Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
Showing posts with label सौंदर्य. Show all posts
Showing posts with label सौंदर्य. Show all posts

Wednesday, June 1, 2016

वांग

आयुर्वेद कोश ~ वांग !!

''चिनॉय सेठ . . चांद पे दाग और हसीन चेहेरे पे वांग शोभा नही देते ''

राजकुमार ने असा कोणताही डायलॉग मारलेला नाही . पण हा डायलॉग मात्र खरा आहे . वांग याने त्रासलेले अनेक चेहेरे आजूबाजूला पाहायला मिळतात . यातील बहुतेकांना या वांगाचा 'न्यूनगंड ' असतो . याच न्यूनगंडातून अनेक क्रीम /जेल / औषधे यांचा भडीमार अंगावर आणि त्वचेवर सुरु असतो . एका दृष्टीने हे पाहायला गेले तर हे साहजिक आहे कारण त्वचा ही जरी शरीरावर असली तरी तिच्याशी निगडीत भाव -भावना -संवेदना या थेट मनाशी जोडलेल्या असतात . त्यामुळे त्वचेचा 'टोन ' बिघडला की मनाचा 'तोल ' हा जातो . तर . . . सौंदर्याला बाधा आणणारे सोरिएसिस सारखे गंभीर . . पिंपल्स सारखे जाहिराती आजार सोडले तर व्यंग / वांग हा आजार महत्वाचा आहे !

आधुनिक विज्ञानानुसार मेलेस्मा ( वांग ) हा आजार मेलेनोसाइटस यांचा अधिक प्रमाणाने होतो . स्त्रियांच्यात अधिक आढळणारा हा आजार घडवण्यात 'इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ' या संप्रेरकांचा वाटा असतो . तसेच 'थायरोइड ' या आजारात मेलेस्मा वाढल्याचे दिसून येते इत्यादी !!

आयुर्वेदानुसार क्रोध आणि परिश्रम याने प्रकुपित झालेला वायू हा पित्तसह मुखात येउन तोंडावर वेदना रहित , पातळ , काळसर असे डाग उत्पन्न करतो . त्याला 'वांग ' असे म्हणतात .

हा आजार एका दिवसात होत नाही . अनेक काळ वात आणि पित्ताचा प्रकोप करणारे हेतू सेवन करत राहिल्याने  हे दोष बिघडतात आणि वांगाची उत्पत्ती होते . मग हे दोष फक्त मुखातच जातात का ?? नाही . . काही वेळा हे दोष संपूर्ण शरीरात पसरून वेदना रहित आणि काळे असे डाग (आयुर्वेदोक्त शब्द मंडल ) उत्पन्न करतात याला 'निलिका ' असे नाव आहे .

आयुर्वेदानुसार यावर करता येण्या सारखे सोपे उपाय :-

१. मंजिष्ठा मधात वाटून त्याचा लेप वांगावर करावा .
२. जायफळाचा लेप लावावा .
३. मसूर दुधात वाटून त्यात तूप मिसळून त्याचा लेप लावावा . आयुर्वेद सांगतो , असा लेप लावल्याने चेहेरा ७ दिवसात कमळाप्रमाणे सुंदर होतो .
४. रक्तचंदन , लोध्र आणि कोष्ठ यांचा लेप लावावा . इत्यादी !!

सदर उपाय हे केवळ लेप स्वरूपाचे आहेत . वास्तविक 'वांग ' यासाठी रक्त मोक्षण , विरेचन इत्यादी पंचकर्मातील उपचार तसेच पित्त शामक , वात शामक , रक्त दुष्टी दूर करणारे , रक्त प्रसादान करणारे असे अभ्यंतर औषध उपचार आवश्यक असतात .

केवळ लेप देण्याचे कारण असे की , वांग घालवणारी क्रीम ही 'मेलेनीन 'वर काम करणारी असतात . आपल्या सौंदर्यासाठी चेहेऱ्यावर रासायनिक क्रीम चोपडून त्याच्या साईड इफेक्ट निस्तरण्या  साठी अजून एक क्रीम बाळगणे फारसे व्यावहारिक नाही . त्यामुळे हे आयुर्वेदिक लेप फायद्याचे ठरतात .

हे लेप लावत असताना किंवा वांगावर उपचार  घेत असताना डोकं आणि मन शांत ठेवणे फार महत्वाचे आहे . . . 'रागाने ' अनेक गोष्टी बिघडतात . . . . वांग हा त्यातलाच एक उपद्रव !!

(टीप - मेलेस्मा = वांग हे दोन्हीतील काही  समान लक्षण असल्याने लिहिले आहे . आधुनिक विज्ञान व आयुर्वेद यांच्यात हेतू , संप्राप्ती व चिकित्सा यात मुलभूत फरक आहेत . पण बिगर आयुर्वेदिक लोकांना पांडू म्हंटल की समजत नाही पण 'एनिमिया ' म्हंटले की ओळखीचा शब्द वाटतो . त्यामुळे येथे केलेली तुलना ही विषय स्पष्ट करायला तात्कालिक स्वरुपात केली आहे )

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश


9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Tuesday, May 17, 2016

चेहरयावरील सुरकुत्या

               चेहरयावरील सुरकुत्या

          त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी ब्युटिपार्लरच्या चकरा, वारंवार फेशीयल करणे, जाहीरातीमध्ये दाखविण्यात येणारी विविध महागडी क्रिम्स वापरणे इत्यादी उपाय केले जातात. वयाच्या एका ठरावीक मर्यादेनंतर सुरकूत्या पडू लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. परंतु वय कमी असताना सुरकुत्या पडणे हे आरोग्यामध्ये बिघाड दर्शिवणारे आहे. शरीरामध्ये रुक्षता किंवा कोरडेपणा वाढणे हे सुरकुत्या पडण्याचे एक कारण होय. चेहरयावरील त्वचा मुळात नाजुक असल्याने वयाचा किंवा कोणत्याही आजाराचा चेहरयावर लगेच बदल जाणवतो, कोरडेपणा वाढला की त्वचा आकसल्यासारखी होते . एरवी आपण पाहतो की भाज्या किंवा फळे बाहेर हवेत तशीच राहिली की त्यातील रस किंवा ओलावा कमी होउन ते वाळतात व लगेच सुरकुततात. संत्री , चिक्कु, आंबा किंवा सफरचंद यासारखया फळामध्ये आपण हा बदल अनुभवू शकतो. तसेच काहीसे त्वचेचे होते, त्वचेमधील स्निग्धताच कमी झाल्याच हा परिणाम असतो. कारण काहीही असली तरी चेहरयावरील सुरकुत्यामुळे सौंदर्यात बाधा येते, हे निश्चित. मग यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण बघु या.

* यामध्ये आयुर्वेदातील रसायन चिकित्सा ही अत्यंत फलदायी आहे. रसायन याचा अर्थ पेशींचे पुनर्जीवन करणारी चिकित्सा होय. आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थ उत्तम रसायन गूण देणारे असतात. जसे दूध, तूप, मध आणि आवळा, फळे इत्यादी पदार्थ प्रत्येकाला सहज पणे मिळतील असे आहेत. आवळा आपण मोरावळा किंवा च्यवनप्राश या स्वरुपा मध्ये वर्षभर घेऊ शकतो. आपल्या प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने आपण रसायन विधी सेवन करावा. 

* बाह्य उपचारामध्ये सर्वांगाला अभ्यंग म्हणजे मसाज हा अत्यंत महत्वाचा उपचार होय. मसाज केल्याने त्वचा व स्नायू यांना बळ मिळते. त्वचेचा नॅचरल टोन टिकून राहतो. त्वचेचे झिजलेले थर निघुन जातात व नवीन तजेलदार सूंदर मुलायम त्वचा प्राप्त होते. मालिशकरिता तीळ तेल, कुंकुमादी तेल, बदाम तेल इत्यादी तेल प्रकृतीनूसार वापरावे. 

* चेहरयाला मसाजसोबत काही विशिष्ट वनौषधींचे लेप लावल्याने देखील फायदा होतो. हे लेप ठरावीक वेळेस व ठरावीक जाडीचे लावायला हवे. मसाज वाफारा व त्यानंतर लेप हे उपचार तदण्यांच्या देखरेखीखाली करावे.

* कोरफडीचा गर काढुन तो हळद टाकून फेसावा व चेहरयाला लावावा. मध आणि साय हे मिश्रण चांगले घोटून चेहरयाला चोळावे. 

* मसूरीचे पीठ, काकडीचा रस व मध असा लेप एकत्र करुन नियमितपणे चेहरयाला लावावा.
असे काही घरघुती उपचार आपण सुरकुत्या घालविण्यासाठी करु शकतो. 

* त्यासोबत दररोज कमीत कमी ३० मिनीटे फिरायला जावे. योगासने करावीत. ओंकार, ध्यान, शवासन, सर्वांगासन इ. करावे. 

* सर्वात महत्वाचे ताण तणाव रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सदैव आनंदी राहावे.

डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पंचकर्म * त्वचा रोग़़ * सौदर्य समस्या * केसांचे विकार * गर्भसंस्कार
लातूर
मो. ०९३२६५११६८१

Sunday, May 15, 2016

सौंदर्याचे पैलू


सौंदर्याचे पैलू
सौंदर्याचे सर्व पैलू स्वतःत समाविष्ट केल्यानंतरच सुंदर व्यक्तीचे सौंदर्य परिपुर्ण होऊ शकते.
शारिरीक सौंदर्याबरोबरच मानसिक सौंदर्याचेही फार महत्व आहे. सुंदरतेचा अर्थ केवळ गोरीपान त्वचा, सुंदर नाक-डोळे, काळे घनदाट केसच नाही तर संपुर्ण शरीराची सूंदरता, सुडोलता आवशयक ऊंची , वजन, हावभाव , मधुरवाणी असणेही आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उठणे, बसणे, चालणे, बोलणे, कपडे घालण्याची पध्दत, व्यव्हारकुशलता, आपल्या कार्यातील दक्षता, अधिकार, कर्तव्याचे  भान, वडीलधारया व्यक्तींशी सन्मानजनक व्यव्हार, लहानांशी प्रेमपुर्वक व्यव्हार, निर्बल दुःखी लोकांबाबत दया, सामान्य न्यान या सर्व पैलूंचा विचार सौदर्याअंतर्गत केला जातो.
          मात्र या सर्व महत्वपुर्ण पैलुपुर्वी शरीर निरोगी राहणे हेही तेवढेच आवश्यक आहे. सौदर्यसाधनेत सर्वात प्रथम लक्षात घेण्याजोगा मुद्दाच आहे की आपले आरोग्य शारिरीक-मानसीक दृष्ट्या उत्तम राहत नाही, तोपर्यंत आपले सौदर्य आतून खुलणे शक्य नाही आणि बाह्यःत जोपासल्या जाणारया सौंदर्याची दीर्घकाळापर्यंत टिकण्याची मुळीच शाश्स्वती नाही. त्याकरीता आतूनच आपले सौदर्य कशाप्रकारे खुलविता येईल याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारची सुंदरता प्राप्त करण्यासाठी आपल्या आहारविहाराकडे योग्य लक्ष द्यायला पाहिजे.
               नियमितपणे योगासने व प्राणायामाचा अभ्यास करावा. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आहार सेवन इत्यादी नियमाचे नियमित पालन करावे. मानसिकरित्या स्वतःला प्रसन्न ठेवावे. जास्त चिंता करू नये. नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा.हसत राहावे. आशावादी व्हावे, तणावास आपल्या जीवनात स्थान देऊ नये.
            जीवनात चांगल्या प्रकारे जगावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आपण जसा व्यव्हार आपल्याशी ठेवतो तसाच व्यव्हार दुसरयांशी ठेवावा. दुसरयांचा आदर करावा. पण स्वतःचा सन्मानही कायम ठेवावा.              आत्मविश्वासासारख्या अमोघ शस्त्रास जीवनात महत्वपुर्ण स्थान द्यावे. योगाभ्यासाद्वारे शरीर निरोगी सुंदर व चेहरा आकर्षक बनविण्याचा प्रयन्त करावा. याप्रकारे सौंदर्याचे सर्व पैलु स्वतःच समाविष्ट केल्यानंतरच व्यक्तींचे सौदर्य परिपुर्ण होऊ शकते.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
OBESITY AND DIABETES REDUCTION CENTER
लातूर
व्हाँटस एप नंबर ०९३२६५११६८१

Friday, March 4, 2016

केसांच्या आरोग्यासाठी

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
केसांच्या आरोग्यासाठी
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शरीरात कितीही त्रास असतिल तरी तेवढे लक्ष दिले जात नाही. पण लोकांना दिसणारा केंसासारखा शरीराचा भाग बिघडला की लगेच अनेकांची झोप उडते.
केस हा आयुर्वेदानुसार हाडांचा मळ सांगितला आहे. केसांच्या तक्रारी मध्ये केस गळणे, पिकणे, कोंडा होणे या तक्रारींचा समावेश करता येईल.
केस हा पितृज वडीलांकडुन येणारा अवयव आहे त्यामुळे ज्या वयात वडीलांना केसांच्या तक्रारी सुरू त्याच वयात मुलांतही दिसु शकतात. किंबहुना आजच्या प्रदुषण युक्त आधुनिक काळात ह्या तक्रारी वडीलांना ज्या वयात उत्पन्न झाल्या त्यापेक्षा कमी वयात मुलांत दिसतात.
आधुनिक आहार, रासायनिक घटकांचा वाढता वापर खाण्यासाठी व तेल शाम्पु आदी बाह्य रूपाने केसांच्या तक्रारीसाठी कारणीभुत आहे.
पुर्णपणे कारणे टाळणे अशक्य आजच्या काळात पण काही गोष्टी नक्कीच केसांच्या आरोग्यासाठी करता येतील.
१. केसांना खोबरेल तेल नक्की लावावे. तेलाने केसांचे व पर्यायाने शरीराचे पोषण होते.
२. फ्रीजयुक्त पदार्थांचा वापर केस गळणारया लोकांनी पुर्णपणे टाळावा. वापर अधिक केस गळणे थांबवण्याची अपेक्षा करू नये.
३. साध्या मीठाऐवजी शेंदेलोण वापरावे. त्याचे आहारातील प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक नसावे.
४. केसात कोंडा अत्याधिक प्रमाणात असेल तर वैद्याकडुन सल्ला घ्यावा व आहार विहार त्यानुसार करावा.
५. केसांचे व शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विरूध्द आहाराचे सेवन टाळावे. यात मिल्कशेक, फ्रुटसलाड, शिकरण, फ्रीजचा अत्याधिक वापर, मुगाची खिचडी+ दुध आदींचा समावेश होतो.
नित्य विरूध्द आहारी लोकांनी केसांच्या गळती थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होणे अतिशय कठीण आहे.
केस पिकणे हे पित्तप्रकृती लोकांत, अनुवांषिकतेमुळे, मीठ क्षारांचा वापर आहारात अधिक प्रमाणात असेल तर उत्पन्न होऊ शकते.घडलेल्या कारणांच्या विरूध्द केलेले उपाय प्रयत्न सफल होऊ शकतात. अनुवांषिकतेमुळे उत्पन्न केसांच्या तक्रारी बीजदोषाने असल्याने दुरूस्त होण्यास अत्यंत कठीण असतात.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
नांदेड
9028562102, 9130497856

Monday, February 15, 2016

केस शरीरासाठी तैल


केस शरीरासाठी तैल
ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः|
मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्||
सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः|
तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ.
           शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे.
केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन शरीरूपी मुळांची शेवटची टोक केस मानता येऊ शकतात. ज्यांच्या साह्यायाने काही प्रमाणात तेलरूपी पोषण शरीरात पोहचवता येते. केसांना लावलेले तेल सर्व शरीरात पोहचते. फक्त केसांसाठी नाहीतर पुर्ण शरीरासाठी डोक्याला तेल लावणे आवश्यक आहे...
काही ब्युटीशिअन तेल लावु नये असे सांगतात. अशा प्रकारे डोक्याला तेल न लावणे म्हणजे शरीराला मिळणारा पोषणाचा १ मार्ग बंद करणे होय..
          नारळाचे व डोक्याचे रचनात्मक साधर्म्य असल्या कारणाने डोक्याला तेल लावण्याकरिता खोबरेल तेल उत्तम असते. प्रकृती अनुशंगाने योग्य सल्ल्याने इतर तेलही केसांना लावन्यासाठी वापरता येतील. केसांना तेल लावणे हे फक्त केसांसाठीच नाही तर सर्व शरीरासाठी उपयोगी असते.
केसांना तेल न लावणारयांनी याचा विचार जरूर करावा...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड.
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Friday, December 25, 2015

तारूण्यपिटिका पिंपल्स

तारूण्यपिटिका पिंपल्स

शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारूतशोणितैः| जायन्ते पिटिका यूनां विञ्येया मुखदुषिकाः|| वंगसेन
     सावरीच्या काट्याप्रमाणे युवांच्या चेहरयावर कफ, ...वात आणि रक्ताच्या बिघाडाने पिटिका (फोड) उत्पन्न होतात त्यांना तारूण्यपिटिका पिंपल्स म्हणतात..
    रक्त बिघाडाची कारणे पुर्वी पाहिलित ती कारणे टाळली आणि सोबत कफवाताला बिघडवणारा आहार विहार जर टाळला तर तारूण्यपिटिकेला दुर ठेवता येईल..


रक्त बिघडवणारी कारणे.......
१.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण high alcohol level hard drinks चे सेवन करणे
२.अतिनमकीन पदार्थांचे सेवन करणे, अतिआंबट पदार्थांचे सेवन करणे, अतिप्रमाणात तिखट पदार्थ खाणे, तिळाचे तेल खाणे, उडीद दाळ अधिक खाणे ही देखील रक्त बिघडवणारी कारणे आहेत.
३.दही दह्यावरचे पाणी, विरूध्द आहार सेवन करणे, सडलेले दुर्गंधीत पदार्थांच्या सेवनाने, जड पदार्थ खाऊन दिवसा झोपल्याने, अतिरागावणे, अति उन्हात फिरणे, आगिजवळ काम करणे, उलटी आदींचा वेग रोखल्याने specially नेहमी antaacid खाणे,मार लागणे, शारीरीक व मानसिक संतापाने, पुर्वीचा आहार पचला नसताना पुन्हा जेवन करणे आदी कारणामुळे देहाचा मुळ रक्त बिघडते. आणि बिघडलेले रक्त कफवाताला बिघडवुन चेहरयावर तारूण्यपिटिका पिंपल्स निर्माण करते. ज्या रक्तामुळे निर्माण झालेल्या असल्याने वेदना निर्माण करतात..
      त्याकरीताच देहाचा मुळ योग्य राहण्यासाठी वरील कारणे टाळावित. कारणे घडत असल्यास रक्तमोक्षन विरेचन औषधी जळु लावणे आदि उपक्रम वैद्याच्या सल्ल्याने करावेत. बाह्य औषधींचा उपयोग तात्पुरत्या स्वरूपात होतो. बिघडलेले रक्त सुधारल्याशिवाय तारूण्यपिटिका पिंपल्स पुर्णपणे कमी होत नाहीत. रक्त सुधारण्याकरिता पोटातुन औषधी घ्याव्या लागतात तसेच जळु लेप आदी local उपक्रमांनी दुरूस्त झालेले पिंपल्स पुन्हा चुकिची कारणे घडल्याशिवाय उत्पन्न होत नाहीत...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
रामानंद नगर
 पावडेवाडी नाका
नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102 ,9130497856

Monday, December 14, 2015

ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवा या थंडीच्या दिवसातही

ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवा या थंडीच्या दिवसातही

=====================================
कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. या ऋतूमध्ये तुम्ही वॅसलीन किंवा लीप जेलचा वापर करून ओठ काही काळासाठी नरम आणि सुंदर करता. परंतु ओठ दिवसभर सुंदर दिसण्यासाठी आणि नरम राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले घरगुती उपाय अवश्य करून पाहा.
हिवाळ्यात थंडीमुळे ओठांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धवून घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी, किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा. या उपायाने ओठ नरम आणि सुंदर राहतील. हा सोपा आणि रामबाण उपाय.
प्रत्येक ऋतूमध्ये ओठ सुंदर आणि नरम ठेवण्यासाठी देशी गुलाबाच्या पाण्यात भिजवलेल्या काही पाकळ्या दररोज ओठांवर रगडा. या उपायने तुमचे ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला लिपस्टिक लावण्याची गरज भासणार नाही.
ओठ फाटण्यावर रामबाण उपाय म्हणजे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासात परिणाम दिसतील.
विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील. ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असतील तर रात्री झोपताना ओठांना बदाम तेल लावा. दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ हळू हळू गुलाबी होतात.
ओठ जास्त प्रमाणात फाटले असेतील तर टमाट्याच्या रसामध्ये तूप किंवा लोणी मसळून ओठांवर लावावे. ओठ पूर्ववत होईपर्यंत हा उपाय चालू ठेवावा.
मध आणि लिंबू
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण एक तासभर ओठांना लावून ठेवा. त्यानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून कमीत कमी दोन वेळेस हे मिश्रण ओठांवर लावा. लिंबामुळे ओठांवरील काळसरपणा दूर होईल आणि मधामुळे ओठ कोमल आणि सुंदर होतील.
https://www.facebook.com/jitendra.ghosalkar.54
Dr. Jitendra Ghosalkar 

Saturday, December 12, 2015

🍀 केस शरीरासाठी तैल

🍀 केस शरीरासाठी तैल 

🍀
ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः|
मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्||
सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः|
तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ.
शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे.
केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन शरीरूपी मुळांची शेवटची टोक केस मानता येऊ शकतात. ज्यांच्या साह्यायाने काही प्रमाणात तेलरूपी पोषण शरीरात पोहचवता येते. केसांना लावलेले तेल सर्व शरीरात पोहचते. फक्त केसांसाठी नाहीतर पुर्ण शरीरासाठी डोक्याला तेल लावणे आवश्यक आहे...
काही ब्युटीशिअन तेल लावु नये असे सांगतात. अशा प्रकारे डोक्याला तेल न लावणे म्हणजे शरीराला मिळणारा पोषणाचा १ मार्ग बंद करणे होय..
नारळाचे व डोक्याचे रचनात्मक साधर्म्य असल्या कारणाने डोक्याला तेल लावण्याकरिता खोबरेल तेल उत्तम असते. प्रकृती अनुशंगाने योग्य सल्ल्याने इतर तेलही केसांना लावन्यासाठी वापरता येतील. केसांना तेल लावणे हे फक्त केसांसाठीच नाही तर सर्व शरीरासाठी उपयोगी असते.
केसांना तेल न लावणारयांनी याचा विचार जरूर करावा...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका 

Wednesday, October 21, 2015

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी 
आयुर्वेदामध्ये त्वचा, केस आणि शरीरासंबंधी विविध समस्यावर उपचार आहेत. खाली असे काही उपचार दिले आहेत. पण या उपचारांचा वापर करण्यापुर्वी छोट्या प्रमाणात वापर करून बघा.

विविध त्वचा प्रकारात वनौषधी फेस पॅक
त्वचेला उजाळा आणण्यासाठी व कांती चमकदार होण्यासाठी फेस पॅककोरड्या रुक्ष व सुरकुतलेल्या त्वचेसाठी
तेलकट त्वचेसाठी फेस पॅकऍक्‍ने व मुरमे होणाऱ्या त्वचेसाठी
डागयुक्त त्वचेसाठी फेस पॅकडाग आणि रंगासाठी
डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी क्रिमत्वचा उजळ करण्यासाठी
सर्वोपयोगी वनौषधीयुक्त फेस पॅककातडी वरील पांढऱ्या डांगासाठी

आरोग्यपुर्ण व तजेलदार त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक सर्व प्रकारासाठी उपयुक्त आहे. यामुळे मधील मृत पेशी काढुन टाकल्या जातात. यामुळे त्वचा ताणली जाउन त्वचेवरील डाग जातात. व त्वचा तजेलदार होते.

घटककृती
ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मुलतानी माती १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/८ टीस्पुनपाणी किंवा दुध यामधे मिसळुन वापरा

वर उल्लेख केलेल्या सर्व वनौषधी पावडर वर सांगितल्या प्रमाणात घेउन योग्य मिश्रण करा. त्यामधे योग्य प्रमाणात पाणी किंवा दूध घालुन पेस्ट तयार करा. पाण्याऐवजी उन्हाळ्यात गुलाबपाणी वापरू शकता. नीम व त्रिफळा त्वचा साफ करते व ताणते. मंजिष्ठा आणी चंदन कांती सुधारण्यास मदत करते.

तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचा थंड होते. व रंध्रे मोकळी/स्वच्छ होतात. व ताणली जातात. यामुळे मुरूमे/ऍक्‍ने होण्यास प्रतिबंध होतो.

घटककृती
नीम १/२ टीस्पुन, ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, चंदन १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/२ टीस्पुनपाणी किंवा दुधात मिसळून वापरा



Monday, October 24, 2011

स्वतःला उटणे लावणे

स्वतःला उटणे लावणे
१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. परत उलट्या दिशेने त्यावरून हात फिरवू नये. उलट्या दिशेने हात फिरवल्याने त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. लावतांना थांबून परत डावीकडून उजवीकडे यावे. कपाळाच्या पोकळीत साठलेल्या त्रासदायक स्पंदनांची गती ही डावीकडून उजवीकडे असल्याने त्याच पद्धतीने या स्पंदनांना कार्यरत करून उटण्यातील तेजोमय स्पर्शाने त्यांचे विघटन केले जाते.

२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे. या भागात सुप्त असणार्‍या त्रासदायक लहरींचे वहन दोन्ही बाजूंनी होत असल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण करून त्यांच्यातील त्रासदायक स्पंदनांना नष्ट करावे.

३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.

४. नाक : उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे आणि खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.

५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.
६. गालांच्या पोकळी : यांत केंद्रबिंदूशी अनेक टाकाऊ वायू घनीभूत झालेले असल्याने उटणे गालाला लावतांना गालाच्या मध्यभागातून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे. यामुळे गालातील मध्यपोकळीत घनीभूत झालेली त्रासदायक स्पंदने कार्यरत होऊन त्यांचे विघटन त्याच जागी होण्यास साहाय्य होते.

७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हालवून उटणे लावावे.

८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.

९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे

१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे. यामुळे चक्रे जागृत होतात. त्यानंतर दोन्ही हातांची बोटे छातीच्या मध्यरेषेशी येतील अशा पद्धतीने दोन्ही हात वरून खाली एकाच वेळी फिरवावेत.

११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला आणि चार बोटे दुसर्‍या बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.

१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.

१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा : पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा आणि तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.

१४. डोक्याच्या मध्यभागी : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

१. पाठ : दुसर्‍या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.

२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.



http://www.facebook.com/pappukaka5

Wednesday, June 29, 2011

महिलांमधील लठ्ठपणा -

भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.

यामागची काही कारणं :

* गरोदार महिलांना गर्भाच्या वाढीसाठी अधिक प्रमाणावर खायला दिलं जातं.

* बाळाला सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे बाळंतपणानंतर स्त्रियांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. गरोदरपणाच्या काळात वाढलेलं वजन आटोक्यात आणण्यासाठी फारसे प्रयत्न करताना त्या दिसत नाहीत.

* फास्ट फूड आणि स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर.

* पाटीर् किंवा अशाच काही प्रसंगांमध्ये करण्यात येणारं मद्यप्राशन आणि भरमसाठ खाणं.

* पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक तर फळांऐवजी कॅन्ड फ्रुटज्यूस घेतल्यानेही लठ्ठपणा वाढतो.

* नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये तणावाचं प्रमाण अधिक आहे. घरातील आणि कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे त्यांना स्वत:कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. लठ्ठपणामुळे महिलांना सांधेदुखी, उच्च रक्तदाब, मणक्याचा त्रास अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागते.
.....

उपाय :

* फ्रुटज्यूसपेक्षा फळं खाणं.

* पाटर््यांमध्ये भरपूर कॅलरीज असणारे अन्नपदार्थ टाळायला हवेत.

* बाहेरचे पदार्थ न खाता घरगुती पदार्थ खाण्याचा आग्रह धरा.

* गरोदपणात सकस आहार घ्या. यामध्ये आयर्न, प्रोटिन्स, कॅल्शियम अधिक असावेत.
गोड पदार्थ टाळा.

* लठ्ठपणाची फॅमिलीहिस्ट्री असेल, तर आहारातील तेलाचं प्रमाण कमी करा.

* रोजच्या रोज व्यायाम करायला हवा.

* बॉडी मास इण्डेक्स (बीएमआय) नियमित तपासा.

* वजन कमी करण्याचे शॉर्टकट् हे तात्पुरते असतात. वजन योग्य प्रकारे कमी करायचं, तर डायटिशियन, कौन्सिलर्स, डॉक्टर्स यांच्याकडून सल्ला घ्या.
 
वैद्य . जितेश पाठक 
धुले
  • 8275007220Mobile
  • 9960507983Mobile


Monday, January 3, 2011

आयुर्वेदाद्वारे केसांची निगा

 आयुर्वेदिक हर्बल कंडीशनर आणि कलप हे वापरासाठी पुर्णतः सुरक्षित आहेत. संबंधित मिश्रणाची सुकी पावडर बनवली आणि साठवली जाऊ शकते. ही साठवून ठेवलेली पावडर बराच काळानंतरही उपयोगात आणली जाऊ शकते. यामुळे केस मुलायम तर होतातच शिवाय केसांचे तुटणेही कमी होते. त्याचबरोबर केसांना चमकदारपणाही येतो.

केसांचा कंडीशनर
सामग्रीप्रमाणप्रक्रिया
बवाची एक ते दोन चमचे (बिया)
नागरमोटा एक ते दोन चमचे (मुळ)
तुळशी एक ते दोन चमचे रक्त चंदनाची भुकटी
प्रत्येकी एक भागसर्व सामग्री गरम पाण्यात चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी व त्याची पेस्ट तयार करावी. मिश्रणानाचा केसांवर चांगल्याप्रकारे लेप द्यावा. पाच मिनिटांनी केस पाण्याने धुवावेत.

ईतर औषधी जसे ब्रम्ही, भ्रिंगराज, मेहेंदी (हीना), कडुलिंब, जास्वंद, त्रिफळा.
आवळाप्रत्येकी दोन भाग
शिकाकाई भुकटीप्रत्येकी पाच भाग

वर उल्लेख केलेल्या औषधींची चांगली सुकी भुकटी बनवता व साठवता येते. साठवण्यासाठी फक्त सुक्या व हवाबंद डब्याचा वापर करावा. आंघोळीआधी ही भुकटी पाण्यात किंवा दुधात पेस्ट करुन वापरता येते.

केसांचा कलप
सामग्रीप्रमाणप्रक्रिया
मेहेंदी (हीना) आठ चमचेनमूद केलेली सामग्री गरम चहासोबत लोखडी भांड्यात २४ तासांसाठी भिजत ठेवावी. वापराच्याआधी दोन चमचे लिंबुचा रस किंवा विनेगर टाकावे. एक चमचा कॉफी किंवा कत्था मिसळावा. यामिश्रणाचा केसांवर जाड थर द्यावा व एक ते तिन तासांसाठी तसेच राहुन द्यावेत. नंतर केस पाण्याने धुवून घ्यावेत.
नीलीनी (विकल्पिक)आठ चमचे
आवळा/त्रिफळाचार चमचे

हे आयुर्वेदिक कलप पुर्णतः सुरक्षित असतात. तसेच त्यांचे कोणतेही दुष्परीणाम होत नाहीत. मिश्रणाची भुकती कॉफीमध्ये भिजत घातल्याने वापरल्यानंतर केसांना तपकिरी रंगाची झालर येते


आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी

आयुर्वेद्वारे त्वचेची काळजी 
आयुर्वेदामध्ये त्वचा, केस आणि शरीरासंबंधी विविध समस्यावर उपचार आहेत. खाली असे काही उपचार दिले आहेत. पण या उपचारांचा वापर करण्यापुर्वी छोट्या प्रमाणात वापर करून बघा.

विविध त्वचा प्रकारात वनौषधी फेस पॅक
त्वचेला उजाळा आणण्यासाठी व कांती चमकदार होण्यासाठी फेस पॅककोरड्या रुक्ष व सुरकुतलेल्या त्वचेसाठी
तेलकट त्वचेसाठी फेस पॅकऍक्‍ने व मुरमे होणाऱ्या त्वचेसाठी
डागयुक्त त्वचेसाठी फेस पॅकडाग आणि रंगासाठी
डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी क्रिमत्वचा उजळ करण्यासाठी
सर्वोपयोगी वनौषधीयुक्त फेस पॅककातडी वरील पांढऱ्या डांगासाठी

आरोग्यपुर्ण व तजेलदार त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक सर्व प्रकारासाठी उपयुक्त आहे. यामुळे मधील मृत पेशी काढुन टाकल्या जातात. यामुळे त्वचा ताणली जाउन त्वचेवरील डाग जातात. व त्वचा तजेलदार होते.

घटककृती
ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मुलतानी माती १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/८ टीस्पुनपाणी किंवा दुध यामधे मिसळुन वापरा

वर उल्लेख केलेल्या सर्व वनौषधी पावडर वर सांगितल्या प्रमाणात घेउन योग्य मिश्रण करा. त्यामधे योग्य प्रमाणात पाणी किंवा दूध घालुन पेस्ट तयार करा. पाण्याऐवजी उन्हाळ्यात गुलाबपाणी वापरू शकता. नीम व त्रिफळा त्वचा साफ करते व ताणते. मंजिष्ठा आणी चंदन कांती सुधारण्यास मदत करते.

तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचा थंड होते. व रंध्रे मोकळी/स्वच्छ होतात. व ताणली जातात. यामुळे मुरूमे/ऍक्‍ने होण्यास प्रतिबंध होतो.

घटककृती
नीम १/२ टीस्पुन, ज्येष्ठमध १/२ टीस्पुन, चंदन १/२ टीस्पुन, त्रिफळा १/२ टीस्पुन, मंजिष्ठा १/२ टीस्पुनपाणी किंवा दुधात मिसळून वापरा
http://marathi.aarogya.com

Visit Our Page