Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 24, 2010

कामजीवन आणि अपंगत्व

व्यंग असलेल्या व्यक्तिंनी लैंगिक संबंध ठेवणे हा विचार देखील समाजात चर्चीला जात नाही. पण व्यंग असलेल्यांना देखील लैंगिक क्रिडा ही तेवढीच महत्वाची वाटते.

साधारण माणसांपेक्षा व्यंग असलेल्या माणसांच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा कां? लैंगिक दृष्टीने उत्साही आणि आकर्षक असणे हे सामान्य माणसांच्या बाबतीत आणि व्यंग असलेल्यांच्या बाबतीत वेगळे कसे असू शकेल? या प्रश्नांची उत्तरे खरे तर अगदी साधी आहेत.

आकर्षक दिसणे हे व्यंग असलेल्यांच्या दृष्टीने महत्वाचे नसेलही पण अनुभव असे सांगतो.

व्यंग असलेली माणसे ही सामान्य माणसांपेक्षा वेगळी असतात इतकेच नव्हे तर त्यांच्यामधे वेगळ्या संस्कृतीची माणसे असतात आणि समाजाकडून त्यांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या लैंगिक इच्छेशी संलग्न असतात.

शारीरिक व्यंगाकडे समाजामध्ये पहिल्यापासून नकारार्थी दृष्टीकोनातून बघितले जाते. खरे तर त्या अवस्थेमध्ये देखील ती व्यक्ती माणूसच असते. मग ती कोणत्याही लिंगाची असो वा जातीची.

पण अशांसाठी व्यंग हे शब्द मनातून काढलेच जात नाहीत. म्हणूनच व्यंग असलेल्या व्यक्तींना जगाच्या दृष्टीने खरे तर वेडेच ठरविले जाते. अशा प्रतिक्रियांमुळे जे जग आपणास वेडे ठरविते त्याच्याविषयी अशा लोकांचा दृष्टीकोन मैत्रीपूर्ण नसतो तर तिरस्कारयुक्त असतो. व्यंग असलेल्या माणसाला आलेला राग आणि नैराश्य हे त्या वातावरणाचा परीणाम असतो. मला व्यंग आहे म्हणजे मी आता अर्धाच स्त्री / पुरूष राहिलो आहे. अशी प्रत्येक व्यंग असलेल्या व्यक्तीची भावना असते. निरनिराळी वृत्तपत्रे दूरदर्शन वगैरेकडून नेहमी अशाच प्रकारच प्रसार होतो.
व्यंग असलेल्या व्यक्ति आणि लैंगिक संबंध याचा कधीही संबंधाची इच्छाच गेलेली असते असे समजले जाते आणि त्यांना तशी इच्छा राहिलेली असते. अशांना "आजारी" समजले जाते. अनेक लेखक आणि कार्यकर्ते जरी व्यंग असलेल्या लोकांबद्दलची समाजाची भावना बदलण्याचा प्रयत्‍न करीत असल्यामुळे अनेकांची मते बदलली आहेत पण त्यासाठी अजून प्रयत्‍न आवश्यक आहेत.

कारण समाजातील अनेकांची मते एकांगी आहेत आणि ती त्यांच्या मनातून काढून टाकायची आहेत. जे जग सामान्यासाठी गुलाबी आहे ते व्यंग असलेल्यांसाठी नाही असा समज आहे. म्हणून त्यात बदल करायला हवा.

कारण समाजातील अनेकांची मते एकांगी आहेत आणि ती त्यांच्या मनातून काढून टाकायची आहेत. जे जग सामान्यासाठी गुलाबी आहे ते व्यंग असलेल्यांसाठी नाही असा समज आहे. म्हणून त्यात बदल करायला हवा.

व्यंग असलेल्या व्यक्ति कशा कार्य करतात?
लैंगिक संबंधाच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या अडचणी येत असतात. त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. कोणती गोष्ट करावयाची आहे आणि शारीरिक अवस्था.

व्यंगाचे तीन प्रकार असतात.
१. शारीरिक हालचाल न करता येणे.
२. दृष्टी दोष.
३. श्रवणदोष.

यामध्ये सुध्दा असलेल्या व्यंगामध्ये कमी जास्त प्रमाण असणे आणि शारीरिक अवस्था यामुळे या प्रतीमध्ये क्लिष्टपणा निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांची लैंगिक संबंधाबाबत असलेली शारीरिक क्षमता. असलेल्या शारीरिक व्यंगानुसार प्रत्येक व्यक्तिंची हालचाल करण्याची शारीरिक क्षमता बदलत असते. उदा. चाकाची खूर्ची वापरणार्‍या व्यक्तींना अर्धांगवायु झालेला असतो. खरे तर अशा अनेक व्यक्तींना अर्धांगवायु झालेलाही नसतो पण इतर काही कारणांमुळे त्यांना खूर्ची वापरावी लागते. अशा अनेक गोष्टींचा विचार व्यंग असलेल्या व्यक्तींच्या लैंगिक संबंधाबाबत करता येईल.

ज्यांना दृष्टीदोष आणि श्रवणदोष आहे अशा व्यक्तींना लैंगिक संबंधाची गरज आणि इच्छा व्यक्त करण्यास अडथळा येतोच पण दोन व्यक्तींची भेट घडविणे देखील दुरापास्त असते. डोळ्यांची भाषा ही लैंगिक संबंधामधील पहिली पायरी समजली जाते. त्यामुळे अंध आणि ज्यांना कमी दिसते. अशांसाठी ही क्रिया वापरणे अवघड असते.

अशा व्यक्तिंच्या बाबतीत ही सुरवात कशी होते? यामध्ये इतर गोष्टी उदा. शाब्दीक देवाण घेवाण, हाताला स्पर्श करणे इत्यादी गोष्टी करता येतात.

शाब्दीक पातळीवर एक पातळी गाठल्यानंतर लैंगिक संबंधाविषयी पुढाकार घेता येतो. त्याचप्रमाणे बहिर्‍यांना अथवा ज्यांना कमी ऐकू येते अशांना सुरवातीची पातळी गाठणे अवघड पडते. यामध्ये अनेक व्यक्ती खुणेची भाषा वापरून प्राथमिक संबंध प्रस्थापित करतात.

अनेक बहिर्‍या लोकांना ओठांची भाषा लगेच उमजते. फक्त या प्रकारात समोरच्या माणसांचे तोंड संबंध बोलणे होईपर्यंत त्या माणसाकडे हवे. अशा पध्दतीने संबंध प्रस्थापित करताना ज्यांना अडचणी येतात त्यांना लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यावर देखील परिणाम होतो खरेतर खूणेची भाषा सर्वांना समजेल असे नाही. ज्याला ऐकू येते अशा व्यक्तिला जर ऐकू न येणारे मित्र, नातेवाईक अथवा प्रेमिक वगैरे असेल तर त्यांना खूणेची भाषा समजते.

त्यामुळे त्यांना संबंध प्रस्थापित करता येतात. पण अशांच्या बाबतीत सुरवातीला एकमेकांना समजून घेणे अतिशय अवघड असते. नव्हे कधी कधी अशक्य असते. दोन बहिर्‍या अथवा कमी ऐकू येणार्‍या व्यक्तींच्या बाबतीत लैंगिक संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने पावले टाकता येणे सोपे पडते कारण ते खाजगीमध्ये विचारांची देवाणघेवाण करू शकतात.

पण बहिर्‍या माणसाला जर एखाद्या ऐकू येणार्‍या माणसाशी संबंध प्रस्थापित करायचे असतील आणि त्याला खूणेची भाषा समजत नसेल तर अशी खूणेची भाषा समजणारा मध्यस्थ हवा.

लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थ असणे ही कल्पनाच करवत नाही. कारण त्यामुळे खाजगीपण संपतो आणि लैंगिक विषयावर बोलणे अवघड होऊन जाते. त्यामुळे अशा अनेक व्यक्तींना खुणांची भाषा माहित नसते आणि त्यामुळे त्यांना लैंगिकसंबंध प्रस्थापित करता येत नाहीत

व्यंग असलेली माणसे कशी वागतात?
हालचालींचे व्यंग असलेल्या व्यक्तींमध्ये देखील अनेक ग्रुप असतात. ज्यांना स्नायु, हाडे अथवा सांध्याचे आजार असतात. असे लोक कुबड्या वापरतात तर ज्यांचे पाय अथवा हात कापलेले असतात अथवा जन्मापासूनच नसतात त्यांच्या बाबतीत कृत्रिम अवयव वापरले जातात. अवयव काढून टाकल्यामुळे अथवा स्नायुंचे अथवा हाडांचे आजार अथवा मज्जारज्जुंच्या आजारामुळे होणार्‍या अर्धांगवायुसारख्या प्रकारामध्ये चाकाच्या खुर्चीचा वापर केला जातो. खुर्चीचा वापर करणार्‍यांमुळे अनेक प्रकारचे शारेरिक अडचणी दिसून येतात.

ज्या व्यक्तिंना शारीरिक व्याधी मोठया प्रामाणावर नसते अशा व्यक्तिंना लैंगिक संबंध ठेवताना आरामदायक स्थितीमध्ये ती करता येते. शारीरिक व्यंग असलेल्या आपल्या जोडीदाराच्या परीस्थीतीवर दुसर्‍या जोडीदाराचे (त्याच्या शारीरिक व्यंगाचा विचार करावा लागतो) शारीरिक अडचणीचे प्रमाण अवलंबून असते. शारीरिक व्याधी नसलेली व्याक्ति जेव्हा शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध ठेवते. तेव्हा स्वत: पाहिजे तशी हालचाल करू शकते अथवा आपल्या जोडीदाराला हलवू शकते आणि त्यामुळे समाधानधारक स्थिती धारण करू शकते त्यामुळे अशा लैंगिक संबंधामध्ये चुंबन अथवा स्पर्श करणे, मुखमैथुन, योनीमार्गामध्ये संभोग करणे अथवा गुद्‌द्वारामध्ये संभोग अशा विविधा लैंगिक क्रिया आरामदायक स्थिती मध्ये करू शकतात.

संपूर्ण अथवा अर्धवट लुळे पडलेल्या व्यक्तिंच्या बाबतीत लैंगिक संबंधाचा प्रकार वेगळा असतो. हा प्रकार सर्वसाधारणपणे धक्का बसणे अथवा मज्जारज्जुला इजा झाल्यामुळे होतो. त्यामुळे लैंगिक क्रीडा करताना त्यांना खूपच जमवून घ्यावे लागते. आपल्या शरीराला समजून घेऊन आपल्या कामवासना कशा शमावायच्या हे शिकून घेतले पाहिजे. आणि हे स्वानुभवावरून आणि स्पर्शज्ञानाद्वारे आपल्याला कसे बरे वाटते तसे केले पाहिजे. काही व्यक्तिंना जेव्हा मज्जारज्जुला दुखापत झालेली असते तेव्हा त्यांना संभोगातील उच्च संवेदना अनुभवता येत नाहीत. योनीमार्ग आणि पुरूषांची जननेंद्रिये यांच्या तील संभोग आणि त्यायोगे मिळणारी तृप्ती हाच संभोगाचा सर्वमान्य प्रकार आपल्या समाजामध्ये आहे. पण मज्जारज्जूला दुखापत झालेल्या व्यक्तिंना अशाप्रकारे संभोग करणे आणि त्यापासून तृप्ती मिळवणे अशक्य असते.

जसजशी एखादी व्यक्ति आपल्या अवयवांशी जास्त जवळजवळ जाते. (आपल्या अवयवांची ओळख होते) तेव्हा त्या व्यक्तिला शरीराच्या निरनिराळ्या भागांना उत्तेजना दिल्यास त्यांना लैंगिक उत्तेजना मिळते अर्धांगवायु झालेल्या अनेक व्यक्तींना मान, कान, दंड, स्तनाग्रे अथवा काही नाजुक जागी स्पर्श केल्यास लैंगिक उत्तेजना मिळते पण त्यातून लैंगिक तृप्ती मिळत नाही अशा काही व्यक्तिंच्या मते त्यांच्या लैंगिक संवेदना त्याच्या मेंदूशी निगडीत झालेल्या असतात आणि त्यांना शारीरिक तृप्ती ऐवढी मानसिक तृप्ती मिळते.

श्रवण दोष दृष्टीदोष असणार्‍यांना प्रथम व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करणे जसे अडचणीचे वाटते तसे शारीरिक व्यंगाच्या व्यक्तिंना वाटत नाही. व्यवस्थितपणे लैंगिकक्रिडा करणे हे खूप अडचणीचे वाटते. लैंगिक संबंध ठेवण्याआधी मानसिक संबंध प्रस्थापित करणे, आपण करणार असलेल्या क्रिडेविषयी बोलणे हे व्यंग असलेल्यांना खूप अवघड जाते. त्यामुळे त्यांना आपण काय बोलायचे हे आधी ठरवावे लागते. त्यामुळे खरी लैंगिक क्रिडा करण्याआधी उत्कंठा वाटून रहात नाही.

शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंधाविषयी असे बोलणे कधी कधी अपमानास्पद वाटते. पण एकदा अशा जोडप्यांना एकमेकांबद्दल विश्वास वाटू लागला आणि संवाद वाढविता आला तर अशा प्रकारचे बोलणे अपमानास्पद वाटत नाही उलट उघडपणे अशा विषयानंतर ते चर्चा करू शकतात

http://marathi.aarogya.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page