Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 10, 2015

🍚 दहीसेवन 🍚

🍚 दहीसेवन 🍚


न नक्तं दधि भुंजीत न चाप्यघृतशर्करम्| नामुद्युगयूषं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना| च.सु.७/६१
रात्रीला व गरम करून दही खाऊ नये. तुपसाखरेशिवाय दही खाऊ नये. मुगाच्या कढणाशिवाय दही खाऊ नये. मधाशिवाय दही खाऊ नये. किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नये. जर नियमरहित दहीसेवन केले तर .......
ज्वरासृकपित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान|
प्राप्नुयात् कामलां चोग्रां विधिं हित्वा दधिप्रियः| च.सु.७/६२
🍀दह्याने उत्पन्न आजार🍀
नियमानुसार दहीसेवन केले नाहीतर
ज्वर( ताप), रक्तपित्त( शरीरातील विविध openings मधुन रक्त बाहेर पडणे), विसर्प कुष्ठ ( त्वचाविकार सोरियासिस),पांडु( anemia), भ्रम ( चक्कर), उग्र कावीळ आदी आजार निर्माण होतात....
१.क्रमानुसार प्रथम आहारसापासुन बनणार्या रसधातुत अपाचित दही पोहचतो ज्वर म्हणजेच ताप निर्माण करतो.येथे योग्य उपचार न केल्यास तो पुढील रक्तात पोहचतो..
२. रक्तात पोहचलेला अपाचित भाग रक्तात आंबटपणा वाढवतो व हिरडे सळसळ करणे, हिरड्यातुन रक्त निघणे, मुळव्याधीचा त्रास, अशा प्रकारचे रक्ताचे आजार उत्पन्न करतो.योग्य चिकित्सा न केली गेल्यास पुढील मांसात हा अपाचित भाग पोहचतो.
३. मांसात पोहचल्यावर हा दुषीत आम कुष्ठ विसर्प ( त्वचाविकार सोरियासिस) निर्माण करते.
४.पुढील मेदात हा दुषीत भाग पोहचला की त्वचेतुन स्राव येणे,खाज सुटणे , blockages निर्माण करणे आदी आजार उत्पन्न करतो.
५, मेदानंतर या दुषीत आमाचा परिणाम हांडावर होतो हाडांची झीज होते, दात हालायला लागतात, किंवा पडायला लागतात, केस गळणे वाढते अशी लक्षणे निर्माण होतात.
६. हाडापर्यंत पोहचल्यासही दुषीत आमाची चिकित्सा योग्य चिकित्सा केली नाही तर मज्जेवर परिणाम होतो.नेहमी चक्कर येते जी सहजपणे दुरूस्त होत नाही.
शेवटी सर्व शरीरात योग्य पचन न झालेले दही पोहचते आणि जिवघेणी कावीळ किंवा crf (kidney faulure) चा त्रास निर्माण होऊ शकतो जो दुरूस्त होण्यास अत्यंत कठीण असतो.
ग्रंथकारांनि सांगितले तसे दहीसेवन केले तर त्रास होत नाही पण त्याशिवाय दहीसेवन केले तर वरील क्रमाने आजार होतात. लवकर योग्य उपचार केले नाही तर आजारांची गंभीरता वाढत जाते.पुर्वी वा आता दहीसेवन केलेले असल्यास वरीलपैकी कुठलाही त्रास नाही ना हे पहावे. त्रास असल्यास योग्य चिकित्सेने अटकाव जरूर करावा....
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका
 नांदेड

9028562102. , 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page