संतुलन ढासळलेले बरेच लोक आजकाल आयुर्वेदावर बोलत आहेत. नाही म्हणजे आयुर्वेदावर बोलायला आमचा अजिबात विरोध नाही आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात आयुर्वेद आणला तर आम्हाला आनंदच होईल कारण आयुर्वेद हि एक परिपूर्ण जीवनशैली आहे, निरोगी राहण्याचा मूलमंत्र आहे. पण आपल्या सोयीप्रमाणे जर कोण आयुर्वेदाचा वापर स्वताच्या व्यावसायिक संतुलनासाठी करत असेल तर नक्कीच आम्हाला ते सहन होणार नाही. वैद्यराज गोगटे, नानल, गाडगीळ , प्र ता जोशी (नाना ), पेंडसे यासारख्या अनेक दिग्गजांनी हाच आयुर्वेद लोकांपर्यंत पोचवायला आपलं जीवन खर्ची घातल आहे. आणि जर ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असेल तर जाहीरपणे काहीतरी बोलावच लागेल. दुर्दैव हेच आहेच कि आपल्यातलेच काही लोक यांना उगाच खांद्यावर घेऊन नाचत आहेत.कुठलिही आयुर्वेदाची पदवी नसताना ,MCIM -CCIM च reg नसताना सुद्धा आपल्याच काही वैद्या नी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे आणि या आयुर्वेदाच्या स्वयं घोषित गुरूंना आपले गुरू मानून आपली आयुर्वेदाची डिग्री गहाण ठेवली आहे.
बरं ठीक आहे तुमी तुमचं संतुलन घ्या बिघडवून आम्हाला त्याची खंत नाही पण आमच्या आयुर्वेदाचा संतुलन तरी राखून या गोष्टी करा जेणेकरून लोकांपर्यंत चुकीची माहिती अथवा गैरसमज पसरणार नाहीत. आणि चरक सुश्रुत वाग्भट यांनी मांडलेले आयुर्वेदातले सिद्धांत जर तुम्ही जसेच्या तसे स्वतःच्या नावावर खपवत असाल तर खरच आपण सर्वात मोठे वाङ्मय चोर आहात. यापुढे याच भान नक्की राखा कारण लोकांना तुम्ही मूर्ख बनवू शकता पण आयुर्वेदातील दिग्गजांनी निर्माण केलेल्या या सर्व शिष्याना नाही. कारण यापुढे आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या मार्गाने जिवंत ठेवायचा त्यांना लोकांच्या मनात रुजवण्याचा विडा तर आम्ही उचलला आहेच पण बरेच विडे उचलण्याची ताकत पण आमच्यात आहे बरं का !!! आमचं एव्हढंच म्हणणं आहे कि ज्या आयुर्वेदामुळे तुम्ही मोठे झालात त्या आयुर्वेदाला फक्त आदर द्या बदनाम नका करू. जय आयुर्वेद ।।।।।।
©वैद्य सचिन रामकृष्ण पाटील
एम.डी. आयुर्वेद
पंचकर्म तज्ञ
9823347244
राजाश्रयाशिवाय वैद्येतर व्यक्ति ईतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आणि सिस्टीम ला वेठीस धरू शकत नाही.
ReplyDeleteराजाश्रयाशिवाय वैद्येतर व्यक्ति ईतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आणि सिस्टीम ला वेठीस धरू शकत नाही.
ReplyDeleteछान मत डॉ प्रशांत सर.
ReplyDelete