मासिक पाळी नेहमी अनियमितच येते, कधी दर महिनाआड येते; तसं होणं हा आजार आहे का? आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का..?
हल्ली सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या आहे. मासिक पाळी उशीरा येणे, दर महिना आड येणे किवा दोन दोन महिन्यांनी येणे अशी अनियमितता मुलींमधे सर्रास आढळते. त्याला वैद्यकीय परिभाषेत पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हणतात. स्त्रीच्या गर्भातशयात बीज परिपक्व झालं आणि त्यादरम्यान त्याचा पुरुष बीजाशी संयोग झाला नाही तर ते परिपक्व झालेलं बीज गर्भाशयातून बाहेर टाकण्यात येतं. मात्र अनेक मुलींच्या शरीरात ही प्रक्रिया पूर्णच होत नाही. एकाचवेळी अनेक बीजं परिपक्व व्हायला लागतात. त्यातून एकही बीज पूर्ण परिपक्व होत नाही आणि तसे न झाल्याने ते गर्भाशयातून बाहेर टाकण्यात येत नाही. त्यामुळे मासिक पाळी सुरू होत नाही. एकच बीज परिपक्व व्हायला वेळ लागतो तसतशी मासिक पाळी उशीरा आणि अनियमित होऊ लागते.
या अनियमिततेची कारणं काय..?
मुलींची सध्याची बदललेली लाईफस्टाईल हे मुख्यत: या समस्येचे कारण आहे. सतत बाहेरचं खाणं, पोषक नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश मुलींमधे ही समस्या उदभवते. पुर्वी मुली घरात काम करत असत, शरीराला त्यातून चलनवलन, व्यायाम होत असे. आता घरकाम अतिशय कमी झालं, पायी चालणंही बंद त्यामुळे शरीराची हालचालच कमी होते. पोटाला तर अजिबातच व्यायाम मिळत नाही.
हे सारं एका दिवसात घडतं असं अजिबात नाही. दोन-चार वर्षे हे सतत असंच घडत राहतं आणि त्यातून मासिक पाळी अनियमित होण्याची तक्रार सुरू होते.
या समस्येवर उपाय काय..?
आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा या समस्येवरचा पहिला उपाय. मात्र सतत मासिक पाळी अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या आहारात तातडीने बदल करावा वजन वाढणार नाही याची काळजी घ्यावी. हॉटेलमधले खाणे, फास्ट फूड, खूप तेलकट-तूपकट पदार्थ कमी करावे. रोज वेळा ठरवून पोषक आणि चौरस आहार घ्यावा. पोषक आहाराचा अभाव आणि अशक्तपणा हेदेखील अनियमिततेचं कारण असू शकतं. त्याचबरोबर व्यायाम सुरू करावा. पुर्वी अशी काही समस्या असेल तर बायकांना रोज पिपळाला दहा प्रदक्षिणा घालायला सांगत. त्यामागे अंधश्र्रद्धा नव्हती तर त्या बाईला रोज ठराविक वेळेला ठराविक व्यायाम करायला लागावा, चालणं व्हावं म्हणून खरं तर ती रीत होती. पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार यातून ही अनियमितता दूर करता येऊ शकते.
मात्र हे सारे करत असताना वैद्यकीय सल्ला घ्यावा. जर अनियमिततेची सुरूवात असेल तर ठीक पण तसे नसेल तर औषधोपचारांची गरज पडू शकते. मात्र समस्या मोठी आणि दीर्घकाळ असेल तर मात्र औषधोपचार करावेच लागतात.
पाळी येण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या घेतल्या तर हा प्रश्न सुटू शकतो का..?
पाळी येण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या म्हणजे काय तर शरीरातील हार्मोन्स वाढवणं. ते वाढले की चक्र सुरळीत होऊन मासिक पाळी येते. पण सतत अशा गोळ्या घेऊन हे चक्र सुरू ठेवण्याचा उपयोग नाही, केवळ पाळी येतेय एवढंच समाधान त्यातून मिळू शकतं. मात्र गर्भाशयात जर स्त्री बीज परिपक्व होण्याचं चक्र सुरळीत होणार नसेल तर त्या व्यवस्थेत झालेला बिघाड दुरुस्त होणार नाही. तो दुरुस्त होण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि आवश्यक तो औषधोपचारच करून घ्यावा लागेल. तरच ही अनियमितता दूर होऊ शकते.
तसं पाहता पाळीची अनियमितता ही मुलींमधे सर्रास दिसणारी समस्या आहे; पण त्यावर वेळीच औषधोपचार झाले नाहीत, पाळीचं चक्र सुरळीत सुरू झालं नाही तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतातच. वजन वाढतं, कधीकधी अचानक जास्त वजन वाढतं. अनियमित पाळी येण्याच्या समस्येतून गर्भाशयात गाठी तयार होऊ शकतात. त्यातून भविष्यात गर्भधारणा होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. मासिक पाळी येणंच अकाली बंद होण्याची समस्याही यातून उदभवू शकते. त्यामुळे मासिक पाळी सतत अनियमित असेल तर वेळीच औषधोपचार करणं आणि त्यापेक्षाही आपल्या जीवनपद्धतीत बदल करणं महत्वाचं.
मासीक पाळीत स्वयंपाक का करू दिलं जात नाही?
मासीक पाळी सुरू असताना स्त्रीयांना सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाते. या काळात महिलांना अन्य लोकांपासून वेगळे राहण्याचाही नियम आहे. या दिवसांत महिलांनी अधिक तीव्र वास असलेल्या परफ्युमस वापर करू नये. आजकाल अधिकांश युवा या रुढींना अंधश्रद्धा मानून त्यावर विश्वास ठेवत नाहीत.
परंतु यामागे वैज्ञानिक कारणे आहेत, याची फार कमी लोकांना माहिती असते. मासिक पाळी सुरू असतांना महिलांना विविध शरीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. या दिवसांमध्ये महिला इतर वेळेपेक्षा जास्त दुर्बल झालेल्या असतात. महिलांच्या गर्भाशयाचे मुख या काळात उघडे राहते. यामुळे मासीक पाळी सुरू असताना महिलांना विश्रांतीची आवश्यकता असते.
धर्मशास्त्र सांगतात की मासिक पाळी सुरू असताना एखाद्या महिलेने केलेले स्वयंपाक घरातल्या सर्वांसाठीच हानीकारक असते. यामुळे घराला उतरती कळा लागते. त्यामुळेच महिलांना मासीक पाळी सुरू असताना स्वयंपाक करू दिले जात नाही
.
वैद्य . जितेश पाठक
धुले
- 8275007220Mobile
- 9960507983Mobile
भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.
यामागची काही कारणं :
* गरोदार महिलांना गर्भाच्या वाढीसाठी अधिक प्रमाणावर खायला दिलं जातं.
* बाळाला सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे बाळंतपणानंतर स्त्रियांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. गरोदरपणाच्या काळात वाढलेलं वजन आटोक्यात आणण्यासाठी फारसे प्रयत्न करताना त्या दिसत नाहीत.
* फास्ट फूड आणि स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर.
* पाटीर् किंवा अशाच काही प्रसंगांमध्ये करण्यात येणारं मद्यप्राशन आणि भरमसाठ खाणं.
* पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक तर फळांऐवजी कॅन्ड फ्रुटज्यूस घेतल्यानेही लठ्ठपणा वाढतो.
* नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये तणावाचं प्रमाण अधिक आहे. घरातील आणि कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे त्यांना स्वत:कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. लठ्ठपणामुळे महिलांना सांधेदुखी, उच्च रक्तदाब, मणक्याचा त्रास अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागते.
.....
उपाय :
* फ्रुटज्यूसपेक्षा फळं खाणं.
* पाटर््यांमध्ये भरपूर कॅलरीज असणारे अन्नपदार्थ टाळायला हवेत.
* बाहेरचे पदार्थ न खाता घरगुती पदार्थ खाण्याचा आग्रह धरा.
* गरोदपणात सकस आहार घ्या. यामध्ये आयर्न, प्रोटिन्स, कॅल्शियम अधिक असावेत.
गोड पदार्थ टाळा.
* लठ्ठपणाची फॅमिलीहिस्ट्री असेल, तर आहारातील तेलाचं प्रमाण कमी करा.
* रोजच्या रोज व्यायाम करायला हवा.
* बॉडी मास इण्डेक्स (बीएमआय) नियमित तपासा.
* वजन कमी करण्याचे शॉर्टकट् हे तात्पुरते असतात. वजन योग्य प्रकारे कमी करायचं, तर डायटिशियन, कौन्सिलर्स, डॉक्टर्स यांच्याकडून सल्ला घ्या.
वैद्य . जितेश पाठक
धुले
- 8275007220Mobile
- 9960507983Mobile