Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, June 10, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद*

मित्रांनो,

सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये  अन्नदात्याचे आंदोलन सुरू आहे. विषय सगळ्यांना माहिती आहेच.आंदोलन योग्य कि अयोग्य? खरंच शेतकरी करताय का राजकारणी घडवून आणताय? शेतकरी पायजमा/धोतर घालून आंदोलन का करत नाहीत? जीन्स घालून का करताय? अन्नाची नासाडी अन्नदाता का करतोय? असे अनेक प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. ह्याचे उत्तर शोधणे किंवा ह्यावर मत देण्यासाठीचा हा लेख नाही. शेतकरी आणि त्यांच्या मधील वाढत्या असनसर्गजन्य व्याधी हा विषय आहे.

मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे. पण मी फक्त शेती पहिली/देखरेख केली आहे पण कधी प्रत्यक्ष राबलो नाही क्वचितच कधीतरी काम केल्याचे आठवते. सर्व केलं ते माझ्या काकांनी किंवा बाबांनीच. माझ्या गावातील संपूर्ण लोक शेतीवरच अवलंबून आहेत. मी एक सर्व्हे केला होता. त्यात मला 30%लोक हे बीपीच्या त्रासाने ग्रासलेले आढळले. जेव्हा केव्हा गावात  मृत्यच्या बातम्या येतात तेव्हा समोर हार्ट अटॅक, लखवा, डायबेटीज, किडनीचे आजार हेच करण समोर येतात.(मृत्यूच्या कारणांचा पूर्ण डेटा उपल्बध न नाही)

असंसर्गजन्य व्याधी म्हणजे ज्या संसर्गाने होत नाहीत. जसे बीपी, डायबेटीज, कँसर, लखवा, स्थौल्य, मानसिक व्याधी ह्यात येतात. शेतकरीच नाही तर एकूणच जनतेत असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण वाढत चालले आहे. आधी शेतकरी बंधूंमध्ये असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण अत्यल्प होते. परंतु ते आता वाढत चालले आहे. ग्रामीण भागात सुद्धा ह्या व्याधी वाढत आहेत. असंसर्गजन्य व्याधींचे प्रमुख करणे पुढील प्रमाणे असतात. व्यायामाचा अभाव, व्यसन, स्थौल्य, तंबाखूचा वापर हे आहेत. शेतकऱयांच्या बाबतीत अजून एक कारण जोडावेसे वाटते ते म्हणजे शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादनाला न मिळणारा योग्य भाव,  पिकांची चिंता, वातावरणाची चिंता, पावसाची चिंता, पीक नुकसानाची चिंता ह्यामुळे होणारा मानसिक ताण, नैराश्य, चिंता हे सुद्धा महत्वाचे आहेत. ह्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. ह्यातूनच आत्महत्या करण्याचे प्रमाणसुद्धा दिसून येते.

*आयुर्वेद काय सांगतो?*

आयुर्वेद असंसर्गजन्य व्याधी टाळण्यासाठी दिनचर्या, ऋतूचर्या, पंचकर्म, वेगधारण न करणे, सदवृत्त पालन ह्या गोष्टी वर्णन केल्या आहेत. ह्यासाठी योग, प्राणायाम ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. शेती आणि आयुर्वेद ह्यांचासुद्धा जवळचा संबंध आहे. आयुर्वेद अन्नालासुद्धा औषध मानतो. म्हणून विचारपूर्वक आहार-विहार ठेवल्यास असंसर्गजन्य व्याधी टाळता येतात. आपल्या परिवारापुरता किंवा आपल्या शक्य होईल तितक्या भागात सेंद्रिय शेती केल्यास अनेक धोके शेतकरी बंधूंचे कमी होऊ शकतात.

     कर्ज, पिकांना न मिळणारा भाव ह्या चिंतादी मुळे येणारा ताण टाळता येणं कठीण आहे पण आयुर्वेद व योग ह्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण ताण कमी करू शकतो. दिनचर्याआदींचे पालन करून, व्यासनमुक्ती करून आपले आरोग्य अन्नदाता नक्कीच रक्षण करू शकतो. अशी मला आशा आहे.

सध्या शेतकऱ्याच्या तापलेल्या विषयात एक आयुर्वेदाचा  वैद्य म्हणून शेतकऱ्याच्या आरोग्याविषयी लिहावेसे वाटले म्हणून आजची पोस्ट.

*– वैद्य भूषण मनोहर देव*

*ज्योती आयुर्वेद जळगाव*
*7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-8F

Wednesday, May 3, 2017

#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे

#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे

🌹दुष्ट (प्रतिश्याय) सर्दी व उपद्रव 🌹

सर्दीची योग्य चिकित्सा न करता अहितकर आहाराचे सेवन केले गेले तर सर्दीचे दुष्ट प्रतिश्यायामध्ये परिवर्तन होते दुष्ट प्रतिश्याय (दुष्ट सर्दीची) खालील लक्षणे निर्माण होतात.
१.नाक कफ साठल्याने बंद होणे
२.नाकात मार लागल्यासारखी वेदना होतात
३.नाकातुन द्रव पाण्यासारखा स्राव बाहेर पडतो.
४.नाकाद्वारे गंध ज्ञान होत नाही.
५.मुखात दुर्गंध निर्माण होणे
६.वारंवार सर्दी पडसे निर्माण होणे
ही लक्षणे दुष्ट प्रतिश्यायामध्ये असतात. दुष्ट प्रतिश्यायामध्ये चिकित्सा न घेता उपेक्षा केली की

उपद्रव स्वरूपातील लक्षणे निर्माण होऊ शकतात.
१. शिंका येणे
२. नाक कोरडे पडणे
३.नाक बंद होणे
४.नाकातुन द्रव स्राव नेहमी निघत राहणे
५.नाकातुन घाण वास येणे
६.नाकात आग होणे
७.नाकात सुज येणे
८.नाकात ग्रंथी बनने
९.नाकात पुय जमा होणे
१०.नाकातुन रक्त येणे
११.नाकात छोटे फोड निर्माण होणे
१२.शिर, कान आणि नेत्राचे इतर आजार निर्माण होणे.
१३.केसांची गळती, केसांचा वर्ण बदलणे.
१४.तहान लागणे, दम लागणे, खोकला येणे, ताप येणे.
१५.रक्तपित्त (शरीरातील बाह्य विवरातुन रक्त बाहेर पडणे, आवाज बसणे बदलणे.
१६.शरीराचा शोष होऊन रसादी सात धातु क्षीण होणे.
अश्या प्रकारची उपद्रव स्वरूपी लक्षणे आजार दुष्ट प्रतिश्यायामध्ये चिकित्सा केली गेली नाही तर निर्माण होतात.
शरीर स्वतच स्वभावपरमवादाने सर्दी दुरूस्त करू शकत नसेल तर अपुनर्भव औषधी चिकित्सेचा विचार नक्की करावा. नजिकच्या वैद्याकडून उपद्रव स्वरूपातील लक्षणे निर्माण होण्या अगोदरच सल्ला अवश्य घ्यावा.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय
2nd Floor Sharma Chembers
Above Samudra Hotel Nal Stop Pune
Cont. No - 9028562102, 9130497856

Thursday, April 6, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*मन कि बात- डिप्रेशनवर मात*

     आज ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम हि वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते. ह्यावर्षी *“डिप्रेशन-लेट्स टॉक”* हि थीम आहे.

       मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा होत होती तेव्हा शशी थरूर ह्यांनी फार interesting fact सांगितली. मेडिकलच शिक्षण घेणारे ५०% विद्यार्थी सतत तणावात असतात. जे पुढे जाऊन आरोग्यसेवा पुरविणार आहेत. नुसतेच मेडिकल नाही तर कुठल्याही शाखेचे शिक्षण असो. साध्या १०वि व १२विच्या निकालानंतर वर्तमान पत्रात आत्महत्या विषयक बातम्या हमखास असतातच.  डिप्रेशन बऱ्याच आजारांच प्रमुख कारण आहे. WHO नुसार २००५ ते २०१५ च्या दरम्यान तब्बल १८%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिप्रेशनमुळे डायबेटीस, हृदयरोग ह्यासारखे असंसर्गन्य रोग तर होतात पण  डिप्रेशनमुळे आत्महत्येच प्रमाण सुद्धा वाढते आहे.

*डिप्रेशन म्हणजे काय?*

           आधुनिक शास्त्रानुसार १४ दिवसापर्यंत तुम्ही सतत दुखी असाल, दैनादिन क्रिया करण सुद्धा जड झाल असेल. ज्या दैनंदिन क्रिया तुम्ही आनंदाने करत होता त्या करण्यात अजिबात रस वाटत नसेल तर तुम्हला डिप्रेशन असू शकते.

*डिप्रेशनचे लक्षण काय आहेत?*

           निरुत्साह, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, पचनक्रिया बिघडलेली असणे, झोप कमी वा खूप झोपावेसे वाटणे, कुठल्याही कामात मन एकाग्र न होणे, स्वतःबद्दल वाईट वाटत राहणे, माझा काहीच उपयोग नाही, मी काही कामाचा नाही अशी भावना निर्माण होणे, निराशा वाढणे आणि स्वतःला संपविण्याची किवा त्रास पोचविण्याचे विचार मनात येणे अशे लक्षण डिप्रेशन ह्या प्रकारात येतात.

*डिप्रेशन कोणाला होऊ शकते?*

           डिप्रेशन कोणालाही होऊ शकते. तो सार्वभौम आहे. तो भेदभाव करत नाही. गरीब असो श्रीमंत असो. त्याला देश, लिंग, वय ह्याची मर्यादा नाही. परंतु प्रामुख्याने किशोर, तरुण वयातील, प्रसूत माता आणि ६० वर्षाच्या वरील वृध्द लोक ह्यांना डिप्रेशनची शक्यता जास्त असते.

*डिप्रेशन कश्यामुळे येते*

पुरेसा पैसा नसणे, गरिबी असणे, नौकरी, व्यवसाय न मिळणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेम संबंध तुटल्याने म्हणजेच ब्रेकअप, दीर्घकालीन आजारपण किंवा, कॅन्सर, एड्स सारखे आजार होणे. दारू आणि DRUGS च्या वापरामुळे डिप्रेशन येऊ शकते.

*डिप्रेशन ला उपाय काय?*

*आयुर्वेदात काय उपाय आहेत?*

आयुर्वेदाने शरीर आणि  मन दोघांच्या स्वास्थ्याला महत्व दिले आहे. सदवृत्त पालन, धारणीय वेग, सत्वावजय असे उपाय सांगितले आहे. मनाचा सत्वगुण वाढवून मानसिक व्याधी दूर करण्यासाठी आयुर्वेद काम करतो. विस्तृत कधीतरी लिहीनच.

*WHO टॉकिंग थेरपी-*

सध्या एक चित्र सगळ्यांनी बघितल असेल. घरात सगळे बसले सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात पण घरात एकमेकांशी आपण बोलत नसतो. सगळे सोबत असून आपण एकटे असतो कारण जोतो त्याच्या whatsapp आणि फेसबुक वर online असतो. पूर्वी जेवायला सोबत, संध्यकाळी रामरक्षा, प्रार्थना असेल ती सोबत होत असे. आता प्रत्येकाच्या घरी येण्याच्या वेळा वेगळ्या जेवणाच्या वेळा वेगळ्या त्यामुळे घरातलाच संवाद कमी झालाय.  मित्रांशीहि संवाद हा प्रत्यक्ष जास्त न होता whatsapp आणि फेसबुक च्या माध्यमातूनच जास्त होतो. आजकाल प्रेमही online होत आणि लग्नही त्यामुळे बोलायलाच नको. एकाच flat स्कीम मध्ये शेजारी जन्म झाला, मरण झाले तरी कळत नाही कारण आमच्यात संवादच नाही.

WHO म्हणतय बोलण वाढवा, संवाद करा डिप्रेशन दूर होईल. आपल्या प्रधानमंत्रिनी सुद्धा हाच संदेश दिला आहे. *“Expression of Depression  instead of suppression”* आपले मित्र, आईवडील, भाऊ-बहिण ह्यांना आपले शेयरिंग पार्टनर बनवा. मनातील गोंधळ, भीती, दुखः, निर्णय आपल्या विश्वासू लोकांजवळ नक्की बोलून दाखवा. ह्याउलट जो डिप्रेशन मध्ये आहे त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करा त्यातून त्याला बाहेर निघण्यास मदत नक्कीच होईल. आपली *“मन कि बात”* कराच पण दुसऱ्यांच्या *“मन कि बात”* पण ऐका म्हणजे  डिप्रेशन नक्की कमी होईल. 

चला तर  *करूया मन कि बात आणि  डिप्रेशनवर मात ….*

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7X

Friday, March 31, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*​उन जरा जास्त आहे.*

     मार्च महिन्यातच मे महिन्याचा फील येतोय. ग्लोबल वार्मिंगमुळे दर वर्षी थोडे थोडे तापमान वाढत चालले आहे. प्रत्येक दशकाला ०.१५ ते ०.२० डिग्री सेल्सियस हे तापमान वाढत चालले आहे असे नासाचे म्हणणे आहे. वाढत्या तापमानाने रस्त्यावर चालणे मुश्कील होते, दुचाली चालविणे कठीण होते. थोडावेळ जरी गाडी उन्हात राहिली कि ती हॉटसीट बनून जाते. अमिताभ बच्चनने म्हंटल तरी त्या हॉटसीट बसायची हिम्मत होत नाही. ह्या उन्हाळ्यात कुलरहि काम करणार नाहीत अस दिसतंय. त्यामुळे कुलर रेझिस्टन्स निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक सज्जन ए.सी. चा पर्याय सेव्ह द वाटरच्या सेवाभावी नावाखाली निवडताना दिसत आहे. कारण  *उन जरा जास्त आहे.*

वाढलेल्या तपमानामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत जातो. पाण्याचे प्रमाण कमी होणे ह्यालाच डीहायड्रेशन असे म्हणतात. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी म्हणून खालील उपाय आपण करू शकता. 

बाहेर पडताना छत्री, रुमाल, टोपी ह्यापैकी आपल्याला सोयीस्कर समरसंरक्षण निवडून घर बाहेर पडा.
पाय पूर्णपणे झाकले जातील असे पादत्राण वापरा. 

गाडीवर बाहेर जात असल्यास हेल्मेट वापरा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लास वापरा.

पाणी पितांना हळूहळू आणि खाली बसून पाणी प्या. घाई घाईत जास्त पाणी पिऊ नका. पाणी पिण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढवू शकता पण अतिसेवन टाळा. तहान असल तेव्हडेच पाणी प्या. 

उन्हातून आल्यावर लगेच थंड कुलर किवा ए.सी. मध्ये बसू नका. लगेच चिल्ड पाणी, पेय पिऊ नका. 

काकडी, टरबूज, खरबूज ह्यांचे सेवन करा ह्यात जलीय अंश जास्त असल्याने पूरक ठरतात.

ताक, मठ्ठा हे गुणाने उष्ण असतात हे लक्षात घेणे महत्वाचे. 

लहान मुलांची व वृद्धांची विशेष काळजी घ्या.

      उन्हाळ्यात घसा, ओठ, त्वचा ह्यांना कोरड पडते. सोबतच निरुत्साहीपणा, थकवा हि लक्षणे दिसतात ह्यासाठी वरील उपाय नक्की करावेत.

शरीरातील जलतत्व कमी झाल्याने मुत्राचे प्रमाण सुद्धा कमी होते, हे कमी झाल्याने मूत्राचा रंग पिवळा होतो आणि लाघवी करतांना आग/जळजळ/उन्ह्ळी होऊ शकते. तसेच जुलाब, ताप व उलटी हि लक्षणे सुद्धा उन्हाळ्यात  काहींमध्ये आढळून येतात अश्यावेळी आपल्या वैद्यांशी संपर्क करावा व योग्य तो उपचार करून घ्यावा.

चला तर उन्हापासून संरक्षण करा आणि काळजी घ्या कारण *उन जरा जास्त आहे.*

*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7U

Wednesday, March 15, 2017

बल (शक्ती) कमी करणारी कारण

👇🏻बल (शक्ती) कमी करणारी कारणे💪🏻

अभिघाताभ्दयात्क्रोधाच्चिन्तया च परिश्रमात् |
धातूनां संक्षयाच्छोकाद्बलं संक्षीयते नृणाम् ||

अभिघाताने --- शस्र वा इतर कुठल्याही कारणाने मार लागला असेल तर शक्ती कमी होते.
    
मानसिक वेगांमुळे
मनात नेहमी भिती राग चिंता दुःख यापैकी कुठल्याही १ कारणाने शक्ती कमी होते. कारण भिती चिंता व राग आदी कारणांनी अन्नपचन योग्य रितीने न झाल्याने शरीराचे पोषण होत नाही.

परिश्रमाने -- अत्याधिक प्रमाणात परिश्रमाने देखील शरीरातील शक्तीचा क्षय होतो.

धातुंचा क्षय -- कुठल्याही कारणाने शरीरातील रस रक्तादी ७ धातूचा क्षय होत असेल तर बल कमी होते.
       उदाहरण पाहावयाचे झाल्यास मुळव्याध असताना जीव रूपी रक्त शरीरातुन बाहेर पडते. अधिक प्रमाणात रक्त शरीरातुन बाहेर पडले तरी देखील बल कमी होते.
   बल कमी कारणारया कारणानुसार काही वेळा मानसिक वेगांचे धारण व मनावरील उपाय जे शास्रात सांगितलेले आहे ते करावे लागतात.
           सप्तधातुंपैकी कुठल्याही धातुचा क्षय असेल तर त्या धातुंना वाढविणारया आहार विहार औषधींचा बलवर्धनार्थ उपयोग करावा लागतो.
           परिश्रमासाठी सद्यतर्पण श्रमनाशक आहार औषधींचा उपयोग करावा लागतो..
  शक्ती  वर्धनार्थ फक्त पौष्टीक पदार्थ खुप वेळा कामी येत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
Mob -- 9028562102, 9130497856

Friday, March 3, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*रोगकारक आमरस*

आम शब्द वाचल्यावर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतो तो पिवळसर गोड आंबा. आंबा कोणाला आवडत नाही. सगळेच चवीने खातात. आमरस म्हंटला कि कैरीचे पन्हे डोळ्यासमोर येते तर कुणाच्या समोर आंब्याचा रस येत असेल. असो. पण आज मला आंब्याविषयी चर्चा नाही करायची आहे. आम रसा विषयी करायची आहे.

           आपण जेवण केल्यावर खाल्लेलं अन्न हे आमाशयात(stomach) जमा होते. पुढे अन्नाचे पचन सुरु होते. खर तर अन्न दातांनी चाऊन खाण्यापासूनच पचन क्रिया सुरु होते. अन्न निट ३२ वेळा चाऊन-चाऊन खाल्ल असेल. त्यात लाळ मिसळली गेली असेल. सगळ्यात महत्वाच  जाठाराग्नी उत्तम असेल तर पूर्ण अन्नाचे पचन होते. परंतु जर अग्नी मंद असेल तर पूर्ण अन्नाचे पचन होत नाही. नीट पचलेला आहार पुढे जाऊन शरीराचे पोषण करणारा  रस धातू बनतो आणि न पचलेला आहार ह्या पासून आम-रस बनतो. आम म्हणजे कच्चा/न पचलेला असा ह्याचा अर्थ आहे.

           पुढे  हा आमरस दोष धातूच्या ठिकाणी जाऊन रोग उत्पन्न करतो. अन्नपचन व्यवस्थित असल्यास आमरस तयार होत नाही आणि पुढे रोगही उत्पन्न होत नाहीत. आमदोष उत्पन्न होऊ नये ह्यासाठी अन्नाचे पचन निट होणे महत्वाचे आहे. भूक लागणे हा जाठराग्नी प्रज्वलित असल्याचा इंडिकेटर आहे. बऱ्याच लोकांना भूक असो का नसो वेळ झाला म्हणून खायची सवय असते. परंतु भूक लागेल तेव्हाच जेवणे योग्य आहे. आधी खाल्लेलं अन्न पचत नाही तोवर पुन्हा काहीही खाऊ नये.  पचायला जड असे पदार्थ जेवणाच्या सुरवातीला घेणे योग्य असते. कारण जेव्हा जाठराग्नी प्रज्वलित असतो तेव्हा जड अन्न सुद्धा सहज पचवून टाकतो. साधारण गोड पदार्थ पचण्यास जड असतात.  आंब्याच्या रसाची स्वीट डिश हि सगळ्यात आधी घेतली म्हणजे त्याचे पूर्ण पचन होईल. नाहीतर शेवटी घेतल्यास आंब्याच्या रसाने आमरस तयार होईल.

 भोजन सेवनाचे नियम आयुर्वेदाने ह्यासाठीच संगुन ठवले आहेत. आमरस तयार झालाच तर गरम पाणी, सुंठ हे फार उपयोगी आहे. पण आपल्या वैद्यांच्या सल्याने ते कसे, कधी व किती घ्यावे हे ठरवून घ्यावे. चलातर मग शरीरात आमरस होण्यापसून टाळूया. निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7G

Thursday, March 2, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*वाद-प्रतिवाद आणि आयुर्वेद*

विविध प्रसिद्धी माध्यमे, इलेक्ट्रोनिक मिडिया, सोशल मिडिया ह्यावरून आपल्याला सतत कुठल्यान कुठल्या विषयावरून वाद सुरु असलेले दिसतात. एकमेकांवर ओरडणे, किंचाळणे पासून तर थेट श्रीमुखावर हाताचा ठसा उमटवे पर्यंत हि चर्चा विकोपाला गेलेली असते. बघणारा श्रोता आणि सोशल मिडिया वरील वाचक सुद्धा आता ह्या प्रकाराला कंटाळत चालला आहे. ह्यामुळे संवेदनशील आणि महत्वाच्या विषयाचे गांभीर्य कमी होत जाताना दिसते आहे. वाद-प्रतिवाद(डिबेट) नक्कीच झाला पाहिजे. परंतु ह्याची काही पद्धती असली पाहिजे व काही नियम असले पाहिजे. आयुर्वेदने वैद्यांना वाद-प्रतिवाद करण्याचे काही नियम सांगितले आहेत. मला वाटते ते नियम सर्व क्षेत्रातील विद्वानांनी नक्कीच फॉलो करायला हवे.

*आयुर्वेद काय म्हणते?*

आयुर्वेदाने डिबेटलाच संभाषा म्हंटले आहे. दोन विद्वानांनी/पक्षांनी केलेल्या संभाषेतून ज्ञानप्राप्ती होते, संदेह, शंका दूर होत असतात. संभाषा कोणासोबत करावी, करू नये. एकमेकांचे गुणदोष ओळखून वाद-प्रतिवाद कसा करावा? संभाषेचे प्रकार इत्यादी विस्तृत माहिती आयुर्वेदाने चरक संहितेत वर्णन केली आहे.

आयुर्वेदाने संधाय संभाषा व विगृह्य संभाषा असे दोन प्रकार वर्णन केले आहेत. संधाय संभाषा म्हणजे जी चर्चा मित्रता ह्या भावाने होते. वादी-प्रतिवादी हे क्रोधरहित, समोरच्याचा आदर ठेऊन चर्चा करणारे, सहनशीलता असणारे, भाषेत आदर व गोडवा असणारे असतात. ह्या चर्चेतून निश्चित निर्णय/ज्ञान मिळत असतो. तर विगृह्य प्रकारात एक दुसऱ्याचा पराभव करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वपक्षाचा दृष्टीकोन लक्षात न घेता विपरीत अर्थ घेऊन मेरे मुर्गी कि एकीच टांग हा attitude ठेवून समोरच्याला हरविण्याचा प्रयत्न असतो. साहजिकच हि चर्चा निष्फळ ठरते. संधाय संभाषा हि संवाद घडविते तर विगृह्य केवळ वितंडवाद घडविते.

आजकाल आपण बघतो संवाद न होता वादच जास्त होतात. कशी चर्चा करावी ह्यापेक्षा कसे भांडावे हेच जास्त शिकायला मिळते. चर्चेतून ज्ञान मिळत नाही आणि शंकाहि दूर होत नाहीत. फक्त मीच खरा. बाकी सब पानी कम हेच जास्त बघयला मिळते. मला वाटते ज्यातून आपल ज्ञान वाढेल, बोलण्याच कौशल्य वाढेल, शंका दूर होतील अश्याच चर्चा आपण बघाव्या किंवा वाचाव्यात आणि चर्चा करतांनाहि नियमांचे भान ठेवून करावी जेणेकरून आपल्या श्रोत्यांचा अपेक्षाभंग होणार नाही. (संदर्भ- च.वि. ८/१५,१६)

(सूचना- ह्या ठिकाणी सविस्तर संभाषा विधी वर्णन केलेला नाही. चरक संहितेत वर्णन केला आहे. जिज्ञासूंनी संहितेतून जरूर जाणून घ्यावे.)

*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7E

Sunday, February 19, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*बुद्धीबळ*

बुद्धीबळ किंवा चेस नावाचा खेळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ह्या खेळात बुद्धीच्या जोरावर समोरच्याला हरविणे अपेक्षित असते. आपल्या बुद्धी चातुर्याने समोरच्या राजाची कोंडी करायची असते आणि सामना जिंकायचा असतो. असा हा रंजक खेळ खेळण सगळ्यांनाच काही जमत नाही. ज्याची बुद्धी तल्लख तोच ह्यात जिंकू शकतो.

आपल्या आजूबाजूच्या समाजात २ प्रकारच्या लोकांचे वर्ग आपल्याला बघायला मिळतात. एक बौद्धिक श्रम करणारे आणि दुसरा वर्ग आहे शारीरिक श्रम करणारा. नोकरदार आणि  व्यापारी वर्ग हा बौद्धिक श्रम करणारा तर मजदूर वर्ग हा शारीरिक श्रम करणारा आहे. एका कडे बुद्धी आहे व एका कडे बळ आहे म्हणून दोगेही एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु दोघेही परीपूर्ण नाहीत.

श्री. समर्थ रामदास स्वामी मात्र ह्याला अपवाद. समर्थ जेव्हडे बुद्धिवान होते तेव्हडेच बलवानहि होते. समर्थ रामदासस्वामी हे बलोपासक होते. हि बलोपासना स्वतः पुरता मर्यादित न ठेवता रामदासांनी सामान्य लोकांपर्यंत पोचवली. बल-बुद्धीचे प्रतिक म्हणजे भगवान मारुती. त्यांनी मारुतीची मंदिरे संपूर्ण देशभरात विविध प्रांतात उभारली आणि लोकांना बलोपासना शिकविली. सोबतच मन बुद्धी स्थिरतेसाठी मनाचे श्लोक समर्थांनी सामान्यांना दिले. ज्याप्रमाणे समर्थांकडे बल आणि बुद्धीचा मेळ होता तसाच बल-बुद्धीचा मेळ छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा होता. युद्धकौशल्या सोबतच गनिमी कावा सुद्धा त्यांच्याकडे होता. त्याच जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली.

काल शिव जयंती झाली आज श्रीरामदास नवमी आहे. काल छत्रपती शिवाजींचा जन्म झाला होता आणि आज समर्थ रामदासांनी सज्जन गडावर देह ठेवला होता. दोघेही जगाचे मार्गदर्शक  आहेत. लोकांच्या हृदयात दोगेही अमर झाले आहेत आणि दोघेही परिपूर्ण आहेत.  म्हणून फक्त बौद्धिक श्रम आणि फक्त शारीरिक श्रम मनुष्याला पूर्णत्व देत नाही त्यासाठी दोघांची सांगड असवी लागते.  जे शारीरक श्रम करीत नाहीत त्यांना स्थौल्य, बिपी, डायबेटीस, मानसिक ताणताणाव असे आजरा होत आहेत. म्हणून डॉक्टर कडे गेल्यावर त्यांना पाहिला सल्ला शारीरक श्रम करण्याचा मिळतो. म्हणून स्वतःचे आणि समजाचे स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शारीरिक बळ आणि बुद्द्धी दोन्ही मिळवावे लागतील.

चला तर बलबुद्धीचे उपासक होऊया, बुद्धी आणि बळ वाढवूया, समाज घडवूया.

*जय जय रघुवीर समर्थ*

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*

http://wp.me/p7ZRKy-7A

Visit Our Page