Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, May 18, 2011

नखदर्पण

नखदर्पण

हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्रतिबिंब दाखवते. आयुर्वेदानुसार नखे ही अस्थिधातुचा मल आहेत. नखांची परीक्षा त्यांचा आकार व रंग यावरून मुख्यत्वे केली जाते.

आकारावरुन नखांचे प्रकार:
१)लांब नखे:
(१) खुप लांब नखे ही शारीरिक शक्ति कमी असल्याचे द्योतक आहेत. अशा व्यक्तिंची फुफ्फुसे कमजोर असतात. त्यांना छातीचे विकार होण्याची शक्यता असते. या बरोबरच जर नखांचा रंग निळसर रेखायुक्त असेल तर हा विकार बळावलेला असतो. याचप्रकारची पण कमी लांबीची नखे असलेल्या लोकांना श्वासनलिकेसंबधी आजार होऊ शकतात.
(२) लांब व अरूंद नखे असणाऱ्यांनी आपल्या मणक्याची काळजी घ्यावी कारण त्यांना मणक्याचे आजार होण्यची शक्यता जास्त असते.

२) छोटी नखे:
(१) छोटी मांसात खोल रुतलेली, मुळशी चपटी असलेली नखे असलेल्यांना मज्जासस्थेचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशातच जर नखे पांढुरकी व तुटकी असल्यास विकार फारच बळावतो.
(२) शिंपल्याच्या आकाराची नखे असलेल्यांना अर्धांग वायु होण्याची शक्यता असते.
(३) छोटी चौकोनी पण वरच्या बाजुस गोलसर नखे असलेल्यांना गळ्याचे विकार जसे टॊन्सिलाइटिस, फॅरींजाइटिस ई. होण्याची शक्यता असते.
(४) छोटी व मुळाच्या बाजुला चपटी, पातळ नखे तसेच नखावरील चंद्राचा आकार लहान असणाऱ्या व्यक्तिंमध्ये रक्ताभिसरणची क्रिया नीट होत नाही. त्यामुळे त्यांना हृदयाचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.
कोणत्याही नखाच्या मुळशी असलेले नखचंद्र मोठे असलेल्या व्यक्तिच्या हृदयाची रक्ताभिसरणची क्रिया चांगली असते.
नखांवर ठीपके व डाग असलेली व्यक्ति घाबरट असते. जर त्यांच्या मुळाशी लहान चंद्र असेल तर किंवा चंद्र नसेल तर त्यांन मज्जातंतुंचे विकार होण्याची शक्यता असते. नखांवर उभ्या रेषा असतील तर नुकतेच आजार होऊन गेले आहेत असे समजावे.
जर व्यक्तिच्या बोटांची पहिली पेरे चेंडूप्रमाणे गोल व नखे ही गोल असतील व नखचंद्र नसतील तर त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते.
नखे खुप पातळ असतील तर त्यांचे तुकडे पडतात अशा व्यक्तिंची प्रकृति फार नाजुक असते.

शारीरिक प्रकृतिप्रमाणेच नखांवरुन मानसिक प्रकृतीही ओळखता येते.
एखाद्याच्या नखाची रुंदी लांबी पेक्ष जास्त असेल तर ती व्यक्ति भांडखोर असते. नखे छोटी असतील तर टीका करण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तिची तर्कब जास्त असेल तरौद्धी चांगली असते, ते चांगले विश्लेषक असतात. व्यवहारी व शीघ्र निर्णय घेणारे असतात. अशा व्यक्ति रागीट व वादविवाद करणाऱ्या असतात. एखाद्या कामाला सुरुवात केल्यावर ते संपल्याशिवाय त्या थांबत नाहीत. लांब नखे असणारे लोक शांत, नम्र, आदर्शवादी, स्वप्नाळू, कलाप्रेमी असतात. ते वादविवादात न पडता आपले मतभेद शांतपणे तोडगा काढून संपवतात.

नखांचा रंग:
नखांच्या रंगावरूनही बऱ्याचशा गोष्टी कळतात. नखांचा रंग पिवळा असल्यास यकृताची कमजोरी किंवा य्कृताचे विकार दर्शवते. नखांचा रंग सफेद असल्यास रक्ताल्पता दखवते. अशी व्यक्ति कायम आजारी व चिडचिडी असते. त्यांना शारीरिक कष्ट जमत नाहीत. नखे निळी असलेल्या व्यक्तिंची फुफ्फुसे अशक्त व आजारी असतात. प्रकृती गंभीर असते. गुलाबी रंगाची नखे असलेल्या व्यक्ति उत्साही व रसिक असतात. प्रेमळ व स्वस्थ असतात. लाल नखे असलेली व्यक्ति पित्तप्रकृतीची, रागीट, भांडखोर आणि मेहनती असते.

अशाप्रकारे नखांद्वारे विविध शारीरिक व मानसिक गोष्टींची माहिती करुन घेता येते, पण ही माहीती करून घेताना हातावरील अन्य लक्षणे, चिन्ह व रेषा यांचाही विचार करणे आवश्यक आहे ..

http://vindhya-astro-ayurved.blogspot.com/


http://www.facebook.com/profile.php?id=100000883922742&sk=इन्फो  • Lake -hieghts , Powai
  • Mumbai (Bombay), इंडिया
  • 9221509969


No comments:

Post a Comment

Visit Our Page