Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, May 31, 2016

तंबाखु सेवन एक दुष्टचक्र

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे

 🍀 तंबाखु सेवन एक दुष्टचक्र ☘

तंबाखु सेवन हा भारतातील स्री पुरूष दोघांतही आवडीने चघळणारा जाणारा एक प्रमुख व्यसनी पदार्थ आहे. तंबाखु चघळल्याने कर्करोग होण्याचा धोका अत्याधिक असतो हा फार लांबचा विचार झाला.
             तंबाखु सेवनाने काहीही त्रास झाला नाही असे खाणारे लोक सांगतात. सोबतच सकाळी सुखकारक मलप्रवर्तन होते, पोट गच्च व्हायचे टाळले जाते, भुक लागते असे तंबाखुचे अनेक फायदे सांगितले जातात..
            आजपर्यंत तंबाखु खाण्याचा शरीरावर काय परिणाम झालाय याचे साधे परिक्षण म्हणजे तोंड ४ बोट सुखाने उघडते का हे पाहाणे होय.
            तंबाखु खाण्यारया लोकांत ते ३ किंवा २ किंवा त्याहीपेक्षा कमी उघडते हे प्रत्यक्ष स्वतः करून पाहीले तरी कळते त्यासाठी काही कागदी तपासणी करावयाची गरज नाही..
             शरीरातील सर्व क्रिया गती ह्या वाताशी संबधीत असतात. अशा ह्या वाताला विषवत गुणधर्म असलेल्या तंबाखुद्वारे प्रेरणा दिली जाते ती मग सकाळी सुखसारक मलप्रवर्तनासाठी असो वा जेवल्यानंतर पोट गच्च होऊ नये अन्नपचन नीट व्हावे याकरिता असो.
तंबाखु तात्काळ परिणाम न दाखवता कालांतराणे परिणाम दाखवते कारण ते तीव्र स्वरूपाचे विष नाही.
               मुखाची opening आकाशीय गुणधर्म कमी झाल्याने अन्नपचनची सुरूवातच तंबाखु खाणारया लोकांत बिघडवली जाते.. पुन्हा अन्नपचन होण्यासाठी व पोटाचा गच्चपणा टाळण्यासाठी तंबाखु जेवनानंतरही बडीशेप प्रमाणे खाल्ले जाते. असे तंबाखुचे दुष्टचक्र वर्षानुवर्ष चालते. आणि चक्राची गतीही वरचेवर वाढत जाते. तंबाखु नाही मिळाले तर वाताला प्रेरणा मिळत नाही. सुखकारक मलप्रवर्तनापासुन ते पोट गच्च राहणे, अन्नपचन नीट न होणे असे त्रास सुरू होतात..
        तंबाखुच्या दुष्टचक्रातुन जितके होईल तितके लवकर बाहेर पडावे. त्यासाठी योग्य आयुर्वेदीय सल्ला जवळच्या वैद्याकडुन घ्यावा..

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

Tuesday, May 24, 2016

स्तनपान


आयुर्वेद कोश ~ स्तनपान !!
मातृत्व म्हणजे काय हे सांगता किंवा लिहिता येत नाही . ते अनुभावावाच लागतं . हे भाग्य आणि  समाधान पुरुषांना नाही . . असो !!  स्तनपान याबाबत समाजात अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत . यातील सर्वात दुर्दैवी अशी पद्धत म्हणजे 'सौंदर्याच्या कारणाने ' बालकांना स्तनपान न देणे . काय करावे अशा विचारांचे ? केवळ दुर्दैव अशा शब्दात याचे वर्णन करावे लागेल . . . आधुनिक विज्ञानानुसार बालकांना लगेच स्तनपान द्यावे असे मत आहे . आयुर्वेद मात्र ३ ते ४ दिवसा नंतर स्तनपान द्यावे असे सांगतो . . . अनेक लोक आमच्या बाळाच्या चांगल्या विकासासाठी काय करू असे विचारतात . . . कोणती औषधे घेऊ ? काय सप्लिमेंट देऊ याच्या 'इ शोधात ' असतात . अशा लोकांना माझे एकच सांगणे असते . . .
'' बाबारे . . घरचे वातावरण आनंदी ठेव ''
स्तनपान ही काही 'तांत्रिक ' गोष्ट नाही . म्हणजे आपण नळाखाली भांडे ठेवले आणि नळ सुरु केला की तुमची इच्छा असो वा नसो . तुम्ही आनंदी असा किंवा चिडलेले त्यातून पाणी येणारच . . अशी ही तांत्रिक क्रिया नाही . . यात भावनिक गुंतवणूक ही फार मोठ्या प्रमाणात असते .
'' स्नेहो निरन्तरस्य प्रवाहे हेतूरुच्यते ''
प्रेम हे नेहमी स्तन्याच्या उत्पत्तीस कारणीभूत असते . हे प्रेम आईला आपल्या अपत्या बाबत वाटणारे जितके महत्वाचे तितकेच घरात एकमेकाबद्दल असणारे आणि सर्वाना बालका बद्दल असणारे प्रेम महत्वाचे . त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी इतर काही शोधत बसण्यापेक्षा घरी प्रेमाचे वातावरण ठेवावे हे महत्वाचे . (टीप - बालकास काही आजार असतील तर औषध योजनेची आवश्यकता असते . परंतु जेव्हा स्तनपानाचा विषय येतो तेव्हा 'आनंदी वातावरण ' हे 'प्रिस्क्राईब्ड ' आहे असे समजावे )
स्तनपान कसे करावे याचा विधी आयुर्वेदात वर्णीत आहे :-
१. मातेने उत्तम वस्त्रे धारण करावीत .
२. आपले तोंड पूर्व दिशे कडे करावे .
३. आपले स्तन पाण्याने चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावेत .
४. प्रथम उजव्या स्तनातील थोडे दुध काढून टाकावे . असे दुध नाही काढले तर बाळास उलटी , खोकला , श्वास असे विकार होतात . हाच नियम डाव्या स्तनाच्या बाबत .
५. बालकाचे मुख पूर्वेकडे करून पुढील मंत्र म्हणून स्तनपान द्यावे .
मंत्र :-
''क्षीरनीर निधीस्तेSस्तु स्तनयो : क्षीरपूरक :
सदैव सुभगो बालो भवत्वेष महाबल :
पयो s मृतसमं पीत्वा कुमारस्ते शुभानने
दिर्घमायुरवाप्नोतू देवा : प्राप्यामृतं यथा ''
अर्थ :-क्षीरसागर तुझ्या स्तनाला क्षीर पुरवणारा असो . तुझे बालक पराक्रमी होवो . अमृतासारखे दुध पिवून बालक दीर्घायुषी होवो . जसे देव अमृत पिवून दीर्घायुषी झाले .
हा मंत्र बालकाच्या वडिलांनी म्हणावा आणि मंत्र संपे पर्यंत आईने स्तनास स्पर्श करावा असा निर्देश आहे . पण सध्याची धावपळ बघता आईने हा मंत्र म्हणायला हरकत नसावी !!
स्तनपान देत असताना बालकास नीट पद्धतीने धरणे आणि त्यास स्तनपान करणे सोपे जाईल याची काळजी घेणे हे महत्वाचे !!
आईचे दुध हे बालकास जीवन देणारे , शरीराची वाढ करणारे असे आहे . बालकांच्या हक्काच्या हक्का पासून त्यांना वंचित ठेवू नये ही विनंती !!!
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश
9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Sunday, May 22, 2016

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
        आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंघोळीनंतर काय ? भाग 9
प्रसन्नपणे आंघोळ झाली. छान मस्त कपडे परिधान केले. आता कुठे जायचं ?
देवघरात !
हं.
किमान 10 मिनीटं देवासमोर बसावं. त्याचं रूप आठवावं. त्याच्याशी एकरूप व्हावं.
त्याचंच सूक्ष्म रूप म्हणजे "मी" आहे हे जाणावे. हा सकारात्मक  अहं जागृत करावा.
कोऽहंचं उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
ते उत्तर सोऽहं आहे, या आनंदी अवस्थेत भानावर यावं, समोरच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार घालावा.
*"देवा, तुझ्याच कृपेमुळे आतापर्यंतचा माझा प्रत्येक क्षण आनंदात गेलाय, यापुढेही तू मला आनंदात रहायला शिकव.*
*तू जी परिस्थिति निर्माण करतो आहेस, ती माझ्या हिताची आहे, हे समजून घ्यायला तूच मला मदत कर.*
*सुख किंवा दुःख काहीही असो, मला स्थिरबुद्धी बनव.*
*असेल त्या परिस्थितीत संधी निर्माण करण्याची दृष्टी मला तू दे.*
*या संधीचे सोने बनवण्याची माझी हिंमत कमी होऊ देऊ नकोस*
*शेवटपर्यंत माझे प्रयत्न कमी पडणार नाहीत, हे धैर्य तू मला दे.*
*तुझ्यावरचा माझा विश्वास किंचीतही हलू देऊ नकोस.*
*देवा, मला दुसरं काहीही नको.*
*हेची दान देगा देवा*
*तुझा विसर न व्हावा !"*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून केलेली अशी आर्त प्रार्थना "त्याच्या"पर्यत पोचते, यावर आपला विश्वास हवा, (नसल्यास निर्माण व्हायला हवा.) यालाच श्रद्धा म्हणतात. या श्रद्धेनेच अनेक रोग बरे होतात. हा अनेकांचा अनुभव आहे.
(... श्रद्धया हरिसेवनम् )
देवासमोरची ही दहा मिनीटे, या आत्म्याची त्या परमात्म्याशी झालेली भेट असते.
या अलौकीक भेटीला नंतर नंतर दहा मिनीटं सुद्धा लागत नाहीत, एक क्षणदेखील पुरेसा असतो.
( ....पातुं विष्णुपदामृतम् )
( उभा क्षणभरी...तेणे मुक्ती चारी)
 एकमेकांचा सहवास, सान्निध्य हे ऊर्जा प्रदान करणारे असते.
माहेरचा माणूस भेटल्यानंतर कित्ती उर्जावान होतो ना आपण ! खूप आनंद होतो ना !
लाईटचं बटन दाबल्यावर कसा लख्ख उजेड पडतो,
अगदी तस्सच वाटतं,
या जीवाला, शिवाला भेटल्यावर !!
*फक्त ही भेट घडवणं महत्वाचं असतं.*
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
23.05.2016.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

गव्हांकुर रस

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
       🌾 गव्हांकुर रस 🌾
हल्ली विविध आजारांसाठी गव्हांकुर रस पिण्याचा प्रघात वाढत आहे. पाश्चात्यांचे अनुकरण श्रेणीतील आणखी एक प्रकार म्हणता येईल याला. गव्हांकुराला आयुर्वेदीय दृष्टीने पाहणे आवश्यकच कारण हा निसर्गनिर्मित पदार्थ व गव्हांकुर रस घेणारे लोकही आयुर्वेदाच्या नावाने पित असतात.
            गव्हांकुराचा गवतात म्हणजे तृणधान्यात समावेश होतो. क्षुद्रधान्याला तृणधान्य देखील म्हणतात. मनुष्य गहु, ज्वारी, तांदुळ, डाळ, फळे या बीज भागरूपी पदार्थांचा उपयोग खाण्यासाठी करतो. प्राण्याप्रमाणे कडबा, चिपाडे, गवताचा चोथा खाण्यासाठी वापरत नाहीत त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे आतडे असे पदार्थ पचवण्यास असमर्थ अाहेत व मनुष्य रवंथ करणारा प्राणीही नाही.
              गवताचा रस हा आयुर्वेदीय शास्रानुसार स्वरस कल्पनेतील असल्याने  पचावयास अतिजड असतो आणि असा अतिजड रस मनुष्याला पचवावा लागतो. गवताच्या रसापेक्षा ज्याबीजभाग गव्हापासुन गवत बनते त्या गव्हापासुन बनलेल्या पीठावर अग्निसंस्कार करून पोळी स्वरूपात खाणे चांगले नाही का ?? हा प्रश्न मनाला पडायला हवा. कारण आजकाल supplyments चीच चलती आहे शरीरासाठी अत्यावश्यक असलेला गहु ज्वारी तांदुळ दुध तुप असा मुख्य आहार मुख्य प्रवाहातुन दिवसेंदिवस कमी होत आहे. याउलट  supplymentory lab made product मोठ्या संख्येने वाढत आहेत आणि खाल्लेही जातात. त्यामुळेच आजारी लोकांची संख्या वरचेवर बुलेट ट्रेन प्रमाणे वाढत आहे असे म्हटल्यास चुकिचे ठरू नये..
       गवत वा गवताचा रस खायचा प्यायचा की गहु ज्वारी तांदुळ दुध तुप दाळी भाज्या यासारखे बीज भागरूपी अन्नधान्यावर संस्कार केलेले पदार्थ खायचेत ते स्वतः च्या डोळस बुध्दीनेच ठरवावे.
     मुख्य आहार खाऊनही पोषण कमी पडत असेल तरच  supplymentory आहाराचा विचार करावा तोही निसर्गनिर्मित. Lab मध्ये बनविलेल्या कृत्रीम पदार्थाचा नव्हे..
            कारण निसर्ग निर्मित पदार्थ शरीरासाठी सहजसात्म्य होतात याउलट कृत्रीम पदार्थांवर जाठराग्नि, पांचभौतिक अग्नि, धात्वाग्नि यांचे संस्कार होत नसल्याने कृत्रीम supplymentory पदार्थ आपोआपच पचन न होता शरीराबाहेर पडतात. कृत्रीम पदार्थ खाण्याचे व शरीराबाहेर काढण्याचे विनाकारण कष्ट मानवी शरीराला घ्यावे लागते त्याद्वारे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होते..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no-- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no

Saturday, May 21, 2016

मिरची

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
           🌶  मिरची 🌶
कटुवीरा महातीक्ष्णा स्मृता ज्वालामुखी च सा |
कटुवीराग्निजननी बलासघ्नी रूचिप्रदा ||
हन्त्यजीर्णं विसुचीं च कुक्कुराखुविषं हरेत् ||
                                       कनोभट्ट
तापमान अर्धशतक पार करत असताना अतिप्रसिध्द लोकांकडुन हिरवी मिरची उन्हापासुन संरक्षणार्थ खाण्याचा सल्ला दिला जात आहे..antioxidants च्या नावाने..
           मिरची चे पर्यायी नावही महातीक्ष्णा अतितीक्ष्ण, ज्वालामुखी असे सांगितलेत. ही पर्यायी नावे मिरचीच्या गुणधर्मानुसारच सांगितली आहेत.
          आगोदरच सुर्य आकाशातुन आग ओकतो आहे तापमानाचे नविन नविन विक्रम मोडत आहेत. अश्या काळात हिरवी मिरची खाण्याचा सल्ला म्हणजे आगीत रॉकेल ओतल्या सारखेच आहे..
          जे पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने सुर्याच्या उष्णतेमुळे जसे बाह्य वातावरणातील उष्णता वाढते त्याचप्रमाणे शरीरातील उष्णताही बाह्य वातावरणातील उष्णतेमुळे आपोआपच वाढते.. अशा उष्णतेच्या काळात बरेच लोकांत आपोआप तोंड येते हिरवी मिरची सोडा पण साधे एरवीही खाल्ले जाणारे तिखट पदार्थ ही खाण्यास त्रासदायक ठरतात.  हिरवी मिरचीच तर फार लांबचाच आहारीय पदार्थ ठरतो या काळात..
                    आयुर्वेदीय शास्रानुसार उन्हाळ्यात या गोष्टी टाळावयास सांगितल्यात 👇​👇​👇​
"" लवणाम्लकटुष्णानि व्यायामं च विवर्जयेत् "" |
उन्हाळ्यात मीठ आंबट तिखट रसाच्या गरम गुणात्मक पदार्थ टाळावेत वा अत्यल्प असावेत असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
     
उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी 👇​👇​👇​
स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम् || शीतं सशर्करं मन्थं... |
घृतं पयः सशाल्यन्नं भजन् ग्रीष्मे न सीदति ||
            गोड थंड द्रवबहुल स्नेहयुक्त, खडीसाखर युक्त जल, दुध तुप साळीचे तांदुळ यांचा नित्य उपयोग केला उन्हाळ्यातील त्रासापासुन बचाव संरक्षण करता येते.
            हिरवी मिरची खायचीय की दुध तुप खडीसाखर पन्है सरबता साखरे पदार्थ याचा स्वतः विचार करावा.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no

Friday, May 20, 2016

याला जबाबदार कोण ?


#घरोघरी_आयुर्वेद
याला जबाबदार कोण??
गेल्या महिन्यात एक रुग्णा आली होती. रुग्णा पित्त प्रकृतीची असून मासिक स्राव अत्यधिक प्रमाणात आणि सतत तोंड येणे अशी तिची तक्रार होती. दोन्ही लक्षणे पित्ताशी संबंधित असलेली होती.
आहार-विहाराची सखोल चौकशी नेहमीप्रमाणे केली. गेले सहा महिने रोज सकाळी २-३ चमचे गोमूत्र अर्क घेण्याची सवय. कोणी घ्यायला सांगितला असे विचारल्यावर उत्तर आले की 'अमक्या-तमक्या बाबा/बुवांच्या कुठल्यातरी मासिकात दररोज गोमूत्र अर्क घेतल्याने आरोग्य उत्तम राहते' असे एका 'गव्यचिकित्सकाने' लिहिले होते. या रोजच्या गोमूत्र अर्क प्राशनाशिवाय अन्य कोणतेही पित्त वाढवणारे कारण नव्हते. जेव्हापासून गोमूत्र घेणे सुरु केले त्याच्या अगदी पुढच्या महिन्यापासून हा सगळा त्रास सुरु होता. अगदी जुजबी औषधे देऊन आणि 'गोमूत्र अर्क' घेणे बंद करायला सांगून तिला परत पाठवले. इतका उन्हाळा असूनही या महिन्याच्या मासिक धर्मात काही त्रास नाही आणि तोंड येण्याची तक्रारही नाही. थोड्क्यात; रोजचे गोमूत्र अर्क प्राशन हे या तक्रारीचे मूळ होते. याला जबाबदार कोण?
आयुर्वेद लाख चांगला; पण वैद्यांच्या सल्ल्यानेच!! 'गव्यचिकित्सा' या गोष्टीचे सध्या पेव फुटत आहे. त्याबाबत तारतम्य बाळगणे अत्यावश्यक आहे. ही कोणतेही स्वतंत्र चिकित्सापद्धती नाही; आयुर्वेदाचाच भाग आहे तो. त्याला स्वतंत्र उपचार पद्धती समजण्याची चूक करू नका. मी स्वतः गेली पाच वर्षे गायींच्या क्षेत्रात काम करत आहे. अगदी उद्याच मी एका गव्यचिकित्सा परिषदेत भाषण करणार आहे. मला या सगळ्या प्रकारांविषयी संपूर्ण माहिती आहे. मात्र या क्षेत्रातील काहीजणांची वाटचाल भरकटते आहे. गोमूत्र कितीही उपयुक्त असले तरी औषध आहे; आहार नव्हे. ते उष्ण आहे; हमखास पित्त वाढवते. त्यामुळे ते पिताना वैद्यकीय सल्ला आवश्यकच आहे. आहार म्हणून दूध-तुपाचा रोज वापर करावा. गोमूत्राचा नव्हे.
सरटेशेवट; आयुर्वेदाबद्दल उठसूट कोणीही लिहू नये असे आम्ही वारंवार का सांगतो त्याचे हे आणखी एक बोलके उदाहरण. आपल्या आरोग्याची काळजी असेल तर अनायुर्वेदियांनी लिहिलेल्या 'आयुर्वेदात म्हटले आहे' या वाक्याच्या मायजालातून बाहेर या आणि आपल्या 'शुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा देणाऱ्या' वैद्यांच्या सल्याशिवाय कोणतेही आयुर्वेदीय औषध घेऊ नका! 
© वैद्य परीक्षित शेवडे;
(श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद- डोंबिवली)
संपर्क : ०२५१-२८६३८३५

Tuesday, May 17, 2016

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?.....हा घ्या उपाय!!
तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर 'स्पीच थेरपी'चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक 'अखेरची आशा' म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात 'वाक्शुद्धिकर' म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास अशा रुग्णांना उत्तम लाभ होतो हा आजवरचा प्रत्यक्षानुभव आहे.
मात्र या औषधी उपचारासहच मी आग्रही असतो ते मंत्र-उपचारासाठी. दचकू नका; मंत्रोपचार हा शब्द उच्चारताच लगेच काही कोणी बाबा-बुवा ठरत नाही. औषधी आणि मंत्र असे दुहेरी उपचार अनेक व्याधींत लाभदायक ठरतात. अर्थात; केवळ 'मंत्रानेच' व्याधी बरा होतो असे मत मांडणे योग्यही नाही आणि शास्त्रसंमतदेखील नाही. पण; मंत्रांचा उपयोग चिकित्सेला जोड-उपचार म्हणून केल्यास 'अधिकस्य अधिकं फलम्|' ठरते.
वाणीशुद्धि करणारा हा मंत्र म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आद्य शंकराचार्य रचित 'नर्मदाष्टक स्तोत्र' आहे. वाचकांसाठी हे स्तोत्र मुद्दाम देत आहे. त्यातील शब्दरचना नीट पहा. जिभेची काय बिशाद आहे न वळण्याची?!
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥
त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं
कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।
सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥
महागभीरनीरपूरपापधूतभूतलं
ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ।
जगल्लये महाभये मृकण्डसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥
गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा
मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा ।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥
अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ।
वसिष्ठसिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥
सनत्कुमारनाचिकेतकश्यपादिषट्पदैः_
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः ।
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥
अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ।
विरञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ।
दुरन्तपापतापहारिसर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।
सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥
जेव्हा कुठल्याही 'स्पीच थेरपी'चा उगम झाला नव्हता तेव्हा आयुर्वेदीय औषधींसह याच 'स्पीच थेरपी'चा वापर कित्येक वैद्य यशस्वीपणे करत होते. आजही करतात. अर्थात; हे सारे श्रेय श्रीमद् भगवत्पाद आद्य शंकराचार्य यांचेच. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तकारण. आजच आचार्यांची जयंती. आपल्याला वाचा दोष असो वा नसो; या स्तोत्राचे दैनंदिन पठण अवश्य करा.
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदज्ञ- लेखक- व्याख्याते)
|| श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद || डोंबिवली
०२५१-२८६३८३५
 
 

आपला आहार


                  आपला आहार

        कित्येकदा पोटभर खाऊनसुध्दा हातपाय गळणे, अशक्तपणा जाणवणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे, उत्साह कमी होणे, केस गळणे, थकवा वाटणे अशी लक्षणे दिसतात. कारण आपल्या दैनंदिन आहारात पौष्टीकता, जीवनसत्वे, लोहतत्वादींचा ­रहास होत आहे. याकरिता पौष्टीक व संतुलित आहाराबाबत नेहमी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. 
महाराष्ट्रीयन जेवणाचा विचार केला तर अगदी परीपुंर्ण असा आपला आहार आहे. परंतु फॅशनच्या प्रवाहात हे मराठमोळे ताट दुर्लभ होत चालले आहे. वरण, भात, भाजी, पोळी, कोशिबिंर, ताक, कडधान्याच्या उसळी अशा सर्व विविधपदार्थानी पूर्वी आपले ताट भरलेले असायचे. त्यामूळे आपल्याला शरीरावश्यक सर्व घटक एका जेवणातून मिळत असत.

* दररोजच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या जसे काकडी, टमाटर, गाजर, मुळा, पालक, मेथी, कद्दु, पत्तागोबी या भाज्या किंवा यांचा रस घ्यावा. शक्य असेल तर पालेभाज्या उकडून घ्याव्यात.


* सर्व प्रकारची फळे किंवा फळांचा रस पोटभरुन घ्यावा. 


* मोड आलेली मटकी, मुग, सोयाबीन, चवळी इत्यादी कडधान्ये खावे. 


* अधुन मधुन मलाई काढलेले दुध, ताजे ताक घ्यावे.


* कधी कधी मुगाच्या डाळीचे पाणी, मुगाच्या डाळीची खिचडी खावी. 


* तंतुमय पदार्थांचा अधिक वापर करावा. 

* खुप भुक लागत असेल तर चुरमुरे, लाह्रा हे कमी कॅलरीजचे पण लवकर पोट भरल्याची संवेदना देणारे पदार्थ खावेत. 


* दररोजच्या जेवणामध्ये घरी बनवलेले चांगले कडविलेले साजुक तुप एक चमचा या प्रमाणात खावे. 


* तसेच जेवणामध्ये गुळ व शेंगदाणे याचा देखील समावेश करावा. 


* याप्रमाणे दररोजच्या आहारामधील एक चपाती किंवा भात-भाकरी कमी करुन पालेभाज्या, फळे, फळांचा रस, कडधान्ये, ताक यांचा अवश्य समावेश करावा. 


* आहारातील गोड पदार्थ, डालडा, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, दररोजचा मांसाहार, किंवा दररोजचे हॉटेलमधील जेवण इत्यादी गोष्टी बंद करावे. 


या प्रमाणे सर्वसमतोल, सर्वसमावेशक असा नैसर्गिक आहार घेतल्याने शरीरावर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न होता आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 


धन्यवाद.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
विविध आजारांसाठी आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्म उपलब्ध.
पद्मा नगर, बार्शी रोड,
लातूर. ०२३८२ २२१३६४
 
 
 

चेहरयावरील सुरकुत्या

               चेहरयावरील सुरकुत्या

          त्वचेवर सुरकुत्या येउ लागल्यास आपले शरीर वृध्दत्वाकडे झुकु लागले आहे याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरकुतलेल्या त्वचेबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती असते. चाळिसीच्या आसपासच्या स्त्रिया आपल्या चेहरयावरील सुरुकुत्या लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. आपण जास्तीत जास्त काळ चांगले दिसावे अशी सुप्त इच्छा त्यामागे असते. त्यासाठी ब्युटिपार्लरच्या चकरा, वारंवार फेशीयल करणे, जाहीरातीमध्ये दाखविण्यात येणारी विविध महागडी क्रिम्स वापरणे इत्यादी उपाय केले जातात. वयाच्या एका ठरावीक मर्यादेनंतर सुरकूत्या पडू लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. परंतु वय कमी असताना सुरकुत्या पडणे हे आरोग्यामध्ये बिघाड दर्शिवणारे आहे. शरीरामध्ये रुक्षता किंवा कोरडेपणा वाढणे हे सुरकुत्या पडण्याचे एक कारण होय. चेहरयावरील त्वचा मुळात नाजुक असल्याने वयाचा किंवा कोणत्याही आजाराचा चेहरयावर लगेच बदल जाणवतो, कोरडेपणा वाढला की त्वचा आकसल्यासारखी होते . एरवी आपण पाहतो की भाज्या किंवा फळे बाहेर हवेत तशीच राहिली की त्यातील रस किंवा ओलावा कमी होउन ते वाळतात व लगेच सुरकुततात. संत्री , चिक्कु, आंबा किंवा सफरचंद यासारखया फळामध्ये आपण हा बदल अनुभवू शकतो. तसेच काहीसे त्वचेचे होते, त्वचेमधील स्निग्धताच कमी झाल्याच हा परिणाम असतो. कारण काहीही असली तरी चेहरयावरील सुरकुत्यामुळे सौंदर्यात बाधा येते, हे निश्चित. मग यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण बघु या.

* यामध्ये आयुर्वेदातील रसायन चिकित्सा ही अत्यंत फलदायी आहे. रसायन याचा अर्थ पेशींचे पुनर्जीवन करणारी चिकित्सा होय. आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थ उत्तम रसायन गूण देणारे असतात. जसे दूध, तूप, मध आणि आवळा, फळे इत्यादी पदार्थ प्रत्येकाला सहज पणे मिळतील असे आहेत. आवळा आपण मोरावळा किंवा च्यवनप्राश या स्वरुपा मध्ये वर्षभर घेऊ शकतो. आपल्या प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने आपण रसायन विधी सेवन करावा. 

* बाह्य उपचारामध्ये सर्वांगाला अभ्यंग म्हणजे मसाज हा अत्यंत महत्वाचा उपचार होय. मसाज केल्याने त्वचा व स्नायू यांना बळ मिळते. त्वचेचा नॅचरल टोन टिकून राहतो. त्वचेचे झिजलेले थर निघुन जातात व नवीन तजेलदार सूंदर मुलायम त्वचा प्राप्त होते. मालिशकरिता तीळ तेल, कुंकुमादी तेल, बदाम तेल इत्यादी तेल प्रकृतीनूसार वापरावे. 

* चेहरयाला मसाजसोबत काही विशिष्ट वनौषधींचे लेप लावल्याने देखील फायदा होतो. हे लेप ठरावीक वेळेस व ठरावीक जाडीचे लावायला हवे. मसाज वाफारा व त्यानंतर लेप हे उपचार तदण्यांच्या देखरेखीखाली करावे.

* कोरफडीचा गर काढुन तो हळद टाकून फेसावा व चेहरयाला लावावा. मध आणि साय हे मिश्रण चांगले घोटून चेहरयाला चोळावे. 

* मसूरीचे पीठ, काकडीचा रस व मध असा लेप एकत्र करुन नियमितपणे चेहरयाला लावावा.
असे काही घरघुती उपचार आपण सुरकुत्या घालविण्यासाठी करु शकतो. 

* त्यासोबत दररोज कमीत कमी ३० मिनीटे फिरायला जावे. योगासने करावीत. ओंकार, ध्यान, शवासन, सर्वांगासन इ. करावे. 

* सर्वात महत्वाचे ताण तणाव रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सदैव आनंदी राहावे.

डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पंचकर्म * त्वचा रोग़़ * सौदर्य समस्या * केसांचे विकार * गर्भसंस्कार
लातूर
मो. ०९३२६५११६८१

Monday, May 16, 2016

अन्नरूपी इंधन

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
   🍜🍲  अन्नरूपी इंधन 🍧🍨
बलमारोग्यमायुष्य प्राणाश्चाग्नौ प्रतिष्ठिताः |
अन्नपानेन्धनैश्चाग्निर्ज्वलति व्येति चान्यथा  || च.सु.
शरीराचे बल, आरोग्य, आयुष्य, प्राण हा जाठराग्नि (भुकेवर), पर्यायाने अन्नपानरूपी मिळणारया इंधनावर अवलंबुन असतो. जाठराग्निला चांगले इंधन (अन्नपान) मिळाले तर बल आरोग्य आदींची प्राप्ती होते अन्यथा बल आरोग्य आदींचा क्षयच होतो....
समजण्यासाठी काही उदाहरणे👇​👇​👇​
१. रोज 90, 180 घेणारया लोकांत शुक्र ओजाच्या विरूध्द गुणात्मक असलेले मद्य (दारू) शरीरातील शुक्र ओज कमी करून बलनाशच करेल यात शंका नसावी..
   2. रोज २-३ तोटे तंबाखु सेवन करणारया लोकांत तंबाखु सेवनामुळे शरीरात वायु अत्याधिक प्रमाणात वाढतो सोबतच ओज शुक्र बल यांचा क्षयही होतो तो वरचेवर वाढत जातो.
        3.  नेहमी विरूध्द अन्न खाणारया लोकांत शरीरातील तयार होणारे रक्त दुषीत तयार होते असे दुषीत रक्त ह्रदय मेंदु ते त्वचा अशा सर्वच अवयवांना पुरविले जाते रोजच्या विरूध्द अन्न सेवनाने मज्जावह स्रोतस ( nervous system) चे आजार, ह्रदयाचे आजार, सर्व प्रकारचे त्वचाविकार निर्माण होतात. विरूध्दान्नसेवन टाळल्याशिवाय कुठलाही आजार पुर्णपणे टाळला जात नाही. कारण ज्या आहाराने त्रास होतो तो बदलला जात नाही.
          4. रोज शिळे अन्न खाणारे फोडणीचा भात, दोनवेळा गरम केलेले अन्न करून खाणारयांत अर्धडोकेदुखी, पोटरया दुखणे, तीव्र सांधेदुखी असे त्रास होतात. शिळे टाळल्याशिवाय कुठलाही त्रास कमी होत नाही रोज pain killers खावे लागतात.
             याऊलट आहारात दुध तुप गहु ज्वारी तांदुळ साळीच्या लाह्या फळभाज्या रूतुनुसार मिळणारी फळे अशा हितकारक आहाराचा नित्य वापर असेल तर बल आयुष्य आरोग्य आदींची प्राप्ती होते.
         जिभेचे लाड अहितकर पदार्थांनी पुरविले तर मग मात्र जाठराग्नि भुकेला अहितकारक पदार्थ पचवुन तयार होणारया  अहितकारक अाहारसाद्वारे शरीराचे पोषण करावे लागते. अशा अहितकारक आहाररसापासुन बल, आरोग्य, आयुष्य प्राप्त होणारच नाही कारण शरीरातील सप्तधातु व अवयव कमकुवतच बनत जातात..
          आयुर्वेदीय शास्रात आहाराला महत्व देण्याचे कारणच हे आहे. जो व्यक्ती हितकारक आहार विहार करेल तो निश्चितच निरोगी राहील.  नाहीतर वाढत्या वयानुसार कायम स्वरूपी टिकणारया रक्तदाब, मधुमेह, thyroid, सांधेदुखी, ह्रद्रोग या सारख्या आजारात anti ....drugs ते ... replacement, transplant करणे सारखे कृत्रीम उपाय वारंवार करावे लागतील कारण कृत्रीम उपाय शरीरासाठी सहजसात्म्य कधीच नसतात. याकरिता वेळीच जवळच्या वैद्याकडुन प्रकृति तपासुन आहार विहार पंचकर्माचा सल्ला घ्यावा आणि त्रास सुरू होण्यापुर्वीच टाळण्यासाठी प्रयत्न करावेत...
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
(For what's up post send your request messege on above mob no )

Sunday, May 15, 2016

सौंदर्याचे पैलू


सौंदर्याचे पैलू
सौंदर्याचे सर्व पैलू स्वतःत समाविष्ट केल्यानंतरच सुंदर व्यक्तीचे सौंदर्य परिपुर्ण होऊ शकते.
शारिरीक सौंदर्याबरोबरच मानसिक सौंदर्याचेही फार महत्व आहे. सुंदरतेचा अर्थ केवळ गोरीपान त्वचा, सुंदर नाक-डोळे, काळे घनदाट केसच नाही तर संपुर्ण शरीराची सूंदरता, सुडोलता आवशयक ऊंची , वजन, हावभाव , मधुरवाणी असणेही आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उठणे, बसणे, चालणे, बोलणे, कपडे घालण्याची पध्दत, व्यव्हारकुशलता, आपल्या कार्यातील दक्षता, अधिकार, कर्तव्याचे  भान, वडीलधारया व्यक्तींशी सन्मानजनक व्यव्हार, लहानांशी प्रेमपुर्वक व्यव्हार, निर्बल दुःखी लोकांबाबत दया, सामान्य न्यान या सर्व पैलूंचा विचार सौदर्याअंतर्गत केला जातो.
          मात्र या सर्व महत्वपुर्ण पैलुपुर्वी शरीर निरोगी राहणे हेही तेवढेच आवश्यक आहे. सौदर्यसाधनेत सर्वात प्रथम लक्षात घेण्याजोगा मुद्दाच आहे की आपले आरोग्य शारिरीक-मानसीक दृष्ट्या उत्तम राहत नाही, तोपर्यंत आपले सौदर्य आतून खुलणे शक्य नाही आणि बाह्यःत जोपासल्या जाणारया सौंदर्याची दीर्घकाळापर्यंत टिकण्याची मुळीच शाश्स्वती नाही. त्याकरीता आतूनच आपले सौदर्य कशाप्रकारे खुलविता येईल याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारची सुंदरता प्राप्त करण्यासाठी आपल्या आहारविहाराकडे योग्य लक्ष द्यायला पाहिजे.
               नियमितपणे योगासने व प्राणायामाचा अभ्यास करावा. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आहार सेवन इत्यादी नियमाचे नियमित पालन करावे. मानसिकरित्या स्वतःला प्रसन्न ठेवावे. जास्त चिंता करू नये. नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा.हसत राहावे. आशावादी व्हावे, तणावास आपल्या जीवनात स्थान देऊ नये.
            जीवनात चांगल्या प्रकारे जगावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आपण जसा व्यव्हार आपल्याशी ठेवतो तसाच व्यव्हार दुसरयांशी ठेवावा. दुसरयांचा आदर करावा. पण स्वतःचा सन्मानही कायम ठेवावा.              आत्मविश्वासासारख्या अमोघ शस्त्रास जीवनात महत्वपुर्ण स्थान द्यावे. योगाभ्यासाद्वारे शरीर निरोगी सुंदर व चेहरा आकर्षक बनविण्याचा प्रयन्त करावा. याप्रकारे सौंदर्याचे सर्व पैलु स्वतःच समाविष्ट केल्यानंतरच व्यक्तींचे सौदर्य परिपुर्ण होऊ शकते.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
OBESITY AND DIABETES REDUCTION CENTER
लातूर
व्हाँटस एप नंबर ०९३२६५११६८१

Saturday, May 14, 2016

धन्याचे सरबत


दैनंदिन आयुर्वेद ~ धन्याचे सरबत !!
उन्हाळ्यात पित्त प्रकृतीच्या लोकांचे बेसुमार हाल होतात . बाहेर हीट आणि शरीरात आगडोंब . त्यामुळे नक्की काय करावे ? या प्रश्नात उन्हाळा असह्य होतो . कितीही कोल्ड ड्रिंक , सरबते पिली तरी जीव काही शांत होत नाही . हा त्रास इतर प्रकृतीच्या लोकांना सुद्धा कमी अधिक प्रमाणात होतो . यातील प्रमुख दोन तक्रारी म्हणजे अंगाचा दाह होणे आणि दुसरी उन्हाळे लागणे . यापासून सुटका करायचा सोप्पा मार्ग म्हणजे फोडणीच्या डब्यातील 'धने ' !!
१ लिटर पाण्यासाठी अंदाजे ५० -६०  ग्राम धने घ्यावेत . धने वजनाने हलके असल्यामुळे ते भरपूर मावतात . ( हे प्रमाण ग्रंथोक्त नाही . ) घेतलेले धने खल बत्त्यात बारीक करून घ्यावेत आणि पाण्यात भिजत ठेवावेत . धन्याचा अर्क पाण्यात उतरण्यास वेळ लागतो त्यामुळे किमान ५-६ तास धने पाण्यात असावेत . नंतर धने पाण्यातून काढून घ्यावेत . धान्याच्या पाण्यात पिठी साखर घालून हे सरबत प्यावे .
धन्याचे सरबत :-
१. थंड .
२. उत्तम पित्त शामक .
३. उन्हाळे यांचे नाशक आहे .
वास्तवात धने हे अत्यंत गुणकारी आहेत . त्रिदोष नाशक असे हे धने तृष्णा कमी करणारे आणि  शरीराचे तापमान नियंत्रित करणारे आहेत . अरुची , अग्निमांद्य ,अजीर्ण , अतिसार , पोटात दुखणे , अर्श (पाइल्स ) , इत्यादी रोगात धन्याचा वापर गुणकारी आहे .
आपल्या सरबतात मात्र धने हे सशर्करा म्हणजे साखरे सह वापरणे अपेक्षित आहे . धन्याचे पाणी आणि साखर हे तहान  कमी करतात .  शरीराच्या आत होणारा दाह -जळजळ याचे शमन करतात . शरीरातील स्त्रोतसांचे विशोधन करतात . ( स्त्रोतस ही आयुर्वेदाने सांगितलेली विशेष संकल्पना आहे . शरीरात तयार होणाऱ्या भाव पदार्थांचे वहन स्त्रोतसातून होते असे सामान्य भाषेत म्हणता येईल . त्यांचे विशोधन म्हणजे त्यांच्या मार्गात काही अडथळा असेल तर तो दूर करणे .) तसेच धने हे मुत्र उत्पन्न करणारे आणि मुत्र शरीरा बाहेर टाकणारे असल्याने उन्हाळे लागणे यापासून सुटका होते .
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो . त्यामुळे धने हे इतके गुणकारी असले तरी त्याचा अतिरिक्त वापर हा शुक्र धातू क्षीण करू शकतो . त्यामुळे जेव्हा त्रास होईल तेव्हा 'औषधा सारखे ' म्हणजे २० -२५ मिली सरबत घ्यायला हरकत नाही . . . पण त्याचा अतिरिक्त वापर नको !!
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
दैनंदिन आयुर्वेद
9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Friday, May 13, 2016

ओटस्

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
         🌾 Oats 🌾
हल्ली भारतीय लोकांच्या आहारात नाष्टाच्या पदार्थांमध्ये oats नावाच्या अति थंड प्रदेशात उत्पन्न होणारया पदार्थाने शिरकाव केला आहे..
            Oats हा russia, canada, poland, finland, australia, united states, spain, united kingdom या १० अतिथंड वातावरण असलेल्या देशांत सर्वाधिक पिकतो. तसेच oats पिकण्यासाठी उन्हाळ्यात ही अतिकमी तापमान असण्याची आवश्यकता असते. भारतात उन्हाळ्यात ही सर्वत्र ४०-४५ च्या पुढे तापमान असते त्यामुळे भारतात oats हिमालयीन प्रदेश वगळता इतरत्र पिकण्यासाठी suitable वातावरण नाही..
          बर्फाळ प्रदेश व उत्तर पश्चिम युरोप oats शेतीसाठी अत्यंत उपयुक्त प्रदेश आहेत..
     आयुर्वेदीय शास्रानुसार जेथे  जे अन्न धान्य पिकते ते ते अन्न त्या प्रदेशात खाण्यासाठी उपयुक्त असते.
             कारण निसर्ग स्वतः च त्या त्या अन्नधान्याच्या रूपाने त्या त्या भागातील लोकांना आहार उपलब्ध करून देतो.
 उदा.. समुद्र काठावर भात साळी नारळ अत्याधिक तयार होतात. मैदानी प्रदेशात गहु ज्वारी दाळी असे विविध पदार्थ मिळतात.
        सरसो सारखे पीक उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पिकते.
 आसाम उटी निलगिरी पर्वतात चहा कॉफीचे मळे असतात. निसर्गाने स्वतः च त्या त्या भागात राहणारया प्राणीमात्रांसाठी त्या त्या पदार्थांची अन्न धान्याची व्यवस्था केली आहे.
त्याचे पालन केले तर निरोगी राहता येते नाहीतर रक्तदाब, मधुमेह सारखे कायम स्वरूपी गोळ्या खावे लागणारे आजार उत्पन्न होतात..
       Oats अंतिथंड वातावरणात राहणारया लोकांना अतिशय हितकारक ठरतात.. ही राष्ट्रे विकसित व भांडवलशाही धोरणे असलेली असल्याकारणाने संशोधन करून आपले products जगासमोर मांडतात. आणि त्यांचा जगभर वेगाने प्रसारही होतो. पण साधा बेसीक विचार केला जात नाही की जे अन्न अतिथंड वातावरणातील भुक अतिप्रखर असणारया लोकांसाठी निसर्गाने निर्माण केले आहे ते latin america, africa, asian contries मध्ये जेथे सुर्य आग ओकतो ४०-५० पर्यंत तापमान असते तेथे कसे उपयुक्त ठरेल.
Oats किंवा इतर खुपच वेगळ्या वातावरणात तयार होणेरे कुठलेही अन्न धान्य पदार्थ खाण्यापुर्वी एक वेळा डोळसपणे विचार जरूर करा.
  आपण चुकीचे अनुकरण तर करत नाही ना....
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no-- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

Thursday, May 12, 2016

येथे थंडगार ताक मिळेल

येथे थंडगार ताक मिळेल...
हे थंडगार कॅटेगिरितील पदार्थ
म्हणजे उन्हाळ्यातील गर्मीचा उतारा म्हणून...
लोकसमूहाच्या बुद्धीवर संस्कार केले गेलेत.
आता,
थंडगार.....
लस्सी, ताक, आमरस, ऊसाचारस,पन्हे, सोलकढी,नीरा, इ.इ.....
अशी यादी मोठी होईल....
थंडगार म्हणजे काय ?
फ्रिझर / फ्रिझ मधून काढलेले, बर्फ घातलेले बहुतेक पदार्थ थंडगार म्हणून सुप्रसिद्ध केले गेले आहेत.
थंडगार च्या पुढे चिल्ड हा ही एक प्रकार आहेच !
असो...
पण,थंड म्हणजे काय ?
नारळपाणी कसे असते हो ?....
कधी ऐकलय ? नारळपाणी खूप गरम होते... त्रास झाला ?
नाही... कारण ते स्वभावतः थंड असते...!!!
असेच,
ऊसाचा रस, नीरे, पन्हे, सरबते हे ही स्वभावतः थंड असतात...
स्वभावतः थंड म्हणजे ?
जे पिल्यावर/खाल्ल्यावर गारपणा जाणवतो, शरीरात कूलिंग इफेक्ट येतो...
अश्या स्वभावाचे म्हणजे शीत ( थंड) पदार्थ !
आणि
काही पदार्थ बरोबर ह्या विरुद्ध असतात,
म्हणजे उष्ण,
... जे गार घ्या किंवा गरम गरम प्या किंवा खावा....
त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते...
कूलिंग होत नाही उलट कमी होत...
 असा स्वभावाचे म्हणजे उष्ण पदार्थ !
... आपण ....
घरी सरबत बनवले व पिले....
रस्त्यावर ऊसाचा रस घेतला....
 की त्यात....
आईस ( बर्फ ) टाकण्याचा हट्ट धरतो...
किंवा
फ्रिजमधील गारपाण्यात बनवण्याचा हट्ट धरतो...
आणि
मस्त थंडगार म्हणून पितो...
चलो...एखाद्या वेळी हे ठीक आहे...
पण
ज्या वेळी बर्फ / थंडपाणी उपलब्ध नसतो तेव्हा  काय होत...
त्याच सरबत किंवा ऊसाच्या रसाने...
थंडावा निर्माण होत नाही का ?
तहान भागत नाही का ?
??
??
थंडावा होतेच ! तहानही भागतेच !
म्हणजे मूळात स्वभावतः गार(शीत) असणारे हे पदार्थ
बिनाबर्फ व बिना गार पानी
अगदी साध्या तापमानाचे तसेच वापरले तरी चालतात...
फ्रीजचा वापर केला म्हणजे सगळ थंडगार होत
व गर्मी कमी होते........ हा गोड_गैरसमज आहे...
काही पदार्थ उष्णच असतात !
 ते फ्रीजमध्ये गार केल्यानेही गार होत नाहीत स्वभावतः गरमच रहाता...
उन्हामध्ये घाम अधिक आल्यामुळे शरीराती द्रव भाग कमी होतो, शरीर कोरडे बनते, थकते,तहान (द्रव भाग पूरणाची इच्छा होते) लागते...
अश्या अवस्थेत गोड चवीचे किंचित् आंबट,
 (स्पर्शाला गार नसले तरी) स्वभावाने थंड...
असे द्रव पदार्थ द्रव भागाचे पूरण करतात,
कोरडेपणा व थकवा, तहान दोन्ही कमी होतो व ताजेतवाणे वाटते, तरतरी येते.
हे महत्वाचे की उष्ण स्वभावाची पण स्पर्शाला थंड द्रव स्वरुप पदार्थ घोट घोट पित रहायचे ?
ताक व दही हे थंडगार असतात.... सत्य...
स्पर्शाला थंडच आहेत'...
पोटात गेल्यावर थंड नाहीत...
तरी,
ह्या भ्रामक कुप्रचारात जनसामान्य बळी पडतात व अनारोग्याकडे झुकतात.
सर्वात मोठा प्रश्न आहे तो .....
((((( दही व ताकाचा... )))))
दही स्पर्शाला थंड आहे हो !.....
 पण स्वभावतः उष्णच आहे...
दह्याने गर्मी कमी होत नाही !
उगाच उन्हाळ्यात दह्याने थंड वाटत ! मस्त खा ! असा अतिशहाणपणा करु नये.
ताक हे थंडगार करुन दाखवले जाते...
उलटपक्षी, ताकबनवताना त्यावर उष्ण गुणांचेच संस्कार असतात...
त्यामुळे ते लगेच थंड स्वभावाचे होत नाही !
दही,ताकाचा उपयोग भर उन्हाळ्यात कूलिंग साठी करणार्‍यांनी....
छान ताजी ताजी हिरवी गार मिरची....
होय हिरवीगार मिरची...
फ्रिज किंव फ्रिजर मध्ये ठेवून....
ती अधिकाधिक थंड झाल्यावर
खाऊन बॉडी कूलिंग होते का ते पहावे...
ज्या पदार्थाचा जो स्वभाव ( उष्ण / शीत )  आहे तो...
फिज मध्ये गार करुन
शीत स्वभाव अजून वाढत ही नाही
आणि उष्ण स्वभाव कमी ही होत नाही !
तात्पर्य...
थंडगार ताक पिणार्‍यांनी हिरवीगार थंड मिरची ही अनुभवावी...
ताक हे ग्रीष्म ऋतुत [उन्हाळ्यात]अजिबात घेऊ नये !
पुर्णतः वर्ज्य आहे !
-
©वैद्य प्र प्र व्याघ्रसूदन
आयुर्वेदाचार्य , नवी मुंबई - ७०५.
📞 9867 888 265
20:22 12-05-2016
#आयुर्वेद_समज_गैरसमज
#आयुर्वेदामृत
#जागर_आयुर्वेदाचा®

Wednesday, May 11, 2016

नारळपाणी

नारळपाणी 🌴
नारिकेरोदकं स्निग्धं स्वादु वृष्यं हिमं लघु |
तृष्णापित्तानिलहरं दीपनं बस्तिशोधनम् || वा. सु.


नारळाचे पाणी स्निग्ध, गोड, शुक्रवर्धक करणारे, थंड, हलके, तहान शमविणारे, भुक वाढविणारे, मुत्राशयाची शुध्दी करणारे आहे.
भुक वाढविणारे असल्याने जेवणापुर्वी वा जेवनाच्या सुरूवातिला नारळपाणी घेता येईल.

सोबतच उन्हापासुन संरक्षण करण्यासाठी व शरीरातील स्निग्धता व ओलावा टिकवुन ठेवण्यासाठी, तहान भागविण्यासाठी नारळपाणी उपयोगात आणता येईल.

गर्भजल वाढविण्यासाठी नारळपाण्याचा उपयोग केला जातो. जेंव्हा शरीरातील जलीय घटक कमी झालेले असतिल त्यावेळीच समानाने समानाची वृध्दी या न्यायाने नारळपाण्याचा उपयोग होईल.

इतर कारणांनी गर्भोदक कमी असेल तर नारळपाण्याचा उपयोग होणार नाही. तसेच जेवणानतंर सेवन केलेले नारळपाणी कफवर्धन करून आमनिर्मितीच करेल व जन्म घेणारया बालकात निमोनिया सर्दी पडसे बालदमा सारखे कफाचे आजार निर्माण होतील. गर्भिणी स्रियांनी नारळपाणी घेताना त्याचे प्रमाण, घेण्याचा काळ आदींचा योग्य आयुर्वेदीय सल्ला जवळच्या वैद्याकडुन जरूर घ्यावा नाहीतर येणारया नविन पिढीला बरेच वर्ष त्रास सहन करावा लागु शकतो.

प्रत्येक आहारीय पदार्थांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात, त्यानुसार प्रत्येक पदार्थ एखाद्याला फार चांगला वा चांगला वा ठीक वा वाईट वा फारच वाईट यापैकी कुठल्याही वर्गीकरणात मोडु शकतो.

सरसकट कुठलाही पदार्थ सगळ्यांनाच चांगला वा वाईट असेल असे नाही एखाद्याला चांगला असेल तर दुसरयासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळेच स्वतः च्या प्रकृती सारतेनुसार खाद्यपदार्थांचे सेवन करावे त्यासाठी योग्य आयुर्वेदीय सल्ला कधीही लाभदायक च..
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

Tuesday, May 10, 2016

दुधाचे मित्र आणि शत्रु

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
      ✔  दुधाचे मित्र व शत्रु ✖
             🌺 दुधाचे मित्र 🌺
सहकारफलं चैव गोस्तनी माक्षीकं घृतम् |
नवनीतं श्रृंगबेरं पिप्पलीं मरिचानि च ||
सिता पृथुकसिन्धुत्थं पटोलं नागराभयाः ||
क्षीरेण सह शस्यन्ते वर्गेषु मधुरादिषु ||
आंबा, मनुका, मध, तुप, लोणी, मिरे, पिपल्ली, साखर, सैंधव मीठयुक्त चिवडा, पडवळ, सुंठ आदी पदार्थ दुधासह खाण्यासाठी हितकारक असतात.
खालील पदार्थ दुधासह खाल्ले तरी चालतात.
१. आंबट पदार्थांत आवळा
२. गोड पदार्थांत साखर
३.भाज्यामध्ये पडवळ
४. तिखट पदार्थांत आर्द्रक
५.तुरट पदार्थांत यव
६.मीठामध्ये शेंदेलोण
           ✖ दुधाचे शत्रु ✖
मत्स्यमांसगुडमुद्गमूलकैः कुष्ठमावहति सेवितं पयः |
शाकजाम्बवसुरादिसेवितं मारयत्यबुधमाशु सर्पवत् ||
दुधासह मासे, मांस, गुळ, मुगदाळ, मुळा खाल्ल्याच्या परिणामी त्वचेचे आजार उत्पन्न होतात.
भाज्या, जामुन, सुरा मद्यजन्य पदार्थ दुधासह घेतले असता तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात क्वचित मरणही येऊ शकते.
🍋🍊🍐 फळांसह दुध 🍼🍼🍼
क्षीरे विरूध्दान्यैकन्ध्यं सह वै भुज्यते यदि |
बाधीर्यमान्ध्यं वैवर्ण्य मुकत्वं चाथ मारणम् ||
दुधासह फळे खाणे वा फळांचा juice  दुधयुक्त खाणे हे बधिरता, आंधळेपणा (डोळ्याचा नंबर तीव्र गतीने वाढविणारे), त्वचेचे वैवर्ण्य त्वचाविकार कारक, मुकेपणा, काही वेळा मृत्युचे कारणही ठरू शकते..
विरूध्द अन्न कधीही त्रासदायकच फक्त तात्काळ त्रास न देता ते काळाच्या संस्काराने त्रास देते यात काहीच शंका नाही..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group

Saturday, May 7, 2016

मुळव्याध


# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
        🍀 मुळव्याध ☘
मुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे, अन्नावर वासना नसणे, घशाशी आंबट येणे, पाठ उरप्रदेशी दुखणे, आळस, शरीराचा रंगात बदल, इंद्रिय निशक्त होणे, राग फार येणे, इतर आजार होतील अशी भिती वाटणे अशी लक्षणे मुळव्याध होण्यापुर्वी कमी अधिक प्रमाणात दिसतात. यातील जेवढी जास्त लक्षणे दिसतात. तेवढा आजार जास्त बलवान असतो. मुळव्याध होण्याच्या पुर्विच अटकाव घालता येतो. पण बहुतेक वेळा रक्त पडायचे स्वतः थांबत नसताना उपचाराचा विचार केला जातो. तोपर्यंत भुक कमी झाल्याने आजार लगेच पुर्ण दुरूस्त होत नाही.उपचाराने रक्त पडायचे थांबते पण आजाराचा पुनरूद्भव टाळण्यासाठी भुक वाढविणे आवश्यक असते. भुक वाढली असता पुन्हा त्रास सहज होत नाही. भुक कमी असेल तर पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो. आयुर्वेद औषधी उपचारही सल्ल्याशिवाय घेउ नयेत. कारण काही औषधी गरम गुणधर्माच्या असल्याने त्रास वाढण्याचा धोका असतो. चांगल्या ताकाचा उपयोग आहारात थोडे शेंदेलोण घालुन करावा. ताकाने भुक वाढावयास मदत होते..
मुळव्याधीत दुषीत रक्त अडवण्याचे उपद्रव
रक्तपित्तं ज्वरं तृष्णामग्निसादमरोचकम् |
कामला श्वयथुं शुलं गुदवक्षंणसंश्रयम् ||
कण्ड्वरूःकोठपिडकाः कुष्ठं पाण्ड्वाह्रयं गदम् |
वातमुत्रपुरीषाणां विबन्धं शिरसो रूजम्||
स्तैमित्यं गुरूगात्रत्वं तथा$न्यान् रक्तजान् गदान् |
तस्मात् स्रुते दुष्टरक्ते रक्तसंग्रहणं हितम् ||
मुळव्याध या आजारातुन शरीर स्वतःच दुषीत झालेले रक्त शरीराबाहेर टाकते. मुळव्याधीचा विशेषतः रक्तस्रावाचा त्रास मुख्यतः रक्त बिघाडाच्या काळात जेंव्हा पावसाळा संपुन ऊन वाढत त्यावेळीे ( शरद रूतुत oct heat वेळी ). पुन्हा जेंव्हा हिवाळा संपुन उन्हाळा लागावयाचा असतो ( feb march मध्ये ) याकाळात होत असतो. कारण या काळात रक्तबिघाड अधिक असल्याने शरीर रक्ताला स्वतःच बाहेर काढते. एरविही रक्त बिघडवणारी कारणे घडत असतिल तर मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो जसे मद्यपान, मसालायुक्त मांसाहार, हिरवी मिरची ठेचा, चनाडाळीचे तळीव पदार्थ, मिरची भज्जे सारखे पदार्थ खाल्यानंतर दुसरया दिवशी लगेच काही लोकांत त्रास होतो. हा तात्काळ उत्पन्न होणारा त्रास असतो.
          अशावेळी जर दुषित रक्ताला बाहेर पडु न देता अडविण्याचे प्रयत्न केले तर दुषीत रक्ताद्वारे पुढील त्रास सुरू होऊ शकतात.
        रक्तपित्तं ( शरीरातील इतर विवरातुन रक्तस्राव ),ताप, तहान अधिक लागणे, भुक कमी होणे, तोडांला चव नसणे, कावीळ, सुज, वेदना, खाज, त्वचेवर चकते पिटिका निर्मिती, पांडु सहित अनेक आजार होऊ शकतात.
    तसेच मल मुत्र अधोवायुचा अवरोध होणे कष्टाने मल मुत्र होणे, डोकेदुखी, ओलसरपणाची जाणीव होणे, सर्वांग जड पडणे तसेच अन्य रक्तदुष्टी जन्य आजार उत्पन्न होऊ शकतात.
         त्यामुळे दुषीत रक्त शरीराबाहेर पडल्यानंतर रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न करणे शरीरासाठी हितकारक असते. अन्यथा रक्त शरीराबाहेर पडावयाचे थांबते पण दुषीत रक्त आडवल्यामुळे उत्पन्न अन्य आजारांचा सामना करावा लागु शकतो. कुठल्या प्रकारे त्रास कमी करायचाय हे स्वतः च ठरवावे..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

वजन


# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
           ☘ वजन 🍀
वजन हा बहुतेक लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बरेच जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतात कोमट पाण्यात मध टाकुन घेणे, सकाळी फिरायला जाणे, जीम करणे etc.
                    कृश बारीक अंगयष्टीचे लोक वजन वाढविण्यासाठी इच्छुक असतात त्यासाठी कृत्रीम उपाय अल्प प्रमाणात मद्य पिणे, केळी आदी कफवर्धन करणारे पदार्थ खाणे, विविध प्रकारच्या भुकट्या खाऊन जीम करणे आदी उपाय करतात.
                   सतत एकमेकांशी तुलना केली जाते माझे वजन तुझ्यापेक्षा एवढे कमी आहे वा एवढे जास्त आहे. यांना हे कसे समजत नाही वा यांच्या डोक्यात प्रकाश कसा पडत नाही की एकाच आईवडीलांच्या पोटी जन्म घेतलेल्या व एकत्रच सारखा आहार खाऊन वाढलेल्या दोन भांवडांचे वजनही ९५-९६ टक्के वेळा सारखे नसते...
             याला कारण ही मुळप्रकृती हे असते. वातप्रकृति लोकांचे वजन आणि कफप्रकृती लोकांचे वजन यांत जमीन असमानचा फरक पडतो जरी दोघे सख्खे भाऊ असतिल तरी.
          स्वतः चा अंहकार मोठेपणा वा इतरांना कमीपणा दाखविण्यासाठीच अशी तुलना केली जाते.. हे पचावयास अत्यंत कडु वा तिखट सत्य आहे.. यात शंका नसावी.
कार्श्यमेव वरं स्थौल्यान्न हि स्थौल्यस्य भेषजम् |
बृंहणं लंघन नालमतिमेदो$ग्निवातजित् |
आयुर्वेदीय शास्रानुसार अतिजाडापेक्षा अतिकार्श्य कधाही बरेच जाड व्यक्तींमध्ये भुक, वातदोष, चरबी यांचा एकत्रित प्रतिकार करता येत नाही. कारण जाड व्यक्तींमध्ये भुक व वायु कमी केले तर चरबी वाढते. लंघनाने चरबी कमी केली तर पुन्हा भुक व वात वाढतो. यामुळेच जाडपणा चिकित्सेसाठी कठीण होतो.
   कृश बारीक लोकांत गोड रसाचे व स्निग्ध स्नेह (तैलतुप) युक्त पदार्थांचे अत्याधिक सेवन केले तर कार्श्य दुर होते.
गुरू चापतर्पणं स्थुले विपरितं हितं कृशे | वा.सु.
स्थुल व्यक्तींमध्ये जे पदार्थ पचावयास जड पण शरीराला बारीक करणारे आहेत ते हितकारक ठरतात.
                याउलट कृश बारीक लोकांत जे पदार्थ पचावयास हलके व पौष्टीक आहेत ते  नेहमी खाण्यास हितकारक ठरतात.
        सातु जांड लोकांत तर गहु कृश बारीक लोकांत नेहमी खाण्यासाठी हितकारक असतात.
       सातु तैल ताक यासारख्या अवरोध दुर करणारया पदार्थांच्या संयोगाने संस्काराने घेतला असता उपयोगी ठरतो.
    तर गहु तुप दुध यासारख्या पौष्टीक पदार्थांच्या संयोगाने संस्काराने घेतला असता कृश बारीक लोकांत खाण्यासाठी हितकारक ठरतो.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no on your group )

Visit Our Page