Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, June 29, 2016

घरोघरी आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

पावसाळा सुरु झाला आहे. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागलेल्या ठेल्यावरून काहीतरी चमचमीत खाण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. यादिवसांत मात्र विशेषतः तसे न करण्याची काळजी घ्या. केवळ पाणीपुरीच नाही तर तुमच्या दृष्टीने 'हेल्दी' वाटणारे एखादे सँडविचदेखील महागात पडू शकते. त्यात घातल्या गेलेल्या भाज्या प्रत्येकवेळेस नीट धुतल्या गेल्या असतीलच असे नाही. त्यामुळे एकंदरीतच जपा.

रस्त्याच्या बाजूला निखाऱ्यांवर भाजलेले आणि वरून तिखट-मीठ-लिंबू लावलेले कणीस म्हणजे तर कित्येकांचा जीव की प्राण. पण हे निखारे अनेकदा स्मशानातून पळवून आणलेल्या साहित्यातून बनलेले असतात; असा अहवाल गेल्याच वर्षी प्रसिद्ध झाला आहे याकडे दुर्लक्ष करू नका. घरी शिजवलेले ताजे-गरम अन्नच खा. क्वचित कधी नाईलाजास्तव बाहेरचे अन्न खाल्ले गेले तर त्यावर भाजलेली बडीशेप जरूर खा. ती पचनास मदत करते.

असे अन्न दुषित असल्यास पोटात दुखणे, मळमळणे, उलटी वा जुलाबासारखे त्रास होवू लागतात. अस्वच्छ अन्न बाधल्याने अतिसार सुरु झाल्यास तो औषधे घेऊन लगेच थांबवू नये. शरीरात गेलेला हानिकारक घटक बाहेर टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला त्याने खीळ बसते. असा अतिसार लगेच थांबवला गेल्यास ते घटक शरीरात तसेच साठून कालांतराने पुन्हा त्रास करू शकतात. याकरताच आयुर्वेद तातडीने अतिसार थांबवण्यास सुचवत नाही. शरीरातील पाणी कमी होवू नये याची मात्र अवश्य काळजी घ्यावी. अगदी साखर-मीठ पाणीदेखील अशावेळी उत्तम काम करते. (मधुमेही वगळता)

मात्र; वरीलप्रमाणे लक्षणे दिसल्यास तातडीने आपल्या वैद्यांना दाखवा. या लक्षणांवर स्वतःच्या बुद्धीने औषधे घेऊ नका. अन्नातून विषबाधा झाली असल्यास मोठा फटका बसू शकतो.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

पंचकर्म-detoxification

।।श्री गजाननाय नमो नमः।।
पंचकर्म-detoxification
मला पंचकर्म करायचय!
i want to detoxify.
एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टर समोर एखाद्या सुज्ञ सुशिक्षित रुग्णाने म्हणावं आणि पुढच्या अटी ऐकल्यावर उठून निघुन जावं.
का?????
तर वेळ नाहीं. आमच्या अमुक एक किंवा दोन सुट्टीच्या दिवशी करा.
अहो, आयुर्वेद वैदिक शास्त्र म्हणजे काय गम्मत वाटली का हो ???
सगळं हम करे सो कायदा!!!
काय अर्थ आहे अश्या वागण्याला ???
मुळात ट्रेंड म्हणून आयुर्वेद चिकित्सा केंद्रात जाणंच चुकीच आहे.
आज काल तुमच्या अश्या वागण्यामुळे, हो हो तुमच्याच मागण्या वाढल्यामुळे आयुर्वेदात कही चुकीची लोकं येऊन परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागलेत. खूप मोठ्या किंमती सांगून तुम्हाला लुटून आयुर्वेदाला गालबोट लावू पाहतायत. फक्त बॉडी मसाजच्या आणि शिरोधाराच्या नावाखाली पंचकर्म करुन detox केलं अस चुकीचा समज करू पहाताय.
नका वागू अस.
पंचकर्म खेळ नाहीं ! त्याचे काही नियम आहेत. त्यात तुम्ही बसता की नाहीं ह्याच परिक्षण वैद्याला करावं लागत.
चुकीचं काही झालं तर आयुष्य पण उध्वस्त होऊ शकतं. ही कल्पना असावी.
बॉडी सर्विसिंग अस गाडी सर्विसिंग सारखा अर्थ लावलात तर थोड सांगू इछितो की सर्विसिंगला दिलेली गाडी आपण कधी काम न होताच चालवतो का???
नाहीं न !
मग तसच पंचकर्म करण्याकरता पण शारीरिक शांतता हवी. म्हणून पंचकर्म चाले पर्यन्त तरी हुशार बुद्धिवान वैद्याच्या सल्ल्याप्रमाणेच वागा आणि सक्षम आणि योग्य आयुर्वेदाला आपल्या रोजच्या आयुष्यात रुजवून आरोग्याचा फायदा करुन घ्या.
धन्यवाद.
🙏🏻😊
वैद्य नीरज प्रकाश दांडेकर
श्री गजानन आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्मा सेंटर
पनवेल
9657722015

Tuesday, June 28, 2016

उपवासाचा उद्देश साध्य करा

उपवासाचा उद्देश साध्य करा.
दिव्याची अमावस्या झाली की श्रावण महिना चालू होतो..मग कुणी पुर्ण श्रावण महिनाच उपवास करतो तर कुणी फक्त सोमवार-शनीवार अशे एक - दोन दिवस या महिन्यात उपवास करतो. तर कुणी पुर्ण चार्तुमासच उपवास धरतो. आपआपल्या शरीराच्या कुवतीप्रमाणे हे उपवाससत्र सुरू होते...उपवासाची परंपरा सगळया धर्मामध्ये आणि सस्कृंतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आली आहे. ठराविक कालावधीसाठी अगदी अल्पसा आहार घेणं किंवा जड पदार्थ दूर ठेवून पोटाला विश्रांती देणं हा उपवासामागचा उद्देश ! आयुर्वेददृष्टीने याचा विचार केला तर पावसाळयात आपला अग्नि ऋतूप्रभावामुळे मंद असतो त्याकरिता पचायला हलके आहार घ्यावे किंवा भूक नसल्यास खावू नये किंवा कमी खावे --असा आरोग्यदायी विचार! मग हा विचार प्रत्यक्षात अमलांत यावा म्हणून आपल्या पुर्वजंानी त्यास धार्मिक किनार जोडली..श्रावण मासात उपवास श्रेष्ठ ही सकंल्पना रूजल्या गेली...थोडं निरिक्षण करून बघा हिंदु धर्मीयंाचा श्रावण म्हणून उपवास, तर मुस्लिम लोकंाचा रमजान म्हणून रोजा, ज्यू लोक योम कुप्पूरसाठी उपास तर जैन समाजात पर्युषण पर्व म्हणून उपवास सागिंतल्या गेले आहेत..परंतु आपण सर्वांनी मिळून अगदी एकजुटीने उपवास मागील उध्दीष्ट पार मोडून टाकले. उपवास म्हणून आपण चवीने साबुदाणा, बटाटा, रताळे, चिप्स्, शेंगदाणे, असा पचायला गरिष्ट आहार अगदी चवीने घेतो. संध्याकाळचा रोजा खोलण्यासाठी सर्वात आधी पेंडखजूर तोंडात टाकल्या जाते, यासाठी की पेंडखजूरात प्रचुर शक्ती आहे, लोह तत्व भरपूर आहे, सात्वीक पदार्थात त्याचा समावेश होतो...पेंडखजूर अधिक खावे हा पण उद्देश आहे...परंतु ही मंडळी सुध्दा दिवसभर रिकाम्या पोटी रहायचे आहे हया हेतूने संध्याकाळी तळीव, भजे, पापडया, मासांहार अधिक प्रमाणात घेतात. तसे आहाराच्या बाबतीत जैन धर्मीय बांधवाचीं प्रशंसाच करायला हवी...ही मंडळी सध्यंाकाळी सुर्यास्तापुर्वीच आहार घेतात तसेच कंद, मुळे, कांदा असा तामसी आहार वज्र्य करतात. खरं तर उपवास हे धर्मशास्त्रात एक प्रकारचं व्रत मानलं गेलयं, आत्मशुध्दीचं व्रत. उप अधिक वास अशी उपवास शब्दाची फोड --त्यात उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणे अर्थात उपवास म्हणजे इश्वराच्या जवळ राहणे या दिवशी सात्वीक आहार घ्यावा, अल्प प्रमाणात आहार घ्यावा, तसेच दिवसभर इ·ाराचे नामस्मरण करावे..काम, क्रोधादि षड्रिपूपासून दुर राहण्याचा यत्न करावा ! परंतु आपण सर्व गोष्टी मोडीत काढण्यात पटाईतच आहोत !
उपवासामुळे शरीराच्या काही क्रियांना विश्रांती मिळते, पचनक्रिया सुधारते. शरीरशुध्दी साठी उपवास उपयोगी पडते, पण तो योग्य रितीने केलेला हवा. तरच आपल्या शरीरातील आम म्हणजे विषद्रव्याचे ज्वलन होते / बाहेर निघते. हेच आम पुढे अनेक विध रोगास कारणीभूत ठरते. चार्तुमासांच औचित्य साधून अनेकजण वजन घटविण्यासाठी उपवास करतात, उपवासामुळे वजन घटतं खरं, पण असं घटलेलं वजन त्याच वेगाने पुन्हा वाढू शकतं, म्हणून वजन स्थायीरूपाने आटोक्यात राहण्यासाठी उपवासाच्या काळातसुध्दा भरपूर व्यायाम आणि खाण्यासाठी लो कॅलरी फुङ...उपवासाचे सुध्दा असे अनेक पदार्थ आहेत. उपवास आहे म्हणून एकदाच भरपेट न खाता 4-5 वेळा आपण खायला हवं. उपवासाच्या काळात सुध्दा आपली जेवणाची वेळ ही नियमित असावी...
रोज 1 ग्लास दुध घ्यावे, पण बिना साखरेचे, साय काढलेले, पण त्यात अद्रक भरपूर टाकावी. तसेच दुपारी जेवणानतंर एखाद्या तासाने ताजं ताक घ्यावं. त्यात सुध्दा पुदीना, जिरे, मि­याची पुड, आलं खिसून टाकावं, चवसुध्दा झक्कास येते. नतंर तीन -चार वाजता फळं खावी किंवा कधी कधी फळंाचा रस घ्यावा, कधी नारळाचं पाणी, लिंबू पाणी प्यावं. फळात केळी, चिक्कू शक्यतोवर टाळावी. आणि फळांच्या रसात साखर घेणं टाळावं. संध्याकाळच्या फराळात भगर, शेगंदाणा, साबुदाणा पेक्षा राजगि­याच्या पदार्थांचां वापर अधिक करावा. राजगि­याच्या घरी फोडलेल्या लाहया सर्वोत्तम पर्याय, कधी कधी राजगि­याची पोळी किंवा दोन लाडू देखील चालतील. अधून मधून अजींर , पेंडखजूर, किशमिश देखील चालतील. सलादमध्ये काकडी, दुधीभोपळा, गाजर, हे उपवासाचे उत्तम पदार्थ! उपवासाच्या काळात पाणी मात्र भरपूर प्यायला हवे. असा उपवास केला तर वजनही उत्तमरित्या / स्थायी प्रकारे कमी होईल तोही कुठलाही अशक्तपणा न येता आणि ख­या अर्थाने उपवास होईल.
द्वारा :-
डॉ. सौ. कविता पवन लड्डा
आयुर्वेदाचार्य
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर
गर्भसंस्कार केंद्र,
पदमा नगर, बार्शी रोड लातूर.
दुरध्वनी(02382) 221364
मोबाईल09326511681

Saturday, June 25, 2016

रजस्वला परिचर्या

#आयर्वेदाकडून_आरोग्याकडे

🍀रजस्वला परिचर्या🍀
    (पाळीच्या काळातील नियम)

मासिक रजस्राव सुरू झाल्यानंतर स्रिंयानी पुढील नियमांचे पालन केले असता विविध आजारांपासुन  (pcod, cyst, fibriods) दुर राहता येते.
१.झोपण्यासाठी चटईचा वापर करणे गादी वैगेरे न वापरणे...
२. शारीरीक व मानसिक हिंसा न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे..
३.सात्विक आहाराचे सेवन करावे...
४.या काळात रडणे, नखे काढणे,अंगाला तैल उटणे लावणे, डोळ्यात काजळ वा अंजन लावणे, स्नान करणे, दिवसा झोपणे, धावणे, मोठे शब्द एेकणे, फार हसणे, फार बोलणे,फार श्रम करणे,भुमिखनन करणे, वारा लागेल अशा ठिकाणी बसणे, अशा वायुला बिघडवणारया प्रकुपित करणारया गोष्टी करू नयेत...
  वरील नियम पाळावेत कारण शरीरातील वायु महिणाभरात जमा झालेले दुषीत रक्त शरीराबाहेर काढतो आणि स्रियांची शारीर शुध्दी करून आरोग्य टिकवतो. जर वरील नियम पाळले नाहीत तर वायुचा प्रकोप होतो आणि प्रकुपीत वायु दुषीत रक्ताला शरीरात पसरवुन वांग, त्वचाविकार, लठ्ठपणा, केस गळणे, pcod,fibriods, cyst.आदी विविध आजार निर्माण करतो....
    स्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी रजस्रावाच्या काळात वरील नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. पाळीच्या तक्रारी ह्याच स्रिंयामध्ये सर्व   आजारांसाठी कारणीभुत ठरतात. मासिक पाळीच्या छोट्या मोठ्या तक्रारींसाठी योग्य उपचार केले नाही तर भविष्यात गंभीर दुष्पपरिणामांचा सामना करावा लागतो.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

Friday, June 24, 2016

आयुर्वेद आणि मंत्रशास्त्र

#घरोघरी_आयुर्वेद
आयुर्वेद आणि मंत्रशास्त्र
आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे असे मानले जाते. स्वाभाविकपणे मंत्रोपचारांचे अनेक संदर्भ आयुर्वेदात सापडतात. ज्वरात शिव-उपासना असो वा सान्निपातिक ज्वरात विष्णूसहस्रनाम पठण असे कित्येक संदर्भ चरकसंहितेत येतात. रसशास्त्र या विषयात तर मंत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. पारा शुद्ध करण्याच्या संस्कारांत 'अघोर मंत्राचा' जप केला जातो. फार कशाला; 'दैवव्यपाश्रय' नामक उपचारांचे एक अंग आयुर्वेदाने वर्णन केले आहे. यात मंत्रांचा समावेश होतो.
हे मंत्र आपल्या मनावरदेखील अतिशय सकारात्मक बदल घडवत असतात. त्रिवेन्द्रमच्या पद्मनाभ मंदिरात पहाटेच्या पूजेसाठी अवश्य जा. मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. मुळात शब्दांचा आपल्या मनाशी निकटचा संबंध असतो. त्यामुळेच कोणी आपल्याला उद्देशून अपशब्द उद्गारला वा आपले कौतुक केले की त्या-त्या प्रकारच्या भावना मनात उत्पन्न होतात. कोणी शिवी दिल्यावर खूष झालेला असा 'शहाणा माणूस' माझ्या तरी पाहण्यात नाही!
'शब्दो नित्यः|' म्हणजे शब्द अविनाशी असतात असे आपले शास्त्र सांगते. आकाश या महाभूताशी संबंधित असल्याने आणि आकाश (म्हणजे पोकळी) सर्वत्र व्यापलेले असल्याने हे शब्द नित्य असतात. अर्थात; हा तात्विक चिंतनाचा विषय असल्याने इथे अधिक स्पष्ट करणे शक्य नाही. केवळ भारतीय दर्शनांच्या तत्वज्ञानाची झलक म्हणून हा मुद्दा मांडला. आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने ध्वनी लहरींचा परिणाम अभ्यासण्यासाठी cymatics सारख्या शाखांत काम केले जात आहे. ध्वनी लहरींच्या सहाय्याने जलद गतीने तुटलेले हाड सांधण्यास मदत होते असा निष्कर्ष प्रयोगांती निघाला आहे. अर्थात; या विषयी अधिक संशोधन होण्यास पुष्कळ वाव आहे. आधुनिक विज्ञान या क्षेत्रात संशोधनाच्या पहिल्या पायरीवर आहे.
आता या उपचारांची दुसरी बाजूदेखील पाहू. आचार्य सुश्रुतांनी सर्पविषावरील उपचार वर्णन करताना त्यातही मंत्रोपचाराचा आवर्जून उल्लेख केला आहे. हो; आपल्याकडे सापाच्या दंशावरचे उपचार होते. आपले पूर्वज अगदीच काही 'प्रतिगामी' आणि 'अडाणी' नव्हते!! याविषयी वेगळा लेखांक तयार करेन. तूर्त विषयसूत्र धरून चालू. या ठिकाणी सुश्रुताचार्य म्हणतात की; हे मन्त्र नेहमी सत्य बोलणे आणि तप करणे यांनी वाचासिद्धी प्राप्त झाली आहे अशा ब्रह्मर्षी वा देवर्षींनीच उच्चारायचे आहेत. उठसूट कोणीही हे मंत्र पुटपुटत बसल्याने काही उपयोग नाही. 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' ही म्हण रूढ होण्यामागे हीच विचारप्रणाली आहे. थोड्क्यात; वैद्याने उपचार करत असताना या मंत्रांचा 'आधार घेणे' अपेक्षित आहे पण त्यांच्यावरच 'अवलंबून राहणे' नाही. औषधोपचार करणे हे वैद्याचे प्रमुख कर्तव्य. आणि वैद्येतरांनी तर मंत्रचिकित्सेच्या फंदात पडूच नये. कितीही अवडंबर माजवले तरी आपण कोणी ब्रह्मर्षी वा देवर्षी नाही याची जाणीव गावोगावी आणि गल्लोगल्ली दिसणाऱ्या अशा तथाकथित 'मंत्रचिकित्सकांनी' ठेवावी आणि आयुर्वेद वा भारतीय संस्कृती यांची ढाल करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करू नये. रुग्णांनीदेखील अशा भोंदूपणापासून सावध रहावे. कारण 'मागणी तसा पुरवठा' हा अर्थशास्त्राचा आवडता सिद्धांत आहे!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Wednesday, June 22, 2016

अम्लपित्त

आयुर्वेदातुन -- आरोग्याकडे

          🌿 अम्लपित्त 🌿

  😁 अम्लपित्ताची कारणे 😁

विरूध्द अन्न सेवन -- दुध फळे, मिल्कशेक, फ्रुटसलाड, दोन वेळा गरम केलेले अन्न, मटकी सारखे विदाह करणारे मोडयुक्त पदार्थ खाणे अम्लपित्त निर्माण करणारे असते.
           सोबतच आंबट विदाहकारक पदार्थ दही पालेभाज्या यांचे अधिक प्रमाणातील सेवन अम्लपित्तकारक असते.
 पावसाळ्यातील अम्ल गुणधर्मात्मक पाण्याच्या साहाय्याने वरील पदार्थ शरीरात अम्लपित्ताचा आजार निर्माण करतात.

     🌿 अम्लपित्ताची लक्षणे 🌿
अन्नाचे पचन योग्य रितीने न होणे, मळमळ, कडु तिखट ढेकर येणे, शरीरात जडपणा निर्माण होणे, कण्ठ उरात जळजळ निर्माण होणे, अन्नाची चव नष्ट होणे असे त्रास अम्लपित्त शरीरात निर्माण झाल्यानंतर होतात.

कफपित्तजन्य पदार्थ उदा. मिल्कशेक फ्रुटसलाड आदी विरूध्द पदार्थांनी वाढणारया अम्लपित्तामध्ये कडु, आंबट ढेकर येतात, उलटी होते, उरात कंठाच्या ठिकाणी जळजळ होते, अंधारी चक्कर येते, आळस, तोडांला चव नसणे, डोकेदुखी, मुखात लाळ पाणी येणे, तोंड गोड पडणे असी लक्षणे दिसतात..

 एकदा अम्लपित्ताचा त्रास सुरू झाला की मग हितकारक अन्न घेतले तरी ते नीट न पचता अम्लपित्त वरचेवर वाढवित जाते..
   Antacids वा सोडा आदी तात्पुरते उपाय तात्पुरता उपशम देतात. पुन्हा काही दिवसांनी त्रास जसा आहे तसाच होतो. कारण आजारांच्या कारणांनुसार चिकित्सा होत नाही.
     मनाने self medication करण्यांची संख्या खुप मोठी आहे.
अशा लोकांना भविष्यात मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो.👇🏻👇🏻👇🏻
People taking proton pump inhibitors may have increased risk of myocardial infarction, study shows | The BMJ - http://www.bmj.com/content/350/bmj.h3220
अम्लपित्त साधा आजार कधीच नाही अम्लपित्ताकडे दुर्लक्ष करणे गंभीर आजांराकडे घेऊन जाते.
       फक्त पित्तशामक गोळ्या औषधींनी अम्लपित्त कमी होत नाही त्यासाठी अन्नपचनात सुधार अत्यावश्यक नाहीतर रोज आयुर्वेदीय or allopathy antacids खावे लागतात. त्रास काही कमी होत नाही वरचेवर वाढतच जातो. योग्य कारणानुरूप अन्नपचन सुधारण्यासाठीची चिकित्साच फलदायी ठरते..

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड

Tuesday, June 21, 2016

योग म्हंजे काय रं भाऊ ?

योग म्हंजे काय रं भाऊ?
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. भारतीय केंद्र शासनाने उचललेले एक स्पृहणीय पाऊल. आज जगभरातील अनेक देशांत मोठ्या प्रमाणात हा दिन साजरा केला जात आहे. आपल्या देशातही अनेक ठिकाणी सामूहिक आसन कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. मात्र हे सगळे करताना 'योग' म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो का आपल्याला??
आलटून-पालटून नाकपुड्या दाबून घेणे म्हणजे योग की; अवघड अशा शारीरस्थिती करणे म्हणजे योग?
सकाळी सकाळी टीव्हीसमोर बसून केला जातो तो योग की; हिरवळीवर 'योग मॅट' अंथरून केला जातो तो??
'युज्' या धातूपासून 'योग' हा शब्द तयार झाला आहे. युज् म्हणजे 'जोडणे'. काय बरं जोडायचे असेल इथे?
जीवात्मा आणि परमात्मा यांना एकमेकांशी जोडणे म्हणजे योग.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात; 'योग: कर्मसु कौशलम्।' अर्थात; कर्मबंधनातून मुक्त होणे हा योग आहे.
योग शास्त्राचे प्रणेते असलेले महर्षि पतंजली सांगतात; 'योगः चित्तवृत्ती निरोध:।' अर्थात; आपल्या मनाच्या प्रवृत्तींवर ताबा मिळवणे म्हणजे योग. हा ताबा मिळवत जाऊन अखेरीस भगवंतांनी सांगितलेल्या स्थानापर्यंत म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंत जाणे हे आहे योगाचे ध्येय. योगाद्वारे मोक्ष मिळवताना आठ पायऱ्या चढाव्या लागतात. म्हणूनच योगाला नाव मिळाले 'अष्टांग योग'.
आपण ज्याला योग समजत असतो ते आसन आणि प्राणायाम या गोष्टी म्हणजे संपूर्ण योग नसून केवळ या आठांतील केवळ दोन पायऱ्या आहेत. आजकाल आपण यापूर्वीच्या यम-नियम इत्यादि पायऱ्यांना चक्क गाळून टाकलंय आणि थेट आसन-प्राणयामावर उडी मारली आहे. इतकंच नाही; तर त्यावरून पुढे असलेल्या धारणा-ध्यान-समाधी या पायऱ्या चढून मोक्षापर्यंत जाण्याचीही आमची तयारी नाही. आम्ही आपले त्रिशंकूसारखे मधल्या मध्ये अडकून पडले आहोत. 'करो योग रहो निरोग' हा नारा ऐकायला छान आहे. कित्येक प्रमाणात उपयुक्त ठरू शकतोदेखील मात्र ते योगशास्त्राचे अंतिम ध्येय नाही हे आजच्या योग दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ध्यानात घ्यायला हवे.
जगाला योगशास्त्राची अमूल्य देणगी देणारी भारतीय संस्कृती आणि या शास्त्राला दर्शन म्हणून त्याला सूत्रबद्ध करणाऱ्या महर्षी पतंजलींना दंडवत.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Saturday, June 18, 2016

मुळव्याध

Piles...मुळव्याध ।।।

अर्श म्हनुन आयुर्वेदात ओळखला जानारा आजार..
बरेच प्रकाराने सजलेला व विविधतेने नटलेला हा आजार..
कधी रक्त पडते,कधी गुद द्वाराच्या ठिकानी वेदना होतात,तर कधी बसता येत नाही।

अशा व अनेक कारने घेवुन रुग्न चिकित्सालयात येतात
नाडी परिक्षन केल्यानंतर दरवेळी वात व पित्त हे दोन दोष नेहमीच सोबत ह्या ठिकानी वास्तव्य करतांना दिसतात तर कधी कफासह सुज उत्पन्न करतात ।

पन हे दोष आपल्या मुळ जागेला सोडुन ह्या ठिकानी स्थान संश्रय का बरे करतात,कोन आणत ह्यांना ह्या ठिकाणी..!!

अर्श रक्त मांस धातुगत आजार व गुदद्वार व गुदनासिका ह्याच्या वलीमध्ये होनारा ,त्वचा व मांस ह्या धातुंना दुष्ट करनारा,
घडाळ्याच्या आकड्याप्रमाने वेगवेग्ळ्या स्थानांमध्ये होनारा,

गुदाच्या मल विसर्जन करने ह्या कार्यात अडथळा निर्मान करनारा हा आजार।।

काहींना जन्मापासुन वा त्यानंतर होतात।।

तर कधी रक्तस्त्राव युक्त तर कधी कोरडे मोड युक्त ।।

तर कधी अत्यंत वेदनायुक्त संपुर्न शरीराला त्रास दायक ,मलावष्टंभ करनारे,बलहानी व इतर इंद्रियाॉनामध्येही बिघाड आननारे असे मोड असतात..!!

तर कधी लालसर,स्पर्श केला की गरम लागनारे,स्राव युक्त,असे काही असतात,ताप उत्तपन करनारे काही मोड असतात.!

तर काही बेरट असतात,कठीन असतात,सर्दि ला पडस्याला सोबत घेवुनच असतात,
तेथे खाजही येते ,हे मोड खरतर रक्त व मांस धातुपासुन तयार होतात  व कफासहीत सुज उत्पन्न करतात

गुदद्वाराच्या ठिकानी तीऩ वली (spincters )असतात,जे मलाला धरुन ठेवने व योग्य वेळी बाहेर काढन्याचे कार्य करतात त्यानुसार,

आतली पहिली वली प्रवाहीनी,

            दुसरी म्हनजेच मधली विसर्जिनी

            तिसरी संवहरणी अश्या तिन वली व शेवटी गुदोष्ट (Anus.)

त्यामुळे ह्या वलीमध्ये सतत होनार्या मलाच्या अपक्व वा खडेयुक्त संचयामुळे वलीमधील कार्यक्षमता कमी होते व त्या रक्त व मांसल धातुपासुन तयार होतात
 व तेथे ह्या मलाच्या संचय वा वातप्रकोपक विहार व आहारामुळे, त्यात कठीनजागी बर्याच वेळ बसने,अवेळी जेवन,कमी पानी घेने,योग्य आहार न घेने,वेगाचे अवरोध म्हनजे मल मुत्राचा अवरोध
तसेच काहींना अनुंवशिक असतो
तर काही स्रीयांना प्रसुतीनंतर होतो,

वलीमध्ये होनारे मोड हे कधी आतल्या बाजुने असतात
कधी त्रास देतात तर कधी देत नाहीत

कधी कधी हे मोड शौचाला गेल्यांनतर सुजुन बाहेर येतात व परत आत जातात तेव्हा शौचाला फार त्रास होतो

कधी हे मोड बाहेर आल्यावर आत जात नाहीत।।
कधी स्राव होतो,खाज ही येते
ह्या सर्वाचा दोषांनुसार भेद करुन चि करता येते

तर कधी हे मोड बाहेरच गुदोष्ठाच्या ठिकानी तयार होतात,वेदनायुक्त,स्रावी वा कंडु ( खाज ) युक्त असतात

वारंवार खडे युक्त मलप्रवुत्तीमुळे म्हना वा फार जोर दिल्याने म्हना वली वर आघात होवुन जखमा होतात,चिरा पडतात त्याला परिकर्तीका म्हनतात वा fissure म्हनतात,त्यास ही दोष भेदाने चि करता येते
व ते पुर्न बरे होतात।।

बर्याच वेळेला रुग्न हा
त्रासलेल्या अवस्थेत येतो,
डॉ मला मुळव्याध आहे,बसता येत नाही फार दुखते काहीतरी करा पन मला बरे करा।।

ह्यांचा व्यवसाय व वय हे नेहमीच आयुर्वेदिक चिकित्सेत महत्वाचे आहे

मी ड्रायवर आहे,टेलर,माळी फुले हार बनवनारा,बसुन काम करनारे मग काही इंजिनिअर पन व डॉक्टरीपेशातील सुध्दा..

काय चुकते  ह्यांचे जो हा महाभंयकर आजार उद्भवतो.. म्हनुन काही वेळा Sitter disease म्हनुन विनोद म्हनुन म्हनतो।।

शरीरात प्रत्येक स्त्रोतस म्हनजेच प्रत्येक system एका अग्नीवर वा पेट्रोलवर काम करत असते तो अग्नीच जर मंदावला तर system रुपी गाडीही मंदावते व हळुहळु काम काढते तसेच शरीराचे आहे,

योग्य वेळी शरीराकडे लक्ष देने गरजेचे आहे,मलाच्या दुष्टीमुळे परिनामी पचन संस्थेतेच्या बिघाडामुळे परिनामी पचनास सहायभुत अग्नी जाठराग्नी मंदावल्यामुळे ,पचनाच्या चलन वलन करन्यास सहायभुत वायु समान व व्यान ह्याच्याही बिघाडामुळे अन्न पचन सुरळीत होत नाही,परिनामी मल व मुत्र ही व्यवस्थित तयार होत नाही,हाच व्यान वायु न समान वायु मंदाग्नीमुळे रक्त व मांस धातुची दुष्टी करुन अपान वायु जो मल मुत्र आर्तव ह्याचे धारन व विसर्जनाचे कार्य करतो त्याला ही दुष्ट करुन मलाच्या विसर्जनास अडधळा निर्मान करतो...

पन हे आपोआप तर नाही होत,

अवेळी जेवन,कित्येक तास बसुन काम करने,आळस आला तर दिवसातुन १० ते १२ वेळा चहारुपी बिनकामाचे अम्रुत पिने,
पर्यायी पानी कमी पिने,
शिळे अन्न खाने,गाडी वरुन प्रवास अत्यंतिक करने,वेगाचा अवरोध करने म्हनजे मुत्र प्रवुत्ती आल्या नंतरही रोखुन धरने तसेच मलाचेही..
स्त्रियांच्या बाबतीत तसेच ,
डिलीवरी नंतर बर्याच स्रियाॉमध्येही त्रास जानवतो...

सुरवात ही पोट फुगने,पोटर्या दुखने,पोट साफ न होने ,परिनामी भुक कमी लागने,करपट ढेकर,पोटात दुखने  आणि ह्या सर्वाचा
परिनाम हा मनावरही होतोच।।

रक्ताची दुष्टी असली की मनाची हा दुष्टी होते,चिडचिड,राग उत्पन्न होतो

पु ल देशपांडे ह्यांना एकदा विचारले,तुमचा आयुष्यातील एखादा चांगला प्रंसग वा दिवस कोनता?

ते म्हनाले ज्या दिवशी माझे पोट साफ होते तो दिवस माझा परमानंदाचा!!! विनोद राहुद्या पन हे सत्य आहे ।।

तसेच सुरुवातीलाच लक्ष देने गरजेचे आहे,

लक्ष देने म्हनजेचे टिव्ही वरील वा वर्तमानपत्रातील जाहीरातीकडे नाही तर योग्य त्या वैद्याकडे  जावुन सल्ला घेने महत्वाचे।।

(उगाच आयुर्वेदाचा दुष्परिनाम होत नाही म्हनुन दुकानातुन,वा औषधी विक्रेत्याकडुन घेवु नये,कारन योग्य ते औषध न घेतल्याने तो आजार ठिक न होता जास्त बळावत जातो व त्यामुळे उपचार करतांना ही बर्याच अडचनी येतात तो विषय वेगळा आहे)

वेैद्याच्या सल्ल्यानेच घ्या।।
तसेच
सुरुवातीलाच जर चिकित्सा योग्य ती घेतली तर तो आजार समुळ नष्ट होतो,
आजाराला त्याच्या सुरुवातीलाच जिंकावे असे म्हनतात पन रुग्न शेवट पर्यत स्वत : एकटाच लढत असतो,व शेवटी हार पत्करुन जेव्हा येतो तेव्हा लगेच बरे करा म्हनतो,

स्वत: ३ ते ६ महिने अंगावर काढले ना त्यापेक्षाही जास्त व मला उद्या पर्यत बरे वाटेल असे करा..

पन रुग्नाला शरीर का बिघडले हे समजावुन सांगीतले की तो मग एकतो तसेच ,

मित्रांनो अर्श हा अाजार आपल्याला आहे तर लवकर त्याची चि करने गरजेचे नाहीतर त्या आजाराला धरुन इतरही आजार आपले डोके वर काढतात,

उदा,लघवीचे आजार, भंगदर fistuala ,परिकरतीका fissure व उदावर्त म्हनजे पोट साफ न झाल्याने वायु उध्व गत होवुन पोट फुगी,दम लागने,छातीत दुखने अशे आजार उ्भवतात।।

चिकित्सा

औषधी चिकित्सा व पंचकर्म चिकित्सेने हा आजार पुर्न बरा होतो पन शरीराची काळजी ही आपन घेनेही तेवढेच महत्वाचे आहे ,आपन काय खातो हेही पाहने फार गरजेचे आहे

चांगल्या पालेभाज्या,सुरन,ताक तसेच ताजे अन्नाचा वापर व योग्य वेळी जेवन( मी माझ्या मागील लेखात दिनचर्या सागीतली आहे ते पहावे।।) व पान्याचा योग्य वापर करने..!!

जेवन करतांना शांत व जेवनाचा आनंद घेवुन जेवन करने
ही गरजेचे आहे..
जेवतांना कमी पानी घ्यावे व जेवन झाल्यानंतर २० -३० मि पाणी घ्यावे

जेवल्यानंतर थोडेसे चालने

तसेच अति तिखट ,अतिआंबट ,शिळे अन्न ई वापर कमी प्रमानात करने

चहा काँफी हे दाहक पदार्थ कमी प्रमानात आहारात घेने,त्यापेक्षा कोंधबीर सैधव युक्त ताक घ्यावे,ताकासारखे दुसरे औषध नाही,
तर कधी फळाचा रसही घ्यावा,
सुरनाची भाजी व त्याचा वापर करावा

पाव,ब्रेड असे पदार्थ टाळावेत,

फळ केळ,डाळिंब,जांबुळ,अंजिर ,मोसंबी ज्युस ई फळाचा वापर ठेवावा

पालेभाज्या वापर करावा पन त्या योग्य धुवुन ,तपासुन घ्याव्यात
वा त्याचे सुप बनवुन ही द्यावे

आहारात तुपाचा( गाईच्या ) वापर नियमित करावा

कधी कधी मोड एवढ्या प्रमानात असतात की गुदद्वारही दिसत नाही व वेदना ही प्रंचड प्रमानात असतात,मनाची दुष्टी होते व असह्या होते रुग्नाला,त्यावेळी औषधी चि व आराम व योग्य औषधी आहार,कधी कधी संपुर्न दिवस औषधी ताकावरच राहावे लागते,जाठराग्नी जेवढा दिपन होईल तेवढ्या लवकर हे मोड लहान होतात,

दिरंगाई व दुर्लक्ष केल्यास व योग्य वेळी चिकित्सा न केल्यास
शस्त्र क्रिया करुन ते मोड काढुन टाकावे लागतात
पन मोड काढल्यानंतरही जर रुग्नाने आपला आहार व विहार बदलला नाही तर चे पुन्हा उत्पन्न  होतात...!!

औषधी चिकित्सा,पंचकर्म बस्ती चिकित्साने हा आजार पुर्न बरा होतो पन रुग्नाने योग्य वेळी शरीराची काळजी घेने गरजेचे आहे..!!

आपन जसे आपल्या महागड्या मोबाइलची ,महागड्या गाडीची काळजी घेतो तसेच सर्वात महाग अशा शरीराचीही काळजी घेने महत्वाचे आहे...!!!

आयुर्वेद सर्वांसाठी..!!

धऩ्यवाद

वैद्य सचिन भोर
ठाणे।।
साईनाथ आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
dr.Sachin_bhor@yahoo.com
9821832578/8451023643.

Sunday, June 12, 2016

ऋतुचर्या व जीवनशैली

ऋतुचर्या व जीवनशैली
- वैद्य स्नेहा मार्लेवार एम. डी. (आयु)
आयुर्वेद हे व्याधींचे शास्त्र नसून आरोग्याचे शास्त्र होय. व्याधी होण्याआधीच तो होऊ नये यासाठी काय काळजी (प्रिकॉशन्स) घेता येतील याचे ज्ञान फक्त आयुर्वेद शास्त्रात दिलेले आहे. आपले जीवन आरोग्यमय होण्यासाठी आयुर्वेदात विविध परिचर्या सांगितल्या आहेत. त्यात जन्मापासून वृध्दावस्थेपर्यंत जातमात्र परिचर्या, बालकांसाठी लेहन, चाटन, अन्नप्राशन, संस्कार, तसेच दिनचर्या, ऋतुचर्या, ऋतुमती स्त्रियांसाठी रजस्वला परिचर्या, गर्भिणींसाठी गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या या सर्व परिचर्यांचे त्या -त्या वेळी व्यवस्थित पालन केल्यास त्या स्थितीशी निगडित आजार होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राने या परिचर्यांवर विशेषत्वाने भर दिलेला आहे. जे की इतर कुठल्याही शास्त्रात हे आढळणार नाही.
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य साधनेला महत्त्व दिलेले दिसते. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, सद्वृत्तपालन, आचार रसायन, प्रकृतीविशिष्ट आहार- विहार, आरोग्याचे निर्देशक मापदंड दिसून येतात. त्यावर प्रकृतीचा विचारही केलेला दिसतो. आरोग्य ही एक स्थिती आहे आणि तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. दिवा लावला म्हणजे 'सकाळ झाली' असा त्याचा अर्थ होत नाही प्रकाश होतो एवढेच! आरोग्य रुजवावे लागते.  आरोग्याची आजीवन उपासना कशी करावी याचे सखोल विवेचन आयुर्वेदामध्ये दिसून येते. ज्या शरीरात दोष, धातूमल, अग्ी यांच्या क्रियांमध्ये समतोल आहे. मन, आत्मा व इंद्रिय प्रसन्न आहेत; ते शरीर स्वस्थ समजावे. त्यासाठी ''सर्व अन्यं परित्यञ्य शरिरं अनुपालयेत् । बाकी सर्व सोडून अगोदर शरीराचे नीट अपालन करावे. हा संदेश स्पष्टपणे जगाला दिलेला आहे. पण आपले सुख फक्त ऐहिक स्वरूपाचे असते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आयुर्वेदाचे चिंतन आहे.
दीपावलीच्या निमित्ताने आपण फक्त ऋतुचर्या आणि जीवनशैली एवढाच विचार या लेखात करणार आहोत. 'ऋतू म्हणजे बदलणारा काळ. प्रत्येक प्रदेशानुसार किंवा देशानुसार ऋतू लांबतो किंवा कमी होतो. नजीकच्या काळामध्ये ऋतुलक्षणांचा आधार घेऊन ऋतुपालन सर्वांना करावे लागणार आहे. प्रत्येक ऋतू हा दोन महिन्यांचा असतो. असे एकूण सहा ऋतू आहेत .
प्रत्येक ऋतूत सभोवतालच्या परिसरात बदल दिसून येतात. वातावरणात विशिष्ट बदल झाल्यावर पर्यावरणातसुध्दा बदल होतो. ऋतूबदलानुसार दोषस्थितीचा विचार आयुर्वेदात आढळतो. दोष 'चय/प्रकोप' झाल्यास ऋतूनुसार आपल्या आहार - विहारात बदल करून दोषांचे शमन करून आरोग्याचे समतोल साधण्याचे व्यवस्थापन म्हणजे ऋतुचर्या.
ऋतुचर्याबाबत पालनाबाबत विचार करताना ऋतूचे साधारण दोन भागांत विभाजन करता येईल.
1) आदान काळ  2) विसर्गकाळ
आदान काळ ः-
हा आग्ेय गुणात्मक असून या काळात सूर्य हा उत्तरायनात असल्यामुळे सूर्याचे किरण प्रखर असतात. त्यामुळे सृष्टीमध्ये रुक्षता, तीक्ष्णता, उष्णता वाढून सृष्टीच्या बलाचा ऱ्हास होतो. कडू, तूरट आणि तिखट या रसांची वृध्दी होते म्हणून मनुष्यांच्या ठिकाणी दुर्बलता येते. सृष्टी आपले बल हिरावून घेते म्हणून या काळात आदान काळ म्हणतात. शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतूंचा समावेश या काळात होतो.
विसर्ग काळ ः- हा काळ सौम्य गुणात्मक असतो, सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे ढग, वर्षा यामुळे सूर्याचा प्रभाव नष्ट होऊन चन्द्राचा प्रभाव वाढतो. चंद्राच्या शीतल किरणांच्या प्रभावामुळे सृष्टीचे पोषण होते. पृथ्वीवरील संताप नष्ट होतो. रुक्षता कमी होते. आम्ल, मधुर आणि लवण रसाची वृध्दी होते. त्यामुळे मनुष्यांना बलप्राप्ती होते. वर्षा, शरद आणि हेमंत या ऋतूंचा समावेश या काळात होतो.
शिशिर ऋतुचर्या -
माघ आणि फाल्गुन या महिन्यांचा समावेश या ऋतूत होतो. ढग, वारा आणि पावसामुळे या ऋतूत शीतलता जाणवते पण आदान काळामुळे रूक्षता उत्पन्न होते. निसर्गात झाडांची पानगळती होते. वातावरण शीत असल्यामुळे अग्नी बऱ्यापैकी प्रदिप्त असतो. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाणे हितकर ठरेल, त्याचप्रमाणे व्यायाम, उद्वर्तन, अभ्यंग, स्वेदन करण्यास हरकत नाही.
वसंत ऋतुचर्या ः-
वसंत ऋतूला 'ऋतूंचा राजा' म्हणतात. या काळात वारा दक्षिणेकडून वाहतो आणि दिशा निर्मळ होतात. सूर्यकिरणे लाल रंगाची होतात. वृक्षांना नवी पालवी फुटते. आंब्याला मोहर येतो. चैत्र आणि वैशाख महिन्यांचा यात समावेश असतो. शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला फक्त या अन्यांमुळे पातळ होतो. त्यामुळे अग्नी मंद होतो. बल कमी होते आणि विविध व्याधी उत्पन्न होतात.
अग्नीमांद्याचा विचार करून आहार योजना करावी लागते. गहू, ज्वारी, बाजरी, जव इ. जुन्या धान्यांचा वापर या काळात करायला पाहिजे. कणिकाचे फुलके, खाकरा, जोंधळयाची भाकरी, असे हलके पदार्थ खावेत. त्याचप्रमाणे तांदूळगा, शेवग्याच्या शेंगा, पातीचा कांदा, पडवळ, मुळा, वांगी यांचा आहारात समावेश करावा. मसाल्यांचे पदार्थ, तेल याचाही वापर करावा.
दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. दुपारी भूक लागल्यास मुरमुरे आणि लाह्यांचा चिवडा खावा. दही, श्रीखंड, लस्सी यांसारख्या पदार्थाच्या सेवनानंतर लगेच झोपू नये. या ऋतूमध्ये तज्ज्ञांच्या सल्यानुसार वमन करून घेण्यास हरकत नाही.
ग्रीष्म ऋतु ः- या ऋतुत वात दोषाचा संचय होतो. त्यामुळे शक्ती कमी झाल्याचा अनुभव येतो. उत्साह वाटत नाही. अग्ी मंद होतो. या काळात पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. थोडया प्रमाणात व्यायाम करावा. चंदनबला तेलाने अभ्यंग करावे. ज्यांना दररोज वेळ मिळत नाही त्यांनी शनिवार/रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी अभ्यंग करावे. आहारात मधुर, शीत, पातळ, तरल आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा. द्रव आहारामध्ये दूध+साखर, सरबत, पन्हे, नारळपाणी व फळांचे रस घ्यावेत. रात्री चांदण्यात उघडयाने झोपावे. शक्यतो सुती तलम कपडयांचा वापर करावा. या काळात शक्यतो मैथुन टाळावे. रात्री उशिरा जेवण करू नये. दुपारी थोडीशी वामकुक्षी घेण्यास हरकत नाही.
आहारामध्ये भेंडी, पडवळ, गाजर, फ्लॉवर, बीट, सुरण कोहळा यांसारख्या भाज्या, मूगडाळ अख्खे मसूर यांचा वापर करावा. कणकेची खीर, दूध-पोळी खावे तसेच सकाळच्या व्याहारीला तूप-मीठ-भात खावे. आमटीमध्ये धने, जिरे, हिंग, हळद यांचा वापर करावा. तसेच कैरी, कोकमदेखील वापरावे. ताकाची कढी विशेषत्वाने सेवन करावी. पण दही मात्र वर्ज्य करावे.

वर्षा ऋतुचर्या ः- श्रावण आणि भाद्रपद या दोन ऋतूंचा समावेश वर्षा ऋतुत होतो. आदान काळाच्या प्रभावाने शरीर आणि जाठराग्नी दुर्बल झालेले असतात आणि वरून पावसामुळे जमिनीतून वाफ असल्यामुळे प्राषण केलेल्या पाण्याचा आम्ल विपाक होऊन दोष दुषित होतात आणि जाठराग्नी मंद होतो. या ऋतूमध्ये वमन/विरेचन आणि बस्ती चिकित्सेने शरीराची शुध्दी (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली) केल्यास बरे राहील.
अग्निमाप असल्यामुळे शक्यतो जुने धान्य, गहू, तांदूळ, यव यांचा समावेश आहारात असावा. जुने धान्य पचण्यास सोपे असतात.
या काळात जाठराग्नी मंद असल्यामुळे त्याला बलवान्द करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आठवडयातून एकदा लंघन करणे आवश्यक असते. त्यामुळे हिन्दू धर्मात या काळात उपवास, व्रत, वैकल्ये सांगितले आहेत. परंतु लोक त्याचा विपर्यास करतात आणि उपवासाचे वेगवेगळे पदार्थ अति गरम करून खातात त्यामुळे उलट जाठराग्नी मंद होतो. या काळात तेलापेक्षा साजूक तुपाचा वापर अधिक प्रमाणात करावा. जेवणामध्ये ताजे आणि गरम गरम जेवण जेवावे. भोपळा, पडवळ, बीट, रताळी यांचा वापर करावा. लसूण, जिरे, सुंठ, मिरी, आले अशा अग्नीवर्धक पदार्थांचा वापर करावा. तांदूळ, गहू, शिंगडे, मुग यांची खीर खावी. स्नानासाठी कोमट पाणी वापरावे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'बस्ती चिकित्सा' करून घ्यावी. बस्ती म्हणजे आयुवर्ेदीय औषधांचा एनिमा विशिष्ट कालवधीत करावयाचा असतो.
उद्वर्तन, स्नान, धूम्रपान इ. क्रिया कराव्यात या ऋतूत पाणी स्वच्छ गाळून आणि उकळून प्यावे या काळात व्यायाम करू नये उन्हात जाऊ नये. उन्हात जाऊ नये.
शरद ऋतुचर्या ः- आश्विन आणि कार्तिक महिन्यांचा समावेश असलेल्या या ऋतूत, वर्षा ऋतूतील संचित पीत्ताचा सूर्याच्या उष्णतेने प्रकोप होतो. कइरस युक्त द्रव्यांनी सिध्द केलेल्या तुपाचे सेवन करून विरेचन करावे आणि रक्तमोक्षणासाठी हा ऋतू अगदी योग्य होय. त्यामुळे रक्तप्रसानास मदत होते. व रक्त शुध्दी होते.
शीतल आणि हलके जेवण करावे. आहारात तुरट, मधूर आणि कडू रसांच्या पदार्थांचा समावेश करावा. भूक लागल्यावर साठी साळी, गहू, यव, मूग, मद्य, साखर, पडवळ, द्राक्ष तसेच मांस सेवन करावे. पित्त प्रकृतीच्या लोकांनी साजूक तूप किंवा स्निग्ध घृन दुधात घालून सेवन करावे. त्वचाविकार असणाऱ्या व्यक्तींनी रक्तमोक्षण करून घ्यावे. आहारामध्ये मुगाची डाळ, जुन्या, तांदुळाचा भात, जोंधळयाची भाकरी, फुल्का, मटकी, चणाडाळ, फळ भाज्यामध्ये दुधी, पडवळ, घोसाळी, दोडके, रताळी, काकडी, माठ, तांदूळगा, पालक, कारले, मेथी अशा कडू व भरपूर रस असलेल्या भाज्या सेवन कराव्यात. या ऋतूमध्ये तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन कर्म करावे.
या ऋतूत हिरवी मिरची, दही, लोणची पापड कमी प्रमाणात घ्यावीत. ओल्या खोबऱ्याची चटणी चवीपुरते मीठ घालून पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी खावी. चंद्राच्या प्रकाशाचे सेवन करावे कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवून आपण चंद्रप्रकाशात पिण्याचे ते एक कारण होय.
या काळात अगदी पोटभर जेवू नये. दही, उन्हात जाणे क्षारीय पदार्थांचे सेवन, तेल, तीक्ष्ण मद्य टाळावे तसेच दिवसा झोपू नये.
हेमंत ऋतुचर्या ः- मार्गशीर्ष - पौष महिन्यांचा समावेश असलेल्या हा ऋतु आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक बलप्रदान करणारा ऋतु होय. अतिशय शीत अशा ह्या ऋतूमध्ये शरीरातील उष्मा शीतल वायूच्या माऱ्याने शरीरात प्रवेश करतो आणि जाठराग्नी प्रदीप्त करतो. म्हणून या काळात पचण्यास गुरू आणि शक्तिदायक पदार्थांचे सेवन करावे. अन्यथा अग्नीस योग्य इंधन न मिळाल्यास अग्नी तो मंद होतो किंवाउदीर्ण होऊन शरीरातील धातूंचे पाचन करून शरीरातील धातू क्षीण करतो. त्यामुळे या ऋतूमध्ये स्निग्ध - मधुर - आम्ल - लवण रसांचे सेवन करावे.
मांसाहार, शिरा, उडीद, डाळींपासून बनणारे पदार्थ, उडीदाचे लाडू, डिंकाचे लाडू, भाज्यांचे पराठे, पुरी लोणी, दुधापासून बनवलेले पदार्थ इ. भरपूर प्रमाणात खावेत आणि ऊर्जा जमा करावी जेणेकरून ही जमा झालेली ऊर्जा आदान काळात किंवा आजारपणामध्ये आपल्याला वापरता येते.
या काळात व्यायाम, उद्वर्तन, अभ्यंग, स्वेदन, धूम्रपान, अंजन आणि उन्हाचे सेवन करावे. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा. या ऋतूत वात, पित्त व कफ हे तीनही धातू साम्यवस्थेत असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढलेली असते. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने 'रसायन चिकित्सा' करावी.
थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा लाभ होण्यासाठी व बदलत्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होणारे आजार टाळण्यासाठी शास्त्रकारांनी ऋतुचर्येचे वर्णन केले आहे. त्याचे अगदी तंतोतंत नाही तरी जेवढे जमले तेवढे अनुकरण करणे शहाणपणाचे ठरेल. वरील सर्व बाबींचे तारतम्य राखून ऋतुचर्या आचरल्यास बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार निश्चितपणे टाळता येतील.
भ्रमणध्वनी : 9819449316

Saturday, June 11, 2016

आरोग्यदायी जीवन जगा

आरोग्यदायी जीवन जगा
 सध्याच्या आधुनिक धावपळीच्या युगात प्रत्येकजण ताण - तणावाखाली आढळतो . सतत व्यवसायाचा ध्यास, पैसे कमविण्याची धावपळ  स्वतःसाठी तर वेळच नाही . राहणीमान बदलले, जीवनशैली बदलली, आहाराच्या, झोपेच्या वेळा बदलल्या. निसर्ग नियमाच्या विरुध्द सर्व काही सुरु आहे. यामुळे  कमी वयामध्ये मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड , आम्लपित्त, मलबध्दता, निद्रानाश अशा आजारांनी  ग्रासलेले दिसून येत आहे. . रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, वारंवार सर्दी - खोकला, अलर्जी , अतिसार असे आजार व्हायला लागले आहेत. अशा आजारावर घरगुती औषधांपेक्षा आधुनिक औषधांचा मारा केला जातो . याचा प्रतिकार क्षमतेवर परिणाम तर होतोच तसंच इतर रोगांनाही आमंत्रित केलं जातं . अशी वेळ आपण आपल्यावर का येऊ द्यावी ? आयुर्वेदात सांगितलेल्या  दिनचर्या, त्रतुचर्या यातील        काही साध्यासोप्या गोष्टी नित्य नियमाने पाळल्या तर बदलत्या लाइफस्टाइलने शरीराला दिलेला ताण आपल्याला सहजपणे पेलता येईल .  आजारापासून बचाव करण्यासाठी  आपली प्रक्रती व आपली दैनंदिन कार्यशैली ओळखून दिनचर्या बनवायची आहे . त्यासाठी या काही साध्या पण महत्त्वाच्या टिप्स .
 शरीर फिट व फाईन ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. मला दिवसभर घरी खूप काम असते, घरातील सर्व कामे मीच करते तरीही माझे वजन वाढते अशी तक्रार खूप लोकांची असते. व्यायाम आणि थकवा यातला फरक ओळखता आला पाहिजे . मुद्दाम वेगळा केला जातो तो खरा व्यायाम . कारण त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आपण दिवसभर काम करतो . पण  दिवसभर घरी जे काम  केले जाते  तो केवळ थकवा असतो.
कोणताही व्यायाम करताना त्याचे निकष व्यवस्थित लक्षात घेणं आवश्यक असतं. जराही कमी किंवा जास्त व्यायाम केला गेला , तर त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. नेमका किती आणि कसा व्यायाम करावा , याविषयी...
व्यायामामध्ये आपल्याला सोसेल, दररोज सहज होइल असा व्यायाम करावा.दररोज चालण्याचा व्यायाम करावा. ४ ते ६ किलोमिटर जाणे येणे करावे. आपले चालणे भराभर असावे, एका  मिनिटाला १०० ते १२० लांब लांब पावले पडायला हवी.  झपझप चालावे , चालताना दम लागणे आवश्यक आहे. घाम येणे आवश्यक आहे. लयबध्द पध्दतीने चालावे, चालताना पायांमध्ये योग्य मापाची पादत्राणे घालावीत. घराच्या बाहेर चालायला जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी ५-१० मिनीटे दंड बैठका, ५-१० मिनीटे दोरीच्या उडया , ५-१० मिनीटे सिट अप्स , ५-१० मिनीटे पायरया चढ उतर करणे,  १०-२०  मिनीटे  घराच्या गच्ची वर  चालणे असा व्यायाम करावा, ५ ते १० मिनीटे सायकल चालवावी.  एकुण ४० ते ६० मिनिटांचा दररोज व्यायाम होणे महत्त्वाचा. नियमित  व्यायाम  करणे हे वजन कमी करण्यामागची गुरुकिल्ली आहे. .
ताणतणावांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे . ताणामुळे शरीराचं चक्र बिघडून हृदयरोगांसारखे आजार होतात . योगसाधना , विशेषतः प्राणायामामुळे ताण कमी करता येतो . आयुर्वेदातील शिरोधारा केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
 आपण सकाळची न्याहारी टाळतो , दुपारी मोजकंच जेवतो आणि रात्री भरपेट जेवतो . हे सर्वस्वी चुकीचं आहे . सकाळचा नाश्ता राजा सारखा खावा, दुपारचे जेवण कर्मचारया सारखे करावे व रात्रीचे जेवण भिकाऱ्या सारखे करावे .
जेवणात साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा . मैद्याचे पदार्थ टाळावेत. वेळेवर जेवण करावे, कडकडुन भुक लागू द्यावी, नुसतेच वेळ झाली म्हणून जेवण करु नये. पुर्वी खाल्लेले अन्न पचू द्यावे. पचन न झालेलं अन्नही त्रासदायक असतं . ते आमाच्या रूपात शरीरात जिथेतिथे साठत आणि त्यामुळे आळशीपणा वाढीला लागतो . पुढे सांधे कठीण होऊन दुखू लागतात . त्यानंतर डायबेटिस , उच्च रक्तदाब आणि हृदरोगही उद्भवतात .आहारात  तेल-तुपाचा नियंत्रित वापर करावा. निव्व्ळ तेल तुप बंद करु नये. तेल - तूप वाईट नाही . उलट आयुर्वेदातली बहुसंख्य औषधं तेला - तुपातच बनतात . पण तेला - तुपात पदार्थ तळले की सगळंच बिघडतं . हे तळलेले पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असतात. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं आणि भूक लागेल तेव्हाच खावं , आणि लघूशंका, दीर्घशंका असल्यास आणि त्यांच निवारण वेळेवर होणे आवश्यक असते. हे गणित बिघडलं तर आजाराला निमंत्रण मिळतं .  अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.  शाकाहार, तसेच सात्त्विक आहार घ्या ! मांसाहार तसेच तमोगुणी आहार टाळा !    दूध, लोणी, गायीचे तूप, ताक, तांदूळ, गहू, डाळी, पालेभाज्या, फळे यांसारखे किंवा यांपासून बनवलेले सात्त्विक अन्नपदार्थ सेवन करा. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मिताहार करा !  जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.
 शरीर हे एक यंत्र आहे . ते सुरळीत चालावं म्हणून त्याचं सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे . हे सर्व्हिसिंग म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्मं . ऋतुबदलानुसार पंचकर्मं करावीत .
 शक्य तेवढं निसर्गाच्या सान्निध्यात राहावं . आपण निसर्गाचाच एक छोटा अंश आहोत . आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ' विहारा ' मध्ये निसर्गात राहणं अपेक्षित आहे .
 रात्रीची झोप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे . कारण या झोपेदरम्यान शरीर दुरुस्तीचं काम चालू असतं . ही झोप शरीराला रिचार्ज करते .
आधुनिक जीवन पद्धतीच्या नावाखाली आपण शरीरासोबत मनमानी करतो आणि त्याचा परिणाम म्हणून प्रतिकार शक्ती यंत्रणा बिघडते . अनेक रोगांना सामोरं जावं लागतं . आता सर्वच इंद्रियांचा आदर करण्याची वेळ आली आहे . हृदय याची अधूनमधून चौकशी करावी . तुला काय आवडतं ? कशाचा त्रास होतो ? माझं तुझ्याकडे लक्ष आहे असं तुला वाटतं का , असं विचारावं . याच प्रकारे लिव्हर, किडनी, मेंदु कडे लक्ष द्यावे, त्याची चौकशी करावी. पंचेंद्रिंयाची काळजी घ्यावी. ही आपली इंद्रियं दिवसरात्र आपल्यासाठी काम करतात. बऱ्याच वेळा जास्त काळ कामही करतात. कामावर कधीही दांडी नसते, की कामगार दिन म्हणून सुट्टी नसते. ज्यास्त वेळ टिव्ही बघणे, कानाला इअर फोन लावुन मोठमोठयाने संगीत ऐकणे, याप्रमाणे इद्रिंयाचे अतिश्रम टाळावे, अन्यथा चष्मा लागतोच, कानांचा बहिरेपणा निर्माण होतो. अर्थात हे फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित नव्हे तर त्यानुसार त्या अवयवाची काळजी घेणारी कृतीही करायला हवी.  आपल्या आनंदात शरीरातील अवयवांनाही समाविष्ट करुन घ्यावे. आज माझे किडनी, लिव्हर, मेंदु , फुफ्फुस, ह्रदय सर्व आनंदी आहेत अशा घोषणा द्याव्यात. डाव्या छातीवर थपकी मारुन ऑल इज वेल म्हणावे. रोजचा व्यायाम चुकवू नका. तरुण वयात शरीर सगळंकाही सहन करेल म्हणून त्याच्यावर अती श्रम, अती कष्ट लादू नका. आणि हो या सर्वासोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाव रहित जीवन जगा, ध्यान, धारणा, योगासने, प्राणायाम करा.
 स्वतःचं आरोग्य जसं समजून घेतलं पाहिजे तसंच आजारसुद्धा समजून घ्यायला हवा . त्यामुळे त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येऊन लवकर बरं होण्यास मदत होते . छोट्या - मोठ्या आजारावर लगेच औषधं घेऊ नयेत . थोडासा संयम बाळगावा . निसर्गाला तो बरा करण्यासाठी थोडासा अवधी द्यावा . पेन किलर किंवा आधुनिक औषधांचा वापर टाळावा . शक्य तेथे आयुर्वेदिक औषधी वापरावीत.
 डॉ. पवन लड्डा
 पत्ता  : लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
 पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपा मागे,
 लातुर. पिन कोड ४१३५३१
 मो. ०९३२६५११६८१
 Email- laddapvn@gmail.com

Friday, June 10, 2016

आमवातातील अपथ्य

आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे  वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -

आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन  शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??

१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations  ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!

मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??

१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे  म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .

२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .

३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .

४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .

५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!

आमवातातील 'अपथ्य '

१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .

असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे  वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -

आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन  शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??

१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations  ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!

मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??

१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे  म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .

२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .

३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .

४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .

५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!

आमवातातील 'अपथ्य '

१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .

असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे  वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -

आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन  शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??

१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations  ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!

मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??

१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे  म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .

२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .

३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .

४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .

५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!

आमवातातील 'अपथ्य '

१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .

असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Thursday, June 9, 2016

कीटक संकट

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे

   🐝🐞 कीटकसंकट 🐜🕷

पावसाळ्याचा काळ हा किटकसंकटांचा काळ असतो. आदान काळात मनुष्याचे शरीर दुर्बल असते, सोबतच जाठराग्नि ही दुर्बल बनते. या काळात जमिनीतुन निघणारया बाष्पामुळे, पावसामुळे, काळाच्या परिणामाने पाणी अम्लविपाकी बनत असल्यामुळे जाठराग्नि क्षीण होतो त्यामुळे शरीर व जाठराग्नि (भुक) आणखीणच दुर्बल बनते या काळात.
   म्हणुनच पावसाळ्याच्या काळात साधारणपणे सर्व विधींचे पालन करावे.
    पुर्वी चिकनगुणिया झालेल्या लोकांत सांधेदुखी सुज अत्याधिक असते, मच्छर कीडे मुंग्या सारखे प्राणी चावले की लहान बालकांपासुन मोठ्या लोकांत पिटिका चकते येतात.
मलेरिया डेंगुचा तापही असतो या काळात..
याला कारण बदललेले वातावरण म्हणजे अम्लविपाकी जल, जाठराग्नि व शरीर दुर्बलता हे असते.
पावसाळ्यातील आहार विहाराचे पालन केले तर या त्रासापासुन दुर राहता येईल.. त्रास असल्यास प्रकृती नुसार आहार विहार औषधींचा सल्ला नजिकच्या वैद्याकडुन घेता येईल.

🌥 पावसाळ्यातील आहार विहार 🌧

काही दिवसांनी पावसाला सुरूवात होईलच पावसाळ्यात बाह्य वातावरणात जसे बदल घडतात तसे शरीरातही बदल घडतात. या बदलानुसार आहार विहारीय बदल करणे आवश्यक आहे.
            पावसाळ्यात जेवनासोबत मधाचा अनुपान रूपाने वापर करावा. ज्या दिवशी अधिक थंड वातावरण असते त्या दिवशी शरीरातील वात अधिक प्रमाणात प्रकुपित असतो. त्यादिवशी वाताला कमी करण्यासाठी आंबट मीठ स्नेहयुक्त लोणच्या सारख्या पदार्थांचा उपयोग करावा.
             भुख चांगली राखण्यासाठी जुने यव, गहु, शाली तांदुळ यांचा नित्य उपयोग करावा. सोबतच उकळुन गार केलेले पाणी पिण्याकरिता उत्तम असते.
              पुर्वीच्या उन्हाळ्यातील आहार विहाराचे पालन केलेले नसल्याने उत्पन्न वाताच्या दमा, सांधेदुखी, पडसे, खोकला आदी आजारांसाठी बस्ती आदी वातनाशक शरीरशुध्दीचे उपक्रम वैद्याच्या सल्ल्याने करावेत.

🌧⛈  पावसाळ्यात वर्ज्य गोष्टी ✖

उदमन्थं दिवास्वप्नंमवश्यायं नदीजलम् ||
व्यायाममातपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् || च.सु.

पावसाळ्यात पाणी मिसळुन सातु खाणे, दिवसा झोपणे, ओस पडत असताना बाहेर फिरणे, नदीचे पाणी पिणे, व्यायाम करणे, उन्हात फिरणे, व्यवाय मैथुन कर्माचा त्याग केला पाहीजे.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड

Wednesday, June 8, 2016

संभोग केंव्हा करू नये ?

दैनंदिन आयुर्वेद - संभोग केव्हा करू नये ??

भारत हा जरी कामशास्त्राचा जनक असला तरी भारतात काम या बद्दल अनेक चमत्कारिक सुरस कथा आणि शास्त्र याबाबत अगाध अज्ञान प्रचलित आहे . हे भारताचे दुर्दैव आहे . इंटरनेट च्या अतिशय वापराने आणि वृत्तपत्रात येणाऱ्या अतिरंजित जाहिरातींमुळे काम यात काही शास्त्र आहे हेच लोकांना पटेनासे किंवा नकोसे झालेले आहे . कारण शास्त्र म्हंटले की काही नियम येतात . आता आपल्याला नियम मोडायला बहुत आनंद होतो . त्यामुळे काम याबाबत कोणाला 'ज्ञान ' घ्यावे असे वाटत नाही . माहिती मात्र पुस्तकाच्या काही पानांपासून ते १ टीबी हार्ड डिस्क पर्यंत कितीही असू शकते !

संभोग किंवा शरीर संबंध हे कधीही , कसेही , केव्हाही आणि कितीही ठेवायचा विषय नाही . याबाबत शास्त्रात काही नियम आहेत . परंतु 'हा ' विषय चार चौघात बोलायचा नाही असे असल्याने शास्त्रीय माहितीची देवाणघेवाण फार क्वचित झाली . 'शुक्र ' हा काही सतत शरीराबाहेर टाकायचा विषय नाही . आयुर्वेद तर शुक्राचे हर तर्हेने रक्षण करावे असे सांगतो . . का ?? कारण आयुर्वेदानुसार ज्या १० गोष्टीत जीव असतो त्यातील 'शुक्र ' हा महत्वाचा भाग आहे . शुक्र क्षयाने अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात . अर्थात येथे सीमेन = शुक्र असे म्हंटले तर जमणार नाही . कारण सीमेन हे वृषणात  तयार होते आणि जननेन्द्रीयातून  बाहेर पडते . . त्याचा मार्ग , प्रभाव आणि अधिकार तितकाच . . आयुर्वेदाने वर्णीत शुक्र मात्र सार्वदेहिक असते . त्याचा क्षय झाला तर बाधक परीनक सर्व शरीरावर दिसून येतात !

पुरुषाने संभोग केव्हा करू नये ?

१. ज्या पुरुषाने भरपूर अन्न खाल्ले आहे .
२. ज्याला भूक लागलेली आहे .
३. ज्याला तहान लागलेली आहे .
४. शरीरावर एखादी जखम /व्रण आहे .
५. जो १६ वर्षाच्या आतील किंवा ७० वर्षाच्या पुढील आहे .
६. शारीरिक रोगाने पिडीत आहे .

अशा पुरुषाने मैथुन करू नये !

तसेच रजस्वला स्त्री , एखाद्या रोगाने ग्रस्त असलेली स्त्री , गर्भिणी या स्त्रियांनी संभोग करू नये .

असे नियम आहेत . वरील स्त्री -पुरुषांनी संभोग करू नये असे आयुर्वेद सांगतो . यातून सध्या जे काही स्वातंत्र्य , स्पेस , लव्ह , लस्ट , डिझायर . मूड वगैरे काय काय म्हणतात त्यास बाधा पोहोचवायचा हेतू नाही तर स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य उत्तम राहावे हा हेतू आहे . कारण आयुर्वेदाचा हेतू 'सुप्रजाजानन ' असा आहे . . त्यासाठी स्त्री पुरुष यांचे आरोग्य चांगले नको का ??

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
दैनंदिन आयुर्वेद (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Tuesday, June 7, 2016

पुंसवन गदारोळ का ??

#घरोघरी_आयुर्वेद

पुंसवन......गदारोळ का??

गेल्याच आठवड्यात आयुर्वेद असा शब्द कानावर पडताच पोटात मुरडा होणाऱ्या एका वृत्तपत्राने आयुर्वेदोक्त पुंसवन विधीच्या संबंधाने विनाकारण वातावरण कलुषित करण्याचा असफल प्रयत्न केला. पुंसवनाचे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथातून वगळण्याचा विचार चालू असल्याच्या थापादेखील या भिकार वर्तमानपत्राने मारल्या. मात्र या नादानपणापायी विनाकारण आयुर्वेदासंबंधित गैरसमज निर्माण होत आहेत हे जाणवल्याने याविषयी लिहित आहे.

पुंसवन विधीची प्रक्रिया चरकसंहिता या ग्रंथात आली असली तरी त्याची पार्श्वभूमी तेथे विशद करण्यात आलेली नाही. ती विशद करण्यात आली आहे वाग्भटाचार्यकृत 'अष्टांगहृदय' या ग्रंथात. या ग्रंथावरील अरुणदत्त टीकेचा आधार घेऊन आणि गुरुवर्य वैद्य अनिल पानसे आणि वैद्य हृषीकेश म्हेत्रे यांसारख्या अष्टांगहृदय या ग्रंथाच्या अभ्यासकांचे या टीकेबाबत मार्गदर्शन घेऊन याविषयाचा अभ्यास केल्यावर जी तथ्ये सापडली ती वाचकांसमोर मांडत आहे. अर्थात त्यांचे मार्गदर्शन हे टीकेच्या अर्थापुरते मर्यादित असून त्या अनुषंगाने केलेल्या विधानांची जबाबदारी मात्र सर्वस्वी माझी आहे.

१. पुंसवनविधी करण्याचा योग्य काळ हा गर्भधारणा झाल्यावर आणि गर्भलिंग 'व्यक्त' होण्यापूर्वी म्हणजे गर्भाधान झाल्यावर एक सप्ताह पूर्ण इथपासून ते एक महिना पूर्ण होण्याच्या आत असा सांगितला आहे. आजच्या घडीला सुमारे ९८% वेळेस गर्भधारणा झाल्याची खात्री ही मासिक पाळी चुकल्यावर म्हणजेच एक महिना पूर्ण झाल्यावर केली जाते. थोड्क्यात; आयुर्वेदाला अपेक्षित काळाची मर्यादा इथे ओलांडली जात असल्याने पुंसवन करताच येत नाही.

२. पुंसवनविधी हा फक्त 'पुष्य' या नक्षत्रावर करायचा आहे. म्हणजेच तो केल्या जाणाऱ्या स्त्रीची गर्भधारणा झाल्यावर एक आठवडा ते एक महिना या कालावधीत पुष्य नक्षत्र असायला हवे. आजकाल ज्याला probability असे म्हटले जाते ती probability या अटीमुळे कितीतरी प्रमाणात खालावते हे सत्य थोडासा विचार केल्यास कोणीही सांगू शकेल!

३. गर्भाचे लिंग हे गर्भधारणा होतानाच निश्चित झाले आहे असे आयुर्वेद सांगतो. तरीही असा विधी का सांगितला गेला? त्याचे फलित किती असेल? यावर आयुर्वेदाचे उत्तर आहे....'अत्यल्प'! का? कारण जर दैव बलवत्तर असेल तर शंभर वेळा प्रयत्न करूनही अशा प्रयत्नांना यश मिळणार नाही आणि बहुतांश वेळेस दैवच बलवत्तर असते असे अरुणदत्त स्पष्टपणे म्हणतात.

४. ही सारी चर्चा संपवण्यापूर्वी वाग्भट असे सांगतात की; पुंसवन हा विधी पुत्रप्राप्ती या उद्देशाने केलेला नसून कन्याप्राप्ती करून घेण्याची इच्छा असल्यास याच विधीत अमुक-अमुक बदल करावेत. थोड्क्यात; आयुर्वेद कुठेही Gender Biased नाही हे सुज्ञांच्या सहज लक्षात येईल.

आता काही महत्वाचे मुद्दे;
१. पुंसवनाचे हे उल्लेख आयुर्वेदीय संहितांमधील तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार आलेले संदर्भ इतक्याच दृष्टीने पाहिले जातात. त्यापलीकडे जाऊन ते शिकवण्यास विशेष प्रयत्न घेणे वा तसे करण्यास उत्तेजन देणे हे प्रकार घडत नाहीत.

२. पुत्र असल्यास त्यालाच जगवा आणि स्त्रीभ्रूणहत्या करा असे संदेश आयुर्वेदाचे नाहीत. याच्या अगदी विरुद्ध जे जे उत्तम असे या जगात आहे ते सर्व स्त्रीच्या ठायीच आहे असे मत आचार्य चरक नोंदवतात!

३. आयुर्वेद हे फक्त भारताचेच शास्त्र आहे का? तसे मत असल्यास जाहीरपणे मांडावे आणि त्याच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. पण तसे नसेल आणि ते भारतात जन्मलेले पण जागतिक पातळीवर कुठेही वापरले जाणारे शास्त्र आहे असे मत असेल तर जगाच्या पाठीवर आज कित्येक देशांत गर्भलिंग तपासणीच सोडा; निवड करणेदेखील कायद्याने मान्य केले आहे. तिथल्या लोकांना यासंबंधी अधिक संशोधन करणे शक्य आहे.

४. या पुंसवनविधीमुळे भारतात किती प्रमाणात स्त्रीभ्रूणहत्या झाल्या याची आकडेवारी सादर करता येईल का? करता येत नसल्यास एरव्ही 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च'च्या गप्पा मारणारे लोक याबाबत गदारोळ का करत आहेत? हा दुटप्पीपणा नाही का?!

५. आज आधुनिक विज्ञानातील सोनोग्राफी, बीबीटी चार्ट, स्पर्म व्हॉशच्या पद्धती यांसारख्या ज्या अनेक गोष्टींतून गर्भलिंग निदान होऊ शकते; किंबहुना तसे झाल्याच्या नोंदणीकृत घटना आहेत.....अशा पद्धतींवरदेखील सरसकट बंदी घातली जाणार का? का आयुर्वेदाकरताच तुघलकी कायदयांचा बडगा दाखवण्यात पौरुषार्थ मानणार?!

आता सगळ्यात कळीचे दोन मुद्दे मांडतो आणि थांबतो. आजच्या कायद्याच्या दृष्टीने पुंसवनविधीसारखे विधी हे गुन्हा ठरत असतील तर कायद्यापेक्षा उच्च कोणीही नाही या भावनेने कायद्याचे पालन झालेच पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. किंबहुना तसेच आमच्या वैद्यांकडून होत आहे असा आमचा दावा आहे. मात्र; याकरता सुमारे तीन- साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथातील संदर्भच वगळावे अशी मागणी करणे हा निखालस मूर्खपणा आहे.

आयुर्वेदीय संहितांचे प्रत्यक्ष वाचन न करताच त्यात काय दिले आहे यावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या व्यक्तींनी यापुढे दहा वेळा विचार करावा. आणि हिंदुत्वाशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या आयुर्वेदादि शास्त्रांवर असे हल्ले करून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या दलालांनीदेखील हे लक्षात ठेवावे की ते आगीशी खेळत आहेत. आयुर्वेद इतका सहजी नष्ट होणारा नाही. हजारो वर्ष आम्ही टिकून आहोत....कायम असू.

सरटेशेवट; आयुर्वेदीय वैद्य आणि वाचकवर्गाला एकच विनंती करतो की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला हातभार लावा. माध्यमांच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडायला आज तुम्हा सगळ्यांची साथ गरजेची आहे.

केला जरी पोत बळेची खाले ।
ज्वाळा तरी तें वरती उफाळे ।

जय आयुर्वेद!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Monday, June 6, 2016

फ्रेक्चर मधील 'अपथ्य'

दैनंदिन आयुर्वेद ~ फ्रेक्चर मधील 'अपथ्य ' !!
सर्व रोगात , सदा सर्वदा , रोजच्या आहारात 'इडली डोसा ' हे 'पथ्य ' म्हणून कधी आले हे काही समजायला मार्ग नाही . 'ट्राय ' म्हणून एखादा पदार्थ खाणे आणि त्याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . असे असले तरी आज सर्वत्र इडली डोसा याचे उदंड पिक आलेले दिसते . कधीतरी खायला हे पदार्थ उत्तम लागतात . . प्रश्नच नाही . परंतु हे पदार्थ सदा सर्वकाळ खावेत असे नाही .
मला सनी देओल च्या सिनेमातला एक संवाद आठवतो ' हड्डीयो मैं पानी भरा है क्या किंवा ढाई किलो का हाथ ' वगैरे . . यातून माणसाची हाडे किती मजबूत असावीत असा अर्थ निघतो . पण हल्ली अनेक केल्शीअम , सप्लीमेंट खाऊन पण आपली हाडे 'कमजोर ' असतात . . सायकलीवरून पडले किंवा गाडी स्लीप झाली किंवा खेळताना पडले की 'कट ' . . मोडले हाड . . हात गळ्यात आणि पाय प्लास्टर मध्ये . . . असे असताना काय खावे आणि खावू नये याचे नियम पुढील प्रमाणे . . .
१. खारट पदार्थ
२. मीठ
३. आंबट पदार्थ
४. तिखट पदार्थ यांचे सेवन करू नये .
५. शारीरिक श्रम करू नये .
६. मैथुन करू नये .
७. रुक्ष अन्न -वाळके पदार्थ खावू नयेत .
असे आयुर्वेद सांगतो . खारट आणि आंबट पदार्थ यात इडली डोसा किंवा अन्य आंबवलेले पदार्थ यांचा समावेश 'असतोच ' . किंबहुना अनेक लहान मोठ्या हॉस्पिटल मध्ये ब्रेकफास्ट ला इडली डोसा समोर येतो . खारट , आंबट आणि तिखट या रसांचे गुण धातूंचा पाक करणारे आहेत . स्नायू दौर्बल्य उत्पन्न करणारे आहेत तसेच पित्ताची दुष्टी करणारे आहेत .
त्यामुळे फ्रेक्चर असताना इडली ,डोसा ,उत्तपा , अन्य आंबवलेले पदार्थ , तेलातली लोणची (आंबा लोणचे , माईनमूळ इत्यादी ) , आहारात अतिशय मीठ , तिखट पदार्थ (ठेचा , कट असलेली आमटी , स्पायसी अन्न इत्यादी ) , रुक्ष अन्न ( मुरमुरे , चिप्स , पेक्ड फूड ) खावू नये . . . तुटलेली हाडे जुळून येण्यास मदत होते .
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
दैनंदिन आयुर्वेद (https://www.facebook.com/aarogyakosh/ )
9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

स्त्री आचार आणि आरोग्य

!!!  स्त्री आचार आणि आरोग्य   !!!

प्रा. डॉ. उषा देशमुख
एम. डी., डी. सीएच (आयु.)
प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोग चिकित्सा
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, वरळी, मुंबई
+919423107039
drusha1954@gmail.com

        ‘आचार’ अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्य संवर्धन व संरक्षण यासाठी आयुर्वेदात दिनचर्या, ऋतुचर्या वर्णिली आहे. शास्त्रानुसार आचरण केले, तर निश्चितच स्वास्थ्य संरक्षण होते. स्त्री स्वास्थ्यानुसार कुटुंब स्वास्थ्य पर्यायाने समाजस्वास्थ अवलंबून असते, म्हणूनच स्त्री स्वास्थ्य संरक्षणास विशेष महत्व आहे.
       
        नदी, वृक्ष हे अनादी काळापासून मनुष्याची व सृष्टीची अविरत सेवा करीत आहेत. या सेवेत आणखी एक नाव जोडायला पाहिजे आणि ते म्हणजे स्त्री. कुटुंबासाठी कष्ट करता करता तिच्या ठिकाणी आघात कधी होतो हे कळत देखील नाही. कुटुंबाच्या सुख शांतीसाठी ती अविरत कष्ट करत असते. त्यात हल्ली अर्थार्जन ही नवीन जबाबदारी टाकली आहे. निसर्गानेसुद्धा नवनिर्माणाची म्हणजेच सर्जन कार्याची फार मोठी जबाबदारी स्त्रीवर टाकली आहे. उलटपक्षी ह्या कार्यासाठीच स्त्रीची निर्मिती झाली आहे. नवनिर्मितीची फार मोठी जबाबदारी शिरावर घेऊन ती आपले आयुष्य जगत असते. स्त्री शब्दाची व्याख्या पाहता हे लक्षात येईल,
स्त्यायेते शुक्रशोणिते अस्यां सा स्त्री l
शुक्रशोणितास एकत्र आणते ती स्त्री.

भगवदगीतेत देखील सर्जनासाठी स्त्री हाच आधार मानला आहे.
प्रकृती स्वामवष्टम्भ विसृजामि पुनः पुनः l
भूतग्रामीनः कृत्स्नमवशं प्रकृतेवर्शांत llअ. ९/८ गीता.

हाती प्रकृती घेऊन जागवी मी पुनः पुनः l
भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो l
        अर्थात स्त्रीचा आधार घेऊनच पुन्हा पुन्हा सृष्टीची देवाणघेवाण होत असते, आणि या कार्यासाठीच तिला निसर्गाने अधिक शक्तिशाली बनवले आहे.

        स्त्री जेव्हा नाग्निका, कन्या, गौरी या विविध अवस्थांमधून जात असते, त्या प्रत्येक टप्प्यात तिच्यात परिवर्तन होत असते. ‘उमलणे आणि फुलणे’ ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. ‘उमलणे’ हे स्वाभाविक असते. परंतु ‘फुलण्यासाठी’ वातावरणाची सोबत लागते. अर्थात हे वातावरण नसेल तर स्त्रीत्व-विकासास बाधा येऊ शकते. उदा. बालवयात मुलगी म्हणून योग्य प्रकारे पोषण मिळाले नाही तर कुपोषणाच्या परिणामी स्त्री-विशिष्ट अवयवांचा विकास होणार नाही. कारण आहार रसावरच स्त्री-विशिष्ट अवयवांचे पोषण अवलंबून असते. ‘रज’ आणि ‘स्तन्य’ हे रसधातूचे दोन उपधातु आहेत. रसधातु समृद्ध असेल तर उपधातु निर्मितीहि चांगल्या प्रकारे होईल. कन्या ह्या अवस्थेत असताना ‘किम नियन्ति’ या विवंचनेने ग्रासलेले माता, पिता तिचे संगोपन प्रामाणिकपणे करतीलच असे नाही. मुलगी झाली म्हणून तिला अंगावर न पाजणारी आई देखील मी रुग्णालयात पाहिली आहे. मुलगी म्हणजे परक्याचे धन ह्याच भावनेतून झालेल्या तिच्या संगोपनामुळे तिच्या शारीरिक-मानसिक व्यक्तिमत्वाचा विकास उत्तमरित्या होऊ शकेलच असे नाही. स्त्री आरोग्याच्या दृष्टीने तिच्या संगोपनाचा विचार अतिशय महत्वाचा आहे. बालवयात संगोपनाच्या दृष्टीने झालेला भेदभाव कदाचित तिच्या उमलण्यावर, पुढे फुलण्यावर होऊ शकतो. स्त्रीत्वाचा विकास करणाऱ्या घटकांवर मनोभिघाताचा परिणाम होऊ शकतो. बालवयात झालेले मनोभिघात पुढे स्त्रीत्वाचा परिपूर्ण विकास न होण्यास कारणीभूत होऊ शकतात.

         ‘आचार’ अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्य संवर्धन व संरक्षण यासाठी आयुर्वेदात दिनचर्या, ऋतुचर्या वर्णिली आहे. शास्त्रानुसार आचरण केले तर निश्चितच स्वास्थ्य संरक्षण होते. स्त्री स्वास्थ्यावर कुटुंब स्वास्थ्य पर्यायाने समाज स्वास्थ्य अवलंबून असते. म्हणूनच स्त्री स्वास्थ्य संरक्षणास विशेष महत्व आहे.
स्त्री हि मूलं अपत्यानां स्त्री रक्षति रक्षिता l

        जागतिक स्तरावर ‘प्रजनन व शिशु स्वास्थ्य संरक्षण’ (RCH) ही योजना गांभीर्याने राबवली जात आहे. इसवी सना पूर्वीपासून आयुर्वेदात स्त्री स्वास्थ्य रक्षणाला विशेष महत्व दिले आहे. अपत्याचे मूलस्थान असलेले स्त्रीचे स्वास्थ्य संरक्षण कसे करावे, यासाठी तिच्या अवस्थांनुसार रजःस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या म्हणजे या अवस्थेत स्त्रीने कशाप्रकारे आचरण करावे हे प्रामुख्याने सांगितले आहे. स्त्रीत्व प्रकट होण्याचे पहिले लक्षण म्हणजे रजःस्राव, स्तनपुष्टी, आर्तववहस्रोतसातून प्रतिमाह स्रवणारा भावविशेष म्हणजे रजःस्राव.

        जर आर्तववहस्त्रोतस स्वस्थ, प्राकृत असेल तर ‘गते पुराणे नवेच अवस्थिते’ या नियमाप्रमाणे प्रतिमाहः रजःस्राव प्रवर्तनात नियमितता आवश्यक आहे आणि ह्यात सातत्य असणे आवश्यक आहे. या सातत्यावर स्त्रीच्या आचरणाचा, अर्थात आहारात्मक आणि विहारात्मक परिणाम होत असतो. ह्या काळात अवलंबण्यासाठी खास रजःस्वला परिचर्या सांगितली आहे. स्त्रीच्या प्रत्येक अवस्थेत तिच्या आचरणाला महत्व आहे. मासिक पाळीच्या तीन दिवसात स्त्रीला ‘रजःस्वला’ हे विशेषण आहे. या काळात योनीमार्गातून सुमारे तीन ते पाच दिवसापर्यंत किंचित काळसर वर्णाचा रक्तस्राव होत असतो. या अवस्थेत स्त्रीने काही विशेष आहार-विहार सांभाळणे आवश्यक आहे. जुन्याकाळी ह्या दिवसात स्त्री अस्पृश्य समजली जात असल्यामुळे काही चांगल्या गोष्टी आपोआप आचरणात येत असत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून ते योग्यच आहे. आज त्या नियमाचा मुद्दाम उल्लेख करणे आवश्यक आहे.

"आर्तवस्रावदिवसात् त्र्यहं सा ब्रह्मचारिणी।
शयीत दर्भशय्यायां पश्येदपि पतिं न च॥
करे शरावे पर्णे वा हविष्यं त्र्यहमाचरेत्।
अश्रुपातं नखच्छेदमभ्यङ्गमनुलेपनम्॥
नेत्रयोरञ्जनं स्नानं दिवास्वप्नं प्रधावनम्।
अत्युच्चशब्दश्रवणं हसनं बहुभाषणम्॥
आयासं भूमिखननं प्रवातञ्च विवर्जयेत्।

        या अवस्थेत रजःस्रावामुळे स्त्री शरीरात आलेले दौर्बल्य वातप्रकोपास कारणीभूत होते. त्यामुळे पुन्हा वातप्रकोप होणारे आचरण टाळावे. तसेच धातुक्षयामुळे आलेले दौर्बल्य हे जंतु-व्याधि संसर्गास कारणीभूत होते. म्हणूनच ब्रह्मचर्याचे पालन करावे. शृंगार, शोक, दिवास्वप्न (दिवसा झोपणे), उटणे लावणे, फार मोठे आवाज ऐकणे, फार हसणे, सारखी बडबड, धावपळ करणे, श्रमाची कामे करणे, खूप जोरदार हवा अंगावर येईल असा विहार – अर्थात वाहन चालवणे – आदि गोष्टी टाळाव्यात. कोष्ठाचे शोधन होईल असा आहार असावा. लघु, लवकर पचणारा उदा. दूध, यव, लाजामंड, मुगाची खिचडी, विविध फळे यांचा आहारात वापर करावा. या काळात धातुक्षयामुळे उत्पन्न होणारे अग्निमांद्य लक्षात घेऊन आहार घ्यावा. अतिस्निग्ध, तळलेले, पचायला जड पदार्थ टाळावेत. सौंदर्य प्रसाधने वापरणे हे कामोत्तेजक असल्यामुळे ती या अवस्थेत अनिष्ट आहेत. ह्या काळात संभोग केल्यास स्त्रीच्या योनीमार्गात जंतु-व्याधी संसर्ग होऊ शकतो. श्रमाची कामे वा फार हालचाल केली तर रजःस्राव अधिक प्रमाणात होतो आणि अतिशय थकवाही येतो. यासाठी विश्रांतीची आवश्यकता आहे. अशाप्रकारे आचरण केले नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर लगेच दिसतातच असे नाही, परंतु आदर्श आरोग्याच्या दृष्टीने काळाच्या ओघात शरीराची हानी व्हायची ती होतच असते. गर्भधारणा, प्रसूती, अपत्य संगोपन, स्तन्य निर्मिती या गोष्टी जशा व्हायला हव्यात तशा होत नाहीत. त्यामध्ये अनेक प्रकारच्या व्यथा, पीडा आणि स्त्रीरोग निर्माण होण्याची शक्यता असते. मासिक पाळी नियमांचे पालन केले नाही तर त्याचे गंभीर व दीर्घकालीन परिणाम गर्भावर व मासिक रजःस्रावावर होतात. खरेतर मासिक रजःस्रावामुळे स्त्री शरीराला बऱ्याच व्याधींपासून संरक्षण मिळते. उदा. हृदयरोग, आम्लपित्त, प्रमेह आदि. काहींना ह्या गोष्टी पटणार नाहीत. कारण ही लक्षणे घेऊन बऱ्याच स्त्रिया आमच्याकडे येत असतात. परीक्षणाअंती असे लक्षात येते, की त्यांच्या मासिक स्रावात विकृती असते. अनियमित मासिक स्राव, अतिशय कमी प्रमाणात स्राव होणे वा स्राव अकाली बंद होणे (रजोनिवृत्ती) इ. मासिक रजःस्राव हे स्त्रीशरीराला मिळालेले एक वरदानच आहे. रजःकाल, गर्भावस्था, प्रसवावस्था व सूतीकावस्था ह्या काळात केलेले योग्य आचरण स्वास्थ्य संरक्षण करणारे तर मिथ्याचरण हे व्याधी संभवास कारणीभूत होतात. मिथ्याचार हे स्त्रीरोगांसाठी महत्वाचे कारण आहे.

        गर्भिणीने विषमचेष्टा, अतिश्रमाची कामे केली तर अकाली गर्भपात होण्याची शक्यता असते. गर्भिणी अवस्थेत योग्य प्रमाणात आणि पोषक आहार घेतला नाही तर ‘गर्भशोष’ म्हणजे कमी वजनाचे बालक जन्माला येते. किंबहुना प्रसवसमयी अधिक रक्तस्राव होणे, कळा घेण्यासाठी शक्ती नसल्यामुळे प्रसवास विलंब होऊन बालकावर आघात होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भिणीने योग्य आहार, विविध फळांचे सेवन आणि विश्रांती ह्या गोष्टी कटाक्षाने आचरणात आणाव्यात.

        प्रसावानंतर सूतीकावस्थेत देखील स्त्रीने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रसवामुळे स्त्री शरीर दुर्बल झालेले असते. श्रम आणि रक्तस्रावामुळे दुर्बल झालेल्या शरीरास विश्रांती आणि बलवर्धक चिकित्सा, आहार – विहार यांची आवश्यकता असते. श्रमपरिहारासाठी सूतीकेस तैलाभ्यंग करणे तितकेच महत्वाचे आहे. ह्या अवस्थेत जसा स्त्रीचा विचार केला जातो, तसाच बालकाच्या पोषणाच्या दृष्टीने देखील विचार करून स्त्रीने आहार – विहार सेवन करावा. स्तन्यामार्फतच बालकाचे पोषण होत असल्यामुळे स्तन्यवृद्धीकर आहार (म्हणजे आहळीव, खसखस, दूध, तूप अशा स्वरूपाचा आहार) घ्यावा. शारीरिक विश्रांतीसोबतच मानसिक स्वास्थ्य देखील स्तन्य निर्मितीस कारणीभूत होत असल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संवर्धन ह्या गोष्टींचा विचार करून आचरण करावे. सध्या जागतिक स्तरावर कष्टतम असलेल्या महाभयंकर व्याधी या मिथ्या आचरणाच्या परिणामी उद्भवतात. उदा. लैंगिक संबंधातून होणाऱ्या व्याधी, फिरंग, उपदंश, एड्स ह्या व्याधींची संपूर्ण माहिती टी.व्ही., रेडिओवर आपण पाहतो, ऐकतो. तेव्हा स्त्री आचरण आणि स्त्रीचे स्वास्थ्य संरक्षण किती महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन परंपरागत जपलेल्या नियमांचे शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून त्याचे पालन करावे. त्याचे अवडंबर वा रूढीचे स्तोम माजू देऊ नये.

Sunday, June 5, 2016

वैश्विक तपमान-वृध्दी

॥ श्री धन्वन्तरये नमः ॥

माझ्या एका खास मित्राच्या सूचनेनुसार यावेळी एका दैनंदिन जीवनासंबंधी विषयाबद्दल विचार मांडीत आहे.
                                वैश्विक तपमान-वृद्धी
हा सध्याचा ज्वलंत विषय आहे. पूर्वी लिहिल्याप्रमाणे, निसर्गाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू इच्छिणा-या मानवाच्या वेड्या हट्टापायी स्वतःच ही परिस्थिती मानवाने ओढवून घेतली आहे. त्याची जी कारणे समोर आली आहेत त्यांचे (उदा. - जंगलतोड, डोंगरांचे सपाटीकरण, मानवनिर्मित विविध प्रदूषणे इ.) निराकरण करणे, हे काही आपल्या हाती नाही. ते काम शासन आणि शासकीय अधिकारी यांचे आहे.
पण हा 'ताप' आपल्यापुरता काहीसा कमी करणे हे आपण आयुर्वेदाच्या मूलभूत नियमांच्या आधारे नक्कीच करू शकतो. पर्यावरणतील तपमान-वृद्धीचा परिणाम प्रत्येक सजीवावर होतो. "वृद्धिः समानैः सर्वेषाम्" या नियमाप्रमाणे स्वाभाविकतःच प्रत्येक मानवाच्या शरीरांत 'ऊष्ण' या गुणाची वृद्धी होते. त्यामुळे या गुणाचे नियंत्रण करणे आवश्यक ठरते. यासाठीच्या उपाय-योजनांचे त्रिविध वर्गीकरण करावे लागेल -
१) आहार, २) विहार आणि ३) औषधे
आहार
आपण ज्या प्रकारचा आहार करतो, त्याप्रकारचा परिणाम शरीरावर आढळून येतो. शरीर कृश करणारा आहार घेतला तर वजन कमी होते. शरीर पुष्ट करणारा आहार घेतला तर वजन कमी होते. त्याचप्रमाणे ऊष्ण गुणात्मक आहार घेतला तर शरीरांतील ऊष्णता वाढते. हा नियम लक्षांत घेतला तर चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत येईल की global warming च्या या जमान्यांत शरीरांतील ऊष्णता कमी करणारा आहार घ्यायला हवा. आपण जो आहार घेतो तो गोड, आंबट, खारट, कडु, तिखट आणि तुरट या सहा रसांनी युक्त असायला हवा. त्या त्या रसात्मक आहाराचे गुणधर्म देखील आयुर्वेदिक ग्रंथांत वर्णन केले आहेत.
"रसाः कटु, अम्ल, लवणाः वीर्येण ऊष्णाः यथोत्तरम् ॥"
- अष्टांगहृदय, सूत्र. १०/३६.
आयुर्वेदाचे मार्गदर्शन असे आहे की - तिखट, आंबट आणि खारट या तीन रसांनी युक्त खाद्य पदार्थ क्रमाने एकाहून एक अधिक प्रमाणांत ऊष्ण गुणाचे असतात. याचा अर्थ असा की, या तीन रसांनी युक्त आहार शक्यतो टाळायला हवा. हे सामान्य सूत्र लक्षांत घेता आहाराचे स्वरूप साधारणतः पुढीलप्रमाणे असावे -
धान्यापैकी एक वर्षाचे जुने तांदुळ/गहू चालतील; पण वरी, नाचणी नको.
कडधान्यापैकी मूग, मसुर, हरभरे चालतील; पण वाल, वाटाणे, तूर, कुळिथ नको.
भाज्यांपैकी पालक, दुधी, पडवळ, केळफुल चालेल; पण शेवगा, लाल भोपळा, वांगी(विशेषतः भरली वांगी) नकोत.
फळांपैकी आवळा, डाळिंब, खजूर,काकडी, केळी, नारळ, कोहाळा, अंजीर चालेल; पपई, अननस, काश्मिरी आंबट फळे, चिंच नको.
दुभत्यापैकी दूध, तूप, लोणी चालेल; दही, आंबट ताक नको.
कंदमुळांपैकी कांदा, शिंगाडा, रताळी, साबुदाणा चालेल; लसूण, मुळा, आळूच्या मुंडल्या, नवलकोल नकोत.
 मांसाहारापैकी बोकड, डुक्कर, भेकरे (हरीण) चालेल; मासे, कोंबडा, अंडी अजिबात नको.
बाकी खाद्यपदार्थांपैकी कोथिंबीर, चारोळ्या, साखर तसेच प्यायला लाह्यांचे पाणी, ऊंबराचे पाणी चालेल. पण शक्यतो बाहेरचे चटपटीत, तेलकट टाळावे, पंजाबी, चायनीझ डिश, आंबवलेले, खारवलेले पदार्थ टाळावे, पापड, लोणची, गरम मसाला, बेकरीचे पदार्थ घेऊ नयेत.
 अन्य पथ्य -
 पिण्यासाठी धण्याजि-याचे पाणी वापरावे. दररोज नवे बनवावे. साळीच्या लाह्यांचे पाणी देखिल चालेल. वाळ्याची जुडी टाकलेले पाणी उत्तम.
 काळ्या मनुका, खजूर यांचा कोळ काढून बनवलेले सरबत प्यावे.
  चंदन/रक्तचंदन उगाळून ते गंध दुपारच्या वेळी पोटांत घ्यावे.
 साखर घालून ताजे दूध प्यावे. (शक्यतो पिशवीचे नको).
 हंगामांत ताजे आवळे खावे.
 उंबराचे फळ स्वच्छ धुऊन साखरेबरोबर खावे.
विहार
• शक्यतो उन्हांत फिरणे टाळावे, जावेच लागले तर संपूर्ण अंग झाकले जाईल असे फिक्या रंगाचे सुती/रेशमी कपडे घालून जावे. डोळ्यांवर गॉगल व डोक्यावर टोपी, कॅप, ओढणी, रुमाल इ. असावे.
• आगीजवळचे काम टाळावे.
• ऊन्हांतून घरी आल्यावर तोंडावर पाणी मारावे व हात-पाय गार पाण्याने धुवावे. कानांच्या पाळ्यांना थंड पाणी लावावे. गार पाण्यांत बसावे.
• दुपारी केळींच्या बागेत वा थंडगार सावलीत बसावे. सायंकाळी दुर्वांच्या लॉनवरून चालावे. रात्री शक्य त्या वेळी चांदण्यांत बसावे. एअरकंडिशनरचा वापर करावा.
• शक्य असेल त्यांनी मोत्यांचे, प्रवाळाचे (पोवळ्याचे) दागिने वापरावे.
• ऊष्माघात झाल्यास केळीच्या/कमळाच्या पानांवर गुंडाळून झोपवावे किंवा शरीर ओल्या कापडाने गुंडाळावे.
• वाळा, चंदन, मोगरा, गुलाब, कापूर यांचा सुवास घ्यावा (शरीर व मनाचा दाह कमी होतो). गुलाब, मोगरा, जाई,वाळा, पाचु इ. सुगंधी फुलांचे हार/वेण्या घालावे.
• शिंगाडा-पीठ, आरारूट यांची दुधातील खीर तूप घालून खावीऔषधे
औषधे शक्यतो वैद्याच्या सल्ल्याने घ्यावी.
गुलकंद, ऊशीरासव, चंदनासव, कामदुधा रस, चंद्रकला रस इ. चा वापर वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे करावा.
पंचकर्म
वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे अंगाला चंदनबलालाक्षादि तेलाचा मसाज,रक्तमोक्षण, विरेचन यांपैकी क्रिया योजाव्या.
वरील सर्व गोष्टी या दिग्दर्शन्मात्र आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, चालू असलेला ऋतु, शरीरांत असणारे अन्य व्याधी यांनुसार वर उल्लेख केलेल्या उपचारांत फरक पडू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी.

- प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई,
सावंतवाडी, जि. - सिंधुदुर्ग.
संपर्क - 9422435323

Saturday, June 4, 2016

आरोग्य सूत्रम्

*आरोग्यसूत्रम्


अन्नाद् भूतानि जायन्ते, जातानि अन्नेन वर्धन्ते ।
अद्यते अत्ति च भूतानि, तस्माद् अन्नम् तद् उच्यते ।। ... तैत्तिरीयोपनिषद्

आरोग्य ज्यावर अवलंबून आहे, असे घटक म्हणजे अन्न (आहार), विहार (वर्तन) आणि औषध होत.

या तीनही घटकांचा परस्पर सहयोगाने होणारा परिणाम म्हणजे आरोग्य होय. आपण बरेचदा केवळ 'आहार एके आहार' एवढाच मर्यादित विचार करतो; पण हेही खरे की रोग होईपर्यंत आहार हाच घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. रोग झाल्यानंतर त्याच्या तीव्रतेनुसार औषध हा घटक अाधिक्याने विचारात घ्यावा लागतो. पण तोपर्यंत मात्र आहार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

काश्यपसंहितेत *आहारो हि परमं भेषजम्* म्हणजे आहार हेच सर्वश्रेष्ठ औषध आहे, असे स्पष्ट विवेचन आहे.

विहार म्हणजे आपली दैनंदिन / ऋतु नुसार / व्याधिनुसार असणारी वर्तणूक होय. जसे; रोज स्नान करावे, हे निरोगी मनुष्यासाठीचे; तर ज्वर असताना स्नान करु नये, हे रोग्यासाठीचे आचरण होय. या दोन्हींचाही परिणाम स्वास्थ्य हा होय.

या वर्णनावरुन एव्हाना लक्षात आलेच असेल की, रोग होवू नये म्हणून आहार हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून, रोग झाल्यानंतर करावयाच्या आहार बदलांनाच *पथ्य* असे म्हणतात. (पथ्य - हा वेगळ्या लिखाणाचा विषय होईल.)

आयुर्वेदाव्यतिरिक्त अन्य शास्त्रात क्वचितच आहार (अन्न) या विषयाबद्दल विस्ताराने वर्णन असेल. आधुनिक आहार शास्त्र (modern dietetics) व आयुर्वेदीय आहारसिद्धांत यात काही मूलभूत भेद आहेत, ते ओघाने चर्चेत येतीलच..

आजच्या या प्रस्तावनेनंतर वर उल्लेख केलेल्या तैत्तिरीयोपनिषदामधील सूत्राचा अर्थ पाहू..

अन्नापासून समस्त भूतमात्रांची उत्पत्ति होते, त्यांची वाढ होते.
भूतमात्र ज्याचे सेवन करतात (अद्यते), आणि जे भूतमात्रांना खाते(!) (अत्ति); ते अन्न होय!

अन्न जसे प्राण्यांचे स्वास्थ्यरक्षक आहे, तसे शास्त्रविरुद्ध सेवन केले तर रोगकारक होवून प्राणिमात्रास मारक ठरते (प्राण्यांचेच भक्षण करते). समर्थ रामदास स्वामींनी *आपण खातो अन्नासी । अन्न खाते आपणासी ।।* यातून हेच सुचविले आहे.

आता शास्त्रानुसार किंवा शास्त्रविरुद्ध म्हणजे काय? याचे आकलन झाले म्हणजे आपल्याला आहार समजला, असे होईल.

(क्रमशः)

*वैद्य नीलेश कुलकर्णी*, पुणें
+९१-७७९८६२७८२३ / +९१-८८०५३३५५१२
vd.nilesh@gmail.com

चायनीज अगरबत्ती

आयुर्वेद कोश ~ चायनीज अगरबत्ती !!

ज्या घरात देव , देवपूजा आणि देवाला मानणारे लोक आहेत त्या घरी अगरबत्ती ही घरचे पावित्र्य असते . सकाळी होणारा घंटीचा आवाज , पाठीमागून येणारे स्तोत्रांचे शब्द . . . आणि अगरबत्तीचा सुवास यातून जे सात्विक वातावरण तयार होते त्या सम तेच ! प्रथम ही गोष्ट स्पष्ट करतो की अगरबत्ती ही डीओ ची आजी नाही . फक्त आणि फक्त सुवास आणि सुगंध निर्माण करणे हे अगरबत्ती चे काम नाही !!

ज्या घरात बाळ - बाळंतीण आहेत त्या घरी तिन्ही सांजेच्या वेळी  रामरक्षा म्हणून , जेथे कोणी आजारी आहे त्या घरात मृत्युंजय मंत्र म्हणून अगरबत्तीचा जो अंगारा उरतो तो कपाळी लावणे हे आपल्या पाहण्यात आहे . मंदिरातून अगरबत्ती -धूप यांच्यातून निघालेला अंगारा घरी घेऊन येणे , एखाद्या ठिकाणी यज्ञ झाला असेल तर तो यज्ञ शांत झाल्यावर त्यातील भस्म घरी आणून ठेवायची पद्धत सुद्धा जुनी . . . आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा ?? असे वाद घालू -उकरू पाहणाऱ्यांसाठी ही पोस्ट नाही . . .

अरुंधतीने एका यज्ञातील भस्म हाती घेऊन , मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित करून लावल्याने मृत झालेली व्यक्ती जिवंत झाली असे संदर्भ आहेत . गुरुचरित्रात २९ साव्या अध्यायात भस्म यावर आहे . जाबाल स्मृती पाहीली तर त्यात भस्म हे पाप नाशक म्हणून सांगितले आहे . भोलेनाथ शंकर यास भस्म किती प्रिय हे वेगळे सांगायला नको . असा अंगारा आणि भस्म याचा महिमा आहे . . मग बंबातली राख आणि देवा समोर लावलेल्या अगरबत्ती /धूप यातून पडलेला अंगारा यात फरक काय ?? दोन्ही राखच की . . .

नदीतले पाणी , नाल्यातले पाणी आणि तुमच्या 'आर ओ ' मधून बाहेर पडलेले पाणी यात फरक काय ? सगळे पाणीच की . . . चला उद्यापासून नदीचे पाणी डायरेक्ट पिऊयात . . . ?? यात फरक आहे तो संस्कारांचा . . . देवा समोरील अगरबत्ती  असो किंवा होम कुंडातील भस्म यावर मंत्र इत्यादी गोष्टींचा होणारा संस्कार त्यांचे कार्य बदलतो . . . . हे पटत नाही ? ठीक आहे . . ते पटावेच अशी आमची सक्ती नाही . . .

सध्या आपण अगरबत्ती आणायला गेलो की आपला निकष काय असतो ?? सुगंधी वासाचे धुराडे कमीत कमी किमतीत मिळायला हवे . . . भारतीय शास्त्रांना मात्र हे अपेक्षित नाही . . धूपन हा अंगराग  या संकल्पनेतील सहावा प्रकार आहे . अंगराग  म्हणजे घामाची दुर्गंधी नाहीशी करून शरीर सुंदर बनवणे . . ! यातील धूपन करण्यास काय वापरावे असा संकेत आहे ?? वास्तविक धूप हा झाडाचा निर्यास आहे . त्याच्या समवेत श्री चंदन , सरल , साल , देवदार , खदिर यापासून धूप काढला जातो . यापैकी गुग्गुळ यापासून काढलेला धूप हा सर्वोत्तम मानला जातो .

भारतीय शास्त्रे पाहीली तर या धुपांचे विषघ्न , सर्पनिर्मोचन , पाप नाशन , दैत्य नाशन असे प्रकार आढळतात . आयुर्वेदात सुद्धा धूम पान , धूपन चिकित्सा ही वेगवेगळ्या व्याधीत सांगण्यात आलेली आहे . त्यात वापरली जाणारी द्रव्ये सुद्धा बदलतात . अगरु , चंदन , मुस्ता, शिलारस ,कस्तुरी , तूप , गंध , गुग्गुळ , हरीतकी , जटामासी इत्यादी ही सामान्यपणे वापरली जाणारी सुगंधी द्रव्ये . . पान यांचा उपयोग केवळ सुगंध देणे आहे  का ?? नक्कीच नाही . . .

घरी पूजा करताना किंवा शोडषोपचार  पूजा पाहताना तुम्ही धूप -दीप - नैवेद्य हा क्रम पहिला असेल . . भारतीय शास्त्रांचा सूक्ष्म विचार पहा . . हाच क्रम शरीरावर लावला तर आधी धूप म्हणजे शरीर तसेच आजूबाजूचे वातावरण निर्जंतुक करून घेणे . . त्यानंतर शरीरातील अग्नी प्रज्वलित झाला की नैवेद्य (भोजन ) ग्रहण करणे . . हा नियम आपण पाळायला काय हरकत आहे ?? एसी रूम १०० % निर्जंतुक आहे असा दावा कोण करेल पान निंब पानाचा धूप केल्यावर ती खोली निर्जंतुक होईल याची खात्री देणे सहज शक्य आहे . . . सायंकाळी देवाची धूप आरती केल्यावर राक्षस पळून जातात असे म्हणतात . यातील राक्षस म्हणजे 'हा हा हा ' असे हसणारे ३ दात बाहेर असणारे आणि केसाळ असे अक्राळ विक्राळ प्राणी गृहीत न धरता राक्षस म्हणजे आजूबाजूची दुर्गंधी ,वातावरणातील जीव जंतू , मनाची अप्रसन्नता , मरगळ असे मानायला काय हरकत आहे ?? हे सर्व दूर होतात ते 'औषधी ' वनस्पतींचा धूप केल्याने . . . सध्या आपण हे करतो का ??

नाही . . . सध्या जे 'से नो टु अगरबत्ती इट मे क्रीएट केंसर ' असे जे सुरु आहे ते 'रसायनांच्या ' ज्वलनामुळे . . आयुर्वेदात एकीकडे धूम  ही चिकित्सा सांगितली आहे आणि दुसरीकडे धूम सेवन हे व्याधींचे कारण सांगतिले आहे . . असे का ?? तर तुम्ही धूर कोणत्या गोष्टीचा घेता यानुसार त्याचे शरीरावर फायदे होणार की तोटे हे ठरत असते . . . चायनीज अगरबत्ती हा यातलाच 'तोटेबाज ' व्यवहार !!

जिथे जिथे आम्ही कमी तेथे तेथे आम्ही चायनीज अशा बेस वर मार्केट सुरु आहे . अगरबत्ती क्षेत्रातील भारतातली मंदी ओळखून चायनीज ड्रेगोन ने आपले हात पाय या क्षेत्रात पसरले आहेत . या अगरबत्ती मध्ये 'फेनोबुकार्ब ' नावाचे हानिकारक घटक आढळल्याचे 'बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन आणि हिंदुस्तान इनसेक्ट कंट्रोल असोसीएशन ' यांनी सांगितले आहे . चीन मधून 'टनांनी ' या उदबत्याची आयात होते . आकर्षक पेकिंग , कमी किंमत आणि भरपूर काड्या यामुळे या 'टनांची ' भारतात विक्री सुद्धा दणक्यात होते . यात असलेले 'फेनोबुकार्ब ' हे  भात आणि कापूस यांच्यावर कीटक नाशक म्हणून फवारले जाते . तसेच याचे मनुष्याच्या आरोग्यास अत्यंत हानिकारक परिणाम आहेत .

हे कीटक नाशक श्वसन मार्गाने शरीरात गेल्यास श्वसन संस्थेचे विकार , डोळे आणि त्वचेची जळजळ , अस्वस्थता , अतिशय घाम येणे , हृदयाचे ठोके मंदावणे किंवा भरभर पडणे असे धोके निर्माण होऊ शकतात . भारतासह अनेक देशात बंदी असलेले हे केमिकल चायनीज अगरबत्ती मधून तुमच्या आमच्या घरात घुसत आहे . याने आपल्याला अपाय  झाले तर दोष कोणाचा ?? भारतीय शास्त्रांचा नक्कीच नाही . .

धूपन चिकित्सा ही एक उत्तम चिकित्सा पद्धती आहे . यात वापरली जाणारी द्रव्ये ही केवळ सुगंध निर्माण करत नाहीत तर माणसाच्या स्वास्थ्यास हितकारक असे वातावरण तयार करतात . काही आजारात 'चिकित्सा ' म्हणून कार्य करतात . . पण ते 'शास्त्रीय ' पद्धतीने वापरले तर आणि तरच . . . केवळ सुगंध बाहेर फेकणारी धुराडी या मर्यादित आणि संकुचित पद्धतीने धूपन /धूप याचा विचार केला तर तो दोष भारतीय शास्त्रांचा किंवा आयुर्वेदाचा नाही !!

प्रयोगशाळेत बनवलेल्या अगरबत्ती काय 'गुण उधळतील ' हे आम्ही सांगू शकत नाही . . . पण भारतीय परंपरेने सांगितलेल्या पद्धतीने , ती द्रव्य वापरून तयार केलेले मिश्रण . . . त्याचे ज्वलन होत असताना होणारा धूर आणि ज्वलन झाल्यावर उरलेला अंगारा किंवा भस्म हे हितकारक असते . . देह आणि मन याची शुद्धी करणारे !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश
(https://www.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

योनीस्राव : कारण – निवारण.....? स्त्री आरोग्य साठी खास ...

**********************
योनीस्राव : कारण – निवारण.....?   स्त्री  आरोग्य साठी  खास ...

  डॉ .सुभाष मार्लेवार .....M .D .

योनी स्राव, योनीसंदर्भात इतर संक्रामक आजार हे दिसायला साधे असले तरी त्याच्या प्राथमिक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास गर्भाशयाचे आरोग्य बिघडू शकते. परिणामी भविष्यात गर्भाशयबाह्य गर्भधारणा, ट्यूबल प्रेग्नन्सी, गर्भस्राव, गर्भपात यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते...

योनी, स्त्री जननेद्रियातील एक महत्वाचे अंग. योनीच्या आतील आम्लीय प्रदेश  होणाऱ्या संसर्गास आळा घालते. योनीतून जो स्राव येतो तो योनीला निरोगी आणि स्वच्छ ठेवत असतो. सामान्य योनिस्रावात कोणत्याही प्रकारचा अडथळा योनिमार्गातील संसर्गास जन्म देतो.
सामान्य योनिस्राव::
सर्वच महिलांना काही प्रमाणात योनी स्राव होणे स्वाभाविक बाब आहे. सामान्य स्राव स्पष्ट, अंधुक पांढरा किंवा पिवळसर दिसतो. सामान्य स्रावात परिवर्तन मासिक चक्र, मानसिक तणाव, पोषणाची स्थिती, गर्भावस्था, गर्भनिरोधक गोळ्या खाण्याने तसेच यौन उत्तेजना यांसारख्या अनेक कारणे येतात.
मासिक चक्राचे प्रभाव :
मासिक चक्र योनी भागाला प्रभावित करते. मध्य चक्राच्या कालावधीत ओलसरपणा आणि स्पष्ट स्रावात वाढ होते. योनीचा PH बदलत असतो आणि मासिक चक्राच्या थोडे आधी आणि त्यादरम्यान तो आम्लीय होत जातो. म्हणून अशा वेळी संसर्ग होणे सामान्य बाब आहे.
असामान्य सरावाची लक्षणे::
स्रावाचा रंग आणि प्रमाणामध्ये कोणत्याही प्रकारचे परिवर्तन योनिमार्गातील संसर्गाचे लक्षण असते. योनिमार्गातील संसर्गाची लक्षणे खालीलप्रमाणे –
• स्रावासोबत खाज, व्रण आणि दुखणे
• सतत स्राव होणे
• लघवी करताना त्वचा जळजळणे
• पांढरा दह्यासारखा स्राव
• अस्वच्छ घाण असलेला भुरा/पांढरा/पिवळा/हिरवा स्राव
अतिसूक्ष्म जंतूपासून होणारा संसर्ग :
अतिसूक्ष्म जंतूपासून होणाऱ्या योनी मार्गातील संसर्गाच्या कारणाचा अजूनही शोध लागलेला नाही. योनीच्या नाजूक भागात बिघाड झाल्याने योनीत जंतूची बेसुमार वाढ होते. हे सामान्यपणे होतच राहते आणि याबरोबरच इतर योनी ससंर्गसुद्धा होऊ शकते.
लक्षणे आणि खुण :
• योनिमार्गातील स्राव वाढणे
• भुरा / पांढरा/ पातळ पाण्यासारखा स्राव
• अस्वच्छ घाण स्राव येणे जो संभोगानंतर अधिकच गडद होतो
• योनीत खाज किंवा जळजळ होणे
• योनीत थोडी लाली किंवा सूज येणे
ट्रायकोमोनियासीस   ------
ट्रायकोमोनियासीस ट्रायकोमोनास व्हज्यान्यालिस नावाच्या जंतूमुळे होतो. ट्रायकोमोनियासीस साधारणपणे लैंगिक संपर्काच्या माध्यमातून पसरतो. तथापि हे सूक्ष्म जंतू ओलाव्याच्या वातावरणात २४ तासांपर्यंत जिवंत राहतात. ओल्या टोवेलच्या वापरामुळे हा संसर्ग निश्चितपणे होऊ शकतो.
लक्षणे आणि खुणा ___
पुष्कळशा स्त्रिया यापैकी कोणत्याही लक्षणाविषयी सांगू शकत नाही. हि लक्षणे अशी –
• पिवळा/ हिरवा फेसाळ स्राव
• घाण वास येणारा स्राव
• स्राव येण्यामध्ये वाढ
• वारंवार लघवी येणे
• योनीत जळजळ/ खाज येणे
हा संसर्ग थांबवण्यासाठी केवळ त्या स्त्रीवर उपचार न करता संभोग करणाऱ्या दोघांवरही एकाच वेळी उपचार केला जावा. उपचार पूर्ण होईस्तोवर लैगिक क्रिया करू नये.
फेसाळ संसर्ग __
योनीमध्ये बहुतेक थोड्या प्रमाणात फेस असतो. फेस वाढल्याने फेसाचे संसर्ग निर्माण होते. हे सर्वसाधारणपणे योनीच्या PH संतुलनात होणाऱ्या बदलामुळे होत असते. सामान्यतः हा संसर्ग यौन संचारी नसतो. फेसाळ संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे वाढता तणाव, मधुमेह, गर्भावस्था, गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, आन्तीबायोटीक्सचे सेवन.
लक्षणे आणि खुणा _
• स्रावाच्या प्रमाणात वाढ
• पांढरा दह्यासारखा स्राव
• योनी आणि लगतच्या भागावर लाली, अधिक खाज, जळजळ किंवा दुखणे
• लैंगिक क्रियेच्या वेळी त्रास
• जोपर्यंत जनन क्षेत्रात खाज अथवा जळजळ ही लक्षणे स्त्री सांगू शकत नाही, तोपर्यंत लैंगिक सोबत्यांचा उपचार होऊ शकत नाही.
योनीमार्गातील संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाय ; ; ;
• योनीचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
• सुती अंडरवेअर वापरा.
• लघवी अथवा शौचालायावरून आल्यावर योनीचा पुढील आणि मागील भाग पुसून काढावा.
• डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेपर्यंत औषधे घ्यावीत.
• उपचार पूर्ण होईस्तोवर आणि लक्षणमुक्त होईस्तोवर लैंगिक संबध प्रस्थापित होऊ देऊ नये.
• संसर्ग आणि जळजळ असणारा भाग खाजवू नये. यामुळे त्रास वाढू शकतो.
• योनीच्या आत औषधाचा वापर करीत असाल तर तो मासिक चक्रातही चालू ठेवा.
• संसर्गाच्या वेळी मासिक चक्र सुरु झाल्यास सानेटरी प्याडचा वापर करावा.
• स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संदर्भात अनेक तक्रारी असतात. त्या तक्रारीच्या संदर्भात थोडक्यात विवेचन व त्यावरील उपाय यासंदर्भातील चर्चा आपण या ठिकाणी केली आहे. सुप्रजननासाठी गर्भाशयाचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक असते. प्राथमिक तक्रारीसुद्धा गर्भाशयाचे आरोग्य खराब करण्यासाठी कारणीभूत होतात. योनिस्राव, योनीसंदर्भात इतर संक्रामक आजार हे दिसायला साधे असले तरी त्यामुळे भविष्यात विविहितेस त्याचा धोका संभवू शकतो. गर्भाशयबाह्य गर्भधारणा, ट्यूबल प्रेग्नन्सी, गर्भस्राव, गर्भपात इत्यादी परिणामांना यामुळे सामोरे जावे लागते.
• योनिस्राव, योनी संक्रमण याची माहिती आता आपण पाहिलेलीच आहे. आता याविषयी आयुर्वेदातून कोणते उपचार करता येतील याचे थोडक्यात विवेचन करणार आहोत.
१) त्रिफळा क्वाथ योनिधावन – यामध्ये आवळा, हिरडा, बेहडा यांची भरड अंदाजे १५ ग्राम प्रत्येकी घेऊन त्याचा काढा तयार करावा. हा काढा तयार करत असताना १ लिटर पाण्यात भरड रात्री भिजत ठेवावी. सकाळी भरड पाण्यात कुस्करून १ लिटर पाणी मंद आचेवर अर्धा लिटर होईपर्यंत आटवावे. काढा गाळून घ्यावा. या काढ्याचा उपयोग योनिधावनासाठी तज्ञ वैद्यामार्फत करता येतो अशी व्यवस्था शासकीय आयुर्वेद रुग्णालयात किंवा इतर वैद्याकडे उपलब्ध असू शकते. याशिवाय,
२) दशमूळ भरड
३) पंचवल्कल क्वाथ
४) तुरटी जल
५) पुष्यानग चूर्ण काढा
इत्यादी काढ्याची योजना वैद्य यात करू शकतात. अशा प्रकारचे प्रयोग महाराष्ट्रातील अनेक आयुर्वेदिक रुग्णालयातून केले जातात. याचा लाभ महिलांना घेता येऊ शकतो. अशा चिकित्सेला योनिधावन चिकित्सा असे म्हणतात.

डॉ  सुभाष मार्लेवार M .D .
पोदार  रुग्णालय   वरळी  मुम्बई (सेवेची 75  वर्ष  विशाल  आयुर्वेद  परम्परा  आंतराष्ट्रीय ख्याति प्राप्त रुग्णालय .)..बाह्य रुग्ण  विभाग क्र __5..मंगल ..शुक्रवार ..

प्रसूतिपश्चात काळजी

प्रसूतिपश्चात काळजी

*** वैद्य गोपाल म. जाधव***
(एम.डी. स्त्रीरोग तज्ज्ञ)

स्वातंत्र्योत्तर काळात देशाने जगाच्या स्पर्धेत विलक्षणीय गरुडभरारी घेतली. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, वैद्यक, क्रीडा इ. अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व क्रांतिकारक बदल झाले. त्यामुळे मनुष्यजीवन अधिक सुकर, सुखद व वेगवान बनले. यामुळे पूर्वापार अस्तित्वात असलेल्या अनेक प्राचीन भारतीय रूढींना खीळ बसली. संयुक्त कुटुंबपध्दती हा अतिशय मूलभूत वारसादेखील भारतीय जनमानसांमधून हद्दपार होण्याच्या उंबरठयावर आहे. त्यामुळे कुटुंबातील आबालवृध्दांपासून ते मानवी समूहाच्या प्रत्येक घटकांवर विपरीत परिणाम संभवतो आहे, नव्हे होत आहे.
कुटुंबनियोजनाच्या प्रभावी उपाययोजनेने तसेच साक्षरता व उन्नत विचारसरणीसारख्या अंगीकरणाने दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्यांची संख्या एक किंवा दोनपर्यंत मर्यादित झाली. या विलक्षण स्पर्धेत आपले बालक यशस्वीरीत्या टिकावे म्हणून बालसंवर्धन व सक्षमीकरणाकडे माणसं साहजिकरीत्या आकर्षली गेली. गर्भिणी परिचर्या, गर्भसंस्कार, प्रसवपूर्व मार्गदर्शन यांच्या दुकानदारीचा अक्षरश: ऊत आला असून ज्या बाबी सहजपणे कुटुंबातच होणे अपेक्षित होते त्यासाठी आता तज्ज्ञ लोकांकडून विशेष मार्गदर्शनाची गरज भासत आहे.
'सूतिका' अर्थात प्रसूत झालेली स्त्री. प्रसूती ही जरी स्वाभाविक बाब असली तरी बदलत्या जीवनशैलीत या अवस्थेला सामोरे जाण्यास सक्षमपणे तयार नसतात व त्यातून काही मनस्ताप व काही शारीरिक आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून हा विषय नमूद करणे क्रमप्राप्त आहे.
खरं तर सूतिकेच्या बाबतीत बऱ्याच वेळा अन्यायच होतो. सामाजिक विसंगतेचं ते एक जागतं प्रतीक आहे, कारण एखाद्या कुटुंबात नव्या पाहुण्याची चाहूल लागली की, आनंदोत्सवाचा असा धबधबा सुरू होतो की, त्या गर्भिणी स्त्रीचे प्रत्येक जण आपापल्या परीने कोडकौतुक करून तिच्या संगोपनामध्ये मदत करतो. शेकडो चित्रपटांमधून स्त्रीला पहिल्या वांत्या (उलटया/ओकाऱ्या) होताच तिच्यासाठी आंबट पदार्थ आणण्यासाठी केलेली धावपळ दर्शविली असेल, पण बाळाच्या जन्मानंतर मातेच्याही आरोग्याचे रक्षण महत्त्वाचे असते हे कधी कुणाला मांडावे वाटले नाही. घराघरातून गर्भिणीची घेतली जाणारी काळजी ही अप्रत्यक्षरीत्या बाळाची असते व प्रसवानंतर सर्वांचे लक्ष पुन्हा बाळावरच केंद्रित होऊन त्या बाळाला सुखरूपपणे जन्माला घालणाऱ्या मातेची आबाळ होतेच होते. त्यातही प्रसूतीवेळी टाके पडले असतील, चिमटा (Forcep) किंवा व्हॅक्युम पध्दतीचा प्रसव अथवा सिझेरीयन पध्दतीने प्रसूति झाल्यास तिच्या वेदनांमध्ये अधिकच भर पडते. अशा नवप्रसूत मातांच्या सर्वसाधारण समस्या खालील कारणांमुळे होतात.
1) प्रसव प्रक्रियेमुळे शरीरात उत्पन्न झालेले स्वाभाविक दौर्बल्य.
2) बाळाच्या रडण्यामुळे अथवा त्याच्या संगोपनामुळे  दुर्बलावस्थेत मातेवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण.
3) वारंवार झोपमोड होणे.
4) स्वत:च्या आरोग्यापेक्षा बालकाची काळजी अधिक घेण्याची प्रवृत्ती.
5) विविध कारणांनी भूक मंदावणे. आहारातील वैषम.
6) मानसिक व भावनाप्रधान कारणांनी होणारा त्रास.
7) कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य न मिळणे अथवा वैचारिकदृष्टया मागास कुटुंबात स्त्रीची होणारी कुचंबणा.
8) झालेले अपत्य मुलगी असल्यामुळे होणारा त्रास.
9) व्यसनी पती, आर्थिक कारणे तसेच पूर्वीची लहान मुले असल्यास मातेच्या दु:खाला परिसीमा नसते.
10) शेतकरी, मजूर, कामगार स्त्रिया यांच्याकडेही सूतिका अवस्थेत पूर्णत: दुर्लक्ष होते व अशा स्त्रियांच्या स्वाभिमान व आरोग्य यांचे काही महत्त्व असते हे संपूर्णत: दुर्लक्षिले जाते.
11. नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना कामाचा ताण, बाळापासून होणारी ताटातूट, रजेचा अभाव अथवा तत्सम कारणांमुळे मातृत्व त्रासदायक ठरते.
यापैकी अनेक स्त्रियांच्या नशिबी एकापेक्षा अनेक कारणास्तव त्रासदायक प्रसंग येतात व अशाप्रसंगी योग्य सहकार्य, सहानुभूती व चिकित्सेच्या अभावी माता व बालक यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे सूतिका अवस्था जनसामान्यांनी गांभीर्याने घेण्याची बाब असून त्याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. अन्यथा निकोप व निरोगी समाजाचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या प्रयत्नांना पुरेसे यश लाभणार नाही, हे निश्चित.
सदर बाबतीत आपणास पुढीलप्रमाणे खबरदारी घेता येईल.
अ) प्राथमिक काळजी : ही अवस्था सामान्यपणे बालकाच्या जन्मापासून पहिला आठवडा पूर्ण होईपर्यंतची आहे. वरकरणी पाहिले तर हा रुग्णालयातील काळ होय. प्रसवाच्या स्वरूपानुसार तीन, पाच किंवा सात दिवसांनी माता व बालक यांना रुग्णालयातून निर्गमीत करण्याची पध्दत असते. (प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी सुटी मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर हा अनुभव हमखास येतो.)
1) प्रसवानंतर रक्तस्राव होणे अपेक्षित नसते. त्याकडे स्वत: रुग्णा व सोबतीच्या व्यक्तीने प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक आहे.
2) प्रसवानंतर मल-मूत्र यांचे प्राकृतपणे विसर्जन होणे आवश्यक आहे. गर्भाशय संकोचक औषधे नियमित घ्यावीत.
3) प्रसवानंतर तत्काळ बालकास दूध पाजवण्यास घेणे आवश्यक आहे. बालकाने मातेच्या स्तनांना स्पर्श करणे, चोखणे इ. मुळेच स्तन्यनिर्मिती होते.
4) प्रसवपथाला टाके पडले असल्यास रुग्णेने त्या भागावर ताण पडणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
5) टाके दररोज स्वच्छ ठेवणे व निर्जंतुक औषधाने साफ करणे आवश्यक आहे.
6) बालकास झोपवून दूध पाजू नये अथवा झोपेत बाळ अंगाखाली दबणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी.
ब) द्वितीयक काळजी : ही अवस्था रुग्णालयात यशस्वीपणे उपचार करून घरी परतल्यानंतरची असून एकदा ही अवस्था संपली की, तिची काळजी घेणे आवश्यक नसल्याचे सर्वांना वाटते. म्हणून घरी आल्यानंतरही मातेचे आरोग्य हा विषय संपत नाही. वास्तविकपणे एका बाळाच्या निर्माणार्थ खर्ची पडलेल्या शक्तीच्या पुनर्भरणाचा हा काल असून ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांच्या बाबतीत ही काळजी घेतली जात नाही. परिणामी अशा शक्तिहीन व दुर्बल माता तशाच अवस्थेत पुन्हा गर्भवती बनतात व दुर्दैवाची मालिका सुरूच राहते. त्यामुळे रुग्णालयांतून घरी आणलेल्या प्रसूत स्त्रीसाठी खालील बाबी अनिवार्य आहेत.
1) सुमारे एक ते दीड महिना कष्टाची कामे टाळणे.
2) रोज किमान सहा तास झोप झालीच पाहिजे. त्यातील किमान दोन तास तरी झोप सलग असावी.
3) सकस व संपूर्ण आहाराचे कटाक्षाने सहा महिन्यांपर्यंत सेवन.
4) शरीराच्या स्वच्छतेची कटाक्षाने काळजी घेणे.
5) घराबाहेरील पदार्थ सेवन करणे टाळणे.
6) दर दोन तासांनी बाळास दूध पाजणे व त्यानंतर स्तनातील उरलेले दूध काढून टाकणे.
7) दूध पाजताना नेहमी ताठ बसणे व पाठीच्या कण्यास आधार देणे आवश्यक आहे.
8) गरोदरपणातील रक्तवर्धक व कॅल्शियमयुक्त गोळयांचे तीन ते सहा महिन्यांपर्यंत सेवन करणे.
9) प्रदर, ज्वर, सनशोथ, शूल, उदरशूल यांसारख्या कारणांसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेणे.
10) बालकास प्रखर वारा, प्रकाश, गोंगाट, माणसांची वर्दळ यांपासून दूर ठेवावे. वातानुकूलित घरातही फार थंड वातावरण असू नये.
11) संतती प्रतिबंधन अवश्य करावे. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाने उपचारपध्दतीचा अवलंब करावा.
12) प्रसूतीपश्चात तूप, बदाम, काजू, मेथी लाडू यांचा प्रमाणबध्द वापर करावा. अति संतपर्णाने वजन वाढण्यापलीकडे काही साध्य होत नाही.
13) दुधाचे पदार्थ, शतावरी, भात यांसारख्या उपचारांनी तसेच माता आनंदी राहिल्याने स्तन्यप्रादुर्भाव उत्तम होतो. होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
14) बालकाच्या लसीकरणासाठी तत्पर राहणे व नियमित वेळेवर योग्य लसीचा डोस बालकास द्यावा.
15) सुरक्षित मातृत्व व बालसंवधनार्थ दोन अपत्यांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर ठेवावे.
गर्भिणी व सूतिका महिलांसाठी शासन स्तरावर विविध  योजना राबवल्या जात असून त्यात 'जननी सुरक्षा योजना', 'जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम', 'अब्दुल कलाम पोषण आहार योजना' इ.बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचा योग्य लाभ घेऊन राष्ट्रीय 'माता-बाल संगोपन' कार्यास मदत करून सामाजिक विकासामध्ये योगदान द्यावे.
                                           - साहाय्यक प्राध्यापक
                                     शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
                                        भ्रमणध्वनी : 8087043758
                                      gmahadev2009@gmail.com

Visit Our Page