Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, September 29, 2016

हृदयाचे संरक्षण

ह्रदयाचे संरक्षण 👇🏻👇🏻👇🏻

तन्महत् ता महामूलास्तच्चौजः परिरक्षिता |
परिहार्या विशेषेण मनसो दुःखहेतवः ||
ह्रद्यं यत्स्याद्यदौजस्यं स्रोतसां यत्प्रसादनम् |
तत्तत् सेव्यं प्रयत्नेन प्रशमो ज्ञानमेव च || च.चि.३०/१३-१४

महत् अतिमहत्वाचा अवयव असलेल्या ह्रदयाचे, ह्रदयापासुन निघणारया धमन्यांचे, ह्रदयाच्या ठिकाणी असलेल्या ओजाचे रक्षण करत असताना विशेषतः मनाला संतप्त करणारया कारणांचा परित्याग करावा.
  जो जो आहार विहार ह्रदयाचे संरक्षण करणारा असेल, ओजाचे वर्धन करणारा असेल सोबतच हदय असमंतातील स्रोतसांना निर्मळ ठेवणारा असेल अशा आहार विहाराचे प्रयत्न पुर्वक सेवन करावे.
तसेच शांतीमय वातावरण राखावे सोबचत ज्ञानाची उपासना करत राहावे.

ह्रदय संरक्षक आहार विहार👇🏻👇🏻👇🏻
गाईचे दुध व तुप हे ओजवर्धन करणारे नित्य सेवनीय पदार्थ आहे.
असात्म्य पदार्थ ज्यामुळे खाल्यानंतर लगेच त्रास होतो असा आहार टाळावा.
मद्याचे गुणधर्म ओजच्या विरूध्द असल्याने मद्य ह्रदयासाठी अहितकारक नुकसान दायक ठरते.
शरीरातील रस रक्त विशुध्द तयार होण्याकरिता देशानुरूप, काळानुरूप, स्वतः च्या शरीरास सात्म्य असा आहार सेवन करावा.
              विहारात महत्वाचा आहे तो व्यायाम तो अर्धशक्ती प्रमाणातच करावा.
अति कष्ट करणे व व्यायाम करणे यात मोठा फरक आहे. व्यायामाने बल वाढते तर अति कष्टाने शरीराची झीज होऊन बल कमी होते.

व्यायाम details👇🏻👇🏻👇🏻
http://ayushdarpanmarathi.blogspot.in/2015/12/blog-post_89.html?m=1

ओजाचे रक्षण👇🏻👇🏻👇🏻

ओज आयुर्वेदीय संकल्पना
http://ayushdarpanmarathi.blogspot.in/2016/01/blog-post.html?m=1

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

Tuesday, September 27, 2016

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली
#ऋतुचर्या_पालन
#आयुर्वेदामृत
#ऋतुसंधी
#शरदऋतु_शोधन_पंचकर्म

अन्न ,वस्त्र आणि निवारा ....माणसाच्या या मुलभूत गरजांमध्ये
एक मुलभूत गरज add करावी लागेल ती म्हणजे स्वास्थ्य !!!
कारण, अन्नादी तीनही गरजा सध्या सहजपणे पूर्ण होताना दिसतायेत,
पण स्वास्थ्य मात्र दुर्मिळ होत चाललेय !

अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आजारातून बरे करण्यास नक्कीच मदत करतेय,
पण स्वास्थ्य लाभण्यास नाही !

माणूस हा निसर्ग साखळीतला एक महत्वाचा जीव आहे.
पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्यात reflect होत असते.
निसर्गात जसे ऋतूंचे चक्र चालू असते त्यानुसार सृष्टीत बदल जाणवू लागतात.
सहा ऋतूंच्या बदलाची जाणीव आपल्याला शरीर करून देत असतेच.
या सर्व ऋतुंनुसार शरीरातील त्रिदोषांच्या ( वात पित्त आणि कफ) अवस्था बदलत असतात.
दोषांच्या संचय, प्रकोप,आणि प्रशम या तीनही अवस्था ऋतूनुसार अनुभवण्यास मिळतात.
संचय म्हणजे प्रत्येक दोष ऋतुनुसार स्वतःच्या स्थानात साचत असतो
प्रकोप म्हणजे प्रत्येक दोष ऋतुबदलल्यावर आपल्या साचलेल्या स्थानातून बाहेर पडण्यास
उत्सुक झालेली अवस्था.
प्रशम म्हणजे पुनः होणार्‍या ऋतुबदलानुसार वाढलेले दोष हळूहळू कमी होणे.

उदाहरणार्थ ,
वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा ( जुन, जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर )
हा पित्त संचायाचा आणि वात प्रकोपाचा काळ असतो.

ग्रीष्मात ( उन्हाळयात ) तीव्र सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे स्नेह(स्निग्धता) कमी होऊन
रुक्षता (कोरडेपणा) वाढल्याने कफ कमी होऊन वात हळू हळू वाढत जातो म्हणजे
वाताचा संचय होतो. त्यानंतर येणार्‍या पावसाळ्यात अम्लपाकी भूबाष्पाने, मलिन पाण्याने
व मंदाग्नि(भूक कमी होणे), ओलसरपणा, त्यातून गारठा व अम्लविपाक सृष्टीत वाढल्याने
झालेल्य परिवर्तनामुळे वाताचा प्रकोप होतो.
अश्या वातावरणात, उष्ण-तीक्ष्ण (गरम), दीपन ( अग्नि = भूक वाढवणारे) पाचन(पचन करणारे)
स्निग्ध( तैलयुक्त), आंबट व तिखट चव असलेले पदार्थ खाण्याची इच्छा पण होते आणि
ह्यावेळी ते वातशमन व अग्निवर्धनासाठी उपयुक्त पण असतात.
परंतु, त्याचवेळी हळूहळू अम्लपणा मुळे पित्त संचय होत असतो.
शरद ऋतुत ( ऑक्टो च्या हिट उष्णते मध्ये ) प्रखर सुर्यकिरणांच्या तीक्ष्णतेमुळे
शरीर तापते व पित्ताचा प्रकोप होतो.

म्हणजे येऊ घातलेल्या शरद ऋतु ( बोली भाषेत ऑक्टोबर )
पित्ताचा प्रकोपाचा काळ असतो.
यानुसार आपल्या शरीरात लक्षणे, व्याधी जाणवू लागतात.  जसे
अम्लपित्त
शीतपित (अंगावर पित्त/गांध्या उमटणे),
घामोळ्या
गोवर
कांजण्या
नागिण ( हर्पिस )
मुखदूषिका ( पिंपल्स )
अति तहान होणे,
उन्हाळी लागणे,
डोके दुखीचा त्रास होणे,
क्वचित पाळीत अतिप्रमाणात राज:स्राव (ब्लीडींग) होणे,
गुद-लघवीवाटे रक्तस्राव होणे-
घोळणा फुटणे,
कावीळ
ताप
इ. उष्णतेचे इतर काही विकार होणे ....
ही सगळी लक्षणे पित्ताच्या प्रकोपाची असतात.
शरीर INTEL INSIDE असल्यामुळे आत चालणाऱ्या घडामोडी
वेगवेगळ्या लक्षणाच्या रुपात आपल्याला लक्षात आणून देत असते.

याच पद्धतीने इतर सर्व ऋतूत दोषांच्या अनुषंगाने घडामोडी चालू असतात.

हे साचलेले दोष अनेक आजारांसाठी कारणीभूत असतात.
यांना वेळीच बाहेर जर काढले नाही तर स्वास्थ्य लाभण्यास अडचणी निर्माण होतात.
याच साठी आयुर्वेदात “शमन” चिकित्सेबरोबरच “शोधन” चिकित्साही सांगितली आहे. त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप अवस्थेत असणाऱ्या दोषांना त्या त्या अवस्थेत बाहेर काढणे स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.

त्यामुळे पित्तशामक असा आहारविहार योजावा लागतो
जसे कडू गोड व तुरट रसांचे पचायला हलके अन्न योजावे लागते.
साठेसाळी मूग ही धान्ये
पडवळ सारखी भाजी
खडीसाखर
आवळा
मध

जांगल( बारीक प्राण्यांचे ) मांस ह्यांचे सेवन
तसेच तिक्त घृतपान (कडूचवीच्या औषधींनी सिद्ध तूप पिणे)
शमनासाठी अपेक्षित ठरते.
ह्या ऋतुचर्येतील शमन म्हणजे पथ्य आहारासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा.

स्वस्थ राहण्यासाठी जशी दिनचर्या आवश्यक आहे,
तशीच ऋतु चर्या देखील !
ऋतु बदलला की त्या त्या ऋतु नुसार आपला आहार
आणि इतर गोष्टीत बदल करणे आवश्यक असते.
काही कारणास्तव या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते
आणि आजारपणाचा पाया इथूनच घातला जातो.

ऋतुचर्या पालनात आहार विहार यांच्या बदलासोबत आवश्यक असते,
त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप करणाऱ्या दोषांचे शोधन !
म्हणून
ह्या काळात
दुष्ट पित्त व त्यासह दुष्ट रक्ताचे शोधन अपेक्षित असते
त्यासाठी अनुक्रमे विरेचन  व रक्तमोक्षण ह्या शोधन चिकित्सा उपयुक्त ठरतात

तेव्हा आयुर्वेद-अनुसारी मित्रहो...
सध्या शरद ऋतु सुरु होणार आहे.
या काळात शरीरात साचलेली उष्णता "विरेचनव रक्तमोक्षण" या शोधन चिकित्सेद्वारे
शरीराबाहेर काढून स्वस्थ राहण्यासाठी शरीराला मदत करा.
यासाठी आपल्या भागातील उत्तम आयुर्वेद तज्ञांकडून या विषयी मार्गदर्शन घेऊन,
आपल्या प्रकृतीनुसार आणि निदानानुसार
स्नेहपान युक्त विधिवत विरेचन करण्यास प्राधान्य द्या !

ऋतुनुसार शोधन घ्या आणि स्वास्थ्य अबाधित राखा !

©वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

उत्तम नेत्रांसाठी आहार

👀  उत्तम नेत्रांसाठी आहार 👀
निरोगी असतानाही डोळे चांगले राहण्यासाठी नेहमी पुढील पदार्थांचे सेवन करावे.
सातु, गहु, साठीसाळीचे तांदुळ व हरीक ही १ वर्ष जुनी धान्यें व मुग वैगेरे कफ व पित्त यांचा नाश करणारी धान्यें ही तुपासह खावे.
     अशाच प्रकारे तुपासह भाज्या खाव्यात. फळात डांळीब, मनुका तसेच खडीसाखर, सैंधव मीठ,  हे पदार्थ, प्यावयास पावसाचे पाणी, पादत्राण्यांचा उपयोग आणि शास्रोक्त रितीने शोधन(शरीरशुध्दी) आदींनी नेत्रांचे आरोग्य सुस्थितीत राहते....

         👀 नेत्रांसाठी अन्य उपाय👀
आयुर्वेदीय शास्रानुसार पायांमध्ये दोन मोठ्या शिरा असुन त्या पुढे डोळ्यापर्यंत गेल्या आहेत. त्यामुळेच पायांस लावलेले तुप तैल उटणे लेप आदींचे काम डोळ्यापर्यंत होते.
      मलोत्पत्ती, तळपायाला उष्ण (गरम) स्पर्श, पायांस नेहमी तुडवुन, दाबुन घेणे या कारणांनी नाड्या बिघडल्या तर डोळ्यासही विकार उत्पन्न करतात. म्हणुनच पादत्राने घालणे, पायांस तुप लावने व पाय धुणे हे प्रकार डोळ्यास हितकारक असतात. त्यांचा नेहमी वापर करावा.

नेत्रांसाठी वर्ज्य---मलमुत्रांचे वेग अडवणे, अजीर्ण असताना जेवन,पुर्वीचे पचले नसताना जेवन, शोक करणे, रागक्रोध, दिवसा झोपणे, रात्रिजागरण, विदाहकारक, विष्टंम्भी मलमुत्र  अडवुन ठेवणारे अन्न, मलमुत्र अडवणारया क्रिया टाळाव्यात.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
9028562102 , 9130497856

Monday, September 19, 2016

बल (शक्ती)कमी करणारी कारणे

👇🏻बल (शक्ती)कमी करणारी कारणे💪🏻

अभिघाताभ्दयात्क्रोधाच्चिन्तया च परिश्रमात् |
धातूनां संक्षयाच्छोकाद्बलं संक्षीयते नृणाम् ||

अभिघाताने --- शस्र वा इतर कुठल्याही कारणाने मार लागला असेल तर शक्ती कमी होते.
    
मानसिक वेगांमुळे
मनात नेहमी भिती राग चिंता दुःख यापैकी कुठल्याही १ कारणाने शक्ती कमी होते. कारण भिती चिंता व राग आदी कारणांनी अन्नपचन योग्य रितीने न झाल्याने शरीराचे पोषण होत नाही.

परिश्रमाने -- अत्याधिक प्रमाणात परिश्रमाने देखील शरीरातील शक्तीचा क्षय होतो.

धातुंचा क्षय -- कुठल्याही कारणाने शरीरातील रस रक्तादी ७ धातूचा क्षय होत असेल तर बल कमी होते.
       उदाहरण पाहावयाचे झाल्यास मुळव्याध असताना जीव रूपी रक्त शरीरातुन बाहेर पडते. अधिक प्रमाणात रक्त शरीरातुन बाहेर पडले तरी देखील बल कमी होते.
   बल कमी कारणारया कारणानुसार काही वेळा मानसिक वेगांचे धारण व मनावरील उपाय जे शास्रात सांगितलेले आहे ते करावे लागतात.
           सप्तधातुंपैकी कुठल्याही धातुचा क्षय असेल तर त्या धातुंना वाढविणारया आहार विहार औषधींचा बलवर्धनार्थ उपयोग करावा लागतो.
           परिश्रमासाठी सद्यतर्पण श्रमनाशक आहार औषधींचा उपयोग करावा लागतो..
  शक्ती वर्धनार्थ फक्त पौष्टीक पदार्थ खाणे खुप वेळा कामी येत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9130497856, 9028562102

Saturday, September 17, 2016

चाई पडणे

चाई पडणे
चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात.

आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. यास व्यवहारात चावी लागणे, चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. याचे ढोबळमानाने दोन प्रकार केले जातात. एकात फक्त त्या ठिकाणचे केस जातात, तर दुसऱ्या प्रकारात केसांच्या मुळाखालील त्वचेत खड्डा पडलेला असतो. पहिला प्रकार बरा करायला सोपा आहे, तर खड्डा पडलेला असल्यास तो प्रकार लवकर बरा होत नाही. ही चाई शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरही पडू शकते, त्यामुळे काहींना ती डोक्यावर, दाढी, मिशा किंवा सर्वागावर कुठेही आढळते. गंमत म्हणजे या प्रत्येक प्रकारात त्याचे निदान बदलते, कारण सगळे केस हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचा संबंध आपल्या शरीरातील वेगवेगळ्या सप्तधातूंशी आलेला असतो. उदाहरणार्थ, सर्वागावरील केस हे लोम प्रकारात मोडतात व ते रस धातूशी संबंधित असतात. ते सुकुमार असतात. ते त्वचेत जास्त खोलवर असले व चमकदार असले की रक्ताशी संबंधित असतात व मांस धातूशी संबंधित केस मांस धातूच्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करतात. त्यामुळे स्नेहन करतानासुद्धा अनुलोम, प्रतिलोम असे शब्द वापरले जातात. यांच्या गतीनुसार स्नेहनाची दिशा ठरवली जाते, तर शरीरात ज्या ठिकाणी मेद धातू अधिक असतो त्या ठिकाणी केस नेहमी कमी प्रमाणात पाहायला मिळतात. जसे की स्तनाचा, पोटाचा व मागचा बसण्याचा भाग. स्त्रियांमध्येसुद्धा मेद वाढू लागला, वजन वाढू लागले, की केस गळणे लगेच वाढते. अस्थी धातूचा आणि केसांचा तर जवळचा संबंध आहे, कारण आयुर्वेदानुसार अस्थीतूनच केसांची उत्पत्ती होते. म्हणून व्यवहारात अस्थिसार लोकांचे केस सुंदर व लांब पाहायला मिळतात. बऱ्याचदा हडकुळ्या असणाऱ्या या अस्थिसार स्त्रियांचे केस पाहा, ते लांबसडक व छान असतात. शुक्र धातूशी संबंधित केस हे शरीरात शुक्राची अभिव्यक्ती जाणवू लागली म्हणजे मुले वयात येऊ  लागली की व्यक्त होऊ लागतात. जसे दाढी, मिशाचे केस, काखेतील-जांघेतील केस. तसेच प्रत्येक केसाच्या पतनानंतर त्या ठिकाणी परत केस येण्याचे कामसुद्धा शुक्रधातूच करत असतो. म्हणून आजकाल ज्या मुलांमध्ये हस्तमैथुन, स्वप्नदोष अशा कारणांमुळे तरुण वयात टक्कल पडू लागले आहे त्यांना केस वाढविणाऱ्या औषधांबरोबरच शुक्रवृद्धीची औषधेपण वापरावी लागतात. तसेच याच काळात मुलींमध्ये पाळीच्या तक्रारी असल्यास चेहऱ्यावर अंगावर अनावश्यक लव वाढू लागते. केस गळणे, पिकणे वाढते यांमध्ये प्रथम मासिक पाळी सुधारल्याशिवाय त्यांच्या केसांच्या तक्रारींमध्ये काहीही फरक पडताना दिसत नाही. तसेच बालपणीचे केस, तरुणपणीचे केस आणि म्हातारपणीचे केस वेगवेगळे असतात. म्हणजेच आपण पाहिलंत की, केसांच्या आजाराची कारणे प्रत्येक व्यक्तीनुसार, त्याच्या वयानुसार व धातूनुसार बदलत असतात. म्हणून केस गळणे, पिकणे अथवा अनावश्यक केस येणे, चाई पडणे, टक्कल पडणे अशा केसांच्या तक्रारी ऐकायला सोप्या वाटत असल्या तरी योग्य निदान करून चिकित्सा केल्याशिवाय बऱ्या होत नाहीत. नाही तर केसही जातात आणि पैसेही जातात. म्हणून तर केसांच्या एवढय़ा तेल, शाम्पू इत्यादींच्या जाहिराती व प्रॉडक्ट्स मुबलक असूनसुद्धा लोकांच्या तक्रारी काही कमी होत नाहीत. फक्त मीठ व लिंबू अनावश्यकपणे जास्त घेणे कमी केले तरी केसांच्या निम्म्या तक्रारी कमी होतात. अक्रोड, बदाम, मनुके, नारळाचे खोबरे केस वाढवायला मदत करतात, तर साधे जयपाल बी, गुंजा बी किंवा दगडीपाला चाईच्या ठिकाणी तीन दिवस चोळून लावलं तरी त्यातील पहिल्या प्रकारच्या चाईवर केस येतात. आपल्या केसांचे परीक्षण करून, आपली प्रकृती, आजार यानुसार विचार करून आयुर्वेद शास्त्रोक्त उपचार तुम्हाला गेलेले केससुद्धा परत आणून देऊ  शकतात. मग उगीच केशारोपण, सिलिकॉन हेअर, विग अशा कृत्रिम गोष्टींच्या मागे धावून नैसर्गिक सौंदर्य हरवून घेण्यात काय अर्थ आहे? लक्षात ठेवा वयोमानासुसार टक्कल पडणे हीसुद्धा प्रकृती आहे. कित्येक जणांना टक्कलसुद्धा छान दिसते. मात्र आपली मानसिकता आजार बरा करण्याऐवजी ती झाकण्याकडेच वाढू लागली आहे.. म्हणूनच आता म्हणावेसे वाटते- ‘विचार बदला.. डोके बदलेल.’

वैद्य हरीश पाटणकर
पुणे
harishpatankar@yahoo.co.in

Friday, September 16, 2016

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

संशोधने आणि त्यांचे अन्वयार्थ!!

'उच्च रक्तदाबावर टॉमेटो खाणे हे लाभदायी आहे'
असे एक संशोधन सांगते. असे कोणीही काहीही सांगितले की खात्री न करताच; आपल्याकडे धडाधड फॉरवर्ड करणाऱ्यांची कमतरता नाही. त्यातच अशी पोस्ट एका महनीय व्यक्तींच्या अधिकृत पेजवर दिसल्याने कुतूहल वाढले. या विषयी अधिक अभ्यास केल्यावर समोर आलेल्या बाबी मजेशीर होत्या.

ज्या संशोधनानुसार टोमॅटो हे उच्च रक्तदाबावर उपयुक्त आहेत असे सांगितले जाते त्यात लायकोपेन  या घटकाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची मानली गेली. (वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने विचार करता; टॉमेटो हा लायकोपेनियासी नामक कुळातील आहे.) हे संशोधन भारतात झालेले नाही. त्यामुळे त्याची आपल्या देशातील उपयुक्तता साशंक आहे. शिवाय हे संशोधन टोमॅटोच्या नेमक्या कोणत्या प्रजातीवर झाले तसेच आपल्या देशात सध्या पिकणाऱ्या टॉमेटोच्या प्रजाती कोणत्या? यांची खातरजमा केलेली न करताच अशा पोस्ट्स पुढे पाठवल्या जात असल्याचे दिसून आले. आपल्याकडील टोमॅटोच्या कित्येक प्रजातींत लायकोपेनचे प्रमाण परदेशी प्रजातीच्या तुलनेत कमी आहे. या व्यतिरिक्त टॉमेटो हा भारतीय पदार्थ नाही हाही मुद्दा इथे महत्वाचा आहेच. एरव्ही स्वदेशी-विदेशी च्या नावाने टाहो फोडणारे लोक अशा पोस्ट्स प्रसवताना ही गोष्ट मात्र सोयीस्करपणे विसरतात; ही सखेद आश्चर्याची गोष्ट आहे.

असो; तर या संशोधनानुसार दिवसाला २०० ग्रॅम टॉमेटो; तोदेखील कच्चा खाल्यासच रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत 'होवू शकते' असा निष्कर्ष आहे. याचाच अर्थ असा की त्यापेक्षा कमी मात्रेत टोमॅटो खाणे हे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरणारे नाही. विचार करा; २०० ग्रॅम कच्चा टोमॅटो म्हणजे जवळपास पाव किलो!! (आपल्या देशात ही मात्रा अधिक वाढेल.) किती रक्तदाबाचे रुग्ण तयार होतील या गोष्टीला? हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयानक आहे. त्यातही केवळ सहा आठवडे हा प्रयोग झाला आहे. म्हणजे जेमतेम दोन महिने. सलग काही महिने/ वर्षे टॉमेटो सेवन केल्याचे तोटे काय असतील यावरचा अभ्यास?? यावर काही उत्तर नाही.

थोड्क्यात अशा संशोधनांना स्थळ-काळ यांनुसार प्रचंड मर्यादा असतात. त्यांवरून सरसकट निष्कर्ष काढून लोकांना 'आता हाणा टमाटे' अशा धर्तीवर सांगता येत नाहीत. विधीनिषेध समजावून घ्यावे लागतात. प्रकृती आदि घटकांचा विचार करावा लागतो. त्या त्या खाद्यपदार्थाचे गुणधर्म नीट लक्षात घ्यावे लागतात. उच्च रक्तदाब म्हणजे काही सर्दी खोकला नाही की घरबसल्या असले प्रयोग करून पाहता यावेत.

गुगलवर सहज ज्या विटा सापडतील त्यांवरून इमले बांधून पोस्ट प्रसवण्याचे उद्योग करणारे आणि विकीपीडियाला संदर्भ म्हणून नमूद करण्याचे हास्यास्पद उद्योग करणारे लोक जनतेची किती दिशाभूल करत आहेत आणि त्यांनी केलेली ही दिशाभूल किती महागात पडेल याचा डोळसपणे विचार करा. मागे एकदा 'जवस आणि गुडघेदुखी' या विषयीदेखील असेच डोळे उघडण्यास प्रवृत्त करणारे लिखाण केल्यावर राज्यभरातून आलेल्या फोनकॉल्सच्या संख्येवरून किती लोकांपर्यंत सोशल मीडिया या माध्यमातून पोहचून आपण जनजागृती करू शकतो याचा अंदाज मला आला. तशीच सजगता या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण व्हावी आणि उठसुट आल्या-गेल्या प्रत्येक संशोधनाचा अन्वयार्थ न लावताच त्याचा प्रचार प्रसार आपल्याकडून होऊन आरोग्याशी संबंधित असे गैरसमज पसरवण्यात आपण भागीदार होऊ नये इतकीच या निमित्ताने इच्छा!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

दिवसाची झोप

🍀 दिवसाची झोप ☘

दिवसा जेवनानंतर झोपणे हा बरयाचस्या लोकांचा नित्यक्रम असतो. दिवसा जेवनानंतर येणारा आळस हा आहारविधी नुसार आहार न घेतल्याचे निदर्शक आहे. अन्नपचन योग्य दिशेने होत नसल्याने आळस झोप येते आणि २-३ तास झोप घेतली असता शरीरातील कफपित्ताचा रोज प्रकोप होतो. त्याने शरीर विविध आजारांसाठी सुपीक जमीनीप्रमाणे बनते. वजन वाढते अंगावर सुज येते विविध प्रकारच्या तपासण्या normal च्या पुढे जातात. कुठलाही त्रास कमी होत नाही.दिवसा जेवनानंतर येणारा आळस झोप टाळण्यासाठी आहारविधींचे पालन अत्यावश्यक आहे. त्याने अन्नपचन योग्य दिशेने होऊन शरीराचे बल आयुष्य आरोग्य वाढेल. दिवसा जेवनानंतर झोपल्याने उत्पन्न आजारांसाठी आयुर्वेदीय  औषधींचा सल्ला घ्यावा. सोबतच आहारातील बदल प्रकृतीनुसार समजावुन घ्यावेत व ते शक्य होईल तितके पाळावेत.
   दिवसा जेवनानंतर झोप येत असेल तर शरीर आजारांच्या दिशेने जात आहे हे समजावे. आजाररूपी stations टाळायची असतिल तर मार्गात बदल म्हणजे आहारविधीचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा बहुतेक आजार होतातच टळत नाहीत.

      ✔  दिवसाची झोप  ✔

रात्री जागरण झाल्यास सकाळी जेवणापुर्वी जेवढे जागरण झाले असेल त्याच्या निम्मा वेळ झोपुन घ्यावे जेवनानंतर झोपु नये.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

#सामान्य_आयुर्वेद

#सामान्य_आयुर्वेद

#BattleOfLoosing

वजन घटवण्याचा एक फाॅर्म्युला म्हणजे प्रोटीनयुक्त आहार. आणि प्रोटीनसाठी मांसाहारापेक्षा भारी काय असणार!!!! वजन कमी करायला पार्टी करणे कुणाला आवडणार नाही??

मटण म्हणजे पार्टी आणि पार्टी म्हणजे मटण समजणारे भरपूर लोक सापडतील. "मग काय, सुट्टी म्हणजे मजाच. घरी रोजच्या रोज मटण." सुट्टीसाठी काही काळ घरी असलेल्या माझ्या मित्राचे उद्गार. मटण म्हणजे आहारातला सर्वोत्कृष्ट प्रकार असंच यांचं समीकरण. मांसाहाराशिवाय इतर काही जेवणात रंगत आणू शकते अशी संकल्पनाच नाही. त्यामुळे मांसाहाराने काही फायदा होतो असं कुणी म्हणत असल्यास तो तर या सर्वांसाठी देवच.

पण आपण सोयीस्करपणे हे विसरतो की
*प्रोटीन हा 'एक' फाॅर्म्यूला अाहे, एकमात्र फाॅर्म्यूला नाही;
*तो सुद्धा इतर सर्व फाॅर्म्यूलांसोबत वापरायचा असतो, एकटा नाही;
*तो वजन "कमी" करण्यात हातभार लावत नाही.

आयुर्वेद म्हणतं आपण जे खातो ते शरीरातील आपल्यासारख्या गोष्टी वाढवते. अर्थात मांस खाल्याने मांस वाढणार. त्यामुळे वजन घटवण्यासाठी मांस वाढवणे जरा विचित्र वाटत नाही? वाटू शकतं, पण त्यामागचं कारण समजून घेतलं तर मुद्दा लक्षात येईल.

वजन घटवण्यासाठी सर्वात जास्त काही आवश्यक असेल तर व्यायाम. त्याशिवाय वजन घटवणे अशक्यप्राय. व्यायाम केल्यावर शरीराची झीज होते, आणि त्याच सोबत वाताचा प्रकोप सुद्धा होतो. शरीराची झीज अाणि वाताचा प्रकोप यांमुळे बल कमी व्हायला लागतं. या कमी झालेल्या शक्तीसाठी आणि वाढलेल्या वातासाठी लागतो शक्ती वाढवणारा आणि वात कमी करणारा आहार.

तसंच मांस पचायला जड असल्या कारणाने ते पचायला वेळ लागतो. पचायला वेळ लागणारा आहार जास्त प्रमाणात खाता येत नाही. त्यामुळे खायच्या आहाराचं प्रमाण कमी होतं. आहाराचं एकूण प्रमाण कमी झाल्याने एकूणच मेद वाढवणारा आहार कमी होतो.

वजन कमी करताना मूळ उद्देश असतो मेद कमी करणे. हा मेद व्यायामाने कमी होतो. पण फक्त मेद कमी करून काम भागत नाही. व्यायामामुळे दुबळा झालेला मांस धातू सुद्धा सांभाळावा लागतो, म्हणून दुसरा उद्देश असतो मांस बलवान बनवणे. आणि यासाठीच घ्यायचं असतं प्रोटीन रिच डाएट, अर्थात मांसाहार जो आयुर्वेदानुसार मांस वाढवेल.

मांस घेणे अाणि त्याचं शरीरातल्या मांसामधे रूपांतर होणे यांच्यामधे अजून एक समस्या असते. ती म्हणजे अग्निरूपी पचनशक्ती. याला समस्या यासाठी म्हटलं कारण अग्नी अगदी व्यवस्थित असणे म्हणजे रेअर कंडिशन. अग्नी योग्य नसेल तर खाल्लेलं मांस पचल्याचा आभास तर होतो, पण त्याचं शरीराच्या मांसामधे रूपांतरण मात्र होत नाही. त्यापासून विकृत धातू बनतात आणि त्यामुळे पुढे मेदाचं प्रमाण वाढतं. म्हणजेच वजन वाढतं. मांसाहार व्यवस्थित नाही पचला तर वजन वाढतं, आणि पचला तरी मांस वाढून वजन वाढतं.

म्हणून मांसाहार हा वजन घटवण्याचा उपाय नाहीच मुळी. दमवणारा व्यायाम करून झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि पिळदार देहयष्टीसाठी लागणाऱ्या बलवान मांसासाठी म्हणून हा उपाय. आणि हा उपाय करणारच असाल तर भरपूर व्यायाम करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि पचवण्यासाठी लागणारा बलवान अग्नि आधी तयार ठेवा.

(मांसाहार हा एकमेव उपाय नाही हे वेगळे सांगायला नको.)

©वैद्य अमित पाळ
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com
Ph- +919890493371

Vaidya Amit Pal

Visit Our Page