Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, May 17, 2016

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?.....हा घ्या उपाय!!
तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर 'स्पीच थेरपी'चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक 'अखेरची आशा' म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात 'वाक्शुद्धिकर' म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास अशा रुग्णांना उत्तम लाभ होतो हा आजवरचा प्रत्यक्षानुभव आहे.
मात्र या औषधी उपचारासहच मी आग्रही असतो ते मंत्र-उपचारासाठी. दचकू नका; मंत्रोपचार हा शब्द उच्चारताच लगेच काही कोणी बाबा-बुवा ठरत नाही. औषधी आणि मंत्र असे दुहेरी उपचार अनेक व्याधींत लाभदायक ठरतात. अर्थात; केवळ 'मंत्रानेच' व्याधी बरा होतो असे मत मांडणे योग्यही नाही आणि शास्त्रसंमतदेखील नाही. पण; मंत्रांचा उपयोग चिकित्सेला जोड-उपचार म्हणून केल्यास 'अधिकस्य अधिकं फलम्|' ठरते.
वाणीशुद्धि करणारा हा मंत्र म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आद्य शंकराचार्य रचित 'नर्मदाष्टक स्तोत्र' आहे. वाचकांसाठी हे स्तोत्र मुद्दाम देत आहे. त्यातील शब्दरचना नीट पहा. जिभेची काय बिशाद आहे न वळण्याची?!
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥
त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं
कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।
सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥
महागभीरनीरपूरपापधूतभूतलं
ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ।
जगल्लये महाभये मृकण्डसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥
गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा
मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा ।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥
अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ।
वसिष्ठसिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥
सनत्कुमारनाचिकेतकश्यपादिषट्पदैः_
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः ।
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥
अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ।
विरञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ।
दुरन्तपापतापहारिसर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।
सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥
जेव्हा कुठल्याही 'स्पीच थेरपी'चा उगम झाला नव्हता तेव्हा आयुर्वेदीय औषधींसह याच 'स्पीच थेरपी'चा वापर कित्येक वैद्य यशस्वीपणे करत होते. आजही करतात. अर्थात; हे सारे श्रेय श्रीमद् भगवत्पाद आद्य शंकराचार्य यांचेच. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तकारण. आजच आचार्यांची जयंती. आपल्याला वाचा दोष असो वा नसो; या स्तोत्राचे दैनंदिन पठण अवश्य करा.
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदज्ञ- लेखक- व्याख्याते)
|| श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद || डोंबिवली
०२५१-२८६३८३५
 
 

No comments:

Post a Comment

Visit Our Page