Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, December 24, 2010

पत्रिकेतील मंगळाचा बागुलबुवा

विवाह ठरविताना मुलाला किवा मुलीला मंगळ आहे या कारणाने अनेक विवाह ठरण्यापूर्वीच मोडतात. काही ज्योतिषी सुद्धा मंगळाचा खूप बागुलबुवा करताना दिसतात. त्यात  नक्की कितपत तथ्य आहे याच्यावर थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न या नोटच्या स्वरूपात केला आहे.
आपल्या पत्रिकेत १,४,७,८ आणि १२ या पैकी कोणत्याही स्थानी मंगळ असेल तर ती पत्रिका “मंगळाची” आहे असे म्हणायची पद्धत आहे. जर हा विचार गृहीत धरला तर साधारण ४० टक्के पत्रिका या मंगळाच्या ठरतील. या प्रकारे वधू अथवा वर दोघांपैकी एकाची पत्रिका ”मंगळाची” असण्याची  शक्यता जास्त येते.
या पैकी प्रथम स्वतचे स्थान, चतुर्थ स्थान हे गृह सौख्याचे स्थान आणि सप्तम स्थान हे आपल्या जीवन साथीदाराचे स्थान आहे. आठवे आणि बारावे स्थान सर्व साधारणपणे अशुभ स्थाने समजली जातात. मंगळ हा अग्नी तत्वाचा,  तमो गुणी, तामसी वृत्तीचा ग्रह असल्यामुळे विवाहप्रसंगी गुणमेलन करताना या पाच स्थानात असेल तर अशुभ समजला जातो.असे असले तरी हा फारच सर्वसाधारण मियम झाला. अशा मंगळाचा गरजेपेक्षा जास्त बागुलबुवा केला जातो आणि काही तरी तारक मारक उपाय सुचविण्याकडे आणि पैसे काढण्याकडे काही ज्योतिषांचा कल असतो. अज्ञान आणि अंधश्रद्धा या कारणासाठी असे काहीतरी उपाय स्वीकारले सुद्धा जातात.  
असे असले तरीसुद्धा प्रत्येक पत्रिकेला तो तशी अशुभ फळे देईलच असे नाही. मी स्वत अशा प्रकारचा विचार करणे हा अंधश्रद्धेचा भाग आहे असे मानतो. माझ्या अभ्यासानुसार मी “मंगळ दोष” या विषयाकडे वेगळ्या प्रकारे पाहतो.
मंगळाचे शुभ अशुभत्व प्रत्येक लग्न राशीला वेगवेगळे असते. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह आहेत. काही ठराविक लग्न राशींना अशा प्रकारचा मंगळ अशुभ होण्याची शक्यता आहे. जर पुढे दिल्याप्रमाणे लग्न राशी असेल ३ मिथुन, ८ वृश्चिक, १ मेष, २ वृषभ आणि ६ कन्या तर या लग्न राशीच्या पत्रीकाना एक,चार,सात,आठ आणि बारा या स्थानी येणारा मंगळ हा चढत्या कर्माने अशुभ असेल. कन्या लग्न राशीला सर्वात जास्त अशुभ येईल.
या बरोबरच प्रत्येक लग्न राशीच्या स्वामी ग्रहाचे काही ग्रह शत्रू येयात. त्या उलट लग्न राशीच्या स्वामी ग्रहाचा एखादा मित्र ग्रह सुद्धा असेल. निरनिराळ्या ग्रहांचे अशा मंगळा बरोबर जसे ग्रह योग होतील त्याप्रमाणे हे शुभ अशुभत्व कमी जास्त होईल.



VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104
9323406386
 

हरीतकी

वनस्पती नाम    :    हरीतकी
विशेष गुणः    :    पञ्चरसाsलवणा तुवरा परम्‌ | रुक्षोष्णा | स्वादुपाका | लघुः | प्रपथ्या | लेखनी | हृद्या | आयुष्या | पौष्टिकीं | धन्यां | वयसस्थापनीं* | संतर्पणकृतान्‌ रोगान्‌ प्रायो हन्ति ||

अन्न VS    :    दीपनपाचनीम्‌ | अनुलोमनी | रेचनी | कोष्ठामयघ्नी |
                      कृमीन्‌ | ग्रहणीरोग | विबन्ध | आध्मान | छर्दि | शूलम्‌ आनाहं | उदावर्तं । अतिसारम् | अरोचकम्‌ |

उदक VS    :     -

प्राण  VS    :    श्वास कास | हिक्का कण्ठ-हृदामयान्‌ | हृद्रोगं | सशिरोरोगम्‌ | वैस्वर्यं  | प्रलेपं हृदयोरसोः |

रस  VS    :    रसायनी | त्वगामयघ्नी |
                    शोथ | उदरं नवम् ‌| विषमज्वरान्‌ | कफप्रसेकं | तमकं |

रक्त VS    :    विसर्प | कामलां | प्लीहानं च यकृद्‌गदम्‌ | मदम्‌ | वातास्र |

मांस VS    :    बृंहणी
                    अर्शः | गुल्म | व्रण | अंगावसादनम्‌ |

मेद  VS    :    प्रमेह | कुष्ठ

अस्थिVS    :     -

मज्जाVS    :    चक्षुष्या | नेत्ररुजापहारिणी |

शुक्र  VS    :    क्लैब्यम्‌ |

रजः  VS    :     -

स्तन्यVS    :    -

मूत्र  VS    :    अश्मरीं मूत्रकृच्छ्रं च मूत्राघातं |

मल  VS    :    अतिसारम्‌ |

स्वेद VS    :     -

मनो  VS    :    मेध्या | बुद्धी-इंद्रिय बलप्रदम्‌ | स्मृति-बुद्धि-प्रमोहं | सेन्द्रियाणां प्रसादनी ।

ओज VS    :     आयुष्या   

वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र
यश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
VISIT OUR WEBSITE :

राहू काल म्हणजे काय ?

हु काल  म्हणजे काय? आणि तो कसा काढावा? त्या काळात महत्वाचे निर्णय टाळावेत का?असे प्रश्न अनेकाच्या मनात येत असतात. अनेक लोकांची या विषयाची उत्सुकता लक्षात घेऊन मी त्याबद्दल माहिती देत आहे.
राहू केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाहीत ते छाया ग्रह आहेत. सूर्य आणि चंद्राच्या भ्रमण कक्षेचे ते दोन छेदन बिंदू आहेत.
तरी सुद्धा याबिंदू जवळून जेव्हा एखादा ग्रह जातो किवा विशिष्ट कोन करतो त्यावेळी त्या ग्रहाच्या परिणामात अडथळे येतात. हे दोन छेदन बिंदू असल्यामुळे राहू हा शरीराचा वरचा भाग तर केतू हा शरीराचा खालचा भाग असे मानले जाते. केतुला चेहरा हा शरीराचा भाग नाही त्यामुळे ग्रह दृष्टी मध्ये केतू या ग्रहाला दृष्टी नाही, राहू काळात आपण करत असलेल्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात असा एक समज आहे पंचागात दिलेला राहुकाळ हा ज्या स्थानाचे पंचांग आहे, उदाहरणार्थ दाते पंचांग सोलापूरचे सूर्योदय/सूर्यास्त देते, त्या स्थानापुराता आहे.जर आपल्याकडे स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा नसतील तर हा राहुकाळ अंदाजे समजावा आणि त्या काळात शक्यतो एखाद्या महत्वाच्या कामाला किवा मिटींगला सुरवात करू नये.
राहुकाळ काढण्याची पद्धत खाली देत आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त मधील जे अंतर असते ते मिनिटात रुपांतरीत करावे. उदाहरणार्थ आज शुक्रवार २४ डिसेंबरला सोलापूरचे सूर्योदय सर्यास्त असे आहेत ७.१० आणि १८ .०७ असे आहेत. म्हणजे आजचे दिनमान १० तास ५७ मिनिटे आहे.त्याची ६५७ मिनिटे होतात.याला ८ ने भागाकार करावा म्हणजे साधार्ब ८२ मिनिटे येतात. कोणत्याही दिवसाचा पहिला भाग राहुकाळ नसतो.
सोमवारी २ रा भाग , मंगळवारी ७ वा भाग, बुधवारी ५ वा भाग, गुरुवारी ६ वा भाग ,शुक्रवार्री ४ था भाग ,शनिवारी ३ रा भाग आणि रविवारी ८ वा भाग घेतात.
आज शुक्रवारी ४ भाग राहुकाळ आहे म्हणजे पहिल्या तीन भागाची २४६ मिनिटे होतात जी ४तास ६ मिनिटे होतात ती आजच्या सूर्योदयाच्या वेळेत ७.१० मध्ये मिळवावी. याचा अर्थ आज ११ वाजून १६ मिनिटापासून ८२ मिनिटे म्हणजे १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहुकाळ आहे
आजचा सोलापूरचा राहुकाळ सकाळी ११ वाजून १६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटे असा येईल.
या कालखंडात महत्वाचे निर्णय घेऊ नयेत असे म्हणता येईल.
हा एक वर्षानुवर्षे चालत आलेला विचार आहे तरी सुद्धा प्रत्येकाने त्याचा स्वत अनुभव घेऊन ठरविणे इष्ट ठरेल केवळ अंधश्रद्धा म्हणून त्याच्या मागे जाऊ नये असे माझे व्यक्तिगत मत आहे.
माझे व्यक्तिगत वेगळे आहे त्याला काही कारण आहे ते पुढे देत आहे.
सर्वोतोभद्र चक्रानुसार एकूण ९ नक्षत्र विषय आहेत. त्यासाठी चंद्रापासून ९ नक्षत्र मोजण्याची एक पद्धत आहे.चंद्रापासून ३.५.७/.१२,१४,१६/,२१,२३,२५ वे नक्षत्र, हे विपत,प्रत्यरी आणि वध नक्षत्रे समजली जातात. ही ९ नक्षत्रे चढत्या कर्माने अशुभ समजली जातात. ज्यावेळी त्या दिवसाचे चंद्र नक्षत्र आणि राहूचे नक्षत्र या प्रमाणे येत असेल त्यावेळी त्या दिवसाचा राहुकाळ अशुभ होण्याची शक्यता जास्त आहे. इतर दिवशी तसेच होण्याची शक्यता कमी आहे. असे मला वाटते. त्यासाठी प्रत्येकाने स्वत अनुभव घेऊन ठरवावे असे माझे मत आहे  .


VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104

9323406386

Thursday, December 23, 2010

गतस्मृतीतिल कविता (बहिणाबाई चौधरींची )

बहिणाबाई चौधरी ह्या  प्रसिध्द मराठी कवयत्री होत्या . बहिणाबाई चौधरी ह्यांचा जन्म सन १९८० साली जळगाव जिल्ह्यातील असोदा ह्या गावी लेवा पाटील परिवारात झाला होता .त्याचा मूळ कविता ह्या सर्व 'अहिराणी' भाषेत होत्या .मानवी जीवनाची त्याची समाज हि  फार गाढ होती . बहिणाबाई ह्या लग्नानंतर  विधवा झाल्या परंतु त्या न डगमगता आत्मनिर्भर व स्वतंत्र राहिल्या .त्यांच्या काव्य ह्या मराठी साहित्य साठी अमूल्य खजाना आहे.त्यांनी आपल्या वास्तविक दैनदिन जीवनातील प्रतिबिंबाच्या  त्यांनी मराठी लेवा भाषेतील ओवीन मध्ये सुरेख रचना केलेल्या आहे .ह्या  ओवी मध्ये अविश्वनीय रुपात मानवी जीवनाचे ज्ञान त्याची प्रकुती वनस्पती ,जीव ,हिरवळ ,नदी ,विहीर ह्या जिवंत  रुपात प्रकट केलेल्या  आहे .त्याची कविता ह्या जणू काही समोर उभ्या केलेल्या चित्र सारख्याच वाटतात .बहिणाबाई ह्या महाराष्ट्र ला नैतिक रुपात मिळालेली एक भेट होती.त्यांचा मृत्यू  हा ३/१२/१९५० साली झाला.


बहिणाबाई चौधरींची कविता रसिकांपुढे जरा उशिरानेच आली. १९ व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे भा. रा. तांबेच्या समकालीन असलेल्या ह्या कवयत्रिची कविता मात्र तिच्या पश्चात प्रसिद्ध झाली. सुप्रसिद्ध कवी सोपनदेव चौधरी याच्या त्या मातोश्री. बहिणाबाई अजिबात शिकलेल्या नव्हत्या. खनदेशात शेतकरी कुटूम्बात राहाणा-या या कवयत्रीला अकाली वैधव्य आलं  पण त्या डगमगल्या नाहीत शेतात काबाडकष्ट करता करता त्या गाणी गायच्या त्या कुणी टिपून ठेवल्या., काही गेल्या. जात्यावर दळता दळता त्यांनी ज्या कविता रचल्या त्या आज उभ्या महाराष्ट्राला परिचित झाल्या आहेत. अहिराणी भाषेत असलेलं अत्यंत गोड रसाळ सुमधुर असं हे काव्य.  कोकिळेने तोंड उघडलं कि आपोआप संगित वाहु लागतं तशी बहिणाबाईंची कविता सहजपणे आपल्या मनात आणि जोभेवर नाचु लागते, असं त्यांच्या कवितेबद्द्ल आचार्य अत्र्यांनी म्हणून ठेवलं आहे.त्यांच्या कवितेला इथल्या मातीचा सुगंध आहे. शेतक-यांच्या अपेक्षांच चित्र आहे.  विधवा स्त्रीच दु:ख आहे आणि त्याच बरोबर निसर्गाच सौंदर्य आहे. डोंगराच्या कडिकपारीतून  झरा उचंबळत यावा तसे तिचे शब्द नाचत बागडत येतात. याच बरोबर अधुनिक पंडितांना आचंबित करून टाकणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांच्या कवितेतून मांडले गेले आहे. आपल्या सहज सुंदर तरिही विलक्षण प्रतिभेने सा-या महाराष्ट्राला वेड लावणा-या या कवयत्रिला सलाम !
आज बहिणाबाईंची एक कविता देत आहे


मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावरं

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वा-याने चालल्या
पान्या व-हल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरी कोन
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे विंचु साप बरा
त्याले उतारे मंत्तर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगु मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत

देवा, आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जगेपनी तुले
असं सपान पडलं....?

http://www.facebook.com/note.php?note_id=126302360766580 

Sunday, December 19, 2010

पाउस

मानवी जीवनात ताण-तणावाच्या, धकाधकीच्या दैंनदिन जीवनात बागेतील फेर-फटका, नदीकाठ, धबधबा, डोंगर माथ्यावर अस्तास जाणारा सूर्य, सूर्याभोवतीचे रंग त्याच्याच सानिध्यात अनेक आकाराचे, प्रकारांचे व विविध रंगांचे ढग, वाहणारा वारा, सायंकाळी घरटयाकडे परतणारे पक्षी, त्यांचा कलकलाट मनाला भुरळ पाडतात व पाहणारा काहीकाळ तरी दैंनदिन व्यथा विसरतो ही नित्याची व प्राय: प्रत्येकाने अनुभवलेली गोष्ट. निसर्ग सानिध्यात रममाण न होणारी व्यक्ती विरळीच.
अहो! हे निसर्ग जर इतके प्रिय, श्रमपरिहार करणारे आमचे मित्र आहेत तर हया मित्राची माहिती आम्हास आहे काय? मित्र म्हटला की त्याच्या आवडी-निवडी, स्वभाव, प्रसंगी मदत करण्याची वृत्ती, संकटांची चाहूल लागताच मित्राला सावध करण्याचा स्वभाव, संकटांची पूर्व सुचना देऊन संकटातून वाचविण्याची कृती यासर्व गोष्टींची आपणांस माहिती हवी. नसल्यास करून घेणे गरजेचे आहे.
आपले पूर्वज वेदकाळापासून अरण्यात निसर्ग सानिध्यात राहिले. निसर्गातील वारा, पाऊस, उन, थंडी, पशु-पक्षी यांचे निरीक्षण केले. हया निसर्गाची भाषा शिकली. त्यांचे संकेत जाणून स्वत:चे व समाजाचे रक्षण केले. अतिवृष्टि, अनावृष्टि, दुष्काळ, यांच्यापासून होणारे दुषपरिणाम, दु:खातून वाचविण्यासाठी निसर्गातील संहितेचा वापर केला. संहिता म्हणजे धर्माप्रमाणे आचरण व कृति. खालील निसर्ग संहितेचे मनन करता लक्षात येते की पशु, पक्षी, किडे, मुंग्या सुध्दा आपआपल्या नियत धर्माचे पालन करतांना काही विशिष्ट परिस्थितीत विपरीत वागतांना दिसतात आणि हेच त्यांच्या नित्य जीवनातील बदल माणसाला पावसाचे संकेत देतात. पाऊस जाणून घेण्यासाठी मुनिंनी ३ पध्दतींचा वापर केला पैकी २ येथे देणार आहोत. हे सकल असून अनेक ग्रंथांच्या वाचनातून संग्रहीत केले आहे. तुम्हीही जाणून घेऊन पर्जन्य तज्ञ होऊ शकता.
पाउस जाणून घेण्याच्या पद्धती
१) भौम पध्दती २) अंतरिक्ष पध्दती

१) भौम पध्दती
पुढील १ ते ७२ निरीक्षणांतून ० ते ५ दिवस आधी पावसाचे संकेत मिळतात. हया पध्दतीस 'भौम पध्दती' असे नाव पूर्वजांनी दिलेले आहे.

बृहत् संहिता सघो वृष्टि लक्षणं(अ.२८ पृष्ट १)वरुन

१) आकाशातील रंग गाईच्या डोळयासारखे किंवा कावळयाच्या अंडयाच्या रंगा सारखे दिसतील. दिशा स्वच्छ असतील तर पाऊस लवकर पडतो.
२) मासे भूमीवर येण्यासाठी उडया मारतील.
३) बेडुक वारंवार शब्द करतील (ओरडतील) तर शीघ्र वृष्टि होते.
४) मांजरे नखांनी जमीन उकरतील.
५) मार्गात (रस्त्यात) मुले पूल बांधतील.
६) कामाशिवाय मुंग्या आपली अंडी दुस-या जागी नेतील.
७) सर्प मैथून करतील, झाडावरही चढतील.
८) गाई उडया मारतील तर ते शीघ्र वृष्टिचे लक्षण होय.
९) सरडे झाडाच्या शेंडयावर जाऊन आकाशाकडे पाहातील तर शीघ्र वृष्टि होते.
१०) गायी, बैल, गोठयातून बाहेर पडत नाहीत. त्यांचे कान व पाय कंप पावतील (कापतील/थरथरतील) तर ही शीघ्र वृष्टिची लक्षणे समजावी.
११) कुत्रे रस्त्यावर उभे राहून आकाशाकडे पाहून भुंकतील, पाळलेले कुत्रे घराबाहेर जात नाही. त्यांचे कान व पाय कंप पावतील (कापतील/थरथरतील).
छतांवर चढून आकाशाकडे पाहात भुंकतील.
१२) पाण्यात आणि धुळीत पक्षी आंघोळ करतील तर लवकर पाऊस येतो.
१३) सर्प गवताच्या गंजीवर चढतील तर शीघ्र वृष्टि जाणावी.
कृषि पराशर सघो वृष्टि लक्षणम् अध्याय १३.
१४) मुंग्या जेव्हा आपली अंडी तोंडात घेऊन भिंतीवर (वर) चढतात तेंव्हा पाऊस निश्चित पडतो.
१५) बेडूक टर्र टर्र आवाज करतील तर निश्चित पाऊस पडतो. इकडे-तिकडे पळतात तेव्हा निश्चित पाऊस पडतो.
१६) मांजरी, मुंगुस, साप आणि बिळात राहणारे इतर प्राणी तसेच फुलपाखरे घाबरून इकडे तिकडे पळतात तेव्हा निश्चित पाऊस पडतो.
१७) मुले खेळतांना रस्त्यात, मार्गात मातीचा पूल बनवितात, मोर नाचतात, तेव्हा पाऊस निश्चित पडतो.
१८) दुषित वायुच्या आघाताने जेंव्हा मानवाच्या शरीराला त्रास होतो (अंग दुखू लागते)
१९) साप झाडाच्या शेंडयावर चढतील तर तात्काळ पाऊस पडतो.
२०) जलचर पक्षी जेंव्हा आपले पंख प्रकाशात सुकवतांना दिसतील, रातकिडे आकाशात आवाज करतील,
(डासांचा आवाज होईंल) तर ते पावसाचे लक्षण समजावे.
वनमाला ग्रंथाधारे (ले. जीवनाथ)
२१) सर्व दिशा आणि आकाश स्वच्छ असून - पिण्याच्या पाण्याची चव बदलेली असेल (पाणी मचूळ लागते) मिठाच्या खडयांना
(विकृती मुळे) पाणी सुटते,विरघळते. आकाश गाईच्या डोळयांच्या रंगाप्रमाणे किंवा कावळयाच्या अंडयाप्रमाणे निळसर दिसू लागेल, तर त्या दिवशी पाऊस पडतो.
२२) मासे पृथ्वीवर येण्यासाठी उडया मारतात, बेडूक आवाज करतात, बिळात राहणारे जीव बाहेर पडतात तेंव्हा पाऊस पडतो.
२३) पावसाळयाच्या दिवसात मांजरी नखांनी जमीन (भूमी) जोर - जोराने खोदतील, उकरतील तर पाऊस पडतो.
२४) मुले रस्त्यात, मार्गात गल्लीत मातीत पूल बांधतील.
२५) मुले खेळतांना ऐकमेकांवर बसून घोडेस्वाराचा खेळ खेळतील.
२६) लोखंडाच्या वस्तूंना गंज चढतो. त्या गंजाचा वास कच्च्या मांसासारखा येतो.
२७) डोगंर काळे दिसतात व डोगंराच्या घळईत धुके (बाष्पयुक्त) दिसते. असे दिसते तेव्हा पाऊस पडतो. वरील सर्व लक्षणे पाऊस पडण्याचे संकेत आहेत.
२८) मुंग्या अंडे कारणाशिवाय नेतांना दिसतील.
सर्प झाडांच्या शेंडयावर चढतील किंवा साप मैथून करतांना दिसतील तर पाऊस चांगला समाधानकारक होईल असे जाणावे.
२९) पावसाळयाच्या दिवसात जर चिमण्या धुलीस्नान करतील, मोर नाचतील, आकाशांत कोकीळ ओरडण्याचा आवाज येईल तर निश्चित पाऊस पडतो.
३०) फुलांनी बहरलेली वेल फुलांच्या वजनाने न झुकता आकाशाकडे जाते (ताठ दिसते) असे असतां सर्वत्र पाऊस सुरू होतो.
मेघमाला ईश्वर पार्वति संवाद पृ १२९
कावळयाच्या घरटयावरून वृष्टिज्ञान
३१) झाडाच्या पूर्व दिशेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर '' सुभिक्ष'' समाधानकारक, उत्तम पाऊस पडतो. धान्य उत्पत्ती चांगली होते.
३२) वृक्षाच्या अग्नेय दिशेस असणा-या फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर दुष्काळ पडतो. ढग पाऊस पाडत नाहीत.
३३) झाडाच्या दक्षिणेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर भंयकर हाहा:कार होऊन देशात विग्रह निर्माण होतो. (बंडाळी होते)
३४) नैऋत्य दिशेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असेल तर दोन महिने पाऊस पडत नाही. नंतर ओस, धुके पडते (पाला पडता है)
३५) वृक्षाच्या पश्चिमेकडील फांदीवर कावळयाचे घरटे असल्यास पाऊस पडत नाही.
३६) वायव्ये कडील फांदीवर कावळयाचे घरटे असल्यास वा-यासह पाऊस पडतो.
३७) उत्तरेकडील फांदीवर चांगले घरटे कावळयाने बनविल्यास सुभिक्ष, आरोग्य, सुखसंपदा असते.
३८) ईशान्य दिशेकडील कावळयाचे घरटे स्वाति नक्षत्राती पाऊस निर्देशीत करतो. सुख समृध्दी होते.
३९) झाडाच्या मध्यभागी जर कावळयाचे घरटे असेल तर पाऊस पडत नाही.
४०) वारूळाच्या आश्रयाने झाडाच्या बुध्यांजवळ जर कावळयाचे घरटे असेल तर महामारी सारखे साथीचे रोग, चोरांचा सुळसुळाट,
पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो.
४१) वाळलेल्या झाडावर कावळयाचे घरटे असल्यास महामारी, चोरांचे भय, राज्य विग्रह होतो.
४२) कावळयाच्या घरटयात १ अंडे असतां उत्तम पाऊस पडतो.
-२ अंडे असतां मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो.
-३ अंडे असतां क्षेम व ४ असतां व्याधि उत्पन्न होतात.
-पण हेच २-२ अंडे अलग अलग असतील तर चांगला पाऊस पडतो. एकत्रित असतां अशुभ जाणावे.
४३) चन्द्रोदयाचे वेळी कावळा मैथुन करील तर पाऊस पडेल.
ऊन्हाचे वेळी मैथुन करतील तर अग्निभय निर्माण होते.
कादम्बिनी दिव्य निमित्ताध्याय (अंतरिक्ष पध्दती) पृ. २२२
पावसा संबंधी प्रश्न कुंडली विचार -
१) पावसाळयात - जलराशीचे लग्न (४,८,१२) लग्नात वरूण नक्षत्र (जल नक्षत्र) उदीत असतांना, लग्नावर शुभ ग्रहांची दृष्टी असतां किंवा
केन्द्रातील चन्द्र, शुक्रावर शुभग्रहांची दृष्टी असतां शीघ्र वृष्टि होते.
२) प्रश्न लग्नी जल राशीत चन्द्र असेल तर खूप पाऊस पडतो. जर प्रश्न लग्नी शनि, बुध चन्द्र असतील तर गारांचा पाऊस पडतो.
जलनक्षत्रे - हस्त, चित्रा, स्वाति, मूळ, पू.षाढा श्रवण, पूर्वा भाद्र, रेवति, भरणी.
३) तिन्ही उत्तरा आणि रोहिणी - आहेत.
प्रश्न लग्नी मंगळ असतां खूप विजा चमकतात, आणि घनघोर गर्जनेसह खूप पाऊस पडतो.
४४) ग्रहयोगांसाठी ग्रहयोगाध्याय पहा संदर्भ ''ऋतुज्योतिष'' आकाशात ढग असतांना मोर आनंदाने नाचतांना दिसतील तर पाऊस लवकर पडतो.
४५) माठात ठेवलेले पाणी कोंबट होईल, सर्व वेलींची तोंडे (अंकूर) वर होतील, कुंकुमा सारखा लाल रंग दिशांना दिसेल, पक्षी आंघोळी करत असतील,
गिधाडे संध्याकाळी ओरडत असतील. सात दिवस आकाशात मेघाच्छादित राहील, रात्री काजवे चमकतील व हे काजवे पाण्याकडे, पाण्याजवळ
पांथळ जागेवर उडत असतील तर ही सर्व पावसाची लक्षणे आहेत.
४६) मुंग्या कारण विरहीत अडचणी व्यतिरिक्त एखाद्या उंच ठिकाणाकडे अंडे घेऊन जातांना दिसतील तर ती पावसाची पूर्व सुचना आहे.
४७) झाडावर साप चढणे, सर्प मैथुन, गाईचे कुदणे (उडया मारणे) चन्द्राची सावली दिसणे ही पुढे होणा-या पावसाची लक्षणे आहेत.
४८) शेणात किडे होणे, (गांडूळ इ.) अत्यंत गरमी होणे, चातक पक्षी सूर्याकडे टक लावून पाहाणे हे पाऊस लवकर सूरू होण्याची लक्षणे आहेत.
४९) डोंगर धुरकट दिसतात, चामडे ओलसर होते, ताक जास्त आंबट होते हे शीघ्र वृष्टि लक्षण होय.
५०) पाणी मचूळ होणे, मासे जमिनीकडे येण्यासाठी उडया मारणे, बेडूक मोठयाने ओरडू लागतील तर शीघ्र वृष्टि होते.
५१) मांजरी नखांनी जमीन खूप खणू लागतील.
५२) लोखंडाला गंज चढेल व त्याचा वाईट वास येईल तर शीघ्र पाऊस पडतो.
५३) पर्वत व डोंगर काळे दिसतील. घळईतुन धुके दिसेल, दरीतून वाफा निघत आहे असे वाटले तर शीघ्रवृष्टि होते.
५४) सरडे झाडाच्या शेंडयावर चढून जर सूर्याकडे पाहात असतील, गाई सूर्याकडे पहात असतील तर शीघ्र पाऊस पडतो.
५५) पशु (गाय, बैल) आणि कुत्रे आपले कान, पंजे, खुरे सारखे हलवितात (कापरे सुटते) गोठयाच्या किंवा घराच्या बाहेर जात नाही, शीघ्र वृष्टि होते.
५६) घराच्या छतावर चढून कुत्रे भुंकतात, आकाशाकडे साशंक नजरेने पहातात शीघ्र पाऊस येण्याचे लक्षण समजावे.
५७) बगळे जर पंख पसरून इतस्तत: बसलेले असतील तर ३-४ तासात पाऊस पडतो.
५८) चिमण्या मातीत अंघोळ करतात (धुलीस्नान) टिटवी पाण्यात अंघोळ करते.
५९) साप झाडावर चढून फुत्कारतात- आवाज करतात, बेडूक जोरात ओरडतात, चातक पक्षी ओरडतात.
६०) चातक पक्षी ओरडतात, मोर नाचतात, हे शीघ्र वृष्टि लक्षण समजावे.
६१) माठात (मातीच्या भांडयात) लोणी, आफू, गूळ यांना पाणी सुटेल, पघळतील तर वृष्टि होते.
६२) बकरी वा-याच्या दिशेने तोंड करून उभी राहील, लहान लहान साप झाडावर चढतील तर शीघ्र वृष्टि होते.
६३) दाढी, मिशा ओलसर होतील, चमकदार - नरम होतील, प्राणी उष्णतेने व्याकूळ होतील, माणसात आळस, ढिलाई,
झोप येणे ही लक्षणे शीघ्र पावसाची जाणावी.
६४) शेणात किडे पडतात. मुंग्यांच्या पंखाचा आवाज होतो. सरडयाचा रंग बदलतो असे होत असतांना आवश्यक पाऊस पडतो.
६५) जर चातक पक्षी, मोर, आणि कोल्हे रडू लागतील, मध्यरात्री कोंबडे आरवतील तर शीघ्र पाऊस पडतो.
६६) खूप माशा उडू लागल्या, भुंगे सारखे उडू लागतील, आणि शेणाचे लहान लहान गोळे घेऊन उडताना दिसतील तर निश्चित पाऊस पडतो.
६७) काशाच्या भांडयाला गंज चढू लागला, जलचर प्राणी व्याकूळ होतील, गटारातील किंवा नालीतील पाणी गरम होईल..
६८) थोरांच्या पानांना (ब्रम्हकमळाच्या पानांना) जागोजागी अंकूर फुटतील तर त्याला पाऊस आणणा-या वा-याचे बोलावणे समजतात.
(बोलणारे -निरोप- समजतात)
६९) जर झाडे वेली, झुडपे, त्यांची पाने छिद्र विरहीत, स्नेग्ध अशी दिसतील तर चहूबाजूंनी दोषरहित पाऊस आणणारे वारे वाहतात.
७०) पित्त प्रकृतीचा मनुष्य गाढ झोपत असेल, तर पाऊस आणणारा वारा वाहतो.
७१) वातपित्त प्रधान व्यक्तीचे डोके भणभण करत असेल तर वृष्टिकारक वारा वाहतो.
७२) कागदावर शाई पसरू लागली, प्रयत्न करूनही वाळत नसेल तर वृष्टिकारक वा-याचे लक्षण समजावे. कल्शाचे भांडे चमकू लागते,
जलचर प्राणी विहार करतांना दिसतात, गटारातील पाणी थंड होते, तेव्हा पाऊस पडत नाही.

Saturday, December 18, 2010

भोजनातील हानिकारक संयोग

दुधा सोबत

दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.

दह्या सोबत

खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.
 

तुपा सोबत

थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

मधा सोबत

मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

फणसा नंतर

पान खाणे हानिकारक असते.

मुळ्या सोबत

गुळ खाणे नुकसान दायक असते.

खीरी सोबत

खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

गरम पाण्याबरोबर

मध घेऊ नये

थंड पाण्याबरोबर

शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.

कलिंगडा बरोबर

पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

चहा सोबत

काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

माशा सोबत

दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

मांसा बरोबर

मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणा बरोबर

थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

खरबुजा बरोबर

लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

आवळा

आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे

अंजीर

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.
अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.
अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते

बध्दकोष्ठ

  • सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे नंतर शौचास जावे.
  • झोपतांना थंड पाणी किंवा दूध बरोबर सत इसबगोल १-२ चमचे टाकून घ्यावे.
  • सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तीचे बारीक तुकडे तोंडात ठेवावे व तासभर चघळत राहावे नंतर चावूPrison Break: The Final Breakन गिळून टाकवे. जेव्हा शरीर अत्यंत थकलेले असेल किंवा अशक्त, भुकलेले तहानेले असेल, पित्त वाढलेले असले अशा वेळेस हरडीचे सेवन करू नये.
  • रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.Prison Break: The Final Break

काकडी

काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.

गुणधर्म :

काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.

उपयोग :

काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.

फायदे :

काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.

जीवनसत्वे :

‘बी’ ९०%

औषधी वनस्पती

भारताला औषधी वनस्पतींचा आकर्षक व सर्वमान्य असा गौरवसंपन्न इतिहास आहे. औषधी वनस्पतींची मागणी वाढत चाललेली असताना त्याचा पुरवठा कमी होत आहे. अशावेळी या उद्योगात उतरून वनस्पतींची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करणे त्यावर प्रतिक्रिया करून औषधे तेले, कॉस्मेटिक बनविणे यांना मोठा वाव आहे. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ आयुर्वेदिक हर्बल औषधी वनस्पतींच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींची लागवड करताना घ्यावयाची काळजी औषधी महत्त्व काढणी पश्चात घ्यायची काळजी प्रक्रिया करणे पदार्थाचे पॅकेजिंग सरकारी योजनांची माहिती कायदेकानून प्रकल्प अहवाल तयार करणे उद्योजकीय गुण व व्यक्तिमय मार्केटिंग व मार्केटसव्र्हे यावर मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे हर्बल टी ज्यूसेस फूड सप्लीमेंट फेस किम्स बास पावडरी बनविणे, ग्रॅन्युअल्स यांसारख्या जवळपास १२ ते १५ उद्योगांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. संपर्क- ९२२१४९८३४४.  
मुखवास निर्मिती
मुखवास Mouth Freshner) म्हणजेच मुखशुद्धी. अनेकविध प्रकारची चूर्ण व मुखवास आज आपल्याकडे प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. अतिशय टेस्टी व पाचक अशी विविध मुखवास चूर्ण करायलाही सोपी व खूप आवडणारी आहेत. म्हणूनच खूप मागणी असणारी अशी आहेत. ‘मुखवास बनविणे’ हा व्यवसाय अगदी छोटय़ा भांडवलापासून ते अगदी मोठय़ा प्रमाणावर मशिनवरही सुरू करता येतो. आवळा सुपारी, आलं सुपारी, ओवा सुपारी, मुखवास बॉम्बे बडीशेप, इन्स्टन्ट पान, खुबसुरत मसाला, काजू बडीशेप, टिपटॉप बडीशेप, कोयीची सुपारी, केशर सुपारी, मसाला सुपारी, खजूर गोळी, खारीक सुपारी, जलजीरा पावडर इ. विविध मुखवासाचे प्रकार प्रश्नत्यक्षिकांसह शिकविले जातील. तसेच मुखवास बनविण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी लायसेन्सिस, बाजारपेठ पाहणी, विक्री तंत्र, गुणवत्ता, पॅकेजिंग, शासकीय अनुदान, कच्चा माल, मशिनरी, नफा-तोटा पत्रक यावर माहिती असणे आवश्यक. संपर्क- ९८१९०७०१६६/ ९३२५०७२००६.   http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=771:2009-08-17-06-40-06&catid=132:2009-08-06-07-25-51&Itemid=144

Friday, December 17, 2010

हृदय

हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
कारने आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
•धूम्रपान करणे •मधूमेह •उच्च रक्तदाब •लठ्ठपणा •उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल •शारिरीक श्रमाची कमतरता •अनुवंशिकता •तणाव, रागीटपणा आणि चिंता •वंशानुगत मुद्दे
लक्षणे
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः •छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो. •घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत. •साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात •तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात. •इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात. •काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
•डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात. •इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते. •ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. •मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. •हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते. •छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो. •हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे • ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते. •कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.

हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. •जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. •जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे. •जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. •पाण्यात ढवळून अँस्प्रीन द्यावे.
•हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. •पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. . प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.
हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षीत स्पंदने आढळली तर त्यावर ऊपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. •जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. •प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. •कितेक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बाईपास सर्जरीचा ऊपयोग केला जातो.

हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत : जीवन शैलीत परिवर्तन: 1.आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मिठ कमी असावे, फाइबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे. 2.वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे. 3.शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे. 4.धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे. मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.

कारिवणा


वनस्पतीशास्त्रीय नावः Hydrocotyle asiatica L. (हाइड्रोकोटिल् एशिआटिका)
कुळ: Umbelliferae
नाम:- (सं.) मण्डूकपर्णी, एकपर्णी; (को.) एकपानी; (हिं.) ब्रह्ममंडूकी, खुलखुडी, बल्लारि; (बं.) ब्रम्हमंडूकी, थलखुरी; (गु.) खडब्राह्मी; (क.) ओंदेलग; (ते.) मंडूकब्रह्मी; (ता.) वल्लारै; (मला.) कोडोगम्, मुत्रळ; (तु.) तिमरे; (सिंगाली) हिंगोटुकोल; (ब्रम्हदेश) मिंकहु अविन्; (मलै) दवून् पुंग्घ्; (इं.) Pennywort (पेनीवॉर्ट्).
tab
वर्णन: ही जमिनीवर पसरणारी वेल आहे. ही सर्वत्र पावसाळ्यांत उगवते व पाणी मिळाल्यास वर्षभर जगते. ताणे लांबवर जातात व त्यांस पेरापेरांवर मुळे, पाने, फुले आणि फळे येतात; प्रत्येक पेरावर एकच पान असते; पान अखंड, मूत्रपिंडाकृति, दांतेयुक्त व सुमारे १ ते १ १/२ इंच मोठे; पानावर ७ शिरा असतात व कोवळेपणी खालचे अंगावर लव असते; पानाचे देठ लांब असतात; फुले लहान व साधी. ही वेल गुरे, बकरी, डुकरे वगैरे जनावरे खातात. ताजी वनस्पति चुरडल्यास सुवास येतो; रूचि किळसवाणी कडु व तिखट; पाने सुकविली म्हणजे वास व रूचि जातात. औषधांत मुळासकट अखंड वेल वापरली जाते.
कारिवण्याची वेल ब्राह्मीसारखी दिसते परंतु ह्या दोन्ही वेली अगदी भिन्न आहेत. ब्रह्मीची पाने गुळगुळीत व एकापेक्षा जास्त प्रत्येक पेरावर असतात. कारिवण्याची पाने जरा खरखरीत, जरा लहान व प्रत्येक पेरावर एक एक पान असते. ब्राह्मीची क्रिया मज्जातंतूव्यूहावर होते व कारिवण्याची क्रिया त्वचेवर होते.
Hydrocotyl morphology.jpg
रसशास्त्र:- ताज्या पानांत ७८ टक्के पाणी असते. सुक्या पानाची १२१/४ टक्के राख पडते. ताज्या पानांत उडणारे तेल असते ते उष्णतेने किंवा उन्हाने उडते.
धर्म:- कारिवणा कुष्ठघ्न, व्रणशोधन, व्रणरोपण, मूत्रजनन, स्तन्यशोधन, संग्राहक, बल्य व रसायन आहे. मोठ्या मात्रेंत कैफजनक आहे. ह्याने डोके दुखते, भोवळ येते व कैफ चढतो. ह्याची त्वचेवर खास क्रिया घडते. ह्याच्यांतील तेल त्वचेंतून बाहेर पडावयास जलदी लागते. त्वचा गरम वाटते व टोचल्यासारखे वाटू लागते. टोचणी प्रारंभी हातापायास जाणवते, नंतर सर्व शरीरभर उष्णता भासते ती इतकी कीं, केव्हां केव्हां असह्य होते. त्वचेंतील रक्तवाहिन्यांचे विकासन होते व त्यांजमधून रक्त जलदी वाहते. त्वचा लाल होते व फार खाज सुटते. सुमारे एक आठवड्यानंतर भूक वाढते. ह्याच्यांतील तेल मूत्रपिंडांतून बाहेर पडते म्हणून मूत्राचे प्रमाण वाढते.
मात्रा:- उजेडांत व पुष्कळ वार्‍यावर सुकविलेले पंचांगाचे चूर्ण २ ते ४ गुंजा, दिवसांतून तीन वेळ देणे. कारिवण्याचा काढा करू नये, कारण त्यांतील उपयुक्त तेल उष्णतेने उडून जाते. ताजी पाने २ ते ४ मुलांसाठी व ८ ते १२ प्रौढांसाठी.
उपयोग:
  1. त्वचेच्या रोगांत कारिवणा उत्तम गुणकारी आहे
  2. सर्व त्वचेच्या रोगांत कारिवणा पोटांत देतात व त्याचा लेप करितात.
  3. मार किंवा ठेच लागून रक्त सांकळले असल्यास किंवा सूज आली असल्यास कारिवण्याचा लेप करितात.
  4. कारिवण्याने लघवीचे प्रमाण वाढते खरे तरी त्यास मूत्रजनन म्हणून स्वतंत्र वापरता येत नाही. कारण त्याने मूत्रपिंडास दगा होतो व इतर कांहीं त्रास होतात. जावा बेटांत कारिवण्याचा रस जेष्ठीमधाबरोबर दुधांतून मूत्रनलिकेच्या रोगांत देतात.
  5. उन्हाळ्यांत लहान मुलांस रक्तमिश्रित जुलाब होतात व लघवीस त्रास होतो किंवा लघवी कमी होते तेव्हां २ ते ४ पानांचा रस जिरे आणि खडीसाखरेबरोबर देतात व कारिवणा वाटून त्याची पोळी बेंबीखालीं पोटावर बांधतात. ह्या रोगांत ज्वर असल्यास मलबारांत कारिवणा मेथीच्या फांटाबरोबर देतात.
  6. बोबडे बोलणार्‍या मुलांस शब्दोच्चार स्पष्ट होण्यास पाने चावण्यास देतात.

माका


वनस्पतीशास्त्रीय नाव: Eclipta prostrata
कुळ: Asteraceae
नाम:- (सं.) मार्कव; (हिं.) भांगरा; (बं.) केसराज; (क.) गर्ग.
वर्णन:- माक्याची क्षुद्र वनस्पति पावसांत उगवते व ओलसर जागेंत किंवा पाणी दिल्यास बाराही महिने जगते. ह्यांत श्वेत आणि पीत अशा दोन जाति आहेत. पाने समोरासमोर दोन असतात आणि ती देठविरहित असतात. दक्षिणेंत श्वेतजाति विशेष मिळते आणि बंगाल्यांत पीत जाति मिळते. ह्याचे पंचांग औषधांत वापरतात.
Eclipta flower.jpg
रसशास्त्र:- माक्यांत एक जातीची राळ व सुगंधि कडु द्रव्य आहे. माका उकडल्यास त्याचा गुण जातो. ह्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात.
धर्म:- माका कडु, उष्ण, दीपन, पाचन, वायुनाशी, आनुलोमिक, मूत्रजनन, बल्य, वातहर, त्वग्दोषहर, व्रणशोधन, व्रणरोपण आणि वर्ण्य आहे. माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ति नाही. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्त्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते. रोज माका खाल्याने वृध्दाचा तरूण होतो ही म्हण केवळ अतिशयोक्ति नाही. माक्याचे धर्म टॅरॅक्झेकम् सारखे किंबहुना त्यापेक्षा उत्तम तर्‍हेचे आहेत. मोठ्या मात्रेंत उलट्या होतात.
मात्रा:- ताजा अंगरस १ ते २ थेंब.
उपयोग:-
  1. माक्याचा रस यकृताची क्रिया बिघडली असता देतात. यकृताची क्रिया सुधारली म्हणजे कावीळ नाहीशी होते, यकृद्वृध्दि आणि प्लीहावृध्दि कमी होते. मूळव्याध आणि उदर बरे होतात व कुपचन नाहीसे होते. कावीळ, मूळव्याध आणि उदर बहुतकरून यकृताच्या रोगावर अवलंबून असतात, म्हणून यकृतावर क्रिया करणारी औषधें द्यावी लागतात. यकृताची क्रिया बिघडल्याने एक जातीचे शारीरिक विष ज्यास संस्कृतांत आम असे म्हणतात ते शरीरांत जमते व त्यामुळे आमवात, भोवळ, डोकेदुखी, द्दष्टिमांद्य आणि तर्‍हेतर्‍हेचे त्वग्रोग उत्पन्न होतात. ह्या रोगांत माका दिल्यास फार फायदा होतो.
  2. जीर्णत्वग्रोगांत (उदा:- कंडू, इंद्रलुप्त वगैरे) माका पोटांत देतात त्याचा लेप करितात. अकालपलित रोगांत माका पोटांत देतात व लेप करितात.
  3. ह्याने केस वाढतात व केसांचा रंग सुधारतो. माक्याचा रस व हिराकस ह्याच्या लेपाने केस काळे होतात.
  4. मद्रासकडे विंचवाच्या दंशावर माक्याचा लेप करितात व पोटांत देतात.
  5. अग्निदग्ध व्रणावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लाविला असता आग नाहीशी होते व नवीन येणारी त्वचा शरीराच्या रंगाची येते. व्रणावर याचा लेप करितात.
  6. तान्ह्या मुलाच्या घशांत बोळ जमला असता माक्याच्या अंगरसाचे १-२ थेंब मधाबरोबर जिभेवर चोळतात. ह्याने घशातील घरघर कमी होते.
  • संदर्भ: ओषधीसंग्रह- डॉ.वा.ग.देसाई

चित्रक

चित्रक

वनस्पतीशास्त्रीय नाव: Plumbago zeylanica L.
कुळ: Plumbaginaceae
नाम: (सं.) चित्रक; (हिं.) चित्रक; (बं.) चिता; (गु.) चित्रो; (क.) वेल्लीचित्रक.
Plumbago zeylanica habit.jpg
वर्णन: हे बहुवर्षायु सदाहरित लहानसर क्षुप आहे. ह्याचा दांडा गोल असून त्यास पुष्कळ फांद्या फुटतात, फांद्या पसरलेल्या असून जमिनीवर पडतात तेव्हां पेरापेरास मुळे फुटतात; पाने एकान्तराने, अखंड, देठरहित, लंबगोल, हिरवीगार, मोगर्‍याच्या पानासारखी, जाडसर व दडस; फुलांचे तुरे येतात, फुले पांढरी, नियमित, स्त्री व पुरूष इन्द्रिये एकत्र असलेली आणि गंधरहित; पुष्पपात्रावर लहान लहान पुष्कळ ग्रंथि असतात; मुळे लांब, ताजेपणी मांसल,पुष्कळ वेडीवाकडी झालेली, सुमारे बोटभर जाड व क्वचित् त्यांस उपमुळे फुटलेली असतात; साल काळसर उभी चिरलेली असून तीवर थोड्याशा लहान गांठी असतात; सुके मूळ तोडले असता त्वरित तुटते; रूचि तिखट, कडू, उष्ण आणि जिभेस भोसकल्याप्रमाणे दुःखदायक, मुळाची साल औषधांत वापरतात. ही नेहमी ताजी वापरावी, कारण जुनी झाली म्हणजे निरूपयोगी होते.
Plumbago zeylanica flower.jpg
रसशास्त्र: चित्रकाच्या मुळाच्या सालींत एक दाहजनक द्रव्य आहे. ते दारूंत फार मिसळते, उकळलेल्या पाण्यांत बरेच मिसळते, परंतु थंड पाण्यांत क्वचितच मिसळते.
धर्म: लहान मात्रेंत चित्रकाने पचननलिकेच्या श्लेष्मलत्वचेस उत्तेजन येते व आमाशय आणि उत्तरगुद ह्यांचे रक्ताभिसरण वाढून त्यांना शक्ति येते. ह्याने पोटांत गरमी उत्पन्न होते व पचनक्रिया वाढते. गुदांतील अर्श उत्पन्न होणार्‍या वलीवर चित्रकाची प्रत्यक्ष क्रिया होते आणि त्याने वलीची शिथिलता नाहीशी होऊन थोडासा ग्राहीपणा देखील उत्पन्न होतो. ह्याने यकृतास उत्तेजन येऊन पित्त नीट वाहू लागते, म्हणून चित्रक दिल्यानंतर मळ नेहमी पिवळा होतो. रक्तांत मिसळून नंतर मलोत्सर्जक ग्रंथीवर ह्याची उत्तेजक क्रिया होते व त्यांतल्यात्यांत त्वचेंतील स्वेदग्रंथीवर विशेष क्रिया घडते. म्हणून चित्रक दिल्याने पुष्कळ घाम सुटतो. मोठ्या मात्रेंत चित्रक दाहजनक व कैफजनक विष आहे. मोठ्या मात्रेंत घशांत व आमाशयांत आग सुटते, उम्हासे येतात, उलट्या व जुलाब होतात, लघवी होण्यास त्रास पडतो, नाडी अशक्त होऊन वेडीवांकडी चालते आणि अंग थंड पडते. गर्भाशयावरील चित्रकाची क्रिया फार महत्वाची व लक्षांत ठेवण्यासारखी आहे. साधारण मोठ्या मात्रेने कटींतील सर्व इंद्रियांचा दाह उत्पन्न होतो म्हणून जुलाब होऊन जुलाबाबरोबर गर्भाशयांतून देखील रक्त वाहू लागते व लघवीस थेंब थेंब होते. चित्रकाने गर्भाशयाचे इतके जोरदार संकोचन होते की, प्रहर दोन प्रहरांत गर्भ पडतो. ही त्याची क्रिया अगदी नेमकी होत असते व नऊ महिन्यांत केव्हांहि दिले तरी गर्भ पडतो, परंतु गर्भ मात्र नेहमी मृत असतो. गर्भ पाडण्यास चित्रक पोटांत देतात व गर्भाशयाच्या तोंडावर लेप लावतात. ह्या लेपाने व पाठीमागून विशेष शुश्रूषा न ठेविल्यास कटीमध्ये अमिताप उत्पन्न होऊन स्त्रीचे जिवास धोका होतो. एकूण चित्रक उत्तम औषध आहे. हा कडू, तिखट, उष्ण, दीपन, पाचन, वायुहर अर्शोघ्न, पित्तस्त्रावी, स्वेदजनन, ज्वरघ्न आणि गर्भाशयास संकोचक आहे. चित्रकाच्या लेपाने फोड उठतो. हा त्वचेस लाविल्यास फार दुःख होते, त्वचा काळी पडते व त्यामुळे पडलेला व्रण लवकर रूजून येत नाही.
उपयोग:
  1. चित्रक वात आणि पित्तयुक्त ज्वरांत, पचननलिकेच्या रोगांत आणि गर्भाशयावरील क्रियेमुळे वापरण्याचा फार प्रघात आहे.
  2. विषमज्वरांत मुख्यत्वें यकृत व प्लीहा ह्यांची वृध्दि झालेली असेल तर चित्रक वापरल्याने फार फायदा होतो. ज्वरांत सुगंधि पदार्थाबरोबर मुळाचे चूर्ण तांदळाच्या पेजेंत उकडून वस्त्रगाळ करून देतात.
  3. सूतिकाज्वरांत चित्रकाचा दोन तर्‍हेने उपयोग होतो; एक ताप कमी येतो व सर्व शरीरास उत्तेजन येते आणि दुसरे गर्भाशयास उत्तेजन येऊन दूषित आर्तव वाहू लागल्यामुळे मक्कलशूळ कमी होतो. सूतिकाज्वरांत चित्रकाबरोबर निर्गुडी द्यावी. मरक (प्लेग) ज्वरांत चित्रक वळंब्यावर लावितात व पोटांतही देतात.
  4. शिथिलताप्रधान पचननलिकेच्या रोगांत चित्रक हेच उपयुक्त औषध होय. ह्याने अन्नावर प्रीति उत्पन्न होते, भूक लागते, अन्न पचते व सर्व ठीक चालले आहे अशी मनाची शांतता होते.
  5. थंड पाणी व थोडे मीठ ह्यांत मूळ उगाळून त्याचा पातळ लेप आमवातांत दुःखदायक सांध्यावर करतात. हा लेप १०/१५ मिनिटांत मात्र पुसून टाकला पाहिजे. चित्रकाची मुळी उकडून तयार केलेले तेल आघातयुक्त वातरोगांत व आमवातांत चोळतात.

कावीळ


नवीन रक्त जसजसे तयार होते तसतशा जुन्या रक्तपेशी मोडीत निघतात. यातले रक्तद्रव्य यकृतात विरघळून त्यातून एक पिवळा पदार्थ (बिलिरुबीन) निर्माण होतो. तो पिवळा पदार्थ शौचावाटे बाहेर पडतो म्हणून विष्ठा रंगाने पिवळी असते.
या पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच 'कावीळ' म्हणतात. हा पदार्थ रक्तात प्रमाणाबाहेर उतरल्याने लघवीही जास्त पिवळी दिसते. डोळे, त्वचा पिवळे दिसतात.
काविळीचे तीन प्रकार
लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन पिवळा पदार्थ जादा तयार होणे. लहान बाळाची पहिल्या दोन-तीन दिवसांतली कावीळ या प्रकारची असते. याचे कारण ओव्हर लोड किंवा अतिरिक्त रक्तद्रव्य.
-  पित्तमार्गात अडथळा येऊन यकृतात पित्त साठून रक्तात उतरणे (उदा. पित्तखडे, यकृताचा कर्करोग)
-  कृत सुजेची कावीळ : यकृताचे कामकाज आजाराने मंद होऊन हे पिवळे द्रव्य रक्तात साठून राहते. (उदा. दूषित पाण्यामुळे किंवा दूषित इंजेक्शनने येणारी सांसर्गिक कावीळ)
यकृताच्या आजारामुळे होणारी कावीळ मोठया प्रमाणावर आढळते. विषाणू काविळीचे दोन मुख्य प्रकार आहेत.
-  अ व ई कावीळ : याची पचनसंस्थेतून लागण होते.
-  बी,सी, डी कावीळ रक्तातून व लैंगिक संबंधातून पसरते.
ए आणि ई प्रकारची कावीळ (तोंडातून प्रवेश)
ए काविळीचे विषाणू रुग्णाकडून विष्ठेमार्फत आणि दूषित अन्नपाण्यामार्फत इतरांकडे पसरतात. प्रदूषित समुद्री मासळीनेही हे विषाणू पसरतात. उकळण्यामुळे 1 मिनिटात हे विषाणू नष्ट होतात. सहसा भारतात लहान वयातच हा संसर्ग होतो व त्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणूनच प्रौढ वयात हा आजार सहसा दिसून येत नाही. मात्र उच्च /मध्यम वर्गात लहानपणी हा आजार क्वचित होतो, म्हणून प्रौढपणी कधीही येऊ शकतो.  लहान वयात या आजाराचा त्रासही कमी होतो. यकृतात हे विषाणू बिघाड निर्माण करतात आणि त्यामुळे कावीळ होते. लक्षणे-चिन्हे काही आठवडयांत (15-20 दिवस) दिसायला लागतात.
हा आजार जिथे पाणी खराब आहे, अस्वच्छता आहे अशा सर्व ठिकाणी आढळतो. ग्रामीण भागांत व शहरातल्या झोपडपट्टयांत पावसाळयात हा आजार जास्त आढळतो. रोगनिदानासाठी तापाचा तक्ता-मार्गदर्शक पाहा.
रोगनिदान
ए प्रकारचा हा आजार सहसा मुलांमध्ये होतो आणि त्यातील 70% बालकांना काही विशेष त्रास होत नाही. काही जणांना फक्त थोडा ताप व थकवा येतो. मात्र तरुण-प्रौढ वयात संसर्ग झाल्यास आजार दिसतो.
लक्षणे : सतत राहणारा मध्यम ताप, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणे, मळमळ, उलटी व काविळीत येणारा पिवळेपणा किंवा मातकटपणा. पिवळेपणा सर्वात आधी डोळयात दिसतो. लघवी जर्द पिवळी दिसते. काही जणांची विष्ठा पांढुरकी होते. त्वचेखाली बिलिरुबीन साठून शरीरावर खाज सुटते.
चिन्हे: कावीळच असल्याची खात्री करून घ्या. शारीरिक तपासणीत डोळयांत पिवळेपणा दिसल्याशिवाय रोगनिदान करु नये. यकृताची सूज असल्यास पोटाच्या उजव्या बाजूला हाताने दाबून दुखरेपणा आढळतो. यकृताचा आकार वाढत असल्यास ते धोकादायक असते.
लघवीची साधी तपासणी: लघवीच्या तपासणीत काविळीचे प्राथमिक  निदान होऊ शकते. लघवी तपासणीची ही एक सोपी पध्दत आहे. एका परीक्षानळीत किंवा लांबट बाटलीत (बाटली रंगीत नको) लघवी घेऊन ती जोरजोराने हलवा. त्यावर फेस येईल. हा फेस पिवळया रंगाचा असेल आणि टिकून राहात असेल तर कावीळ आहे असे समजावे.
रक्ताची तपासणी: रक्ततपासणीत काविळीचा प्रकार, यकृताला झालेल्या आजाराचे प्रमाण व बिलिरुबीनचे प्रमाण समजते. यामुळे उपचारासाठी आवश्यक असणारी माहिती मिळते.
प्रतिबंधक लस:
अ काविळीसाठी इंजेक्शन स्वरुपात लस उपलब्ध आहे. याचा परिणाम 4 वर्षे टिकतो. मात्र याचा खर्च फार (1400 रु.) असल्याने ती परवडत नाही. भारतात याचा संसर्ग आधीच बालवयात झालेला असल्याने त्याचा आपल्याला विशेष उपयोग नाही.
ई प्रकारचे विषाणू
हे विषाणू पण दूषित अन्न - पाण्यावाटे पसरतात. पावसाळयाच्या सुरुवातीस किंवा पूर, इ. वेळी हे विषाणू साथी निर्माण करतात. '' प्रकारचे विषाणू सहसा बालवयात आजार निर्माण करतात तर '' प्रकारचे तरुण आणि प्रौढ वयात जास्त. या साथींमध्ये गरोदर स्त्रियांना जास्त घातक कावीळ होते. त्यामुळे काही स्त्रिया दगावतात देखील. मात्र '' प्रकारच्या काविळीत सहसा नंतर काही त्रास उरत नाही. आयुष्यात एकदा झाल्यानंतर हा संसर्ग सहसा परत होत नाही.
काविळीचे दुष्परिणाम
विषाणू-कावीळ 4-8 आठवडयांत बहुधा आपोआप बरी होते. पण काही जणांची कावीळ बरी न होता वाढत जाते व मृत्यू येतो. झोपेचे चक्र बिघडणे किंवा बेशुध्दी, गुंगी या वाढलेल्या काविळीच्या सर्वात महत्त्वाच्या खुणा आहेत. अशी खूण दिसल्यास डॉक्टरकडे पाठवावे.
काही महिन्यांनी किंवा वर्षांनी काही रुग्णांना जलोदराचा त्रास चालू होतो. या जलोदराचे कारण म्हणजे यकृत निबर होऊन त्याचे काम बिघडते. रक्तावर नीट प्रक्रिया न झाल्यामुळे खाली पोटात पाणी साठते.
काविळीमुळे गरोदरपणात गर्भावरही अनिष्ट परिणाम होतात. या सर्व दुष्परिणामांना वेळीच ओळखून रुग्ण स्त्रियांना डॉक्टरकडे पाठवा. या आजारात गर्भपात करणे आवश्यक ठरू शकते.
रक्तावाटे पसरणारी कावीळ
('बी, सी, डी आणि जी प्रकार')
काविळीचे आणखी काही प्रकारचे विषाणू तोंडावाटे न येता दूषित इंजेक्शनच्या मार्गाने किंवा लैंगिक संबंधाने  येतात. यामुळे होणारा आजार सौम्य असतो. पण नंतर जलोदराचा त्रास होण्याची मात्र जास्त शक्यता असते. याचे विषाणू शरीरात नंतरही बरेच महिने राहतात. या काळात स्त्रीला गर्भ राहिला तर तो विकृत होणे, पोटात मरणे वगैरे दुष्परिणाम होतात. म्हणून गरोदर स्त्रियांना साथीच्या काळात अशा प्रकारच्या काविळीविरुध्द तात्पुरती प्रतिकारशक्ती देणारी लस टोचणे आवश्यक आहे. या लसीचे तीन डोस असतात. या आजाराबद्दल जास्त माहिती लिंगसांसर्गिक आजारांच्या प्रकरणात दिली आहे.
उपचार
काविळीबद्दल बरेच गैरसमज आहेत. माळ बांधणे आणि कावीळ उतरण्याचा काहीएक संबंध नाही. नाकात थेंब टाकून कावीळ बरे करण्याची पध्दतही शास्त्रीयदृष्टया बरोबर की चूक हे माहीत नाही. तसेच कावीळ म्हटले की 'लावा सलाईन' हा  खाक्याही निरर्थक आहे. रुग्ण खूप आजारी असेल तरच रुग्णालयात दाखल करावे लागते.
काविळीचे विषाणू कोठल्याही औषधाने मरत नाहीत. कावीळ आपोआप हटते किंवा क्वचित रोगी दगावतो. फक्त रोग्याला भूक लागत नसते. मळमळ होते म्हणून उसाचा रस, साखरपाणी वगैरे देणे बरोबर आहे. याच्या पलीकडे औषध नाही.
दारू पिणा-यांनी किमान सहा महिने दारू बंद केली पाहिजे. दारू ही यकृताला अत्यंत घातक आहे.
काविळीत यकृत नाजूक होते. त्यामुळे  काविळीत अनावश्यक औषधे टाळावीत. माळ बांधणे व सलाईन-टॉनिक-इंजेक्शन देणे या अनावश्यक, निरुपयोगी गोष्टी आहेत.
काविळीत पूर्ण विश्रांती आवश्यक असते. 'बी, सी, डी ' प्रकारची (एका वेगळया प्रकारचे विषाणू) कावीळ असेल तर लैंगिक संबंध टाळावा. कारण हा प्रकार लिंगसांसर्गिक आहे.
कावीळ असताना तेल, तूप टाळावे असा सार्वत्रिक समज आहे, पण आधुनिक शास्त्रात असे सांगितलेले नाही. मात्र आयुर्वेदात काही पथ्यापथ्य सांगितलेले आहे.
तापासाठी पॅमाल द्यावे. मळमळ किंवा त्वचेची खाज यांवर प्रोमेझिनची गोळी द्या. एवढाच औषधोपचार ऍलोपथीत आहे.
कावीळ हा आजार त्रासदायक व काही प्रमाणात धोकादायक आहे. आधुनिक शास्त्रात त्याला अद्यापि औषध मिळालेले नाही. मात्र आयुर्वेदिक शास्त्रात बरीच औषधे दिली जातात. काविळीवर खेडोपाडी ब-याच प्रकारचे उपचार केले जातात.  ही औषधे खरोखर परिणामकारक, सुरक्षित आहेत की नाही हे सिध्द होणे आवश्यक आहे. परंतु या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने  प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे. स्वच्छता, शुध्द पाणी, चांगले राहणीमान हेच खरे यासाठी प्रतिबंधक उपाय आहेत. दूषित इंजेक्शन-सिरींज वापराने ही बी-कावीळ पसरू शकते. यासाठी जैव कचरा विल्हेवाट चांगली असली पाहिजे.
आयुर्वेद व पारंपरिक उपचार
कावीळ या सांसर्गिक आजारावर अनेक प्रकारचे उपाय आहेत. सगळयांत सोपा उपाय म्हणजे भुईंआवळा. ही पावसाळयात वाढणारी एक वनस्पती असते.12-15 इंचाचे हे पूर्ण रोप (मुळासकट) कुटून त्याचा रस करावा.यासाठी त्यात थोडे पाणी मिसळावे लागते. हे दोन-तीन चमचे याप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा द्यावा. असे कावीळ बरी होईपर्यंत रोज द्यावे. काविळीचा विकार पावसाळयात जास्त प्रमाणात आढळतो. याच काळात ही वनस्पती खूप आढळते. ही वनस्पती वाळवून चूर्ण करून ठेवून गरज पडल्यावर पाणी मिसळून वापरता येते. पण यात ओल्या वनस्पतीपेक्षा कमी गुणवत्ता असते.
आणखी एक उपाय म्हणजे आरोग्यवर्धिनी गोळी 500 मि.ग्रॅमच्या दोन गोळया दिवसातून तीन वेळा याप्रमाणे सात दिवस द्याव्यात. आरोग्यवर्धिनीबरोबरच कुमारी आसव 2 चमचे + 2 चमचे पाणी द्यावे.
काविळीत लघवीचा रंग लालसर असल्यास एरंडाच्या 1-2 पानांचा देठासह रस द्यावा. हा रस सकाळी रिकाम्या पोटी 4-5 दिवस रोज द्यावा.
जेव्हा लघवीचा रंग पिवळा पण विष्ठा पांढरट असेल तेव्हा पित्तरसाचा आतडयात येण्याचा मार्ग बंद झालेला असतो. अशावेळी सैंधवमीठ 2 ग्रॅम व त्रिकटू चूर्ण 2 ग्रॅम 3 दिवसांपर्यंत देत राहावे. या उपायाने सुजेचा अडथळा दूर होऊन पित्ताचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र गाठ, खडा यांमुळे अडथळा असेल तर पित्तमार्गावर शस्त्रक्रियाच करावी लागेल.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काविळीत तेलकट, पचावयास जड असलेले पदार्थ व मिठाई हे वर्ज्य आहेत. मात्र अल्प प्रमाणात गाईचे तूप (10-20मि.ली.) हे पित्त कमी करते म्हणून देत राहावे; मना करू नये. आयुर्वेद काविळीच्या उपचारात, तेल व तूप यांना सारखे मानत नाही. तेल, डालडा, वनस्पती तूप हे पित्तकारक तर साजूक तूप हे पित्तशामक आहे.
जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी 15-20 मि.ली. तूप देऊन तिस-या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/ अमलताश) मगज 15-20 ग्रॅम पाण्याबरोबर द्यावा. आरग्वध मगज हा गाभुळ चिंचेसारखा पदार्थ असता. यामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.
लघवीचा पिवळेपणा, मळमळ, यकृताचा दुखरेपणा कमी होणे, भूक सुधारणे, त्वचेची खाज कमी होणे या लक्षणांवरून कावीळ बरी होत असल्याचे समजावे.

आयुष दर्पण हे विकिपीडिआ वर

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%आ३


आयुष दर्पण हे विकिपीडिआ वर http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3

तारामासा

तारामासा हा एक समुद्री जीव आहे.हयाला सी स्टार असे सुध्दा म्हणतात. याच्या शरीराचा आकार तार्‍याच्या आकारासारखा असून तो पंचअरीय सममित असतो. हयांच्या रंगामध्ये फारच विविधता आढळते. पण तो कायमस्वरुपी टिकवल्यानंतर पिवळया किंवा तपकिरी रंगाचा दिसतो. हा विशेष करुन भारत आणि अमेरिका या देशांलगत असलेल्या सागरी पाण्यात आढळतो
संघ इकायनोडर्माटा
हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.
हे प्राणी त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून त्यांच्या प्रौढावस्थेत पंचअरिय सममिती आढळते परंतु त्यांच्या अळया द्विपाश्र्र्वसममित असतात.
ते नलिकापाद यांच्या साहाय्याने प्रचलन करतात, नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुध्दा होतो. काही प्राणी स्थानबध्द असतात.
हयांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पीकांचे बनलेले असते.
हे प्राणी बहुतेक एकल् ठिकाणी  असतात.
उदाहरण : तारामासा , सीर्च्ािन, ब्रिटल स्टार, सी कंकूबर इत्यादी

Thursday, December 16, 2010

जीवन्ती

'जीवनीय' ?

जीवनीय-शब्देन-इह-आयुष्यत्वम्‌-अभिप्रेतम्‌ ।
तत्र च मधुररसगुणे " आयुष्यो जीवनीयः " (च.सू.२६) इति च करिष्यति तत्र मूर्च्छितस्य संज्ञाजनकत्वेन जीवनीयत्वं व्याख्येयम्‌ ।
(च.सं.सू.४/१ ः आयु.दि.व्याख्या.-चक्रपाणिदत्त)

पांचभौतिकत्व ?

पृथिवि-अपां-गुणैः युक्तं जीवनीयं इति स्थितिः । र.वै.सू.

रस ?
मधुर

वीर्य ?
शीत

विपाक ?
मधुर

गुण ?
गुरु शीत स्निग्ध पिच्छिल मृदु 

कर्म ?
वातशमन  गुरु शीत स्निग्ध पिच्छिल मृदु 
पित्तशमन  शीत वीर्य + गुरु शीत स्निग्ध पिच्छिल मृदु 
कफवर्धन  सर्वतः

धातु  सप्तधातुवर्धक ओजवर्धक

मल  मल मूत्र सृष्टकर

इतर संदर्भ ?

प्रवरं जीवनीयानां क्षीरं उक्तम्‌ । 
च.सू. २५

इतर द्रव्ये ?
क्षीर* (गो/नारी)
गोधूम
द्राक्षा
आमलकी
मधुयष्टी
 
 
 
जीवक
ऋषभक
मेदा
महामेदा
काकोली
क्षीरकाकोली
मुद्गपर्णी
माषपर्णी
जीवन्ती
मधुकम्‌
इति दशेमानि जीवनीयानि भवन्ति ॥ 
{ च.सू. ४/९-१ }

जीवनीयम्‌-आदौ-उच्यते सर्वेषां जीवनहितस्य-एव-इति-अर्थम्‌-अभिप्रेतत्वात्‌ ।
मुद्गमाषपर्ण्यन्तं सुगमम्‌ ।
जीवन्ती स्वनामख्याता सुवर्णवर्णभा ।
मधुकं यष्टीमधुकम्‌ ।
{ श्री चक्रपाणिदत्त विरचित आयुर्वेददीपिकाव्याख्या } 
 

जीवन्ती
कुल - अर्ककुल

FAMILY - Asclepiadaceae
लॅटिन नाम - Leptadenia reticulata

गण - जीवनीय ,
मधुरस्कंध (च.)
काकोल्यादी (सु.)

स्वरूप - शाखाप्रशाखायुक्त गुल्म स्वरुप वेल.
पर्ण - चिवट,वरुन गुळ्गुळीत, मागच्या बाजूला रोमश.
पुष्प - हिरवट पिवळे, मंजिरीस्वरूप
फल - शिंगाच्या आकाराचे, ५ ते १० सेंमी लांब,
कच्च्या शेंगाची भाजी सर्व भाज्यांमध्ये श्रेष्ठ समजतात.

प्रकार - (१) जीवन्ती L. reticulata
(२) स्वर्णजीवन्ती L. pyrotechnica

उत्पत्तिस्थान - पश्चिम व दक्षिण भारत

गुण - M-S-M लघु , स्निग्ध

दोषघ्नता - त्रिदोषहर VPK

स्थानिक प्रयोग -
निर्देश - पित्तज शोथ - दाहप्रशमनार्थे

आभ्यंतर प्रयोग -

१. अन्नVS :
स्निग्धा + वातानुलोमन + ग्राहिणी : वातज ग्रहणी

२. प्राणVS :
हृद्‌बल्य (बलकारी ) : हृद्दौर्बल्य

३. प्राणVS :
कफनिःसारक : कास

४. रसVS :
दाहप्रशमन : पित्तजज्वर

५. रक्तVS :
स्तंभन : रक्तपित्त

६. मांसVS :
बलकारी + रसायनी : क्षय /राजयक्ष्मा / शोष

७. मज्जाVS :
चक्षुष्या : दृष्टीमांद्य

८. शुक्रVS :
शुक्रस्तंभक : शुक्रमेह

९. स्तन्यVS :
स्तन्यजनन : स्तन्यक्षय

१०. मूत्रVS :
मूत्रल + दाहप्रशमन : मूत्रदाह/मूत्रकृच्छ/पूयमेह

मात्रा -

चूर्ण - २ ते ४ किंवा ८ ग्रॅम
अनुपान - गोदुग्ध / अजाक्षीर
क्वाथ - ४०-८० मिली

कल्प - जीवन्त्यादी घृत
जीवन्त्यादी तैल
जीवन्त्यादी यमक

संदर्भ -

जीवन्ती शीतला स्वादुः स्निग्धा दोषत्रयापहा ।
रसायनी बलकारी चक्षुष्या ग्राहिणी लघुः ॥
भा.प्र.

उपलब्धी -

वैद्यरत्नम्‌ - १०० ग्रॅम - १०० रु.





वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

Saturday, December 11, 2010

वनस्पती मूळ

ग्रह व नक्षत्र मानणारा मोठा वर्ग आहे. या ग्रह-नक्षत्रांचा अनुकूल व प्रतिकूल असा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. आपण घरात यज्ञ, जप, धार्मिक अनुष्ठान करतो व सुखाची अपेक्षा ठेवत असतो.

झाडा-झुडपाच्या कालचक्रात सूर्य-चंद्र तसेच नवग्रह यांचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचे पुराणात सांगण्यात आले आहे. यज्ञात आहूती म्हणून अर्पण करण्यात येणारी सामग्री विविध प्रकारच्या जातीच्या वनस्पतींपासून मिळत असते. वनस्पतींवर समस्त प्राणीमात्रांचे जीवन अवलंबून आहे. जे नागरिक किंमती रत्‍न खरेदी करू शकत नाहीत तर ते झाडाची पाने किंवा मुळे यांचा वापर करू शकतात.

सूर्य ग्रह-
आपल्या कुंडलीत सूर्य कमजोर, कनिष्ठ किंवा अशुभ प्रभाव पाडणारा असेल तर बेल-पत्र लाल किंवा गुलाबी धाग्यात रविवारी धारण करावे. अशुभ प्रभाव कमी होईल.

चंद्र ग्रह-
चंद्र दूषित असून अशुभ प्रभाव पाडत असल्यास सोमवारी सकाळी खिरणीचे मूळ पांढर्‍या धाग्यात धारण करावे.
  ग्रह व नक्षत्र मानणारा मोठा वर्ग आहे. या ग्रह-नक्षत्रांचा अनुकूल व प्रतिकूल असा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. आपण घरात यज्ञ, जप, धार्मिक अनुष्ठान करतो व सुखाची अपेक्षा ठेवत असतो.      


मंगल ग्रह-
आपल्याला मंगळ असेल तर मंगळवारी दुपारी अनंत मूळ लाल धाग्यात धारण करावे.

बुध ग्रह-
बुध नकारात्मक प्रभाव टाकत असेल तर बुधवारी सकाळी विधाराचे मूळ हिरव्या धाग्यात धारण करावे.

गुरु ग्रह-
गुरु दोषी असून पीडा देणार असेल तसेच अशुभ प्रभाव टाकणारा असेल तर भारंगी किंवा केळ्याचे मूळ गुरुवारी दुपारी पिवळ्या धाग्यात धारण करावे.

शुक्र ग्रह-
आपल्याला केंद्राधिपती दोष असेल तर शुक्रवारी सकाळी सरपोरवाचे मूळ पांढर्‍या धाग्यात धारण करावे.

शनि ग्रह-
शनिची साडेसाती मागे लागली असेल तर शनिवारी सकाळच्या प्रहरी निळ्‍या धाग्यात बिच्छूची मूळे काळ्या धाग्यात धारण करावी.

राहु ग्रह-
राहूची अशुभता दूर करण्यासाठी पांढर्‍या चंदनाचा तुकडा निळ्या धाग्यात बुधवारी धारण केल्याने लाभ होतो.

केतु ग्रह-
केतुचा अशुभ प्रभाव कमी करण्‍यासाठी अश्वगंधाचे मूळ निळ्या धाग्यात गुरुवारी धारण करावे. त्यामुळे केतुचा अशुभ प्रभाव समाप्त होतो

तमालपत्र

अरूची, अजीर्ण, श्र्वास, कास, अतिसार, पण्डुरोग व संग्रहणीत तमालपत्राचे चूर्ण वापरावे. त्यात तमालपत्र १ भाग, मिरी २ भाग, सूंठ ३ भाग, पिंपळी व वंशलोचन प्र २ भाग, वेलची आणि दालचिनी प्रत्येकी अर्धाभाग आणि पिठीसाखार ३२ भाग आहे. तीक्ष्ण, उष्ण, व सस्निग्ध असल्याने कफ नाहीसा करतो आणि मधुर अनुरस असल्याने वातघ्न राजयक्ष्मा व शोष या व्याधी बरे होण्यास मदत होते.

Tuesday, December 7, 2010

व्याख्यान

सप्रेम नमस्कार !

वैद्य श्री विजय रेंदाळकर , चेंबुर- मुंबई .०२२-२-५२२७२९२ 
vrendalkar@yahoo.co.in

यांचे
"स्वामी विवेकानंद - श्री रामकृष्ण परमहंस - श्री स्वामी समर्थ यांचे अद्वैत नाते व पवित्र विचार" ह्या विषयावर
व्याख्यान आयोजित करणे आहे !
जानेवारी महीन्याच्या " श्री गजानन आशिष " ह्या मासिकात वैद्य विजय रेंदाळकर यांचे
"अमेरिकेतील शिकागो येथिल स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पवित्र तीर्थस्थाने ! "
ह्या लेखात आपले अमृतानुभव मांडले आहेत !
ओक्टोबर २०१० मध्ये रेंदाळकर सर ३ महिने शिकागो येथे वास्तव्यास होते, त्या दरम्यान विवेकानंदांच्या
पदस्पर्शाने पवित्र स्थानी आलेले अनुभव , स्वामी विवेकानंद केंद्रित ग्रंथमाला चे अध्ययन करुन झालेला विवेक
हे ह्या लेखा चे वैशिष्ट्य !
तरी विवेकानंदांचे मौलिक विचार व त्यांचा अभ्यास करताना स्वतः वैद्यांना आलेले अनुभव हे सर्व भारतीयांसमोर
यावेत अशी स्वामी आज्ञा असल्याने ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करणे आहे !
येत्या वर्षी जाने १२ बुधवार किंवा पौष कृष्ण ७ ला विवेकानंद जयंती निमित्त विशेष कार्यक्रम असल्यास त्यात
व्याख्यान आयोजनाचे कार्य होईल का ? याबाबत कळवावे !
धन्यवाद !
आपल्या विभागात माझे नियमित येणे नसल्याने , कार्यालये व संबद्धित संस्थांशी संपर्क नाही !

तेव्हा आपण मार्गदर्शन करावे !

* मेल वर प्रत्युत्तर मिळावे ही आशा ठेवतो .


प्रेषक

वैद्य प्र. प्र. वाघमारे ,सानपाडा ,न.मुं.७०५.
९८६७ ८८८ २६५

वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आ्रणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :


Thursday, December 2, 2010

आयुष दर्पण

आपण सर्वच जानता आपले लाडके मासिक तिन महिन्यातून एकदा आपल्या घरी येते .
आपले प्रेम दिवसे दिवस वाढत आहे . आपले प्रतिसाद आम्हाला भेटत आहेत. सर्वात जास्त प्रतिसाद आमच्या ( स्त्री भ्रूण हत्ये च्या विरोधातील चलवलिला  आहे . तुमचे अश्याच प्रतिसद्ची अपेक्षा होती . तुमचे मानावे तितके आभर थोडेच आहेत .


(http://www.facebook.com/pages/Faizpur-India/Ayush-Darpan/101294789927330 ) या facebook page वरुण आमचे कार्य आपल्या ला माहितच आहे . तरी जाहिरात आणि मासिकाच्या सद्स्यत्वाची रक्कम  ही अशी                                                                                                     
                                                                                      
आणि सदस्यत्वाची रक्कम पुढील प्रमाणे आहे                   

Subscription Charges INR Charges USD
One YearRs. 60.00$4.00
Two YearRs. 100.00$7.00
Five YearRs. 400.00$10.00
Life MembershipRs. 2000.00 $12.00
Life Membership(Institutes)Rs 5000.00$20.00
   
      सम्पर्क :
Address
Murli Ganga Smriti Bhawan
Tildhukri  District  -PITHORAGARH-262501
UTTARAKHAND, INDIA
MOB.+919760846878
PSTN:+915964223049


Visit Our Page