व्यायाम 🍀
स्निग्ध आहार (तुपतेलयुक्त) आहार घेणारया लोकांनी व बळकट लोकांनी थंडीच्या काळात व वसंत रूतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मा व्यायाम करावा. व इतर काळात म्हणजे पावसाळ्यात व उन्हाळ्यात शरीराचे बल कमी असल्याने अल्प व्यायाम करावा किंवा व्यायाम करू नये.
व्यायाम आणि मेहनत (exertion) यात basik फरक आहे. व्यायाम हा शरीराचे बल वाढवतो तर exertion मुळे शरीराची झीज होते..
अतिव्यायाम केल्याने तहान लागणे क्षय दम लागणे रक्तपित्त शरीरातील विविध opening मधुन रक्त पडणे थकवा दुर्बलता खोकला ताप वांती हे विकार उत्पन्न होतात. त्यामुळेच काळानुरूप तुप तैल आदींनी युक्त स्निग्ध आहारासह अर्धशक्ति व्यायाम करावा. स्निग्ध आहाराचा समावेश नसताना केलेला व्यायाम शरीराची झीज घडवुन नुकसान करतो..

🍀 व्यायामाचे लाभ 🍀
लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं दुःखसहिष्णुता|
दोषक्षयो ग्निवृध्दिश्च व्यायामादुपजायते|| च.सु. ७/३२

व्यायाम केल्याने शरीरास लाघवता (हलकेपणा) प्राप्त होतो.आळस दुर होतो.
कर्मसामर्थ्यं म्हणजे काम करण्याची कष्ट करण्याची क्षमता वाढते.
स्थैर्य प्राप्त होते. शारीर आणि मानस दोन्हींमध्ये स्थिरता येते. मनाची चंचलता दुर होते.
दुःखसहिष्णुता म्हणजे दुख कष्ट सहन करण्याची क्षमता वाढते. दुःख पचवण्याची मनाची तयारी वाढते.
शरीरातील मेद विकृत कफ आदी दोष वाढले असता त्यांचा क्षय व्यायामाने होतो.
व्यायामाने अग्निमध्ये (भुकेत) वाढ होते..फक्त व्यायाम अगोदरच्या नियमानुसार स्निग्ध आहारासह अर्धशक्ती रूतुनुसार करावा.म्हणजे वरील लाभ होतात.

🍀 व्यायामाची लक्षणे 🍀
ह्रदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते|
मुखं च शोषं लभते तब्दलार्धस्य लक्षणम्||
किंवा ललाटे नासायां गात्रसंधिषु कक्षयोः|
यदा संजायते स्वेदो बलार्धं तु तदा$$दिशेत्||

बलार्ध लक्षण---
व्यायाम केल्यानंतर जेंव्हा ह्रदयातील वायु मुखात येत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तेंव्हा बलार्ध (शक्तीच्या अर्धा व्यायाम झाला समजावे.
किंवा व्यायाम केल्यानंतर जेंव्हा कपाळ, नाक, सांध्याचे ठिकाणी तसेच काखेत घाम येत असेल तेंव्हा आपल्या ताकदिच्या अर्धा व्यायाम झाला असे समजावे.

🍀 व्यायाम अयोग्य व्यक्ती 🍀
अतिव्यवायभाराध्वकर्मभिश्चातिकर्शिताः| क्रोधशोकभयायासैः क्रान्ताः ये चापि मानवाः||
बालवृध्दप्रवाताश्च ये चोच्चैर्बहुभाषकाः| ते वर्जयेयुर्व्यायामं क्षुधितास्तृषिताश्च ये|| च.सु.७

ज्यो व्यक्तीने अत्यधिक मैथुनकर्म, अधिक वजन उचलण्यामुळे, जास्त चालण्याच्या कारणाने क्षीण झालेला आहे तसेच राग, शोक(दुखः), भिती व परिश्रमाने पिडीत असणारयांनी, बालवयात, म्हातारपणात, वातप्रकृती लोकांनी व नेहमी जोरात बोलणारया लोकांनी, भुकतहान लागलेली असताना मनुष्याने व्यायाम करू नये.
कुठल्याही प्रकारचा अर्धशक्ती पेक्षा अधिक प्रमाणात केलेला व्यायाम वर सांगितलेले अतिव्यायामजन्य आजार निर्माण होतात....

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
नांदेड
9028562102, 9130497856

No comments:
Post a Comment