विवाह ठरविताना मुलाला किवा मुलीला मंगळ आहे या कारणाने अनेक विवाह ठरण्यापूर्वीच मोडतात. काही ज्योतिषी सुद्धा मंगळाचा खूप बागुलबुवा करताना दिसतात. त्यात नक्की कितपत तथ्य आहे याच्यावर थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न या नोटच्या स्वरूपात केला आहे.
आपल्या पत्रिकेत १,४,७,८ आणि १२ या पैकी कोणत्याही स्थानी मंगळ असेल तर ती पत्रिका “मंगळाची” आहे असे म्हणायची पद्धत आहे. जर हा विचार गृहीत धरला तर साधारण ४० टक्के पत्रिका या मंगळाच्या ठरतील. या प्रकारे वधू अथवा वर दोघांपैकी एकाची पत्रिका ”मंगळाची” असण्याची शक्यता जास्त येते.
या पैकी प्रथम स्वतचे स्थान, चतुर्थ स्थान हे गृह सौख्याचे स्थान आणि सप्तम स्थान हे आपल्या जीवन साथीदाराचे स्थान आहे. आठवे आणि बारावे स्थान सर्व साधारणपणे अशुभ स्थाने समजली जातात. मंगळ हा अग्नी तत्वाचा, तमो गुणी, तामसी वृत्तीचा ग्रह असल्यामुळे विवाहप्रसंगी गुणमेलन करताना या पाच स्थानात असेल तर अशुभ समजला जातो.असे असले तरी हा फारच सर्वसाधारण मियम झाला. अशा मंगळाचा गरजेपेक्षा जास्त बागुलबुवा केला जातो आणि काही तरी तारक मारक उपाय सुचविण्याकडे आणि पैसे काढण्याकडे काही ज्योतिषांचा कल असतो. अज्ञान आणि अंधश्रद्धा या कारणासाठी असे काहीतरी उपाय स्वीकारले सुद्धा जातात.
असे असले तरीसुद्धा प्रत्येक पत्रिकेला तो तशी अशुभ फळे देईलच असे नाही. मी स्वत अशा प्रकारचा विचार करणे हा अंधश्रद्धेचा भाग आहे असे मानतो. माझ्या अभ्यासानुसार मी “मंगळ दोष” या विषयाकडे वेगळ्या प्रकारे पाहतो.
मंगळाचे शुभ अशुभत्व प्रत्येक लग्न राशीला वेगवेगळे असते. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह आहेत. काही ठराविक लग्न राशींना अशा प्रकारचा मंगळ अशुभ होण्याची शक्यता आहे. जर पुढे दिल्याप्रमाणे लग्न राशी असेल ३ मिथुन, ८ वृश्चिक, १ मेष, २ वृषभ आणि ६ कन्या तर या लग्न राशीच्या पत्रीकाना एक,चार,सात,आठ आणि बारा या स्थानी येणारा मंगळ हा चढत्या कर्माने अशुभ असेल. कन्या लग्न राशीला सर्वात जास्त अशुभ येईल.
या बरोबरच प्रत्येक लग्न राशीच्या स्वामी ग्रहाचे काही ग्रह शत्रू येयात. त्या उलट लग्न राशीच्या स्वामी ग्रहाचा एखादा मित्र ग्रह सुद्धा असेल. निरनिराळ्या ग्रहांचे अशा मंगळा बरोबर जसे ग्रह योग होतील त्याप्रमाणे हे शुभ अशुभत्व कमी जास्त होईल.

VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104
9323406386
No comments:
Post a Comment