Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, November 28, 2010

शेवगा

शेवगा

शेवग्याच्या शेंगा
शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) ही भारतातील वनस्पती आहे. शेवगा ही भारतातील खाद्य भाजी आहे. शेवगा या वनस्पतीचे जगभर गेले दशकात महत्त्व वाढले.[ संदर्भ हवा ]

वनस्पतीची रचना

शेवग्याच्या झाडाच्या खोडाचे चित्र
शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

 • शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात.
 • वाळलेल्या शेवगा बियांचे चूर्ण पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरल्या जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजंतुक करण्यास ८०० ग्रॅम चूर्ण वापरावे असे सुचित केले आहे. त्यामुळे शेवगा बियांचे चूर्ण भारतातून जगभर निर्यात होते.

प्रजाती  

 • जाफना प्रजाती - ही स्थानिक प्रजाती आहे. याच्या शेंगा चवदार असतात. वाणाचे वैशिष्टय़ - एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते.
 • कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केली आहे. या झाडाची उंची ५ ते १६ मीटर इतकी असते.
 • पी. के. एम. १ - हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे.
 • पी. के. एम. २ - हा वाणही तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. - बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.

इतर प्रकार

 • दत्त शेवगा कोल्हापूर
 • शबनम शेवगा
 • जी.के.व्ही.के. १ आणि जी.के.व्ही ३
 • चेन मुरिंगा
 • चावा काचेरी

अधिक वाचन

खालील पुस्तके उपलब्ध आहेत.
 • शेवगा - लेखक  वि. ग. राऊळ
 • शेवगा लागवड -लेखक डॉ. ठोंबरे
 • शेवगा -  लेखकडॉ. राहूडकर.

No comments:

Post a Comment

Visit Our Page