Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, October 23, 2015

वर्षा ऋतु – गर्भसंस्कार.... एक दृष्टीकोन

वर्षा ऋतु – गर्भसंस्कार.... एक दृष्टीकोन

वर्षा ऋतु-
निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:|
मास- श्रावण, भाद्रपद
इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
रास- सिंह
ऋतुलक्षण- वर्षा हा विसर्गकाळातील ऋतु आहे.
“आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो sऽ पि सीदति |
वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे ||
सतुषारेण मरुता सहसा शीतलेन च |
भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन च वारिणा ||
वन्हिनैव च मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु |
भजेत् साधारणं सर्व उष्णं तेजपनं च यत् ||”
वा. सु. ३
अग्नि- शिशिरादि इतर तीन विसर्ग काळातील ऋतुंच्या उष्णतेच्या योगाने शरीर निःसत्व होऊन त्यांचा अग्नि मंद झालेला असतो. अशा वेळी वर्षाऋतूत दोषांचा प्रकोप होतो व अग्नि अधिकच मंद होतो.
दोषावास्था- वर्षा ऋतूत बल व अग्नि क्षीण झाल्याने पित्ताचा संचय होण्यास सुरुवात होते.
रस- वर्षा ऋतुत अम्ल रसाची वृद्धि होते.
वर्षा ऋतुतील दोषस्थितीचा जननेंद्रियावर होणारा परिणाम-
प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो. सृष्टीतील क्लेदाधिक्यामुळे स्थानिक (जनेनेंद्रियांवर) जिवाणु विषाणूजन्य विकार उदा. Candidiasis, Trichomonas, इ. अनेक विकार होतात.
स्त्रियांच्या अनुषंगाने विचार केल्यास
“ न हि वातादृते योनि नारीणां संप्रदुष्यति ||”
च. चि. ३०
अनियमित रजस्त्राव, नष्टार्तव, अल्परजस्राव ३ विकार हे वाढतात. स्थानिक विकारांमध्ये आर्द्रतेमुळे व शैत्यामुळे योनिकण्डु, मुत्रादाह, श्वेतस्त्राव ३ विकार संभवतात. अम्लविपाकी जलामुळे पित्तसंचय होतो व पित्ताच्या आश्रयाने असणाऱ्या रक्त धातूची दुष्टी होते. त्यामुळे त्याचा परिणाम रजावर होतो.
पुरुष- अग्नि व बलं क्षीण झाल्याने मैथुन सामर्थ्य कमी होतो
वर्षा ऋतु-मैथुन कालावधि-
आचार्य सुश्रुत व वाग्भटांच्या नुसार १५ दिवसांच्या अंतराने मैथुन करावे व चरकानुसार वर्षा ऋतुत व्यवाय वर्ज्य करावा असे वर्णन आढळते.
वर्षाऋतू व गर्भाधान-
“ उद्मन्थ दिवास्वप्न अवश्यायं नदीजलम |
व्यायाम आतपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् ||”
आचार्य चरक व सुश्रूतांनी वर्षा ऋतुमध्ये मैथुन वर्ज्य करावे असे म्हटले आहे याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वर्षाऋतुमध्ये आचार्यांना गर्भाधान अपेक्षित नाही.
गर्भोत्पत्तीस आवश्यक घटक-
आचार्य सुश्रूतांनी खालील चार घटकांचा उल्लेख केला आहे.
“ध्रुवं चतुर्णां सानिध्यात गर्भा स्यात् विधीपूर्वकः |
ऋतु क्षेत्र अम्बु बिजाणां सामग्र्यात अंकुरो यथा ||”
“शुध्दे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रे ऽ निले हृदी |
वीर्यवंत सुतं सुते.... ||”
अ.हृ.शा १/१८.
वरील सर्व श्लोकांचा विचार केला असता शारीरिक व मानसिक दृष्टीने निरोगी असणाऱ्या स्त्री व पुरुषाने संपूर्ण वीर्यात आयु प्राप्त झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी मैथुन कर्म करावे असे वर्णन आढळते.
वरील प्रत्येक घटकाचा वर्षा ऋतुच्या अनुषंगाने विचार करूया-
ऋतु-
वर्षा ऋतुमध्ये वातप्रकोप असतो. त्यामुळे अनियमित रजःस्राव, अल्प रजःस्राव, कष्टार्तव हे विकार दिसून येतात. गर्भात्पत्तीसाठी नियमित ऋतु चक्र असणे गरजेचे आहे.
क्षेत्र-
आचार्य वाग्भटांच्या श्लोकांनुसार त्यांनी शुद्ध गर्भाशय व प्राकृत अनिल (अपान वायू) यांचाही गर्भसंभव सामग्रीमध्ये विचार केला आहे. पुरुष व स्त्री जननेंद्रिय अपान वायूच्या क्षेत्रात येतात. वर्षा ऋतुतील वातप्रकोप हा क्षेत्रदुष्टीसाठी व विकृत संतान उत्पत्ती साठी कारणीभूत ठरतो. तसेच सृष्टीतील शैत्य व आर्द्रतेच्या परिणामामुळे स्थानिक व्याधि निर्माण होऊ शकतात.
अम्बु (आहार पाकोत्पन्न रस)-
गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचे पोषण हे मातेकडून होत असते. गर्भधारणेवेळी असणाऱ्या मानसिक व शारिरीक स्थितींचाही गर्भावर परिणाम होत असतो. ह्याच अनुषंगाने आचार्य चरकांनी विमान स्थानामध्ये प्रकृतीचे वर्णन करताना मातु आहार, विहार, प्रकृति, काल, गर्भाशय प्रकृती असे वर्णन केले आहे.
वर्षाऋतु अग्निमांद्य असल्याने गर्भधारणा झाल्यास अग्नि अधिक मंद होऊ शकतो व गर्भाच्या पोषणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भोपघातकार भावांचा विचार केला असता मातेने वातप्रकोपक आहारविहार केल्यास विकृत संतान उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते.
बीज-
उत्तम गर्भ प्राप्तीसाठी अदुष्ट शुक्र शोणिताची आवश्यकता असते. वर्षा ऋतूमध्ये जल अम्ल विपाकी असते. त्यामुळे पित्ताचा क्षय व रक्त दुष्टी होऊ शकते. सुश्रुतांनी ‘रक्तंलक्षम् आर्तवं गर्भाकृत् च’ असे आर्तवाचे वर्णन केले आहे. त्यामुळे प्राकृत बीजनिर्मितीवर वर्षा ऋतुचा प्रभाव होऊ शकतो.
अदुष्ट शुक्रबीजाचा विचार केला असता मैथुन सामर्थ्य व प्राकृत शुक्रनिर्मिती ही देहबलावर अवलंबून असते. त्यामुळे वर्षा ऋतुत देहबल कमी असल्याने त्याचा परिणाम शुक्रधातूच्या उत्पत्तीवर होतो.
वर्षा ऋतुत गर्भधारणा झाल्यास पुढे येणाऱ्या शरदातील पित्त प्रकोपामुळे गर्भपात, गर्भस्त्राव होऊ शकतात.
जन्मणाऱ्या बालकाच्या प्रकृतीवर व स्वास्थ्यावर वात दोषाधिक्य दिसू शकते. वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता आचार्यांनी वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य का सांगितला याची मीमांसा ध्यानात येते.
आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भोत्पादन हे शुक्राचे श्रेष्ठ कर्म आहे व व्यवायाचे प्रमुख उद्देश ‘प्रजोत्पादन” असल्याने वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य म्हणजेच गर्भधारणा न होऊ देणे हे आयुर्वेदीय संहिताकारांना अपेक्षित असावे.
गर्भिणी व विशिष्ट आहाररस इच्छा-
ज्याप्रमाणे वर्षाऋतुमध्ये निसर्गात वनस्पतींचा निर्मिती होत असते. त्याप्रमाणे गर्भिणी मध्ये गर्भाची नवनिर्मिती होत असते.
वर्षाऋतुमध्ये सृष्टीची स्थिती-
‘ आद्भिः अम्लविपाकाभिः ओशाधीभिः समीरणाः |’ अशी असते. म्हणजेच अम्ल रसाची निर्मिती होते. याचप्रकारे गर्भिणीला अम्ल रसेच्छा होते.
वर्षा ऋतु-
पथ्यकर आहार-
पुराण शाली, लाल षष्टिक, गहू, भाजलेले धान्य, पुराण जव, कुलत्थ, मूग, उडीद, जीरक, हिंग, काळे मिरे, जडवळ, माठ, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, लसूण, कांदा, सुंठ, सुरण, कद्दू, बोर, ताक, दूध, उकळलेले पाणी (श्रृतशीत जल), सैंधव मीठ, मधु, निंबू, अजा मांस, दाडिम, अंगुर, गरम जेवण.
पथ्यकर विहार-
चंदन, खस आदि चूर्णाचा अभ्यंग, स्वच्छ, कोरडे व लघु (हलके) रंगाचे कपडे घालणे, कोरड्या जागेवर बसणे, नेहमी पादत्राणे घालणे.
अपथ्य आहार-
बाजरी, मका, नवीन तांदूळ, मसूर, हरभरा (अरहर), तुरीची डाळ, हिरवा वाटाणा, पालक, मेथी, कारली, फुलकोबी, बटाटा, काकडी, सिंगाडा, टरबुज, कवठ, म्हशीचे दूध, पनीर, श्रीखंड, मिठाई, थंड जल, नदी आणि विहिरीचे पाणी, शुष्क मांस, मासे, तळलेले पदार्थ, न झाकलेले पदार्थ, शिळे पदार्थ.
अपथ्य विहार-
दिवास्वाप, अधिक परिश्रम, अत्याधिक व्यायाम, प्रवात सेवन.
वर्षा ऋतु - योगासने
वर्षा ऋतूत मनुष्याचे शारीरिक बल अत्यंत कमी असते आणि वात-पित्ताची दुष्टी असते. त्यामुळे शरीरास लाभदायक व दोष दुष्टी निवारक योगासने असावीत.
वर्षा ऋतूत उपयुक्त योगासने -
1. पद्मासन 2. वज्रासन 3. हलासन 4. ताडासन 5. बद्धकोनासन 6. भुजंगासन 7. वृक्षासन 8. धनुरासन 9. सर्वांगासन.
डॉ. सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
वरळी, मुंबई – ४०० ०१८
भ्रमणध्वनी +917738086299
Email – subhashmarlewar@gmail.com

शास्त्रीय दृष्टीकोन आणि संशोधक वृत्तीचा मिलाफ.........‘औषधी गर्भसंस्कार’

शास्त्रीय दृष्टीकोन आणि संशोधक वृत्तीचा मिलाफ.........‘औषधी गर्भसंस्कार’

    गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली आयुर्वेदाबद्दलची जागृती आणि एकंदरीत समाजाचा आयुर्वेदाकडे वाढलेला ओढा लक्षात घेता सध्याच्या काळात वैद्यांची एकंदरीतच जबाबदारी वाढली असल्याचे दिसून येते. पंचकर्म असो वा गर्भसंस्कार; यांविषयी रुग्णांकडून वारंवार चौकशी केली जाते हा प्रत्यक्षानुभव आहे. खरे तर सगर्भावस्था हा केवळ गर्भवतीस्त्रीसाठीच नव्हे तर ते दांपत्य आणि पर्यायाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकरताच कुतूहल, आनंद आणि काळजी अशा संमिश्र भावनांनी भरलेला काळ असतो. अनेकांचे सल्ले-उपदेश, काही समजुती-गैरसमजुती यांच्या समीकरणातून उभ्या राहिलेल्या या काळात योग्य मार्गदर्शनाकरता अर्थातच वैद्यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण असते.
   ‘गर्भसंस्कार’ हा शब्द सध्याच्या काळात फारच लोकप्रिय झाला आहे. प्रचलित गर्भसंस्कारांत विविध मंत्रश्रवण, आहार तसेच काही योगासने यांसारख्या बाबींवर विशेष भर दिल्याचे दिसून येते. गर्भिणीच्या आहार आणि विहाराबद्दल आयुर्वेदीय संहितांमध्ये विशेष काळजी घेण्यात आलेली आहे; हे जरी सत्य असले तरी आरोग्यशास्त्र असे म्हटल्यावर अपरिहार्यपणे समोर येणारी बाब असलेल्या औषधींकडे मात्र दुर्दैवाने विशेष लक्ष दिले गेलेले नाही असे खेदाने म्हणावे लागते. हीच उणीव भरून काढणारे एक पुस्तक हाती लागले आणि एका बैठकीतच ते वाचून संपवले. प्रस्तुत पुस्तकाचे नाव आहे ‘औषधी गर्भसंस्कार’. पुस्तकाचे लेखन केले आहे वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर आणि वैद्य नीता संतोष जळूकर यांनी; तर ‘अक्षय फार्मा रेमेडीज’ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
    वाग्भटकृत अष्टांगहृदयातील मासानुमासिक योग हा या पुस्तकाचा पाया आहे. सर्वसाधारणपणे ‘मासानुमासिक काढे’ अशी परिभाषा आपण ऐकली असेल; परंतु सगर्भावस्थेत क्वाथ वा घनवटी यांसारख्या कल्पना उपयुक्त नसून वनस्पतीच्या चुर्णांस त्याच पाठातील प्रधान वनस्पतीची भावना देऊन तयार केलेल्या ‘चूर्णवटी’ अधिक उपयुक्त ठरतात असे मत लेखक मांडतात. मुख्य म्हणजे द्रव्याची कार्मुकता वाढविण्याची ही पद्धत ग्रंथोक्तच आहे. पुस्तकाच्या सुरुवातीसच आलेले हे स्पष्टीकरण वाचताच या पुस्तकाच्या ‘वेगळेपणाची’ जाणीव होते. हे वेगळेपण शेवटच्या पानापर्यंत टिकविण्यात लेखकद्वयी यशस्वी झाली आहे. वाग्भटांच्या मासानुमासिक पाठांचा केवळ उहापोह इतकाच या पुस्तकाचा उद्देश नव्हे तर आयुर्वेदाच्या मूळ संकल्पनांना कोठेही धक्का न लावता संशोधक वृत्तीने ‘औषधी गर्भसंस्कार’ या दुर्लक्षित परंतु महत्वपूर्ण संकल्पनेचा पायाच या पुस्तकामार्फत रचला गेला आहे.
   आधुनिक शास्त्रानुसार सगर्भावस्थेचा कालावधी हा नऊ महिने नऊ दिवस इतका गणला जातो. मात्र आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये हाच कालावधी दहा महिन्यांचा मानला गेला आहे. वरवर भासणारा दोन्ही शास्त्रांमधील हा विरोधाभास प्रत्यक्षात मात्र केवळ परिभाषांमधील फरक आहे. हा फरक नेमका कसा? हेया पुस्तकातूनच जाणून घेण्यासारखे असल्याने त्याविषयी येथे अधिक लिहीत नाही. मात्र हा फरक जाणून न घेताच यापूर्वी काहीजणांनी केवळ मासानुमासिक योग ‘बाजारात’ उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रंथांमध्ये आलेले दहा योग प्रत्यक्षात मात्र नऊ योगांच्याच स्वरूपात आले !! प्रस्तुत पुस्तकामध्ये मात्र आपल्याला हे वाग्भटोक्त दहा योग (यांस प्रथमाह ते दशमाह अशी सार्थ नावे देखील प्रदान करण्यात आलेली आहेत). तसेच त्यांमध्ये वापरण्यात आलेल्या वनस्पतींचे कार्मुकत्व यांवर सविस्तर माहिती मिळते. जागोजागी आधुनिककालीन शास्त्रीय प्रयोगांती सिद्ध झालेले काही वनस्पतींचे गुणधर्म देखील देऊन या पुस्तकास खऱ्या अर्थाने ‘सर्वशास्त्रमान्य’ बनविलेले आहे. विशेषतः मंजिष्ठा व हरिद्रेसारख्या द्रव्यांची विद्युत-चुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्यासाठीची उपयुक्तता वा यष्टीमधुची गुणसूत्रांतील बीजदोष निवारणाची क्षमता यांसारख्या संशोधनांच्या संदर्भांनी आपले लक्ष न वेधल्यासच नवल !
    वंध्यत्वाच्या चिकित्सेमध्ये फलघृताच्या उपयुक्ततेविषयी आपणा सर्वांस माहिती आहेच. परंतु, प्रत्यक्ष चिकित्सेत रुग्णांकडून अनेक कारणवशात घृतकल्पना स्वीकारली जात नाही. या अडचणीवर उपाय म्हणून फलघृताच्याच पाठात आलेल्या वनस्पतींच्या वरीलप्रमाणे चूर्णवटी- ‘फलमाह’ बनवून त्या गोघृताच्या अनुपानासह घेण्याचा मार्ग हा निश्चितपणे अनुसरणीय आहे. पुरुषांसाठी तयार करण्यात आलेला ‘अश्वमाह’ हा वाजीकर पाठदेखील शुक्र संबंधित जवळजवळ सर्वच तक्रारींवर उपयुक्त ठरेल अशा प्रकारे तयार करण्यात आल्याचे दिसते.
    वरील चूर्णवटींव्यतिरिक्त ‘किक्कीस निवृत्ती तेल’,‘सुप्रसव पिचू तेल’ यांसारख्या सगर्भावस्थेत उपयुक्त ठरणाऱ्या शास्त्रोक्त पाठांचा उहापोह देखील पुस्तकात करण्यात आलेला आहे. आयुर्वेदानुसार; बालकाच्या जन्मानंतर चिकित्सकाची जबाबदारी संपत नाही. किंबहुना ती अधिक वाढते !
सूतिकावस्थेतील स्त्रियांमधील प्रसूतीपश्चात झालेल्या वात प्रकोपाचे शमन आणि स्तन्यप्रवर्तनास मदत या दोन प्रमुख गरजा लक्षात घेता; प्रस्तुत पुस्तकातील ‘सुतिकाभ्यंग तेल’ आणि ‘क्षीरमाह वटी’ यांविषयीचे विवेचन हे अतिशय महत्वपूर्ण आहे.
    आयुर्वेदातील यशस्वी आणि सिद्धहस्त चिकित्सक असलेले हे वैद्य-लेखक दांपत्य त्यांच्या स्वतःच्या प्रदीर्घ चिकित्सानुभवाबरोबरच परंपरेतून आलेल्या ज्ञानाची जोड लाभून देखील त्यांच्या या संशोधनाचे श्रेय नमूद करीत असताना मासानुमासिक योगांची मूळ संकल्पना ही आचार्य वाग्भट यांची असल्याचे मुखपृष्ठावरच ठळकपणे नमूद करतात हे महत्वाचे. बाजारीकरणाच्या बजबजपुरीत ‘विज्ञाता शासिता योक्ता प्रधानं भिषगत्र तु |’ ही वैद्य-प्रधानतेची भावनाच नष्ट होत चालल्याचे दिसून येते. हे पुस्तक मात्र याबाबत अपवाद असून; प्रत्येक ठिकाणी वैद्याचा सल्ला घेवूनच औषधे/ अनुपान घेण्याविषयी सुचविण्यात आलेले आहे.
    आयुर्वेदातील अनेक मान्यवर चिकित्सकांनी या पुस्तकातील मते केवळ मान्यच केलेली नसून प्रशंसली देखील आहेत. या सर्व मान्यवरांचे अभिप्राय पुस्तकात जागोजागी दिलेले आढळून येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘औषधी गर्भसंस्कार’ हे पुस्तक केवळ आशयसमृध्दच नसून अतिशय देखणेसुद्धा आहे ! संपूर्णपणे आर्ट पेपर वर छापलेल्या या पुस्तकासारखी पुस्तके आयुर्वेदात तरी विरळाच !!
अनुभवसंपन्न वैद्यांनी शास्त्राधारानुसार आणि संशोधकवृत्तीने ‘सुप्रजाजननार्थ’ लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक वैद्याने स्वसंग्रही ठेवण्यासारखे आहे.
वैद्य परीक्षित स. शेवडे.
एम.डी. (आयुर्वेद संहिता )
वाजीकरण चिकित्सक, डोंबिवली.
pareexit.shevde@gmail.com

गर्भावस्था ९ महिन्यांची की १० महिन्यांची ???

गर्भावस्था ९ महिन्यांची की १० महिन्यांची ???
"औषधी गर्भसंस्कार " उत्पादनांची नावे पाहिल्यावर आपल्या मनात नक्कीच शंका येईल ती "दशमाह" पाठावरून. गर्भावस्था सर्वसामान्यपणे नऊ महिन्यांची असतांना हा दहावा महिना कुठून आला व कशासाठी ?
गर्भावस्था २८० ते २८३ दिवसांची असते हे शास्त्रसंमत व सर्वानुभूत आहे. प्रचलित कालगणनेनुसार हा कालावधी अंदाजे ९ महिने व ९ दिवसांचा होतो. आयुर्वेदात गर्भावस्था ही एकूण दहा महिन्यांची सांगितली आहे. स्त्री शारीर क्रियेच्या दृष्टीने "महिना" हा काळ २८ दिवसांचा समजणे इष्ट आहे.
"औषधी गर्भसंस्कार" संकल्पनेचा आधारभूत ग्रंथ, अष्टांग हृदय, शारीरस्थान १/७ ह्यामध्ये देखील "मासि मासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहं" असेच वर्णन आढळते. अर्थात, स्त्रियांमध्ये दर महिन्याला तीन ते चार दिवस ऋतुस्राव होत असतो. मासिक ऋतुस्रावाची पुनरावृत्ती दर २८ दिवसांनी होते, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. ह्या न्यायानुसार महिना म्हणजे "२८ दिवसांचा कालावधी" हा त्याचा गर्भित शास्त्रार्थ आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने देखील इस्ट्रोजिन व प्रोजेस्टेरॉन चे चक्र सुद्धा २८ दिवसांचेच असते.
गर्भावस्थेच्या दृष्टीने ३०, ३१ किंवा २८ तर कधी कधी २९ दिवसांचा महिना मोजणे हे निश्चितच सयुक्तिक होत नाही. म्हणूनच अशा विचाराने केलेली औषधयोजना देखील अचूक होणार नाही. मासिक ऋतुस्रावाचे चक्र व पुढील गर्भावस्था लक्षात घेऊन ग्रंथकर्त्यांनी १० महिन्यांचे १० पाठ सांगितले आहेत त्यामागची शास्त्रीय बैठक किती खंबीर आहे हे आपल्या लक्षात येते.
गर्भधारणे नंतर मासिक रजःस्राव खंडित होतो तरीदेखील त्याचे भविष्यातील आराखडे २८ दिवसांच्या चक्रानुसार निसर्गतः आखले जातात. त्याचबरोबर अंतःस्रावी ग्रंथींच्या स्रावांमध्ये होणारे बदल हे देखील २८ दिवसांच्या टप्प्यानेच होत असतात. ह्या अनुषंगाने निरनिराळ्या अवस्थांमध्ये होणारी स्थित्यंतरे दहा महिन्यांमध्ये विभागून सांगितली आहेत व त्यामागे हाच शास्त्रीय उद्देश आहे. ह्याच दोन कारणांस्तव "औषधी गर्भसंस्कार" मालिकेतील पाठांचा अवलंब करताना महिना म्हणजे "२८ दिवसांचा काळ" समजणे सर्वदृष्टीने समयोचित आहे.
आयुर्वेद हे एक परिपूर्ण वैद्यक शास्त्र आहे व त्याचे सिद्धांत काळाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेले आहेत. अशा शास्त्रात वर्णन केलेले "औषधी गर्भसंस्कार" करतांना त्यातील कालगणना देखील तंतोतंत पाळणे अनिवार्य आहे. 'गर्भावस्था ९ महिन्यांची' असा विचार करून केलेली औषध योजना नक्कीच अपूर्ण अथवा चुकीची होईल ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्या विचारांचे समर्थन विविध नामांकित आयुर्वेद महाविद्यालये, रुग्णालये व ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक यांनी जाहीरपणे केले आहे.
"औषधी गर्भसंस्कार" उत्पादनांच्या मालिकेत समाविष्ट औषधी पाठात फक्त वनस्पतींचाच वापर केला आहे. ह्या वनस्पती स्वगुणधर्मांनी संपन्न आहेतच तसेच शरीरावर कोणतेही अनिष्ट परिणाम करणाऱ्या नाहीत व गर्भावस्थेत वापरण्यास संपूर्णपणे सुरक्षित आहेत. परिणामी, गर्भाचा विकास व मातेचे पोषण यांचे सुरेख संतुलन त्यामुळे राखले जाते.

Manoj Anant Joshi(मनोज अनंत जोशी)

AKSHAY PHARMA REMEDIES (INDIA) PVT. LTD.

पंचकर्म

   सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद आणि पंचकर्म याबाबत इतकी जास्त जाहीरातबाजी होत आहे की पुष्कळजणाना पंचकर्म करून घेण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे .यासाठीच आता पंचकर्म म्हणजे काय ?, ते नेमके का?, कधी?, कशासाठी?,कोणाला करतात? ते पाहू.
पंचकर्म म्हणजे काय?
  आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन त्यातील हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.
१)शमन-औषधे देउन वाढलेले दोष कमी करणे, कमी झालेले शरीरातील घटक, दोष प्रमाणात आणणे म्हणजे शमन चिकित्सा.
२)शोधन-दोष जर प्रमाणा बाहेर वाढलेले असतील किवा कुठल्यातरी शरीर घटकाच्या(शरीर धातू) आश्रयीत ,चिकटून बसलेले असतील तर त्याना त्या पासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन चिकित्सा.
ही पंचकर्म कोणती ?
पंचकर्माच्या ५ मुख्य प्रक्रीया आहेत.
रोगाच्या स्वरूपानुसार त्या त्या दोषासाठी वेगवेगळ्या प्रक्रीया केल्या जातात.
तसेंच ऋतूनुसार देखील स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी ऋतु नुसार शोधन घेण्याचे वर्णन आहे. रसायन वाजीकरण चिकित्से पूर्वी शोधन घ्यावे असे वर्णन आहे, थोड्यात पंचकर्म हि शुद्धी चिकित्सा आहे  
पंचकर्म
१) वमन
२)विरेचन
३)बस्ती
४)नस्य
५)रक्तमोक्षण
हे शोधन कशा पद्धतीने करतात?
पूर्वकर्म :- 
  ह्या प्रक्रीया करण्यापूर्वी शरीरातील वाढलेले दोष जे शरीर घटकाना काही वेळा चिकटून बसलेले त्यात लपून बसलेले असतात त्याना त्या पासून मोकळे करून मध्य मार्गात (कोष्ठात)आणून जेणे करून ते सहजगत्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना करावी लागते. ह्यालाच पूर्वकर्म म्हणतात.ही २ आहेत
                    १)स्नेहन    २)स्वेदन
             १)स्नेहन- काही दिवस आधी पासून पोटातून औषधी तेलं /तुपं एका विशिष्ट मात्रेत प्यायला देउन,तसेच अंगाला मालिश करून (थोडक्यात शरीराला आंतरबाह्य स्निग्ध करून ) चिकटून बसलेले दोष सुटे केले जातात.
जस तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही , किवा स्निग्ध ते मुळे चिकटून बसलेले घटक सुटे होतात त्याच प्रमाणे हे घडते.
         २)स्वेदन-शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने घाम येइल असे उपाय करून (वाफेचा शेक.)देउन दोष उष्णते मुळे सुटे झालेले दोष वितळून पाझरत पाझरत मध्यमार्गात (कोष्ठात)येतात.
      दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार हे पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी,बल  तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना शरीरातून बाहेर काढले जाते.
मुख्य कर्म
   १)वमन-दोषाना उर्ध्व मार्गाने (वरच्या बाजूने) शरीराबाहेर काढणे-अर्थात उलटी वाटे तोंडावाटे दोषाना बाहेर काढणे.
        ही क्रिया प्रामुख्याने ज्या रोगात दुषित कफ दोषाचे प्रमाण शरीरात वाढलेले असते अशा रोगात करतात(अनेक प्रकारचे त्वचारोग्,आम्लपित्त्,दमा ई.).पूर्वकर्मा नंतर आतड्यात वरील बाजूला किवा जठरात जमा झालेले दोष उलटीचे औषध,सहज उलटी होइल अशा काढ्याबरोबर /दुधाबरोबर, उसाच्या रसासह तथा औषधी कल्पांसह प्यायला देउन. तोंडातून बाहेर काढले जातात.
प्यायला दिलेल औषधाचे  प्रमाण मोजलेले असते.उलटी वाटे बाहेर पडलेले द्रव्य ही मोजले जाते त्याचे स्वरूप वास याची नोंद ठेवली जाते.
  २)विरेचन- अधो  बाजूने म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन.विरेचन हा वाढलेल्या पित्त दोषाचा प्रमुख उपचार आहे.अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लाली, जळजळ असते ,पित्ताची डोकेदुखी,अंगावर  गांधी उठणे  ,मुळव्याध,कावीळ तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते.या प्रक्रियेतही रुग्णाला आलेल्या मल वेगांची नोंद ठेवली जाते 
  ३)बस्ती- "बस्ती जीरवते वाताची मस्ती " असच वैद्य प्रत्येक रुग्णाला सांगत असतात ,ही वात दोष वाढलेला असल्यास मुख्य उपचार म्हणून दिली जाते.बस्ती म्हणजे औषधी काढे,सिद्ध तेल अथवा सिद्ध तूप  असे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडले जाते. यामुळे आतडयातील शुष्क  मलाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो.अनेक वातव्याधी(सांधेदुखी,कंबर दुखी),हाडांचे रोग,आतड्यातील विकार ,त्वचारोग यात बस्ती ची उपाययोजना उपयोगी ठरते .
  4)नस्य-नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे ,तुपाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे.मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास,  काही प्रकारच्या डोकेदुखीत नस्याचा उपयोग होतो.ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात (पक्षाघात , अर्दीत (facial palsy) याचा बराच उपयोग होतो.
  ५)रक्तमोक्षण -रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्ताला शरीराबाहेर काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण त्वचाविकारात जेथे चिकट स्त्राव होत असतो तिथे जळवा लागत नाहीत अशाठिकाणी काही वेळा सुचीवेधाद्वारे रक्त काढल्या जाते 
     पंचकर्मा शी निगडीत काही उपचार आहेत.जे कहीवेळा एखादा पंचकर्मापैकी चा उपचार करताना सहाय्य म्हणून केले जातात किवा काहीवेळा मुख्य उपचार म्हणूनही करावे लागतात
वेगवेगळे अभ्यंगाचे प्रकार ,स्वेदनाचे प्रकार, शिरोधारा ,कटीबस्ती,जानुबस्ती ई.
ही पंचकर्म कधी करतात?
१) आजारानुसार पंचकर्म-
    आयुर्वेदात व्याधीच्या अवस्थांचे वर्णन आहे .पेशंट ची आजाराची लक्षणे पाहून ,नाडी आणि पोट ,बल  तपासून वैद्यास व्याधीची अवस्था कळते.अशा काही अवस्थांमध्ये गोळ्या काढे औषधे  देऊन व्याधी आटोक्यात येण्यासारखा ,बरा होण्यासारखा नसतो.अशावेळी हे उपचार उपयोगी ठरतात.
२)आजाराचा जोर कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार म्हणूनही काहीवेळा हे उपचार करावे लागतात.
उदा.खूप दिवस मलप्रव्रुत्ती न झाल्यास , मलाचे खडे झाल्यास बस्ती देतात. दम्यात कफाची घरघर वाढलेली असताना कधीकधी तात्कालिक उपाय म्हणून लघु  वमन द्यावे लागते.
३)ऋतू नुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते, अशावेळी काही आटोक्यात असलेल्या(सध्या लक्षणे न दिसणार्या) व्याधी बळावतात्,जोर धरतात अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात.वर्ष्या ऋतूत वात निर्हरहर्नार्थ बस्ती, वसंत ऋतूत वामन, शरद ऋतूत विरेचन अथवा रक्तामोक्षण
४)विशिष्ट आजार लक्षणे नसणार्या व्यक्तीस तिच्या शरीरातील दोषबदल पाहून ऋतू नुसार एखादा उपचार सुचवला जाउ शकतो. उदा. स्थूल (obese ) स्वेदन.
५) आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन,वाजीकरण  उपचारापूर्वी हे उपचार केले जातात
ह्या पंचकर्माचा साधारण कालावधी काय?
              प्रथम पंचकर्म उपचार म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे हा समज चुकीचा आहे.
व्याधीच्या बलानुसार ,ऋतूनुसार्,प्रकृती नुसार रुग्णास उपचार केला जातो.
काहीवेळा शोधन उपचारापूर्वी चे पूर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदनाचे उपचार ) केल्यानंतर दोषांची गती ( दिशा पाहून रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना) शरीरातून बाहेर काढले जाते. अशावेळी वमनासाठी औषध द्यायचे का विरेचनासाठी हे त्या त्या वेळी ठरते.
दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार वमन किवा विरेचन दिले जाते
     बस्ती,नस्य हे उपचार काही दिवस सतत/दिवसाआड/एका दिवसातून दोनदाही गरजेनुसार करावे लागतात
रक्तमोक्षण त्या आजाराच्या लक्षणांनुसार करावे लागते.
काही आजारांमध्ये पूर्वकर्म (स्नेहन-स्वेदन) हीच मु़ख्य उपचार म्हणून केली जातात
पंचकर्मा साठी पथ्य :-
   कोणत्याही उपचारात पथ्यास खूप महत्व आहे,मग ती कोणतीही उपचार पद्धती असो.
हे उपचार करण्यापूर्वी,ते सुरू असताना आणि त्यानंतरही काही दिवस आहार विहारा संबंधीचे पथ्य पाळावेच लागते.यात अगदी खाण्यापिण्यापासून ,गरम कपडे,आंघोळीसाठी गरम पाणी ,थंड हवेत न जाणे , दिवसा न झोपणे ई. सर्व काटेकोर पणे पाळावेच लागते.
  इतर उपचारांप्रमाणेच ह्या उपचारातही अयोग- अतीयोग असे धोके असतात, मात्र अनुभवी,वैद्याकडून उपचार झाल्यास ते नगण्य असतात.
ह्या उपचारानंतर शरीर घटक दोषांचे प्रमाणात रहाणे योग्य आहारविहाराने,काही वेळा काही औषधांच्या सहाय्याने राखता येऊ शकते .
पण हे उपचार एकदा केले म्हणजे झाले असे नेहमीच नसते. बर्‍याच व्याधीत त्यांच्या अवस्थेनुसार्/ऋतू बदलान्चे परीणाम म्हणून नंतरही ते आवश्यकतेनुसार करावे लागतात.
वेगवेगळ्या व्याधीत,लक्षणानुसार,वयानुसार ह्या उपचारात वापरली जाणारी औषधी तेले-तुपे,काढे,शेकाचे प्रकार वेगवेगळे असतात.
    या उपचारास मर्यादा आहेत, कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत आजाराच्या विशिष्ट अवस्था,वय,गर्भिणी ,अती नाजुक प्रकृतीची माणसे हे अपवाद ठरू शकतात.
यासर्व उपचारापूर्वी,उपचार चालू असताना आणि पूर्ण उपचार संपल्यानंतर(त्यानंतर जावा लागणारा पथ्याचा कालावधी झाल्यावर) त्या त्या आजारानुसार लक्षणान्ची ची नोंद ठेवली जाते.
हा एक वैद्यकीय उपचार आहे.प्रशिक्षीत वैद्याच्या सल्याने ,त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केला जावा.
डॉ . सुशांत शशिकांत पाटील 
अथर्व आयुर्वेद हॉस्पिटल 
६० फुट रस्ता , आय. डी .बि. आय. बँकेसमोर ,
वसई रोड (पश्चिम )
9860431004
9158949110

Wednesday, October 21, 2015

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
पन्नाशी ओलांडली की किमान निम्म्या लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करता बरे पण लवकर होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात. म्हणून त्यांची माहिती साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत.
ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
सांधेदुखी म्हणजे काय ? ती कशी होते ?
सांधेदुखी साठी “संधिवात” हा शब्द व्यवहारात अगदी प्रचलित आहे. “संधि” आणि “वात” असे दोन मिळून “संधिवात” हा एक सामासिक शब्द बनलेला आहे. मुळात हा शब्द कसा तयार झाला हे सुरुवातीला समजून घेऊया.
आयुर्वेदाने वयाचे तीन गट केले आहेत. बाल वय हे कफाचे, तरुण वय पित्ताचे तर वार्धक्य हे वाताचे. त्यानुसार विशिष्ट वयोगटात होणारे रोग मुख्यतः त्या त्या दोषानुसार होत असतात. लहान वयात कफाचे रोग अधिक होतात, तारुण्यात पित्ताचे तर उतार वयात वातदोषाचे रोग अधिक होतात. आयुर्वेदाने शरीराचे पण असेच तीन हिस्से केलेले आहेत.
छातीपासून वरचा हिस्सा कफाचा, छातीपासून बेंबीपर्यंतचा भाग पित्ताचा तर बेंबीपासून खालचा हिस्सा वाताचा. त्यानुसार त्या त्या आजारांचे स्थान सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते.
कफ – पित्त - वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची स्वसंवेद्य तीन प्रमुख लक्षणे आहेत. कफाचे लक्षण आहे ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’.
ह्या सर्व बाबींचा विचार करता संधिवात हा उतार वयात होणारा आणि कंबरेच्या खालच्या भागात वेदना निर्माण करणारा आजार आहे हे आपल्याला स्पष्ट होईल. वास्तविक शरीरात सुमारे साडेतीनशे सांधे आहेत. मग सगळ्यात जास्त सांधेदुखी कंबरेच्या खालच्या भागातच का होते असा प्रश्न साहजिकच मनात येईल.
सगळ्या शरीराचा भार ज्या सांध्यांवर पडतो ते सांधे लवकर दुखू लागतात हे त्याचे साधे उत्तर. ही दुखणी संध्याच्या ठिकाणीच अधिक का होतात ह्याचेही कारण आयुर्वेदात दिले आहे.
"तत्रास्थिनि स्थितो वायुः पित्तं तु स्वेदरक्त्योः श्लेष्मा शेषेषु . . . ” म्हणजे वायु हाडांमध्ये असतो, पित्त घाम आणि रक्तात राहते तर कफ हा इतर सर्व धातूंमध्ये राहतो. म्हणून हाडांच्या सापळ्यात ज्या ठिकाणी सर्वाधिक हालचाली होतात त्या ठिकाणी म्हणजेच सांध्यांच्या ठिकाणी हे रोग जास्त प्रमाणात होतात.
सांधेदुखीची कारणे ?
संधिवात आणि आमवात असे दोन प्रकारचे मुख्य संधिविकार प्रत्यक्षात आढळतात. ह्या दोनही विकारात सांधेदुखी हे मुख्य लक्षण असते. संधिवातामध्ये विशिष्ट सांध्यात दोष उत्पन्न होतात तर आमवातामध्ये सर्व शरीरात निरनिराळी लक्षणे निर्माण होत असतात.
संधिवात हा मुख्यतः वात दोषाच्या वैषम्यामुळे उत्पन्न होतो तर आमवात मात्र अनेक दोषांच्या बिघाडामुळे निर्माण होतो. उतार वयामुळे होणारी वाताची विकृत वाढ, त्यात अस्थिसंधि म्हणजे वाताची हक्काची जागा, कुपथ्य, कमी व्यायाम, थंड पदार्थांचे अतिसेवन, वजन वाढणे, अनुवांशिकता अशा अनेक कारणांमुळे संधिवात होतो.
आमवात हा एक स्वतंत्र आणि गंभीर रोग आहे. त्यासाठी ‘आम’ म्हणजे काय व त्यामुळे आमवात कसा होतो हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी माधवनिदान ग्रंथात दिलेला श्लोक -
विरुद्धाहारचेष्टस्य मन्दाग्नेर्निश्चलस्य च l स्निग्धं भुक्तवतो ह्यन्नं व्यायामं कुर्वतस्तथा ll
वायुना प्रेरितो ह्यामः श्लेष्मस्थानं प्रधावति l तेनात्यर्थं विदग्धोऽसौ धमनीः प्रतिपद्यते ll
वातपित्तकफैर्भूयो दूषितः सोऽन्नजो रसः l स्रोतांस्यभिष्यन्दयति नानावर्णोऽतिपिच्छिलः ll
जनयत्याशु दौर्बल्यं गौरवं हृदयस्य च l व्याधीनामाश्रयो ह्येष आमसंज्ञोऽतिदारुणः ll
चुकीचा आहार विहार घेणारा, मंदाग्नि असणारा, व्यायाम न करणारा, पचायला जड व स्निग्ध अन्न सेवन करून लगेच व्यायाम करणाऱ्यास ‘आम’ होतो. असा आम, वायुने प्रेरित होऊन कफ स्थानात जातो. पुढे तो अमाशयाच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये शिरून अन्नरस, वात, आणि कफ-पित्ताने दूषित होऊन स्रोतसांना भरून बुळबुळीत व नाना रंगांनी प्रकट होतो. ही सर्व दूषित संरचना सांध्यांच्या ठिकाणी असलेल्या कफस्थानात (सायनोव्हियल कवचात) जाऊन स्थिर होतात. अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचा आमवात नावाचा विकार होतो.
आयुर्वेदाने सांगितलेली रोगाची ही संप्राप्ति समजायला नक्कीच कठीण आहे. थोडक्यात म्हणजे भूक नसतांना पचायला जड आणि स्निग्ध अन्न सेवन करून लगेच व्यायाम करण्यामुळे आमवात होण्याची भीती संभवते.
वेदना आणि सूज – विशेष माहिती....
थंडीने वेदना वाढते व शेकण्याने नियंत्रणात राहते. खेळतांना डोळ्याजवळ चेंडू लागला तर लगेच खिशातून रुमाल काढून तोंडाच्या वाफेने रुमालाला ऊब देऊन त्याठिकाणी हलकेच शेकण्याची पद्धत आपण अनेकदा पहिली असेल. हॉट वॉटर बॅगचा वापर पाठ किंवा कंबर शेकण्यासाठी आपण नेहमीच पाहतो. लवकर आराम पडण्यासाठी तेल लावून शेक घेण्याची पद्धत नक्कीच शास्त्रीय आहे.
भरपूर थंडीच्या ठिकाणी हातापायाला किंचितसा मार लागला तरी असह्य वेदना होतात पण तेवढाच मार उन्हाळ्याच्या दिवसात मात्र विशेष त्रासदायक वाटत नाही. कुठेही दुखापत झाल्यावर “ताबडतोब बर्फ लावावा” अशी सूचना डॉक्टर करतात. त्याचे कारणसुद्धा समजून घेऊया. मार लागल्यावर त्वचेखालच्या नाजूक रक्तवाहिन्या तुटतात व त्यातून रक्तस्राव सुरु होतो. हा रक्तस्राव त्वचेखालच्या जागेत साचू लागतो. तुटलेल्या रक्तवाहिन्या बर्फ लावण्यामुळे ताबडतोब आकुंचित होतात व रक्तस्राव की होतो. मार लागल्यावर त्याठिकाणी अपोआप बाधीर्य आलेले असते, म्हणून वेदना वाढत नाहीत आणि रक्तस्तंभनही होते.
सुजेवर बर्फ लावणे हा फक्त तात्पुरता इलाज आहे हे लक्षात ठेवावे. कालांतराने शेक देण्यानेच सूज व वेदना नियंत्रणात ठेण्यास उपयुक्त ठरते.
सुजेची ५ मुख्य लक्षणे -
1) स्थानिक उष्णता
2) लाली
3) वेदना
4) आकारात वाढ
5) हालचालीत अटकाव
सूज निर्माण होण्याची प्रक्रिया कशी घडते ?
शरीरात अराचिडोनिक अॅसिड नामक चरबी सदृश घटक असतो. सूज निर्मितीच्या प्रक्रियेत ह्यातील ऑक्सीडेटिव्ह प्रक्रिया वाढते. ह्यातून दोन मार्गाने सूजेची प्रक्रिया घडते. सायक्लो-ऑग्झिजिनेझ मार्गातून प्रोस्टाग्लॅंडिन्सची निर्मिती होते तर 5-लायपॉग्झिजिनेझ मधून ल्युकोट्राइन्सची निर्मिती होते. प्रोस्टाग्लॅंडिन्समध्ये अनेक रसायने असतात. त्यांच्या संयुक्त प्रभावाने रक्तवाहिन्यांचे विस्फारण होते, वेदनेची तीव्रता वाढते, परिणामी सूज, लाली, स्पर्शासहत्व ही लक्षणे उत्पन्न होतात. ल्युकोट्राइन्सपैकी LTB4 ह्या जातीच्या रसायनाने वेदनेच्या जागेवर पांढऱ्यापेशींचा संचय होऊन सूज वाढते. प्रोस्टाग्लॅंडिन्स व ल्युकोट्राइन्स ह्या घटकांना नित्रणात ठेवून सूजेची चिकित्सा करता येते. ह्या विषयाचे महत्व पुढे चिकित्सेच्या संदर्भात लक्षात येईल. अॅस्पिरीन सदृश (NSAID) औषधांची क्रिया अशीच होते.
सांधेदुखी होण्यापूर्वीची लक्षणे-
संधिवातात हालचालीच्या वेळी आवाज होणे, दीर्घकाळ एकाच सांध्यावर भार सहन न होणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर रो बळावतो व लक्षणे तीव्र होऊन वेदना वाढत जातात.
आमवतात अंग दुखते, अन्नावर रुची राहत नाही, खूप तहान लागते, आळस येतो, शरीर जड होते, ताप येतो, अन्नपचन व्यवस्थित होत नाही व सांध्यांवर सूज येते.
प्रमुख लक्षणे –
संधिवात -
1. वार्धक्यात होणारा व वयानुसार लक्षणे अधिक बळावत जाणारा विकार. काही मार लागल्याशिवाय सहसा तरुण वयात होत नाही.
2. लोकसंख्येच्या मानाने खूप अधिक जणांना होतो
3. सांध्यांच्या मधली कूर्चा झिजते व हाडांचा एकमेकांवर घास्ल्याचा आवाज येतो
4. रोगात होणारी सर्व लक्षणे फक्त संध्यांपुरती मर्यादित असतात.
5. अधिक भार सोसणाऱ्या सांध्यांवर (गुडघे, कंबर, पाठीचे माणके) वेदना अधिक व सूज कमी
6. वेदना आणि सूज विशिष्ट सांध्यांवर स्थिर असते, जागा बदलत नाही.
7. सांध्यांच्या आजूबाजूला गाठी (स्पर) होतात.
8. त्वचेखाली गाठी (नोड्यूल्स) होत नाहीत.
9. स्त्री व पुरुषांमध्ये समान प्रमाणात होतो.
10. वार्धक्य, आनुवंशिकता, बाहेरून आघात, झीज, अधिक वजन वाढणे, हॉरमोन्सची कमी, स्नायुदौर्बल्य अशी प्रमुख करणे आढळतात.
11. वेदना आणि सूज क्रमशः वाढते, जागा बदलत नाही.
12. सकाळी उठल्याबरोबर सांधे आखडतात पण थोड्याफार हालचालीनंतर मोकळे होतात. जास्त चाल झाल्यावर पुन्हा दुखू लागतात.
13. सांध्यांमध्ये वेदना आणि सूज ह्याशिवाय फारशी अधिक लक्षणे दिसत नाहीत.
14. आजार सांध्यांपुरताच मर्यादित असतो त्यामुळे वेदना सोडल्यास अन्य रोग होऊन आयुष्मान कमी होण्याची शक्यता नसते.
आमवात -
1. अगदी लहान वयापासून केव्हाही होऊ शकतो. ३० ते ५० मध्ये अधिक संभवतो.
2. लोकसंख्येच्या मानाने पीडितांची संख्या त्यामानाने कमी.
3. सांध्यांमधील सायनोव्हिअल कवचात दोष संचय होतो, कूर्चा शाबूत असते.
4. ताप, सर्व शरीरावर सूज, हृदयात जडपणा, फुप्फुस विकार, डोळ्यांचे विकार अशी अनेक सर्वादेहिक लक्षणे होतात.
5. हातापायांची बोटं, मनगट अशा सांध्यांवर सूज, वेदना, स्थानिक उष्णता, लाली अशी लक्षणे होतात.
6. सूज अदलून बदलून निरनिराळ्या तीस पर्यंत सांध्यांवर दिसते.
7. योग्य चिकित्सा न केल्यास सांध्यांमध्ये वक्रता / व्यंग निर्माण होते.
8. २० ते ३० % रुग्णांमध्ये त्वचेखाली गाठी (नोड्यूल्स) होतात.
9. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ३ पट अधिक प्रमाणात होतो.
10. रोगप्रतिकारक्षमता कमतरतेमुळे सांध्यांच्या कवचावर आघात करणारा विकार (ऑटोइम्यून डिसीज).
11. अचानकपणे लक्षणांचे गांभीर्य कमी-अधिक होते व जागाही बदलत राहते.
12. सकाळी उठल्याबरोबर सांधे आखडतात व दीर्घकाळ पर्यंत तसेच आखडलेले राहतात.
13. सतत आजारी असल्याची भावना, मंद ताप, प्रचंड थकवा व स्नायूंमध्ये वेदना होत असतात. हृदयरोग व काही कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
14. सार्वदेहिक आजार असल्यामुळे आयुष्मान कमी होण्याची शक्यता असते.
पथ्यापथ्य –
रोग होण्याच्या कारणांपासून दूर राहणे हाच पथ्यापथ्याचा खरा कानमंत्र. फक्त संधिविकारातच नव्हे तर स्वास्थ्याच्या दृष्टीने एकूणच विचार केला तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसेल की जाडजूड लोकांपेक्षा सडपातळ प्रकृतीचे लोक तुलनेने कमी आजारी असतात. त्यांना काही आजार झालाच तर लवकर आटोक्यात येतो, रोगाचे इतर उपद्रव अतिशय कमी प्रमाणत होतात, चिकित्साही जास्त काल घ्यावी लागत नाही, त्यांचे आयुष्मान देखील तुलनेने अधिक असते. दोन घास जास्त खाण्यापेक्षा दोन घास कमी खाणे कधीही हितकार असते हे कायम स्मरणात ठेवावे. अतिव्यायामाने धातूंची झीज अधिक होते. त्यामुळे मर्यादित व्यायाम पण अतिशय नियमितपणे करावा. शीतपेय, आईस्क्रीम्स ह्यांचे सेवन क्वचित व मर्यादित प्रमाणात करावे. फसव्या जाहिरातींच्या मोहात पडून बारा महिने तेरा काळ थंड पाणी / पेय घेण्यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. सूर्यनमस्कार व योगासने करण्याने बॉडी पहेलवानासारखी दिसणार नाही पण निरोगी राहू शकते. प्रत्येक संध्याला एक नियोजित हालचाल करण्यासाठी निसर्गाने रचलेले आहे. दिवसातून एकवेळा तरी ती नियोजित हालचाल त्यात्या संध्याकडून करून घ्यावी. उदा. मनगटाच्या हालचाली किती प्रकारे होऊ शकतात (प्रसाद घेण्यासाठी हात पुढेकारतो तशा स्थितीपासून, मुठ गुंडाळून) –
1) शरीराच्या जवळ घेणे (फ्लेक्शन)
2) शरीरापासून खाली घेणे (एक्सटेन्शन)
3) शरीरापासून बाजूला घेणे (अॅब्डेक्शन)
4) शरीराजवळ घेणे (अॅडक्शन)
5) सुलट्या दिशेने फिरवणे (क्लॉकवाईज रोटेशन)
6) उलट्या दिशेने फिरवणे (अॅंटिक्लॉकवाईज रोटेशन)
सांधेदुखी ची परिपूर्ण चिकित्सा -
सांधेदुखीची चिकित्सा दोन प्रकारांनी होते. तोंडावाटे औषधोपचार करून आणि स्थानिक उपचार करून. ह्या दोन्ही प्रकारच्या चिकित्सा यशस्वीपणे करण्यासाठी वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट कशाप्रकारे सहाय्य करतात ते आता पाहूया-
वातमुक्ता गोळ्या -
देवदार (Cedrus deodara), एरंडमूळ (Ricinus communis), हाडजोडा (Cessus quadrangularis), शल्लकी निर्यास (Boswellia serrata), शुद्ध गुग्गुळ (Balsamodendron mukul), शुद्ध कुचला (Strychnous Nux-vomica) हा आहे वातमुक्ता गोळ्यांचा पाठ.
देवदार : सूजनिर्मितीच्या प्रक्रियेत केंद्रबिंदु असलेले लायपॉग्झिजिनेझ स्राव रोखून सूज नियंत्रण करण्याचे प्रभावी कार्य देवदाराने होते. ह्याशिवाय उत्तम वेदनाशामक म्हणून ही वनस्पती स्वयंसिद्ध आहे.
एरंडमूळ : डायक्लोफिनॅक सोडियम नामक वेदनाशामक औषध आधुनिक वैद्यक शास्त्रात प्रसिद्ध आहे. कोणतेही कारण असो, ह्या औषधाने तत्काळ वेदना थांबते. एरंडमुळाचा तौलनिक अभ्यास ह्या औषधाबरोबर केला असता ह्यातील वेदनाशामक गुण तुल्यबलअसल्याचे निदर्शनास आले. आयुर्वेदातही आमवाताच्या चिकित्सेत हे श्रेष्ठ असल्याचे वर्णन मिळते. “आमवातगजेन्द्र स्य शरीरवनचारिणःl एक एव निहन्ताऽयमैरण्डस्नेहकेसरी ll” आमवातरुपी गजेन्द्राचा नाश करणारा एकमेव सिंह म्हणजे एरंडस्नेह आहे.
हाडजोडा : व्यायाम नेहमी अर्धशक्ति करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे. अवाक्यापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे हाडांतील सांध्यांची झीज होते व त्याठिकाणी सूज येते. व्यायामाबद्दलच्या चुकीच्या समजुतीने किंवा जलद वजन नियंत्रणाच्या अपेक्षेने काही तरुण मंडळी अघोरी व्यायाम करतात. अशा कारणामुळे झालेल्या सांधेदुखीवर हाडजोडाचा प्रयोग वेदनामुक्ति उत्तम ठरला असा निष्कर्ष संशोधनांति सिद्ध झाला.
शल्लकी निर्यास : शाल्लकी नावाच्या झाडापासून निघणाऱ्या डिंकाला शल्लकी निर्यास म्हणतात. ह्यात बोसवेलिक अॅसिडनाकाम कार्यकारी घटक असतो. शाल्लकी सेवनाने उत्तम वेदनानियंत्रण होते व गुडघ्यातील हालचाली अल्पकाळात पूर्ववत होतात असे सिद्ध झाले आहे. आमवात व संधिवात अशा दोन्ही प्रकारच्या संधिविकारात उपयोगी ठरणारे हे औषधी द्रव्य आहे. सूजनिर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या ल्युकोट्राइन्सवर ह्याचे कार्य होते.
शुद्ध गुग्गुळ : केवळ सूजनियंत्रण नव्हे तर विशेषकरून सांध्यांच्या सुजेवर शुद्ध गुग्गुळ अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठीसुद्धा गुग्गुळाचा उपयोग प्रसिद्ध आहे. वजन वाढीमुळे सांध्यांवर पडणारा भार कमी करून ह्याचा दुहेरी फायदा होतो. सूजनिर्मिती करणाऱ्या प्रोस्टाग्लॅंडिन्सना आटोक्यात ठेवून ह्याची क्रिया होते.
शुद्ध कुचला : ही एक विषारी वनस्पती आहे. योग्यप्रकारे उपयोग केला तर विषदेखील परामौषध म्हणून उपयोगी होऊ शकते तर चुकीच्या पद्धतीने उपयोग केला तर अमृतसुद्धा विषसमान काम करते. ह्या तत्वानुसार आयुर्वेदाने कुचल्याची शुद्धि करून त्याचा अमृतरूपी वापर करण्याचा कानमंत्र दिला आहे. स्ट्रिकनिन व ब्रूसीन असे दोन विषारी घटक ह्यात प्रामुख्याने असतात. पैकी स्ट्रिकनिन अधिक विषारी असते. आयुर्वेदात सांगितलेल्या शुद्धी क्रियेमुळे ह्यातील स्ट्रिकनिन नाहीसे होते व ब्रूसीन चे परिवर्तन आयसोब्रूसीनमध्ये होऊन अत्यंत प्रभावशाली वेदनाशामक म्हणून कार्य करते. हे कार्य केवळ स्थानिक नव्हे तर केंद्रीय मज्जा यंत्रणेवरही होते ज्यामुळे वेदनेचे गांभीर्य त्वरित आटोक्यात येते. शुद्धी केल्यावर कुचल्याचे अनेक सुप्त गुण दिसू लागतात. ह्याने रोगप्रतिकारक्षमता सुधारते, यकृताचे कार्य सुधारते, अपस्मार रोगात उपयोगी ठरते, स्मरणशक्ती सुधारण्यास सहाय्य करते, काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरसाठी उपयोगी ठरते, पचनाच्या तक्रारींवर (जुलाबावर) नियंत्रण करते व सर्पदंशावर लाभदायक होते.
वातमुक्ता लिनिमेंट
विषगर्भ तेल, महामाष तेल, नारायण तेल, गंधपुरा तेल – हा आहे वातमुक्ता लिनिमेंटचा पाठ.
विषगर्भ तेल : प्रामुख्याने शुद्ध कुचला असलेले, सांध्यांच्या सुजेवर अत्यंत गुणकारी असे हे तेल आहे. गृध्रसी (सायाटिका), डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कानामध्ये आवाज (टिनिटस), मांसक्षय, खूप चालण्यामुळे होणारी अंगदुखी, पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ अशा सर्वप्रकारच्या वातरोगांवर गुणकारी आहे. बाल वयात आणि गर्भावस्थेत ह्याचा वापर करू नये.
महामाष तेल : पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ, चेहऱ्याचा पॅरालिसिस (फेशियल पॅरालिसिस), मन्यास्तंभ, हनुस्तंभ, सांधे आखडणे, पाठीच्या व मानेच्या मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस), मुकामार, आमवात व संधिवात, मांसक्षय, अशा विकारांमध्ये उपयोगी. ह्याचा विशेष उपयोग वार्धक्यात होणाऱ्या विविध वातविकारांवर उत्तम होतो. अभ्यंग, नस्य, शिरोधारा, बस्ति व सेवनासाठी ह्या तेलाचा वापर करता येतो.
नारायण तेल : लांबच्या प्रवासामुळे होणारी अंगदुखी, संधिवात, आमवात, वातरक्त (गाऊट), मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस) व हाडांना बळकटी देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. अभ्यंग, नस्य, शिरोधारा, बस्ति व सेवनासाठी ह्या तेलाचा वापर करता येतो.
गंधपुरा तेल : ह्यालाच विंटरग्रीन तेलही म्हणतात. ह्याचे झाड ऐन बर्फावृष्टीतही सदा हिरवे राहणारे असल्यामुळे विंटरग्रीन नाव पडले आहे. ह्या झाडापासून निघणारे पिवळसर सुगंधी तेल जगात सर्वत्र वापरले जाते. ह्या तेलात मिथाइल सॅलिसिलेट नामक वेदनाशामक रसायन असते. ह्या तेलाचा वास थोडाफार निलगीरीप्रमाणे असतो. ह्याचा प्रयोग फक्त बाह्य वापरासाठीच करावा. पोटात घेणे योग्य नाही. त्वचेवर लावल्याने शेकल्याप्रमाणे जाणवते व वेदना शमन करण्यास उपयुक्त ठरते. त्वचाविकार किंवा जखम असता ह्याचा वापर टाळावा.
वातमुक्ता कोणी घ्यावे?
तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची व्यवस्था करावी. सांधेदुखी होण्यापूर्वीची लक्षणे दिसू लागताच वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट मध्यम मात्रेत घेण्याची व वापरण्याची सुरुवात करावी. ह्याने “प्रिवेन्शनइज बेटर दॅन क्युअर” ही म्हण आपल्याला अंमलात आणता येईल व पुढे होणारे त्रास, उपद्रव आणि ऑपरेशन (नी रिप्लेस्मेंट / जॉइंट रिप्लेसमेंट) सारखे खर्चिक इलाज टाळता येतील. गर्भिणींनी उदरावर लावण्यासाठी व ६-७ वर्षाखालील मुलांनी सोडून सर्वांनी ह्या तेलाचा सर्वप्रकारच्या दुखण्यांवर डोळे झाकून वापर करावा. वेदना, सूज, पाठदुखी, कंबरदुखी, खांदे आखडणे (फ्रोजन शोल्डर), सायाटिका क्निवा अन्य कोणत्याही वातरोगापासून खऱ्या अर्थाने मुक्ति मिळवण्यासाठीच निर्माण केले आहे वातमुक्ता, गोळ्या व लिनिमेंट स्वरुपात.
सेवन विधी :
गोळ्या : २ – २ गोळ्या दोन वेळा रिकाम्यापोटी, कोमट पाण्याबरोबर.
लिनिमेंट : वेदनेच्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज व शेक, दिवसातून दोन वेळा.
सावधगिरीचा इशारा :
औषध घेण्याने क्वचित प्रसंगी थोडे आम्लपित्त होण्याची शक्यता आहे. असे होत असल्यास गोळ्या जेवणानंतर घ्याव्यात. लिनिमेंटचा वापर गर्भिणींनी करू नये. बाल वयात त्वचा सुकुमार असते म्हणून लिनिमेंटचा वापर टाळावा. त्वचारोग, त्वचेला भेगा असतील त्या ठिकाणी लिनिमेंट वापरू नये.
ह्या लेखातील माहिती वाचकांना ज्ञानवर्धनासाठी दिली आहे. वैद्यांच्या सल्ल्याशिवाय औषधसेवन करणे योग्य नाही हे सदैव स्मरणात ठेवावे.

“यौवन ते विवाह अवस्थेतील समस्या” कारणे व उपाय.....

“यौवन ते विवाह अवस्थेतील समस्या” कारणे व उपाय.....
मातृदेवो भव | पितृदेवो भव |
वेदांनी आरंभीच केला गौरव,
स्त्री ही नररत्नाची खाण म्हणोनिया ||
स्त्री-पुरुष किंवा माता-पिता या दोन्ही शब्दात स्त्रीचे किंवा मातेचे स्थान प्रथम असल्याचे दिसते. वेदातील वरील उक्ती लक्षात घेता हे सर्वांना सहज कळेल. त्याप्रमाणे जीवन रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाके आहेत. हेही खालील उक्तीमधून स्पष्ट होईल,
स्त्री पुरुष ही चाके, परस्पर पोषक होता निके |
गाव नांदेल स्वर्गीय सुखे तुकड्या म्हणे ||
“रश्मी, मी बाहेर जात आहे. आता खूप उशीर झालेला आहे, तुला बाहेर जायचे असेल तर लवकर जा व लवकर घरी परत ये. आता तुझे वय फिरायचे राहिलेले नाही. परतल्यावर घरी कोणी आले तर दरवाजाची कडी जपून काढ. ओळखीच्या व्यक्तीशिवाय किंवा नात्यातल्या माणसाशिवाय कोणालाही घरात घेऊ नकोस. आई, बाबा, दादा घरी नाहीत म्हणून सांग..” ह्या सगळ्या सूचना प्रत्येक आई आपल्या मुलीला न चुकता काळजीपूर्वक देत असते. पण हे सांगत असताना त्यामागील भूमिका मात्र आई स्पष्ट करत नाही. ती स्पष्ट करायला हवी. त्यामुळे मुलीलाही काही गैर वाटणार नाही. कारण मुलीच्या प्रेमापोटीच सावधगिरीच्या सूचना म्हणून आई हे सगळं सांगत असते. सगळ्या जबाबदारीतून व आयुष्यात आलेल्या आपल्या कडू गोड अनुभवातून प्रत्येक आई पाडसाप्रमाणे आपल्या मुलीला जपत असते. पित्याचा सहभाग ह्यात फार अल्प असतो. चांगल्या वाईटाचे खापर तो आपल्या पत्नीवरच फोडतो व जबाबदारीतून मुक्त होऊन हात वर करतो. म्हणून स्त्रियांची जबाबदारी पुरुषांपेक्षा अधिक असते, किंबहुना निसर्गाने तिचे शरीरही तसे बनविले आहे. तिच्यामध्ये क्षमा, सहनशीलता ह्या गोष्टी एकाच वेळी आहेत. मुले कितीही चुकली तरी त्यांनी ‘सॉरी’ म्हणताच ती लगेच त्यांना कुशीत घेते. म्हणून मुलांनी आई वडिलांच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
या कोवळ्या कळ्या माजी; लोपले रविंद्र ज्ञानेश्वर शिवाजी | विकसिता प्रगटतील समाजी; शेकडो महापुरुष ||
बाल्यावस्थेतून यौवनावस्थेत व त्यानंतर प्रौढावस्थेत पदार्पण केलेले आजचे युवक हे उद्याचे राष्ट्र निर्माते आहेत. म्हणून त्यांना लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांच्या मनातील शंका-उपशंका दूर करणे, शंकाचे योग्य निरसन करणे, कामवृत्तीचे दमन न करता आनंदाने जगण्यासाठी व कामशक्तीमुळे जगण्यात अडथळा येणार नाही व त्यांनी मनोवांच्छित सुप्रजेस जन्म देणे अशी पालकांची अपेक्षा असते. लैंगिकतेबद्दल शिक्षण दिल्यास मुले बिघडतील, त्यांच्या हातून पाप घडेल, किंबहुना लैंगिकता हेच पाप आहे असा गैरसमज करून दिला जातो. वयात येण्यापूर्वी त्यांचा वीर्यनाश होईल इत्यादी चुकीचे समज युवकांमध्ये रूढ करून दिले जातात.
लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव शालेय शिक्षणामध्ये न केल्यास तरुणांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात. सुरक्षित मातृत्व संपादन करण्यासाठी कुठेही प्रशिक्षण किंवा कोर्स उपलब्ध नाही. विवाहानंतर एकमेकांशी कसे वागावे या बाबतीत कुठलाही प्रमाणित कोर्स नाही, नियम नाहीत. परंपरेनुसार किंवा अनुभवी व्यक्तीच्या सांगण्यावरून माणूस वागतो. लग्न झाल्यावर नवऱ्याचा स्वभाव कळतो, व्यसन समजते. कधीकधी मुलगा अगोदरच विवाहित असतो, तेव्हा डोके बडविण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. मुलीचा घटस्फोट व्हायच्या अगोदरच आई वडील तिचा पुनर्विवाह करून देतात ह्यातूनच समस्या उद्भवतात. कधीकधी मुलामुलींना संसर्गजन्य रोगाची बाधा जडलेली असते. माझ्या माहितीतील एका तरुणास विवाहापूर्वीच एड्सने ग्रासलेले होते, परंतु श्रीमंतीमुळे गाजावाजा न करता त्याने विवाह केला व त्यानंतर मुलीला व तिच्या आई वडिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. कालांतराने मुलगा दगावला व मुलीला वैधव्य प्राप्त झाले, दरम्यान मुलीला एड्सने कधी ग्रासले ते समजलेच नाही व मुलगी एकाकी पडली. विवाहापूर्वी दोघांची रक्त तपासणी केली असती तर ही वेळ आली नसती. पण आता वेळ निघून गेली होती. ह्यासाठी विवाहपूर्व मार्गदर्शनाची गरज आहे.
विवाहानंतर समस्यांना तोंड देण्यापेक्षा विवाहापूर्वी काळजी घ्यावी. रोग होण्यापूर्वी रोग होऊ नये म्हणून काळजी घेतली तर ते केव्हाही चांगले नाही का? ह्या दृष्टीकोणातूनच हा लेख लिहिण्याचा प्रपंच आणि ह्यातूनच अनेक प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न.
काम जीवन ही शारीरक आणि मानसिक कलाकृती आहे. आदर्श कामजीवनासाठी उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची गरज असते. संपूर्ण शरीर, त्यातील निरनिराळ्या संस्था, यंत्रणा, अंर्त:स्त्रावी ग्रंथी ह्यांचा समतोल असणे गरजेचे असते. कामजीवनाशी मज्जारज्जूचा विशेष संबंध आहे व त्यापेक्षा अधिक संबंध मेंदूशी आहे. आदर्श कामजीवन म्हणजे स्त्री-पुरुषाचे शरीर, मन आणि आत्मा यांचे मिलन होय. भारतीय संस्कृतीमध्ये गृहस्थाश्रमाला अधिक महत्व दिले आहे. ह्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असा क्रम आहे. कामजीवन ही जीवनाला स्थैर्य देणारी एक क्रिया किंवा क्रीडा असून त्यात गैर अध्यात्मिक असे काहीही नाही. किंबहुना काम ही पापमुलक कल्पना मुळीच नाही.
आपल्या संस्कृतीनुसार कामजीवनाची सुरुवात विवाहानंतर होते. भारतीय ऋषीमुनींनी विवाहातील सप्तपदीला महत्व दिले असून ही सप्तपदी खालीलप्रमाणे आहे.
“ईष एकपदी भव | ऊर्जे व्दिपदी भव | रायस्पोषाय | मायोकिव्याय |प्रजाभ्य | ऋतूभ्य | सखां |”
पती पत्नींना शारीरिक बल आणि उत्साह मिळो, त्यांना ऊर्जा प्रदान होवो, जीवनामध्ये ईश्वरी ऐश्वर्य, सौख्य, संतती प्राप्त होवो, सर्व ऋतूंमध्ये सुखविणारा सुख – दु:ख, भावभावनांशी अतूट ऐक्य साधणारा सखा प्राप्त होवो, असा ह्याचा अर्थ असून तो अनेकांना माहीत नसतो.
आदर्श कामजीवनामध्ये पैसा, सत्ता, कीर्ती, यश, सौंदर्य, विद्या इ. गोष्टी आड येत नाहीत. लैला - मजनू, शिरी – फरहाद, पृथ्वीराज – संयोगिता, नल – दमयंती अशी कितीतरी उदाहरणे ह्यासाठी सांगता येतील. आदर्श कामजीवन हे कला, काव्य, साहित्य यांना स्फूर्ती देते. तुकाराम, एकनाथ, नामदेव ह्यांसारख्या संतांचे अमरकाव्य ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. फ्राइड, मार्कोज ह्यांसारख्या तत्वज्ञांनी याचा अभ्यास केला असून भारतातील ‘वात्सायन’ हे जगप्रसिद्ध नाव आहे.
कामशक्तीला अनेक नावे असून लिबिडो, आर्बिओ, एनर्जी अशी आधुनिक नावे असून योगामध्ये याला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात. काम शक्तीमधून आत्मशक्तीकडे सुध्दा जाता येते. व्यास, सूरदास, तुळसीदास ह्यांच्या चरित्रांकडे पाहिले तर हे लक्षात येते. थोडक्यात कामशक्ती किंवा लैंगिकता हे पाप नाही तर जीवन उत्तम तऱ्हेने जगण्याचा तो एक योग आहे.
मुलामुलींचे वय हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा तसा तो घडतो. मातीचा गोळा जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला हवा तसा आकार देऊन त्याचे मडके बनविता येते. ओल्या मातीच्या गोळ्यातून सुंदर मुर्तीही साकारता येते. पण मातीचा गोळा एकदा सुकला की त्याला आकार देता येत नाही. मुलामुलींच्या मनाचेही तसेच आहे. म्हणून ह्या संस्कारक्षम वयात त्यांना आधार व आकार द्यावा, मार्गदर्शन करावे व जोडीला उत्तम संस्कार करणारे विज्ञाननिष्ठ, सुसंस्कृत आधार असलेली लैंगिकतेचे शिक्षण देणारी पुस्तके वाचण्यास द्यावीत. ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’, मुंबई ह्या संस्थेने तसेच ‘कुटुंब कल्याण मंत्रालयाने’ ह्याबाबतीत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती तरूण तरुणींनी वाचावीत. महाराष्ट्रातील नामवंत तज्ञ डॉ. विठ्ठल प्रभू ह्यांची “तारुण्याच्या उंबरठ्यावर”, “निरामय कामजीवन”, “उमलत्या कळ्याचे प्रश्न”, “यौवन ते विवाह” ही पुस्तके आवर्जून वाचावीत.
मित्रांनो ऐकीव किंवा प्रसारमांध्यमाद्वारे मिळणारी माहिती चुकीची किंवा अपुरी असू शकते. म्हणून तज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांनी लिहिलेली माहीती वाचावी. “वीर्यनाश हाच मृत्यू” किंवा अशा प्रकारच्या पुस्तकांत वैज्ञानिक सत्य असेलच असे नाही. अशा पुस्तकांवर विसंबून राहून मनामध्ये भीती निर्माण करून घेऊ नये, अपराध भावनेने वागू नये.
मुले–मुली १२-१३ वर्षांच्या दरम्यान वयात येतात. तेव्हापासून त्यांच्यावर संस्कार करणे, वैज्ञानिक पद्धतीने लैंगिकता समजावून सांगणे व तारुण्यसुलभ कामभावनांचे उदात्तीकरण करणे, सुदृढ व्यक्तिमत्व निर्माण करणे, पुनरुत्पादन इ. गोष्टींची माहीती देणे हे लैंगिक शिक्षणाचे हेतू आहेत. संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी असते. पालकांनी ती वेळीच सांभाळावी व ह्याबाबतीत सर्व साहित्य घरी आणून मुला-मुलींच्या स्टडी रूममध्ये वाचनास ठेवावे म्हणजे त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल.
१६ ते १८ वर्षे हे वय भावनाप्रधान बनविणारे आहे. ह्या वयात मुलाला मिशा फुटल्या व मुलीला मासिक पाळी आली तरीही त्यांच्या मनाची स्थिती दोलायमान असते. ह्या वयात मुले-मुली तडकाफडकी निर्णय घेतात, आपली मते स्वतंत्रपणे मांडून बेजबाबदार वागतात. अशावेळी पालकांनी त्यांना समजावून सांगावे, आपले विचार व मते त्यांच्यावर लादू नयेत. आपणास जे ध्येय प्राप्त करता आले नाही ते ध्येय आपल्या मुलीने किंवा मुलाने पूर्ण करावे अशी अपेक्षा पालकांनी ठेवू नये. बहुतांश निर्णय त्यांना घेऊ देण्याची संधी द्यावी. अलीकडे प्रत्येक माणूस योग्य खुर्चीत दिसत नाही. ज्याला कवी व्हायचे असते तो डॉक्टर बनतो तर डॉक्टर इंजिनीयरच्या खुर्चीत दिसतो. वास्तुशास्त्रज्ञ कृषिअधिकारी बनून वास्तूविषयक सल्ला देतो. शिक्षक बनलेला माणूस अर्थतज्ञांची स्वप्ने बघतो, आई वडिलांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मुलांचा मानसिक कल व शारीरिक क्षमता ओळखून त्यांना आवडत्या विषयांत प्राविण्य मिळविण्याची संधी द्यावी.
वयात आल्यानंतर मुलामुलींच्या अनेक समस्या असतात. त्याबद्दलची थोडक्यात माहीती आता बघूया.
यौवन अवस्थेतील मुलांच्या समस्या व उपाय :-
वाढत्या वयाबरोबर तारुण्याच्या उंबरठ्यावर रेंगाळताना अनेक समस्या तरुणांना भेडसावतात. आजच्या काळातही तरुण पिढीचे ज्ञान एवढे तोकडे आहे की “मुलीला हात लावला तर ती आई बनणार का”? असा बावळट प्रश्न, तसेच “हात लावला की एड्स होतो” अशी समजूत, “मुलाच्या तोंडातला उष्टा लाडू मी खाल्ला तर”.... हे विचारणाऱ्या तरुणीच्या लैंगिक ज्ञानाविषयी अनुकंपा बाळगावी की रामायण महाभारतातील कथेचा तो ठसा मानावा ?
1) स्तन मोठे होणे : हार्मोनच्या वाढीमुळे स्तनात गाठ निर्माण होऊन स्तन मुलीप्रमाणे दिसतात. पण ह्याला औषधांची गरज नसते. ती गाठ आपोआप कमी होते. गाठीस दाबू नये, ही गाठ दुखते तेव्हा वेदनाशामक औषधे ड़ॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.
2) तोंडावर फोड किंवा मुरूम येणे : ह्यावर खास उपचारांची गरज नाही. शरीरातील हार्मोन्सची वाढ हेच ह्याचे कारण आहे. चेहरा स्वच्छ ठेवावा, वारंवार मुरुमे दाबू नयेत. गोखरूचूर्ण + चंदनचूर्ण एकत्र करून चेहऱ्यावर लेप लावावा. हमखास गुण येतो असा अनुभव आहे. पोटात गंधर्व हरीतकी चूर्ण ५ ग्रॅम रात्री घ्यावे.
3) बोकडासारखी दाढी येणे.: काही मुलांना बोकडासारखी दाढी असते. मुलांच्या मनात यामुळे निर्माण झालेला न्यूनगंड काढून टाकावा. विविधता निसर्गाचे वरदान आहे. एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते. केस निर्माण करणाऱ्या ग्रंथी कानशीलावर नसल्यास हनुवटीवर दाढी येते. ह्याला काही औषध करण्याची आवश्यकता नाही.
4) स्वप्नदोष व हस्तमैथुन : टेस्टोस्टेरॉन ह्या हार्मोनची वाढ झाल्याने वृष्णग्रंथीत वीर्य निर्मिती होते. तयार झाल्यावर ते बाहेर पडणे नैसर्गिक आहे. काळजी करू नये. ‘वीर्यनाश हाच मृत्यू’ असा गैरसमज करून घेऊ नये. माझ्या पस्तीस वर्षाच्या वैदकीय व्यावसायिक अनुभवातून मी हे सांगत असून ‘स्वप्नदोष’ हा आजार नसून असे वीर्य बाहेर पडणे हे प्राकृत समजावे. उकळलेल्या पाण्यावर ठेवलेल्या झाकणातून ज्याप्रमाणे वाफ बाहेर निघते त्याप्रमाणे हे घडते. त्यामुळे घाबरू नये. फार तर डॉक्टरांना दाखवावे. आहारात फळे, भाजीपाला, सुकामेवा घ्यावा, मोकळ्या हवेत फिरण्यास जावे, धार्मिक पुस्तके वाचावीत.
5) वृषणग्रंथी अंडकोषात न उतरणे : दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. विद्याकाकू आपल्या नातवाला घेऊन आल्या. साहेब ह्याच्या पिशवीत गोळी नाही. आमचे नशीब फुटके. वैदुकडे बरेच पैसे घातले पण गोळी काही खाली येत नाही. असा पाढा त्या वाचत होत्या. मी थोडा वेळ गोंधळून गेलो. प्रकरण समजायला बराच वेळ गेला. त्यानंतर कळले की ‘अनडिसेन्डेड टेस्टिज’ ची केस आहे. विद्याकाकूला नातवाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.
त्या आजही भेटल्या की मी त्यांना म्हणत असतो, “काकू सापडल्या का गोळ्या ?” विद्याकाकू गालात हसतात.
वृषण ग्रंथी अंडकोषात न उतरणे ह्या विकारासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. तेव्हा वैदुच्या भानगडीत न पडता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दैवाला दोष देऊ नये.
6) लिंग भेदातील विकृत्या : ह्यामध्ये एका बाजूला अंडकोष तर दुसऱ्या बाजूला बीजकोष असतो. दोन्ही बाजूला वृषण ग्रंथी असतात. बाह्य लिंगावरून स्त्री की पुरुष हे निदान करता येत नाही. काही पुरुषांत वयाप्रमाणे लिंगाची वाढ होत नाही. यौवन आरंभाच्या प्रारंभी स्तनांची वृद्धी होते. ही वाढ स्त्रियांतील स्तनाच्या वाढीप्रमाणे असते. जननेंद्रीयांवर केस नसतात. बाह्यतः शरीर पूर्णपणे स्त्रीयांसारखे दिसते. परंतु वास्तविक तो पुरुषच असतो. ह्या सर्व विकृती फार क्वचित प्रमाणामध्ये दिसून येतात. शस्त्रक्रियेनंतर हे व्यंग नीट होऊ शकते. काही पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेनंतर गर्भाशय सुद्धा आढळून आलेले आहे. ह्या विकृती किंवा व्यंग क्वचित दिसतात तेव्हा लवकरच डॉक्टरांना दाखवून घ्यावे म्हणजे समस्या सुटेल. दैवाला दोष देत बसू नये. अलीकडे तर हार्मोन चिकित्सेमुळे अशा विकृती ठीक करणे सोपे झाले आहे.
यौवन अवस्थेतील स्त्रियांच्या विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्या :
यौवनाचा काळ म्हणजे बालपणापासून प्रौढत्व दिशेकडे जाणारा संक्रमणाचा काळ. हा काळ जरी मोठ्या गुंतागुंतीचा असला तरी ह्याच काळात स्त्रियांच्या शरीरामध्ये शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारचे बदल होत असतात. ह्या काळात शरीरातील निरनिराळ्या इंद्रियांमध्ये होणारे बदल गुंतागुंतीचे असतात. ह्यात जननेंद्रिय, स्तन, भगोष्ठ इत्यादी अवयवांचा समावेश असतो. वयाप्रमाणे वाढ होत नसेल तर वेळीच तज्ञ स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.
यौवनामध्ये पदार्पण करणाऱ्या मुलीला तिच्यात होणारे फरक नीट समजावून सांगायला हवेत. माता-पिता व फॅमिली डॉक्टरांचा ह्यात महत्वाचा वाटा आहे. यौवनात पदार्पण करणाऱ्या मुलीला जर चांगले मार्गदर्शन केले गेले तर तिला मासिक पाळीचा कुठल्याही प्रकारचा त्रास न होता स्त्रीत्व प्राप्त होईल व आई होणाच्या काळामध्ये आपल्या प्रेरणा व मनोवृत्ती ती चांगल्या प्रकारे काबूत ठेवू शकेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मुलींना चांगले मार्गदर्शन केले जात नाही व त्यामुळे यौवनातून स्त्रीत्वात प्रवेश करीत असतांना तिच्या मनाला भीती वाटते व त्यानंतर संभोग, गर्भारपण, बाळंतपण ह्या येणाऱ्या गोष्टींबद्दल मनामध्ये एक प्रकारची भीती उत्पन्न होते, उत्साही दिसत नाही. मनामध्ये उगाचच विकल्प निर्माण होतात. म्हणून मासिक पाळीच्या विकृती तिला नीट समजावून सांगायला हव्यात. मासिक पाळीत काय काळजी घ्यावी याबद्दल तिला स्पष्ट मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचायला द्यायला हवीत. आईने सुद्धा आपल्या अनुभवाची शिदोरी तिच्या समवेत वाटून खावी.
1) यौवनाचा अभाव : ही क्वचित दिसून येणारी विकृती असून ह्यामुळे शारीरिक व लैंगिक वाढीला अडथळा येतो. यौवनालाच अटकाव केला जातो. ही स्थिती अंर्तःस्त्रावी ग्रंथीच्या विकृतीमुळे उत्पन्न होते. ह्याबाबतीत अंर्त:स्त्रावी अभ्यासतज्ञांचा सल्ला घ्यावा.
2) अकाल प्रौढत्व : एखाद्या मुलीमध्ये जर वयाच्या ८ वर्षापूर्वी मासिक पाळी सुरु झाली तर ती प्रौढत्व येण्यापूर्वीची मासिक पाळी समजावी. क्वचित मुलींमध्ये जन्मापासून सुद्धा मासिक पाळी सुरु झाल्याची उदाहरणे मी बघितलेली आहेत. परंतु ह्या बाबतीत नक्की कारण सांगता येत नाही. हे नैसर्गिकच समजावे कारण मासिक पाळीबरोबरच अशा मुलींमध्ये जननेन्द्रीयाची वाढ पूर्ण झालेली असते. शरीराची वाढ प्रौढासारखीच असते. एवढेच नव्हे तर माझ्या जवळच्या मित्राची बहीण वयाच्या १४ व्या वर्षीच गरोदर राहून तिचे बाळंतपण सुद्धा नैसर्गिकरीत्या झाले. अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात. अशा स्त्रियांमध्ये जननेन्द्रियाची वाढ झाली की नाही हे पाहण्यासाठी भूल देऊन तपासणी करता येते व त्यानंतर निदान करून यशस्वी औषध योजना करता येते.
3) उशीरा येणारी मासिक पाळी : काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी उशीरा येते. त्यामुळे घाबरून जाऊ नये. कधी कधी उपासमार, अति कष्टाची कामे, मानसिक ताप, रक्त कमी असणे, टायफाईड, मलेरिया अशा आजारांच्या उपद्रवामुळे पाळी उशीरा येऊ शकते. ह्यावर उपचार केल्यास पाळी लवकरच सुरु होते, परंतु जननेन्द्रियाची वाढ झालेली नसेल तर मात्र पाळी येणे जवळजवळ अशक्य असते. काही स्त्रियांमध्ये जन्मापासून गर्भाशयच नसतो. मुलगी वयात येत नाही हे पाहून आई वडील घाबरतात. काही काही वेळा तर मुलीचे लग्न करून हात वर करतात. एका ब्यादेतून आपली मोकळीक झाली असे त्यांना वाटते. लग्नानंतर मात्र प्रकरण मासिक पाळी न आल्यामुळे घटस्फोटापर्यंत जाते. अशा समस्या कमी प्रमाणात आहेत. माझ्या ३५ वर्षाच्या दीर्घ सेवेमध्ये फक्त ३ स्त्रियांना गर्भाशय नसल्याचे मला दिसून आलेले आहे. ह्यात कोणत्याही प्रकारचे उपचार करून यश मिळणे शक्य नाही.
4) यौवनामध्ये मासिक पाळी जास्त येणे : ह्यात यौवनानंतर म्हणजे वयाच्या १५ - १६ व्या वर्षी मासिक पाळीत अंगावरून जास्त जाते. अनेक आठवडे मासिक पाळी चालूच राहते. रक्त जाण्यामुळे पांडुरोग होतो. यावर परिश्रमपूर्वक इलाज करावे लागतात.
5) मासिक पाळी न येणे : प्रौढ स्त्रियांमध्ये मासिक पाळी येत नसली तर किंवा वयाच्या १८ वर्षांपर्यंत सुरु झाली नाही तर त्याला ‘अनार्तव’ म्हणतात. तीव्र कुपोषण, भीती, कुटुंबातील कर्ता पुरुष देशोधडीला लागणे, मानसिक आघात अशा कारणांमुळे मासिक पाळी येत नाही.
महाराष्ट्रातील १९९३ च्या खिल्लारी येथील भूकंपात नातेवाईकांपासून ताटातूट झालेल्या अनेक मुलींना मासिक पाळी आलेली नाही. त्यातील अनेक स्त्रिया उपचार घेत आहेत व उपचारास दाद देत आहेत. परंतु वर सांगितल्याप्रमाणे गर्भाशयच नसेल तर मात्र मासिक पाळी येणे असंभव आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये लंडन शहरावर बॉम्ब हल्ले झाल्यानंतर काही स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद झाल्याचे माझ्या वाचनात आले आहे. ह्यात तडक बीजकोषावर परिणाम होऊन मासिक पाळी अचानक थांबली असावी.
6) मासिक पाळी न येण्याची प्राकृतिक कारणे : उपासमार, क्षयरोग, हिवताप व इतर प्रदीर्घ आजार ह्यामुळे मासिक पाळी येत नसल्याचे माझ्या अभ्यासात आहे. संतुलित आहार व उपचार केल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी येते. ह्याउलट अति खाणे, वजन वाढणे, सुखासीनता व स्थौल्य अशा कारणांमुळे मासिक पाळी येत नाही. स्थूल स्त्रियांमध्ये अंतरा अंतराने थोडाथोडा मासिक स्त्राव होतो किंवा अनार्तव असते. वजन कमी केल्यावर मासिक पाळी नियमित येते. स्थूल स्त्रियांमध्ये अंत:स्त्रावी ग्रंथीच्या विकृतीमुळे मासिक पाळी येत नाही. परंतु अशा स्त्रियांमध्ये अंत:स्त्रावी ग्रंथी-विकृतीचा ठोस पुरावा मिळत नाही.
7) मासिक पाळीपूर्वी मनावर ताण येणे आणि त्रास होणे: पुष्कळशा स्त्रियांमध्ये मासिक पाळीपूर्वी २-३ दिवस थोडा त्रास होतो. ही विकृती २० ते २५ वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. २५ ते ३५ वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये ही विकृती जास्त प्रमाणात असते. प्रौढ मुलींमध्ये त्याची तीव्रता व कालमान कमी असते. या प्रकारचा ताण बाळ झालेल्या स्त्रियांपेक्षा ज्यांना बाळ नाही अशा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. सामान्यपणे पाळी येण्यापूर्वी ८ ते १० दिवसांपूर्वी लक्षणांना सुरुवात होते. ह्यामध्ये डोकेदुखी, मन बैचैन होणे, स्तनावर ताण पडणे, पोट फुगणे, वजन वाढणे, भावनाविवशता इ. लक्षणे असतात. काही स्त्रियांमध्ये ५ ते १० पौंडांपर्यंत वजन वाढते. स्तनांना इतकी ताठरता येते की स्थानिक त्वचा पूर्णपणे ताणते व अस्वस्थता येते. मासिक पाळी सुरु झाल्यावर ही लक्षणे आपोआप कमी होतात. ह्यामध्ये मूत्रल औषधे, वेदनाशमन करणारी औषधे द्यावीत.
8) कष्टार्तव (मासिक पाळीत पोट दुखणे) : ही तक्रार बऱ्याच स्त्रियांमध्ये आढळून येते. गरीब स्त्रियांपेक्षा श्रीमंत स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. किती प्रमाणात पोटात दुखते, खरोखर वेदनांची तीव्रता किती आहे हे आजमावता येत नाही. वेदना सहन न होणाऱ्या असतात एवढे खरे. २० वर्षाच्या खालील स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते. मासिक पाळीपूर्वी १-२ वर्ष हा प्रकार चालू असतो व औषधोपचाराने तो कमी होतो. जननेन्द्रियांची अपूर्ण वाढ, गर्भाशय लहान असणे, गर्भाशयाचे तोंड टाचणीप्रमाणे छोटे असणे ही कारणे असू शकतात. कधी कधी गर्भाशय मागच्या बाजूला दुमडलेला असतो. त्यामुळे मासिक पाळीतील रक्त बाहेर पडत नाही व पोटामध्ये दुखते. गर्भाशयाची अपूर्ण वाढ असेल तर गर्भाशयात येणारी आकुंचने अनियमित व वेदनायुक्त असतात. त्यामुळे पोटात दुखते. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. श्रीमंत, फाजील, हळव्या मुलींमध्ये जास्त मनस्ताप झाल्यामुळे पोटात दुखते. वेदना सहन करण्याची ताकद कमी होत जाते. मुलीला दिलासा दिला तर तिच्या मनातील भीती नष्ट होते व त्रासाची तीव्रता कमी होते.
9) लक्षणे: पाळीच्या वेळी पोटात दुखताना वेदना तीव्र असतात. मळमळ व उलटी होते. मासिक पाळी चालू होणाच्या एक दिवस अगोदर पोटात दुखायला सुरु होते. ओटीपोटात जास्त दुखते, रक्ताच्या गाठी पडतात. सुरुवातीचे काही दिवस मासिक पाळी बीजविरहीत असते म्हणून निदान १५ वर्षापर्यंत हा त्रास होत नाही. ह्यामध्ये चांगला आहार व शौचास साफ होणारी औषधे दिल्यास चांगला उपयोग होतो. वेदनाशामक गोळ्याही चांगल्या उपयोगी पडतात. आई वडिलांनी मुलीचे फाजील लाड व चिंता करण्यापेक्षा तिला समजावून सांगावे म्हणजे तिचे दुखणे कमी होते. चिकाटी व युक्तिवाद यामुळे दुखणे बरेचसे कमी होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करून गर्भाशयाचे तोंड मोठे करतात व असा त्रास कायमचा जातो.
10) प्रौढत्वातील मानसशास्त्रीय विचार : आधुनिक जीवनाचा ताण, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड ही प्रत्येकाला साधतेच असे नाही. एका बाजूला आपल्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा तर दुसऱ्या बाजूला सासू-सासरे, आई-वडील, कुटुंबाची ठेवण, चाली-रीती, नवरा आंबा म्हणतो तर बायको चिंच ह्यामुळे मनामध्ये वाद सुरु होतो, मन एकाग्र होत नाही. हा ताण शरीरावर पण पडतो म्हणून स्त्रियांना सहन करण्याची, समजून घेण्याची शक्ती निसर्गाने पुरुषांपेक्षा जास्त दिलेली आहे. हा मानसिक ताण, शारीरिक लक्षणे उत्पन्न करतो. ही लक्षणे स्त्रीत्वाच्या चिह्नांशी निगडीत असतात. मुलींच्या मनामध्ये भाऊ, चुलत भाऊ व नात्यातील इतर मुले ह्यांच्याबद्दल थोडासा मत्सर निर्माण होऊ शकतो. आई वडील नेहमी ‘आमचा बाळ्या असा आणि आमचा बाळ्या तसा’ हेच कौतुक दिवसभर करतात व मुलीला गौण समजतात. मुलगा म्हणजे भांडवल व मुलगी म्हणजे जबाबदारी ही प्रथा पडून गेली आहे. ह्या प्रकारामुळे तरूण मुलीच्या मनामध्ये चीड निर्माण होण्याची शक्यता आहे व कदाचित त्यामुळेच ती पुरुषांबरोबर स्पर्धा करू लागली आहे.
विवाहित स्त्रियांमध्ये सामान्यतः दिसून येणाऱ्या विकृती व परिणाम :
1) रतिसुख मिळविण्याची असमर्थता (थंडता)
2) मासिक पाळीतील विकृती
3) श्वेतप्रदर
4) वंध्यत्व
5) गर्भधारणा झाल्याचा भास होणे
6) योनीच्या जागी खाज येणे
7) कंबर दुखी व ओटीपोटात दुखणे
ह्याशिवाय काही कारणे गरोदरपणा, बाळंतपण व आर्तवनिवृत्ती (मेनोपॅाज) यांच्याशी निगडीत असतात.
ज्या स्त्रियांना मुले नसतात त्या स्त्रियांमध्ये वरील पैकी एखादी मानसिक विकृती दिसून येते. गरोदरपणाच्या तीव्र इच्छेमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण होते. पतीचे प्रेम परत मिळविण्याची इच्छा, संततीची इच्छा ह्यातून ह्या समस्या निर्माण होतात. अशा स्त्रियांना मानसोपचार, सम्मोह्नचिकित्सा, आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभला तर फायदा होतो.
वंध्यत्व : ही अनेक स्त्रियांमधील समस्या असली तरी त्यात पुरुष व स्त्री या दोघांचा सहभाग असतो. त्यात प्रामुख्याने जगामध्ये साधारणतः चार कारणे आढळतात.
• शारीरिक व्यंग
• व्याधी (रोग)
• एखाद्या औषधाचे सतत सेवन व त्याचे दुष्परिणाम
• मद्यपान व अन्य व्यसने
ही कारणे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा आढळून येतात. त्या तपशिलात जाण्याचे हे ठिकाण नव्हे तरी ह्या बाबतीत स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला वाचकांनी घ्यावा, स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाची आयुर्वेदाने चांगली चिकित्सा होऊ शकते म्हणून आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणे उचित राहील. अशी चिकित्सा हर्मोनविरहित असते व त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

अल्झेमर्सचा आजार - आयुर्वेदाच्या चष्म्यातून

अल्झेमर्सचा आजार - आयुर्वेदाच्या चष्म्यातून
आज २१ सप्टेंबर, हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
अलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झेमर्स डिसीज नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यु झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झेमर्स डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे, आपली स्वतःची लक्षणांच्या वेळी घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यावर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झेमर्स होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.
अल्झेमर्सची कारणे काय ?
आज ह्या रोगाची वैद्यक शास्त्राला ओळख होऊन १०३ वर्षे झाली आहेत. पण ह्याचे कारण फक्त ३ शब्दांत सांगता येते ‘‘नक्की माहित नाही’’. अनेक संस्था, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या ज्ञान कौशल्याची शिकस्त करुनही आज ह्या आजारावर नक्की इलाज सापडलेला नाही ही बाब खरी आहे. मुळात कारणच माहित नाही तर उपचार करणार तरी कुठल्या आधारावर? ह्या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणांचाच आधार घ्यावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामुग्री पण विशेष उपयोगी पडत नाही. मृत्यू नंतर शवविच्छेदन करण्याची वेळ आली तरच त्याचा उलगडा होतो.
अल्झेमर्स होऊ नये म्हणून :
अल्झेमर्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्या विषयी बरेच काही वाचायला मिळते. त्यात ‘‘नियमित व्यायाम करावा, सकस – हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे – पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात, अल्झेमर्स होऊ नये म्हणून विशेष असे ह्यात काहीही नाही. नाही म्हणायला डोनपझिल आणि रिव्हास्टिगमिन नावाची दोन औषधे आहेत. शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, मळमळणे, उलटी, निद्रनाश, चित्रविचित्र स्वप्न, चक्कर, वजन घटणे, हाता-पायात गोळे, सांधेदुखी, डोकदुखी अशी अनेक लक्षणे होतात. शिवाय इतर औषधांच्या उपयुक्ततेवर विपरित परिणाम होतात. हे उपचार रोग बरा करण्यासाठी नसून फक्त तात्पुरता आराम देण्यासाठी आहेत एवढे लक्षात ठेवले पाहिजे. थोडक्यात म्हणजे अल्झेमर्स डिसीज वर हमखास उपयोग होईल असा काही इलाज आज तागायत आधुनिक वैद्यक शास्त्रात नाही. पण शास्त्रज्ञानी ह्या विषयावर जो कही अभ्यास केला आहे त्यावर आधारित काही आयुर्वेदिक तत्वांचा आणि उपचारांचाही एक वेगळी दिशा दाखवणारा एक प्रामणिक प्रयत्न आपण करू शकतो.
मेंदूचा विचार :
मेंदूची रचना किंवा घडण करण्यामध्ये ७० टक्के वाटा स्निग्ध पदार्थांचा आहे आणि ३० टक्के वाटा प्रथिनांचा आहे. म्हणजेच मेंदू हा मुख्यतः लायपोफिलिक भाग आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार चार स्निग्ध पदार्थ असतात ते म्हणजे ‘‘घृत-तैल-वसा-मज्जा’’ अर्थात – तूप, तेल, चरबी आणि मज्जा म्हणजेच मेंदू किंवा हाडांमधली चरबी त्यातल्या रासायनिक घटकांबद्दल सूक्ष्म विश्लेषण नसलं तरी त्यांच्या गुणधर्मांबद्दल सखोल माहिती उपलब्ध आहे. ह्या मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आयुर्वेदात जे उपाय सांगितले आहेत त्यांचा अभ्यास वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. तुपाबद्दल आयुर्वेदात केलेलं वर्णन असं आहे – ‘‘शस्तं धी स्मृति मेधाग्नि, बलायुः शुक्र च क्षुषाम्,’’…
म्हणजेच गायीचं तूप हे मेंदूच्या तीन क्रिया, ‘ज्ञान ग्रहण करणं, ते योग्य प्रकारे साठवून ठेवणं आणि वेळेवर स्मरण होणं ह्यासाठी श्रेष्ठ आहे. आधुनिक शास्त्रज्ञांच्या अनेक संशोधनांचा अभ्यास केल्यावर ह्या श्लोकाचा खरा अर्थ कळतो. स्निग्ध पदार्थांचा उपयोग गर्भावस्थेपासून मेंदूच्या पोषणासाठी कसा होतो ह्या विषयी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. इटलीच्या सेराफिना सल्वाति ह्या शास्त्रज्ञाने मेंदूच्या मायलिन नावाच्या महत्वाच्या आवरणाचा मुख्य घटक स्निग्ध पदार्थ असून त्याचा मेंदूच्या घडण्यामध्ये किती मोलाचा वाटा आहे ह्यावर प्रबंध प्रसिद्ध केला आहे.
नाकातून औषध देणं
‘‘नासा हि शिरसोद्वारं…’’ म्हणजे नाक हा मेंदूचा दरवाजा आहे असं छोटसं वचन आयुर्वेदात सांगितलं आहे. ह्या विषयी ‘विहाई यांग’ नावाच्या शास्त्रज्ञांनी एक प्रबंध लिहिला आहे. फ्युचर न्युरोलॉजी नामक अमेरिकन जर्नल मध्ये (२००८,३ (१) १-४) ह्या विषयी विस्ताराने वर्णन आहे. ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या अनेक विकारांसाठी उपयोगी ठरणारा मार्ग म्हणजे नाकातून औषध देणे. नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वेचेतून स्निग्ध पदार्थ जलद गतीने मेंदूकडे पोचवले जातात. तोंडावाटे घेतलेली औषधं ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या विकारात कुचकामी होतात किंवा फारच अल्पांशाने उपयोगी पडतात. त्यासाठी नाकातून औषध देणे हा सहज, सोपा आणि परिणाम करणारा मार्ग आहे. विहाई यांग यांच्या प्रबंधाचा हा सारांश आहे.
आयुर्वेदात एक – दोन ओळींच्या श्लोकांत जी माहिती दिली असते ती म्हणजे एखाद्या क्लिष्ट गणिताचं सोपं उत्तर जगात असंख्य शास्त्रज्ञ वर्षानुवर्ष अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात ते उत्तर आयुर्वेदात एक-दोन ओळींच्या श्लोकात दिलेलं असतं.
अल्झेमर्स मधे आयुर्वेद :
अल्झेमर्स डिसीज मधे मेंदूच्या पेशी क्रमाक्रमाने सुकण्याची क्रिया घडते. मेंदूच्या पेशींची रचना भरपूर स्निग्ध पदार्थांच्या उपस्थितीतून झालेली असते. त्यासाठी आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे ‘‘घृत नस्य’’ म्हणजे गायीचं तूप ४-६ थेंब नियमितपणे घालण्यामुळे अल्झेमर्स होण्याची शक्यता टाळता येऊ शकेल. इंद्रियांच्या पोषणासाठी तूप नक्कीच उपयोगी होऊ शकेल असा विश्वास आपण बाळगण्यास हरकत नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, कानात तेल घालून ऐक, तैलबुद्धी हे वाक्यप्रचार प्रचारात आले त्यामागे काहीतरी शास्त्रीय अभ्यास नक्कीच असणार. नाकातून प्रविष्ट केलेलं एक विशिष्ट फ्लूरोसंट औषध NXX-066 हे मेंदूतल्या CSF (सेरिब्रो स्पायनल फ्लुइड) मधे २ मिनिटांच्या आत शोषलं जातं असा अभ्यास स्वीडन मधील शास्त्रज्ञांनी करून त्याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. EEG म्हणजे मेंदूतील विद्युत यंत्रणेचा वेग तपासण्याची एक यंत्रणा आहे. त्यात P300 नावाची एक रेषा (Wave) ज्ञानेंद्रियांपासुन मेंदूपर्यंत संवेदना पोचवण्याची गती मोजण्यासाठी अभ्यासली जाते. स्निग्ध आहार दिल्या नंतर ही गती कशी वाढते ह्या विषयी शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.ओमेगा ३ जातीच्या स्निग्ध आहारामुळे ही गती वाढते असं सिद्ध झालं आहे. ओमेगा ३ हे माशापासून काढलेले तेल आहे. अमेरिकेत दुधापासून लोणी काढणं त्यातून तूप तयार करणं ही गोष्ट माहिती नसल्यामुळे कादाचित त्या शास्त्रज्ञांनी ओमेगा ३ चा वापर केला असावा. भारतात साजुक तूप तयार करण्याची कला अवगत आहे त्यामुळे माशा पासून काढलेल्या तेलाची आवश्यकता नाही. आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी कमी होत चालला आहे हे पण अल्झेमर वाढण्याचं कारण असू शकतं. आयोवा युनिव्हर्सिटी मधे स्टॅटिन्स वर एक संशोधन प्रसिद्ध झालेले नुकतेच वाचण्यात आले. हजारो केसेस मधे अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, स्टॅटिन्स (रक्तातील चरबी कमी करणारे औषध) मुळे अल्झेमर्सची शक्यता खूप प्रमाणात वाढते. कोलेस्टेरॉल हा यकृतात तयार होणारा घटक मेंदूच्या पोषणासाठी फार महत्वाचा आहे. त्याला प्रतिबंध केल्यामुळे मेंदू शुष्क होऊन त्याची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होत जाते.
तोंडावाटे औषध घेणं?
अल्झेमर्स विकारात तोंडावाटे औषध घेऊन कितपत फायदा होईल ही शंकाच आहे. ब्राम्ही, शंखपुष्पी, वेखंड, तुळस, केशर अशा अनेक गुणी वनस्पती उपयोगी पडू शकतील पण त्या नाकाच्या मार्गाने दिल्या तर त्यांचा परिणाम नेमक्या ठिकाणी, लवकर आणि अचूक होऊ शकेल. अशा वनस्पतींनी सिद्ध केलेलं गायीचं तूप ४-६ थेंब रोज नाकात सोडावं. वयाची पन्नाशी उलटली की ही एक सवयच लावून घ्यायला हवी. ‘‘काही फायदा झाला नाही तरी अपाय तर नक्कीच होणार नाही’’ आयुर्वेदावर नितांत श्रद्धा असणार्यांना ह्या वाक्याचा खूप राग येतो. पण अल्झेमर विकाराच्या यातना बघितल्या की, खरेच हे वाक्य आवर्जून म्हणावसं वाटते. कारण रोगाची सुरूवात मेंदूच्या पेशींमधे सुरू झाल्यानंतर १० ते १५ वर्षांनी अल्झेमरची लक्षणं दिसायला सुरूवात होते. तेव्हा उपचार करण्याची वेळ केव्हाच टळून गेलेली असते.
डॉ. संतोष जळूकर
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

मधुमेह – आयुर्वेदाच्या चष्म्यातून.......

मधुमेह – आयुर्वेदाच्या चष्म्यातून.........
“मधुमेह किंवा डायबिटीस" अगदी शाळकरी मुलांनाही परिचित असे हे शब्द. ह्याविषयी शास्त्रीय आणि किचकट भाषेत अनेक लेख किंवा पुस्तके आपल्याला वाचायला मिळतात. मात्र साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत मधुमेहविषयक महत्वाची माहिती ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
मधुमेह म्हणजे काय ? तो कसा होतो ?
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते.
मधुमेहाची कारणे ?
आस्यासुखं स्वप्नसुखं दधीनि ग्राम्यौदकानूपरसा: पयांसि l नवान्नपान्नं गुडवैकृतं च प्रमेहहेतु: कफकृच्च सर्वम् l l . . . . भावप्रकाश प्रमेहपिडिकाऽधिकारः ३८ / १
भरपूर आराम, जास्त झोप, दूध – दह्याचे पदार्थ, उसाचे पदार्थ, पाणथळ जागेतील प्राण्यांचे मांस, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे अशा कारणांमुळे मधुमेह होतो.
मधुमेह होण्यापूर्वीची लक्षणे ?
दन्तादीनां मलाढ्यत्वं प्राग्रूपं पाणिपादयोः l दाहश्चिक्कणता देहे तृट् स्वाद्वास्यं च जायते ॥ . . . . . भावप्रकाश प्रमेहपिडिकाऽधिकारः ३८ / ५
दात, टाळू, गळा, जीभ अशा ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मल उत्पन्न होतो व चिकटा आल्यासारखी जाणिव होते. दात पिवळसर होतात. हातापायाच्या तळव्यांना आग होणे, टोचल्याप्रमाणे वेदना होणे इ. लक्षणे जाणवतात. मेदोदोषांमुळे अधिक प्रमाणात मलोत्पत्ती होते. श्वास दूर्गंधी असणे, अति तहान लागणे अशी लक्षणे मधुमेह होण्यापूर्वी दिसून येतात.
मधुमेहाची लक्षणे-
सामान्यं लक्षणं तेषां प्रभूताविलमूत्रता l l . . . . भावप्रकाश प्रमेहपिडिकाऽधिकारः ३८ / ६
वारंवार लघवीची भावना, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, मूत्रमार्गाची जळजळ, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. लघवीला मुंग्या लागल्या तर मधुमेह बळावला असे वृद्ध वैद्यांनी सांगितल्याचे येथे स्मरते.
मधुमेहाचे प्रकार-
सहजमधुमेह किंवा इन्शुलिन डिपेंडण्ट डायबिटीस (टाईप १ / “आय डी डी”):
हा मधुमेह बहुतेकवेळा जन्मतः असतो किंवा अगदी लहान वयातच होतो. आई वडिलांकडून, बीजदोषामुळे हा पुढच्या पिढीत येतो. तुलनेने हा अधिक त्रासदायक असतो, ह्याची चिकित्साही कटकटीची असते. ह्यामध्ये रुग्ण अधिकतर इन्शुलिनवरच अवलंबून असतो. आई वडिलांपैकी कोणाला मधुमेह असेल तर बहुतांशी पुढच्या पिढीतही तो उद्भवतो. पण चिकित्सा, आहार, विहार, व्यायाम ह्यांची सुनियोजित सांगड घातली तर अगदी ऐन विशीत होणार असेल तर तो दहा बारा वर्षे तरी नक्कीच पुढे ढकलता येईल.
कर्मज मधुमेह किंवा नॉन इन्शुलिन डिपेंडण्ट डायबिटीस (टाईप २ / “एन आय डी डी”) :
हा मधुमेह सामान्यतः वयाच्या तिशी – पस्तीशी दरम्यान किंवा नंतरही होतो. चुकीचा आहार आणि जीवनपद्धती हे ह्या विकाराचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. औषध सेवनाने हा प्रकार नियंत्रणात राहू शकतो. मात्र योग्य चिकित्सा न केल्यास किंवा इतर पथ्यपाणी न सांभाळल्यास शेवटी इन्शुलिनवर अवलंबित गंभीर अशा टाईप १ प्रकारात जाऊ शकतो.
गर्भावस्थाजन्य मधुमेह :
गर्भावस्थेत अन्तःस्रावी (हॉर्मोन्स) ग्रंथींचे संतुलन कमीअधिक होत असल्याने त्याचा परिणाम इन्शुलिनवर होतो. परिणामी अस्थायी स्वरूपाचा मधुमेह गर्भावस्थेत होण्याची शक्यता असते. सुमारे तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात ह्याची शक्यता सर्वात अधिक असते.
शस्त्रकर्माच्या (ऑपरेशन) वेळी रक्तातील साखर नियंत्रणात असणे अत्यावश्यक असते. शिवाय तोंडावाटे काही औषध देता येत नसेल त्यावेळी इन्शुलिनला पर्याय नसतो. अशावेळी रुग्णाची रक्तातील साखर तपासून इन्शुलिनची मात्रा नक्की करतात. तसेच शस्त्रकर्माच्या वेळी अनेक औषधी दिल्या जातात, त्यांचा परिणाम म्हणून रक्तशर्करा पातळी कमीअधिक होऊ शकते. शस्त्रकर्मानंतर सर्व स्थिरस्थावर झाल्यावर इन्शुलिन बंद करून पुन्हा नेहमीच्या औषधांची सुरुवात करता येते.
मधुमेहाचे उपद्रव -
ह्यामध्ये हृद्रोग, मज्जायंत्रणेचे (सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिम) विकार, वृक्क (किडनी) विकार, डोळ्यांचे विकार, पायांचे विकार, कानाचे दोष, त्वचारोग, स्मृतिभ्रंश हे प्रमुख आजार संभवतात. मधुमेहात रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स सारखी चरबी वाढते. शिवाय काठिण्य (अथेरोस्क्लेरोसिस) होऊन रक्तवहन होण्यात अडथळे निर्माण होतात. शरीरातील सर्वच महत्वाच्या अवयवांना प्राणवायूची आवश्यकता असते जी रक्तामार्फत पुरी केली जाते. ह्या अडथळ्यांमुळे प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन महत्वाच्या यंत्रणेतील पेशी मृत होऊ लागतात. अशा प्रकारे मधुमेहाचे उपद्रव निर्माण होतात. त्यामुळे केवळ रक्तातील शर्करा नियंत्रण करून मधुमेहाची चिकित्सा पूर्ण होत नाही. तर शरीरातील ह्या प्रमुख अवयवांवर होणाऱ्या आघातांपासून संरक्षण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ का म्हणतात हे आता आपल्या लक्षात आले असेल.
मधुमेहात पथ्यापथ्य –
भरपूर आराम, जास्त झोप, दुग्धजन्य पदार्थांचे अति सेवन, गोड पदार्थ, मांसाहार, नवीन धान्य आणि कफ वाढवणाऱ्या इतर क्रिया वारंवार करणे ही मधुमेहाची कारणे आपण वर पाहिली. कोणत्याही रोगाची चिकित्सा करण्याचा कानमंत्र म्हणजे “रोग होण्याची कारणे टाळणे”.
आराम : मधुमेहींनी “आराम आहे हराम” ही म्हण नेहमी लक्षात ठेवावी. विशेषतः आनुवंशिक मधुमेह होण्याची ज्यांना शक्यता आहे त्यांनी तर ह्या म्हणीला प्राणापलीकडे लक्षात ठेवले पाहिजे. नित्य व्यायामाने शरीरात उर्जा किंवा उष्णता निर्माण होते परिणामी शरीरातील चरबी घटते. व्यायामाने रक्तसंवहन सुधारते व महत्वाच्या अवयवांना अखंडित रक्तपुरवठा मिळण्यास मदत होते. अतिरिक्त चरबी मधुमेहासाठी अत्यंत घातक आहे हे विसरून चालणार नाही. अव्यायाम हा देखील शरीरात जडपणा निर्माण करतो, पर्यायाने ह्यानेही कफ वाढतो.
झोप : लवकर निजे लवकर उठे l त्यासी आयुसंपदा लाभे आरोग्य ll ह्या म्हणीचे शब्दशः पालन केल्यास लाभही तसेच होतात. कोंबडा आरवणे, पक्षांचा किलबिलाट, गायी म्हशींचे हंबरणे हे ब्राह्म मुहूर्तावर म्हणजेच भल्या पहाटे सुरु होते. सूर्य मावळल्यावर मात्र सर्व काही शांत, हे आहे निसर्गचक्र. अशा निसर्ग चक्राचे पालन करणे मधुमेहासाठी नक्कीच हितावह आहे.
आपल्या पूर्वजांनी सूचक शब्दातून मुलभूत सिद्धांत मांडले आहेत. ‘साखरझोप’ हा त्यातीलच एक प्रचलित शब्द. ब्राह्म मुहूर्तानंतर झोपून राहणे म्हणजे ‘साखरझोप’. एका संशोधनात सुमारे दोन हजार व्यक्तींची रक्तशर्करा साखरझोपेपूर्वी उठवून तपासली. ठराविक दिवसांनी ही तपासणी साखरझोपेनंतर केली. ह्या दोन्ही तपासण्यांमध्ये जवळजवळ २० अंशांची वाढ झालेली आढळली. साखरझोपेमुळे रक्तातली साखरेची पातळी खरोखरच वाढते हा ह्या संशोधनाचा निष्कर्ष.
दूध-दह्याचे पदार्थ : क्षीराद, क्षीरान्नाद, अन्नाद असे मानवी वयाचे तीन गट आयुर्वेदात सांगितले आहेत. ‘क्षीराद’ म्हणजे फक्त दूध पिण्याचे वय. जन्मापासून उष्टावणाच्या वयापर्यंतचे हे वय. ह्या वयानंतर दुधाचे दात पडेपर्यंत ‘क्षीरान्नाद’ काळ. म्हणजेच दूध व अन्न दोन्हीही सेवन करण्याचा काळ. त्यानंतर ‘अन्नाद’ काळ सुरु होतो. म्हणजेच “आता दूध बंद, फक्त अन्न सेवन”.
गायी म्हशीदेखील वासराला एका विशिष्ट वयापर्यंत दूध पाजतात, त्यानंतर मात्र त्याला लाथ मारून हाकलतात. निसर्गाची नियमावली माणसापेक्षा प्राण्यांना जास्त चांगली समजते. ह्या विषयात एकंदर लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, दुधाचे दात पडून पक्के दात आले की दूध किंवा दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत.
आजकाल मिळणारे जर्सी गायीचे दूध तर ‘ए१’ प्रकारचे. ‘ए१’ चा अर्थ सर्वोत्तम असा नसून हे दूध युरोपात पिण्यास अयोग्य असल्याचे समजते.
हितं अत्यग्नि अनिद्रेभ्यो गरीयो माहिषं हिमम् . . . . अष्टांगहृदय, सूत्रस्थान ५/ २३
ज्यांना अति भूक लागते त्यांनी किंवा झोप येत नसेल त्यांनीच फक्त म्हशीचे दूध प्यावे. म्हणजे दुधाने भूक मंदावते आणि झोपही अधिक येते. मधुमेह रुग्णांसाठी ह्या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. म्हणून दूध व दुधाचे पदार्थ मधुमेहासाठी हितकर नाहीत हे लक्षात ठेवावे.
गोड पदार्थ : मधुमेह म्हटला की गोड पदार्थ टाळावेत हे सांगण्याची गरजच नाही. निसर्गाने गोडाबरोबर बहुतेकवेळा तुरट चव जोडून दिली आहे. आंब्याच्या सालीचा तुरटपणा हा त्यातील गोडाचे संतुलन राखण्यासाठी दिला आहे. पशुपक्षी अशी फळे सालीसकट खातात तर मनुष्य त्यातील फक्त गोड भागच घेतो, त्याला संतुलित करणारा तुरटपणा फेकून देतो. शक्य असेल तेथे गोडाबरोबर तुरट रस घ्यावा हा गर्भितार्थ लक्षात घ्यावा. श्रीखंड, बासुंदी सारख्या गोड पदार्थांबरोबर केशर, जायफळ, वेलची घालण्याचे हेच प्रयोजन असावे.
मांसाहार : निसर्गाने मानवी शरीराची जडणघडण फक्त शाकाहार सेवनासाठीच केली आहे. त्यातूनही ज्यांना मांसाहार आवडत असेल त्यांनी तो अतिशय मर्यादित प्रमाणात घ्यावा. मात्र त्यासोबत पालेभाज्या घेणे आवश्यक आहे. मांसाहारात फायबर्स नसतात त्यामुळे हा आहार सुद्धा कफ वाढवण्यास कारणीभूत होतो.
नवीन धान्य : नव्या धान्यात ओलावा अधिक असतो त्यामुळे ते पचायला जड व अभिष्यंदी असते. तेच एक वर्ष जुने झाले की त्यातील ओलावा कमी होतो व पचायला हलके होते. असे जुने धान्य उपलब्ध नसल्यास दुष्परिणाम टाळण्यासाठी ते भाजून मगच आहारात वापरावे. भाजणीसाठी ज्याप्रमाणे धान्य भाजून घेतात त्याचप्रमाणे नव्या धान्याचा वापर मधुमेहींनी करावा.
उसळींच्या किंवा इतर कोणत्याही स्वरूपात मोड आलेल्या कडधान्यांचा वापर मधुमेहींनी टाळावा.
धान्य भिजत ठेवल्याने त्यातील ओलावा व गोडवा वाढतो. मोड आलेली मेथी चवीला गोड लागते म्हणजेच त्यात कफ निर्माण करण्याची प्रक्रिया बळावते.
कफवर्धक गोष्टी : गोडाने कफ वाढतो. थंड पाणी, शीतपेय, केळी, आईसक्रीम, मैद्याचे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ कफ व पर्यायाने मधुमेह वाढवणारे असतात. त्यांच्यापासून चार हात लांब राहणे योग्य समजावे. आहारात मैद्याच्या पदार्थांचे वारेमाप सेवन हे मधुमेहाचे एक ठोस कारण म्हणून सिद्ध झाले आहे.
गव्हातील कोंडा किंवा फायबर्स काढून मैदा तयार केला जातो. फायबर्समुळे अन्नघटकात ‘लेखन’ गुण जोपासला जातो. त्यामुळे चिकटपणा खरवडून काढण्यात हे फायबर्स उपयोगी ठरतात. मैदा निर्माण प्रक्रियेत ग्लूटीन नावाचे एक चिकट स्वरूपाचे प्रथिन तयार होते. ह्या ग्लूटीनमुळे संपूर्ण पचन यंत्रणेत चिकट लेप तयार होतो. चिकटपणा हा कफाचा गुण आह. ह्या लेपामुळे अन्न शोषणात अडथळा निर्माण होतो आणि पाचकस्रावांचा अवरोध होतो.
मधुमेहाची परिपूर्ण चिकित्सा –
मधुमेह आणि त्याच्या उपद्रवांपासून मुक्तीसाठी ‘मधुमुक्ता’ (लिक्विड व टॅबलेट)
मधुमुक्ता (लिक्विड व टॅबलेट) मुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण उत्तम प्रकारे होतेच शिवाय मधुमेहाच्या उपद्रवांवर एक अभेद्य संरक्षक कवच निर्माण होते. ह्यातील प्रत्येक वनस्पतीच्या गुणधर्मांचा आढावा घेतल्यावर ही गोष्ट नक्कीच स्पष्ट होईल.
मधुमुक्ता (लिक्विड) : घटक द्रव्ये
गुळवेल : गुळवेल ह्या वनस्पतीच्या नावात जरी गूळ असला तरी मधुमेहात ही वनस्पती म्हणजे हुकमी एक्काच आहे. रक्तातील साखरेचे नियंत्रण करणाऱ्या कितीतरी वनस्पती आहेत, परंतु स्वादुपिंडाचे कार्य पूर्ववत करणाऱ्या वनस्पती अगदी मोजक्याच आहेत. गुळवेल ही त्यात अग्रक्रमावर आहे. मधुमेहात होणारा दृष्टिदोष (रेटिनोपॅथी), मज्जातंतूंचे विकार (न्युरोपॅथीज), आमाशयक्षोभ (गॅस्ट्रोपॅथी), वृक्कदोष (नेफ्रोपॅथी), पायांच्या जखमा (डायबेटिक फूट), मेंदुविकार, यकृतविकार, हृदयविकार, रक्तातील चरबी, मधुमेहजन्य शुक्रदौर्बल्य, अस्थिक्षय (ऑस्टिओपोरोसिस) अशा सर्वच उपद्रवांवर गुळवेल उत्तम कार्य करते.
गुळवेलीच्या गुणवत्तेची परिसीमा म्हणजे गर्भावस्थेत होणारा मधुमेह व त्याचे गर्भावर होणारे दुष्परिणाम ह्याने थांबवता येतात. स्वादुपिंडात बीटा जातीच्या कोशिकांमधून इन्शुलिन तयार होत असते. ह्या बीटा कोशिकांना मारक पेशी शरीरात वाढल्यावर इन्शुलिनची कमतरता झपाट्याने होऊ लागते. गुळवेलीतील विशेष घटक ह्या पेशींना प्रतिरोध करून इन्शुलिन स्रावांना प्रेरणा देतो.
मेषशृंगी : गुडमार हे वनस्पतीचे दुसरे नाव. मधुर अर्थाने गुड हा शब्दप्रयोग केला आहे. अर्थात, मधुरनाशक म्हणून ह्या वनस्पतीला ‘गुडमार’ म्हटले आहे. मधुमेहात ह्या वनस्पतीचे कार्य निरनिराळ्या पद्धतीने होते. १) हिच्या सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते २) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते ३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते ४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो. ह्याशिवाय मेदनाशक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.), जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच.
निंब : निंब म्हणजेच कडुलिंब. निंब सेवनाने इन्शुलिनची गरज ६० ते ७०% नी कमी होत असल्यामुळे इन्शुलिनवर अवलंबून असणाऱ्यांना ह्याचा विशेष उपयोग होतो. मधुमेहात रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य निर्माण होते. त्यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा खंडित होतो. ही विकृती वाढत गेली तर गॅंग्रीन होऊन अवयव कापण्याची वेळ येऊ शकते. रक्तसंवहन सुरळीत करण्याची विशेष किमया ह्या वनस्पतीत असल्यामुळे हा धोका टळतो. मधुमेहात अनेक त्वचाविकार होतात. त्वचारोगात ही वनस्पती किती उपयोगी आहे हे किमान भारतात तरी कोणाला सांगण्याची गरज नाही.
सप्तरंगी : इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरातील पेशींवर इन्शुलिनचा परिणाम न होणे. अशा परिस्थितीत रक्तातील साखर वाढतच राहते. सप्तरंगीच्या सेवनाने हा रेझिस्टन्स नियंत्रणात राहतो व रक्तातील साखरेचे शोषण शारीरिक धातूंमध्ये होऊन तिचे रक्तातील प्रमाण कमी होते. रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे काही पेशीविघातक घटक (फ्री रॅडिकल्स) उत्पन्न होतात व त्यांचाच दुष्परिणाम लिव्हर, किडनी, रेटिना अशा यंत्रणांवर होतो. सप्तरंगीमध्ये असलेल्या पेशीरक्षक गुणांमुळे ह्या दुष्परिणामांपासून बचाव होतो.
आमलकी : आमलकी म्हणजे आवळा. व्हिटामिन सी चा नैसर्गिक स्रोत असलेले हे फळ आहे. ह्याने शरीराची रोगप्रतिकारक्षमता अत्युत्तम राहते. मधुमेही रुग्णांना आमलकी नियमितपणे दिल्याने त्यांची जेवणाअगोदरची व नंतरची रक्तातील साखर आणि रक्तकणांशी संलग्न साखर (ग्लायाकोसायलेटेड हिमोग्लोबिन) उत्तमप्रकारे नियंत्रणात राहते. ह्याशिवाय रक्तातील चरबीचे (कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स इ.) प्रमाण देखील चोख राहते.
बिल्वपत्र : मज्जातंतुंच्या विकारामुळे (न्युरोपॅथीज) शरीरातल्या विविध भागात असह्य वेदना निर्माण होतात. बिल्वपत्राचा विशेष उपयोग ह्या ठिकाणी होतो. मधुमेहाच्या नियंत्रणाबरोबरच विशेष करून वृक्क (किडनी) संरक्षण आणि दृष्टिदोष (कॅटरॅक्ट) वर ह्याचा हुकमी उपयोग होतो.
हरिद्रा : हरिद्रा म्हणजे हळद. कॅन्सर, सूज, पेशीरक्षण, रक्तवाहिन्यांमधील अडथळे (थ्रोम्बस), रक्तवाहिनी काठिण्य (अथेरोस्क्लेरोसिस), हृद्रोग, नाडीसंरक्षण (न्युरोप्रोटेक्शन), स्मरणशक्ती, कंपवात (पर्किन्सन्स डिसीज), संधिवात, जंतुसंसर्ग, वयस्थापन, सोरियासिस आणि अपस्मार (फिट्स येणे) अशा अनेक विषयांवर प्रदीर्घ संशोधन होऊन हळदीची गुणवत्ता वाखाणली गेली आहे. मधुमेही स्त्रीला गर्भधारणा झाली तर गर्भाच्या मेंदूचे कवच सांधणाऱ्या यंत्रणेचे (न्यूरल ट्यूब) विकार होण्याची दाट शक्यता असते. हळदीच्या सेवनाने हे कवच सांधण्याची क्रिया चोख होते.
जांभुळबीज : मधुमेहासाठी एक उत्तम फळ म्हणून जांभळाची ओळख आहे. वास्तविक जांभळाचे फक्त बी मधुमेहासाठी उपयुक्त आहे. जांभळाचा रस रक्तातील साखर वाढवतो. त्यामुळे मधुमेहींनी जांभळाचा रस उपयुक्त समजून सेवन करणे हमखास धोकादायक ठरू शकते.
जांभळाच्या बियांचा मधुमेहासाठी उपयोग प्राचीन काळापासून अवगत आहे. इन्शुलिनचा शोध लागण्यापूर्वीच मानवाला हा शोध लागला होता. जांभुळबीज सेवनाने रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण तीन पटीने वाढते व रक्तातील चरबी नियंत्रणात राहते.
कारले : कारल्याने स्वादुपिंडातील इन्शुलिन निर्माण करणाऱ्या पेशींना चालना मिळते, आतड्यातून साखरेचे शोषण कमी होऊन पेशींमध्ये शोषण वाढते. अशा तीन प्रकारे मधुमेह नियंत्रणाचे काम कारल्याने होते.
चिरायता : रुग्ण मधुमेही असो किंवा नसो, रक्तातील साखरेची पातळी ७० मिलीग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा खालावली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. मधुमेहासाठी चिकित्सा घेत असतांना हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते. अशावेळी बौद्धिक संभ्रम, चक्कर, अंगाचा थरकाप, भूक, डोकेदुखी, चिडचीड, नाडी मंद होणे, हृदयाची धडधड, त्वचा पांढरीफटक पडणे, दरदरून घाम सुटणे, थकवा अशी लक्षणे उत्पन्न होतत. चिरायता वनस्पतीतील विलक्षण खुबीमुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते पण आवश्यक पातळीपेक्षा खाली जात नाही.
कुलिंजन : मधुमेह नियमन करण्याचे उत्तम कार्य ह्याने होतेच शिवाय वृक्कांवर (किडनी) होणारा मधुमेहाचा दुष्परिणाम रोखण्याचे आणि रक्तातील चरबी (कोलेस्टेरॉल इ.) नियंत्रण करण्याचे विशेष सामर्थ्य ह्या वनस्पतीत आहे.
त्रिवृत : मधुमेहात हातापायांची आग होणे, अपचन, बद्धकोष्ठ, तहानेने घसा कोरडा पडणे अशी लक्षणे होतात. ह्या लक्षणांवर उपयोगी असलेली ही गुणकारी वनस्पती आहे.
विजयसार : ह्यामुळे रक्तातील वाढलेली साखर मांसपेशीत शोषली गेल्याने मधुमेहाचा त्रास होत नाही. शक्ती टिकून राहते, थकवा येत नाही, मरगळही नाहीशी होऊन उत्साह वाढतो. त्याचबरोबर रक्तातील चरबी घटते, इन्शुलिनची पातळी वाढते आणि मधुमेहाला चांगलाच चाप बसतो.
यष्टिमधु : हजारो वनस्पतींपैकी अगदी मोजक्याच वनस्पती चवीला “गोड” आहेत. त्यापैकी एक आहे यष्टिमधु. सामान्यतः गोड वनस्पती मधुमेहात कशी उपयोगी पडेल अशी शंका अगदी स्वाभाविक आहे. यष्टिमधुमध्ये अमोरफ्रूटिन नावाचा घटक असतो. इन्शुलिनची क्रिया पिपरी (PPARγ) नामक नाडिकेंद्रावर (रिसेप्टर्स) होते, त्याच पेशींवर ह्या अमोरफ्रूटिनचा प्रभाव पडतो. ह्या पेशी मेद आणि साखरेचे नियोजन करतात. अमोरफ्रूटिनच्या प्रभावामुळे इन्शुलिनचा प्रतिरोध (इन्शुलिन रेझिस्टन्स) कमी होतो व अशा प्रकारे कार्य करून ही वनस्पती मधुमेहात उपयोगी पडते.
मधुमुक्ता (टॅबलेट)-
दारुहरिद्रा, देवदार, नागरमोथा, त्रिफळा ह्या चार विशेष घटकांची जोड गुळवेल, जांभुळ बीज, कारले ह्यांना देऊन मधुमुक्ता (टॅबलेट) ची निर्मिती केली आहे. द्रव्यांचे विशिष्ट गुणधर्म व आयुर्वेदीय औषधी निर्माण सिद्धांत तसेच भावना व मर्दन ह्या संस्कारांमुळे होणारे गुणवर्धन अशा विविध बाबींचा विचार ह्या निर्मितीमागे आहे.
टॅबलेटमधील घटक भिन्न आहेत, त्यांची कार्मुकता देखील भिन्न आहे. ह्यातील वनस्पतींमध्ये उडनशील तेलांचा अंश आहे. लिक्विड निर्मितीच्या प्रक्रियेतील उष्णतेमुळे ह्या तेलांची वाफ होऊन त्यातील कार्यकारी घटक नाहीसे होऊ शकतात म्हणून ह्या वनस्पतींना टॅबलेटच्या रूपात सादर केले आहे.
मधुमेह रुग्णांनी लिक्विड व टॅबलेट ह्यांचे सेवन एकत्रितपणे करावयाचे आहे. लिक्विड व टॅबलेट एकमेकांना पर्याय नाहीत. टॅबलेटमधील विशेष घटकांची कार्मुकता पुढील प्रमाणे.
दारुहरिद्रा : रक्तशर्करा नियमन करून रक्तातील चरबीचे संतुलन हिने राखले जाते. एल. डी. एल. आणि एच. डी. एल. अशा दोन प्रकारच्या चरबी रक्तात असतात. हृदयरोगाच्या दृष्टीने एल. डी. एल. (लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स किंवा बॅड कोलेस्टेरॉल) चे प्रमाण १०० मिलीग्राम / डेसिलिटर पेक्षा कमी असावे लागते. ह्यासाठी अनेक वनस्पती उपयोगी असलेल्याचे दिसून येते. एच. डी. एल. म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स किंवा गुड कोलेस्टेरॉल. ह्यांची पातळी ६० मिलीग्राम / डेसिलिटर पेक्षा अधिक असावी. ही पातळी वाढवणारी औषधी द्रव्ये मात्र मोजकीच आहेत. दारुहरिद्रा सेवनाने हे प्रमाण सुयोग्य पातळी इतके वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
देवदार : सामान्यतः यकृतविकाराचा संबंध मद्यपानाशी जोडला जातो. परंतु मधुमेहाशी देखील यकृतविकारांचा घनिष्ट संबंध आहे. मद्यपान न करता देखील मधुमेहींना फॅटीलिव्हर नावाचा विकार होण्याची शक्यता अधिक असते. देवदाराने फॅटीलिव्हर विकारावर चांगलाच लगाम बसतो. एस.जी.ओ.टी., एस.जी.पी.टी., कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स अशा यकृतरोग सूचक घटकांचे संतुलन ह्याने राखले जाते. शिवाय ह्यातील बहुमोली पेशीरक्षकांमुळे शरीराची एकंदर रोगप्रतिकारक्षमता खणखणीत राहते.
नागरमोथा : ह्या द्रव्याची कार्मुकता निराळीच आहे. ह्याच्या सेवनाने आहारातील साखरेचे रक्तात शोषण अतिशय मंदगतीने होते. अल्फा ग्लूकोसायडेज इन्हिबिटर व अल्फा अमायलेझ इन्हिबिटर अशा दोन प्रक्रियांमुळे हे कार्य साध्य होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील शर्करा वाढण्याच्या अवस्थेत नागरमोथ्याचे विशेष कार्य घडते. ह्या क्रियेत आहारातील कर्बोदके इन्शुलिनला अधिक काळ प्रेरणा देऊ शकतात. हातापायांची जळजळ, जखमा भरून काढणे, अपचन, मेदोरोग, विविध जन्तुंपासून संरक्षण करण्याची आगळीच किमया ह्या वनस्पतीत आहे.
त्रिफळा : मधुमेहातील रक्तशर्करा नियंत्रणाखेरीज अनेक गुण ह्या सम्मिश्रणात दडलेले आहेत. उत्तम पेशीरक्षक (अॅंटिऑक्सिडंट), सूज कमी करणे, ज्वरनाशक, वेदनाशामक, जंतुसंसर्गनाशक, जनुकदोषनिवारक, जखमा भरून काढणे, कॅन्सर प्रतिरोधक, मानसिक क्लेशनिवारक, वयस्थापन, किरणोत्सर्जनाचे दुष्परिणाम रोखणे अशा अनेक गुणांनी त्रिफळा समृद्ध आहे. बद्धकोष्ठ, भूक मंदावणे आणि अम्लपित्त ह्या विकारांवर तर हे सुप्रसिद्ध आहेच.
मधुमुक्ता कोणी घ्यावे?
• मधुमेहग्रस्त रुग्णांनी
• ज्यांच्या घराण्यात मधुमेह आहे त्यांनी, संरक्षणार्थ
• ज्यांना मधुमेह होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत
• गर्भावस्थेत मधुमेह झाल्यास
• इन्शुलिनवर विसंबूनअसलेल्यांनी इन्शुलिन मात्रा कमी करण्यासाठी
• मेदरोगाने त्रस्त असलेल्यांनी सहाय्यक म्हणून
• रक्तातील चरबी कमी करण्यास सहाय्यक म्हणून
सेवन विधी :
मधुमुक्ता लिक्विड १५ – १५ मिली सोबत २ – २ मधुमुक्ता टॅबलेट दिवसातून २ वेळा, रिकाम्यापोटी. एक दिवस.

Manoj Anant Joshi(मनोज अनंत जोशी)

Visit Our Page