बहिणाबाई चौधरी ह्या प्रसिध्द मराठी कवयत्री होत्या . बहिणाबाई चौधरी ह्यांचा जन्म सन १९८० साली जळगाव जिल्ह्यातील असोदा ह्या गावी लेवा पाटील परिवारात झाला होता .त्याचा मूळ कविता ह्या सर्व 'अहिराणी' भाषेत होत्या .मानवी जीवनाची त्याची समाज हि फार गाढ होती . बहिणाबाई ह्या लग्नानंतर विधवा झाल्या परंतु त्या न डगमगता आत्मनिर्भर व स्वतंत्र राहिल्या .त्यांच्या काव्य ह्या मराठी साहित्य साठी अमूल्य खजाना आहे.त्यांनी आपल्या वास्तविक दैनदिन जीवनातील प्रतिबिंबाच्या त्यांनी मराठी लेवा भाषेतील ओवीन मध्ये सुरेख रचना केलेल्या आहे .ह्या ओवी मध्ये अविश्वनीय रुपात मानवी जीवनाचे ज्ञान त्याची प्रकुती वनस्पती ,जीव ,हिरवळ ,नदी ,विहीर ह्या जिवंत रुपात प्रकट केलेल्या आहे .त्याची कविता ह्या जणू काही समोर उभ्या केलेल्या चित्र सारख्याच वाटतात .बहिणाबाई ह्या महाराष्ट्र ला नैतिक रुपात मिळालेली एक भेट होती.त्यांचा मृत्यू हा ३/१२/१९५० साली झाला.
बहिणाबाई चौधरींची कविता रसिकांपुढे जरा उशिरानेच आली. १९ व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे भा. रा. तांबेच्या समकालीन असलेल्या ह्या कवयत्रिची कविता मात्र तिच्या पश्चात प्रसिद्ध झाली. सुप्रसिद्ध कवी सोपनदेव चौधरी याच्या त्या मातोश्री. बहिणाबाई अजिबात शिकलेल्या नव्हत्या. खनदेशात शेतकरी कुटूम्बात राहाणा-या या कवयत्रीला अकाली वैधव्य आलं पण त्या डगमगल्या नाहीत शेतात काबाडकष्ट करता करता त्या गाणी गायच्या त्या कुणी टिपून ठेवल्या., काही गेल्या. जात्यावर दळता दळता त्यांनी ज्या कविता रचल्या त्या आज उभ्या महाराष्ट्राला परिचित झाल्या आहेत. अहिराणी भाषेत असलेलं अत्यंत गोड रसाळ सुमधुर असं हे काव्य. कोकिळेने तोंड उघडलं कि आपोआप संगित वाहु लागतं तशी बहिणाबाईंची कविता सहजपणे आपल्या मनात आणि जोभेवर नाचु लागते, असं त्यांच्या कवितेबद्द्ल आचार्य अत्र्यांनी म्हणून ठेवलं आहे.त्यांच्या कवितेला इथल्या मातीचा सुगंध आहे. शेतक-यांच्या अपेक्षांच चित्र आहे. विधवा स्त्रीच दु:ख आहे आणि त्याच बरोबर निसर्गाच सौंदर्य आहे. डोंगराच्या कडिकपारीतून झरा उचंबळत यावा तसे तिचे शब्द नाचत बागडत येतात. याच बरोबर अधुनिक पंडितांना आचंबित करून टाकणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांच्या कवितेतून मांडले गेले आहे. आपल्या सहज सुंदर तरिही विलक्षण प्रतिभेने सा-या महाराष्ट्राला वेड लावणा-या या कवयत्रिला सलाम !
आज बहिणाबाईंची एक कविता देत आहे
मन
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावरं
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वा-याने चालल्या
पान्या व-हल्यारे लाटा
मन लहरी लहरी
त्याले हाती धरी कोन
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे विंचु साप बरा
त्याले उतारे मंत्तर
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगु मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत
देवा, आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जगेपनी तुले
असं सपान पडलं....?
http://www.facebook.com/note.php?note_id=126302360766580
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment