Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, November 3, 2015

मेदोरोग


निरोगी माणसाच्या शरीरांत कमी अगर अधिक चरबी असते. परंतु जेव्हां तिचें प्रमाण फाजील वाढून शरीरव्यापार अगर त्या माणसाचा व्यवसाय चालण्यास त्यामुळें अडचण पडूं लागते तेव्हां त्यास रोग समजून त्यावर उपचार केले पाहिजेत. निरोगी स्थितींत चरबी किती असावी व मेदोरोग झाला असें समजण्यास तिची वृद्धि किती असली पाहिजे हें सांगणें कठिण आहे, म्हणून वरील व्याख्या पुरेशी आहे. कारण मेदामुळें अत्यंत स्थूल झालेलीं कित्येक माणसें सदृढ, निरोगी व कष्टाळू आढळतात.


मेदोरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
सातिवृद्धत्वात्‌ चलस्फिगुदरस्तनः ।
अयथोपचयोत्साहो नरोऽतिस्थूल उच्यते ।। ...माधवनिदान

- पोट (उदर), स्तन व नितंब या ठिकाणी मेद साठायला सुरुवात होते.
- शरीरात शिथिलता येते.
- उत्साह तसेच मानसिक शक्‍ती कमी होते.

वात, पित्तदोषांमध्ये बिघाड होतो, कफदोषही अति प्रमाणात वाढलेला असतो. म्हणूनच मेदोरोगातून अनेक समस्या उद्भवू शकतात. तेव्हा वजन वाढू लागले, विशेषतः शरीरात मेद साठायला लागला तर त्यावर वेळीच योग्य उपचार घेणे श्रेयस्कर होय.
रोंगाचें स्वरूप.-त्वचेखालीं पुष्कळ चरबी जमणें हें लक्षण या रोगांत असून शिवाय शरीरांतील अंतस्त्रावक, बहिवस्त्राक व रसोत्पादक नाना पिंड, स्नायु, इंद्रियें वगैरे नाना प्रकारच्या रचनांच्या पेशींमध्येंहि मेदोवृद्धि होऊन त्यांच्या व्यापारास व क्रियेस अडथळा येतो व रोगलक्षणें होतात. हृदयस्नायूंत वसावृद्धि झाल्यानें हृदयक्रियेंत अडथळा येणें स्वाभाविक घडतें. थोडा मेद असणें हें पोषण सुस्थितींत असल्याचें चिन्ह आहे, परंतु फाजील मेदोवृद्धीमुळें रोग होतो.
लक्षणें.- तरुणपणीं अंगांत मेद शिरला म्हणजे वजन वाढतें व तें सहन करण्यासाठीं स्नायूंचीहि वृद्धि होते. कांहीं पहिलवान लोक अशामुळेंच लठ्ठ बनलेले असतात. पण एकंदरींत या दिसण्यांत ढब्बू लोकांच्यानें फारसे श्रम करवत नाहींत व केले तर त्यांनां वाजवीपेक्षां अधिक दम लागून, छाती उडते व ते धांपा टाकतात. ते बहुधां सुस्त व झोंपाळू असून त्यांच्यानें शारीरिक अगर मानसिक श्रम फारसे करवत नाहींत; मात्र यास पुष्कळ अपवाद सांपडतात. कांहीं लठ्ठ माणसांची कांति लालबुंद गाजरासारखी व निरोगी दिसते व कांहीं मात्र फिकटलेले असतात. त्यांनां संधिवात, बहुमूत्ररोग, दम, श्वास, मधुमेह यांपैकीं एखादा रोग होण्याची प्रवृत्ति असते.

मेदोरोगाचे वैशिष्ट्य असे, की मेदधातू अति प्रमाणात वाढला की त्याच्या पुढचे धातू उदा. हाडे, मज्जा, शुक्र यांना पोषण मिळेनासे होते आणि याचा परिणाम म्हणून मनुष्याची शक्‍ती कमी होते, थोड्याही परिश्रमांनी थकून जातो, थोडेही चालले असता त्याला दम लागतो, फार तहान लागते, अस्वस्थ व्हायला होते, झोपेमध्ये घोरण्याची प्रवृत्ती वाढते, अंग दुखते, भूक जास्ती लागते, घाम अतिप्रमाणात येतो, घामाला दुर्गंध येतो, तसेच काख, जांघ वगैरे ठिकाणी दुर्गंध येतो. काहीही करण्याचा उत्साह राहत नाही. तसेच मैथुनाच्या बाबतीत असमर्थता येते.
मेदोरोगावर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. पण हि औषधे आयुर्वेद तज्ञ अथवा वैद्याच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत .
आयुर्वेदानुसार अत्यांबू सेवनाने म्हणजेच जास्तीचे पाणी पिल्याने मेदोरोग बळावतात . यांचा उल्लेख संतार्पनोत्थ व्याधीन मध्ये म्हणजे स्निघ्ध पदार्थांच्या सेवनाने होणारे रोग यात केलेला आहे . मेदोरोगात पाणी तहान असेल तरच आणि गरज असेल तितकेच आणि शक्यतो कोमट करूनच प्यावे .
औषधे
कैशोर गुग्गुळ
चंद्रप्रभा वटी
आरोग्य वर्धिनी
कुम्भजतु
अशी औषधे यात वापरता येतत. तसेच वमन , लेखन बस्ती सारख्या पंचाकार्मातील उपचार पद्धतीनी यात अनेक लक्षणीय बदल होऊ शकतात .
अथर्व आयुर्वेद हॉस्पीटल
आय. डी . बी . आय. बँके समोर
६० फुटी रस्ता ,
वसई रोड पश्चिम 9860431004


No comments:

Post a Comment

Visit Our Page