Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 24, 2010

आजू बाजुच्या वनस्पती.




आमच्या आजूबाजूला बर्‍याच प्राकृतिक औषधी असतात, पण त्यांच्याबद्दल पुरेषी माहेती नसल्यामुळे आम्ही त्यांचा वापर करण्यास अक्षम असतो. काही वनस्पत्या, फळ आणि मसाले अशे असतात जे आमच्या शरीराचा संसर्गापासून बचाव करतात.

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी कापूर लावायला पाहिजे. यात बॅक्टेरियाविरोधी तत्व मौजूद असतात.

कडू लिंबाच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते.

आलं व लसणाचा वापर रोज आपल्या जेवणात केला पाहिजे. या दोघांमध्येदेखील बॅक्टेरियाविरोधी तत्व मौजूद असतात.

एक सफरचंदाचे सेवन रोज करायला पाहिजे त्याशिवाय तुम्ही त्याला चिरून त्यावर लिंबू, काळेमिरे पूड आणि थोडेसे मीठ लावून सलॅडप्रमाणे वापर करू शकता.

4 कप पाण्यात 25 तुळशीची पानं उकळून थंड करून ठेवायला पाहिजे. मुलांना थोड्‍या प्रमाणात हा काडा प्यायला दिला पाहिजे. मोठ्‍यांना अर्धा कप द्यायला पाहिजे. तुळशीच्या पानांचा हा काडा कुठल्याही प्रकारच्या फ्लूला दूर करण्यास मदतगार ठरेल.

यूकेलिप्टस (निलगरी)चे तेल नाकाला लावल्याने गंभीर प्रकारचे फ्लू पसरवणारे वायरसपासून बचाव होतो. या तेलाचे काही थेंब तुमच्या रुमालावर लावून जवळ ठेवल्याने मोसमी-संक्रमणापासून बचाव करता येतो.

थोडीशी दालचिनी (कलमी) दोन कप पाण्यात उकळून त्या पाण्याचे सेवन करावे, गळा साफ होण्यास मदत मिळतो.

आपल्या आहारात काळे मिरे व हळदीचे सेवन आवश्यक केले पाहिजे. हे संक्रमण रोखण्यात मदतगार असतात.

मध आणि आलं हे दोघेही वायरल इन्फेक्शन रोखण्यात सहायक असतात.

सकाळच्या वेळेस कोमट पाणी पीणे आरोग्यासाठी लाभकारी असते.

No comments:

Post a Comment

Visit Our Page