*आयुमित्र*
*नामकरण आणि आयुर्वेद*
सध्या एका नाम करणाची चर्चा संपूर्ण भारतात सुरु आहे ती म्हणजे सैफ व करिनाचा मुलगा तैमूर ह्याची. हे नामकरण चूक का बोरोबर हा माझा विषय नाही. परंतु नामकरण कसे केले पाहिजे? ते किती महत्वाचे आहे ह्याची माहिती व्हावी म्हणून आजचा लेख.
*आयुर्वेदीय नामकरण संस्कार*
आयुर्वेदाने नामकरणाला एक संस्कार मानला आहे. मतापितांनी शुचिर्भूत होऊन इष्टदेवांचे पूजन करून नामकरण करायचं अस आयुर्वेद सांगते.
केव्हा करावे?- 10व्या, 11व्या किंवा 12व्या दिवशी
*नामकरण कसे करावे?*
1) नाव ठेवताना प्रथम अक्षर घोषवर्ण असावे. म्हणजेच क वर्ग, च वर्ग इत्यादी असे असावे व शेवटचा वर्ण उष्मवर्ण श, ष, स, ह इत्यादी.वर्ण येणारे ठेवावे.
2) नाव अतिशय लांबलचक असू नये.
3) आपल्या शत्रूचे किंवा शत्रूशी मिळते जुळते नाव असू नये.
4)नाव हे नक्षत्र, किंवा आपल्या इष्ट देवतांच्या नावाने युक्त असावे.
5) नाव हे क्रूर असू नये.
6) अयोग्य नावामुळे बालकाची समजात चेष्टा होते, मनात नामाविषयी घृणा निर्माण होते. म्हणून नाव हे अनुकूल असल्यास ते सुख, संतोष आणि आत्मविश्वास बालकाच्या मनात निर्माण होण्यात मदत होते. यासाठी योग्य नामकरण होणे महत्वाचे आहे.
संदर्भ- अष्टांग संग्रह 1/29,30,
मतापितांनी विचारपूर्वक नामकरण संस्कार केल्यास हाबालकाच्या सामजिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील ह्यात शंका नाही.
*वैद्य भूषण मनोहर देव*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*7588010703/8379820693*
*drbhushandeo@gamil.com*
http://wp.me/p7ZRKy-5y
No comments:
Post a Comment