Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, May 11, 2016

नारळपाणी

नारळपाणी 🌴
नारिकेरोदकं स्निग्धं स्वादु वृष्यं हिमं लघु |
तृष्णापित्तानिलहरं दीपनं बस्तिशोधनम् || वा. सु.


नारळाचे पाणी स्निग्ध, गोड, शुक्रवर्धक करणारे, थंड, हलके, तहान शमविणारे, भुक वाढविणारे, मुत्राशयाची शुध्दी करणारे आहे.
भुक वाढविणारे असल्याने जेवणापुर्वी वा जेवनाच्या सुरूवातिला नारळपाणी घेता येईल.

सोबतच उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी व शरीरातील स्निग्धता व ओलावा टिकवुन ठेवण्यासाठी, तहान भागविण्यासाठी नारळपाणी उपयोगात आणता येईल.

गर्भजल वाढविण्यासाठी नारळपाण्याचा उपयोग केला जातो. जेंव्हा शरीरातील जलीय घटक कमी झालेले असतिल त्यावेळीच समानाने समानाची वृध्दी या न्यायाने नारळपाण्याचा उपयोग होईल.

इतर कारणांनी गर्भोदक कमी असेल तर नारळपाण्याचा उपयोग होणार नाही. तसेच जेवणानतंर सेवन केलेले नारळपाणी कफवर्धन करून आमनिर्मितीच करेल व जन्म घेणारया बालकात निमोनिया सर्दी पडसे बालदमा सारखे कफाचे आजार निर्माण होतील. गर्भिणी स्रियांनी नारळपाणी घेताना त्याचे प्रमाण, घेण्याचा काळ आदींचा योग्य आयुर्वेदीय सल्ला जवळच्या वैद्याकडुन जरूर घ्यावा नाहीतर येणारया नविन पिढीला बरेच वर्ष त्रास सहन करावा लागु शकतो.

प्रत्येक आहारीय पदार्थांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात, त्यानुसार प्रत्येक पदार्थ एखाद्याला फार चांगला वा चांगला वा ठीक वा वाईट वा फारच वाईट यापैकी कुठल्याही वर्गीकरणात मोडु शकतो.

सरसकट कुठलाही पदार्थ सगळ्यांनाच चांगला वा वाईट असेल असे नाही एखाद्याला चांगला असेल तर दुसरयासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळेच स्वतः च्या प्रकृती सारतेनुसार खाद्यपदार्थांचे सेवन करावे त्यासाठी योग्य आयुर्वेदीय सल्ला कधीही लाभदायक च..
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

Tuesday, May 10, 2016

दुधाचे मित्र आणि शत्रु

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
      ✔  दुधाचे मित्र व शत्रु ✖
             🌺 दुधाचे मित्र 🌺
सहकारफलं चैव गोस्तनी माक्षीकं घृतम् |
नवनीतं श्रृंगबेरं पिप्पलीं मरिचानि च ||
सिता पृथुकसिन्धुत्थं पटोलं नागराभयाः ||
क्षीरेण सह शस्यन्ते वर्गेषु मधुरादिषु ||
आंबा, मनुका, मध, तुप, लोणी, मिरे, पिपल्ली, साखर, सैंधव मीठयुक्त चिवडा, पडवळ, सुंठ आदी पदार्थ दुधासह खाण्यासाठी हितकारक असतात.
खालील पदार्थ दुधासह खाल्ले तरी चालतात.
१. आंबट पदार्थांत आवळा
२. गोड पदार्थांत साखर
३.भाज्यामध्ये पडवळ
४. तिखट पदार्थांत आर्द्रक
५.तुरट पदार्थांत यव
६.मीठामध्ये शेंदेलोण
           ✖ दुधाचे शत्रु ✖
मत्स्यमांसगुडमुद्गमूलकैः कुष्ठमावहति सेवितं पयः |
शाकजाम्बवसुरादिसेवितं मारयत्यबुधमाशु सर्पवत् ||
दुधासह मासे, मांस, गुळ, मुगदाळ, मुळा खाल्ल्याच्या परिणामी त्वचेचे आजार उत्पन्न होतात.
भाज्या, जामुन, सुरा मद्यजन्य पदार्थ दुधासह घेतले असता तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात क्वचित मरणही येऊ शकते.
🍋🍊🍐 फळांसह दुध 🍼🍼🍼
क्षीरे विरूध्दान्यैकन्ध्यं सह वै भुज्यते यदि |
बाधीर्यमान्ध्यं वैवर्ण्य मुकत्वं चाथ मारणम् ||
दुधासह फळे खाणे वा फळांचा juice  दुधयुक्त खाणे हे बधिरता, आंधळेपणा (डोळ्याचा नंबर तीव्र गतीने वाढविणारे), त्वचेचे वैवर्ण्य त्वचाविकार कारक, मुकेपणा, काही वेळा मृत्युचे कारणही ठरू शकते..
विरूध्द अन्न कधीही त्रासदायकच फक्त तात्काळ त्रास न देता ते काळाच्या संस्काराने त्रास देते यात काहीच शंका नाही..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group

Saturday, May 7, 2016

मुळव्याध


# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
        🍀 मुळव्याध ☘
मुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे, अन्नावर वासना नसणे, घशाशी आंबट येणे, पाठ उरप्रदेशी दुखणे, आळस, शरीराचा रंगात बदल, इंद्रिय निशक्त होणे, राग फार येणे, इतर आजार होतील अशी भिती वाटणे अशी लक्षणे मुळव्याध होण्यापुर्वी कमी अधिक प्रमाणात दिसतात. यातील जेवढी जास्त लक्षणे दिसतात. तेवढा आजार जास्त बलवान असतो. मुळव्याध होण्याच्या पुर्विच अटकाव घालता येतो. पण बहुतेक वेळा रक्त पडायचे स्वतः थांबत नसताना उपचाराचा विचार केला जातो. तोपर्यंत भुक कमी झाल्याने आजार लगेच पुर्ण दुरूस्त होत नाही.उपचाराने रक्त पडायचे थांबते पण आजाराचा पुनरूद्भव टाळण्यासाठी भुक वाढविणे आवश्यक असते. भुक वाढली असता पुन्हा त्रास सहज होत नाही. भुक कमी असेल तर पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो. आयुर्वेद औषधी उपचारही सल्ल्याशिवाय घेउ नयेत. कारण काही औषधी गरम गुणधर्माच्या असल्याने त्रास वाढण्याचा धोका असतो. चांगल्या ताकाचा उपयोग आहारात थोडे शेंदेलोण घालुन करावा. ताकाने भुक वाढावयास मदत होते..
मुळव्याधीत दुषीत रक्त अडवण्याचे उपद्रव
रक्तपित्तं ज्वरं तृष्णामग्निसादमरोचकम् |
कामला श्वयथुं शुलं गुदवक्षंणसंश्रयम् ||
कण्ड्वरूःकोठपिडकाः कुष्ठं पाण्ड्वाह्रयं गदम् |
वातमुत्रपुरीषाणां विबन्धं शिरसो रूजम्||
स्तैमित्यं गुरूगात्रत्वं तथा$न्यान् रक्तजान् गदान् |
तस्मात् स्रुते दुष्टरक्ते रक्तसंग्रहणं हितम् ||
मुळव्याध या आजारातुन शरीर स्वतःच दुषीत झालेले रक्त शरीराबाहेर टाकते. मुळव्याधीचा विशेषतः रक्तस्रावाचा त्रास मुख्यतः रक्त बिघाडाच्या काळात जेंव्हा पावसाळा संपुन ऊन वाढत त्यावेळीे ( शरद रूतुत oct heat वेळी ). पुन्हा जेंव्हा हिवाळा संपुन उन्हाळा लागावयाचा असतो ( feb march मध्ये ) याकाळात होत असतो. कारण या काळात रक्तबिघाड अधिक असल्याने शरीर रक्ताला स्वतःच बाहेर काढते. एरविही रक्त बिघडवणारी कारणे घडत असतिल तर मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो जसे मद्यपान, मसालायुक्त मांसाहार, हिरवी मिरची ठेचा, चनाडाळीचे तळीव पदार्थ, मिरची भज्जे सारखे पदार्थ खाल्यानंतर दुसरया दिवशी लगेच काही लोकांत त्रास होतो. हा तात्काळ उत्पन्न होणारा त्रास असतो.
          अशावेळी जर दुषित रक्ताला बाहेर पडु न देता अडविण्याचे प्रयत्न केले तर दुषीत रक्ताद्वारे पुढील त्रास सुरू होऊ शकतात.
        रक्तपित्तं ( शरीरातील इतर विवरातुन रक्तस्राव ),ताप, तहान अधिक लागणे, भुक कमी होणे, तोडांला चव नसणे, कावीळ, सुज, वेदना, खाज, त्वचेवर चकते पिटिका निर्मिती, पांडु सहित अनेक आजार होऊ शकतात.
    तसेच मल मुत्र अधोवायुचा अवरोध होणे कष्टाने मल मुत्र होणे, डोकेदुखी, ओलसरपणाची जाणीव होणे, सर्वांग जड पडणे तसेच अन्य रक्तदुष्टी जन्य आजार उत्पन्न होऊ शकतात.
         त्यामुळे दुषीत रक्त शरीराबाहेर पडल्यानंतर रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न करणे शरीरासाठी हितकारक असते. अन्यथा रक्त शरीराबाहेर पडावयाचे थांबते पण दुषीत रक्त आडवल्यामुळे उत्पन्न अन्य आजारांचा सामना करावा लागु शकतो. कुठल्या प्रकारे त्रास कमी करायचाय हे स्वतः च ठरवावे..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

वजन


# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
           ☘ वजन 🍀
वजन हा बहुतेक लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बरेच जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतात कोमट पाण्यात मध टाकुन घेणे, सकाळी फिरायला जाणे, जीम करणे etc.
                    कृश बारीक अंगयष्टीचे लोक वजन वाढविण्यासाठी इच्छुक असतात त्यासाठी कृत्रीम उपाय अल्प प्रमाणात मद्य पिणे, केळी आदी कफवर्धन करणारे पदार्थ खाणे, विविध प्रकारच्या भुकट्या खाऊन जीम करणे आदी उपाय करतात.
                   सतत एकमेकांशी तुलना केली जाते माझे वजन तुझ्यापेक्षा एवढे कमी आहे वा एवढे जास्त आहे. यांना हे कसे समजत नाही वा यांच्या डोक्यात प्रकाश कसा पडत नाही की एकाच आईवडीलांच्या पोटी जन्म घेतलेल्या व एकत्रच सारखा आहार खाऊन वाढलेल्या दोन भांवडांचे वजनही ९५-९६ टक्के वेळा सारखे नसते...
             याला कारण ही मुळप्रकृती हे असते. वातप्रकृति लोकांचे वजन आणि कफप्रकृती लोकांचे वजन यांत जमीन असमानचा फरक पडतो जरी दोघे सख्खे भाऊ असतिल तरी.
          स्वतः चा अंहकार मोठेपणा वा इतरांना कमीपणा दाखविण्यासाठीच अशी तुलना केली जाते.. हे पचावयास अत्यंत कडु वा तिखट सत्य आहे.. यात शंका नसावी.
कार्श्यमेव वरं स्थौल्यान्न हि स्थौल्यस्य भेषजम् |
बृंहणं लंघन नालमतिमेदो$ग्निवातजित् |
आयुर्वेदीय शास्रानुसार अतिजाडापेक्षा अतिकार्श्य कधाही बरेच जाड व्यक्तींमध्ये भुक, वातदोष, चरबी यांचा एकत्रित प्रतिकार करता येत नाही. कारण जाड व्यक्तींमध्ये भुक व वायु कमी केले तर चरबी वाढते. लंघनाने चरबी कमी केली तर पुन्हा भुक व वात वाढतो. यामुळेच जाडपणा चिकित्सेसाठी कठीण होतो.
   कृश बारीक लोकांत गोड रसाचे व स्निग्ध स्नेह (तैलतुप) युक्त पदार्थांचे अत्याधिक सेवन केले तर कार्श्य दुर होते.
गुरू चापतर्पणं स्थुले विपरितं हितं कृशे | वा.सु.
स्थुल व्यक्तींमध्ये जे पदार्थ पचावयास जड पण शरीराला बारीक करणारे आहेत ते हितकारक ठरतात.
                याउलट कृश बारीक लोकांत जे पदार्थ पचावयास हलके व पौष्टीक आहेत ते  नेहमी खाण्यास हितकारक ठरतात.
        सातु जांड लोकांत तर गहु कृश बारीक लोकांत नेहमी खाण्यासाठी हितकारक असतात.
       सातु तैल ताक यासारख्या अवरोध दुर करणारया पदार्थांच्या संयोगाने संस्काराने घेतला असता उपयोगी ठरतो.
    तर गहु तुप दुध यासारख्या पौष्टीक पदार्थांच्या संयोगाने संस्काराने घेतला असता कृश बारीक लोकांत खाण्यासाठी हितकारक ठरतो.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no on your group )

Sunday, April 24, 2016

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 5
चिंतन मनन
आज नष्ट पाडवा !
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळेच देतात. मी नष्ट पाडव्याला शुभेच्छा देतो.
जुने बुरसटलेले विचार आणि नवीन विचारातील बुरशी लगेचच्या लगेच नष्ट होवो, आणि चांगल्या आरोग्याचे योग्य विचार स्थिर होवोत, ही ईश्वराकडे प्रार्थना !
या निमित्ताने थोडंस चिंतन मनन करूया.
हम कितने पानी मे डुबे है, इसका अंदाजा आ जाएगा !
गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मी काय मिळवले, काय गमावले, आणि पुढे काय करायचे आहे हे स्वतःशीच ताडून बघणे म्हणजे चिंतन !
त्यासाठी काय करायला हवे, याचे मनामधे आडाखे बांधणे म्हणजे मनन !
या दोन्ही प्रक्रिया कोणी करत असतील असे वाटत नाही. त्यासाठी सतत वर्तमानात रहायला शिकले पाहिजे.
आम्ही दररोज आहोत, त्या क्षणात न रहाता, भूतकाळात किंवा भविष्य काळात स्वतःला नेतो आणि वर्तमानाचा आनंद हरवून बसतो.
आता हेच बघा ना .....
दात घासत असताना आपले बोट दातावर फिरत असते, पण मन चहाच्या वासात रमलेले असते,
दात घासतानाच्या येणार्‍या कुर्रकुर्र आवाजाची लय आम्ही कधी पकडलीच नाही.
चहा पिताना "व्वा" असं म्हणायलाच विसरतो, कारण तोपर्यंत वाॅटसअपचे मेसेज येणे सुरू झालेले असते.
पोरांच्या अभ्यासाच्या चौकशीचं नाटक करताना दाढी "उरकून" घेतलेली असते. दाढी करताना देखील आपण स्वतःचे स्वतः नसतो.
तोपर्यंत नाश्त्याचा मेन्यू डोक्यात पिंगा घालायला लागलेला असतो. नाश्ता करायला बसलो तरी मन त्यात कुठे रमतंय.... ते पळालेलं असतं आज ड्रेस कोणता घालायचा हे विचार करायला....
ड्रेस घालत असताना त्या कपड्यांना येत असलेला कडक इस्त्रीचा वास आता कधी घेतलाय हे आठवतंच नसेल !
अगदी आंघोळ करताना सुध्दा, किती दिवसापूर्वी बाथरूम मधे गाणं गुणगुणले होते, हे जरा मनाला विचारून पहा.
आंघोळ करताना पाण्याच्या स्पर्शाचा, उटण्याच्या रंगाचा, त्याच्या गंधाचा, बालदीमधे तांब्या बुडवल्यानंतर येणार्‍या बुडबुड आवाजाचा आनंद गेल्या वर्षी किती वेळा घेतलाय ?
सतत पुढे पुढे जाणार्‍या या मनाला जरा आवर घालून वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.
हे खरं सुख आहे.
यातच खरा आनंद आहे.
बायकोला गजरा आणून किती दिवस होऊन गेलेत हो,
काही आठवतेय का ?
पण तिच्या मनात मात्र तिने मागील गजर्‍याच्या स्मृती अजूनही ताज्या ठेवलेल्या आहेत. जरी तिचं मन भूतकाळात गेलेलं असलं तरी....
वर्तमानात शाबूत असलेला...
वैद्य सुविनय दामले
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

आजची आरोग्यटीप

   आजची आरोग्यटीप
आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 6
नियमितपणे व्यायाम
आज व्यायामाचे महत्व सगळेच जण सांगतात. करीत मात्र कोणीच नाहीत.( अगदी डाॅक्टर सुध्दा ! सन्माननीय अपवाद सोडून ...)
नवीन वर्ष सुरू झाले की दरवर्षी ठरवतो, आता व्यायाम नियमाने दररोज करायचा !
पण हाय रे दैवा,
जसं जसे दिवस पुढे जातात, तसंतसे या निश्चयाचा जोर ओसरू लागतो, ते प्रत्येकजण "सवडच होत नाही " या हमखास वाक्यावर येऊन थांबतो आणि व्यायाम पुनः वर्षभर बंद पडतो.
मधे मधे कोणीतरी आठवणीनं, प्रेमानं विचारलं तर कोणता तरी काढीव मुहुर्त शोधला जातो. ....
पण
तेरड्याचा रंग तीन दिवस !
पुनः येरे माझ्या मागल्या !
प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचा व्यायामपण वेगवेगळा असणं स्वाभाविक आहे.
वजन कमी करण्यासाठीच फक्त व्यायाम करायचा असतो ही डोक्यातली वेडगळ कल्पना आधी काढून टाका.
सकाळी आंघोळीच्या अगोदर किमान पंधरावीस मिनीटे स्वतःसाठीच राखीव ठेवावीत.
यात आपणाला जमेल तो, झेपेल तो व्यायाम करावा. काहीजण सूक्ष्म व्यायाम करतील तर काहीजण एरोबिक्स !
काहीजण दंडजोर बैठका मारतील तर काहीजण सूर्यनमस्कार घालतील,
जो जे वांछील तो ते लाहो,
फक्त काही वैश्विक नियम सांगतो.....
मोकळ्या हवेत व्यायाम करावा.
मिशीच्या ठिकाणी, काखेत घाम यायला सुरवात झाली की थांबावे.
अति हट्टाने,
कोणीतरी सांगितले म्हणून,
दुसरा एवढे डिप्स मारतो म्हणून,
वाॅटसपचे मेसेज वाचून,
व्यायाम करण्याने व्यायाम अंगलट येण्याची शक्यता असते.
एसी जिममधे केलेल्या व्यायामामधे घाम कधी येतोय ते कळणारच नाही. धोक्याचा इशारा कळलाच नाही तर दगाफटका निश्चित !
समझनेवालो को इशारा काफी होता है !
वैद्य सुविनय दामले
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग - 7
नियमितपणे व्यायाम केला, तर काय होऊ शकते, हे आज सर्वांनी वाचले असेलच.
हो.
अनंत नीता मुकेश धीरूभाई अंबानींची गोष्ट म्हणतोय मी !
18 महिन्यात 108 किलो वजन केवळ नैसर्गिक उपायांनी कमी करणे,
ही साधी गोष्ट नक्कीच नाही.
त्यांनी काही व्यायाम केले.
महत्वाचे म्हणजे जीभेवर संयम ठेवून "नियमितपणे" व्यायाम केला. व्यायामात "सातत्य" राखले, म्हणून परत माणसात आले.
असो.
आंघोळीपूर्वी केलेल्या व्यायामाने भरपूर घाम येतो. स्रोतसे आतून मोकळी होतात. चरबीसुध्दा विरघळू लागते. घामात रूपांतरीत होते आणि निघून जाते. ( हे समजून घेण्यासाठी हं )
सांगायचंय काय.....
भरपूर घाम आला पाहिजे.
तर लवकर बारीक होता येते.
आणि
आणखीन एक महत्वाचं...
मी जाड आहे, मी बारीक आहे, माझं वजन कमी करायचं आहे,
हे कोणी ठरवायचं ?
पुस्तक वाचून किंवा छापील नियम ऐकून ठरवायचं ?
उदा. जगात अनेक देशातील सोळा ते वीस वर्षाच्या मुलांना किंवा मुलींना एकत्र उभे केले तर ते सगळे एकाच आकाराचे दिसतील ?
आताच्या आयपीएल क्रिकेट टीम मधील मुलांकडे बघा ! समान वयाच्या दोघांपैकी एखादा राक्षसच दिसतो आणि एखादा कोवळ्या काकडीसारखा !
हा फरक राहाणारच ! प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत,
काहीजण म्हशीरेडे खातात, काही कुत्रेपण खातात, तर काही तरकारी, पालेभाज्या शुध्द शाकाहारी !
आता यांची शरीरयष्टी त्या यष्टींच्या समोर कशी दिसते पहा ना !
पण ताकद ?
सर्वांची सारखी.
हरबार "जाडी" मायना नही रखती।
त्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्वाच्या आड जर तुमचे वजन येत नसेल तर क्या बिगडता है ?
जाडी असूनही चपळता, लवचिकता, कर्मसामर्थ्य, आरोग्य हे असलं की झालं ...जे योग्य व्यायामानी मिळते...म्हणुन व्यायाम महत्वाचा आणि त्यासाठी वैद्यांचा सल्लादेखील !
निर्मितीताई सावंतना त्यांचे व्यक्तीमत्व कधीच बाधक ठरले नाही, आरोग्याला नियमांच्या चौकटीत बंदिस्त करू नका.
आता नीताताईंच्या अनंताची गोष्टच वेगळी !
वैद्य सुविनय दामले.
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

Tuesday, April 5, 2016

रक्तदाब, मधुमेह गंभीर आजार 🍀

रक्तदाब, मधुमेह गंभीर आजार 🍀
रक्तदाब वाढलेले खुप सारे लोक आजुबाजुला पाहायला मिळतात. बहुतेक लोकांना वयाची ४० शी व पन्नाशी पार केली की रक्तदाब वाढलेला आढळतो. बरयाचस्या लोकांत रक्तदाब हा त्याही पेक्षा कमी वयात झालेला आढळतो वयवर्ष २० पासुन काही जणांत रक्तदाब वाढलेला आढळतो.
रक्तदाबाचा त्रास हा शरीरावर आजपर्यंत आहार निद्रा मैथुन या त्रयोपस्तंभांचे पालन न करता केल्या गेलेल्या अत्याचाराचे प्रतिक म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही.
रक्तदाबाचा त्रास निर्माण होईपर्यंत यथेच्छ प्रमाणात इंद्रीयसेवन करून शरीराचा नाश केला जातो. आहार निद्रा बह्मचर्यचे कुठलेही नियम जे आजारमुक्त शरीर टिकविण्यासाठी आवश्यक आहेत ते पाळले जात नाहीत..
शरीराची सहन करण्याची क्षमता संपली की मग शरीर रक्तदाब मधुमेह सारखे दुर्जर उपद्रव दाखविण्यास सुरू करते. मग वेगवेगळे उपाय करून शरीराची प्रयोगशाळा बनते. परिस्थिती उद्भवु नये यासाठी प्रयत्न न करता त्रास सुरू झाल्यावर उपाय शोधले जातात.
जसे दुष्काळ पडला असता बोअर विहार खणली जाते पण परिस्थिती वरचेवर गंभीर बनते.
रक्तदाब मधुमेह सारखे आजार लवकर उद्भवु नये असे वाटत असेल तर त्रयोपस्तंभ ( आहार निद्रा बह्मचर्य) यांचे पालन अत्यावश्यक आहे. नाहीतर त्रास ठरलेलेच.
रक्तदाब मधुमेह त्रास असणारयांसाठी तर त्रयोपस्तंभ पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही. नाहीतर आजाराची तीव्रता वरचेवर वाढत जाते जरी antihypertensive, antidiabetic गोळ्या सुरू असतिल तरी....
सांगायचा उद्देश एवढाच मुळापासुन रक्तदाब मधुमेह कमी होण्यासाठी उपाय सांगा असे प्रश्न वांरवार येतात. या प्रश्नांचे उत्तर त्रयोपस्तंभ पालनात दडले आहे सोबत आयुर्वेदीय निदान पुर्वक आजारांची उद्भवण्याची कारणे पाहुन केलेली चिकित्सा बरयांच अंशी फलदायी ठरते.
मोठ्या आजारांचा सामना करताना जेथे स्वभावपरमवाद उपयोगी ठरत नाहीत म्हणजे शरीर स्वतः दुरूस्त होत नाही अशावेळी त्रयोपस्तंभ पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही हे नक्की...
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on what's up no -- 9028562102 )

Saturday, April 2, 2016

निद्रानाश / अल्पनिद्रा

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
🍀 निद्रानाश / अल्पनिद्रा ☘
निद्राल्पता उतारवयात सहजच उत्पन्न होणारा त्रास आहे. कारण उतारवयात शरीरात वाताचे आधिक्य असते त्यामुळे निद्राल्पता निर्माण होते.
🍀 निद्रानाशाची कारणे ☘
नावनं लघनं चिंता व्यायामः शोकभीरूषः||
एभिरेव भवेन्निद्रानाशः श्लेष्मातिसंक्षयात् ||
नस्य करणे नाकात तीक्ष्ण औषधी तेल आदी टाकणे, लंघन करणे उपवास आदी कारणांनी, चिंता अत्याधिक प्रमाणात असणे, व्यायामाच्या आधिक्याने, शोक भीती राग आदी मानसिक वेगांच्या अतियोगामुळे निद्रेचा नाश होतो. शरीरातील कफाचा क्षय झाल्याने निद्रानाश निद्राल्पता निर्माण होते.
😵 अकाली निद्रा रोगकारक 😵
अकालशयनान्मोहज्वरस्तैमित्यपीनसाः|
शिरोरूकशोफह्रल्लास्रोतोरोधाग्निमंदताः|| वा.सु.८/६०
अकाली झोपल्याने मुर्च्छा, ताप, शरीरात ओलसरपणाचा भास होणे, पीनस, डोकेदुखी, सुज, तोंडस पाणी येणे, शरीरात अवरोध निर्माण होणे, भुक मंद होणे असे त्रास होतात....
☘ निद्रानाशासाठी काही उपाय ☘
१.महिषीक्षीरं स्वप्नजननानाम् | च.सु.
कफक्षीण झालेल्या व्यक्तींमध्ये म्हशीचे दुध कफवर्धन करून निद्रानाश कमी करणारे ठरते.
अन्य कफवर्धक पदार्थांचा उपयोग ही निद्रानाशाकरिता होतो. त्यांचा योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपयोग करावा..
☘ बाह्योपचार 🍀
नित्य तेलाने अभ्यंग करणे, उदवर्तन, स्नान आदींचा योग्य सल्ल्याने उपयोग केला तर निद्रानाशासाठी उपयोग होतो.
🍀 मनासाठी उपाय 🍀
प्राणायाम, अनुलोम विलोम या अष्टांग योगाचा उपयोग यम नियम पाळुन मनाच्या आरोग्याकरिता करता येईल.
शिरोधारा, तुपाचे नस्य करणे, तर्पण, मनावर काम करणारया औषधींचा उपयोग आदी उपक्रमांचाही मनोदुष्टीजन्य निद्रानाशात उपयोग करता येतो.
निद्रा त्रयोपस्तंभापैकी म्हणजे शरीररूपी घराच्या ३ खांबापैकी १ आहे. निद्रा प्राकृत असेल तर शरीरस्वास्थ्य उत्तम राहते अन्यथा सर्वप्रकारच्या आजारांचा सामना निद्रानाश / निद्राल्पतेने करावा लागतो.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड
Cont no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on what's up no -- 9028562102 )

घरोघरी आयुर्वेद‬

#‎घरोघरी_आयुर्वेद‬
बस्ती हे पंचकर्मातील एक कर्म. या प्रक्रियेत गुदमार्गाद्वारे काढ्याचे वा तेलाचे मिश्रण दिले जाते. शरीरातील वात वाढला की; बस्ती हा अतिशय उत्तम परिणामकारक उपाय आहे. या उपक्रमाला ‘बस्ती’ असे नाव का पडले ठाऊक आहे का? पूर्वीच्या काळी बस्ती देण्यासाठी मृत प्राण्यांचे मूत्राशय काढून- स्वच्छ करून त्यात काढे वा तेलाचे मिश्रण भरून बस्ती दिला जात असे; जेणेकरून या मुत्राशयातील स्नायूंवर योग्य दाब दिल्यास त्यातील औषध शरीरात पोहचावे. या मूत्राशयास संस्कृतमध्ये ‘बस्ती’ असे म्हणतात. त्याच्या सहाय्याने दिला जातो म्हणून हा उपक्रमदेखील ‘बस्ती’ याच नावाने ओळखला जाऊ लागला. आजही बस्ती अशाच पद्धतीने दिला जातो का? उत्तर आहे....नाही! सध्याच्या काळात; बहुतांश दाक्षिणात्य राज्यांत प्लॅस्टिकच्या जाड पिशव्यांचा वापर करून बस्ती दिला जातो. आपल्याकडे बहुतेक वैद्य हे एनिमा सिरींज आणि कॅथेटर यांच्या सहाय्याने बस्ती देतात.
सांगण्याचा मुद्दा असा की; ‘आयुर्वेदाने काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे. नाहीतर साचून राहिलेल्या डबक्याप्रमाणे आयुर्वेदाची गत होईल’ अशी आपली विद्वत्ता पाजळणाऱ्या ‘स्वयंघोषित’ विद्वानांची कमतरता नाही. कित्येकदा त्यांची ही तथाकथित ‘सुधारक’ मते आपल्यालाही ‘जबरदस्त’ वगैरे वाटत असतील. मात्र अशी सनसनाटी विधान करणाऱ्या लोकांचा आयुर्वेदातला अभ्यास नेमका किती असतो हे सर्वप्रथम बघायला नको का? आयुर्वेदाचा सांगोपांग अभ्यास असणारा कुठलाही माणूस आपल्याला सांगेल की; आयुर्वेदाने नेहमीच काळानुसार आवश्यक बदल स्वीकारले आहेत. मात्र तसे करताना ते बदल केवळ तपशीलातील बदल आहेत. त्याच्या ‘कोणत्याही’ मुलभूत सिद्धांताला धक्का लागलेला नाही. (यावर स्वतंत्रपणे लिहीनच.) त्यामुळे अशा सुधारकांना माझी एकच विनंती आहे की; अशी चक्रम विधाने करण्यापूर्वी आपले ज्ञान पुन्हा एकदा तपासून पहा.
उगाच आपली थोरवी तमाम लोकांनी गावी; यासाठी आयुर्वेदाच्या आडून शिखंडीसारखे बाण चालवत बसू नका.
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Visit Our Page