Pages

Saturday, April 2, 2016

निद्रानाश / अल्पनिद्रा

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
🍀 निद्रानाश / अल्पनिद्रा ☘
निद्राल्पता उतारवयात सहजच उत्पन्न होणारा त्रास आहे. कारण उतारवयात शरीरात वाताचे आधिक्य असते त्यामुळे निद्राल्पता निर्माण होते.
🍀 निद्रानाशाची कारणे ☘
नावनं लघनं चिंता व्यायामः शोकभीरूषः||
एभिरेव भवेन्निद्रानाशः श्लेष्मातिसंक्षयात् ||
नस्य करणे नाकात तीक्ष्ण औषधी तेल आदी टाकणे, लंघन करणे उपवास आदी कारणांनी, चिंता अत्याधिक प्रमाणात असणे, व्यायामाच्या आधिक्याने, शोक भीती राग आदी मानसिक वेगांच्या अतियोगामुळे निद्रेचा नाश होतो. शरीरातील कफाचा क्षय झाल्याने निद्रानाश निद्राल्पता निर्माण होते.
😵 अकाली निद्रा रोगकारक 😵
अकालशयनान्मोहज्वरस्तैमित्यपीनसाः|
शिरोरूकशोफह्रल्लास्रोतोरोधाग्निमंदताः|| वा.सु.८/६०
अकाली झोपल्याने मुर्च्छा, ताप, शरीरात ओलसरपणाचा भास होणे, पीनस, डोकेदुखी, सुज, तोंडस पाणी येणे, शरीरात अवरोध निर्माण होणे, भुक मंद होणे असे त्रास होतात....
☘ निद्रानाशासाठी काही उपाय ☘
१.महिषीक्षीरं स्वप्नजननानाम् | च.सु.
कफक्षीण झालेल्या व्यक्तींमध्ये म्हशीचे दुध कफवर्धन करून निद्रानाश कमी करणारे ठरते.
अन्य कफवर्धक पदार्थांचा उपयोग ही निद्रानाशाकरिता होतो. त्यांचा योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपयोग करावा..
☘ बाह्योपचार 🍀
नित्य तेलाने अभ्यंग करणे, उदवर्तन, स्नान आदींचा योग्य सल्ल्याने उपयोग केला तर निद्रानाशासाठी उपयोग होतो.
🍀 मनासाठी उपाय 🍀
प्राणायाम, अनुलोम विलोम या अष्टांग योगाचा उपयोग यम नियम पाळुन मनाच्या आरोग्याकरिता करता येईल.
शिरोधारा, तुपाचे नस्य करणे, तर्पण, मनावर काम करणारया औषधींचा उपयोग आदी उपक्रमांचाही मनोदुष्टीजन्य निद्रानाशात उपयोग करता येतो.
निद्रा त्रयोपस्तंभापैकी म्हणजे शरीररूपी घराच्या ३ खांबापैकी १ आहे. निद्रा प्राकृत असेल तर शरीरस्वास्थ्य उत्तम राहते अन्यथा सर्वप्रकारच्या आजारांचा सामना निद्रानाश / निद्राल्पतेने करावा लागतो.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड
Cont no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on what's up no -- 9028562102 )

No comments:

Post a Comment