Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 29, 2010

पिंपळी

पोटाचे विकार- पिंपळी चूर्ण गुणकारी

पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार व कफरोग यांवर अत्यंत गुणकारी आहे. कफयुक्त खोकल्यावर पिंपळीचे चूर्ण तूप व मध द्यावे. मात्र ते सर्व विषम प्रमाणात द्यावे म्हणजे आराम वाटतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटणे अथवा पोटास तडस लागत असेल व अन्नपचन होत नसेल, तर जेवणानंतर पिंपळीचे चूर्ण मधाशी खावे. तसेच पोटात वात धरुन शूल होत असेल, तर पिंपळीचे चूर्ण सैंधव, आल्याचा रस व थोडा मध यातून दिल्याने दुखने थांबते. भुक अजिबात लागत नसेल व बारीक ताप असेल तसेच तोंड बेचव असून मळमळ , तोंडाला पाणी सुटणे इत्यादी लक्षणे होत असतील तर नुसते पिंप्ळीचे चूर्ण गुळाबरोबर घेतल्याने हे विकार कमी होतात. पिंपळीचे चूर्ण नुसते न घेता त्याबरोबर सुंठीचे चूर्णही थोडेसे घेतल्यास लवकर गुण येण्यास मदत होते. दमा, खोकला, ह्र्दयाचे विकार, कावीळ, पांडुरोग इत्यादी रोगही या उपायाने बरे होतात. पिंपाळीचे चूर्णाचे दुप्पट गुळ घ्यावा असे वैदक शास्त्रात सांगितले आहे.

मध व पिंपळीने चरबी कमी होते

दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व सैंधव यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन दांताच्या मुळाशी घासल्याने त्या तक्रारी कमी होतात. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोग बरे होतात.

चौसष्टी पिंपळीने दमा बरा होतो

पिंपळाचा उपयोग अनेक रोगांवर होतो. याशिवाय तिचे काही विशेष प्रयोगही शस्त्रांत सांगितले आहेत. त्यापैकी चौसष्टी पिंपळी, वर्धमान पिंपळी, पाचक पिंपळी इत्यादी काही होत. नुसत्या पिंपळीचा सतत चौसष्ट दिवस अहोरात्र खल करतात. तिलाच चौसष्टई पिंपळी म्हणतात. ती अतिशय तीव्र, उष्ण, अतिसुक्ष्म व तीव्र असते. म्हणून ती फक्त मुगाच्या डाळीइतकी तूपमध किंवा मध साखर अथवा वासावलेहातून दोन वेळा घेतल्याने अति जुनाट दम्याचा विकारही बरा होतो. तसेस पडसे, खोकला, अग्निमांद्य, अनिमिया, जीर्णज्वर, ह्रुदयाची अशक्तता इत्यांदीवर फार गुनकारी आहे. चौसष्ट दिवसांऐवजी फक्त चौसष्ट प्रहरच खल करतात. तिलाही चौसष्टी पिंपळीच म्हणतात. पण ती जरा सौम्य आहे. पण इतके असुनही उष्ण्ता वाढल्यास गेण्याचे बंद करुन तुप व दूध पुष्कळ प्रमाणात घेतल्याने पित्त कमी होते. फारच उष्णप्रक्रुतीच्या माणसांनी मात्र पिंपळीचा उपयोग जपूनच करीत जावा.

वर्धमान पिंपळीने अशक्तता जाते

गाईचे दूध चार तोळे, पाणी सोळा तोळे घेऊन त्यात तीन पिंपळ्या घालून सर्व एकत्र करून कल्हईच्या भांड्यात आटवावे. पाणी आटले म्हणजे त्यात खडीसाखर घालून त्यातील पिंपळ्या चावुन खाऊन ते दूध प्यावे किंवा थंड-उष्ण या प्रकृतिभेदानुसार पिंपळ्या खाव्यात किंवा त्या काढून टाकुन, नुसते दुध प्यावे. याप्रमाणे रोज एक पिंपळी याप्रमाणे सात दिवस वाढवीत न्यावे व पुन्हा सात दिवस रोज एक पिंपळी कमी करीत आणावी. यासव वर्धमान पिंपळी म्हणतात. यात पिंपळीचे प्रमाण व ती वाढविण्याचे दिवस यात बरेच प्रकार आहेत. पण सर्वसाधारणपणे वरील प्रमाणे घेतल्यास जरा उष्ण प्रकृतीसही मानवण्यास सोईचे होते. हिच्या सेवनाने जीर्ण ज्वर, पांडुरोग, गुल्म, उदर, अग्निमांद्य, खोकला, अशक्तता व वातरोग दूर होतात. प्रमेह रोगावरही ही गुणकारी.

अजीर्णावर घ्यावयाच्या पिंपळ्या

बरेच दिवसांचा अजीर्णाचा उपद्रव असेल तर पिंपळ्या लिंबाच्या रसात भिजत घालून त्यात सैंदवाचे चूर्ण घालावे. दोन-चार दिवस भिजल्यावर सुकवून ठेवाव्यात व त्यातून दोन तीन नित्य जेवणावर किंवा जास्त त्रास होईल तेव्हा चावून खाव्यात म्हणजे तोंडात रुचि घेऊन पचनास मदत होते

पिंपळमुळाचे पाण्याने नारू जातो

पिंपळीचे गुणाप्रमाणेच पिंपळ मुळाचे गुण आहेत. पण त्यात काही विशेष गुण आएह्त. ते म्हणजे झोप येत नसेल तर पिंपळ मुळांचे चूर्ण गुळाबरोबर रात्री अथवा संध्याकाळी घ्यावे. म्हणजे झोप येते. तसेच ओकारीवर पिंपळमूळाचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात त्याच्या बरोबरीने सुंठीचे चूर्ण घालुन त्यातून साधरणतः एक मासा दरवेळी मधातून चाटावे. म्हणजे ओकारी कमी होते. खोकल्यावरही या दोंहोच्या मिश्रणात थोडे बेहड्याचे चूर्ण मिसळुन मधाबरोबर अथवा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास खोकला त्वरीत थांबतो. याशिवाय नारूवरही पिंपळमुळाचा अगदी सोपा उपाय सांगितला आहे. तो असा की, पिंपळगुळ थंड पाण्यात उगाळून प्याल्याने नारू बरा होतो. याप्रमाणे पिंपळगुळाचेहि अनेक औषधी उपयोग आहेत.

 

 

 

 

पिंपळमुळ

पिंपळीच्या झाडाच्या मूळाचा वापर पिंपळमूळ या नावाने होत. भूऱ्या खाती रंगाची ओबड धोबड मुळे काष्ठौषधींच्या दुकानात मिळतात. त्यांचा आकारमानावरून त्यांचा भाव ठरतो. पिंपळमूळ जुने झाल्यास त्याला पोरकिडा लागण्याची शक्यता असते. यामुळे ८-१५ दिवसांपेक्षा अधिक पिंपळमूळ आणून ठेवू नये.
इंपळमूळ हे अत्यंत तिखट अर्थात चव घेतल्यास जिभेच्या शेंड्याची, नाकाची चुणचुण करणारी, प्रसंगी घाम आणणारी असते. तिखट असूनही पिंपळमुळास एक सुगंध असतो. त्यामुळे पिंपळगुळाची उपयुक्तता मानसिक विकार, मतिमंदता, कफामुळे आलेले. हृदयविकार यांमध्ये दिसून येते. अतिशय तिखट असल्यामुळे पचनशक्ती वाढविणारे, साठून राहिलेली आव, पाचन करणारे, वाढलेल्या कफामुळे चोंदलेले नाक, जाड झालेल्या रक्तवाहिन्या, आतड्यांत बसलेला कफाचा लपेटा, डोकेदुखी, यकृताचा मार्ग बंद झाल्यामुळे झालेली कावीळ अशा सर्व विकारांत पिंपळगुळाचा उपयोग होतो.
मतिमंद मुलांमध्ये बऱ्याच वेळा सर्दी, लाळ गळणे, बोबडे बोलणे, अजिबात न बोलणे, सारखी लघवी होणे अशी लक्षणे असता पाव चमचा पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होत मागे पडलेले बोलणे सुरू होऊ शकते.

No comments:

Post a Comment

Visit Our Page