकट वगैरे नका घेऊ. एवढयातच समोरच्याची बोळवण करायची . पण आज चित्र बदललय बरं का ! आज एम. डी. फिजिशियन असो की कुठल्याशा वैद्यकीय विषयातील विशेष तज्ञ असो आहाराविषयी रुग्णास सविस्तर माहिती देतात. कित्येक डॉक्टरांच्या रुग्ण पत्रकावर तर काही खाण्यापिण्यांच्या पदार्थांची यादीच छापलेली असते. मोठया शहरात तर आपल्यास या बद्दल आहारतज्ञांनाच भेटावे लागते, मग आपल्या आजारानुसार ते तज्ञ आपणास पुर्ण पथ्याची यादी देतात .मात्र आयुर्वेद शास्त्रात थोडया थोडक्याने भागत नाही आपण कुठला पदार्थ घेता, किती घेता, कसा बनविता, कशा पद्धतीने खाता, कुठल्या वेळेत खातात व कुठल्या स्थळी खातात या सर्व बाबीवरुन त्या पदार्थाचे गुण दोष आपणास लाभतील . आजच्या तरुण पिढीचे सर्व साधारण पणे आयडियल असतात करीना, कॅटरीना, दिपीका वा रणधीर कपुर किंवा एखादा खान. तर ही सिलेब्रिाटी मंडळी ग्लॅमरच्या दुनियेशी संलग्न असल्याने त्यांना आपल्या डायट विषयी खूप सजग राहावं लागते, त्यांचा व्यायाम त्यानुसार त्यांचा आहार या बाबत पुरेपुर काळजी ही घ्यावीच लागते. खूप नियंत्रण करतात बरं ही मंडळी खाण्यापिण्यावर नाहीतर आपण आवडता पदार्थ आला समोर की घ्यायचं गच्च पोट भरुन नाही तर राहीच दिवसभर उपाशी तर आपल्यालाही नटनटयांसारखं सुंदर सुदृढ व्हायचं असेल तर आपल्याला देखील आपल्या डायटची काळजी ही घ्यावीच लागेल .आपण आपल्या फिटनेस साठी काहीना काही व्यायाम प्रकार करावाच लागतो, चालणे - पळणे, सुर्यनमस्कार, योगासने काहीही करा, पण आपल्या स्वत:साठी आपण 25 ते 35 मिनीटे रोज देणे हे आवश्यक आहे. व्यायामात किंवा आपल्या रोजच्या शारीरिक हालचालीत आपले स्नायू ताणल्या जातात, कधी कधी तुटतातही पण अशा वेळी पौष्टीक आहार घेतला तर हे स्नायू पुन्हा पुर्ववत होऊ शकतात. पण असा आहार वेळीच घेतला गेला नाही तर स्नायूंना योग्य शक्ती पुरवली जाणार नाही व ते कमजोर होऊन परिणामी तुम्ही देखील अशक्त व्हाल. त्यासाठी व्यायाम आहार यांचा समतोल व्यवस्थित साधलाच गेला पाहिजे पण अनेक वेळा आपण बघतो की सर्वांचा कल पौष्टीक खाण्यापेक्षा चविष्ट खाण्याकडे अधिक असतो. जसे बर्गर, पिझ्झा, भेळ, कोल्डड्रिक्ंस, पाणीपुरी इत्यादी इत्याादी. आणि विश्वास ठेवा यात शुन्य टक्के पोषक द्रव्ये असतात, असतं फक्त फॅट. ही चरबी आपल्या शरीरात जाऊन जाऊन आपण लठ्ठ होऊन जातो मग सुस्ती, जडपणा, आळस, अधिक झोप, रोजच्या दैनंदिन क्रिया मंदावणे, उत्साह नसणे अशी लक्षणे सुरु होतात. मुलींमध्ये पीसीओडी म्हणजे अनियमित पाळी, चेह­यावर लव वाढणे, वजन वाढणे, पिंपल्स येणे अशी लक्षणे आढळतात . तर कधी थायरॉइड डिसऑर्डर किंवा ऐन पंचवीशीत बीपी किंवा मधुमेहासारखे गंभीर आजार उद्भवतात. तरुणांना या आजारांचे गांभीर्य कळणार नाही, पण सौंदर्यासाठी तर आपण निश्चित चंागलं चंागल्ंा खाण्यावर भर देऊ शकतो ना... वि·ाास नसेल वाटत तर तुमच्या इंटरनेट वर सर्च करा, एखादया हिरो किंवा हिरोईनचा डायट शेडयुल. तुम्हाला लक्षात येईल ही मंडळी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, अॅन्टीऑक्सीडेंटस यांचा खूप चांगला ताळमेळ दिवसभराच्या टाईट शेडयुल मध्ये बसवितात. जितकी रसरसीत फळे तुम्ही खाल तेवढी तजेलदार त्वचा तुमची होणार. जितक्या रंगबिरंगी फळभाज्या तुम्ही घ्याल तेवढा तुमचा ग्लो वाढेल, केसांची चमक वाढेल. जेवढा सात्विक आहार तुम्ही घ्याल तेवढी तुमची प्रतिकार शक्ती वाढेल. म्हणजे पौष्टीक व योग्य आहाराच्या सेवनाने तुम्हाला निखळ सौंदर्य तर प्राप्त होईलच पण सोबत आरोग्याचा देखील पाया मजबुत होत राहणार. इति शुभम् । द्वारा :- डॉ. सौ. कविता पवन लड्डा आयुर्वेदाचार्य लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर गर्भसंस्कार केंद्र, पदमा नगर, बार्शी रोड लातूर. mo. 09326511681

Tuesday, January 26, 2016

स्वः मनाने औषधी (self medication)

स्वः मनाने औषधी (self medication)

🌷
भारतीयांचा आवडता प्रकार म्हणजे औषधींचा गुणधर्म माहीति नसताना आजार त्रास कमी करण्यासाठी योग्य सल्ल्याशिवाय उपयोग करणे होय.
It च्या युगात कुठलिही माहीति सहज मिळते. Google आदींचा उपयोग यासाठी होतो.
कुठल्याही आजारासाठी आयुर्वेद औषधींचे side effects नाहीत या समजेने विविध प्रयोग केले जातात. प्रकृति काळ रूतु वय बल आदींच्या विचाराला फाटा दिला जातो. स्वतः च्या शरीराचे स्वतः नुकसान केले जाते. 
समजण्यासाठी काही उदाहरणे
१. कोरफड -- सर्वत्र उपलब्ध प्रसिध्द वनस्पती, या वनस्पतीचा वापर कुठेतरी वाचुन ऐकुन विविध आजारांसाठी केला जातो.
Side effects नाहीत, पण या वनस्पतीच्या भेदन व यकृत उत्तेजना या कामामुळे मुळव्याधचा त्रास परिणाम स्वरूपी effect म्हणुन होउ शकतो. बरयाच जणांना झालेला दिसतोही. सुजही येऊ शकते.
२. मधुमेही रूग्ण एवढे प्रयोग करतात वा त्यांच्याकडुन केले जातात की असे व्यक्ती स्वः मधुमेही तज्ञ होतात !!! आणि सल्ल्यांची हिरवळ ऐन दुष्काळात सर्वत्र फुलते. कडुनिंब रस, मेथ्या, गव्हांकुर रस, जांभुळ, कारले....अशा पदार्थांची औषधींची यादी वरचेवर वाढत जाते. काही जण सल्ल्याने प्रयोग करतात पण बहुतेक लोक योग्य सल्ल्याशिवाय स्वः मनाने औषधी खात असतात. स्वतःची प्रकृति, आजारांची घडलेली कारणे व औषधींचे गुणधर्म माहिती नसताना प्रयोग करतात. प्रकृति आजाराच्या कारणाशी सुसंगत प्रयोग नसेल तर effect होऊन शरीराचे बल ओज कमी होते. आजाराची गंभीरता वाढत जाते. आणि उपद्रव स्वरूप गंभीर आजार निर्माण होतात जे दुरूस्त होण्यासाठी अत्यंत कठीण असतात.
३. वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी लसनाच्या पाकळ्या, पिंपळाची पाने, अमुक पानांचा रस, तमुक वटी यांचा उपयोग केला जातो. कुठल्या कारणामुळे रक्तदाब वाढलाय याचा विचार कुणीही करत नाही. मुळ रक्तदाब वाढीचे कारणाचा विचाराशिवायचे प्रयोग रक्तदाब कमी करत नाहीत.
एवढे प्रयोग उपाय करूनही रक्तदाब मधुमेही रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कारण आहार निद्रा बह्मचर्य या त्रयोपस्तंभाचे पालन कुणी करत नाही. पण विविध प्रयोग मात्र नियमित केले जातात. बहुतेक लोकांना प्रयोगांचा अपेक्षीत परिणाम दिसत नाही. याचा विचार ही करायला हवा.
सर्दी पडसे मुळव्याध ते तापापर्यंतच्या आजारासाठी असे असंख्य प्रयोग केले जातात. स्वः मनाने प्रयोग करणारयांनी विचार आवश्य करावा.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
Mob no-- 9028562102, 9130497856

घरोघरी आयुर्वेद‬

अन्नपदार्थ शिजवत असताना 'नॉन स्टिक' भांड्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्यांच्या कोटिंगसाठी वापरले जाणारे PTFE (Polytetrafluoroethylene) सारखे घटक हे पोटात गेल्यास आरोग्याला घातक असतात. (असे आयुर्वेद नाही तर आधुनिक विज्ञानच सांगते!)
अशी भांडी/ पॅन वापरणे अनिवार्यच असेल तर किमान दोन पथ्ये अवश्य पाळावीत.
१. अशा भांड्यांत पदार्थ शिजवताना ते मंद आचेवर शिजवावे. आच तीव्र असल्यास; त्यातून निघालेल्या वाफा श्वसनावाटे शरीरात जाऊ शकतात. यानेही फुफ्फुसे, हृद्य आणि यकृतासारख्या अवयवांना अपाय संभवतो.
२. अशा भांड्यांना हलकासादेखील चरा पडल्यास ती वापरू नयेत. भांड्यांना आलेल्या अशा ओरखड्याच्या कडांमधूनदेखील यातील आवरणाचे घटक त्यात शिजवल्या जाणाऱ्या अन्नात मिसळत राहतात आणि शरीरात विषार निर्माण करत राहतात. हे विषार कँसरसारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे; अशा भांड्यांना चरा पडल्यास ती फेकून द्यावी!!
नियमितपणे अन्न शिजवण्यासाठी कल्हई केलेली भांडी, लोखंडी वा मातीच्या भांड्यांचा वापर करावा. जेणेकरून; किमान रोजच्या 'पूर्णब्रह्म' अन्नाच्या माध्यमातून आरोग्यास अपायकारक घटक आपल्या शरीरात जाऊ नयेत.
उत्तम खा....स्वस्थ रहा!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Sunday, January 24, 2016

मूळव्याध भंगदर फिसार आणि बंगाली बाबू ए के बिस्वास यांचा धुमाकूळ

"मूळव्याध भंगदर फिसार आणि बंगाली बाबू ए  के बिस्वास यांचा धुमाकूळ "
हि माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवी हा एकमेव हेतू हि पोस्ट लिहिण्यामागे आहे. आजकाल महाराष्ट्राच्या खेडेभागात आणि शहरात देखील सर्रास " लक्ष्मी मूळव्याध आयुर्वेद  क्लिनिक लेडीज के लिये लेडीज स्पेसालिस्ट " नावाचे फलक पाहायला मिळतात . आणि विशेष म्हणजे या सगळ्यांचा खाली नाव common असता ते म्हणजे डॉ   ए के बिस्वास आणि पदवी असते BAMS .
सांगायचा मुद्दा हा कि हे सगळे सो कॉल्ड डाँक्टर भोंदू आहेत त्यांची डिग्री सुद्धा पूर्णपणे खोटी आहे आणि त्यांचे नाव हि खोटे आहेत. कुठल्यातरी एका डॉक्टर च्या हाताखाली 4 महिने काम करायचं आणि स्वतःच स्वयंघोषित डॉक्टर म्हणून बांडगुळ बनून जागा मिळेल तिथे पसरायच. या भोंदू बाबांचा आणि आयुर्वेदाचा काडीचाही संबंध नाही हे कृपया जाणून घ्या . कारण हे सांगताना असेच सांगतात कि आयुर्वेदिक पद्धतीने आम्ही धागा बांधून ऑपरेशन करतो , मूळव्याध भंगदर फिसार या सगळ्यांसाठी हे एकच उपाय सांगतात ऑपरेशन करून धागा बांधावा लागेल.
बरं यांची हि ऑपरेशन होतात पण एकदम गलिच्छ ठिकाणी जिथे स्वच्छतेचा मागमूस हि नसतो , तोंडात तंबाखू खाऊन धागा बांधणारे हे भोंदू आपलं नाव लपवून ठेवतात सो जरी काही कॉम्पलीकेशन आले तरी तुम्ही यांना शोधून विचारू हि शकत नाही कारण हे पोबारा करतात .
मूळव्याध वर आयुर्वेदात क्षारसूत्र नावाची एक अंत्यत छान उपचार पद्धत आचार्य सुश्रुतांनी सांगितलेली आहे जी ऑपरेशन थेटर मधेच केली जाते ,त्याच उपचार पद्धतीच्या नावाचा उपयोग करून हे भोंदू बाबा लोकांना फसवतात . त्यांच्यापासून सावध राहा .
मुळात मूळव्याध भंगदर हे तिन्ही आजार वेगवेगळे आहेत, त्याची माहिती नीट जाणून घ्या आणि मगच उपचार घ्या.
आयुर्वेदातील बरेच वैद्य जे M.S.आहेत किंवा ज्यांनी क्षरसूत्राचे  योग्य ज्ञान घेतले आहे ते या व्याधींचा नीट उपचार करत आहेत, त्यांच्याकडून अवश्य उपचार घ्या पण या भोंदू बाबांच्या नादि लागून आपलं आरोग्य धोक्यात घालू नका .
आणि परत आयुर्वेदिक उपचार घेतले पण त्रास झाला अस सांगून आम्हाला आणि आमच्या आयुर्वेदाला त्रास देऊ नका.
धन्यवाद
वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
एम. डी .आयुर्वेद
पंचकर्म तज्ञ
9823347244

Thursday, January 21, 2016

आयुर्वेदाची बदनामी करू नका


संतुलन ढासळलेले बरेच लोक आजकाल आयुर्वेदावर बोलत आहेत. नाही म्हणजे आयुर्वेदावर बोलायला आमचा अजिबात विरोध नाही आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात आयुर्वेद आणला तर आम्हाला आनंदच होईल कारण आयुर्वेद हि एक परिपूर्ण जीवनशैली आहे, निरोगी राहण्याचा मूलमंत्र आहे. पण आपल्या सोयीप्रमाणे जर कोण आयुर्वेदाचा वापर स्वताच्या व्यावसायिक संतुलनासाठी करत असेल तर नक्कीच आम्हाला ते सहन होणार नाही. वैद्यराज गोगटे, नानल, गाडगीळ , प्र ता जोशी (नाना ), पेंडसे यासारख्या अनेक दिग्गजांनी  हाच आयुर्वेद लोकांपर्यंत पोचवायला आपलं जीवन खर्ची घातल आहे. आणि जर ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असेल तर जाहीरपणे काहीतरी बोलावच लागेल. दुर्दैव हेच आहेच कि आपल्यातलेच काही लोक यांना उगाच खांद्यावर घेऊन नाचत आहेत.कुठलिही आयुर्वेदाची पदवी नसताना ,MCIM -CCIM च reg नसताना सुद्धा आपल्याच काही वैद्या नी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे आणि या आयुर्वेदाच्या स्वयं घोषित गुरूंना आपले गुरू मानून आपली आयुर्वेदाची डिग्री गहाण ठेवली आहे.
बरं ठीक आहे तुमी तुमचं संतुलन घ्या बिघडवून आम्हाला त्याची खंत नाही पण आमच्या आयुर्वेदाचा संतुलन तरी राखून या गोष्टी करा जेणेकरून लोकांपर्यंत चुकीची माहिती अथवा गैरसमज पसरणार नाहीत.  आणि चरक सुश्रुत वाग्भट यांनी मांडलेले  आयुर्वेदातले सिद्धांत जर तुम्ही जसेच्या तसे स्वतःच्या नावावर खपवत असाल तर खरच आपण सर्वात मोठे वाङ्मय चोर आहात. यापुढे याच भान नक्की राखा कारण लोकांना तुम्ही मूर्ख बनवू शकता पण आयुर्वेदातील दिग्गजांनी निर्माण केलेल्या या सर्व शिष्याना नाही. कारण यापुढे आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या मार्गाने जिवंत ठेवायचा त्यांना लोकांच्या मनात रुजवण्याचा विडा तर आम्ही उचलला आहेच पण बरेच विडे उचलण्याची ताकत पण आमच्यात आहे बरं का !!! आमचं एव्हढंच म्हणणं  आहे कि ज्या आयुर्वेदामुळे तुम्ही मोठे झालात त्या आयुर्वेदाला फक्त आदर द्या बदनाम नका करू. जय आयुर्वेद ।।।।।।
©वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
      एम.डी. आयुर्वेद
      पंचकर्म तज्ञ
      9823347244

Tuesday, January 19, 2016

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि - बायपासचा विळखा

राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना आणि अंजिओप्लास्टि - बायपासचा विळखा

        नमस्कार मित्र हो आजकाल आपण नेहमी ऐकत असतो कि मित्रांच्या वडिलांची बायपास झाली शेजारच्या काकूंची प्लास्टि झाली, अशी बरेच उदाहरणे आपण सर्रास ऐकतो आहोत. त्यासोबत हे हि ऐकतो कि एक गोष्ट छान झाली कि ऑपरेशन हे अल्प खर्चात झालं किंवा राजीव गांधी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत झालं.
याचा आनंद खूप लोकांना होतो कारण ऑपरेशन झालं ते पण मोफत.
           पण या गोष्टीचा खरच विचार आत्तापर्यंत कोणी केलाय का कि खरच बायपास किंवा प्लास्टि ची गरज होती का कि मोफत होत म्हणून आपण करून घेतलं किंवा आपल्याला भीती घालण्यात आली कि आठ दिवसाच्या आत ऑपरेशन झालं नाही तर धोका आहे. म्हणून आम्ही घाबरून करून घेतलं. बर घेतलं करून पुढे काय ??? खरच आपण हृदयरोग मुक्त झालो का ????
            खरच मला भविष्यात हृदय विकार होणार नाही का खरच मला अटॅक येणार नाही का ?????याच उत्तर कदाचित कोणीच देऊ शकणार नाही दिल तरी ""आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही "" असं असेल , खरंतर गॅरंटी ची अपेक्षा करणं चुकीच आहे पण पुढची दहा वर्ष मी चांगल आयुष्य जगायला पाहिजे हि अपेक्षा अगदी योग्य आहे. पण हे होत का ????
काल परवाचीच गोष्ट , असाच एक रुग्ण छातीत दखल म्हणून एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल झाला , अटॅक आला होता. रुग्ण ऍडमिट झाला सगळं झालं औषध उपचार झाले सोबत अंजिओग्राफी पण झाली. आणि त्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लोकेजेस सापडले आणि रुग्णाला त्वरित सांगण्यात आलं इनफॅकट भीती घालण्यात आली कि 8 दिवसाच्या आत प्लास्टी नाही केली तर जीवाला धोका आहे काहीहि होऊ शकत.
रुग्ण घाबरून गेला आणि त्यांनी प्लास्टी करून मोकळे झाले आणि बिंदास्त झाले आपण रोगमुक्त झालो वेळीच प्लास्टी करून घेतली म्हणून!!!आणि ती हि मोफत !!!!!
            रुग्ण घरी गेला सगळ्या गोष्टी सुरळीत सुरु झाल्या बघता बघता 3 महिने गेले आणि अचानक रुग्णाला परत छातीत दुखू लागलं रुग्ण परत ऍडमिट झाला परंत अंजिओग्राफी झाली आणि सांगण्यात आलं मागे ज्या ठिकाणी प्लास्टी केले त्याच ठिकाणी पुन्हा 3 महिन्यात ब्लॉकेजेस तयार झालेत आणि आत्ताच्या आत्ता बायपास करावी लागेल!!!
आणि त्यासोबत हृदयाचि ताकत कमी झाले सो बायपास करताना सुद्धा जीवाला धोका आहे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही!!!
रुग्णाच्या नातेवाईकांचा प्रश्न डाँक्टर मागे तुमीच सांगितलेलं कि प्लास्टी केल्यानंतर काही होणार नाही मग हे कस झालं????? उत्तर -नाही अस होऊ शकत आम्ही काही सांगू शकत नाही. रुग्ण हतबल .......सो मोफत ऑपरेशन होत म्हणून करून घेत असाल तर तुम्ही स्वताच्या जीवाशी खेळ करताय !!!
मित्रानो सांगायचं मुद्दा हा आहे कि हृदयविकार हा एक जीवनशैलीत बदल घडल्याने झालेला विकार आहे 70 % केसेस मध्ये नियमित औषध उपचार (प्लास्टी बायपास न्हवे ) आहारातील पथ्य आणि व्यायाम हे जर नियमित केलं तर आपण खूप छान आयुष्य जगू शकतो.
            असे बरेच लोक आहेत ज्यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत पण ते अगदी निरोगी आहेत छान आहेत कारण त्यांचा आहार व्यायाम आणि औषध ..
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि ब्लॉकेजेस या चरबीच्या गाठी असतात रक्ताच्या नाही , आणि अटॅक हा रक्ताच्या गुठळी मूळे येतो जो ब्लॉकेजेस नसलेल्या व्यक्तीला हि येऊ शकतो. अगदी मलासुद्धा जर मी नियमित व्यायाम आहारातील पथ्य सांभाळली नाहीत तर !!!!!
             व्यायामाचा अभाव आहारातील अपथ्य आणि मधुमेह या तीन गोष्टी हृदयरोगाला कारणीभूत आहेत या गोष्टींमुळेच रक्तवाहिन्यातील आतला स्तर खराब होऊन तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो ब्लॉकेजेस बनु शकतात ...
            जर तुम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर नियमित व्यायाम निदान रोज पहाटे अर्ध्या तासात 3km चे चालणे आणि आहारातील पथ्य हे सांभाळावे या गोष्टी कारण खूप गरजेचं आहे .
आणि जर तुम्ही हृदयरोगी असाल तर प्लास्टी बायपास पेक्षा नियमित व्यायाम आहारातील पथ्य औषध आणि पंचकर्म या गोष्टी तुम्हाला चांगलं आयुष्य (quality life) जगायला नक्कीच मदत करू शकतात.
©वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
Ast. Professor at Late Kedari Redekar Ayurvedic Medical College And Research Institute and Chief Medical Officer at Amrutwel Ayurved Panchakarma Hospital
एम.डी. पंचकर्म
9823347244

Monday, January 11, 2016

सूज व वेदनेबद्दल थोडक्यात

सूज व वेदनेबद्दल थोडक्यात
कफ, पित्त आणि वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची तीन स्वसंवेद्य लक्षणे आहेत. कफाचे लक्षण आहे ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’. ह्या लक्षणांच्या मूळ कारणांची श्रेष्ठ चिकित्सा क्रमशः मध, तूप आणि तेल ह्या तीन द्रव्यांनी होते. म्हणून वातासाठी तेल हे सर्वोत्तम द्रव्य असल्याने सूज, वेदना, मुरडा, लचक अशा सर्व प्रकारच्या आजारांमध्ये तेलाचा प्रयोग श्रेष्ठ आहे. अक्षयने ह्या शास्त्रीय संकल्पनेवर आधारित वाताच्या दुखण्यांवर सेवनासाठी वातमुक्ता गोळ्या आणि बाह्य प्रयोगासाठी लिनिमेंट अशी दोन उत्पादने सादर केली आहेत.

कारणे -
• अपचन
• वाढते वय
• रोगप्रतिकार क्षमता खालावणे
• अनुवांशिक
• वजन वाढणे
• आघातजन्य
• व्यवसायजन्य आघात
• विशिष्ट खेळांमुळे आघात
• जीर्ण आजारांच्या परिणामाने

लक्षणे:
• स्थानिक उष्णता
• लाली
• वेदना
• आकारात वाढ
• हालचालीत अटकाव
• ज्वर
• घामाचा अवरोध होणे

चिकित्सा सूत्रे-
• शरीरातील शोथनिवारक यंत्रणा कार्यान्वित करणे
• शरीरस्थ दोषांना बाहेर घालविणे
• उष्मा वृद्धी करणारी चिकित्सा करणे
• स्नायु व सांध्यांना वंगण (स्नेहन) करणे
• पचनाचे तंत्र संतुलित ठेवणे

वातमुक्ता गोळ्यांमध्ये उत्तम रोगनिवारक, शोथहर, संधिवातशामक आणि वेदनाहर गुण आहेत. प्रोस्टाग्लॅंडिन व ल्युकोट्राइन हे शरीरांतर्गत घटक शोथ निर्मितीस कारणीभूत असतात. सदर घटकांना प्रतिबंध करणारे स्राव ह्या पाठातील गुग्गुळ व शल्लकीमुळे उत्तेजित होतात हे खास लक्षात घेण्यासारखे आहे. ह्या पाठातील घटकद्रव्यांमुळे शरीराचे वजन कमी होते. वाढलेल्या वजनाचा भार सांध्यांवर सतत पडण्यामुळे होणारी झीज ह्यामुळे आटोक्यात राहते. ह्यातील पाचक औषधी द्रव्ये ‘अंतर्गत विषारी द्रव्यांचे’ (endotoxins) निर्हरण करतात. हाडजोडामुळे सांध्यांतील कुर्चांची (cartilages) स्थिती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते व हाडांची वक्रता (व्यंग) होण्यापासून संरक्षण होते.

वातमुक्ता लिनिमेंट त्वचेतून खोलवर शोषले जाते ज्यामुळे सांध्यांची लवचिकता आणि स्निग्धपणा वाढून हालचाली सहज होतात. ह्यात पेट्रोलियम किंवा पॅराफिन सदृश कोणताही कृत्रिम घटक नाही. सर्वश्रेष्ठ अशा तीळ तेलाचा उपयोग आधारद्रव्य म्हणून केल्याने शोषण उत्तम होऊन वाताची परिपूर्ण चिकित्सा होते. त्वचेवर आग किंवा जळजळ करणाऱ्या बाम किंवा तेलांच्या तुलनेत ह्याची गुणवत्ता कैक पटीने अधिक आहे.

वातमुक्ता (विलेपित वटी)
प्रत्येक विलेपित वटीतील घटक द्रव्ये व प्रमाण
देवदार (Cedrus deodara), एरंडमूळ (Ricinus communis), हाडजोडा (Cessus quadrangularis), प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; शल्लकी निर्यास (Boswellia serrata), शुद्ध गुग्गुळ (Balsamodendron mukul) प्रत्येकी ५० मिलिग्रॅम; शुद्ध कुचला (Strychnous Nux-vomica) २५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य एरंडमूळ (Ricinus communis) आवश्यकतेनुसार

घटकद्रव्यांची कार्मुकता-

देवदार : सूजनिर्मितीच्या प्रक्रियेत केंद्रबिंदु असलेले लायपॉग्झिजिनेझ स्राव रोखून सूज नियंत्रण करण्याचे प्रभावी कार्य देवदाराने होते. ह्याशिवाय उत्तम वेदनाशामक म्हणून ही वनस्पती स्वयंसिद्ध आहे.

एरंडमूळ : डायक्लोफिनॅक सोडियम नामक वेदनाशामक औषध आधुनिक वैद्यक शास्त्रात प्रसिद्ध आहे. कोणतेही कारण असो, ह्या औषधाने तत्काळ वेदना थांबते. एरंडमुळाचा तौलनिक अभ्यास ह्या औषधाबरोबर केला असता ह्यातील वेदनाशामक गुण तुल्यबळ असल्याचे निदर्शनास आले. शिवाय अन्य उपद्रवही (साइड इफेकट्स) होत नाहीत. आयुर्वेदातही आमवाताच्या चिकित्सेत एरंडमूळ श्रेष्ठ असल्याचे वर्णन मिळते.
“आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिणःl एक एव निहन्ताऽयमैरण्डस्नेहकेसरी ll”
आमवातरुपी गजेन्द्राचा नाश करणारा एकमेव सिंह म्हणजे एरंड स्नेह आहे.

अस्थिशृंखला : व्यायाम नेहमी अर्धशक्ति करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे. आवाक्यापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे हाडांतील सांध्यांची झीज होते व त्या ठिकाणी सूज येते. व्यायामाबद्दलच्या चुकीच्या समजुतीने किंवा जलद वजन नियंत्रणाच्या अपेक्षेने काही तरुण मंडळी अघोरी व्यायाम करतात. अशा कारणामुळे झालेल्या सांधेदुखीवर अस्थिशृंखलेचा प्रयोग वेदनामुक्तिसाठी सर्वश्रेष्ठ ठरला आहे.

शल्लकी : शल्लकी नावाच्या झाडापासून निघणाऱ्या डिंकाला ‘शल्लकी निर्यास’ म्हणतात. ह्यात बोसवेलिक अॅसिड नामक कार्यकारी घटक असतो. ह्यामुळे उत्तम वेदना नियंत्रण होते व सांध्यांच्या हालचाली अल्पकाळात पूर्ववत होतात असे सिद्ध झाले आहे. संधिवात व आमवात ह्या दोन्ही संधिविकारात उपयोगी ठरणारे हे मौल्यवान औषधी द्रव्य आहे. सूजनिर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या ल्युकोट्राइन्सवर ह्याचे अवसादक कार्य होते.

शुद्ध गुग्गुळ : केवळ सूजनियंत्रण नव्हे तर विशेषकरून सांध्यांच्या सुजेवर शुद्ध गुग्गुळ अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठीसुद्धा गुग्गुळाचा उपयोग प्रसिद्ध आहेच. वजन वाढीमुळे सांध्यांवर पडणारा भार कमी करून ह्याचा दुहेरी फायदा होतो. सूज निर्मिती करणाऱ्या प्रोस्टाग्लॅंडिन्सना आटोक्यात ठेवून ह्याची क्रिया होते.

शुद्ध कुचला : अत्यंत प्रभावशाली वेदनाशामक म्हणून हे द्रव्य कार्य करते व वेदनेचे गांभीर्य त्वरित आटोक्यात येते. मात्र ही एक विषारी वनस्पती आहे. अर्धवट ज्ञानाने वापरलेले अमृत हे विषसमान ठरते तर डोळसपणे अभ्यासून वापरलेले विष देखील अमृतासमान उपयोगी ठरते. कुचल्याच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत जुळते. शरीरातील दोष बाहेर काढून औषधाची गुणवत्ता अमृतासमान करण्यासाठी आयुर्वेदाने ह्याची शुद्धी करण्याचे तंत्र दिले आहे. स्ट्रिकनीन व ब्रूसीन असे दोन विषारी घटक ह्यात असतात. पैकी स्ट्रिकनीन हे तीव्र विष आहे.

शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धी केल्याने ह्यातील स्ट्रिकनीन नाहीसे होते आहे तर ब्रूसीन चे परिवर्तन आयसोब्रूसीन नावाच्या श्रेष्ठ वेदनाशामक द्रव्यात होते. ह्याचा परिणाम स्थानिक वेदनेबरोबरच मेंदूतील वेदना संवाहक नाड्यांवरही होतो. शुद्धी क्रियेमुळे कुचल्यातील अन्य उपयुक्त गुणधर्म क्रियाशील होतात तर घातक परिणाम पूर्णपणे नाहीसे होतात. ह्याने बुद्धि तल्लख होते, रोगप्रतिकार क्षमता बळावते, यकृताचे कार्य सुधारते, अपस्माराचे वेग रोखले जातात, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगात लाभदायक ठरते, पचन क्रिया सुधारते व सर्पविषावर उतारा म्हणून कार्य करते. म्हणून सार्वदेहिक दोषवैषम्य असलेल्या आमवातात देखील कुचला प्रभावी ठरतो.

वातमुक्ता (लिनिमेंट) :
१० मिलि लिनिमेंट मधील घटकद्रव्ये व प्रमाण
विषगर्भ तेल ३ मिलि, महामाष तेल, नारायण तेल प्रत्येकी २ मिलि, गंधपुरा तेल (Gaultheria fragrantissima) ३ मिलि

घटकद्रव्यांची कार्मुकता-

विषगर्भ तेल : सांध्यांच्या सुजेवर अत्यंत गुणकारी असे हे तेल आहे. गृध्रसी (सायाटिका), डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कानामध्ये आवाज (टिनिटस), मांसक्षय, खूप चालण्यामुळे होणारी अंगदुखी, पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ अशा सर्वप्रकारच्या वातरोगांवर गुणकारी आहे.

महामाष तेल : पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ, चेहऱ्याचा पॅरालिसिस (फेशियल पॅरालिसिस), मन्यास्तंभ, हनुस्तंभ, सांधे आखडणे, पाठीच्या व मानेच्या मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस), मुकामार, आमवात व संधिवात, मांसक्षय, अशा विकारांमध्ये परम उपयोगी. ह्याचा विशेष उपयोग वार्धक्यात होणाऱ्या विविध वातविकारांवर उत्तम होतो.

नारायण तेल : लांबच्या प्रवासामुळे होणारी अंगदुखी, संधिवात, आमवात, वातरक्त (गाऊट), मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस) व हाडांना बळकटी देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

गंधपुरा तेल : हे पिवळसर सुगंधी तेल संधिविकार चिकित्सेसाठी जगप्रसिद्ध आहे. गंध थोडाफार निलगिरीप्रमाणे असतो. ह्यात मिथाइल सॅलिसिलेट नामक वेदनाशामक रसायन असते. हे तेल त्वचेवर लावल्याने शेकल्याप्रमाणे जाणवते व वेदना शमन करण्यास उपयुक्त ठरते.

उपयुक्तता-
• आमवात
• संधिवात
• गृध्रसी
• वातरक्त
• कटिशूल व मन्याशूल
• मांसगत वेदना
• स्नायुशोथ, कंडराशोथ
• पृष्ठशूल, मान आखडणे, कंबरेच्या वेदना

आहार विहार-
• भाजलेले धान्य व हलका आहार घ्यावा
• गहू, जव, कुळीथ, आले, लसूण ह्यांचा आहारात वापर करावा
• थंड पदार्थांचे सेवन व बाह्य प्रयोग करू नये
• जेवणानंतर किमान दोन तास झोपू नये
• घामाला रोखू नये
• मध्यम प्रमाणात पण नियमित व्यायाम करावा
• वजन वाढू देऊ नये

सेवन विधी:
• तीव्र अवस्थेत : २ गोळ्या रोज तीन वेळा
• नित्यावस्थेत : २ गोळ्या रोज दोन वेळा
• लिनिमेंट : बाह्य प्रयोग, जरुरीनुसार दिवसातून २ किंवा ३ वेळा करून शेक द्यावा.
रोगावस्थेनुसार औषधसेवन मात्रा वैद्यांच्या सल्ल्याने बदलावी

उपलब्धी:
टॅबलेट : ४० विलेपित गोळ्या
लिनिमेंट : १०० मिलि पेट बाटली

अधिकतम मुल्य-
रु.१२०.००/४० टॅबलेट
रु.२१०.००/१०० मिलि लिनिमेंट

व्यापारी चौकशी:
महाराष्ट्र राज्य +919881167711

ओज ---आयुर्वेदीय विचार


ओज ---आयुर्वेदीय विचार

ओजाची उत्पति
 ओज सर्व शरीरगत असुन थंड स्नेहयुक्त स्थिर असते. ह्रदयाच्या ठिकाणीही ओजाचे काही बिंदु असतात ह्रदयाच्या गतीची स्थिरता टिकवणे ओजवर अवलंबुन असते. शरीराच्या शक्ती बल वाढविण्यासाठी याचा फारच उपयोग होतो.
जसे (भ्रमर) मधमाश्या फुले व फळातुन रस एकत्र करून मध तयार करतात. त्याचप्रमाणे शरीरातील गुण (रसरक्तादी ७धातु) अवयव आपल्या कर्माने ओजाला बल देतात.
शरीरातील जीवाची स्थाने
जीवे वसति सर्वस्मिन्देहे तत्र विशेषतः|
वीर्ये रक्ते मले यस्मिन् क्षीणे याति क्षयं क्षणात्||
जीव सर्व शरीरात वसलेला असतो. पण विशेषरितीने वीर्य रक्त आणि मळ यामध्ये राहतो. या पदार्थांपैकी १ जरी पदार्थ क्षीण झाला असता जीवही नाश पावतो.
ओजक्षयाची कारणे
 १. व्यायामात - अधिक प्रमाणात व्यायाम केला असता..
२. अनशन - नेहमी उपाशी राहणे. अत्याधिक प्रमाणात उपवास केल्याने
 ३. चिन्ता - नेहमी चिंता केली जात असेल तर
 ४. रूक्षाल्पप्रमिताशनम् - कोरडे तेल तुप रहित टोस्ट बिस्किट असे पदार्थ नेहमी खाल्याने, नेहमी अल्प प्रमाणात शरीराच्या गरजेपेक्षा कमी प्रमाणात आहार घेतला जात असेल, एकाच रसाचा प्रकारचा आहार घेणे नेहमी अत्याधिक तिखट वा आंबट पदार्थ खाणे..आदीने
 ५. वातातपौ - नेहमी वारयाला वा उन्हात फिरल्याणे बसल्याने ओजाचा क्षय होतो.
६. भय शोक - नेहमी भिती वाटत असेल, कुठल्याही गोष्टीचा शोक दुख मनात घर करून राहत असेल तर
 ७. रूक्षपानं - नेहमी रूक्ष गुणात्मक पदार्थांपासुन बनविलेल्या मद्याचे सेवन केले जात असेल तर
 ८. प्रजागर - नेहमी नेहमी रात्री जागरण होत असेल तर
 ९. कफशोणितशुक्रांणा मलानां चातिप्रवर्तनम् -- कुठल्याही कारणाने शरीरातुन कफ, रक्त, शुक्र आणि मळ अधिक प्रमाणात निघत असेल तर ओजक्षय दिसुन येतो.
नेहमी सर्दी खोकल्याने वा आव रूपात कफ बाहेर पडत असेल तर..
मुळव्याध वा अन्य कारणाने शरीरातुन रक्त अधिक प्रमाणात बाहेर पडत असेल तर...
कुठल्याही कारणाने अधिक प्रमाणात शुक्र शरीराच्या बाहेर पडत असेल तर ओजक्षय होतो.
शरीरातील मल कुठल्याही कारणाने अधिक प्रमाणात बाहेर पडत असेल तर.. त्यात मधुमेह झाला असता नेहमी नेहमी मुत्रप्रवर्तन झाल्याने वा ibs मध्ये अत्याधिक प्रमाणात मल बाहेर पडत असेल तर ओजक्षय होतो. किंवा अत्याधिक प्रमाणात घाम चरबीचा मल शरीराच्या बाहेर पडत असेल तर ओजाचा क्षय होतो.
१०. काल - वयाच्या वृध्दावस्थेत बल कमी झाल्याने ओज कमी कमी होत जाते..
वरील कारणांनी शरीरातील ओज तेज कमी होतो क्षय पावतो..
ओज कमी होत असताना पुढील लक्षणे दिसतात..
बिभेति दुर्बलो$भीक्ष्णं ध्यायति व्यथितेन्द्रियः| दुश्छायो दुर्मना रूक्षः क्षामश्चैवौजसः क्षये|| च.सु.१७
ओजाचा क्षय झाला असेल तर मनुष्य नेहमी भयभित असतो, नेहमी चिंतित ध्यानमग्न असतो, इंद्रिय आपले कर्म करण्यात असमर्थता दर्शवितात. शरीराची कांती मलिन होते, मन उदास राहते, शरीरात रूक्षता वाढिस लागते. शरीर पुर्वीपेक्षा कृश बारिक होत जाते.
ह्रदयाच्या ठिकाणी असणारे ओज कमी होत असेल तर ह्रदयाची गती वाढुन palpitation होते.
वरील लक्षणे दिसत असतिल तर ओजक्षय होत आहे हे समजते. घडणारी वेगवेगळी ओजक्षयाची कारणे बंद करून केलेले उपचार चिकित्सा उपयोगी ठरते. अन्यथा ओज कमी कमी होत जाऊन प्राणाचा नाश देखील होउ शकतो.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 वैद्य गजानन मॅनमवार
 मो. 9028562102, 9130497856

Visit Our Page