विरूध्द अन्न 🍨
यत्किञ्चिदोषमुत्क्लेश्य न निर्हरति कायतः |आहारजातं तत्सर्वमहितायोपपद्यते|| च.सु.
जो कुठला आहार औषधी द्रव्य कफपित्त आदी दोषांना आपल्या स्थानात प्रकुपित करेल पण त्यांना शरीराच्या बाहेर काढणार नाही. अशा आहाराला अहितकर विरोधी आहार म्हणता येईल...
विरोधी आहाराचे आयुर्वेदानुसार प्रकार
देशविरूध्द
आपण ज्या देशात म्हणजे भौगोलिक प्रांतात राहतो तेथे पिकणारे धान्य पदार्थ फळे खाणे जास्त उपयोगी ठरते कारण तेथील वातावरणाला अनुसरणच निसर्ग फळे भाज्या धान्य उत्पन्न करते किंवा त्या भागात विशिष्ट धान्य फळे पिकतात..
उदा. कोकणात-- भात मासे etc
उर्वरीत महाराष्टात-- गहु ज्वारी etc
कोकणा सारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात स्निग्ध तेल तैलयुक्त व थंड गुणधर्माचे पदार्थ खाणे व तापमान अधिक असणारया विदर्भ मराठवाड्यात कोरडे तीक्ष्ण पदार्थ खाणे देशविरोधी आहार घेणे ठरते
कालविरूध्द ⛅
काळानुरूप रूतुनुसार आहार न घेणे जसे थंड काळात थंड कोरडा स्नेहरहित (तैलतुपरहित) आहार घेणे
तसेच उन्हाळ्यात तिखट उष्ण गुणधर्माचा आहार घेणे काळविरोधी ठरते..उदा.. उन्हाळ्यात वसंत रूतु, oct heat मध्ये गरम गुणात्मक दही खाणे काळाच्या विरोधी ठरते तर पावसाळा हिवाळ्यात थंडी असताना दही काळानुरूप आहार ठरते..
अग्निविरूध्द (भुकेच्या विरूध्द)
भुक मंद असताना जडान्न खाणे किंवा भुक तीक्ष्ण असताना कमी वा हलके पदार्थ खाणे हे भुकेच्या विरोधी आहार ठरते.. भुकेनुसार घेतलेला आहार विरोधी ठरत नाही.
मात्राविरूध्द
मध व तुप समान मात्रेत एकत्र खाणे मात्रेच्या विरूध्द आहे..
सात्म्यविरूध्द
एखाद्या व्यक्तीला प्रकृती नुसार तिखट गरम गुणात्मक आहार suitable असेल अशा व्यक्तीने गोड थंड गुणाचा आहार घेणे. जो आहार आपणास suit होत नाही तो खाणे म्हणजे सात्म्यविरूध्द आहार घेणे होय.
संस्कारविरूध्द
दही गरम करून खाणे, कुठलेही अन्न दोन वेळा गरम करून खाणे ही संस्कार विरूध्द अन्नाची उदाहरणे आहेत. संस्कार विरूध्द अन्न म्हणजे अन्न चुकिच्या पध्दतीने बनवुन खाणे पनीर चा समावेश ही संस्कार विरूध्द अन्नात करता येईल..
वीर्यविरूध्द
थंड गरम पदार्थ एकत्र खाणे जसे चहाच्या आधी व नंतर थंड पाणी पिणे.. थंड गुणात्मक दुध व गरम गुणात्मक मासे एकत्र खाणे हे वीर्यविरूध्द अन्नाचे उदाहरण आहे.
कोष्ठविरुध्द (पोटाच्या विरोधी)
जो व्यक्ती अधिक मात्रेत आहार पचवु शकतो अशा व्यक्तीने अत्यल्प आहार घेणे व जो व्यक्ती अधिक मात्रेत आहार पचवु शकत नाही अशा व्यक्तीने अत्याधिक आहार घेणे कोष्ठ म्हणजे कोठ्याच्या विरोधी ठरते..
अवस्थाविरूध्द
परिश्रम, मैथुन तसेच व्यायाम आदी कार्यात असणारया लोकांना वातवर्धक आहार देणे व ज्याला झोप आळस अत्याधिक प्रमाणात येतो अशा व्यक्तीने कफवर्धक आहार घेणे. हे अवस्था विरूध्द आहार घेणे ठरते.
क्रमविरूध्द
जो व्यक्ती मलमुत्रांचा त्याग न करता वा भुक नसताना वा अत्याधिक भुक लागुन गेल्यावर, वा जेवणाची सुरूवात तिखट खारट पदार्थांनी, व जेवणाची शेवट गोड पदार्थांनी करतो तो क्रमविरूध्द आहार घेत असतो...
परिहारविरूध्द
प्राण्यांच्या मांसाच्या सेवनानंतर पुन्हा गरम गुणधर्माचे पदार्थ खाणे. म्हणजे आग लागलेली असताना त्यात रॉकेल ओतल्या सारखे होय.. यालाच परिहार विरूध्द अन्न म्हणता येईल
उपचार विरूध्द
तुप वैगेरे स्नेहयुक्त पदार्थ सेवनानंतर
थंड पाणी पिणे हे उपचार विरूध्द उपक्रमाचे उदाहरण होय.
पाकविरूध्द
कच्चे बनलेले अन्न वा अधिक शिजलेले अन्न वा कपरलेले अन्न पाकविरूध्द प्रकारचे अन्न होय.
संयोग विरूध्द अन्न
आंबट पदार्थ दुधासह घेणे वा दुध फळे दुध मीठ एकत्र खाणे. हे संयोग विरूध्द आहार आहे.
ह्रदय विरूध्द अन्न
जो आहार मनास रूचत नाही तो आहार ह्रदय विरूध्द प्रकारात येतो.
मनास रूचकर पण शरीरास हितकारक आहार घेणे उपयुक्त असते.
सम्पद् विरूध्द आहार
असे द्रव्य पदार्थ घेणे जे अजुन योग्य रितीने तयार झाले नाहीत वा तयार होऊन बराच काळ लोटल्याने खराब झाले आहेत.. उदा. कच्चे खाण्यास अनुपयुक्त फळे वा पिकुन खराब झालेली फळे खाणे.
विधीविरूध्द आहार
आयुर्वेदात आहार घेण्याचे जे नियम विधी सांगितलेली आहेत त्यांचे पालन न करता आहार घेणे हे विधी नियम विरूध्द अाहारसेवन ठरते.
जसे एकान्तात जेवन न करणे, रात्री दही सातु खाणे...इत्यादी
🔥 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती 💪🏻
व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्|| वा.सु. ७/४६
व्यायाम करणारे, स्निग्ध आहार घेणारे, अग्नि भुक चांगली असणारे, तरूणवयात व बलवान अशा लोकांत जरी विरूध्द अन्न सेवन केले तरी फारसे विकार होत नाहीत. तसेच सवयीमुळे व कमी प्रमाणात विरूध्द अन्न फारसे बाधक ठरत नाहीत.
🍀विरूध्द पदार्थ अन्न सेवनाने होणारे त्रास🍀
विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.....
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग(रक्त कमी होणे) आमविष(पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड, विविध त्वचाविकार सोरियासिस,ग्रहणीरोग( ibs),सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत. नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात. विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा......
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102,9130497856
No comments:
Post a Comment