Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, May 22, 2011

इन्टर्नशिप एक आव्हान..


आशा या वैद्यकीय व्यवसायाची  निवड केल्याचा सार्थ अभिमान बालगत प्रत्येक विद्यार्थी ४ १/२ वर्षा एकाच दिवसाची वाट पाहत असतो ,तो दिवस म्हणजे अंतिम वर्षाच्या निकालाचा . निकालाचा दिवस !! मनात प्रचंड  भीती ,डोक्यावर मणाचे ओजे - पालकांच्या अपेक्षांचे अणि आपन पाहिलेल्या स्वप्नांचे.. वेबसाइट वर बैठक क्रमांक, वर्ष टाकुन जाला की निकल येई परेन्त ४ १/२ सेकंड मधे ४ १/२ वर्ष च कल ज़र्ज़र निघून जातो...वर्गातील पहिलाच दिवस ,रात्र रात्र जागुन केलेला आभ्यास ,dissection  चुकवून पाहिलेला सिनेमा ,चहा ची टपरी, १ अणि २ वर्ष ज़ल्यावर केलेला दंगा, कळत  नकळत निर्माण जालेली नाती अणि रुनानुबंध ....यात वेळ कसा जातो समजतच  नाही अणि १६' स्क्रीन वर आयुष्याचा निकाल लागतो  ,डोळ्यातून एकाच वेळी असू अणि तोंडातून आरोळी बाहेर पड़ते " मी डॉक्टर जालो sssssssss"" याच वेळी  काही मित्रांचा स्वप्नभंग जाला आहे हे पाहून वाईट वाटते  पण मनाच्या  संवेदानावर "डॉक्टर" मात करतो अणि जीना इसीका नाम है बोलून पेढे वाटायला बाहेर पडतो.....
              आनंदी आनंद ,पेढे वाताप ,बक्शिसने खीसे अणि कौतुकाने मन भरल्यावर इन्तेर्न्शिप च्या पहिल्या दिवशी हॉस्पिटल मधे पाउल  पड़ते , सर नि विचारलेले प्रश्न bounsar सारखे जातात ( तिथे no ball denare कोणी नसते अणि अहो त्यावेळी मुन्नी बदनाम जाली होती, शीला  जवान जाली होती त्यामुले वाचायचे राहिले हे सांगायची सोय नसते ) सर आपल्याकडे पाहून कुत्सित हसत असतात अणि त्यातूनच सन्देश मिळतो " बेट्या ,वैद्यकीय व्यवसायात तुजे स्वागत आहे "
                   इन्टर्नशिप ही मुलातच असते ती वैद्यकीय व्यवसायाची ओळख होण्यासाठी ,पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष रुग्नावर वापरण्यासाठी कारण पुस्तकातून ज्ञान घेण सोप असत पण ते  रुग्नावर वापरना कठिन असत अणि "बहुतेक जमेल मला " असा न म्हणता " होय जमते मला " असा आत्मविश्वास डॉक्टर ला देण्यासाठी ,काही शिकायचा राहिला असेल तर ते शिकण्या साठी हे वर्ष असत .....घाना,इंग्लैंड,साउथ अफ्रीका  मधे हा काल २ वर्षाचा,इरान अणि स्वीडन  मधे १८ महीने आहे .
           या  काळात इन्टर्न खुपच विभ्रमावास्थेत असतो ,आधीच कसा बसा पास ज़लेला असतो ,basic clear नसते , pathological reports,ECG,CT,MRI reports ,USG, Xray अजुन नीट समजत नसतात ,एकाच रुग्णत सगळ्याच रोगांची लक्षणे दिसू लागतात ,medicine dose  नीट adjust करायला जमत नसतात ,यामुले एक डोळा davidson वर अणि एक डोळा  CIIMS वर आसतो, या सगळ्यात तो गोंधालुन जातो ..फक्त ज्यानी अधि clinic केले असते त्यांचा मार्ग थोडा सुकर असतो . नकळत होत असलेल्या लहान सहन चूका, अपुरे ज्ञान ,कसा विचारायच  हा न्यूनगंड यामुले आतल्या आत तो अस्वस्थ होत असतो..अणि खरी अस्वस्थता निर्माण होते ती रुग्नाच्या  च्या नजरेने ..प्रतिस्पर्धी संघास विजयासाठी ६ चेंडूत १० धावा हव्या असताना धोनी जेवा मुनाफ / नेहरा कद चेंडू देतो तेवा कोत्यावधि भारतीयांच्या मनात जी भावना येते तीच रुग्णच्या चेहेर्यावर ज़लाकते " आता हा काय करणार ??" रुग्नाची भावना त्याच्या दृष्टीने बरोबर असली तारी या नजरेची सवय नसलेल्या  इन्टर्न च्या अत्मविश्वाचे खच्चीकरण होते अणि असे वारंवार घडले की येते विमनास्कता !!
       या वर्षाच्या काळात एक प्रश्न सताव्तो तो म्हणजे पुढे काय करायच?त्याच्या जोडीला ही विमनास्कता आली की विचार्चाकरे वेगाने फिरू लागतात ..सर्वांची पैसे भरून एम्.डी/ एम्.एस व्हायची आर्थिक ताकद नसते ,तर मेरिट ने व्ह्यायची बौद्धिक ताकद नसते अणि ज़लेच तर रुग्णालय काढणे व चलवाने  सोपे नसते , इतर courses अणि त्यांची उपयुक्तता याची प्रतेकला माहिती असतेच असे नसते त्यामुले अडचणीचा  डोंगर वाढतच जातो .. 
              डॉक्टर जेवा I.P.S/I.A.S होउन देशाचे आव्हान पेल्तात, किंवा "नटसम्राट " होउन कलेचे आव्हान पेलतात तेवा मन अभिमानाने फुलून येते ,पण सग्ल्यानाच हे जमते असे नाही..शैक्षणिक कर्जाचा वाढत जाणारा आकड़ा ,खांद्यावर असणारी जबाबदारी, काही गुंता गुन्तिचे घरघुति प्रश्न अणि त्यामुले आयुष्यात स्थिर व्हयाची गड़बड़ यमुले पिचून एखादा मित्र मला म्हणतो "गड्या बस जाला आता,आपन बर अणि G.P बरी " तेवा मनात कोठेतरी वाईट वाटता ...G.P वाईट नक्कीच नसते पण त्याने पाहिलेली स्वप्न अणि प्रत्यक्ष परिस्थिति यात खुप तफावत असते ..माज्यासारखा वैद्यकीय वारसा असनारा इन्टर्न कदाचित आशा समस्या कधीच समजणार नाहीत कारन शून्यापासून सुरु करणे अणि दहा पासून सुरु करणे यात खुप फरक आहे ...
                               या सगळ्या अव्हानाचा विचार करतानाही हे मन प्रचंड आशावादी असते..कारण आज या व्यवसायात जे निष्णात आहेत ते पण या अवस्थेतून गेले आहेत हे माहित  असते ..प्रकाशाचा वाटा,के.इ.एम् सारखी पुस्तके वाचल्यावर आपल्या समोरचे आव्हान काहीच नाही असे वाटू लागते. माज्या अयुर्वेदास आज राजश्रय मिळत आहे अणि त्याच्या उत्कर्षा साठी परिश्रम करायची तयारी असते ..अशावेळी " चांगले रुग्णालय म्हणजे काय?तर समाजातील दिन दुबल्या ,अनाथना नाथ करणारे, वैद्याकतिल सर्वोत्तम ज्ञान जिथे शिश्योत्तमानना प्रदान केले जाते ,जिथे नवा विचार संशोधनाचे स्फुल्लिंग फुलवतो , जिथे वैद्याकाचे शास्त्र सुश्रुशेच्या कलेशी एकरूप पावते,प्रत्येक  शाखेतील शिक्षकाला जेथून प्रेरणेचा  स्त्रोत मिळतो ,अणि जेथे वैद्यकीय सल्लामसलत ही सदभावना अणि वैचारिक देवानघेवानिच्या भक्कम पायावर उभी असेल अशी गंगोत्री म्हणजे रुग्णालय " हे विल्यम ऑस्लर यांचे शब्द अताव्तात अणि पाय अपोआप रुग्णालय कड़े पडतात ...एक नव्या अव्हानाला सामोरे जायला......
   (वैद्य) अंकुर रविकांत देशपांडे
       B.A.M.S INTERN
          SANGLI 416416
    CELL NO- +91 9175338585
                   

Wednesday, May 18, 2011

आयुर्वेद संशोधन

मतिमंद मुलांसाठी शंखपुष्पीचा वापर लाभदायक
मुंबई - मतिमंद मुलांमधील दोष निवारण करण्यासाठी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये शंखपुष्पी ही अत्यंत महत्त्वाचे योगदान देऊ शकते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. महाराष्ट्रातील 100 मतिमंद मुलांची निवड या संशोधन कार्यासाठी झाली असून, त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारपद्धतीमध्ये शंखपुष्पीचा वापर हा लाभदायक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षांपासून चालू असणारा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय क्षेत्रामधील आयुर्वेदाचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित होणार असल्याचा विश्‍वास संशोधन संस्थेकडून व्यक्त केला जात आहे.

मतिमंद मुले ही इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. त्यांचा बौद्धिक विकास हा उशिरा होतो; तसेच काही मुलांमध्ये शारीरिक वाढीमध्येही मर्यादा आढळून येतात. या मुलांमध्ये हे व्यंग नेमक्‍या कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, त्यात आनुवांशिकता, रक्तगट, जीवनशैली, तणाव यासारख्या गोष्टींप्रमाणे अन्य कोणत्या बाबी कारणीभूत असतात यांचाही विचार करणे गरजेचे असते. या मुलांमधील न्यून पूर्णपणे संपुष्टात आले नाही तरीही त्यांचे परावलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यासाठी विशेषत्वाने विचार करण्याची गरज या प्रकल्पामध्ये करण्यात आल्याचे डॉ. कुणाल पाटील सांगतात. याच विचाराचा पुढचा टप्पा म्हणून आयुर्वेदिक औषधांबाबतही विविध प्रयोग करण्यात आले. त्यातून शंखपुष्पीचा एका विशिष्ट प्रमाणात या मुलांमध्ये केलेला वापर हा सकारात्मक परिणाम देतो, असे संशोधनांती सिद्ध झाले. यासाठी निवड करण्यात आलेल्या या मुलांचा वयोगट चार वर्षांपेक्षा कमी असावा, जन्मानंतर आवश्‍यक त्या सर्व प्रकारचे लसीकरण करण्यात आलेले असावे, डोक्‍याला अथवा मेंदूला कोणत्याही प्रकारची दुखापत यापूर्वी झालेली नाही हेदेखील यात कटाक्षाने पाहण्यात आले आहे. तसेच या मुलांच्या आई-वडिलांमध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा कोणताही आनुवंशिक आजार नसणे हा मुद्दाही या संशोधनातील निवडीच्या वेळी महत्त्वाचा मानला गेला आहे.

डॉ. वैशाली इंगले -घोलप 
लन्दन 
dr.vaishali.ingle@gmail.com

आंबे

आंबे खा जपून...
पिवळ्याधम्मक आंब्याच्या प्रेमात पडला नाही, असा माणूस मिळणे विरळच. मे महिना आणि आंबा हे दोन्ही हातात हात घालून येतात. आंब्याची चव जिभेवर रेंगाळत
राहते आणि बस एक और... चा नारा बुलंद होतो. यात लहानांसोबत मोठ्यांचाही सहभाग असतो.

फळांच्या या राजाचे आहारात भरपूर उपयोगही आहेत. अ आणि क जीवनसत्वांचा मोठा सोत असलेला आंबा त्वचेवरील सुरकुत्या कमी करून ती तरूण ठेवतो. त्यात बी कॉम्प्लेक्स असल्याने त्वचा तजेलदार करतो. कैरीमध्ये अॅण्टि ऑक्सिडन्ट वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे अमृतचवीचा आंबा खाण्यात भरपूर फायदेही आहेत. अर्थात पदार्थ कितीही चांगला असला तरी अति तेथे माती होते.

आंब्यामध्ये भरपूर काबोर्हायड्रेट््स आणि कॅलरीज असतात. त्यामुळे पटकन वजनही वाढते. त्यामुळे वजनाबाबत कॉन्शस असलेल्या व्यक्तींनी फार आंबे खाऊ नयेत. आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींनीही त्यापासून चार हात दूर राहिलेलेच चांगले. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खा. खूप आंबे खाल्ले की पोटही बिघडते.

आंब्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे शरीरावर येणारे उष्णतेचे फोड. आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. या फोडांना गंमतीत आंबे फुटले का, असेही म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हा प्रकार अनेकदा होतो. या फोडांना खाजही सुटते. याचा सरळ उपाय म्हणजे आंबे कमी करणे असा असला तरी केवळ मोसमात मिळणाऱ्या या फळांच्या राजाचा मोह सुटत नसतो, हेदेखील खरे. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अॅलजीर् लक्षात येत नसल्याने तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वषीर् अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नका. एवढे करूनही फोड आलेच तर त्यावर गरम टॉवेल लावा. त्यामुळे ते लवकर बरे होऊ शकतील.

काही वेळा आंब्याच्या सालीमधील चिक लागून ओठाशेजारचा भाग तसेच गालावर रॅशेस येतात. हा प्रकार दुमिर्ळ असला तरी त्याबाबतही काळजी घेतली पाहिजे. आंबा नीट धुवावा. सालासकट आंंबा चोखून खाणे टाळावे. तसेच रॅशेस आले तर त्यावर मध लावावा. खूपच अॅलजीर् होत असेल तर आंबे टाळणे चांगले. अर्थात ज्यांना अशी अॅलर्जी असेल त्यांच्यासाठीच हे सारे आहे. इतरांनी आंब्याचा आनंद लुटायला हरकत नाही.http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक
धुले 
  • 8275007220
  • 9960507983

निद्रा भव!

निद्रा भव!
झोपेतून मध्येच जाग आल्यावर झोपण्यासाठी बराच वेळ शिल्लक असल्याची जाणीव होणे यासारखा आनंद नाही . झोपण्यासारखे सुख नाही आणि उत्त
म आरोग्यासाठी शांत झोप हा महत्त्वाचा घटक आहे .

झोप आवश्यक का आहे ?
दिवसभर पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी रात्रीची झोप खूप गरजेची आहे . पण आपले आयुष्य अधिक धावपळीचे झाल्यावर झोपेकडे कमी लक्ष दिले जाते . उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोपही झाली पाहिजे .

किती तास झोपायचे ?
वय वाढत जाते तसे झोपेचे तास कमी होत जातात . अगदी तान्हे मूल १८ ते २० तास झोपते . थोडे मोठे झाल्यावर झोपेची वेळ कमी होते आठ ते दहा तासांवर स्थिरावले . मोठ्यांना दिवसभरात सहा ते आठ तास झोप लागते .

झोपेवर परिणाम करणारे घटक
दररोजच्या आयुष्यातील अनेक घटक झोपवर परिणाम करत असतात . सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो तणाव . काम , दैनंदिन आयुष्यातील प्रश्न यामुळे मनावर आलेल्या दडपणामुळे शांत झोप लागत नाही . याशिवाय बेडरुममधील जास्त प्रकाश , आवाज , उच्च तापमान , जेवणापूर्वी घेतलेले खूप आणि जड जेवण , झोपेपूर्वी दोन तासात केलेला थकवणारा व्यायाम आणि जेवणापूर्वी चार तासांदरम्यान घेतलेली कॉफी , चहा यामुळेही झोपेवर परिणाम होतो .

सध्या सुरू असलेल्या तापमानवाढीचा झोपेवर परिणाम होतो ?
जास्त गरम होत असल्याचा झोपेवर निश्चितच परिणाम होतो . जास्त आर्द्रता आणि त्यामुळे येत असलेल्या घामामुळे त्रास होतो .

झोपेसंबंधी समस्या ...

पुरेशी आणि शांत झोपेआड अनेक समस्या येतात .

१ . झोपेत घोरणे
२ . झोप न लागणे
३ . झोपेत बोलणे किंवा चालणे
४ . चित्रविचित्र स्वप्ने पडणे
५ . खूप जास्त वेळ झोप लागणे .

अपुरी किंवा जास्त झोप यांचा शरीरावर आणि मनावर प्रभाव पडतो ?
झोप कमी झाली की स्वभाव कार्यक्षमता घसरते . अपुरी झोप घेत असलेल्या व्यक्तींमध्ये थकवा , चिडचिड , उच्च रक्तदाब , विसरभोळेपणा , विचारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले आहे . घोरण्यामुळे झोप अपुरी राहत असेल तर त्याचा संबंध स्मृतिभ्रंश , हृदयविकार , आकडी किंवा मधुमेहाशी जोडता येऊ शकतो .

झोप कशी सुधारावी ?
झोपेशी सुसंगत असलेली जीवनशैली पाळा .
दैनंदिन धावपळीत झोपेसाठी पुरेसा वेळ द्या .
बेडरुममधील प्रकाश कमी करा . आवाज , तापमान यावर नियंत्रण ठेवता आल्यास उत्तम .
झोपेपूर्वी जड आहार टाळा . हलका आहार घेतल्यास हरकत नाही . पचायला जड असलेल्या पदार्थांमुळे पचनसंस्था कार्यरत राहते आणि त्यामुळे झोपेत अडथळे येतात .
झोपायला जाण्याआधी दोन तासांदरम्यान दमछाक करणारा व्यायाम टाळा . त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप येण्यास अडथळा येतो .
झोपेपूर्वी चार तासांदरम्यान चहा , कॉफी यांच्यासारखे उत्तेजक पेय टाळाhttp://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक 
धुले ..

  • 8275007220
  • 9960507983


नखदर्पण

नखदर्पण

हातांवरील रेषांप्रमाणेच नखांवरुनही भविष्य जाणून घेता येते. अस म्हणतात कि चेहरा हा मनाचा आरसा असतो, तर नख हे मन व शरीर दोघांचेही प्रतिबिंब दाखवते. आयुर्वेदानुसार नखे ही अस्थिधातुचा मल आहेत. नखांची परीक्षा त्यांचा आकार व रंग यावरून मुख्यत्वे केली जाते.

आकारावरुन नखांचे प्रकार:
१)लांब नखे:
(१) खुप लांब नखे ही शारीरिक शक्ति कमी असल्याचे द्योतक आहेत. अशा व्यक्तिंची फुफ्फुसे कमजोर असतात. त्यांना छातीचे विकार होण्याची शक्यता असते. या बरोबरच जर नखांचा रंग निळसर रेखायुक्त असेल तर हा विकार बळावलेला असतो. याचप्रकारची पण कमी लांबीची नखे असलेल्या लोकांना श्वासनलिकेसंबधी आजार होऊ शकतात.
(२) लांब व अरूंद नखे असणाऱ्यांनी आपल्या मणक्याची काळजी घ्यावी कारण त्यांना मणक्याचे आजार होण्यची शक्यता जास्त असते.

२) छोटी नखे:
(१) छोटी मांसात खोल रुतलेली, मुळशी चपटी असलेली नखे असलेल्यांना मज्जासस्थेचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशातच जर नखे पांढुरकी व तुटकी असल्यास विकार फारच बळावतो.
(२) शिंपल्याच्या आकाराची नखे असलेल्यांना अर्धांग वायु होण्याची शक्यता असते.
(३) छोटी चौकोनी पण वरच्या बाजुस गोलसर नखे असलेल्यांना गळ्याचे विकार जसे टॊन्सिलाइटिस, फॅरींजाइटिस ई. होण्याची शक्यता असते.
(४) छोटी व मुळाच्या बाजुला चपटी, पातळ नखे तसेच नखावरील चंद्राचा आकार लहान असणाऱ्या व्यक्तिंमध्ये रक्ताभिसरणची क्रिया नीट होत नाही. त्यामुळे त्यांना हृदयाचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.
कोणत्याही नखाच्या मुळशी असलेले नखचंद्र मोठे असलेल्या व्यक्तिच्या हृदयाची रक्ताभिसरणची क्रिया चांगली असते.
नखांवर ठीपके व डाग असलेली व्यक्ति घाबरट असते. जर त्यांच्या मुळाशी लहान चंद्र असेल तर किंवा चंद्र नसेल तर त्यांन मज्जातंतुंचे विकार होण्याची शक्यता असते. नखांवर उभ्या रेषा असतील तर नुकतेच आजार होऊन गेले आहेत असे समजावे.
जर व्यक्तिच्या बोटांची पहिली पेरे चेंडूप्रमाणे गोल व नखे ही गोल असतील व नखचंद्र नसतील तर त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते.
नखे खुप पातळ असतील तर त्यांचे तुकडे पडतात अशा व्यक्तिंची प्रकृति फार नाजुक असते.

शारीरिक प्रकृतिप्रमाणेच नखांवरुन मानसिक प्रकृतीही ओळखता येते.
एखाद्याच्या नखाची रुंदी लांबी पेक्ष जास्त असेल तर ती व्यक्ति भांडखोर असते. नखे छोटी असतील तर टीका करण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तिची तर्कब जास्त असेल तरौद्धी चांगली असते, ते चांगले विश्लेषक असतात. व्यवहारी व शीघ्र निर्णय घेणारे असतात. अशा व्यक्ति रागीट व वादविवाद करणाऱ्या असतात. एखाद्या कामाला सुरुवात केल्यावर ते संपल्याशिवाय त्या थांबत नाहीत. लांब नखे असणारे लोक शांत, नम्र, आदर्शवादी, स्वप्नाळू, कलाप्रेमी असतात. ते वादविवादात न पडता आपले मतभेद शांतपणे तोडगा काढून संपवतात.

नखांचा रंग:
नखांच्या रंगावरूनही बऱ्याचशा गोष्टी कळतात. नखांचा रंग पिवळा असल्यास यकृताची कमजोरी किंवा य्कृताचे विकार दर्शवते. नखांचा रंग सफेद असल्यास रक्ताल्पता दखवते. अशी व्यक्ति कायम आजारी व चिडचिडी असते. त्यांना शारीरिक कष्ट जमत नाहीत. नखे निळी असलेल्या व्यक्तिंची फुफ्फुसे अशक्त व आजारी असतात. प्रकृती गंभीर असते. गुलाबी रंगाची नखे असलेल्या व्यक्ति उत्साही व रसिक असतात. प्रेमळ व स्वस्थ असतात. लाल नखे असलेली व्यक्ति पित्तप्रकृतीची, रागीट, भांडखोर आणि मेहनती असते.

अशाप्रकारे नखांद्वारे विविध शारीरिक व मानसिक गोष्टींची माहिती करुन घेता येते, पण ही माहीती करून घेताना हातावरील अन्य लक्षणे, चिन्ह व रेषा यांचाही विचार करणे आवश्यक आहे ..

http://vindhya-astro-ayurved.blogspot.com/


http://www.facebook.com/profile.php?id=100000883922742&sk=इन्फो  • Lake -hieghts , Powai
  • Mumbai (Bombay), इंडिया
  • 9221509969


मुलाखत

मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांची गिरीश कुबरे यांनी घेतलेली मुलाखत...

प्रश्न : मानसिक दृष्ट्या एखादी व्यक्ती निरोगी अथवा रोगी आहे, हे कसे ठरवावे?
उत्तर : एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी अथवा रोगी आहे, हे ठरविणे तारेवरची कसरत आहे. त्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. मला पूर्वी पेक्षा किती ताण जाणवतो किंवा मला मिळणारी झोप पुरेशी आहे काय याचा विचार करावा. माझा स्वभाव पूर्वीपेक्षा भित्रा झाला आहे काय, किती वेळा भिती वाटते. दैनंदिन कार्यातून समाधान मिळते काय. ही पॅरामीटर्स आहेत. व्यक्तीने त्याबाबत स्वत:च विचार करुन उपचार घ्यावा किंवा तिसर्‍या व्यक्तीशी चर्चा करुन उपचार घ्यावा.

प्रश्न : मनाची ताकद वाढविण्यासाठी काय करावे?
उत्तर : वास्तविक भारतीय संस्कृतीने मनाच्या सुदृढतेसाठी मोठे योगदान दिले आहे. संत वाडमय, अभंगातून मनाची शक्ती, एकाग्रता वाढविण्याबाबत सांगितले आहे. मन आणि शरीर एकच आहे. ते अव्दैत आहे. मन प्रसन्न ठेवले तर शरीरही निरोगी राहिल. विचार पध्दतीत बदल करणे, जास्तीत जास्त हसल्याने मन सुदृढ होते. चिंता करु नये, रागावर नियंत्रण ठेवावे, मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, कसलीही भिती बाळगू नये, या गोष्टी केल्यास मनाची ताकद वाढेल.

प्रश्न : शहरातील व्यक्तींप्रमाणे खेड्यातील व्यक्ती देखील मानसिक विकाराने त्रस्त असल्याचे जाणवते, याबाबत काय सांगाल?
उत्तर : मानसिक आरोग्य हे भावनांवर अवलंबून आहे आणि भावना एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे असते. सभोवताली आनंदी किंवा दु:खी व्यक्ती असेल तर त्या पध्दतीने वातावरण तयार होते. नेहमीच जर मन खच्चीकरण करणारे विचार देणार्‍या व्यक्तीबरोबर राहिल्यास सभोवतालच्या व्यक्तीची मानसिकता देखील तशीच होते. त्यातून मनोविकार जडतो. त्यामुळे शहराप्रमाणे खेड्यातही मानसिक रुग्ण आढळू शकतात.

प्रश्न : मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी काय करावे?
उत्तर : माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, मात्र मनाचे प्रश्न आपण सोडविले नाहीत. हा बेसिक प्रश्न आहे. मानसिक सुदृढतेसाठी सदैव आनंदी राहावी. विनाकारण कसल्याही गोष्टीची चिंता करुन नये. स्वत:शी संवाद साधावा. भावनांवर नियंत्रण ठेवावे.

Sunday, May 15, 2011

किराततिक्त


Swertia Chirata किराततिक्त

गण - तिक्त स्कंध , स्तन्य शोधन , तृष्णा निग्रहण ( चरक )

आरग्वधादी ( सुश्रुत )

``किरात: सारको रुक्ष: शीतल: तिक्तको लघु :/
सन्निपात ज्वर श्वास कफपित्तास्त्र दाहनुत //
कास शोथ तृषा कुष्ठ ज्वर व्रण कृमि प्रणुत // ``
( भाव प्रकाश निघंटु )

Botanical Name : Swertia Chirata


Family Name : GentianaceaeCommon Name : Clearing Nut Tree, Bitter Stick, Chirette Indian, Dowa I Pechish, Indian Gentian
Part Used : SeedsHabitat : Found in the temperate himalayas at altitudes of 1,200-3,000 m. from kashmir to bhutan and in the khasi hills in meghalaya at 1,200-1,500 m.Product offered : Seeds


गुण -लघु , रुक्ष
रस = तिक्त
विपाक = शीतकर्म व प्रयोग =
दोष= कफ पित्त शामक , त्यामुले कफ पित्त जन्य विकारांवर उपयोगी


संस्थानिक कर्म

बाह्य - व्रण शोधन , याच्या काढयाने स्त्रावी व्रण धुतात .
अंगावरील खरक्यात काढ़े चिराइताच्या काढ्याने आंघोळ घालतात .


पाचन संस्थान = दीपन ,
तृष्णा निग्रहण ,
आम पाचन ,
पित्त सारक
अनुलोमक व
कृमिघ्न आहे ,
आमज तृष्णा ,
यकृत शैथिल्य ,
यकृत वृद्धि ,
बद्ध कोष्ठ व
कृमि यांत याचा चूर्ण व काढ़ा देता येते .
याने सर्व पचन संस्था क्रम क्रमाने प्राकृत होत जाते ,
याने क्रम क्रमाने भूक वाढत जाते व
शौचास साफ़ होऊ लागते .


रक्त वह संस्थान - रक्त शोधक ,
रक्त पित्तघ्न , व
सूज नाशक आहे .
रक्तार्शात उपयोगी आहे
कामला ,
पांडू रोग ,
यकृत वृद्धि यांत उपयोगी पड़ते .


श्वसन संस्थान - कफघ्न ,
श्वास हर

प्रजनन संस्थान - स्तन्य शुद्धि कर ,
रस धातु चे पाचन करून विशुद्ध व हलके दूध उत्त्पन्न करण्यास उपयोगी

त्वचा - कुष्ठघ्न

तापक्रम - ज्वरघ्न
प्लीहा वृद्धि नाशक

सात्मीकरण=काडे चिराईत कटु पौष्टिक व बाल्य आहे .
अपचन जन्य अशक्तता व
तापानंतर ची क्षीणता याने कमी होते .
ज्वर नंतरचे उत्तम रसायन आहे ,
याचे सिद्ध दूध द्यावे .

उपयुक्तांग - पंचांग


मात्रा - काढ़ा ६० मी. लि ,
चूर्ण २-६ ग्रम

विशिष्ठ कल्प -
महासुदर्शन चूर्ण ,
किरातादी क्वाथ ,
मेदोयोग शर्करा ,
किरातादी तैलं


स्त्रोतों गामित्व -

दोष= कफ पित्त कमी करणारा

धातु - रक्त ( शोफ ) रस ( अग्नि वर्धक )
रक्त ( रक्त पित्त )
मेद व अस्थि गत ज्वरावर किरातिक्तादी काढ़ा

मल = पुरीष ( सारक )

अवयव -आमाशय बल्य ,
गुद( अर्श )Uses : According to Ayurveda, this herb is a bitter tonic, stomachic. It is useful in liver disorders, eyes, heart. A strongly bitter tonic it is an excellent remedy for a weak stomach, especially when this gives rise to nausea, indigestion and bloating and it has also been shown to protect the liver.

It is best known as the main ingredient in Mahasudarshana churna, a remedy containing more than 50 herbs. It also contains xanthones which are reputedly effective against malaria and tuberculosis, and also amarogentin, a glycoside that may protect the liver against carbon tetrachloride poisoning.

The whole plant is an excellent drug for intermittent fevers, skin diseases intestinal worms, bronchial asthma, burning of the body, regulating the bowels. The root of the plant is useful in checking hiccups and vomiting. It is used in the liquor industry as a bitter ingredient.

dr. Arvind pathak
Raghunath Ayurvediya Chikitsalayam & Research centre
survey no.36/3/1a
near old sai baba mandir
Kharadi road
yashwant nagar
chandan nagar
PUNE - 411014
phone - 09850662190
dr. arvindpathak@gmail.com

स्थूलता

आपले निरोगी राहणे किंवा न राहणे हे आपण जे अन्न ग्रहण करतो त्यावर ब-याच प्रमाणावर अवलंबून असते. अन्न आपणास जीवनावश्यक सत्व पुरवतात. सुदृढ शरीरासाठी आपणास लागणारी प्रथिने आपणास उर्जा देत असतात. जर आपण जास्त खात असू तर आपली शरीरयंत्रणा आवश्यक ते सत्वे घेऊन उर्वरीत भाग मेदात म्हणजेच चरबीत रुपांतरीत करत असते. तसेच ही चरबी आपल्या शरीरातून उत्सर्जीत न होता शरीरातच साठत असते. जर आपण नियमित अतिरीक्त अन्न खात राहीलो तर ही चरबी साठत जाऊन स्थूलता येऊ शकते.

स्थूलता म्हणजेच शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे होय. स्थूलता हा कायमस्वरुपी आजार म्हणजेच मोठ्या कालावधीसाठी शरीरात रहाणारा आजार मानला जातो. जसे उच्चरक्तदाब किंवा मधुमेह. आपल्या आरोग्यासाठी घातक मानल्या जाणा-या आजाराच्या आघाडीच्या कारणांमधे तंबाखूचा पहिला तर स्थूलतेचा (अमेरिकेत) दुसरा क्रमांक लागतो. शरीरातीला द्रव्यमान सुचकांक(BMI) जर ३० हून अधिक असेल तर स्थूलता असल्याचे निदान करता येते. (BMI) अंक हा आपल्या उंचीनुसार असलेल्या वजनाच्या प्रमाणात ठरवतात.

स्थूलता हा अमेरिका व अन्य प्रगतशील राष्ट्रातील एक महत्वाचा प्रश्न बनला आहे. अमेरिकेतील लोकसंख्येच्या जवळ जवळ अर्धे लोक शरीराचे वजन अधिक असल्यामुळे ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. तेथिल प्रत्येक ५ मुलांमधील एका मुलाचे वजन अधिक असते. लोकसंख्येच्या एकतृतियांश भाग हा स्थूलतेचा बळी ठरला आहे. स्थूलतेचे प्रमाण आपल्या समाजात वाढत आहे कारण आपल्या आहारात मेदयुक्त पदार्थ वाढत आहेत व शरीराच्या हलचालीचे (क्रियाशीलतेचे प्रमाण) कमी कमी होत चालले आहे.

अमेरिकेतील लोक प्रत्येक वर्षी वजनात संतुलन आणण्यासाठी, आहार संतुलनासाठी, त्याविषयाच्या पुस्तकांसाठी, त्यावरील औषधांसाठी करोडो डॉलर्स खर्च करतात. तसेच जवळजवळ ४५ करोड डॉलर्स स्थूलतेमुळे उद्भवणा-या आजारावर उपचारासाठी खर्च केला जातो. तसेच प्रत्येक वर्षी स्थूलतेमुळे उद्भवणा-या आजारामुळे उद्योगधंद्यात २० करोड डॉलर्सचे नुकसान होते असे निरिक्षणावरून दिसून आले आहे.

स्थूलतेची कारणे:
जेव्हा आपण आवशक्तेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ ग्रहण करतो तेव्हा त्याचे अतिरिक्त मेदात रुपांतर होऊन शरीरात साचत जाते. ह्या साचत गेलेल्या चरबीमुळे शरीराचे आकारमान वाढते. चरबीमधे पेशी असतात. चरबीचे प्रमाण वाढत गेल्यामुळे पेशींची संख्याही वाढते. आपण जरी वजन घटवले तरी त्यापेशी आकुंचन पावतात त्यांची संख्या मात्र तितकीच राहते.

स्थूलता वेगवेगळ्या कारणामुळे उद्भवू शकते. त्यात वय, लिंग, गुणसूत्र, मानसिकतेची रचना व वातावरणातील बदल हे महत्वाचे घटक ठरतात.

गुणसूत्र: स्थूलता असलेले नातेवाईक असल्यामुळे आपल्याला स्थूलता येईलच असे नाही. पण स्थूलता गुणसूत्रांवर व जीवनशैलीवर अवलंबून असते.
भावना: काही लोक नैराश्यामुळे, सर्व आशा सोडल्या गेल्यामुळे, रागामुळे, मानसिक दबावामुळे तसेच अशा अनेक कारणामुळे जास्त अन्न ग्रहण करतात. त्यात भूख हा भागच नसतो. याचा अर्थ असा नाही की वजनाचे आधिक्य किंवा स्थूलता असणा-या लोकांना भावनांच्या समस्या इतर लोकांपेक्षा अधिक असतात. खरतर अशा व्यक्ती भावनेच्या भरात अधिक अन्न ग्रहण करतात व याची त्यांना एकप्रकारे सवयच लागते. काही प्रकरणात स्थूलतेचा बचाव तंत्र म्हणूनही वापर केला जातो. कारण यात शरीराच्या आकारमानात विचित्रता आलेली असते. अशा भावनिक समस्यांचा सामना करणा-यांना केलेली मानसिक मदत त्यांना उपयुक्त ठरू शकते.
वातावरणातील घटक: या महत्वाच्या घटकात जीवनशैलीचा अधिक प्रभाव असतो. आपल्या अन्न ग्रहण करण्याच्या सवयी आणि आपली क्रियाशीलता आपल्या आसपास राहणा-या लोकांकडून शिकवले गेले असते. अति अन्न ग्रहण केले जाणे व जास्त काळ बसून काम करणे हे यात घातक ठरू शकतात.
लिंग: पुरुषांना स्त्रीयांच्या तूलनेत जास्त स्नायू असतात. तसेच पुरुषांना स्त्रीयांपेक्षा जास्त उर्जा निर्माण करावी लागते त्यामुळे जास्त स्निग्धसत्वाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे ही त्यांची काही प्रमाणात गरजच असते. तसेच पुरुष स्त्रीयांपेक्षा कमी आराम करतात यामुळेच स्त्रीयांमधे वजन वाढण्याचे प्रमाण अधिक असते.
वय: लोकांकमधे वाढत्या वयानुसार स्नायु कमी होत जाऊन चरबी साठवण्याचे प्रमाण जाते. तसेच चयापचयाची क्रिया काही प्रमाणात हळू चालत असते. अशा लोकांना आपल्या खाद्यपदार्थातील स्निग्धतेचे प्रमाण कमी करावे लागते.
गर्भावस्था: स्त्रीयांमधे गर्भावस्थेच्या नंतर ४ ते ५ पौंडने वजन वाढते. तसेच हे प्रमाण प्रत्येक गर्भावस्थेनुसार वाढू शकते. गर्भावस्थेमुळे स्त्रीयांमधे स्थूलता येऊ शकते.

काही चिकित्साविषयक अवस्थांमुळे व काही उपचार पद्धतींमुळे स्थूलता येऊ शकते. पण ह्या कारणास्तव स्थूलता येण्याचे प्रमाण अती अन्न सेवन व अक्रियाशीलतापेक्षा कमीच असते. यापैकी काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

हायपोथीरॉडिजम
कुशींग सिड्रोम
नैराश्य (डिप्रेशन)
काही औषधोपचार जसे : स्टेरॉईड, अँटीडीप्रेसंट, गर्भनिरोधक गोळ्या
प्रेडर-व्हिल्ली सिंड्रोम
पॉलीचय्स्टीक ओव्हरीन सिंड्रोम
"ग्लॅड्स" या कारणामुळे क्वचितच स्थूलता उद्भवते.
स्थूलता काही इतर खाण्यापिण्याच्या विकारांमुळेही उद्भवू शकते. जसे बिंज पद्धतीने खाणे
काही स्थूलतेच्या संदर्भातील काही विकारास शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात वर्गीकरण होऊन पसरणारी चरबी कारणीभूत ठरते. त्यामुळेच वेगवेगळ्या शाररिक समस्या उद्भवतात. सहसा शरीरात दोन प्रकारची चरबी आढळून येते. स्कँडिनेव्हिया अभ्यासात दिसून आले आहे की आपल्या शरीरात मेद म्हणजेच चरबी आपल्या कमरेभोवती (सफरचंदाच्या आकारात)जमा होते. तसेच हा प्रकार कुले व मांडीवर (त्वचेखाली चरबी जमा होणे) जमा होणा-या चरबीच्या प्रकारापेक्षा जास्त घातक ठरतो.
दक्षता
ज्यांना स्थूलता आली आहे अशांना व ज्यांना अशा शाररिक समस्या टाळायच्या आहेत त्यांनी आपल्या जीवनशैलीतील काही सवयी बदलणे गरजेचे असते. अधिक कालावधीसाठी कमी खाणे म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करायला शिकणे होय.

आपण अती अन्न ग्रहण का करतो? व केव्हा करतो?
मित्रांबरोबर बाहेर गेल्यावर? दुरदर्शन पाहताना?
रात्री उशीरा गोड पदार्थ खाता का?
वेळ नसल्यामुळे किंवा थकल्यामुळे अन्न घरी न बनवता स्निग्ध सत्वाचे प्रमाण अधिक असणारे फास्ट फूड आपण नियमित खाता का?
आपल्या काही खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष दिल्याने आपल्या शरीरात उद्भवणा-या समस्या टाळता येतात व आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत आपण वजनाचे प्रमाण आणू शकतो.

आपण जितकी आपली क्रियाशीलता वाढवत जातो तितकाच आपला दृष्टिकोनही बदलत जातो. आपणास अगदी धावपटू व्हायचे नाही. पण तरीही आपली क्रियाशीलता कशी वाढवता येईल तसेच त्या क्रियाशीलते बरोबरच आपणास आनंदी कसे राहता येईल याचा शोध घ्यावा.वैद्य . जितेश पाठक 
धुळे 

Saturday, May 7, 2011

रसम्

चूतः – च्योतति रसम्, “च्युतिट् क्षरणेः”, “च्यवन्ते पक्वानि फलान्यस्य’ इति ।
यावरुन असा अर्थ घेता येतो कि जे पक्व झाल्यानंतर पडते. हि व्याख्या शोणित म्हणजे रज (अन्तःपुष्प) यालाहि लागु होते. त्यामुळे रजः शुद्ध्यर्थ सहकार (आम्र) रस वापरावा. (हिंदी भाषेत च्यूत म्हणजे योनि.)
तसेच मराठवाड्यामधे लग्नानंतर “गडंगन जेवन” म्हणजे नातेवाईकांकडे जेवणाचे आमंत्रण देण्याची प्रथा आहे. यामध्ये विशेषतः आमरस सक्तिचा असतो तो हि पुरणपोळी सोबत.
हे सर्व भोजन शुक्र शोणितावरति कार्य करणारे आहे.
“बालं कषायकट्वम्लं रुक्षं वातास्रपित्तकृत् । संपूर्णमाम्रमम्लं तु रक्तपित्तकफप्रदम् ॥
स्वादु साम्लं गुरु स्निग्धं मारुतघ्नमपित्तलम् । हृद्यं पर्यागतं श्लेषममांसशुक्रबलप्रदम् ॥”
ग्रीष्म ऋतुमधे सेवनार्थ निसर्गाने केलेली उत्तम उपाययोजना. ग्रीष्म ऋतुमधे अचयपुर्वक पित्तप्रकोप असतो त्यामुळे वातपित्तघ्न  आहार सेवन करावे. या ऋतुत अग्निहीन असतो तर मग गुरु पदार्थ सेवन करु नये. परन्तु गुरु पदार्थ जर अग्नि दीपन करणारे असेल तर उत्तम. यामुळेच ग्रंथकारांनी पानका चा समावेश ग्रीष्म ऋतुचर्येत केला आहे.
ग्रीष्म दोषावस्था – प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते।
आंबा कफकर पित्तवातघ्न आहे. तसेच ग्रीष्मात सर्वस्वी आंबा वापरावा फक्त खाण्यासाठीच नाहि तर झोपण्यासाठी देखील.
“सुगन्धीहिमपानीयसिच्यमानपटालिके ॥ कायमाने चिते चूतप्रवालफललुम्बिभिः ॥”
सहकार रस गुण – “सहकाररसो हृद्यः सुरभिः स्निग्धरोचनः । दीपनः पित्तवातघ्नः शुक्रशोणितशुद्धिकृत् ॥”
यामुळे जे प्रजोत्पादन होते ते उत्तम होते. आम्र हे एकमेव द्रव्य आहे जे शुक्र आणि शोणित या दोन्हींवरति काम करते.
याचकारणामुळे कदाचित् गर्भिणीला स्वप्नामधे सहकार वृक्ष दिसले असता पुत्र गर्भ असल्याचे अनुमान ग्रंथात वर्णन आहे.
प्रश्न – आमरस बनविताना त्यात दुध मिसळावे कि नाहि ? कारण फल + दुग्ध विरुद्ध आहे.
http://www.facebook.com/home.php#!/profile.php?id=1841096127 

Visit Our Page