Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 10, 2015

हेल्दी नाश्ता' म्हणून 'कॉर्नफ्लेक्स' खाताय? पुन्हा एकदा विचार करा!!

हेल्दी नाश्ता' म्हणून 'कॉर्नफ्लेक्स' खाताय? पुन्हा एकदा विचार करा!!
गेल्या काही वर्षात आपल्या देशातल्या आहार-विहारात आमुलाग्र बदल झाले आहेत. विशेषतः नाश्त्याचे पदार्थ अधिकाधिक पाश्चात्य होण्यास सुरुवात झाली आहे. सतत डोक्यावर धडकणाऱ्या जाहिरातींमुळे अनेकांकडे रोज सकाळी 'बाऊलभर' कॉर्नफ्लेक्स खाण्याची 'प्रथा' वाढीला लागली आहे. मात्र हा नाश्ता खरंच 'हेल्दी' आहे का?
कॉर्नफ्लेक्सचा जन्म झाला तो पाश्चात्य देशांतील मांसाहारामुळे निर्मित वाढत्या बद्धकोष्ठासारख्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी! मक्याचे दाणे उच्च तपमानावर भाजून त्याचे रुपांतर कॉर्नफ्लेक्समध्ये केले जाते. मात्र असे करताना त्यातील wheatgerm हे महत्वाचे अंग काढून घेतले जाते. कारण या wheatgerm मुळेच कॉर्नफ्लेक्स खवट लागू शकतात. आपण कॉर्नफ्लेक्सच्या पॅकेटवर 'with added nutrition' असे वाचल्याचे आपल्याला स्मरते का? ही पोषणतत्वे 'वरून' का घालावी लागतात याचा विचार केला आहे कधी?! wheatgerm मध्येच विविध जीवनसत्वे, आवश्यक तैल घटक इत्यादी असतात. मात्र तेच काढून टाकल्याने कृत्रिमरीत्या तयार झालेली ही पोषणमुल्ये 'वरून' वेगळी घालावी लागतात. यात भरीस भर म्हणजे हा नाश्ता चविष्ट होण्यासाठी त्याला साखरेचे आवरणदेखील चढवले जाते. ते सेवन करताना दुधासह घेऊन त्यात फळे घालावीत असेही सांगितले जाते. थोडक्यात आधीच अपथ्यकर आहार; त्यात त्याचे रुपांतर विरुद्धाहारात करायचे. म्हणजे; आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास!!!
इतक्या सगळ्या प्रक्रीयेनंतर या पदार्थाला 'आरोग्यपूर्ण' म्हणावे का? अर्थात; 'परदेशात तयार केलेला पदार्थ आहे म्हणजे त्यावर संशोधन झाले असणारच' अशी 'अंधश्रद्धा' बाळगूनही स्वतःला बुद्धीवादी म्हणवणाऱ्यांनी तसे जरूर म्हणावे आणि नित्यनेमाने कॉर्नफ्लेक्स खावे. आमची ना नाही. मात्र; आपल्या आरोग्याची काळजी असणाऱ्यांनी यापुढे आपला बाऊल भरताना १०० वेळा विचार करावा!
Pareexit Shevde
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ-लेखक-व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page