Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, May 15, 2011

स्थूलता

आपले निरोगी राहणे किंवा न राहणे हे आपण जे अन्न ग्रहण करतो त्यावर ब-याच प्रमाणावर अवलंबून असते. अन्न आपणास जीवनावश्यक सत्व पुरवतात. सुदृढ शरीरासाठी आपणास लागणारी प्रथिने आपणास उर्जा देत असतात. जर आपण जास्त खात असू तर आपली शरीरयंत्रणा आवश्यक ते सत्वे घेऊन उर्वरीत भाग मेदात म्हणजेच चरबीत रुपांतरीत करत असते. तसेच ही चरबी आपल्या शरीरातून उत्सर्जीत न होता शरीरातच साठत असते. जर आपण नियमित अतिरीक्त अन्न खात राहीलो तर ही चरबी साठत जाऊन स्थूलता येऊ शकते.

स्थूलता म्हणजेच शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे होय. स्थूलता हा कायमस्वरुपी आजार म्हणजेच मोठ्या कालावधीसाठी शरीरात रहाणारा आजार मानला जातो. जसे उच्चरक्तदाब किंवा मधुमेह. आपल्या आरोग्यासाठी घातक मानल्या जाणा-या आजाराच्या आघाडीच्या कारणांमधे तंबाखूचा पहिला तर स्थूलतेचा (अमेरिकेत) दुसरा क्रमांक लागतो. शरीरातीला द्रव्यमान सुचकांक(BMI) जर ३० हून अधिक असेल तर स्थूलता असल्याचे निदान करता येते. (BMI) अंक हा आपल्या उंचीनुसार असलेल्या वजनाच्या प्रमाणात ठरवतात.

स्थूलता हा अमेरिका व अन्य प्रगतशील राष्ट्रातील एक महत्वाचा प्रश्न बनला आहे. अमेरिकेतील लोकसंख्येच्या जवळ जवळ अर्धे लोक शरीराचे वजन अधिक असल्यामुळे ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. तेथिल प्रत्येक ५ मुलांमधील एका मुलाचे वजन अधिक असते. लोकसंख्येच्या एकतृतियांश भाग हा स्थूलतेचा बळी ठरला आहे. स्थूलतेचे प्रमाण आपल्या समाजात वाढत आहे कारण आपल्या आहारात मेदयुक्त पदार्थ वाढत आहेत व शरीराच्या हलचालीचे (क्रियाशीलतेचे प्रमाण) कमी कमी होत चालले आहे.

अमेरिकेतील लोक प्रत्येक वर्षी वजनात संतुलन आणण्यासाठी, आहार संतुलनासाठी, त्याविषयाच्या पुस्तकांसाठी, त्यावरील औषधांसाठी करोडो डॉलर्स खर्च करतात. तसेच जवळजवळ ४५ करोड डॉलर्स स्थूलतेमुळे उद्भवणा-या आजारावर उपचारासाठी खर्च केला जातो. तसेच प्रत्येक वर्षी स्थूलतेमुळे उद्भवणा-या आजारामुळे उद्योगधंद्यात २० करोड डॉलर्सचे नुकसान होते असे निरिक्षणावरून दिसून आले आहे.

स्थूलतेची कारणे:
जेव्हा आपण आवशक्तेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ ग्रहण करतो तेव्हा त्याचे अतिरिक्त मेदात रुपांतर होऊन शरीरात साचत जाते. ह्या साचत गेलेल्या चरबीमुळे शरीराचे आकारमान वाढते. चरबीमधे पेशी असतात. चरबीचे प्रमाण वाढत गेल्यामुळे पेशींची संख्याही वाढते. आपण जरी वजन घटवले तरी त्यापेशी आकुंचन पावतात त्यांची संख्या मात्र तितकीच राहते.

स्थूलता वेगवेगळ्या कारणामुळे उद्भवू शकते. त्यात वय, लिंग, गुणसूत्र, मानसिकतेची रचना व वातावरणातील बदल हे महत्वाचे घटक ठरतात.

गुणसूत्र: स्थूलता असलेले नातेवाईक असल्यामुळे आपल्याला स्थूलता येईलच असे नाही. पण स्थूलता गुणसूत्रांवर व जीवनशैलीवर अवलंबून असते.
भावना: काही लोक नैराश्यामुळे, सर्व आशा सोडल्या गेल्यामुळे, रागामुळे, मानसिक दबावामुळे तसेच अशा अनेक कारणामुळे जास्त अन्न ग्रहण करतात. त्यात भूख हा भागच नसतो. याचा अर्थ असा नाही की वजनाचे आधिक्य किंवा स्थूलता असणा-या लोकांना भावनांच्या समस्या इतर लोकांपेक्षा अधिक असतात. खरतर अशा व्यक्ती भावनेच्या भरात अधिक अन्न ग्रहण करतात व याची त्यांना एकप्रकारे सवयच लागते. काही प्रकरणात स्थूलतेचा बचाव तंत्र म्हणूनही वापर केला जातो. कारण यात शरीराच्या आकारमानात विचित्रता आलेली असते. अशा भावनिक समस्यांचा सामना करणा-यांना केलेली मानसिक मदत त्यांना उपयुक्त ठरू शकते.
वातावरणातील घटक: या महत्वाच्या घटकात जीवनशैलीचा अधिक प्रभाव असतो. आपल्या अन्न ग्रहण करण्याच्या सवयी आणि आपली क्रियाशीलता आपल्या आसपास राहणा-या लोकांकडून शिकवले गेले असते. अति अन्न ग्रहण केले जाणे व जास्त काळ बसून काम करणे हे यात घातक ठरू शकतात.
लिंग: पुरुषांना स्त्रीयांच्या तूलनेत जास्त स्नायू असतात. तसेच पुरुषांना स्त्रीयांपेक्षा जास्त उर्जा निर्माण करावी लागते त्यामुळे जास्त स्निग्धसत्वाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे ही त्यांची काही प्रमाणात गरजच असते. तसेच पुरुष स्त्रीयांपेक्षा कमी आराम करतात यामुळेच स्त्रीयांमधे वजन वाढण्याचे प्रमाण अधिक असते.
वय: लोकांकमधे वाढत्या वयानुसार स्नायु कमी होत जाऊन चरबी साठवण्याचे प्रमाण जाते. तसेच चयापचयाची क्रिया काही प्रमाणात हळू चालत असते. अशा लोकांना आपल्या खाद्यपदार्थातील स्निग्धतेचे प्रमाण कमी करावे लागते.
गर्भावस्था: स्त्रीयांमधे गर्भावस्थेच्या नंतर ४ ते ५ पौंडने वजन वाढते. तसेच हे प्रमाण प्रत्येक गर्भावस्थेनुसार वाढू शकते. गर्भावस्थेमुळे स्त्रीयांमधे स्थूलता येऊ शकते.

काही चिकित्साविषयक अवस्थांमुळे व काही उपचार पद्धतींमुळे स्थूलता येऊ शकते. पण ह्या कारणास्तव स्थूलता येण्याचे प्रमाण अती अन्न सेवन व अक्रियाशीलतापेक्षा कमीच असते. यापैकी काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

हायपोथीरॉडिजम
कुशींग सिड्रोम
नैराश्य (डिप्रेशन)
काही औषधोपचार जसे : स्टेरॉईड, अँटीडीप्रेसंट, गर्भनिरोधक गोळ्या
प्रेडर-व्हिल्ली सिंड्रोम
पॉलीचय्स्टीक ओव्हरीन सिंड्रोम
"ग्लॅड्स" या कारणामुळे क्वचितच स्थूलता उद्भवते.
स्थूलता काही इतर खाण्यापिण्याच्या विकारांमुळेही उद्भवू शकते. जसे बिंज पद्धतीने खाणे
काही स्थूलतेच्या संदर्भातील काही विकारास शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात वर्गीकरण होऊन पसरणारी चरबी कारणीभूत ठरते. त्यामुळेच वेगवेगळ्या शाररिक समस्या उद्भवतात. सहसा शरीरात दोन प्रकारची चरबी आढळून येते. स्कँडिनेव्हिया अभ्यासात दिसून आले आहे की आपल्या शरीरात मेद म्हणजेच चरबी आपल्या कमरेभोवती (सफरचंदाच्या आकारात)जमा होते. तसेच हा प्रकार कुले व मांडीवर (त्वचेखाली चरबी जमा होणे) जमा होणा-या चरबीच्या प्रकारापेक्षा जास्त घातक ठरतो.
दक्षता
ज्यांना स्थूलता आली आहे अशांना व ज्यांना अशा शाररिक समस्या टाळायच्या आहेत त्यांनी आपल्या जीवनशैलीतील काही सवयी बदलणे गरजेचे असते. अधिक कालावधीसाठी कमी खाणे म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करायला शिकणे होय.

आपण अती अन्न ग्रहण का करतो? व केव्हा करतो?
मित्रांबरोबर बाहेर गेल्यावर? दुरदर्शन पाहताना?
रात्री उशीरा गोड पदार्थ खाता का?
वेळ नसल्यामुळे किंवा थकल्यामुळे अन्न घरी न बनवता स्निग्ध सत्वाचे प्रमाण अधिक असणारे फास्ट फूड आपण नियमित खाता का?
आपल्या काही खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष दिल्याने आपल्या शरीरात उद्भवणा-या समस्या टाळता येतात व आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत आपण वजनाचे प्रमाण आणू शकतो.

आपण जितकी आपली क्रियाशीलता वाढवत जातो तितकाच आपला दृष्टिकोनही बदलत जातो. आपणास अगदी धावपटू व्हायचे नाही. पण तरीही आपली क्रियाशीलता कशी वाढवता येईल तसेच त्या क्रियाशीलते बरोबरच आपणास आनंदी कसे राहता येईल याचा शोध घ्यावा.



वैद्य . जितेश पाठक 
धुळे 

No comments:

Post a Comment

Visit Our Page