स्त्रीयांना मातृत्व मूळे कटीशूल असू शकतो तर पुरुषात बैठे काम, ओझे वाहने, अचानक पडणे इत्यादी करणे असू शकतात. पाठीच्या स्नायूंचा तन, त्यांना झालेली दुखापत , आघात ही कारणे तसेच , मल मूत्र या वेगाचे धारण कारणे हे देखील कारण असू शकते .यात पाठीला झटका बसल्या नन्तर होत असलेला शूल हा जास्त दुखरा तसेच अल्प काळ टिकणारा असू शकतो. पण भरपूर वेळा हा रोज रोज होतो . त्या वेळी वाट चा संचय शारीत झालेला असेल तर मग ह्या वेदना असह्य असतात .
अग्निकर्म शेक शेगडी होवून जरी उपशय नाहि मिळाला तर मग वरील कल्प योग्य वेळी वापरावा .
गोक्षुर
विपाक; मधुर वीर्य : शीत मुख्य गुण: गुरु स्निग्ध
दोषग्नता: सर्व गुणी वाताघ्न ,कफकार, शीत वीर्य असल्याने पित्त शामक
तसेच गोक्षुर हा पक्वाशय गात वाताचे हरण करतो , अपान वायू वर कार्य करणारा आहे.वाताचे स्थान पक्वाशय सांगितले आहे पक्वशायात वाताचा संचय झाला असता शूल उत्पन्न होतो . संधी तील कफाचे प्राकृत प्रमाण कमी झालेले असल्यास गोक्षुर ते सम्यक तेणे पूर्त करतो . तसेच वाताचे शमन करतो . पुरीशाचे, मुत्राचे शोधन करतो . अश्या प्रकारे वेग विधारण केल्याने जरी आपण वायूचा प्रकोप झालेला असताना कटी शूल उत्पन्न झाला असला तरी तो तेथे कार्य करतो .
शुण्ठी
रस : कटू विपाक : मधुर वीर्य : उष्ण मुख्य गुण: लघु व स्निग्ध
दोषाग्नता : काफघ्न, उष्ण असल्याने वात्घ्न . समता नाशक
शुण्ठी उत्तम आमपाचक आहे , दीपन पचन आहे उष्ण व स्निग्ध गुणे अनुलोमन करते . शुलाघ्न आहे
अश्या प्रकारे गोक्षुर आणि शुण्ठी चे कवाथ कटी शुलाचे हरण करतो
कवाथ ची पद्धत
गोक्षुर एक भाग + शुण्ठी एक भाग
पाणी ८ भाग मिश्रण करून तापवावे आणि निम्मे उरवावे . गाळुन घेवून वापरावे
अश्या प्रकारे गोक्षुर शुण्ठी कवाथ वापरावा