Pages

Saturday, November 27, 2010

जांभूळ

जांभूळ जांभळ्या रंगाचे, उन्हाळ्यात मिळणारे, गोड-तुरट चवीचे एक फळ असलेली भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा वृक्ष मोठा होतो. यास साधारणतः पेवंदी बोराएवढी जांभळ्या रंगाची फळे लागतात. म्हणून याचे नांव जांभूळ. याच्या झाडाच्या फांद्या फारच कच्च्या असतात. हा रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुणकारी आहे. हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.

No comments:

Post a Comment