Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, November 20, 2016

डायबेटीस आणि आयुर्वेद

*आयुमित्र*

*डायबेटीस आणि आयुर्वेद*

     आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते.

*ह्याचे कारण काय?*

1) हाय कॅलरी असलेला आहार.

2) वाढलेले व्यसनांचे प्रमाण.

3) व्यायामाचा अभाव

4) स्थौल्य

5) वाढता मानसिक ताण-तणाव

6) बदलती जीवनशैली

*आयुर्वेद काय म्हणते?*

    *“प्रकृष्टोमेह: यास्मिन रोगे स प्रमेह:* म्हणजेच ज्या रोगात मुत्राचे प्रमाण वाढते (प्रभुताविलमुत्रता) तो प्रमेह. प्रमेह हा व्याधी डायबेटीस ह्या व्याधीशी मिळता-जुळता आहे. डायबेटीससाठी प्रचलित शब्द ‘मधुमेह’ हा प्रमेहाच्या वाताज प्रकारपैकी एक आहे.

*आयुर्वेदानुसार प्रमेहाची करणे-*

    नवे धान्य वापरणे, नवे तांदूळ, उडीद व डाळींच अतिप्रमाणात घेणे, खीर, खिचडी, भात अधिक घेणे, नवीन मद्य/दारू पिणे, न विरजलेले दही, ताजे दही, द्रव पदार्थ, गोड पदार्थ अधिक प्रमाणात घेणे, पंचकर्म व व्यायाम न करणे, अधिक झोपणे, झोपून वा बसून राहणे, हे सर्व करणे शरीरात कफ, चरबी वाढवतात आणि प्रमेह हा व्याधी उत्पन्न करतात.

    चला तर मित्रांनो, *योग्य व गरजे इतकाच आहार घेऊया आणि पुरेसा व्यायाम करूया आणि भारताला डायबेटीस मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया.*

*वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद, जळगाव* *
8379820693

http://wp.me/p7ZRKy-4k

No comments:

Post a Comment

Visit Our Page