Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, December 14, 2015

अ‍ॅसिडिटी

अ‍ॅसिडिटी

=========
खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे डायजेशन प्रक्रियेमध्ये पोटात एक असे अ‍ॅसिड स्रावीत होते जे डायजेशनसाठी खूप आवश्यक असते. अनेकदा हे अ‍ॅसिड गरजेपेक्षा जास्त निर्माण होऊ लागते ज्यामुळे हृदयात जळजळ आणि पोटात गरम होते. या स्थितीला अ‍ॅसिडिटी किंवा अ‍ॅसिड पेप्टिक रोगाच्या नावाने ओळखले जाते.
अ‍ॅसिडिटी होण्यामागची कारणे
आहारात अनियमितपणा, अन्न व्यवस्थितपणे न चावणे, पर्याप्त प्रमाणात पाणी न पिणे, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे, जंक फूड, तणावग्रस्त राहणे आणि धुम्रपान इ. गोष्टी अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरतात. जड अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळी नाष्टा न करणे आणि उशिरापर्यंत उपाशी राहिल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते.
अ‍ॅसिडिटीचे लक्षणं
1. पोट गरम झाल्याचे जाणवणे
2. हृदयात जळजळ
3. मळमळ होणे
4. ढेकर येणे
5. अन्न-पाणी घेण्याची इच्छा न होणे
6. डिस्पेप्सिया
उपाय -
बटाटा -
कदाचित तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी दूर करण्याचा हा विचित्र उपाय वाटेल, परंतु बटाट्याचे ज्यूस प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे साल काढून पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर या ज्यूसमध्ये थोडेसे गरम पाणी मिसळून हे ज्यूस प्या. गॅस, अ‍ॅसिडिटी दूर होईल तसेच लिव्हर स्वच्छ होते.
जांभूळ
मधुमेह उपचारामध्ये जांभूळ एक पारंपारिक औषध आहे. या फळाला मधुमेह रुग्णांचेच फळ म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही, कारण यातील बी, साल, रस आणि गर हे सर्व घटक मधुमेहमध्ये सर्वात फायदेशीर आहेत. ऋतूनुसार जांभळाचे सेवन औषधी रुपात भरपूर करावे. पोटाच्या रोगावर हे रामबाण औषध आहे. रिकाम्या पोटी जांभूळ खाल्ल्यास गॅस व अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते.
पेरू
पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीमध्ये फायदा होतो. पेरूमध्ये विविध प्रकारचे गुण असतात, जे आरोग्यासाठी लाभकारी ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल तत्व भरपूर प्रमाणत असतात. यामध्ये फायबर असल्यामुळे हे बद्धकोष्ठता दूर करते.
संत्री
संत्र्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेले फ्रक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन्स शरीरात पोहोचताच उर्जा निर्माण करण्याचे कार्य करतात. संत्रीचे सेवन केल्याने शरीर स्वस्थ राहते आणि उत्साह वाढतो. याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी नष्ट होते.
टोमॅटो
शरीरासाठी टोमॅटो अत्यंत लाभकारी आहेत. यामुळे विविध रोगांचे निदान होते. हे शरीरातील विशेषतः किडनीमधील जीवाणू बाहेर काढते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन-सी आढळून येते. अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास टोमॅटोचे सेवन वाढवल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होईल. यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात. यामुळे याच्या नियमित सेवनाने अ‍ॅसिडिटी होत नाही.
पपई -
हे एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत बीटा-कॅरोटिन, ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते
DrJitendra Ghosalkar

No comments:

Post a Comment

Visit Our Page