Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, December 14, 2015

'' मूतखडा ''

'' मूतखडा '' 

========
कोकण किनारपट्टीत नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे/ स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते.
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
पाणी भरपूर पिणे.
लघवी तुंबवून न ठेवणे.
काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे.
मुतखड्याची लक्षणे कोणती?
पोट दुखणे.
लघवीला त्रास होणे.
लघवी तुंबणे.
कधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे.
लघवीतून रक्त जाणे.
मुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे?
लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
सोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का? किडनीला त्याचा काही त्रास आहे का? या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते.
एकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात?
उपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात.
एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते.
काही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का? हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
कारणे, लक्षणे व आहार
१) अनुवंशिकता- मूत्रपिंडात असलेले काही आजार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत जातात व त्यामुळे मुतखडा तयार होतो. उदा. रीनल टयुब्युलर अ‍ॅसिडॉसीस, सीन्टीन्युरीया इ.
२) वय आणि लिंग- वयाच्या पंचेचाळीस ते चाळीस या गटात मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. पुरुषांध्ये असलेल्या टेस्टेस्टेरान या हारमोनमुळे लीव्हरमध्ये आक्ससेटचे प्रमाण वाढते व मुतखडा होण्याचे प्रमाण पुरुषांध्ये जास्त आढळते.
३) विविध प्रदेश- वातावरणातील तापमान व दमटपणा यांच्या परिणामामुळे विविध प्रदेशामध्ये मुतखड्याचे प्रमाणे कमी आढळून येते. डोंगराळ व अधिक तापमान असणाऱ्या
प्रदेशांध्ये याचे प्रमाण जास्त असते. उदा. युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, नार्थ इंडिया, पाकिस्तान, नार्थ ऑस्ट्रेलिया, चीन इ. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भ भागात याचे प्रमाण तुलनात्मक जास्त आढळते. त्या त्या प्रदेशातील आहार व सवयी याचाही परिणाम यावर होतो.
४) पर्यावरण- अतिउष्ण वातावरणात श्वाच्छोश्वासचे प्रमाण वाढते व त्यामुळे लघवीचे प्रमाण घटते ,व यामुळे मुतखडा बनण्याची प्रक्रिया चालू होते.
५) पाण्याचे प्रमाण- पाण्याच्या भरपूर प्रमाणात वापर (दररोज ३ लीटरपेक्षा जास्त पाणी पिणे) व लघवी भरपूर होण्यामुळे मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते. पाणी खुप पिल्यामुळे मुतखड्याचे लहान क्रिस्टल बाहेर फेकले जातात आणि मुतखडा बनण्यासाठी पाहिजे तो वेळ त्यांना मिळत नाही. जास्त क्षमता क्षारयुक्त असलेले पाणी पिण्याचे देखील मुतखड्याचे प्रमाण वाढते. उदा. बोअरचे पाणी.
६) आहार- आहार हा मुतखडा तयार होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. वेगवेगळ्या प्रातांत तयार होणारे अन्नधान्य व भाज्या व त्यातील क्षारांचे प्रमाण याचाही यावर परिणाम होतो. आहारात कॅल्शियम, युरीक अ‍ॅसीड, ऑक्सलेट व इतर क्षार असलेले पदार्थाचे प्रमाण जास्त झाल्यास त्यांचे लघवीतील प्रमाण वाढते व मुतखडा तयार होतो. पंजाबमध्ये मुतखड्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण अ जीवनसत्व अभाव आहे. यामुळे मुतखडा बनण्यास प्रेरणा मिळते. जेवणात दाळीचे प्रमाण अतिजास्त असणे, पॉलीशड राइसचे प्रमाण जास्त असणे, फॅटस व मांसाहरचे प्रमाण जास्त असणे यामुळे मुतखडा बनण्याचे प्रमाण वाढते.
७) व्यवसाय- अतिशय स्थूलपणाच्या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींना मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.
उदा. * ऑफीस टेबल वर्क, अ‍ॅडमीनीस्ट्रटीव्ह वर्क इ.
* अतिशय तत्प उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीमध्येही याचे प्रमाण असते.
* अंतराळविरामध्येही याचे प्राण जास्त आढळते. कारण गुरूत्वाकर्षण शक्ती स्पेसमध्ये कमी असल्यामुळे वजन सहन करणाऱ्या हाडातील कॅल्शियम कमी होते व मुतखड्याचे प्रमाण वाढते.
८) मुत्रसंस्थेचे इंफेक्शन– जंतूच्या इंफेक्शनमुळे त्याचा विषाचा प्रादुर्भाव मुत्र संस्थेवर होतो व मुतखडा बनण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
९) हायपरप्यारा यायरॉईडीझम- पॅराथायरॉईड ही एक गळ्याजवळ असणारी ग्रंथी असून त्यामुळे कॅल्शियमचे संतुलन राखले जाते. याची वाढ झाल्यामुळे आतड्यामध्ये कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण वाढते व कॅल्शियमचा किडनीतून बाहेर पडणारा भाग वाढतो व मुतखडा तयार होतो.
१०) दीर्घकालीन आजार- ज्या आजारात रुग्ण बराच काळ अथरुणात झोपून राहतो. उदा. पॅरालिसीस (अर्धांगवायू) फॅक्चर इ. त्यामुळे कॅल्शियम चे क्षार किडनीत जमा
होऊन मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते.
११) किडनी व मुत्रसंस्थेचे आजार- ज्या किडनीच्या आजारामध्ये लघवी ही बाहेर फेकली जात नाही व त्याला अडथळा निर्माण होतो त्या सर्व आजारामंध्ये मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते. उदा. * युरेथ्रल स्ट्रीक्चर * पी.यु.जे. ऑक्स्ट्रक्शन, * मुत्रवाहिनी बारीक होणे (युरेट्रल स्ट्रीक्चर), * प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, * फामोसीस इ. मुतखड्याची पूर्वसूचना देणारी लक्षणे-
१) लघवीतून रक्तस्त्राव होणे.
२) लघवीला नेहमी जळजह होणे.
३) पाठीमागच्या भागात दुखणे व ते दुखणे अंडाशयाकडे जाणे.
४) लघवीतून बारीक कण जाणे इ. मुतखडा झाल्यानंतर व त्याची उपचार घेतल्यानंतर तो परत होऊ नये म्हणून घ्यावयाची आहारातील काळजी. आहारात पाण्याचे व द्रव पदार्थाचे प्रमाण जास्त ठेवावे. २४ तासात कमीत कमी अडीच ते तीन लीटर लघवी बाहेर पडायला हवी. आहारात खालील वस्तू ५० टक्के कमी कराव्यात. दुध, दुधाचे पदार्थ. उदा. चहा, कॉफी, तुप, लोणी, बटर, चीज, मासांहार-मटण, मासे, कोंबडी, अंडी इ. पालक, चवळी, टमाटे, आवळा, चिक्कू, काजू, काकडी, मनुका, कोबी, भोपळा, मशरुम, वांगे इ. भरपूर पाणी पिणे हे मुतखडा न होण्यासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर नारळाचे पाणी, मका, भात, अननस, ज्यूस, केळी, लिंबू, गाजर, डाळ, कारले, बदाम या वस्तुंचे प्रमाण चांगल्यापैकी आहारात असावे.
======
आयुर्वेद
======
मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2 चमचे घ्यावे.
एक उपाय म्हणजे पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते. औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणाम दिसणे अपेक्षित आहे.
याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.
पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.
या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात.
============
होमिओपथी निवड
============
चामोमिला, लायकोपोडियम र्बेरिस व्हल्गॅरिसचा द्राव 3/4 थेंब पाण्यात टाकून दिवसातून दोन वेळा रोज घ्यावा.
मुतखडा हा विकार सुरवातीच्या अवस्थेमध्ये असल्यास औषधांद्वारे बरा होऊ शकतो. मात्र वेळीच योग्य उपचार न केल्यास मुतखड्याच्या आकारात वाढ होते. अशा वेळी शस्त्रक्रमाद्वारेच मुतखडा काढावा लागतो.
PCNL शस्त्रक्रीया –
ही एण्डोस्कोपीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रीया असून यामध्ये संपूर्ण भूल किंवा कंबरेखालील भाग बधीर करुन एक्स-रे किंवा सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने किडनीमध्ये सुई घालून त्याद्वारे किडनीपर्यंत छोटा मार्ग बनवून एण्डोस्कोप घालून मुतखडा काढला जातो. खडे मोठे असल्यास ते फोडृन तुकडे करुन काढले जातात.
============================================================
किडनी स्टोनपासून नैसर्गिकरीत्या सुटका=
बदलती जीवनशैली, अनियमित दिनचर्या, खाण्या-पिण्याच्या उलटसुलट सवयी यामुळे अनेक जण सध्या किडनी स्टोनच्या त्रासाला बळी पडतायत. किडनी स्टोनचा खूप त्रास होत असताना प्रचंड पोटात दुखतं. हा आजार आनुवंशिकही असू शकतो. या आजाराने त्रस्त रुग्णाला डॉक्टर अनेकदा ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. पण यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपचार आहेत. या औषधांच्या सेवनाने तुम्ही या आजारावर मात करू शकता.
मीठ आणि मूत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्यास किडनी स्टोनचा आजार होऊ शकतो. किडनी स्टोनचा आकार विविध प्रकारचा असतो. काही कण वाळूप्रमाणे बारीक असतात, तर काही कण मोठे असतात. कधी कधी लहानसहान स्टोन लघवीवाटे शरीराच्या बाहेर पडतात. पण जे आकाराने मोठे असतात ते बाहेर पडत नाहीत. परिणामी पोटात दुखण्यासारखे त्रास होतात. मात्र हे स्टोन नष्ट करणारे काही घरगुती उपाय पुढे दिले आहेत. त्याचा उपयोग केल्यास निश्चितच आराम पडेल.
द्राक्षांचे सेवन करा
सध्या थंडीचे दिवस आहेत. या मोसमांत द्राक्षं चांगली येतात. आता द्राक्ष बाजारातही दिसायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे ती मुबलक प्रमाणात मिळतील. किडनी स्टोनपासून सुटकारा मिळण्यासाठी द्राक्षं अतिशय उपयुक्त ठरतात. द्राक्षात पोटॅशिअम मीठ आणि पाणी भरपूर प्रमाणात असतं. तसंच द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणूनच ती या आजारात अतिशय उपयुक्त ठरतात.
कारल्याचा आहारात समावेश करा
कारलं चवीला अतिशय कडू असतं. त्यामुळे प्रत्येकालाच ते आवडतं असं नाही. क्वचितच त्याचा आहारात समावेश होतो, मात्र किडनी स्टोनवर हा रामबाण उपाय आहे. कारल्यात मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस असतं जे किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया थांबवतं. म्हणूनच जे रुग्ण किडनी स्टोनने त्रस्त आहेत त्यांनी आपल्या आहारात कारल्याचा आवर्जून समावेश करायला हवा.
केळी खा
स्टोनचा कमीत कमी त्रास व्हावा म्हणून केळी खायला हवीत. केळ्यात बी-६ नावाचं जीवनसत्त्व असतं. या जीवनसत्त्वामुळे खड्यांच्या निर्मितीला आळा घातला जातो. याशिवाय जीवनसत्त्व बी अन्य जीवनसत्त्वांबरोबर सेवन केल्यास किडनी स्टोनच्या आजारात खूप आराम पडतो. एका शोधानुसार जीवनसत्त्व बीचं १०० ते १५० मिलिग्राम दररोज सेवन या आजारात खूप फायदेशीर ठरतं.
ओवा
लघवीला चालना देणारे गुण ओव्यात उपजतच असतात. त्यामुळे ओवा किडनी स्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून उपयुक्त ठरतो. किडनीत स्टोन जमा होऊच नये म्हणून नियमित आहारात, मसाल्याच्या रूपात ओव्याचा वापर करावा.
लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस यांच्या एकत्रित सेवनाने या आजारात खूप फायदा होतो. या आजारात पोटदुखी होते. अशा वेळी ६० मिलीलीटर लिंबाच्या रसात तितक्याच ऑलिव्ह ऑइलची मात्रा घेतली तर पोटदुखीपासून त्वरित आराम पडतो.
चाकवताचा रस
किडनी स्टोन नष्ट करण्यासाठी चाकवत ही पालेभाजी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी चाकवताची अर्धी जुडी पानं चांगली उकळून घ्यावीत. हे पाणी गाळून त्यात काळीमिरी, जिरं आणि थोडं सैंधव मीठ घालावं. हे पाणी दिवसातून चार वेळा प्यावं. खूप गुणकारी ठरतं.
थंड कांदा
कांद्यात स्टोननाशक तत्त्वं असतात. आहारात कांद्याच्या सतत सेवनाने किडनी स्टोनपासून सुटकाराही मिळू शकतो. साधारण ७० ग्रॅम कांदा किसून त्याचा रस काढावा. सकाळी अनशापोटी या रसाच्या नियमित सेवनाने स्टोनचे बारीक बारीक खडे होतात आणि ते लघवीवाटे बाहेर पडतात.
तुळस
तुळस कित्येक आजारांत लाभदायक आहे. तुळस घालून नियमित चहा प्यायल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तुळशीचा रस प्यायल्याने स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. कमीत कमी एक महिना तुळशीच्या पानांच्या रसासोबत मधाचं सेवन केल्यामुळे किडनी स्टोनपासून कायमची सुटका मिळू शकते. तुळशीची ताजी पानं रोज चावून खाल्ल्याने खूप फायदा होतो.
सौफ' चा चहा-
अर्धा चमचा सौफ बारीक करून घ्‍या. दोन कप पाण्‍यात पाच मिनिट उकळून घ्‍या. सौफचा चहा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्‍यानंतर स्‍टोनपासून होणार त्रास बंद होतो. लघवी करताना त्रास होत असेल तर आवळ्याचा रस प्‍यायल्‍यानंतर त्रास होत नाही. आवळ्याचा रस, साखर आणि तुपचे मिश्रण घेतल्‍यानंतर स्‍टोनचा त्रास होत नाही. आवळ्याचा रस आणि इलायची याचे मिश्रण गरम करा. उलटी, चक्कर येणे, पोटात दुखणे याचा त्रास होत नाही.
डाळिंबाचा रस
किडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस सेवन करणं हा अतिशय गुणकारी घरगुती उपचार आहे. डाळिंबाचे दाणे आणि रसात काहीसा तुरटपणा असल्याने तो किडनी स्टोनसारख्या आजारात अतिशय उपयुक्त ठरतो.
लघवी करताना जळजळ होत असेल तर गुळवेल आणि आवळ्याचे मिश्रण तयार करा. यामध्‍ये आदरक पाच ग्रॅम, अश्वगंधा पाच ग्रॅम टाका. हे मिश्रण 100 मिली लीटर पाण्‍यात उकळून घ्‍या. हा काढा दोन दिवसाच्‍या आतंराने दोन महिने प्‍यायल्‍यानंतर किडणी स्‍टोन बरा होतो.
दुर्वा च्‍या मुळ्या, अंबी हळदीचे कंद, मालकांगनीचे पाने समान मात्रेत घ्‍या. याला बारीक वाटून या मिश्रणाचा रस तयार करा. हे मिश्रण मधासोबत घेतल्‍यानंतर स्‍टोन बरा होतो. अश्वगंधा नवस्‍पतीचा रस प्‍यायल्‍यानंतर स्‍टोन बरा होतो. अश्वगंधा वनस्‍पतीच्‍या मुळ्याचा रस व आवळ्याचा रस समप्रमाणात घ्‍या. मूत्राक्षय आणि लघवी करताना होणारा त्रास होणार नाही.
या उपायामुंळे किडनी स्टोनपासून सुटका होऊ शकते. हे उपाय घरगुती तर आहेतच, शिवाय फायदेशीरही आहेत. मात्र हे उपाय उपयुक्त ठरले नाहीत तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
DrJitendra Ghosalkar
७७९८६१७२२२ /९४०४८०९५३१

No comments:

Post a Comment

Visit Our Page