Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 24, 2010

मासिकपाळी

सध्याच्या काळातील सामाजिक परिस्थितीच अशी आहे की मासिकपाळी या विषयाशी संबंधित अनेक दंतकथा अस्तित्वात आहेत आणि त्याचे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. शाळा कॉलेजांमध्ये या विषयी जे शिकविले जाते. त्यामुळे त्यासंबंधी सविस्तर माहिती मिळण्यापेक्षा फक्त उत्कंठाच वाढविली जाते.

प्रचलित माहितीचा अभ्यास केल्यास आपल्याला निर्णयाप्रत येता येईल. जसे संतती नियमिनासाठी कोणते उपाय योजायचे, डॉक्टरला कधी भेटायचे आणि आपल्या वाढत्या वयाबरोबर निर्माण होणार्‍या समस्यांना कसे सामोरे जायचे.

मासिकपाळी सामान्यपणे प्रत्येक स्त्रीमध्ये दर २८ दिवसांनी मासिकपाळी येते मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.

पण विशीतील मुली आणि रजोनिवृती पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणेच शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमीत येणे शक्य असते. म्हणूनच संततिनियमनासाठी “तालबध्द प्रक्रिया" ( रिदम मेथड) ही अत्यंत असुरक्षित पध्दत समजली जाते.

गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ अगोदर ठरविणे अथवा निश्‍चीत करणे ही म्हणूनच अशक्यप्राय गोष्टी आहे. बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलिकडील पाच दिवसात तर आपण समागम केला असेल तर आपण गरोदर राहू शकता. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना आहे जर आपली पाळी सात दिवस लांबली आणि शुक्रजंतु पाच दिवस राहिले आणि आपला मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर आपण गरोदर राहू शकता.

मासिक स्त्राव:
मासिक पाळीमध्ये अंगावरून जाणारा स्त्राव हा त्या स्त्रीच्या पाळीच्या लांबीच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साधारणपणे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत प्रत्येक पाळीमध्ये तीन अंसापेक्षा कमी रक्तस्त्राव होते.

समागमोत्सुकता:
समागमोत्सुकता ही प्रत्येकीच्या बाबतीत वेगळी असते. त्यामध्ये आजारपण, नवीन बालकाचा जन्म,

अतिशय श्रम अथवा एखादा वाईट दिवस यामुळे बदल दिसून येतो. बहुतेक स्त्रियांमध्ये मासिकपाळी आणि त्यांनुसार हार्मोन्समध्ये होणारे बदल यामुळे संभोगमोत्सुकतेमध्ये जास्त बदल झालेला आढळून येत नाही. ह्या स्त्रिया संतती नियमनासाठी हार्मोन्सचा वापर करीत नाहीत अशा स्त्रिया बीजांड परिपक्व होऊन बीजपुंज अलग होण्याच्या काळात समागामासाठी जास्त उत्सुक असतात तर काही स्त्रिया मासिकपाळीच्या काळामध्ये समागमाची अभिलाषा धरतात.

समागमोत्सुकता आणि समागमाचे अभिलाषा यामध्ये हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि व्यग्रतेमुळे येणारा शीण अशा अनेक कारणांमुळे बदल झालेला दिसून येतो. तुमच्या जोडीदाराची इच्छा जर कमी जास्त असेल तर त्यामुळे देखील तुमच्या वर परिणाम दिसून येतो. समोगमोत्सुकता ही रजोनिवृत्तीच्या काळात वाढलेली दिसून येते. कारण त्यावेळी गरोदर राहण्याची भीती नसते. मुले देखील घरात नसतात आणि त्यामुळे समागमाबद्दल जास्त उत्साह असतो. काही स्त्रियांच्या बाबतीत रजोनिवृत्तीनंतर समागमोत्सुकता कमी झालेली आढळून येते.

संततिनिमन:
स्त्रियांच्या बाबतीत संतति नियमनासाठी कोणता उपाय जास्त परीणामकारक असेल याबाबत नेहमीच संभ्रम आढळून येतो. शास्त्राच्या आधारे संततिनियमनासाठी मध्ये अभेद्य वातावरण निर्माण करणारी उपकरणे उदा. कंडोम, डायफ्रॅम ही गरोदरपणा होऊ न देण्यास जास्त प्रभावी ठरतात. खरे तर कंडोम अथवा डायफ्रॅम पेक्षा गोळ्या घेणे हे जरी जास्त व्यवस्थितपणाचे वाटत असले तरी स्त्रिया बहुतेकवेळा गोळ्या घ्यायला विसरतात. आपण जर गोळ्या घेत असलात आणि एखादेवेळी ती घ्यायला विसरलात तर “गरोदरपण नको असेल तर व्यवस्थितपणे काळजी घ्या" अशा प्रकारची माहिती आपल्याला आपल्या प्रिस्क्रीप्शन बरोबर मिळेल.

http://marathi.aarogya.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page