Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, December 24, 2010

राहू काल म्हणजे काय ?

हु काल  म्हणजे काय? आणि तो कसा काढावा? त्या काळात महत्वाचे निर्णय टाळावेत का?असे प्रश्न अनेकाच्या मनात येत असतात. अनेक लोकांची या विषयाची उत्सुकता लक्षात घेऊन मी त्याबद्दल माहिती देत आहे.
राहू केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाहीत ते छाया ग्रह आहेत. सूर्य आणि चंद्राच्या भ्रमण कक्षेचे ते दोन छेदन बिंदू आहेत.
तरी सुद्धा याबिंदू जवळून जेव्हा एखादा ग्रह जातो किवा विशिष्ट कोन करतो त्यावेळी त्या ग्रहाच्या परिणामात अडथळे येतात. हे दोन छेदन बिंदू असल्यामुळे राहू हा शरीराचा वरचा भाग तर केतू हा शरीराचा खालचा भाग असे मानले जाते. केतुला चेहरा हा शरीराचा भाग नाही त्यामुळे ग्रह दृष्टी मध्ये केतू या ग्रहाला दृष्टी नाही, राहू काळात आपण करत असलेल्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात असा एक समज आहे पंचागात दिलेला राहुकाळ हा ज्या स्थानाचे पंचांग आहे, उदाहरणार्थ दाते पंचांग सोलापूरचे सूर्योदय/सूर्यास्त देते, त्या स्थानापुराता आहे.जर आपल्याकडे स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा नसतील तर हा राहुकाळ अंदाजे समजावा आणि त्या काळात शक्यतो एखाद्या महत्वाच्या कामाला किवा मिटींगला सुरवात करू नये.
राहुकाळ काढण्याची पद्धत खाली देत आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त मधील जे अंतर असते ते मिनिटात रुपांतरीत करावे. उदाहरणार्थ आज शुक्रवार २४ डिसेंबरला सोलापूरचे सूर्योदय सर्यास्त असे आहेत ७.१० आणि १८ .०७ असे आहेत. म्हणजे आजचे दिनमान १० तास ५७ मिनिटे आहे.त्याची ६५७ मिनिटे होतात.याला ८ ने भागाकार करावा म्हणजे साधार्ब ८२ मिनिटे येतात. कोणत्याही दिवसाचा पहिला भाग राहुकाळ नसतो.
सोमवारी २ रा भाग , मंगळवारी ७ वा भाग, बुधवारी ५ वा भाग, गुरुवारी ६ वा भाग ,शुक्रवार्री ४ था भाग ,शनिवारी ३ रा भाग आणि रविवारी ८ वा भाग घेतात.
आज शुक्रवारी ४ भाग राहुकाळ आहे म्हणजे पहिल्या तीन भागाची २४६ मिनिटे होतात जी ४तास ६ मिनिटे होतात ती आजच्या सूर्योदयाच्या वेळेत ७.१० मध्ये मिळवावी. याचा अर्थ आज ११ वाजून १६ मिनिटापासून ८२ मिनिटे म्हणजे १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहुकाळ आहे
आजचा सोलापूरचा राहुकाळ सकाळी ११ वाजून १६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटे असा येईल.
या कालखंडात महत्वाचे निर्णय घेऊ नयेत असे म्हणता येईल.
हा एक वर्षानुवर्षे चालत आलेला विचार आहे तरी सुद्धा प्रत्येकाने त्याचा स्वत अनुभव घेऊन ठरविणे इष्ट ठरेल केवळ अंधश्रद्धा म्हणून त्याच्या मागे जाऊ नये असे माझे व्यक्तिगत मत आहे.
माझे व्यक्तिगत वेगळे आहे त्याला काही कारण आहे ते पुढे देत आहे.
सर्वोतोभद्र चक्रानुसार एकूण ९ नक्षत्र विषय आहेत. त्यासाठी चंद्रापासून ९ नक्षत्र मोजण्याची एक पद्धत आहे.चंद्रापासून ३.५.७/.१२,१४,१६/,२१,२३,२५ वे नक्षत्र, हे विपत,प्रत्यरी आणि वध नक्षत्रे समजली जातात. ही ९ नक्षत्रे चढत्या कर्माने अशुभ समजली जातात. ज्यावेळी त्या दिवसाचे चंद्र नक्षत्र आणि राहूचे नक्षत्र या प्रमाणे येत असेल त्यावेळी त्या दिवसाचा राहुकाळ अशुभ होण्याची शक्यता जास्त आहे. इतर दिवशी तसेच होण्याची शक्यता कमी आहे. असे मला वाटते. त्यासाठी प्रत्येकाने स्वत अनुभव घेऊन ठरवावे असे माझे मत आहे  .


VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104

9323406386

No comments:

Post a Comment

Visit Our Page