Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, May 18, 2011

निद्रा भव!

निद्रा भव!
झोपेतून मध्येच जाग आल्यावर झोपण्यासाठी बराच वेळ शिल्लक असल्याची जाणीव होणे यासारखा आनंद नाही . झोपण्यासारखे सुख नाही आणि उत्त
म आरोग्यासाठी शांत झोप हा महत्त्वाचा घटक आहे .

झोप आवश्यक का आहे ?
दिवसभर पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी रात्रीची झोप खूप गरजेची आहे . पण आपले आयुष्य अधिक धावपळीचे झाल्यावर झोपेकडे कमी लक्ष दिले जाते . उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोपही झाली पाहिजे .

किती तास झोपायचे ?
वय वाढत जाते तसे झोपेचे तास कमी होत जातात . अगदी तान्हे मूल १८ ते २० तास झोपते . थोडे मोठे झाल्यावर झोपेची वेळ कमी होते आठ ते दहा तासांवर स्थिरावले . मोठ्यांना दिवसभरात सहा ते आठ तास झोप लागते .

झोपेवर परिणाम करणारे घटक
दररोजच्या आयुष्यातील अनेक घटक झोपवर परिणाम करत असतात . सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो तणाव . काम , दैनंदिन आयुष्यातील प्रश्न यामुळे मनावर आलेल्या दडपणामुळे शांत झोप लागत नाही . याशिवाय बेडरुममधील जास्त प्रकाश , आवाज , उच्च तापमान , जेवणापूर्वी घेतलेले खूप आणि जड जेवण , झोपेपूर्वी दोन तासात केलेला थकवणारा व्यायाम आणि जेवणापूर्वी चार तासांदरम्यान घेतलेली कॉफी , चहा यामुळेही झोपेवर परिणाम होतो .

सध्या सुरू असलेल्या तापमानवाढीचा झोपेवर परिणाम होतो ?
जास्त गरम होत असल्याचा झोपेवर निश्चितच परिणाम होतो . जास्त आर्द्रता आणि त्यामुळे येत असलेल्या घामामुळे त्रास होतो .

झोपेसंबंधी समस्या ...

पुरेशी आणि शांत झोपेआड अनेक समस्या येतात .

१ . झोपेत घोरणे
२ . झोप न लागणे
३ . झोपेत बोलणे किंवा चालणे
४ . चित्रविचित्र स्वप्ने पडणे
५ . खूप जास्त वेळ झोप लागणे .

अपुरी किंवा जास्त झोप यांचा शरीरावर आणि मनावर प्रभाव पडतो ?
झोप कमी झाली की स्वभाव कार्यक्षमता घसरते . अपुरी झोप घेत असलेल्या व्यक्तींमध्ये थकवा , चिडचिड , उच्च रक्तदाब , विसरभोळेपणा , विचारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले आहे . घोरण्यामुळे झोप अपुरी राहत असेल तर त्याचा संबंध स्मृतिभ्रंश , हृदयविकार , आकडी किंवा मधुमेहाशी जोडता येऊ शकतो .

झोप कशी सुधारावी ?
झोपेशी सुसंगत असलेली जीवनशैली पाळा .
दैनंदिन धावपळीत झोपेसाठी पुरेसा वेळ द्या .
बेडरुममधील प्रकाश कमी करा . आवाज , तापमान यावर नियंत्रण ठेवता आल्यास उत्तम .
झोपेपूर्वी जड आहार टाळा . हलका आहार घेतल्यास हरकत नाही . पचायला जड असलेल्या पदार्थांमुळे पचनसंस्था कार्यरत राहते आणि त्यामुळे झोपेत अडथळे येतात .
झोपायला जाण्याआधी दोन तासांदरम्यान दमछाक करणारा व्यायाम टाळा . त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप येण्यास अडथळा येतो .
झोपेपूर्वी चार तासांदरम्यान चहा , कॉफी यांच्यासारखे उत्तेजक पेय टाळाhttp://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक 
धुले ..

  • 8275007220
  • 9960507983


No comments:

Post a Comment

Visit Our Page