Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, May 7, 2016

मुळव्याध


# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
        🍀 मुळव्याध ☘
मुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे, अन्नावर वासना नसणे, घशाशी आंबट येणे, पाठ उरप्रदेशी दुखणे, आळस, शरीराचा रंगात बदल, इंद्रिय निशक्त होणे, राग फार येणे, इतर आजार होतील अशी भिती वाटणे अशी लक्षणे मुळव्याध होण्यापुर्वी कमी अधिक प्रमाणात दिसतात. यातील जेवढी जास्त लक्षणे दिसतात. तेवढा आजार जास्त बलवान असतो. मुळव्याध होण्याच्या पुर्विच अटकाव घालता येतो. पण बहुतेक वेळा रक्त पडायचे स्वतः थांबत नसताना उपचाराचा विचार केला जातो. तोपर्यंत भुक कमी झाल्याने आजार लगेच पुर्ण दुरूस्त होत नाही.उपचाराने रक्त पडायचे थांबते पण आजाराचा पुनरूद्भव टाळण्यासाठी भुक वाढविणे आवश्यक असते. भुक वाढली असता पुन्हा त्रास सहज होत नाही. भुक कमी असेल तर पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो. आयुर्वेद औषधी उपचारही सल्ल्याशिवाय घेउ नयेत. कारण काही औषधी गरम गुणधर्माच्या असल्याने त्रास वाढण्याचा धोका असतो. चांगल्या ताकाचा उपयोग आहारात थोडे शेंदेलोण घालुन करावा. ताकाने भुक वाढावयास मदत होते..
मुळव्याधीत दुषीत रक्त अडवण्याचे उपद्रव
रक्तपित्तं ज्वरं तृष्णामग्निसादमरोचकम् |
कामला श्वयथुं शुलं गुदवक्षंणसंश्रयम् ||
कण्ड्वरूःकोठपिडकाः कुष्ठं पाण्ड्वाह्रयं गदम् |
वातमुत्रपुरीषाणां विबन्धं शिरसो रूजम्||
स्तैमित्यं गुरूगात्रत्वं तथा$न्यान् रक्तजान् गदान् |
तस्मात् स्रुते दुष्टरक्ते रक्तसंग्रहणं हितम् ||
मुळव्याध या आजारातुन शरीर स्वतःच दुषीत झालेले रक्त शरीराबाहेर टाकते. मुळव्याधीचा विशेषतः रक्तस्रावाचा त्रास मुख्यतः रक्त बिघाडाच्या काळात जेंव्हा पावसाळा संपुन ऊन वाढत त्यावेळीे ( शरद रूतुत oct heat वेळी ). पुन्हा जेंव्हा हिवाळा संपुन उन्हाळा लागावयाचा असतो ( feb march मध्ये ) याकाळात होत असतो. कारण या काळात रक्तबिघाड अधिक असल्याने शरीर रक्ताला स्वतःच बाहेर काढते. एरविही रक्त बिघडवणारी कारणे घडत असतिल तर मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो जसे मद्यपान, मसालायुक्त मांसाहार, हिरवी मिरची ठेचा, चनाडाळीचे तळीव पदार्थ, मिरची भज्जे सारखे पदार्थ खाल्यानंतर दुसरया दिवशी लगेच काही लोकांत त्रास होतो. हा तात्काळ उत्पन्न होणारा त्रास असतो.
          अशावेळी जर दुषित रक्ताला बाहेर पडु न देता अडविण्याचे प्रयत्न केले तर दुषीत रक्ताद्वारे पुढील त्रास सुरू होऊ शकतात.
        रक्तपित्तं ( शरीरातील इतर विवरातुन रक्तस्राव ),ताप, तहान अधिक लागणे, भुक कमी होणे, तोडांला चव नसणे, कावीळ, सुज, वेदना, खाज, त्वचेवर चकते पिटिका निर्मिती, पांडु सहित अनेक आजार होऊ शकतात.
    तसेच मल मुत्र अधोवायुचा अवरोध होणे कष्टाने मल मुत्र होणे, डोकेदुखी, ओलसरपणाची जाणीव होणे, सर्वांग जड पडणे तसेच अन्य रक्तदुष्टी जन्य आजार उत्पन्न होऊ शकतात.
         त्यामुळे दुषीत रक्त शरीराबाहेर पडल्यानंतर रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न करणे शरीरासाठी हितकारक असते. अन्यथा रक्त शरीराबाहेर पडावयाचे थांबते पण दुषीत रक्त आडवल्यामुळे उत्पन्न अन्य आजारांचा सामना करावा लागु शकतो. कुठल्या प्रकारे त्रास कमी करायचाय हे स्वतः च ठरवावे..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

No comments:

Post a Comment

Visit Our Page