Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, December 18, 2010

औषधी वनस्पती

भारताला औषधी वनस्पतींचा आकर्षक व सर्वमान्य असा गौरवसंपन्न इतिहास आहे. औषधी वनस्पतींची मागणी वाढत चाललेली असताना त्याचा पुरवठा कमी होत आहे. अशावेळी या उद्योगात उतरून वनस्पतींची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करणे त्यावर प्रतिक्रिया करून औषधे तेले, कॉस्मेटिक बनविणे यांना मोठा वाव आहे. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ आयुर्वेदिक हर्बल औषधी वनस्पतींच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींची लागवड करताना घ्यावयाची काळजी औषधी महत्त्व काढणी पश्चात घ्यायची काळजी प्रक्रिया करणे पदार्थाचे पॅकेजिंग सरकारी योजनांची माहिती कायदेकानून प्रकल्प अहवाल तयार करणे उद्योजकीय गुण व व्यक्तिमय मार्केटिंग व मार्केटसव्र्हे यावर मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे हर्बल टी ज्यूसेस फूड सप्लीमेंट फेस किम्स बास पावडरी बनविणे, ग्रॅन्युअल्स यांसारख्या जवळपास १२ ते १५ उद्योगांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. संपर्क- ९२२१४९८३४४.  
मुखवास निर्मिती
मुखवास Mouth Freshner) म्हणजेच मुखशुद्धी. अनेकविध प्रकारची चूर्ण व मुखवास आज आपल्याकडे प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. अतिशय टेस्टी व पाचक अशी विविध मुखवास चूर्ण करायलाही सोपी व खूप आवडणारी आहेत. म्हणूनच खूप मागणी असणारी अशी आहेत. ‘मुखवास बनविणे’ हा व्यवसाय अगदी छोटय़ा भांडवलापासून ते अगदी मोठय़ा प्रमाणावर मशिनवरही सुरू करता येतो. आवळा सुपारी, आलं सुपारी, ओवा सुपारी, मुखवास बॉम्बे बडीशेप, इन्स्टन्ट पान, खुबसुरत मसाला, काजू बडीशेप, टिपटॉप बडीशेप, कोयीची सुपारी, केशर सुपारी, मसाला सुपारी, खजूर गोळी, खारीक सुपारी, जलजीरा पावडर इ. विविध मुखवासाचे प्रकार प्रश्नत्यक्षिकांसह शिकविले जातील. तसेच मुखवास बनविण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी लायसेन्सिस, बाजारपेठ पाहणी, विक्री तंत्र, गुणवत्ता, पॅकेजिंग, शासकीय अनुदान, कच्चा माल, मशिनरी, नफा-तोटा पत्रक यावर माहिती असणे आवश्यक. संपर्क- ९८१९०७०१६६/ ९३२५०७२००६.   http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=771:2009-08-17-06-40-06&catid=132:2009-08-06-07-25-51&Itemid=144

No comments:

Post a Comment

Visit Our Page