Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, May 15, 2016

सौंदर्याचे पैलू


सौंदर्याचे पैलू
सौंदर्याचे सर्व पैलू स्वतःत समाविष्ट केल्यानंतरच सुंदर व्यक्तीचे सौंदर्य परिपुर्ण होऊ शकते.
शारिरीक सौंदर्याबरोबरच मानसिक सौंदर्याचेही फार महत्व आहे. सुंदरतेचा अर्थ केवळ गोरीपान त्वचा, सुंदर नाक-डोळे, काळे घनदाट केसच नाही तर संपुर्ण शरीराची सूंदरता, सुडोलता आवशयक ऊंची , वजन, हावभाव , मधुरवाणी असणेही आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उठणे, बसणे, चालणे, बोलणे, कपडे घालण्याची पध्दत, व्यव्हारकुशलता, आपल्या कार्यातील दक्षता, अधिकार, कर्तव्याचे  भान, वडीलधारया व्यक्तींशी सन्मानजनक व्यव्हार, लहानांशी प्रेमपुर्वक व्यव्हार, निर्बल दुःखी लोकांबाबत दया, सामान्य न्यान या सर्व पैलूंचा विचार सौदर्याअंतर्गत केला जातो.
          मात्र या सर्व महत्वपुर्ण पैलुपुर्वी शरीर निरोगी राहणे हेही तेवढेच आवश्यक आहे. सौदर्यसाधनेत सर्वात प्रथम लक्षात घेण्याजोगा मुद्दाच आहे की आपले आरोग्य शारिरीक-मानसीक दृष्ट्या उत्तम राहत नाही, तोपर्यंत आपले सौदर्य आतून खुलणे शक्य नाही आणि बाह्यःत जोपासल्या जाणारया सौंदर्याची दीर्घकाळापर्यंत टिकण्याची मुळीच शाश्स्वती नाही. त्याकरीता आतूनच आपले सौदर्य कशाप्रकारे खुलविता येईल याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारची सुंदरता प्राप्त करण्यासाठी आपल्या आहारविहाराकडे योग्य लक्ष द्यायला पाहिजे.
               नियमितपणे योगासने व प्राणायामाचा अभ्यास करावा. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आहार सेवन इत्यादी नियमाचे नियमित पालन करावे. मानसिकरित्या स्वतःला प्रसन्न ठेवावे. जास्त चिंता करू नये. नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा.हसत राहावे. आशावादी व्हावे, तणावास आपल्या जीवनात स्थान देऊ नये.
            जीवनात चांगल्या प्रकारे जगावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आपण जसा व्यव्हार आपल्याशी ठेवतो तसाच व्यव्हार दुसरयांशी ठेवावा. दुसरयांचा आदर करावा. पण स्वतःचा सन्मानही कायम ठेवावा.              आत्मविश्वासासारख्या अमोघ शस्त्रास जीवनात महत्वपुर्ण स्थान द्यावे. योगाभ्यासाद्वारे शरीर निरोगी सुंदर व चेहरा आकर्षक बनविण्याचा प्रयन्त करावा. याप्रकारे सौंदर्याचे सर्व पैलु स्वतःच समाविष्ट केल्यानंतरच व्यक्तींचे सौदर्य परिपुर्ण होऊ शकते.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
OBESITY AND DIABETES REDUCTION CENTER
लातूर
व्हाँटस एप नंबर ०९३२६५११६८१

No comments:

Post a Comment

Visit Our Page