विविध रूग्णांच्या गरजेनूसार प्रत्येक ‘पिंट’ दान केलेल्या रक्ताचे वेगवेगळ्या घटकांमध्ये वर्गीकरण करता येणे शक्य आहे म्हणून प्रत्येक ‘पिंट’ रक्त हे संजीवनी ठरू शकते. लाल रक्तपेशी या शरीरात प्राणवायु पुरवितात आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर काढून टाकतात. त्यांच्या योग्य त्या कार्यासाठी लाल रक्तपेशींचे नीट पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण पदार्थ म्हणजे लोह, मांसापासून, काळीज, अंडी, हिरव्या पालेभाज्या, इ. पासून मिळू शकते.

मेगाकायरोसाइटसचे मुख्य कार्य रक्तामध्ये गाठी निर्माण करून रक्तस्त्राव थांबविणे हे आहे. याशिवाय प्लेटलेटस (Platelets) रक्तवाहिन्या ‘लीकप्रूफ ठेवण्याचे कार्य करतात. प्लाझ्मामध्ये ९२ टक्के पाणी ,७ टक्के प्रोटीन्स, १ टक्के खनिज हार्मोन्स आणि एन्हाइम्सअव्हिटॅमिन्स असतात. प्लाझ्मा हा गामा ग्लोब्यूलीन, सीरम अल्ब्यूमिन, फायब्रिनोजिन आणी गाठी निर्माण करणार्या घटकांचा स्त्रोत आहे. Blood Bank
No comments:
Post a Comment