Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, March 23, 2011

हरिद्रा

हरिद्रा कांचनी पीता निशाख्या वर वर्णिनी /
कृमिघ्ना हल्दी योषित प्रिया हट्ट विलासिनी //
हरिद्रा कटुका तिक्ता रुक्ष उष्णा कफ पित्तनुत /
वर्णया त्वक दोष मेहास्त्र शोष पांडू व्रणा पहा //``
( भाव प्रकाश निघंटु )


****गण -कुष्ठघ्न,
लेखनीय ,
कंडूघ्न ,
विषघ्न,
तिक्त स्कंध ,
शिरो विरेचनीय( चरक ) ,

हरिद्रादि ,मुस्तादी ,श्लेषम संशमन ( सुश्रुत )

***कुल -हरिद्राकुल


Latin Name = Curcuma Longa

English Name =Turmeric

***गुण धर्म ==


***गुण -रक्ष ,लघु
***रस -तिक्त ,कटु
***विपाक -कटु
***वीर्य -उष्ण

***कर्म व प्रयोग =======================-
दोष -उष्ण वीर्य म्हणुन कफ वात शामक , पित्त विरेचक व तिक्त रसाने पित्त शामक कार्य ही करते . साहजिक त्रिदोषात्मक विकारांवर उपयोगी पड़ते .

संस्थानिक कर्म
***बाह्य -हल्दी चा लेप शोथहर, वेदना कमी करणारा ,वर्ण्य ,कुष्ठघ्न ,व्रण शोधक , व्रण रोपक , लेखन आहे , हल्दीच्या धुम्रपानाने उचकी थांबते ,श्वास वेग कमी होतो , लेप विषघ्न आहे. हल्दीच्या धुपाने विंचवाच्या दंशाने वेदना कमी होते. हल्दी चा धुप हा फार तीक्ष्ण असतो .

***आभ्यंतर -नाडी संस्थान - उष्ण धर्मं मुले हलद ही वेदना स्थापक होते . मार लागल्यानंतर होणान्या वेदना हलद +गुड़ खाण्यास दिल्यास कमी होतात . याने रक्त फैलावते.

***पाचन संस्थान - हलद ही कडू , रूचिवर्धक , अनुलोमक , पित्तविरेचक व कृमिघ्न आहे , या कर्मा मुले ती अरुचि ,विबंध , कावीळ ,जलोदर, कृमि या मध्ये वापरतात .

***रक्त वह संस्थान - हलद उत्तम पैकी रक्त प्रसादन काम करते . रक्तवर्धक , रक्त स्तंभक

यादृष्टीने हलद ही अत्यंत उपयुक्त आहे . निरनिराले रक्त विकार , पांडू रोग व रक्तस्त्रवात उपयोगी पड़ते .

***श्वसन संस्थान - तिक्त व तीक्ष्णत्वा मुले कफघ्न आहे . कास , श्वास प्रतिश्याय या सारखे विकार हल्दी ने कमी होते

***मूत्र वह संस्थान - हल्दीत मूत्र संग्रहणीय गुण श्रेष्ठतेने आहे. पण ती आम , कफ मेद यांचे पाचन करून हे कार्य करते ...`` मेहेषु धात्री निशे ``

हे वाग्भट उक्त सूत्र ( वा . सु . ४०-४८ ) महत्वाचे आहे
प्रमेहात हल्दिचा काढ़ा किंवा चूर्ण वापरावे.
हल्दी ने मरण केलेले वंग भस्म ही प्रमेहात उपयोगी पड़ते.
( धात्री निशा - मेहघ्न )


***प्रजनन संस्थान -गर्भाशय शोधन, स्तन्य शोधक व शुक्र शोधक आहे, प्रसव नंतर हरिद्रा खंड पाक वापरतात ,शुक्र मेहात हलद उपयोगी पड़ते

***त्वचा - कुष्ठघ्न ,वर्ण्य , कंडूघ्न .... शीतपित्त या विकारांत रक्तातील गोठण्याचा धर्म कमी करणे हा त्यामागे उद्देश्य असतो .

***ताप क्रम - ज्वरात पित्तसारक व आमपाचक व रसादि धातुगामित्वामुले ती उपयोगी पड़ते ..

***सात्मीकरण - तिक्त रसामुले धातु-शैथिल्य नाहीसे होते
सर्व सामान्य अशक्तपणा कमी करण्यास हरिद्रा उपयोगी पड़ते
हरिद्रेने विषघ्न धर्म चांगला आहे

***उपयुक्त अंग - कंद

***मात्रा स्वरस १२ -२० मी. लि. ---चूर्ण -१-३ ग्रम
*विशिष्ट कल्प - हरिद्रा खंड



***स्त्रोतों गामित्व -दोष कफघ्न व पित्तघ्न
***धातु -रस रक्त ( वर्ण्य )
मेद -( मेह )
रक्तमेद ( पांडू रोग )
रक्त -( कुष्ठ )
***मल -कृमिघ्न
***अवयव - गर्भाशय
मूत्रवह- स्त्रोतस
***विशेष - विषघ्नी



VD. Arvind Pathak
http://www.facebook.com/profile.php?id=1092994764

No comments:

Post a Comment

Visit Our Page