Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, May 18, 2011

मुलाखत

मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांची गिरीश कुबरे यांनी घेतलेली मुलाखत...

प्रश्न : मानसिक दृष्ट्या एखादी व्यक्ती निरोगी अथवा रोगी आहे, हे कसे ठरवावे?
उत्तर : एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी अथवा रोगी आहे, हे ठरविणे तारेवरची कसरत आहे. त्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. मला पूर्वी पेक्षा किती ताण जाणवतो किंवा मला मिळणारी झोप पुरेशी आहे काय याचा विचार करावा. माझा स्वभाव पूर्वीपेक्षा भित्रा झाला आहे काय, किती वेळा भिती वाटते. दैनंदिन कार्यातून समाधान मिळते काय. ही पॅरामीटर्स आहेत. व्यक्तीने त्याबाबत स्वत:च विचार करुन उपचार घ्यावा किंवा तिसर्‍या व्यक्तीशी चर्चा करुन उपचार घ्यावा.

प्रश्न : मनाची ताकद वाढविण्यासाठी काय करावे?
उत्तर : वास्तविक भारतीय संस्कृतीने मनाच्या सुदृढतेसाठी मोठे योगदान दिले आहे. संत वाडमय, अभंगातून मनाची शक्ती, एकाग्रता वाढविण्याबाबत सांगितले आहे. मन आणि शरीर एकच आहे. ते अव्दैत आहे. मन प्रसन्न ठेवले तर शरीरही निरोगी राहिल. विचार पध्दतीत बदल करणे, जास्तीत जास्त हसल्याने मन सुदृढ होते. चिंता करु नये, रागावर नियंत्रण ठेवावे, मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, कसलीही भिती बाळगू नये, या गोष्टी केल्यास मनाची ताकद वाढेल.

प्रश्न : शहरातील व्यक्तींप्रमाणे खेड्यातील व्यक्ती देखील मानसिक विकाराने त्रस्त असल्याचे जाणवते, याबाबत काय सांगाल?
उत्तर : मानसिक आरोग्य हे भावनांवर अवलंबून आहे आणि भावना एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे असते. सभोवताली आनंदी किंवा दु:खी व्यक्ती असेल तर त्या पध्दतीने वातावरण तयार होते. नेहमीच जर मन खच्चीकरण करणारे विचार देणार्‍या व्यक्तीबरोबर राहिल्यास सभोवतालच्या व्यक्तीची मानसिकता देखील तशीच होते. त्यातून मनोविकार जडतो. त्यामुळे शहराप्रमाणे खेड्यातही मानसिक रुग्ण आढळू शकतात.

प्रश्न : मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी काय करावे?
उत्तर : माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, मात्र मनाचे प्रश्न आपण सोडविले नाहीत. हा बेसिक प्रश्न आहे. मानसिक सुदृढतेसाठी सदैव आनंदी राहावी. विनाकारण कसल्याही गोष्टीची चिंता करुन नये. स्वत:शी संवाद साधावा. भावनांवर नियंत्रण ठेवावे.

No comments:

Post a Comment

Visit Our Page