Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, November 27, 2010

एरंड

आयुर्वेद एरंड (इंग्लिश: Castor; लॅटिन: Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.

अनुक्रमणिका


उत्पत्तीस्थान

भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडची लागवड प्रामुख्याने केली जाते.

वर्णन

एरंड झाड साधारण १२ मी. पर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो. पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात. फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात. बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढर्‍या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.

 प्रकार

रंगावरून प्रकार

  1. पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधात वापरतात. ब्) मोठा - याची पाने औषधात वापरतात.
  2. तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधात वापरतात.

आयुष्यानुसार प्रकार

  1. वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड.
  2. दीर्घवर्षायू - बरीच वर्षे जगणारे, मोठ्या आकाराचे बी व फळे असणारे झाड.

चवीनुसार प्रकार

  1. गोड.
  2. कडू.

उपयोग

एरंडचा प्रामुख्याने चेता-मज्जा-नाडी संस्था (Nervous system), श्वसन संस्था (Respiratory system), पचन संस्था (Digestive system), रक्त वहन संस्था (Circulatory system), मूत्र वहन संस्था (Urinary system), प्रजनन संस्था (Reproductive system) आणि त्वचा (Skin) यासाठी उपयोग होतो.
वातविकार काविल  , दीर्घकालीन बद्धकोष्ठता,मुलव्याध, अजीर्ण ,    आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तिरोग , सर्प विष, अन्य विष, सूज येणे, कृमि होणे, झोप न येणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केल्या जातो.
एरंडची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

No comments:

Post a Comment

Visit Our Page