Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, October 30, 2011

पानगळ आणि चैत्रपालवी


सातत्याने परिवर्तन हा  निसर्ग नियम आहे. शिशिर ऋतूत निसर्गात जे बदल होतात त्याचे परिणामस्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची होत असलेली पानगळ  आपण दरवर्षी बघतो. त्यापाठोपाठ वसंत ऋतू सुरु झाला कि निसर्ग पुन्हा एकदा बदलतो आणि त्याचे परिणामस्वरूप झाडांना आलेली नवीन चैत्रपालवी सुद्धा आपण दरवर्षी बघतो. निसर्ग ऋतुचक्र दरवर्षी याप्रकारे कार्यरत असते. शिशिर ऋतू आल्यावर झाडांची जुनी पाने कोणतीही खळखळ न करता त्या त्या झाडापासून वेगळी होतात आणि नवीन येणाऱ्या चैत्र पालवीला जागा करून देतात.
आम्हाला असलेला अनुभव नवीन येणाऱ्या पानाना नाही असे जुनी पाने म्हणत नाही. आम्ही नसलो तर झाडाचे कार्य व्यवस्थित चालणार नाही अशा गमजा ती जुनी पाने करत नाहीत. चैत्र महिन्यात येणारी नवीन पालवी कोणताही अनुभव गाठीशी नसताना जुन्या पानांची कमतरता भासू न देता नवीन जोमाने त्या झाडाची कार्ये पूर्वी सारखीच पूर्ण करतात.
प्रत्यक्ष जीवनात मात्र हे चित्र सहसा दिसत नाही. घराघरातील वयोवृध्द स्वखुशीने तरुणांच्या हातात संसाराची सूत्रे सोपवताना फार कवचित दिसतात. आम्ही गेली कैक वर्षे जसे करत आलो आहोत तसेच पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा हेका कमी होताना दिसत नाही. एकंदर आयुष्मान वाढत चालले आहे त्यामुळे ज्या घरात ७५-८० चे वयोवृध्द आहेत त्या घरात ५० च्या जवळपास असणाऱ्या त्यांच्या पुढील पीढीला स्वतंत्र पाने संसार करता येत नाही आणि त्यांच्या मनातील स्वतंत्र संसारच्या कल्पना पूर्ण झालेल्या नसतानाच त्यापुढील पीढी सुद्धा त्यांच्या मनासारखे करता येत नाही म्हणून चीचीद करताना दिसते.
जी गोष्ट घरात तीच गोष्ट बाहेरील कार्य क्षेत्रात दिसून येते. व्यवसाय क्षेत्र असो किवा राजकारण असो वायोवृधानी  आपले अधिकार स्वताहून पुढील पिढीच्या हाती सोपवले आहेत हे दृश्य काहुपाच तुरळकपणे पाहण्यास मिळते.
कोणत्याही गोष्टीचा मोह ठेऊ नये अशी अध्यात्माच्या नावाने सकाळ संध्यकाळ पोपटपंची करणारी मंडळी सुद्धा याला अपवाद दिसत नाहीत.
स्वताचे अधिकार स्वताहून सोडणे हे आपण पानगळ ते चैत्र पालवी या अविरत चालणाऱ्या निसर्ग दृश्यातून कधी शिकणार आहोत का ?               

Vasant Chintaman Joshi  • A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
  • Mumbai, India 400104

  • 9323406386


No comments:

Post a Comment

Visit Our Page