Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 29, 2016

बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*
*बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य*    

     बस्ती हि आयुर्वेदातील एक श्रेष्ठ चिकित्सा आहे. आयुर्वेदीय पंचकर्मात बस्तीला फार महत्व आहे. वाताच्या विकारावर बस्ती रामबाण अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदातील सर्व आचार्य, संहिता बस्तीच्या श्रेष्ठतेचे वर्णन करतात. औषधी काढा किंवा औषधी तेल वापरून बस्ती दिला जातो. सामन्य भाषेत ह्याला एनिमा म्हणतात. पण बस्तीला एनिमा म्हणणे योग्य नाही कारण बस्तीचे फायदे आणि उपक्रम त्याहून खूप वेगळे आहेत.

      बस्ती चिकित्सा वातविकार म्हणजे संधीवात, कंपवात, मांसपेशीगत वात( मस्कुलर पेन), सर्वप्रकारच्या वेदना डोके दुखी, पोटदुखी, मासिकपाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी इत्यादी अनेक वेदनाशमन करण्यासाठी बस्ती चिकित्सा केली जाते. एव्हडच नव्हे तर स्थौल्यता कमी करण्यासाठी लेखन व कर्षण बस्ती, गर्भाशयाच्या विकारांसाठी उत्तर बस्ती, हाडांची झीज भरून काढण्यासाठी तिक्तक्षीर बस्ती केला जातो. साधे पोट साफ होत नसेल तर बस्ती फार उपयोगी आहे. अश्या अनेक विकारांसाठी बस्ती चिकित्सा केली जाते. जानू(गुडघे) बस्ती, कटी(कंबर) बस्ती, मन्या(मान) बस्ती, हृदय बस्ती इत्यादी बस्तीचे काही प्रकार आहेत जे त्या ठिकाणच्या वेदना/विकार कमी करतात.

      एकदा बस्ती घेतलेला व्यक्ती जेव्हा पुन्हा भेटून हे विचारतो- डॉक्टर आज पोट साफ नाही झाले बस्ती देता का?, डॉक्टर बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? डॉक्टर पिरेड येणार आहेत पोट दुखी सुरु व्हायच्या आत बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? तेव्हा मनात आयुर्वेदाबाद्दलचा अभिमान अजून उंचावतो. धुळ्याला आदरणीय वैद्य.नाना ह्याच्या कडे आयुर्वेदाचे प्रात्यक्षिक शिकण्याचा योग आला.  बस्तीचा उल्लेख आल्यावर ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत *बस्ती घ्यावा बस्ती द्यावा बस्ती जीवीचा विसावा* तुम्ही स्वतः बस्ती घ्या आणि रुग्णांनासुद्धा द्या.

सध्या पंचकर्माचे रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्याचा ऋतू आणि त्यात स्नेहन, स्वेदन करण्याचा मजा वेगळाच असतो. आनंद देणारी प्रक्रिया आणि आरोग्याचे इतके फायदे करून देणारी चिकित्सा पंचकर्माशिवाय कोणती असेल बर?

चला तर  पंचकर्म करूया, बस्ती घेऊया आणि  आनंदी व  निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5A

बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*
*बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य*    

     बस्ती हि आयुर्वेदातील एक श्रेष्ठ चिकित्सा आहे. आयुर्वेदीय पंचकर्मात बस्तीला फार महत्व आहे. वाताच्या विकारावर बस्ती रामबाण अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदातील सर्व आचार्य, संहिता बस्तीच्या श्रेष्ठतेचे वर्णन करतात. औषधी काढा किंवा औषधी तेल वापरून बस्ती दिला जातो. सामन्य भाषेत ह्याला एनिमा म्हणतात. पण बस्तीला एनिमा म्हणणे योग्य नाही कारण बस्तीचे फायदे आणि उपक्रम त्याहून खूप वेगळे आहेत.

      बस्ती चिकित्सा वातविकार म्हणजे संधीवात, कंपवात, मांसपेशीगत वात( मस्कुलर पेन), सर्वप्रकारच्या वेदना डोके दुखी, पोटदुखी, मासिकपाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी इत्यादी अनेक वेदनाशमन करण्यासाठी बस्ती चिकित्सा केली जाते. एव्हडच नव्हे तर स्थौल्यता कमी करण्यासाठी लेखन व कर्षण बस्ती, गर्भाशयाच्या विकारांसाठी उत्तर बस्ती, हाडांची झीज भरून काढण्यासाठी तिक्तक्षीर बस्ती केला जातो. साधे पोट साफ होत नसेल तर बस्ती फार उपयोगी आहे. अश्या अनेक विकारांसाठी बस्ती चिकित्सा केली जाते. जानू(गुडघे) बस्ती, कटी(कंबर) बस्ती, मन्या(मान) बस्ती, हृदय बस्ती इत्यादी बस्तीचे काही प्रकार आहेत जे त्या ठिकाणच्या वेदना/विकार कमी करतात.

      एकदा बस्ती घेतलेला व्यक्ती जेव्हा पुन्हा भेटून हे विचारतो- डॉक्टर आज पोट साफ नाही झाले बस्ती देता का?, डॉक्टर बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? डॉक्टर पिरेड येणार आहेत पोट दुखी सुरु व्हायच्या आत बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? तेव्हा मनात आयुर्वेदाबाद्दलचा अभिमान अजून उंचावतो. धुळ्याला आदरणीय वैद्य.नाना ह्याच्या कडे आयुर्वेदाचे प्रात्यक्षिक शिकण्याचा योग आला.  बस्तीचा उल्लेख आल्यावर ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत *बस्ती घ्यावा बस्ती द्यावा बस्ती जीवीचा विसावा* तुम्ही स्वतः बस्ती घ्या आणि रुग्णांनासुद्धा द्या.

सध्या पंचकर्माचे रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्याचा ऋतू आणि त्यात स्नेहन, स्वेदन करण्याचा मजा वेगळाच असतो. आनंद देणारी प्रक्रिया आणि आरोग्याचे इतके फायदे करून देणारी चिकित्सा पंचकर्माशिवाय कोणती असेल बर?

चला तर  पंचकर्म करूया, बस्ती घेऊया आणि  आनंदी व  निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5A

Sunday, December 25, 2016

नामकरण आणि आयुर्वेद

*आयुमित्र*

*नामकरण  आणि आयुर्वेद*

सध्या एका नाम करणाची चर्चा संपूर्ण भारतात सुरु आहे ती म्हणजे सैफ व करिनाचा मुलगा तैमूर ह्याची. हे नामकरण चूक का बोरोबर हा माझा विषय नाही. परंतु नामकरण कसे केले पाहिजे?  ते किती महत्वाचे आहे ह्याची माहिती व्हावी म्हणून आजचा लेख.

*आयुर्वेदीय नामकरण संस्कार*

   आयुर्वेदाने नामकरणाला एक संस्कार मानला आहे. मतापितांनी शुचिर्भूत होऊन इष्टदेवांचे पूजन करून नामकरण करायचं अस आयुर्वेद सांगते. 

केव्हा करावे?- 10व्या,  11व्या किंवा 12व्या दिवशी 

*नामकरण कसे करावे?*

1) नाव ठेवताना प्रथम अक्षर घोषवर्ण असावे. म्हणजेच क वर्ग, च वर्ग इत्यादी असे असावे व शेवटचा वर्ण उष्मवर्ण श, ष, स, ह इत्यादी.वर्ण येणारे ठेवावे.

2) नाव अतिशय लांबलचक असू नये.

3) आपल्या शत्रूचे किंवा शत्रूशी मिळते जुळते नाव असू नये.

4)नाव हे नक्षत्र, किंवा आपल्या इष्ट देवतांच्या नावाने युक्त असावे. 

5) नाव हे क्रूर असू नये.

6) अयोग्य नावामुळे बालकाची समजात चेष्टा होते, मनात नामाविषयी घृणा निर्माण होते. म्हणून नाव हे अनुकूल असल्यास ते सुख, संतोष आणि आत्मविश्वास बालकाच्या मनात निर्माण होण्यात मदत होते. यासाठी योग्य नामकरण होणे महत्वाचे आहे. 

संदर्भ- अष्टांग संग्रह 1/29,30, 

मतापितांनी विचारपूर्वक नामकरण संस्कार केल्यास हाबालकाच्या सामजिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील ह्यात शंका नाही. 

*वैद्य भूषण मनोहर देव*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*7588010703/8379820693*
*drbhushandeo@gamil.com*

http://wp.me/p7ZRKy-5y

Wednesday, December 21, 2016

सर्दीची कारणे

😤  सर्दीची कारणे  😤

सन्धारणाजीर्णरजो$तिभाष्यक्रोधर्तुवैषम्यशिरो$भितापै: प्रजागरातिस्वपनाम्बुशीतैरवश्यया मैथुनबाष्पधूमै: ||

१. नेहमी मल मुत्र शिंक आदि १३ वेगांचे धारण केल्यामुळे
२. नेहमी अर्जीर्ण होत असेल तर
३. धुलिकण नियमित नाकात जात असतिल तर
४. नियमित अत्याधिक प्रमाणात बोलण्याने
५. नेहमी राग येत असेल तर
६. ऋतुंचे वैषम्य असताना
७. नियमित डोकेदुखी असेल तर
८. नियमित रात्री जागरण होत असेल तर
९. अतिप्रमाणात झोप घेतल्या कारणाने
१०. थंड पाणी नियमित वापरल्या कारणाने
११. दव पडल्यामुळे
१२. अत्याधिक प्रमाणात मैथुन कर्माचा उपयोग केल्याने
१३. अधिक प्रमाणात अश्रु निघाल्याने
१४. धुर अत्याधिक प्रमाणात लागत असेल तर
सर्दीचा त्रास होतो.

😤 सर्दीतुन होणारे आजार 😤

बाधीर्यमान्ध्यमघ्रत्वं घोरांश्च नयनामयान्|
शोफाग्निसादकासांश्च वृध्दाः कुर्वन्ति पीनसाः|| यो.र.

सर्दी अतिशय साधा common होणारा आजार आहे. पण जास्त दिवस शरीरात टिकला तर मात्र वाढुन बहिरेपणा (deafness), डोळ्यांची क्षमता vision कमी होणे, सुज, भुक मंद होणे, त्रासदायक सहज दुरूस्त न होणारा खोकला दमा असे अनेक उपद्रव स्वरूपी प्राणाशी संबधीत आजार उत्पन्न करतो. जे दुरूस्त होण्यास कष्टदायक असतात. सर्दी सारख्या साध्या पण प्राणाशी संबधीत आजाराची उपेक्षा केली असता भविष्यात गंभीर उपद्रव स्वरूप आजारांचा सामना करावा लागतो हे निश्चित. वेळीच उपचार फायद्याचे.
स्वभावपरमवादाने म्हणजे स्वतः शरीराने जर आजार कमी झाला तर औषधींची आवश्यकता नाही. पण शरीर स्वतः सर्दीचा त्रास दुरूस्त करू शकत नसेल तर मात्र औषधींची मदत शरीरास आवश्यक. त्यावेळी आजार तात्पुरत्या उपायांनी कमी करण्यापेक्षा पुन्हा त्रास होऊ नये किंवा अपथ्याने त्रास पुन्हा झालाच तरी तो शरीराने स्वतः स्वभावपरमवादाने दुरूस्त व्हावा अशी प्रकारची शरीराचे बल वाढविणारी चिकित्सा आवश्यक असते.
सर्दीच्या कारणांकडे दुर्लक्ष करू नये.
नाहीतर उपद्रवांचा त्रास सहन करावा लागु शकतो कायमस्वरूपी...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

Sunday, December 11, 2016

औदुंबर/उदुंबर आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*

*औदुंबर/उदुंबर आणि आपले आरोग्य*

आज श्री.दत्त जयंती. श्री दत्तात्रयाची उपासना स्मरण होताच औदुंबराचे झाड नक्कीच डोळ्यसमोर येणार. अनेक दत्तभक्त आपल्या भक्ती भावाने औदुंबराच्या प्रदक्षणा मारताना आपल्याला दिसतात, झाडाखाली बसून उपासना/साधना करतांना दिसतात तर कुणी फुल वाहताना दिसतात. अशी हि वेगवेगळ्या पद्धतीची *वृक्ष उपासना* आपल्याला भरतातचब बघायला मिळू शकते. दत्तप्रिय औदुंबर ह्याचे आध्यत्मिक दृष्ट्या महत्व तर आहेच पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्व आहे.

*शारीरिक आरोग्य आणि औदुंबर*

        औदुंबरचे झाड बघितले नाही असा नर दुर्लभच. कारण सर्व भारत भरात औदुंबरची झाडे बघयला मिळतात. लालबुंद फळे, हिरवी कच्ची फळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी खाल्ली सुद्धा असतील. औदुंबराची साल, दुध, फळ व मुळांचा रस ह्या सर्वांचा औषधी उपयोग आहे. औदुंबर हे मुख्यतः दाह कमी करणारे आहे. आम्लपित्त/एसिडीटी कमी करणारे आहे. कावीळ, मूत्ररोग, प्रमेह, तृष्णा, गर्भपात, जुलाब अश्या अनेक व्याधींवर औदुंबराचा उत्तम उपयोग आहे. एव्हडेच नाहीतर काही विषारी वनस्पतीच्या प्रभावाला सुद्धा औदुंबर कमी करते. असे बहूउपयोगी औदुंबर आहे. ( *सूचना-आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊनच औदुंबरच्या विविध अंगांचा उपयोग करावा.* )

*मानसिक आरोग्य आणि औदुंबर*

     जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा भगवान अत्यंत  क्रोधीत होते त्यांचा शारीरक व मानसिक दाह शांत होत नव्हता तेव्हा त्यांनी औदुंबराच्या झाडत त्यांचे नख टोचले होते. हे केल्यावर त्यांचा दाह कमी झाला. अशी आख्यायिका सुद्धा आहे.  औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात राहिल्याने  मनःशांती मिळते. ज्यांना क्रोध, चिडचिडेपणा आहे, अश्यांनासुद्धा ह्या औदुंबर वृक्षाची सेवा केल्यास लाभ मिळतो. असा आमचा अनुभव आहे.

     चला तर औदुंबर वृक्षाची उपासना करूया शरीर व मनाला  स्वस्थ ठेवूया.

-वैद्य भूषण मनोहर देव.

*ज्योती आयुर्वेद, जळगाव* 8379820693/7588010703
drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5f

Friday, December 9, 2016

पथ्य व अपथ्य

🌹 पथ्य व अपथ्य  🌹

पथ्यं पथो$नपेतं यद्यच्चोक्तं मनसः प्रियम् |
यच्चाप्रियमपथ्यं च नियतं तन्न लक्षयेत् ||
मात्राकालक्रियाभूमिदेहदोषगुणान्तरम् ||

जो आहार आहारीय पदार्थ शरीरातील स्रोतसांकरिता अहितकर नाहीत आणि शरीर मन दोन्हींकरिता हितकारक आहेत अशा पदार्थांना पथ्यकर खाण्यास उपयुक्त पदार्थ म्हणतात.
याऊलट जो आहार शरीरातील स्रोतसांकरिता तसेच मन शरीराकरिता अहितकर असतो अशा आहार अपथ्यकर खाण्याकरिता अहितकरच असेल.
पथ्य व अपथ्य हे निश्चित कधीच नसते.
कारण पदार्थाच्या मात्रेनुसार, काळानुरूप, क्रिया संस्कारारूनुप, देशानुरूप, प्रत्येकाच्या शरीरानुसार, शरीरातील दोषांच्या अवस्थेनुसार परिवर्तन दिसुन येईल...
काही वेळा पथ्यकर आहार अपथ्यकर बनेल तर काही वेळा अपथ्यकर आहार पथ्यकर बनेल.
यामुळेच पथ्यकर व अपथ्यकर याची निश्चिती मात्रा काल क्रिया संस्कार, देश, देह, दोष यानुसारच ठरवावी लागेल...

समजण्यासाठी उदाहरण

दुध पथ्यकर जीवनीय पदार्थ आहे...
अत्याधिक मात्रेत अपथ्यकरच होईल.
दुध फ्रीजमधुन काढुन तसेच गरम न करता प्याले किंवा न तापवता थंडच दुध प्याले तर अपथ्यकरच होईल.
दुध फळांसह फ्रुटसलाड मिल्कशेक स्वरूपातील वा मीठासह वा आंबट पदार्थांसह नेहमीच अपथ्यकर अहितकारकच असेल.
अनुप देशात अत्याधिक दुग्धपान हे देशाच्या विरूध्दच म्हणजे अपथ्यकरच होईल.
शरीरातील कफदोष वाढलेला असताना किंवा नविन ताप असताना दुग्धपान विषवत अपथ्यकारक अहितकारकच असेल.
स्थुल देहात म्हशीचे दुध अपथ्यकारकच होईल...
असा प्रत्येक आहारीय पदार्थाचा प्रत्येक मनुष्यानुसार वेगवेगळ्या पध्दतीने विचार करावाच लागतो
व्यक्तीपरत्वे पथ्यकारक व अपथ्यकारक पदार्थ बदलतील. यात कुठलीही शंका नसावी.

वैद्य गजानन मॅनमवार
Mob no - 9028562102, 9130497856

Thursday, December 8, 2016

शारीरिक आणि मानसिक स्नेहन आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*

*शारीरिक आणि मानसिक स्नेहन आणि आपले आरोग्य*

    हिवाळ्याचे दिवस आहेत थंडीपण खूप पडली आहे आणि वातावरण सुद्धा थंड झाले आहे. ह्या बाह्य वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा झालेला दिसून येतो. त्वचा कोरडी पडते, भूक वाढते, लघवीला वारंवार लागते. पावसाळ्यात व हिवाळ्यात वातावरणातील शील गुणामुळे शरीरातील वात वाढतो. तसेच शरीरातील रुक्षता वाढते आणि सांधेदुखी, अंगदुखीचे त्रास सुरु होतात. तर उन्हाळ्यात वातावरणात उष्ण गुण वाढलेला असतो ह्यामुळे शरीरातील उष्ण गुण वाढतो आणि रुक्षता सुद्धा वाढते. ह्यामुळे शरीरात दाह निर्माण होतो. स्नेहनाची खरी गरज हि हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा ह्या तिन्ही ऋतूत असते.

*शारीरिक स्नेहन म्हणजे काय?*

       स्नेहन म्हणजे तूप व तेल ह्यांचा शरीरातील उष्णता, रुक्षता, कोरडेपणा म्हणजेच वात आणि पित्त कमी करण्यासाठी उपयोग करणे होय. बाह्यस्नेहन म्हणजे त्वचेचा कोरडेपणा व उष्णता कमी करण्यासाठी तेल व तुपाचा उपयोग करणे होय. आभ्यंतर स्नेहन म्हणजे तेल व तूप हे शरीराच्या आतील दाह/उष्णता/पित्त व शीतता/रुक्षता/वात कमी करण्यासाठी उपयोग करणे होय. वात वाढला असेल तर तीळ तेल हे उत्तम आहे. पित्त कमी करण्यासाठी गाईचे तूप हे उत्तम आहे, असे आयुर्वेद सांगते.  दररोज अंगाला तेल लावणे( अभ्यंग करणे) व जेवणात तेल व तुपाचा वापर करणे हे सुद्धा स्नेहनच आहे. आणि ते केलेही पाहिजे.

*मानसिक स्नेहन म्हणजे काय?*

     जसे तेल व तूप वापरून शरीरातील कोरडेपणा, उष्णता, रुक्षता, दाह, अंगदुखी ह्या घालवता येतात तसेच मानाचे विकार सुद्धा कमी करता येतात.  काही कारणाने मनातील राज व तम गुण वाढतात आणि मनस्ताप(उष्णता/दाह), निराशा(रुक्षता), निरसता/एकाकी पणा(कोरडेपणा) निर्माण करतात.  ह्यावर सुद्धा स्नेहनाचा उपयोग करता येतो. ते स्नेहन कोणते? तर ते स्नेह म्हणजे “सत्व गुण वाढविणारे घटक” होय. सत्वावजय चिकित्सा सांगताना आयुर्वेद म्हणतो कि आध्यत्मिक ज्ञानाने, सात्विक आहाराने( दूध, तूप, फलाहार आदी) सत्वगुण वाढवता येतो. हा सत्वगुण वाढून मनात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया, ममता, आदर निर्माण होतात. ह्यांचा उपयोग करून नात्यात आलेली रुक्षता, एकाकीपणा, मनस्ताप व निराशा नक्कीच कमी करता येईल.  

चला तर शरीराला व मनाला स्वस्थ ठेवूया, स्नेहन करूया.

( वरील स्नेहन विषयक माहिती हि स्वस्थ व्यक्तींसाठी आहे. स्थूलता, सूज, इत्यादी विकार असल्यास आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. आभ्यंतर स्नेह व बाह्य स्नेह मात्रासुद्धा त्यांच्याच सल्ल्याने घ्यावी.)

*-वैद्य भूषण मनोहर देव.*

*ज्योती आयुर्वेद, जळगाव 8379820693/7588010703

drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5a

Monday, December 5, 2016

शरीरातील काळेधन आणि आयुर्वेद

   
*आयुमित्र*
*शरीरातील काळेधन आणि आयुर्वेद*

  स्वस्थ शरीर हे आपले धनच आहे. म्हणून ‘हेल्थ इज वेल्थ’ असे म्हणतात. आजकाल काळ्याधनाची चर्चा संपूर्ण भारतात होते आहे. ह्याच निमित्याने शरीरातील काळ्याधनाची चर्चा करणे सुद्धा आज गरजेचे आहे. त्यासाठीच आजचा लेख.   

*माझ वजन का वाढतंय?*

      आज हा प्रश्न अनेकांना पडतों आहे. कारण, स्थूलता ह्या रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. ह्यातूनच डायबेटीस, बिपी, लखवा, वंध्यत्व इत्यादी आजार होत आहेत. स्थौल्यता हा आजार संपूर्ण जागासमोर एक आव्हान म्हणून पुढे येतो आहे. स्थौल्यता कमी करणे फार कठीण आहे असे अनेकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून दिसून आले आहे. परंतु संकल्प असल्यास निश्चितच करता येते. मुकेश अंबानीचे सुपुत्र व आमिर खान ह्यांची उत्तम उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आपण सुद्धा निश्चितच करू शकतो.

*स्थौल्यता/वजन कसे वाढते बर?*

          आधुनिक शास्त्र असे सांगते कि, आपण दररोज आपल्या शरीराला गरज असेल तेव्हडेच अन्न घेतले पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त घेतल्यास ते चरबीच्यारूपाने शरीरावर साचून राहते. हि चरबी म्हणजे शरीराचे काळेधनच आहे. पैसा कमविला पाहिजे पण त्याचा टॅक्स/कर चुकविला पाहिजे म्हणजे न रेड ची भीती ना सर्जिकल स्ट्राईकची भीती. तसेच, जेवढे अन्नरुपी उर्जा घेतो आहे तेव्हडी वापरा आणि व्यायामरुपी टॅक्स/कर दररोज चुकवा नाहीतर चरबी रुपी काळेधन शरीरात जमा होईल आणि एकदिवस अटॅक येईल आणि बायपाससर्जरी करण्याची वेळ येईल. 

*आयुर्वेद काय सांगते?*

      आयुर्वेद म्हणते कि, अधिक मात्रेत आहार घेतल्याने, जड, गोड, थंड, तेलकट/तुपकट अन्न जास्त खाल्याने, व्यायाम न केल्याने, दिवसा झोपल्याने, सदैव चिंता रहित राहिल्याने व अनुवांशिक कारणाने स्थौल्याता हा रोग होतो.

*वजन कमी करण्यसाठी काय करावे?*

   काही उपाय आहेत जे प्रत्येक स्थूल व्यक्ती करू शकतो म्हणजे आपल्या शक्तीनुसार व्यायाम करणे. आहार काय घ्यावा? कॅलेरीज किती घ्यायच्या? किती वेळ जेवायचे? ह्याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे नाहीत. ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार व व्यायामाचे नियोजन करावे. 

चला तर आपले शरीरातील चरबीरुपी काळेधन कमी करूया आणि स्वस्थ राहूया. 

  *-वैद्य भूषण मनोहर देव
ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693/7588010703*

drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-52

Wednesday, November 23, 2016

मेंटल जिम, आयुर्वेद आणि आरोग्य

#आयुमित्र

मेंटल जिम, आयुर्वेद आणि आरोग्य

       मेंटल जिम? हा काय नवीन प्रकार बर आता? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जिम म्हणजे निरोगी रहाण्यासाठी शारीरक कसरत करण्याचे एका बंदिस्त ठिकाण. शरीर निरोगी राहण्यासाठी जसे जिम आहे, त्याच प्रमाणे मन सुदृढ रहाण्यासाठी सुद्धा मेंटल जिम असते. ती कशी ते बघूया.

मेंटल जिम आणि आयुर्वेदीय धारणीय वेग

दैनंदिन जीवनात बरेच अस प्रसंग येतात जिथे आपल्याला चीड येते, राग येतो, लोभ होतो, ईर्षा होते अश्या वेळी आपण त्याठिकाणी त्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त करीत असतो. ह्यामुळे अशांती, निराशा, ताण आपल्याला येत असतो. आयुर्वेद म्हणते कि लोभ, शोक, भय, क्रोध/राग, अहंकार, निर्लज्जता, ईर्षा, आसक्ती, दुसरयाचे धन मिळविण्याची इच्छा ह्या मनाच्या वेगाचे आडविण्याची कसरत आयुर्वेदाने करायची सांगितली आहे. ह्या मेंटल जिम मुळे मनाच्या पेशी अधिक मजबूत होतात आणि मन निरोगी राहते.

ज्यांना काही आजार आहेत, विशेषतः स्थौल्य, डायबेटीस, आम्लपित्त इत्यादी कि ज्यामध्ये पथ्य पाळणे महत्वाचे असते. बऱ्याच पदार्थ्र ऑफर केल्यावर आपल्याला नाही म्हणता येत नाही, जसे स्वीट्स, आईसक्रिम, फास्टफूड, कोल्डड्रिंक्स अश्यावेळी सुद्धा मेंटल जिम उपयोगी पडते. मनाला नाही म्हणण्याची कसरत आपण केली तर बरेच आजार आपण दूर ठेवू शकतो.

चला तर, शरीर व मनाला निरोगी ठेवूया आणि मेंटल जिम करूया.  

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693

drbhushandeo@gmail.com

Tuesday, November 22, 2016

गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद

#आयुमित्र

गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद

     सध्या लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. अनेक तरुण जोडपी आपल्या जीवनाची नवी सुरवात करणार आहेत. लग्न झाल्यानंतर पतीपत्नी संततीप्राप्ती गर्भाधानाकडे वळतात. आयुर्वेदात ह्याला सुद्धा एक संस्कार म्हंटलेले आहे. उत्तम व निरोगी संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असल्यास उचित गर्भाधान विधी करणे महत्वाचे आहे.
गर्भाधनाची पूर्वतयारी कशी करावी?

“शुध्दबिजा पोटी फळे रसाळ गोमटी..|”

जसे उत्तम व निरोगी फळासाठी बीजही उत्तम व शुध्द हवे, तसेच निरोगी व उत्तम संतती प्राप्तीसाठी शुक्र(पुरुष बीज) व शोणित( स्त्रीबीज) हे शुध्द असणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने ह्यासाठी उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. शुध्द स्त्री व पुरुषबीजासाठी पतीपत्नीने खालील उपाय करावे.

1) दोघांनी वैद्यानकडून शरीरशुद्धी म्हणजेच पंचकर्म करून घ्यावे.

2) पुरुषाने गाईचे दुध, तूप आहारात घ्यावे तर स्त्रीने तीळ तेल व उडीद ह्याचा आहारात वापर करावा.( टीप– सोबत इतर आहार सुद्धा घेऊ शकता पण प्रामुख्याने वरील आहार घ्यावा. तसेच आपल्या वैद्यांशी संपर्क करून ह्या आहाराचे प्रमाण निश्चित करून घ्यावे.)

3) एक महिनाभर वरील आहार घ्यावा व ह्याकाळात दोघांनी ब्रम्हचर्य पालन करावे.(शरीरसंबंध ठेवू नये)  

वरील उपायांनी स्त्री व पुरूषबीज सुदृढ व शुध्द होते आणि पुढे उत्तम संतातीसाठीचे गर्भाधान करता येते. 

निरोगी संतती हि निरोगी समाज निर्माण करेल आणि निरोगी समाज निरोगी देश निर्माण करेल. 

(आजचा लेख खास माझ्या सर्व नव वर व वधु मित्र मैत्रीणीना समर्पित)

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद, जळगाव 8379820693

drbhushandeo@gmail.com

Sunday, November 20, 2016

डायबेटीस आणि आयुर्वेद

*आयुमित्र*

*डायबेटीस आणि आयुर्वेद*

     आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते.

*ह्याचे कारण काय?*

1) हाय कॅलरी असलेला आहार.

2) वाढलेले व्यसनांचे प्रमाण.

3) व्यायामाचा अभाव

4) स्थौल्य

5) वाढता मानसिक ताण-तणाव

6) बदलती जीवनशैली

*आयुर्वेद काय म्हणते?*

    *“प्रकृष्टोमेह: यास्मिन रोगे स प्रमेह:* म्हणजेच ज्या रोगात मुत्राचे प्रमाण वाढते (प्रभुताविलमुत्रता) तो प्रमेह. प्रमेह हा व्याधी डायबेटीस ह्या व्याधीशी मिळता-जुळता आहे. डायबेटीससाठी प्रचलित शब्द ‘मधुमेह’ हा प्रमेहाच्या वाताज प्रकारपैकी एक आहे.

*आयुर्वेदानुसार प्रमेहाची करणे-*

    नवे धान्य वापरणे, नवे तांदूळ, उडीद व डाळींच अतिप्रमाणात घेणे, खीर, खिचडी, भात अधिक घेणे, नवीन मद्य/दारू पिणे, न विरजलेले दही, ताजे दही, द्रव पदार्थ, गोड पदार्थ अधिक प्रमाणात घेणे, पंचकर्म व व्यायाम न करणे, अधिक झोपणे, झोपून वा बसून राहणे, हे सर्व करणे शरीरात कफ, चरबी वाढवतात आणि प्रमेह हा व्याधी उत्पन्न करतात.

    चला तर मित्रांनो, *योग्य व गरजे इतकाच आहार घेऊया आणि पुरेसा व्यायाम करूया आणि भारताला डायबेटीस मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया.*

*वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद, जळगाव* *
8379820693

http://wp.me/p7ZRKy-4k

Visit Our Page