Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, November 20, 2010

हृदय


धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.

आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात.

जर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात.

तीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि हृदयाला रक्त अपुरं पडू लागतं.

या धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो?
हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक - Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस - Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस - Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला. गेल्या ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत हृदयाविषयीचं वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान हे शवविच्छेदनातून मिळालेलं होतं. कारण जिवंतपणी हृदयाचं निरीक्षण आणि अभ्यास रण्यासाठी आवश्यक ती साधनं त्या काळापर्यंत उपलब्ध नव्हती.
source:- 

No comments:

Post a Comment

Visit Our Page