Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, December 18, 2010

अंजीर

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.
अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.
अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते

No comments:

Post a Comment

Visit Our Page