मतिमंद मुलांसाठी शंखपुष्पीचा वापर लाभदायक
मुंबई - मतिमंद मुलांमधील दोष निवारण करण्यासाठी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये शंखपुष्पी ही अत्यंत महत्त्वाचे योगदान देऊ शकते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. महाराष्ट्रातील 100 मतिमंद मुलांची निवड या संशोधन कार्यासाठी झाली असून, त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारपद्धतीमध्ये शंखपुष्पीचा वापर हा लाभदायक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षांपासून चालू असणारा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय क्षेत्रामधील आयुर्वेदाचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित होणार असल्याचा विश्वास संशोधन संस्थेकडून व्यक्त केला जात आहे.
मतिमंद मुले ही इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. त्यांचा बौद्धिक विकास हा उशिरा होतो; तसेच काही मुलांमध्ये शारीरिक वाढीमध्येही मर्यादा आढळून येतात. या मुलांमध्ये हे व्यंग नेमक्या कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, त्यात आनुवांशिकता, रक्तगट, जीवनशैली, तणाव यासारख्या गोष्टींप्रमाणे अन्य कोणत्या बाबी कारणीभूत असतात यांचाही विचार करणे गरजेचे असते. या मुलांमधील न्यून पूर्णपणे संपुष्टात आले नाही तरीही त्यांचे परावलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यासाठी विशेषत्वाने विचार करण्याची गरज या प्रकल्पामध्ये करण्यात आल्याचे डॉ. कुणाल पाटील सांगतात. याच विचाराचा पुढचा टप्पा म्हणून आयुर्वेदिक औषधांबाबतही विविध प्रयोग करण्यात आले. त्यातून शंखपुष्पीचा एका विशिष्ट प्रमाणात या मुलांमध्ये केलेला वापर हा सकारात्मक परिणाम देतो, असे संशोधनांती सिद्ध झाले. यासाठी निवड करण्यात आलेल्या या मुलांचा वयोगट चार वर्षांपेक्षा कमी असावा, जन्मानंतर आवश्यक त्या सर्व प्रकारचे लसीकरण करण्यात आलेले असावे, डोक्याला अथवा मेंदूला कोणत्याही प्रकारची दुखापत यापूर्वी झालेली नाही हेदेखील यात कटाक्षाने पाहण्यात आले आहे. तसेच या मुलांच्या आई-वडिलांमध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा कोणताही आनुवंशिक आजार नसणे हा मुद्दाही या संशोधनातील निवडीच्या वेळी महत्त्वाचा मानला गेला आहे.

डॉ. वैशाली इंगले -घोलप
लन्दन
dr.vaishali.ingle@gmail.com
No comments:
Post a Comment